Tuesday, December 23, 2025
Home Blog Page 543

Vande Bharat Express : देशातील पहिल्या 20 कोच असलेल्या ‘वंदे भारत एक्सप्रेस’ची ट्रायल रन यशस्वी

Vande Bharat Express : पूर्णपणे स्वदेशी बनावटीची वंदे भारत एक्सप्रेस आता देशभर प्रवाशांच्या पसंतीस उतरत आहे. एवढेच नाही तर देशभरातून या रेल्वेसाठी मागणी देखील होत आहे. दरम्यान वंदे भारत रेल्वे बाबत एक नवी माहिती समोर आली आहे. तुम्हाला माहितीच असेल मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रस्तावित असून याचे काम वेगाने सुरु आहे. पण आता देशाची आर्थिक राजधानी मुंबई आणि अहमदाबाद दरम्यान लवकरच वंदे भारत ट्रेन सुरू होण्याची शक्यता आहे. त्याची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. भारतीय रेल्वेने 9 ऑगस्ट रोजी 20 डब्यांसह पहिल्या वंदे भारत ट्रेनची (Vande Bharat Express) यशस्वी ट्रायल घेण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार , दिनांक 9 ऑगस्ट रोजी सकाळी सात वाजता अहमदाबाद येथून 20 कोच असलेली पहिली वंदे भारत ट्रेन रवाना झाली. अहमदाबाद ते वडोदरा, सुरत असे स्टेशन्स पार करत दुपारी बारा वाजून पंधरा मिनिटांनी ही ट्रेन मुंबई सेंट्रलला पोहोचली. अशाप्रकारे या ट्रेनची ट्रायल रन यशस्वीपणे पार पडली. तसे पाहायला गेल्यास देशातल्या मोठ्या शहरांमध्ये वंदे भारत ट्रेनचे 16 तर छोट्या शहरांमध्ये आठ कोच असलेली ट्रेन चालवली जाते. तर अहमदाबाद ते मुंबई (Vande Bharat Express) यांच्या दरम्यान सध्या 16 -16 कोच असलेली वंदे भारत ट्रेन (Vande Bharat Express) सुरू आहे. तर अहमदाबाद पासून 20 कोचेस असलेली वंदे भारत ट्रेन सोडण्यात येणार आहे. ट्रायल रन घेतलेल्या ट्रेनमध्ये 14C+ 2E आणि 4चा असे कोच जोडले गेले आहेत.

देशभरातून वंदे भारत एक्सप्रेसला मिळणारा प्रचंड प्रतिसाद पाहता 20 कोच असलेली वंदे भारत एक्सप्रेसची यशस्वी ट्रायल रन घेण्यात आली. सध्या असलेल्या 16 कोचच्या डब्यांना अधिकचे डबे जोडून 20 कोच असणारी ट्रेन तयार केली गेली असून त्याचे स्पीड हे 130 किलोमीटर (Vande Bharat Express) प्रति तास आहे. अशा या ट्रेनची ट्रायल रन घेताना जास्त कोच जोडल्याने त्याच्या स्पीड मध्ये कोणता फरक पडतो का ? याची चाचणी देखील करण्यात आली. शिवाय ही गाडी किती वेळात मुंबईपर्यंत पोहोचते हे सुद्धा पडताळण्यात आलं?

या यशस्वी ट्रायल रन नंतर या मार्गावर जादा कोच असलेली वंदे भारत एक्सप्रेस सुरु होण्याची (Vande Bharat Express) अपेक्षा आहे.

काकांची पुंगी निघाली, नागोबा डुलाया लागला; व्यंगचित्रावरून रंगला सामना

sharad pawar uddhav thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी विधानसभा निवडणूक जसजशी जवळ येत आहे तस तस राजकीय आरोप प्रत्यारोपाच्या फैलीही वाढतच आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे २ गट पडल्यानंतर दोन्ही गटातील नेते एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. त्यातच शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे काँग्रेस- राष्ट्रवादीसोबत असल्याने विरोधक त्यांच्यावर वेगवेगळ्या मुद्द्यांवरून निशाणा साधतच असतात. आजकाल व्यंगचित्रातून टोमणे- ताशेरे ओढणे सुद्धा सोशल मीडियाच्या माध्यमातून सुरुये. शिवसेना शिंदे गटाचे व्यंगचित्राच्या रूपाने उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला आहे. काकांची पुंगी निघाली, नागोबा डुलाया लागला या मथळ्याखाली या टोला ठाकरेंना लगावण्यात आलाय.

महाविकास आघाडीत उद्धव ठाकरेंना मानाचे स्थान मिळत नाही, काँग्रेस- राष्ट्रवादीकडून त्यांची मुस्कटदाबी होते अशी टीका भाजप आणि शिंदे गट सातत्याने करत असतो. त्यातच उद्धव ठाकरे हे ३ दिवसाच्या दिल्ली दौऱ्यावर गेल्यानंतर विरोधकांची टीकेची धार आणखी वाढली. गांधी घराणे आणि शरद पवार यांच्यासमोर ठाकरेंचं काही चालत नाही असा आरोपही विरोधकांनी यापूर्वी केलाय. याच पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाने शरद पवार, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांचे व्यंगचित्र काढत टोला लगावला आहे.

काय आहे व्यंगचित्रात ?

शिवसेनेच्या ट्वीटर हँडलवरुन जे ट्वीट करण्यात आले आहे. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार. हे पुंगी वाजवताना दिसत आहे. तर त्यांच्या तालावर संजय राऊत उद्धव ठाकरे, आणि आदित्य ठाकरे हे डोलत असल्याचे चित्र रंगवण्यात आले आहे. संजय राऊत हे तर पुंगीवरच गुडघे टेकून बसल्याचे यात दिसतंय. जर आपण बारकाईने पाहिले तर या चित्रात मशाल हे उद्धव ठाकरे यांचे चिन्हं विझल्याचे आणि त्यातून आता केवळ धूर येत असल्याचा मार्मिक चिमटा या व्यंगचित्राच्या माध्यमातून काढण्यात आला आहे. काकांची पुंगी निघाली, नागोबा डुलाया लागला असं म्हणत शिंदे गटाने उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.

Lonavala Tourism | लोणावळ्यात पर्यटनासाठी आलेल्या ग्रुपमध्ये झाला वाद, एका मुलाने उचलले टोकाचे पाऊल

Lonavala Tourism

Lonavala Tourism | महाराष्ट्रमध्ये पर्यटनासाठी अनेक पर्यटन स्थळ आहेत. पावसाळा सुरू झाल्यावर या पर्यटन स्थळाला राज्यभरातून अनेक पर्यटक भेट देत असतात. त्याचप्रमाणे पुण्याजवळील लोणावळा हे ठिकाण पावसाळ्यातील पर्यटनासाठी खूप प्रसिद्ध आहे. पावसाळ्यामुळे या ठिकाणी मोठमोठे धबधबे असतात. त्याचप्रमाणे निसर्गाचे सौंदर्य बघण्यासाठी अनेक लोक इथे गर्दी करत असतात. या काळातील स्थानिक लोकांचा चांगला रोजगार देखील मिळतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी असते. अशातच आता पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांमध्ये वाद झाल्याची घटना नुकतेच लोणावळ्यामध्ये (Lonavala Tourism) घडलेली आहे. या वादामुळे एका तरुणाने प्राण धोक्यात घालण्याचा निर्णय देखील घेतलेला आहे. परंतु नशिबाने तो वाचला. रागात असलेल्या तरुणाने राजमाची या पॉईंटवरील कड्यावरून उतरण्याचा निर्णय घेतलेला. परंतु त्या ठिकाणी असलेल्या लोखंडी जाळीमुळे त्याचा जीव वाचला.

नक्की काय घडले ? | Lonavala Tourism

एक पर्यटकांचा ग्रुप लोणावळ्यामध्ये फिरण्यासाठी आला होता. त्या आलेल्या ग्रुपमधील एक युवकांमध्ये शाब्दिक वाद झाले. त्यानंतर तेथील एका पर्यटकाने रागाच्या भरात डोंगराच्या माथ्यावरून थेट खंडाळ्यातील राजमाची पॉईंट येथील खोलदरी धोकादायक गडावरून खाली उतरण्याचा प्रयत्न केला. परंतु राजमाची पॉईंट खाली बसून एक्सप्रेस हायवेवर येऊ नये. यामुळे त्या ठिकाणी लोखंडी जाळी लावण्यात आली होती. तो व्यक्ती खाली उतरला परंतु त्या जाळीमुळे तो रस्त्यापर्यंत आला नाही. त्याचा जीव वाचला.

राजमाची पॉइंट वरून हा युवक उतरत असल्याची बातमी सगळीकडे पसरली. त्यानंतर लोणावळा शिवदुर्ग बचाव पथकाने त्या स्थळी धाव घेतली. आणि त्याची शोध मोहीम सुरू केली. परंतु हा तरुण खाली स्वतः उतरत गेल्याचे समजले आणि त्यांनी त्यांची शोध घेण्याची मोहीम थांबवली त्यानंतर त्यात पर्यटकाला खंडाळा बोरघाट दुरुस्त महामार्ग या पोलिसांनी ताब्यात घेतले. नंतर त्याला समज देऊन सोडवण्यात देखील आले. त्यांनी केलेला हा जीवघेणा प्रयत्न त्यांच्या जीवावर भेटू शकला असता. आणि इतर लोकही अडचणीत आले असते. या सगळ्याची माहिती त्याला नीट पटवून दिली आणि त्यानंतर त्याला सोडून देण्यात आले.

Rameswaram Tour | IRCTC मार्फत 2 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत रामेश्वरला भेट देण्याची संधी; असे करा बुकिंग

Rameswaram Tour

Rameswaram Tour | आपल्या भारतात अनेक वेगवेगळे पर्यटन स्थळ आहेत. त्यामुळे अनेक लोक इथे भेट देत असतात. आपल्या भारताला सांस्कृतिक आणि पर्यटक वारसा देखील मिळालेला आहे. अनेक रूढी परंपरांनी समृद्ध असलेली अनेक ठिकाण देखील आहे. यातीलच रामेश्वरम (Rameswaram Tour) हे भारतातील एक सगळ्यात मोठे आदरणीय क्षेत्र आहे. हे सर्वाधिक भेट दिल्या जाणाऱ्या एका शिवमंदिरांपैकी एक आहे. जय श्रीरामनाथ स्वामी यांना समर्थित केले जाते. रामनाथ स्वामी मंदिर हे एक तीर्थक्षेत्र आहे.

ज्या ठिकाणी प्रचंड शिल्पकृतीखांब पवित्र पाण्याच्या टाक्या आहेत. त्याचप्रमाणे भाविक समुद्रकिनाऱ्यापासून पूर्व मंदिराच्या पूर्वेला अग्नी तीर्थाच्या पाण्यात देखील स्नान करतात. त्यामुळे हे ठिकाण अत्यंत पवित्र मानले जाते. यासोबतच गंधमादन पर्वत हा या बेटाचा नजारा असलेली टेकडी आहे. त्यामुळे तुम्हाला जर एका अद्भुत दृश्याचा अनुभव घ्यायचा असेल, तर तुम्ही आयुष्यात एकदा तरी या रामेश्वरमला भेट द्यावी. अगदी कमी खर्चामध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारे एक ट्रिप करता येईल. आता याच टूर पॅकेजबद्दल आपण जाणून घेऊया.

तुम्ही IRCTC च्या माध्यमातून रामेश्वरम (Rameswaram Tour) टूरसाठी 3950 रुपयात करू शकता. हे पॅकेज एका दिवसासाठी असणार आहे. त्यामुळे तुम्ही हा प्लॅन करू शकता. या पॅकेज मद्ध्ये तुम्हाला श्री रामनाथस्वामी मंदिराला भेट देता येईल. त्याचप्रमाणे इतर अनेक ठिकाणे पाहता येतील. तुम्ही अगदी तुमच्या सुट्टीच्या दिवशी देखील ही ट्रिप प्लॅन करू शकता. IRCTC च्या या टूर पॅकेजबद्दल तपशीलवार जाणून घेण्यासाठी त्यांच्या अधिकृत वेबसाईटला देखील भेट देऊन सर्व माहिती मिळवू शकता. म्हणजे अगदी कमी खर्चात आणि कमी वेळेत तुम्ही ही ट्रिप करू शकता.

Pune : दिलासादायक ! पुण्यातील पूरग्रस्तांना मिळणार 25 हजार रुपये ; जिल्हाधिकाऱ्यांचे आश्वासन

Pune : मागच्या काही दिवसांपूर्वी पुण्यात मुसळधार पाऊस झाल्यामुळे पुण्याला पाणीपुरवठा होणाऱ्या खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आल्यामुळे पुण्यातल्या अनेक भागात पूर आला होता. नदीच्या जवळची अनेक घरे दुकाने सोसायट्यांमध्ये पाणी शिरले होते. काही ठिकाणी तर अगदी छातीएवढे पाणी होते. त्या भीषण स्थितीतून अद्यापही पूरग्रस्त सावरत असून पूरग्रस्त नागरिकांना काहीसा दिलासा मिळेल अशी माहिती समोर आली आहे. पुण्यातही पूरग्रस्तांना २५ हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाणार असल्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांकडून (Pune) देण्यात आले आहे.

निकष केले जाणार शिथिल ? (Pune)

पुण्यातील पूरग्रस्तांना 25 हजार रुपये दिले जाणार असल्याचं आश्वासन पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे. पुण्यातील पूरग्रस्तांसाठी नुकसान भरपाईचे निकष शिथिल करण्यात येणार असल्याची माहिती देखील समोर येत आहे. पुरामुळे अनेकांच्या घरात पाणी शिरलं असल्याने लोकांना त्रासाला सामोरे जावे लागले होते. अनेकांच्या घरात दोन ते तीन दिवस पाणी साचून होते तर मोठ्या प्रमाणात गाळही साठला (Pune) होता.

व्यावसायिकांना मदतीचा हात (Pune)

दरम्यान व्यावसायिक आणि दुकानदारांच्या झालेल्या नुकसानासाठी ही मदतीचा हात देणार असल्याची माहिती समोर येत आहे. व्यापारी, दुकानदार यांचेही मोठ्या प्रमाणात या पुरामध्ये नुकसान झालं. मतदार यादीत नाव असलेले आणि नोंदणीकृत परवानाधारक दुकानदार यांना नुकसानीच्या 74% किंवा जास्तीत जास्त 50 हजार जि रक्कम जास्त असेल ती दिली जाणार आहे. तर टपरी धारकांचाही यात समावेश करण्यात (Pune) आला आहे. शहरातली अतिक्रमण वाढली आहेत त्यामुळे देखील पुराची तीव्रता वाढली होती. ती अतिक्रमणे देखील काढण्यात येणार आहेत अशी माहिती समोर येत आहे. याशिवाय पूर रेषा देखील नव्याने आखण्यात येणार (Pune) आहेत.

यशस्वीत्यांच्या मार्गदर्शकाची कहाणी; तो ‘वाटाड्या’ एक…!

Pune University

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजवर तुम्ही,आम्ही,आपण फक्त यशस्वीतांच्या स्टोर्या,गप्पा ऐकल्या असतील.पण आजची कहाणी जरा हटके आहे.ती कहाणी आहे एका मार्गदर्शकाची किंवा आजच्या सिनेमाच्या भाषेत सांगायचं तर मित्र, तत्वज्ञ,वाटाड्याची अर्थात ‘मितवा’ची. कहाणी आहे महादेव नरवडे नावाची गुरुजींची.दुष्काळग्रस्त धाराशिव जिल्ह्यातल्या एका छोट्याशा खेडेगावात सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातला गुरुजींचा जन्म. खानदानी मराठा असले तरी आर्थिक परिस्थिती प्रचंड बेताचीच.अख्ख घरदार माळकरी, वारकरी.म्हणून जन्मजात अध्यात्माचे संस्कार.काहीही झालं तरी नैतिकता सोडायची नाहीं हा त्यांच्या वडिलांचा शिरस्ता.कसतरी जेमतेम शिक्षणाच्या सोयीत गुरुजींनी आपलं दहावी पर्यंतचं शिक्षण गावातच पूर्ण केलं.दहावी झालो म्हणून बारावी केली.आता शिक्षण बास झालं.पूढे पोटापाण्याचा उद्योग म्हणून त्यांनी काहीकाळ शेतीकडे लक्ष दिलं.पण सततचा दुष्काळ आणि कायमची नापीकी म्हणून तिकडं किमान जगण्याच्या अपेक्षा पूर्ण होतील याची काहीच शाश्वती नव्हती म्हणून पूर्ण नोकरी करावी या उद्देशाने मास्तर पुण्यात आले. लागलीच कुठल्या सिक्युरिटी संस्थेत अवघ्या २५०० रुपये पगाराची नौकरी धरली.बऱ्याचदा कामाचं स्वरूप रात्रपाळीत असतं म्हणून दिवसा काहीतरी करावं या उद्देशाने पर्वती पायथ्याजवळच्या शाहू कॉलेजला नावालाच फक्त म्हणून त्यांनी बीएला अँडमिशन घेतल आणि बस त्यादिवसापासून गुरुजींच्या आयुष्याला कलाटणी मिळाली.

बीए झालं म्हणून पुढे एमए केलं.त्याबरोबरच एमपीएससीचा अभ्यासही सूरू केला.एक – दोन अटेंप्ट दिलेत.त्यात अपयश आलं म्हणून नेट – सेटचा पर्याय त्यांनी धुंडाळून पाहिला.सेट परीक्षेच्या पहिल्याच प्रयत्नात त्यांना यश आलं. आपल्याला मिळालेल्या यशाची क्लूप्ती इतरांनाहीं सांगावी या उद्देशाने एक विध्यार्थीकेंद्री अभ्यास चळवळ उभी राहिली त्या चळवळीचेच नावं म्हणजे आपला मास्तर,सेट – नेट डिजिटल लर्निंग हब. आज याचं आपला मास्तर सेट – नेट डिजिटल लर्निंग हबने ऐतिहासिक आणि अभूतपूर्व असं यश मिळवलं आहे.महाराष्ट्र सेट परीक्षा – २०२४ मध्ये तब्बल १०० + विध्यार्थी गुणवत्ता यादीत चमकले आहेत.

या अभूतपूर्व यशाबद्दल बोलतांना प्रा. महादेव नरवडे म्हणाले की ‘माझे वडिल अशिक्षित असले तरी असंख्य अभंग त्यांना तोंडापाठ होते.म्हणून ते बऱ्याचदा संत वचन सांगत राहायचे.मला त्यातलं एक वचन कायम स्मरत राहतं ‘जे जे आपणासी ठावे ते ते इतरांसी सांगावे, शहाणे करून सोडावे सकल जण! याप्रमाणे मी कायम आपलं कामं करत असतो आणि त्यातूनच हे यश मिळालं आहे असं मला वाटतं. सर्वतोपरी विध्यार्थी हिताचं कामं करणाऱ्या गुरुजींना हॅलो महाराष्ट्र कडून कडकडीत सलाम!

मिरज विधानसभा मतदारसंघ भाजपच्या सुरेश खाडे यांच्या हातातून जाणार?

Miraj vidhan sabha

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सलग तीन टर्मची हॅट्रिक… अनेक मातब्बरांना पाणी पाजत मिरजेची आमदारकी गेली पंधरा वर्षे एक हाती ठेवणारा… भाजपचा हा चेहरा म्हणजे सुरेश खाडे (Suresh Khade) … आमदारकी, पालकमंत्री आणि मंत्रीपद असा राजकीय चढता भाजणीचा इतिहास असणाऱ्या खाडेंनी मिरजेत कुठल्याच प्रतिस्पर्ध्याला टिकू दिला नाही… मिरजेत फक्त आपणच! अशा वर्चस्वाच्या राजकारणातून त्यांनी मतदारसंघात पकड मिळवली… पण डाव पलटलाय… लोकसभेला मिरजेतून महायुतीच्या बाजूने मायनस मध्ये लीड गेलंय… आकडा सांगतोय, विद्यमान आमदार खाडे साहेब यांची आमदारकी धोक्यात आहे… म्हणूनच खाडेंना पराभवाचा धडा शिकवण्यासाठी अनेक मातब्बर मिरजसाठी तयारी करतायत.. अगदी त्यात लोकसभेला डिपॉझिट जप्त झालेल्या ठाकरे गटाच्या चंद्राहार पाटलांचेही नाव आहेच… खाडे यांच्या आमदारकीचा चौकार रोखण्यासाठी डझनभर इच्छुक उमेदवार नेमके आहेत तरी कोण? यापैकी भाजपचा पराभव करत मिरजचा खाडेंचा बालेकिल्ला ढासळवण्याची हिंमत नेमकी कुणाच्यात आहे? मविआ ते महायुती यांच्यात मिरजसाठी चाललेली रस्सीखेच ते मिरजच्या स्थानिक जनतेचा कौल नेमका कुणाच्या बाजूने आहे? त्याचाच हा सविस्तर आढावा…

सांगलीचे पालकमंत्री आणि मिरज विधानसभेचे स्टॅंडिंग आमदार सुरेश खाडे यांच्या विरोधात लढत देण्यासाठी तब्बल दोन डझनभर इच्छुकांनी राजकारण तापवायला सुरुवात केलीये… लोकसभेला मिरजेतून भाजपचं लीड घटल्याने यातल्या अनेकांना आता आमदारकीची स्वप्नही पडू लागलेत… खरतर 2009 मध्ये नव्याने तयार झालेला मिरज हा विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जाती जमातीसाठी राखीव झाला… तेव्हापासून ते सलग तीन टर्म भाजपाच्या तिकिटावर वन साईड निवडणूक जिंकण्याचा करिष्मा हा सुरेश खाडे यांनी केला… खरंतर खाडे यांचा पराभव करणं तशी फा र अवघड गोष्ट नाही… पण विरोधकांच्यात एकी कमी आणि बेकी जास्त… 2009 ला राष्ट्रवादी काँग्रेस तर 2014 ला काँग्रेसकडून तर 2019 ला बाळासाहेब होनमारे यांनी स्वाभिमानी कडून खाडेंना लढत दिली खरी पण खाडे मोठ्या लीडने दणक्यात विजयी झाले… खाडे कामगार मंत्री झाले…

जिल्ह्याच्या पालकत्वाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आल्याने सांगलीतील त्यांचं वजनही वाढलं… पण याच पालकमंत्र्यांना आपल्याच हक्काच्या बालेकिल्ल्यातून विधानसभेला मायनस मध्ये जावं लागलय… त्यामुळे खाडेंच्या राजकीय वर्चस्वला सव्वाशेर होण्यासाठी अनेक इच्छुकांनी सध्या दंड थोपटलेत… अर्थात त्यात पहिलं नाव येतं ते प्राध्यापक मोहन वनखंडे यांचं… खरंतर खाडेंच्या राजकारणाच्या पाठीशी सावलीसारखे उभे राहणारे वनखंडे हे त्यांचे स्वीय सहाय्यक… खाडेंच्या राजकीय मोर्चेबांधणीपासून ते प्रशासकीय कामांची पूर्तता करण्यापर्यंत पडद्या आडून सगळी सूत्र वनखंडेच चालवत होते… पण सुरेश खाडेंना पालकमंत्री पद भेटल्यानंतर या राम- लक्ष्मण जोड गोळी एक मिठाचा खडा पडला… दोघे एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले… तब्बल दीड दशकांच्या राजकीय जनसंपर्काच्या जोरावर सध्या ते खाडेंऐवजी आपल्याला तिकीट मिळावं, यासाठी लॉबिंग करत आहेत…

दुसर्‍या बाजूला महायुतीतूनच जनसुराज्य शक्तीने मतदारसंघावर प्रबळ दावा केला आहे. राज्यात महायुतीची सत्ता आल्यानंतर जनसुराज्यने आपल्या वाट्याला मिळणारा विकास कामाचा निधी मिरज मतदारसंघासाठी खेचून आणला. पक्षाचे अध्यक्ष आमदार विनय कोरे यांनी मिरजेतील मेळाव्यात मिरजेवर केलेला दावा आणि यानंतर प्रदेशाध्यक्ष समित कदम यांनी मिरजची जागा जनसुराज्यच लढवेल, अशी ठाम भूमिका घेतल्याने पालकमंत्र्यांनाच उमेदवारीसाठी धडपड करण्याची वेळ मिरजमध्ये आली आहे… त्यात शिंदे गटाकडूनही युवा आघाडीचे जिल्हा प्रमुख सचिन कांबळे यांनी गावभेट दौरे सुरू करून उमेदवारीचा एल्गार केला आहे… थोडक्यात महायुतीमध्ये मिरजची जागा कोण लढवणार? यावरून बराच झांगडगुत्ता असल्याचं पाहायला मिळतंय…

दुसऱ्या बाजूला मविआमध्येही उमेदवारीचा जोर काही कमी नाही… काँग्रेसमधून ठाकरेंचं शिवबंधन हाती बांधलेल्या प्रा. सिद्धार्थ जाधव यांनी काहीही झालं तरी निवडणूक लढणारच, असा जणू पण केलाय… बाळासाहेब होनमारे यांनीही आत्तापर्यंत जमलं नाही पण 2024 ला एक घाव आणि दोन तुकडे करायचेच, असा चंग बांधल्याने खाडेंसाठी आमदारकी वाटते तितकी सोपी नक्कीच नाही… महेशकुमार कांबळे, महेंद्र गाडे, महादेव दबडे, इंद्रजित घाटे, सी. आर. सांगलीकर, अशोक कांबळे अशा एक ना दोन डझन इच्छुकांची भाऊगर्दी एकट्या मिरजसाठी झाल्याने मिरजच्या आमदारकीचा तिढा आणखीन गुंतागुंतीचा झाला आहे… त्यात सुरेश खाडे यांनी आयत्या टायमिंगला आपला मुलगा सुशांत खाडे याचं पॉलिटिकल लॉन्चिंग करण्यासाठी खेळी केलीच तर मिरजचं राजकारण गरमा गरमीचं होऊ शकतं…

त्यात निवडून आल्यानंतर खाडे गायब होतात आणि पुढच्या निवडणुकीआधी वर्षभर हात सैल सोडतात, असं तोंडसुख त्यांच्यावर नेहमीच घेतलं जातं… मनी आणि मसल पॉवर असल्यामुळे पक्षापेक्षा आपलं बस्तान बसवण्यात त्यांचा जास्त इंटरेस्ट असतो, असा आरोपही त्यांच्यावर वारंवार होत असतो… म्हणूनच जिल्हाध्यक्षांपासून खासदारा पर्यंतची सगळी मंडळी त्यांना थोडीफार टरकून असल्याचंही बोललं जातं… आपल्या मतदारसंघातील खड्डे नीट करता आले नाहीत… अनेक योजना, प्रकल्प हे गोगलाईच्या संथ गतेने पुढे सरकतायत… अर्थात पायाभूत सुविधा आणि औद्योगिक जाळं या सगळ्या पातळ्यांवर खाडे साहेबांची उदासीनता पाहता मिरजची जनता त्यांचा करेक्ट कार्यक्रम करण्याचे चान्सेस सध्या जास्त वाढलेत… पण वाढलेल्या इच्छुकांची भाऊ गर्दी पाहता… गटतट आणि बंडखोरी झाली… तर विस्कटलेलं मतदान खाडे साहेबांच्या पथ्यावर पडू शकतं, हेही तितकच खरं…

Bullet Train : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन बाबत मोठी अपडेट समोर ; रेल्वे मंत्रालयाने दिली माहिती

Bullet Train : भारतीय रेल्वे ही सार्वजनिक वाहतुकीच्या साधनांमध्ये प्रमुख पर्याय आहे. त्यामुळेच भारतीय रेल्वे विभाग आणि भारत सरकार यांच्या माध्यमातून ही सेवा आणखी सुलभ व्हावी यासाठी प्रयत्न केले जात आहेत. रेल्वे मार्ग विस्तारण्यासोबतच नवीन ट्रेन्स तसेच बुलेट ट्रेन , मेट्रो असे महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. सरकारच्या अशाच महत्वकांक्षी प्रकल्पांपैकी (Bullet Train) एक प्रकल्प म्हणजे मुंबई -अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प. या प्रकल्पाबाबत एक महत्वाची अपडेट आता हाती आली आहे चला जाणून घेऊया…

महाराष्ट्रातील मुंबईला गुजरातमधील अहमदाबादशी जोडणाऱ्या महत्त्वाकांक्षी मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल कॉरिडॉर (MAHSR) बुलेट ट्रेनची देश आतुरतेने (Bullet Train) वाट पाहत आहे. रेल्वे मंत्रालयाने बुधवारी , 7 ऑगस्ट रोजी या प्रकल्पाबाबत मोठी अपडेट शेअर केली आहे . त्यानुसार मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पात लक्षणीय प्रगती झाली आहे आणि मुख्य बांधकाम टप्प्यांमध्ये लक्षणीय प्रगती होत आहे आणि हा प्रकल्प पूर्णत्वाच्या जवळ आहे असे सांगण्यात आले आहे.

रेल्वे मंत्रालयाने ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली आहे त्यामध्ये म्हण्टले आहे की , “देशातील पहिला #BulletTrain प्रकल्प पूर्ण होण्याच्या दिशेने लक्षणीय प्रगती, मोठ्या बांधकामाचे टप्पे सुरू आहेत.” सोबतच रेलवे मंत्रालयाने 31 जुलै 2024 पर्यंत केलेल्या अनेक महत्त्वाच्या कामाबद्दल माहिती देणारा सर्वसमावेशक अहवाल शेअर केला.

काय सांगतो अहवाल ?(Bullet Train)

  • भूसंपादन: 100% अधिग्रहित. 1,390 हेक्टर जमीन.
  • पिअर फाउंडेशन: 341 किलोमीटर
  • घाट बांधकाम: 324 किलोमीटर
  • गर्डर कास्टिंग: 231 किलोमीटर
  • गर्डर लॉन्चिंग: 200 किमी

या आकडेवारी सोयाबीटाचा माहिती देताना रेल्वे मंत्रालयाने सांगितले आहे की, प्रकल्पाचे काम सुरळीत सुरू असल्याने रेल्वे रुळ टाकण्याचे कामही सुरू असून ते वेळेत पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

मुंबई-अहमदाबाद हाय-स्पीड रेल्वे कॉरिडॉर

  • मुंबई-अहमदाबाद हाय-स्पीड रेल्वे कॉरिडॉर 1.08 लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीने विकसित केला जात आहे.
  • MAHSR ही भारतातील पहिली बुलेट ट्रेन असेल जी गुजरात, महाराष्ट्र आणि केंद्रशासित प्रदेश दादरा आणि नगर हवेलीमधून जाईल.
  • ही ट्रेन 320 किमी/तास या वेगाने 508 किमी अंतर कापेल.
  • 2026 पर्यंत मुंबई-अहमदाबाद मार्गावर भारतातील पहिली बुलेट ट्रेन सुरू होईल, अशी घोषणा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या वर्षी (Bullet Train) 19 मार्च रोजी केली होती.

PM Kisan Sanman Nidhi Yojana | या दिवशी येणार पीएम किसान निधीचा पुढील हप्ता; त्याआधी ‘हे’ काम नक्की करा

PM Kisan Sanman Nidhi Yojana

PM Kisan Sanman Nidhi Yojana | सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक नवनवीन योजना आणल्या आहेत. त्यातीलच पंतप्रधान किसान सन्माननिधी योजना (PM Kisan Sanman Nidhi Yojana ) ही एक लोकप्रिय योजना आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये दिले जातात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी केवायसी यांनी जमीन पडताळणी करणे, खूप गरजेचे आहे. जर तुम्ही हे काम केले नाही, तर तुमचे हप्ते तुम्हाला येणार नाही. आत्तापर्यंत या योजनेचे 17 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेले आहेत. अशातच आता हाती आलेल्या माहितीनुसार येत्या ऑक्टोबर महिन्यात 18 वा हप्ता जारी होऊ शकतो. जर तुम्ही इतर केवायसी केले नाही, तर तुम्हाला तुमचा हप्ता येणार नाही. यासाठी तुम्हाला अधिकृत वेबसाईटला भेट देऊन संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केल्या करावी लागेल.

पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षाला 6 हजार रुपये 2 हजाराच्या समान हफ्त्यांमध्ये दिले जातात. परंतु या योजनेअंतर्गत जर तुमचा हप्ता आला नसेल, तर तुम्हाला ते करणे खूप गरजेचे आहे.

ई-केवायसी करणे महत्वाचे | PM Kisan Sanman Nidhi Yojana

ई-केवायसी ही एक प्रक्रिया आहे ज्याद्वारे तुम्ही तुमचे आधार कार्ड आणि मोबाईल नंबर वापरून तुमची ओळख सत्यापित करू शकता. तुम्ही तुमच्या घरच्या आरामात ई-केवायसी ऑनलाइन करू शकता. याशिवाय, तुम्ही तुमच्या जवळच्या CSC केंद्रावर जाऊन किंवा तुमच्या बँकेला भेट देऊन ई-केवायसी करू शकता. यासाठी तुम्हाला ई-केवायसी फॉर्म भरावा लागेल आणि बायोमेट्रिक्सद्वारे तुमची ओळख पुष्टी करावी लागेल.

जमीन पडताळणी आवश्यक

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेशी संबंधित शेतकऱ्यांनी त्यांच्या जमिनीची ई-केवायसी सोबत पडताळणी करणे आवश्यक आहे. हे काम न झाल्यास 18 वा हप्ता अडकू शकतो. हे काम मार्गी लावण्यासाठी विभागाला यापूर्वीच सांगण्यात आले आहे. पीएम किसान योजनेअंतर्गत आतापर्यंत एकूण 17 हप्ते जारी करण्यात आले आहेत. पुढील हप्ता ऑक्टोबरमध्ये रिलीज होण्याची अपेक्षा आहे. या योजनेतून शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळते. देशातील करोडो शेतकरी या योजनेचा लाभ घेतात.

RBI Big Decision | चेकने पेमेंट करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! RBI ने घेतला मोठा निर्णय

RBI Big Decision

RBI Big Decision | बँकेच्या ग्राहकांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर आलेली आहे. जे लोक चेकने पेमेंट करतात, त्यांच्यासाठी ही बातमी अतिशय महत्त्वाची आहे. गेल्या अनेक वर्षांपासून चेक आणि कॅश या दोन्ही पद्धतीने व्यवहार करणे खूप कमी झालेले आहे. सध्या ऑनलाईन पेमेंटमुळे या गोष्टी अत्यंत जलद आणि सोप्या झालेल्या आहेत. डिजिटल इंडिया करण्याचे मोदींचे स्वप्न हे साकार होताना दिसत आहे. त्यामुळे सध्या कॅश आणि चेकने व्यवहार करणे अत्यंत दुर्मिळ झालेले आहे. परंतु ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी तुम्हाला यूपीआय पेमेंट एप्लीकेशनचा देखील उपयोग होत आहे.

आजकाल गुगल पे, फोन पे, पेटीएम यांसारख्या यूपीआय पेमेंट एप्लीकेशनचा उपयोग करून सर्वसामान्य लोकांना अगदी सहजपणे पैशांचा व्यवहार देखील करता येत आहे. यामुळे पैसे पाठवणे आणि पैसे स्वीकारणे खूपच सोपे आणि जलद झालेले आहे. अगदी भारतातील कुठल्याही ठिकाणी असताना व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला पैसे पाठवू शकतो. परंतु व्यापारी लोक हे नेहमीच त्यांचे पेमेंट चेकने करत असतात.

त्याचप्रमाणे जेवढी रक्कम मोठी असते. त्याबाबतचे पेमेंट अनेक लोक चेकने करतात. ऑनलाइनमुळे चेकने पेमेंट करणाऱ्यांची संख्या कमी झालेली असली, तरी मोठ्या कामासाठी चेकचा वापर केला जातो. रियल इस्टेट, शैक्षणिक संस्था, जमिनीचे व्यवहार व्यवसायांसाठी आजही चेकचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो.

अशातच आता आरबीआयने (RBI Big Decision) चेकने पेमेंट करणाऱ्या ग्राहकांसाठी एक मोठा निर्णय घेतलेला आहे. 6 ऑगस्ट पासून आरबीआयची पतधोरण समितीची बैठक सुरू होती. ही बैठक 6 ते 7 ऑगस्टपर्यंत झालेली आहे. या बैठकीत अनेकांच्या अनेक निर्णय घेण्यात आलेले आहेत. त्यामुळे आता नक्की काय निर्णय घेतलेले आहेत. याकडे लोकांचे बारीक लक्ष आहे. या बैठकीत रेपो रेटमध्ये देखील बदल होणार असल्याची शक्यता वर्तवली जात होती. परंतु आरबीआयने रेपो रेटमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल केलेला नाही.

अशातच आरबीआयने (RBI Big Decision) एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे.आता चेकने पेमेंट करणाऱ्या लोकांसाठी हा निर्णय आहे. चेक जमा झाल्यानंतर तो चेक झटपट क्लियर होणार आहे. आतापर्यंत बँकेत चेक जमा केल्यानंतर तो चेक क्लिअर होण्यासाठी दोन दिवसांची वाट पहावी लागत होती. परंतु आता अगदी काही तासातच हे चेकने केलेले पेमेंट क्लियर होणार आहे. आरबीआयने घेतलेल्या या निर्णयामुळे आता पैशांच्या व्यवहार देखील अगदी जलद गतीने व्हायला सुरुवात होणार आहे. त्यामुळे चेक देणाऱ्यांना आणि स्वीकारांना देखील मोठा दिलासा मिळणार आहे.