Monday, December 22, 2025
Home Blog Page 550

Ganeshotsav 2024 : पुण्यावरून कोकणात जाण्यासाठी विशेष रेल्वे गाडीचे आयोजन ; पहा वेळापत्रक

Ganeshotsav 2024 : आपल्याला माहितीच असेल की शिक्षणाची पांढरी म्हणून ओळखलया जणाऱ्या पुण्याला आता IT हब म्हणून सुद्धा ओळखले जाते आहे. पुण्यात नोकरी, शिक्षण या निमित्ताने देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक येऊन वसलेले आहेत. त्याचप्रमाणे पुण्यात कोकणी लोकांचे सुद्धा वास्तव्य आहे. कोकणी माणूस जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असला तरी गणेशोत्सवासाठी कोकणात जातोच जातो. म्हणूनच ऐनवेळी होणारी गर्दी पाहता रेल्वे खात्याकडून कोकणात जाण्यासाठी विशेष २२२ गाड्यांची सोय करण्यात आली आहे. यात पुणे येथून सुटणाऱ्या गाडीचा सुद्धा समावेश आहे. चला अधिक जाणून घेऊया पुण्याहून सुटणाऱ्या या विशेष (Ganeshotsav 2024) गाडीबद्दल…

पुण्याहून रत्नागिरी साठी विशेष ट्रेन धावणार आहेत मध्य रेल्वेच्या माध्यमातून हे विशेष गाडी सोडण्यात येत आहे. या गाडीसाठी जर तुम्हाला बुकिंग करायचं असेल तर तुम्ही 7 ऑगस्टपासून या गाडीसाठी बुकिंग करू शकता.

मध्य रेल्वे दिलेल्या माहितीनुसार पुणे – रत्नागिरी विशेष एक्सप्रेस गाडी क्रमांक 0 1 4 4 7 पुणे इथून 7 सप्टेंबर आणि 14 सप्टेंबरला रवाना होणार आहे आणि रत्नागिरी येथे त्याच दिवशी 11:50 वाजता पोहोचणार आहे म्हणजेच या गाडीच्या दोन फेऱ्या होणार आहेत. दुसरी एक गाडी क्रमांक 0 1 4 4 8 या गाडीच्या सुद्धा दोन फेऱ्या होणार आहेत. ही गाडी रत्नागिरी इथून दिनांक ८ आणि दिनांक 15 रोजी सोडली जाणार आहे. ही गाडी (Ganeshotsav 2024) रत्नागिरी रेल्वे स्थानकावरून याच दिवशी 17 वाजून पन्नास मिनिटांनी सुटेल तर पुणे इथे दुसऱ्या दिवशी पाच वाजता पोहोचणार आहे.

‘या’ स्थानकांवर थांबे घेणार

मध्य रेल्वे कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार या ट्रेनला अनेक महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांवर थांबा मंजूर करण्यात आला आहे. ही साप्ताहिक विशेष गाडी चिंचवड, तळेगाव, लोणावळा, कल्याण, पनवेल, पेन, रोहा, माणगाव, वीर, करंजाडी, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड आणि संगमेश्वर रोड या स्थानकांवर थांबा घेणार आहे त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात पुणे ते रत्नागिरी दरम्यान प्रवास करणाऱ्या अनेकांना या गाडीचा मोठा फायदा होणार आहे.

कोकणात जाणाऱ्या इतर गाड्या

लोकमान्य टिळक टर्मिनस ते रत्नागिरी द्विसाप्ताहिक

लोकमान्य टिळक टर्मिनस ते रत्नागिरी द्विसाप्ताहिक विशेष रेल्वे गाड्यांच्या एकूण आठ फेऱ्या असतील. गाडी क्रमांक 0 1 0 31 एलटीटी इथून 6, 7, 13, 14 सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे चार 50 वाजता रत्नागिरी येथे पोहोचेल. तर तीच गाडी रत्नागिरी इथून ७,८,14 आणि 15 सप्टेंबर रोजी सकाळी ८ : 40 वाजता सुटेल आणि एलटीटी इथे त्याच दिवशी सायंकाळी पाच वाजून पंधरा मिनिटांनी पोहोचेल.

पनवेल रत्नागिरी साप्ताहिक विशेष

पनवेल रत्नागिरी साप्ताहिक विशेष गाडीच्या एकूण चार फेऱ्या होतील. गाडी क्रमांक 0 1 4 4 3 पनवेल इथून आठ आणि पंधरा सप्टेंबर रोजी पहाटे चार वाजून 40 मिनिटांनी सुटेल तर रत्नागिरी येथे त्याच दिवशी सकाळी 11:50 वाजता पोहोचेल. तर गाडी क्रमांक 0 1 4 4 4 रत्नागिरी इथून 7 आणि 14 सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजून पन्नास मिनिटांनी सुटेल आणि पनवेल इथं दुसऱ्या दिवशी रात्री दीड वाजता पोहोचेल.

पनवेल रत्नागिरी साप्ताहिक विशेष

पनवेल रत्नागिरी साप्ताहिक विशेष रेल्वे गाडीच्या दोन फेऱ्या धावतील गाडी क्रमांक 0 1 4 4 1 पनवेल इथून 11 सप्टेंबर रोजी पहाटे 4 वाजून 40 मिनिटांनी सुटेल आणि रत्नागिरी येथे त्याच दिवशी सकाळी अकरा वाजून पन्नास मिनिटांनी पोहोचेल. तर दुसरी गाडी 10 सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच पन्नास वाजता रत्नागिरी इथून गाडी सुटेल आणि पनवेल इथे दुसऱ्या दिवशी रात्री दीड वाजता पोहोचेल.

या सर्व गणपती विशेष रेल्वे गाड्यांचा आरक्षण हे 7 ऑगस्टपासून सर्व ठिकाणी संगणकीकृत आरक्षण केंद्रावर करण्यात येईल. शिवाय IRCTC च्या संकेतस्थळावर देखील विशेष शुल्क मध्ये सुरू होणार असं मध्य रेल्वे कडून सांगण्यात आला आहे.

Sheikh Hasina | आई-वडील आणि 3 भावांची झाली हत्या, जाणून घ्या शेख हसीना यांची हृदयद्रावक कहाणी

Sheikh Hasina

Sheikh Hasina | सध्या बांगलादेशमध्ये हे हिंसक आंदोलन सुरू आहे त्याच्यावर सगळ्यांच्या नजरा आहेत. या सगळ्यात पंतप्रधान शेख हसीना यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिलेला आहे. आणि त्यांनी तो देश देखील सोडून दिलेला आहे. आज आपण शेख हसीना यांच्या वैयक्तिक आयुष्य बद्दल माहिती जाणून घेणार आहोत. शेख हसीना यांचे आयुष्य अनेक चढ-उतारांनी भरलेले होते. त्यांचे आई-वडिलांनी तीन भावांची हत्या झाली. त्यानंतर त्यांनी अत्यंत हलाखीमध्ये आयुष्य काढलं. राजकारणातही अनेक वेळा त्यांना हार पचवावी लागली. त्या 2009 पासून पंतप्रधान या पदावर होत्या. परंतु आता त्यांना हे पद सोडावे लागलेले आहे. बांगलादेशात सुरू असलेल्या हिंसक आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शेख हसीना (Sheikh Hasina) यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिलेला आहे.

शेख हसीना यांचा प्रवास | Sheikh Hasina

शेख हसीना यांचा जन्म 28 सप्टेंबर 2017 रोजी झाला. बांगलादेशाचे संस्थापक शेख मुजिबूर रहमान हे त्यांचे वडील होते. घरातील त्या सर्वात मोठ्या होत्या. त्यांचे बालपण हे पूर्व बंगालमध्ये गेले. तेथेच त्यांचे शालेय शिक्षण देखील पूर्ण झाले. त्यानंतरचा काही काळ त्या शेगूनबाही या ठिकाणी राहिल्या. आणि त्याचे संपूर्ण कुटुंब बांगलादेशची राजधानी असलेल्या ढाका या शहरांमध्ये स्थलांतरित झाले.

राजकारणात प्रवेश

शेख हसीना यांना सुरुवातीला राजकारणात कोणत्याही प्रकारचा रस नव्हता. परंतु 1966 मध्ये ईडन महिला महाविद्यालयात शिकत असताना त्यांना राजकारणात जास्त इंटरेस्ट निर्माण झाला. त्यानंतर विद्यार्थी संघटनेची निवडणूक लढवून त्या उपाध्यक्ष झाल्या. त्यानंतर त्यांनी त्यांच्या वडिलांचा आवामी लीग पक्षाचे काम सांभाळण्याचा निर्णय घेतला. आणि युनिव्हर्सिटी ऑफ ढाकामधील विद्यार्थी राजकारणातही त्या सक्रिय झालेल्या होत्या.

आई-वडिलांनी भावाची हत्या | Sheikh Hasina

राजकारणाचे हसीना यांचा प्रवास चांगल्या प्रकारे चालू होता. परंतु 1975 साली त्यांच्या आयुष्यातील काळरात्र आली. ती म्हणजे बांगलादेशाच्या लष्करानं बंड केलं. व त्यांच्या कुटुंबाविरुद्ध बंड पुकारले. या सैनिकांनी शेख हसीना यांची आई वडील शेख मुजीबुर रेहमान आणि तीन भावांची हत्या केली. त्यावेळीस शेख हसीना या त्यांचे पती आणि छोट्या बहिणी सोबत युरोपमध्ये होत्या. त्यामुळे ते या हल्ल्यातून वाचल्या. त्यानंतरचा काही काळ त्यांनी जर्मनीमध्ये घालवला. इंदिरा गांधींचे सरकार आले त्यावेळी त्या भारतात आल्या होत्या. आणि त्यानंतर त्यांच्या बहिणी सोबत दिल्लीमध्ये आल्या.

1981 मध्ये शेख हसीना या बांगलादेशात परत आल्या. आणि विमानतळावर पोहचल्या, तेव्हा त्यांचे स्वागत करण्यासाठी कितीतरी नागरिक तिथे उपस्थित होते. तिथे गेल्यानंतर त्यांनी त्यांच्या वडिलांचा पक्षाचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला. 1986 मध्ये त्यांनी पहिल्यांदा त्या सर्वसाधारण निवडणुकीत उतरल्या आणि परंतु त्यांची हार झाली. त्यावेळी त्या विरोधी पक्षनेत्या म्हणून निवडल्या गेल्या होत्या. 1991 मध्ये पहिल्यांदाच एक प्रकारे बांगलादेशात स्वतंत्रपणे निवडणुका झाल्या आणि त्यावेळी हसीना यांच्या अवामी लीग पक्षाला बहुमत मिळाला आणि खालिदासिया यांचा विरोधी पक्ष सत्तेत आला.

शेख हसीना या त्या पर्यंत दोनवेळा मरता मरता वाचलेले आहेत पहिल्यांदा 1975 साली आणि दुसऱ्यांदा 2004 साली 1975 झाली त्यांच्या संपूर्ण कुटुंबाची हत्या झाली होती. आणि त्यांना देशाबाहेर काढले होते आणि 2004 मध्ये त्यांच्यावर ग्रॅनाईट हल्ला झाला होता. त्यात त्या गंभीर देखील जखमी झाल्या होत्या. या हल्ल्यात एकूण 24 जणांचा मृत्यू झाला होता अशा प्रकारे त्यांनी आतापर्यंतचा आयुष्य काढलेले आहे.

BMC Bharati 2024 | मुंबई महानगर पालिकेत ‘या’ पदांसाठी भरती सुरु; असा करा अर्ज

BMC Bharati 2024

BMC Bharati 2024 | विद्यार्थ्यांसाठी आम्ही एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. म्हणजे आता बृहमुंबई महानगरपालिके अंतर्गत कार्यकारी सहाय्यक या पदाचा रिक्त जागा आहेत. या पदांच्या एकूण 30 रिक्त जागा आहेत आणि त्या जागा भरण्यासाठी इच्छुकानी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. ही भरती प्रक्रिया 5 ऑगस्टपासून सुरु होणार आहे. त्याचप्रमाणे 9 ऑगस्ट 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे उमेदवारांनी अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अर्ज करत आहे. भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.

रिक्त पदांची संख्या | BMC Bharati 2024

या भरती अंतर्गत 29 रिक्त पदे आहेत. आणि ती पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेली आहे.

नोकरीचे ठिकाण

या भरती अंतर्गत निवड झाल्यावर तुम्हाला मुंबई या ठिकाणी नोकरी करावी लागेल

शैक्षणिक पात्रता

या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवार हा कोणत्याही मान्यता प्राप्त बोर्डातून दहावी किंवा बारावी पास असणे खूप गरजेचे आहे. तसेच मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे गरजेचे आहे.

वयोमर्यादा

या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 18 ते 30 वर्षे दरम्यान असणे गरजेचे आहे.

महत्वाचे कागदपत्र | BMC Bharati 2024

पासपोर्ट साईज फोटो, आधार कार्ड रहिवासी दाखला, उमेदवाराचे स्वाक्षरी, शाळा सोडल्याचा दाखला, शैक्षणिक कागदपत्र, जातीचा दाखला

हसीना शेख यांना पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यायला लावणारा; नाहिद इस्लाम नक्की कोण?

Haseena Shaikh And Nahid Islam
Haseena Shaikh And Nahid Islam

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या बांगलादेशची परिस्थिती पाहून संपूर्ण देश आता बांगलादेशकडे नजर लावून बसलेले आहे. या ठिकाणाची परिस्थिती देखील अत्यंत अस्वस्थ झालेली दिसत आहे. या सगळ्या परिस्थितीत शेख हसीना यांनी देखील त्यांच्या पंतप्रधान पदाचा राजीनामा दिलेला आहे. आणि त्यांनी तो देश देखील सोडलेला आहे. बांगलादेशातील शेख हसीना यांना सत्तेवरून उतरवण्यासाठी अनेक खूप प्रयत्न केले गेले. आणि विद्यार्थी नेता नाहीद इस्लाम यांनी हा प्रयत्न खूप जोरदार केला. आणि त्यांच्यामुळेच हसीना शेख यांना पंतप्रधान पदाचा राजीनामा द्यावा लागलेला आहे. स्टुडन्ट अगेन्स डिस्क्रिमिनेशन या विद्यार्थी संघटनेचा तो समन्वयक आहे. आणि त्यांनी येत्या 24 तासात अंतरिम सरकार स्थापन करणार आहे. असे देखील आव्हान सगळ्यांना केलेले आहे.

नाहिद शेख त्या चळवळीचा मुख्य चेहरा आहे. ज्यामुळे शेख हसीना यांना पंतप्रधान पदाचा राजीनामा देऊन देश देखील सोडावा लागलेला आहे. 20 जुलै रोजी पोलिसांनी नाहीद याला अटक केली आरोप केला जात होता. परंतु पोलिसांनीच हा आरोप फेटाळून लावल्याने कोणाला काहीच करता आलेली नाही.

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. ज्यामध्ये नाहीदइस्लामला पोलीस त्यांच्या गाडीत बसून नेत आहेत. बेपत्ता झाल्यानंतर 24 तासानंतरच नाहीद इस्लाम हा पुलाखाली बेशुद्ध अवस्थेत सापडला. परंतु तो बेशुद्ध होईपर्यंत त्याला पोलिसांनी मारहाण केली होती. असा देखील दावा यामध्ये करण्यात आलेला होता.

याआधी 19 जुलै रोजी नाहीत इस्लामचे मित्र आसिफ महमूद आणि अबू बकर यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर सहा दिवसांनी त्यांच्या डोळ्यावर एक पट्टी बांधली आणि त्यांना निर्जनस्थळी दुर्गम भागात सोडण्यात आले. आणि त्यानंतर त्यांच्यावर रुग्णालयात उपचार चालू आहेत. हे उपचार झाल्यानंतर 26 जुलै रोजी त्यांना पुन्हा एकदा ताब्यात घेण्यात आलेले आहे. देशातील सुरक्षिततेसाठी त्यांना ताब्यात देखील घेण्यात आलेला आहे. परंतु यावेळी पोलिसांकडून पोलिसांनी त्यांच्याकडून आंदोलन संपवण्याचे आवाहन करणारे व्हिडिओ देखील शेअर केलेले आहेत. ज्यावेळी नाहीद हे पोलीस कोठडीतून बाहेर आले. त्यावेळी त्यांनी हे आंदोलन जास्त तीव्र करण्याचा निर्णय घेतला आणि तशी पावले देखील उचलण्यास सुरुवात केली. आणि त्यामुळे शेख हसीना यांना त्यांचा पंतप्रधान पदाचा राजीनामा द्यावा लागला. आणि देश देखील सोडावा लागला.

Ganeshotsav 2024 : कोकणात जाण्यासाठी आणखी 20 रेल्वे गाड्या वाढवल्या ; पहा वेळापत्रक

Ganeshotsav 2024 : संपूर्ण महाराष्ट्र गणेशोत्सव हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतो त्यातही कोकणात मोठ्या दिमाखात हा सण साजरा होतो. या सणाला कोकणवासी सुद्धा आवर्जून हजेरी लावतो. मुंबईवरून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असते. पश्चिम रेल्वेने यंदाच्या गणपती उत्सव दरम्यान प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी विशेष गाड्या सुरू करण्याची घोषणा केली आहे. यापूर्वी मध्य रेल्वेने 202 गणपती उत्सवासाठी (Ganeshotsav 2024) विशेष रेल्वे गाड्यांची घोषणा केली आहे.

आता त्यामध्ये आणखी वाढ झाली असून आणखी 20 गणपती विशेष रेल्वे गाड्या चालवण्यात येणार आहेत. त्यामुळे आता एकूण 222 गणपती उत्सवासाठी विशेष रेल्वे गाड्या उपलब्ध असतील. या नव्या गाड्यांचा आरक्षण 7 ऑगस्ट पासून सुरू होणार आहे. चला जाणून घेऊया या रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक (Ganeshotsav 2024) काय असेल.

लोकमान्य टिळक टर्मिनस ते रत्नागिरी द्विसाप्ताहिक

लोकमान्य टिळक टर्मिनस ते रत्नागिरी द्विसाप्ताहिक विशेष रेल्वे गाड्यांच्या एकूण आठ फेऱ्या असतील. गाडी क्रमांक 0 1 0 31 एलटीटी इथून 6, 7, 13, 14 सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे चार 50 वाजता रत्नागिरी येथे पोहोचेल. तर तीच गाडी रत्नागिरी इथून 7,8,14 आणि 15 सप्टेंबर रोजी सकाळी 8 : 40 वाजता सुटेल आणि एलटीटी इथे त्याच दिवशी सायंकाळी (Ganeshotsav 2024) पाच वाजून पंधरा मिनिटांनी पोहोचेल.

पनवेल रत्नागिरी साप्ताहिक विशेष

पनवेल रत्नागिरी साप्ताहिक विशेष गाडीच्या एकूण चार फेऱ्या होतील. गाडी क्रमांक 0 1 4 4 3 पनवेल इथून आठ आणि पंधरा सप्टेंबर रोजी पहाटे चार वाजून 40 मिनिटांनी सुटेल तर रत्नागिरी येथे त्याच दिवशी सकाळी 11:50 वाजता पोहोचेल. तर गाडी क्रमांक 0 1 4 4 4 रत्नागिरी इथून 7 आणि 14 सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजून पन्नास मिनिटांनी सुटेल आणि पनवेल इथं दुसऱ्या दिवशी रात्री दीड (Ganeshotsav 2024) वाजता पोहोचेल.

पनवेल रत्नागिरी साप्ताहिक विशेष

पनवेल रत्नागिरी साप्ताहिक विशेष रेल्वे गाडीच्या दोन फेऱ्या धावतील गाडी क्रमांक 0 1 4 4 1 पनवेल इथून 11 सप्टेंबर रोजी पहाटे 4 वाजून 40 मिनिटांनी सुटेल आणि रत्नागिरी येथे त्याच दिवशी सकाळी अकरा वाजून पन्नास मिनिटांनी पोहोचेल. तर दुसरी गाडी 10 सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच पन्नास वाजता रत्नागिरी इथून गाडी सुटेल आणि पनवेल इथे दुसऱ्या दिवशी रात्री दीड वाजता पोहोचेल.

तसंच पुणे रत्नागिरी साप्ताहिक विशेष रेल्वे गाड्यांच्या सहा फेऱ्या होणार आहेत या सर्व गणपती विशेष रेल्वे गाड्यांचा आरक्षण हे 7 ऑगस्टपासून सर्व ठिकाणी संगणकीकृत आरक्षण केंद्रावर करण्यात येईल. शिवाय IRCTC च्या संकेतस्थळावर देखील विशेष शुल्क मध्ये सुरू होणार असं मध्य रेल्वे कडून सांगण्यात आला आहे.

Technology : पावसाळ्यात कपडे गॅस शेगडीवर, इस्त्री करून सुकवण्याची कटकट नाही ; आलाय पोर्टेबल क्लोथ ड्रायर

Technology : पावसाळ्याच्या दिवसात पुरेसा सूर्यप्रकाश नसल्यामुळे कपडे वाळत नाहीत. जर कपडे नीट वाळले नाहीत तर त्याला कुबट वासही येऊ लागतो. शिवाय ओले कपडे घातल्यामुळे स्किन इन्फेक्शनचा धोका वाढतो. पावसाळ्यात शाळेला जाणाऱ्या विद्यार्थी आणि नोकरवर्गासाठी ही मोठी समस्या होऊन बसते. तुम्ही अनेकदा पावसाळ्यात कपडे वाळवण्यासाठी ओले कपडे हेअर ड्रायर किंवा अगदी गॅस शेगडीवर ,किंवा मोठ्या बल्ब खाली ठेवले असतील. मात्र आता हे घरगुती फंडे वापरण्याची काही गरज नाही. कारण पावसाळ्यात कपडे वाळवण्यासाठी एक लई भारी प्रोडक्ट (Technology ) बाजारात आले आहे. चला जाणून घेऊया या नव्या प्रोडक्ट बद्दल….

या प्रोडक्ट चे नाव आहे 220V इलेक्ट्रिक पोर्टेबल कॉम्पॅक्ट ड्रायर. विशेष म्हणजे हे प्रोडक्ट आकाराने लहान असल्यामुळे तुम्ही याला ट्रिप वर किंवा कुठेही घेऊन जाऊ शकता. पोर्टेबल क्लोथ ड्रायर काही मिनिटांत कपडे सुकवतात. त्यांचा (Technology ) वापर करण्यासाठी फार काही करावे लागत नाही. केवळ एक बटन दाबल्यावर हे मशीन त्याचे काम सुरु करेल आणि मिनिटात तुमचे कपडे सुकतील

कुठून खरेदी कराल (Technology )

220V इलेक्ट्रिक पोर्टेबल कॉम्पॅक्ट लॉन्ड्री ड्रायर Amazon वरून खरेदी करता येईल. Amazon वर त्याची किंमत 58 टक्के डिस्काउंटसह 3,799 रुपये आहे. तुम्ही ते EMI वर देखील खरेदी करू शकता. त्याची कपडे सुकवण्याची क्षमता 5KG आहे. यात थर्मोस्टॅटिक तंत्रज्ञान (Technology ) वापरण्यात आले आहे.

Auslese पोर्टेबल मिनी ड्रायर (Technology )

हा एक दुसऱ्या प्रकारचा ड्रायर आहे जो तुम्ही पावसाळ्यात कपडे सुकवण्यासाठी वापरू शकता. हे पोर्टेबल मिनी क्लोथ ड्रायर Amazon वर देखील उपलब्ध आहे. 3,645 रुपयांना खरेदी करता येईल. यामध्ये एबीएस प्लास्टिक आणि नायलॉन मटेरियल वापरण्यात (Technology ) आले आहे. हे शूज, मोजे किंवा लहान घरगुती वस्तू सुकविण्यासाठी वापरले जाऊ शकते. यावर ग्राहकांसाठी ईएमआयचा पर्यायही उपलब्ध आहे.

फवारणी पंपावर शेतकऱ्यांना मिळणार 100 टक्के अनुदान, असा घ्या लाभ

Spraying Pump

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सरकार मार्फत शेतकऱ्यांना विविध योजना मिळत असतात. अशातच आता कृषी विभागामार्फत आता शेतकऱ्यांना विशेष कृती या योजनेअंतर्गत शंभर टक्के अनुदानावर फवारणी पंप आणि कापूस साठवणुकीच्या बॅगेचा पुरवठा केला जाणार आहे. ज्या लोकांना या फवारणी पंपाचा लाभ घ्यायचा आहे. त्या लोकांनी 6 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट पर्यंत महाडीबीटी पोर्टलवर जाऊन अर्ज करायचा आहे. याबाबतची माहिती देखील कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी दिलेली आहे.

शेतकऱ्यांच्या पिकाला चालना देण्यासाठी त्याचप्रमाणे कापूस सोयाबीन आणि इतर तेल यांच्या आधारित असणाऱ्या पिकास चालना देण्यासाठी ही नवीन योजना आणलेली आहे. या योजनेअंतर्गत चालू खरीप हंगामामध्ये 100% बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप आणि कापूस साठवण्याचीसाठी बॅग शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे.

तुम्हाला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर तुम्हाला शेतकऱ्यांच्या महाडीबीटीत पोर्टलवर जावे लागेल. त्यानंतर तिथे गेल्यावर संपूर्ण माहिती भरावी लागेल. तुम्हाला बियाणे औषधे आणि खते या अंतर्गत कापूस साठवून बॅगसाठी अर्ज करता येईल. त्याचप्रमाणे कृषी यांत्रिकीकरण या टाइल्स अंतर्गत बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंपासाठी देखील तुम्हाला अर्ज करता येईल. या योजनेत अंतर्गत आता शेतकऱ्यांना चांगलाच लाभ होणार आहे.

Railway News : वर्धा – नांदेड रेल्वे मार्गाबाबत आली महत्वाची अपडेट ; जाणून घ्या

Railway News : मागच्या काही दिवसांपासून वाहतूक सेवा मजबूत करण्याकडे सरकारचा कल वाढलेला दिसून येत आहे.राज्यात रस्त्यांचे जाळे अधिक मजबूत करण्यात येत आहेत. शिवाय ‘वंदे भारत’ सारख्या पूर्ण स्वदेशी बनावटीच्या ट्रेन्स सह ज्या भागात अद्याप रेल्वे मार्ग जोडले गेले नाहीत तिथे रेल्वे मार्ग टाकण्याचे काम सुद्धा सुरु आहे. महाराष्ट्राच्या बाबतीत असाच प्रस्तावित असलेला (Railway News) एक रेल्वे मार्ग म्हणजे वर्धा ते नांदेड रेल्वे मार्ग आता या मार्गाबाबत एक महत्वाची अपडेट हाती आली आहे चला जाणून घेऊया..

मिळालेल्या माहितीनुसार, वर्धा ते नांदेड दरम्यान सुरू असणाऱ्या रेल्वे मार्गाचे काम आता 2027 पर्यंत पूर्ण होणार आहे. हा मार्ग यवतमाळ मार्गे प्रस्तावित करण्यात आला आहे.खरंतर या रेल्वे मार्गामुळे (Railway News) मराठवाडा आणि विदर्भातील जनतेला मोठा फायदा होणार आहे. या रेल्वे मार्गामुळे मराठवाड्यातला जनतेला विदर्भ आणि विदर्भातलया जनतेला मराठवाड्यात येणं सोपं होणार असून जलद गतीने (Railway News) हे आंतर पार येणार आहे. मात्र हा रेल्वे मार्ग केव्हा सुरू होईल याबाबत अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत होते. मात्र याबाबत आता एक मोठी अपडेट हाती आली असून मध्य रेल्वेचे महाप्रबंधक रामकरण यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकल्प डिसेंबर 2027 पर्यंत सर्वांत सामान्यांसाठी खुला होणार आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वी मुंबई येथे एक महत्त्वाची बैठक झाली होती या बैठकीमध्ये वर्धा यवतमाळ आणि नांदेड या रेल्वे लाईन (Railway News) संदर्भात बराच वेळ चर्चा झाली संबंधित अधिकाऱ्यांनी प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहणाचा काम संपुष्टात आलं असून रेल्वे मार्गाची मातीकरण व अस्तरीकरण करण्याचं काम वेगानं सुरू आहे. सध्या वर्धा ते कळंब पर्यंत रेल्वे मार्ग पूर्णत्वास आला आहे अशी माहितीही देण्यात आली आहे.

Neem Leaves Water Bath | कडुलिंबाच्या पानांनी अंघोळ केल्याने होतात अनेक फायदे; अशाप्रकारे करा वापर

Neem Leaves Water Bath

Neem Leaves Water Bath | पावसाळा अनेकांना आवडत असला, तरी पावसाळामुळे अनेक आजाराने संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो. पावसाळ्यात तुमच्याशी संबंधित देखील अनेक आजार उद्भवतात. यामध्ये घामुळे, जळजळ, खाज यांसारख्या समस्या उद्भवतात. अशावेळी अनेक लोक डॉक्टरांकडे ट्रीटमेंट घेऊन महागडे औषध आणतात. परंतु तुम्ही जर तुमच्या आंघोळीच्या पाण्यात केवळ कडूलिंबाची पाने (Neem Leaves Water Bath) टाकून जर आंघोळ केली, तर त्यात तुमच्या या त्वचेच्या सगळ्या समस्यांपासून तुम्हाला सुटका मिळेल. कडुलिंबामध्ये अँटीबॅक्टरियल गुणधर्म असतात. त्यामुळे तुमच्या त्वचेचे असणारे होतात. त्याचप्रमाणे डोळ्यांचे आणि केसांच्या समस्या देखील दूर होतात. तर जाणून घेऊया कडुलिंबाच्या पाण्याने अंघोळ केल्यावर काय फायदे होतात.

कडुलिंबाच्या पाण्याने आंघोळ करण्याचा योग्य मार्ग | Neem Leaves Water Bath

कडुलिंबाची हिरवी पाने घ्या आणि पानांचा रंग निघून पाणी हिरवे दिसू लागेपर्यंत उकळा. यानंतर सुती कापडाने ते चांगले गाळून आंघोळीच्या पाण्यात मिसळा. आठवड्यातून किमान दोन-तीन वेळा हे करा. कडुलिंब आंघोळ करताना शरीराला हलक्या हाताने चोळा. यामुळे त्वचा हायड्रेट होईल, तिला पोषण मिळेल आणि त्याच्याशी संबंधित समस्याही दूर होतील. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही कडुलिंबासोबत कोरफड आणि तुळशीची पाने देखील उकळू शकता.

कडुलिंबाच्या पाण्याने अंघोळ करण्याचे फायदे | Neem Leaves Water Bath

मुरमांची समस्या दूर होते

कडुलिंबाच्या पाण्याने अंघोळ केल्याने मुरुमांची समस्या दूर होते आणि चेहऱ्यावर चमकही येते. डाग आणि डाग तुम्हाला त्रास देत असतील तर कडुलिंबाच्या पाण्याने चेहरा धुवा. त्यात नैसर्गिक चमक असेल आणि ती ताजी दिसेल.

कोंडा आणि उवा दूर करा

जर तुम्हाला कोंडा किंवा कोरडे केस किंवा उवांचा त्रास होत असेल तर कडुलिंबाच्या पाण्याने आंघोळ करणे फायदेशीर ठरू शकते. यामुळे निर्जीव केसांना जिवंतपणा आणि चमक येते. कडुलिंबाच्या पाण्याने केस धुताना शॅम्पू करण्याची गरज नाही. यामुळे उवांच्या समस्येपासूनही आराम मिळू शकतो.

डोळ्यांसाठी फायदेशीर

डोळ्यांना संसर्ग असल्यास कडुलिंबाच्या पाण्याने ही समस्या दूर होऊ शकते. कडुलिंबाच्या पाण्याने आंघोळ केल्याने आणि डोळे धुण्याने संसर्ग, डोळ्यांच्या बुबुळाच्या पुढील भागाचा होणारा दाह म्हणजेच डोळे लाल होणे, डोळे सुजणे यासारख्या समस्या दूर होतात.

फोड आणि मुरुम टाळतील

ज्या लोकांना फोड आणि पिंपल्सचा त्रास आहे त्यांच्यासाठी कडुलिंबाच्या पानांच्या पाण्याने आंघोळ करणे रामबाण उपायापेक्षा कमी नाही. कडुनिंबामध्ये नैसर्गिक अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म असतात, ज्यामुळे फोड आणि पुरळ येण्याच्या समस्येपासून आराम मिळतो.

घामाचा वास निघून जाईल | Neem Leaves Water Bath

उष्ण आणि दमट हवामानात, घामाच्या वासाने अनेकदा समस्या निर्माण होतात. याचे कारण शरीरात बॅक्टेरियाची निर्मिती होते. अशा परिस्थितीत कडुलिंबाच्या पानांनी आंघोळ करणे फायदेशीर ठरू शकते. असे केल्याने घामाची दुर्गंधी दूर होते.

Fasting | उपवास केल्याने कर्करोगाचा धोका होतो कमी; संशोधनात धक्कादायक खुलासा

Fasting

Fasting | आजकाल लोकांची जीवनशैली बदलल्याने वेगवेगळ्या प्रकारचे आजार देखील होत आहे. त्यातील कर्करोग हा अत्यंत झपाट्याने वेग घेणारा एक धोकादायक असा आजार बनलेला आहे. ज्यावर आता उपचार करणे देखील कठीण झालेले आहे थांबवण्यासाठी संशोधकांनी डॉक्टरांकडून नेहमीच प्रयत्न केले जात आहे. परंतु नुकतेच केलेल्या एका संशोधनात अशी माहिती समोर आलेली आहे की, कर्करोगाचा धोका कमी करण्यासाठी उपवास (Fasting) करावा. उपवासामुळे कर्करोगांच्या पेशीवर परिणाम होतो. आता उपवासाचा आणि कर्करोगाचा नक्की काय संबंध आहे? हे आज आपण जाणून घेणार आहोत.

उपवास आणि कर्करोगाचा संबंध | Fasting

उंदरांवर केलेल्या या संशोधनात असे आढळून आले की, उपवासामुळे शरीराची नैसर्गिक संरक्षण यंत्रणा मजबूत होते. यामुळे कर्करोगाच्या पेशींवर हल्ला करणाऱ्या नैसर्गिक किलर पेशींची कार्यक्षमता वाढते. उपवास करताना या पेशी साखरेऐवजी चरबी वापरतात. ज्यामुळे ते कर्करोगाच्या पेशी नष्ट करण्यास सक्षम असतात. या संशोधनातून असेही समोर आले आहे की, उपवासामुळे या पेशी ट्यूमरच्या वातावरणातही तयार होतात आणि त्यांची कर्करोगाशी लढण्याची क्षमता वाढते.

संशोधन आणि फायदे

2012 मध्ये उंदरांवर केलेल्या अभ्यासात असे आढळून आले की अल्पकालीन उपवास केमोथेरपीच्या दुष्परिणामांपासून निरोगी पेशींचे संरक्षण करू शकतो. 2016 मध्ये आणखी एका संशोधनात असेही आढळून आले की केमोथेरपीपूर्वी अल्पकालीन उपवास केल्याने विषाक्तता कमी होऊ शकते. जर्मन कॅन्सर रिसर्च सेंटरने केलेल्या अभ्यासात असे दिसून आले आहे की अधूनमधून उपवास केल्याने फॅटी लिव्हर, यकृताचा दाह आणि यकृताचा कर्करोग होण्याचा धोका कमी होतो.

मानवांवर प्रभाव | Fasting

बऱ्याच डॉक्टरांचा असा विश्वास आहे की उपवास कर्करोगाचा धोका कमी करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतो, परंतु त्याचा परिणाम इन्सुलिनची पातळी आणि सेल्युलर प्रतिक्रियांवर अवलंबून असतो. उपवासामुळे इन्सुलिनची पातळी कमी करून कर्करोगाच्या पेशींसाठी अनुकूल वातावरण टाळता येते. उपवासामुळे कर्करोगापूर्वीच्या पेशी वाढण्याआधीच नष्ट होऊ शकतील अशा प्रक्रिया देखील सक्रिय करू शकतात.

उपवासाचे इतर फायदे

उपवासामुळे शरीरातील नैसर्गिक अँटिऑक्सिडंट्स वाढतात, ज्यामुळे पेशींना कर्करोगामुळे होणाऱ्या नुकसानापासून संरक्षण मिळते. तथापि, प्रत्येक रुग्णामध्ये असे घडत नाही, म्हणून यावर अधिक संशोधन आवश्यक आहे. विशेषतः त्या रुग्णांसाठी ज्यांचे वजन आधीच कमी आहे.