Tuesday, December 23, 2025
Home Blog Page 549

BSNL Sim Card : आता घरबसल्या खरेदी करा BSNL सिमकार्ड; फॉलो करा ‘या’ स्टेप्स

BSNL Sim Card

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एअरटेल, जिओ सारख्या देशातील आघाडीच्या टेलिकॉम कंपन्यांनी रिचार्जच्या किमती महाज केल्यानंतर सर्वसामान्य माणसाच्या खिशाला चांगलीच झळ बसली आहे. त्यामुळे पैसे वाचवण्यासाठी अनेकजण देशी टेलिकॉम कंपनी असलेल्या BSNL कडे (BSNL Sim Card) वळू लागलेत. बीएसएनएलचे रिचार्ज प्लॅन अतिशय कमी पैशात उपलब्ध असल्याने ग्राहकांना ते चांगलंच परवडते. सध्या BSNL ने संपूर्ण देशभरात आपली 4G सेवा पुरवण्यास सुरुवात केली असून याशिवाय कंपनी आपल्या 5G नेटवर्कवर सुद्धा काम करत आहे. त्यामुळे बीएसएनएल सिमकार्ड खरेदी करण्यासाठी ग्राहकांच्या रांगा लागत आहेत. तुम्ही सुद्धा बीएसएनएल सिम खरेदी करण्याचा विचार करणार असाल तर हि बातमी कास तुमच्यासाठी आहे. कारण घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने सिमकार्ड कस खरेदी करायचे ते आज आम्ही तुम्हाला अतिशय सोप्प्या भाषेत सांगणार आहोत.

इतर दूरसंचार कंपन्यांप्रमाणे, BSNL नेही prune नावाच्या कंपनीसोबत पार्टनरशिप करून सिम कार्ड वितरणाचे काम सुरू केले आहे. तुम्हाला हे अँप गुगल प्ले स्टोअरवरून डाउनलोड करावं लागेल. अवघ्या ९० मिनिटांत मिनिटात सिमकार्ड तुमच्या दारी येईल असा कंपनीचा दावा आहे. यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा.

यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा- BSNL Sim Card

सर्वात आधी prune.co.in या वेबसाइटला भेट द्या.
यानंतर येथे Buy SIM Card या पर्यायावर क्लिक करा. आणि देशाची निवड करताना भारताच्या नावावर क्लिक करा.
आता तुम्हाला ऑपरेटरसाठी बीएसएनएल निवडावे लागेल. निवडल्यानंतर, तुम्हाला तुमची योजना निवडावी लागेल.
यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकावा लागेल ज्यावर एक OTP येईल. OTP भरण्यासोबतच त्याठिकाणी आवश्यक माहिती भरा.
यानंतर तुमचा पत्ता टाका.
आता तुम्हाला पेमेंट करावे लागेल. ऑर्डर नक्की होताच तुमचं नवीन BSNL सिम कार्ड अवघ्या 90 मिनिटांत तुमच्या घरी येईल.
यानंतर घरबसल्या केवायसी केली जाईल आणि तुमचं सिमकार्ड ऍक्टिव्ह होईल.
मात्र सध्या कंपनी फक्त हरियाणातील गुरुग्राम आणि उत्तर प्रदेशातील गाझियाबाद जिल्ह्यात ही सुविधा देत आहे. महाराष्ट्रात अजून हि सेवा सुरु झालेली नाही.

दरम्यान, ऑक्टोबर 2024 पर्यंत BSNL कडून देशभरात सुमारे 80 हजार टॉवर बसवले जातील अशी माहिती केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी दिली होती. तर मार्च 2025 पर्यंत आणखी हजार टॉवर बसवले जातील असं त्यांनी म्हंटल होते. म्हणजेच एकूण 1 लाख BSNL टॉवर देशात उभारले जातील. सध्या जरी BSNL 4G सेवा देत असली तरी कंपनी 5G इंटरनेटवर सुद्धा काम करत आहे. बीएसएनएलचे नवीन 5G सिमकार्डची झलक सुद्धा काही दिवसांपूर्वी समोर आली होती. त्यामुळे येत्या काळात Jio-Airtel ला टक्कर देत BSNL जोरदार मुसंडी *BSNL Sim Card) मारण्याची शक्यता आहे.

Lava Yuva Star 4G : अवघ्या 6,499 रुपयांत लाँच झाला स्वस्तात मस्त Mobile; AI कॅमेरासह मिळतात भन्नाट फीचर्स

Lava Yuva Star 4G launched

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मोबाईल हा आजकाल जीवनावश्यक गोष्ट बनली आहे. मोबाईलशिवाय कोणाचं पानही हलत नाही. मोबाईलच्या माध्यमातून आपलं मनोरंजन तर होतेच, मात्र आपली अनेक कामे ऑनलाईन पद्धतीने मोबाईलवरच होतात. त्यामुळे प्रत्येकाच्या हातात मोबाईल पाहायला मिळतोच. मात्र मोबाईल खरेदी करत असताना स्वस्तात मस्त आणि कमी पैशात खरेदी करण्याकडे सर्वसामान्य ग्राहकांचा कल असतो. तुम्ही सुद्धा नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याच्या विचारात असाल तर आज आम्ही तुम्हाला अशाच एका अतिशय कमी किमतीत उपलब्ध असलेल्या मोबाईल बद्दल सांगणार आहोत. Lava Yuva Star 4G असे या नव्या स्मार्टफोनचे नाव असून नुकताच या मोबाईल अवघ्या 6,499 रुपयांत लाँच झाला आहे. आज आपण या मोबाईलचे खास फीचर्स जाणून घेऊयात….

डिस्प्ले –

Lava Yuva Star 4G मध्ये 6.75-इंचाचा HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. हा मोबाईल दिसायला अतिशय आकर्षक असा आहे. स्मार्टफोनमध्ये UNISOC 9863A चिपसेट वापरण्यात आली असून लावाचा हा मोबाईल Android 14 Go ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. मोबाईलमध्ये 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज देण्यात आलं असून वर्चुअल रॅमद्वारे हि रॅम आणखी 4GB पर्यंत वाढवता येते.

कॅमेरा – Lava Yuva Star 4G

मोबाईलच्या कॅमेराबाबत बोलायचं झाल्यास, Lava Yuva Star 4G मध्ये पाठीमागील बाजूला 13 मेगापिक्सलचा डुअल AI कॅमेरा आहे, तर सेल्फी आणि विडिओ कॉल साठी समोरील बाजूला 5 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आहे. कॅमेरामध्ये एआय, एचडीआर आणि पॅनोरामासह विविध शूटिंग मोड मिळतात. त्यामुळे फोटोग्राफी करताना यूजर्सना चांगला अनुभव येतो. पॉवरसाठी लावाच्या या स्मार्टफोन मध्ये 5000mAh ची बॅटरी असून हि बॅटरी 10 वॅट चार्जरला सपोर्ट करते.

किंमत किती?

Lava Yuva Star 4G स्मार्टफोनची किंमत 6,499 रुपये आहे. हा स्मार्टफोन 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज अंतर्गत येतो. देशातील सर्व मोबाईल स्टोअर्सवर लावाचा हा नवा स्मार्टफोन उपलब्ध असून ग्राहक काळ्या, पांढऱ्या आणि जांभळ्या रंगात खरेदी करू शकतात.

‘या’ 3 गोष्टीमुळे दुप्पट वाढतो कर्करोगाचा धोका; आजच करा बंद

Cancer

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आजकाल आणि नवनवीन आजार उदयास येत आहे. अशातच कर्करोग (Cancer) हा एक अत्यंत जीवघेणा आजार आहे. यावर अगदी 100 टक्के इलाज होईलच याची देखील खात्री नाही. परंतु आपण जर पाहिले, तर आजकाल कर्करोगाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. हा कर्करोग शरीराच्या एखाद्या भागापासून सुरू होऊन संपूर्ण शरीरात देखील पसरू शकतो. आणि त्यावेळी आपल्याला त्यावर प्रतिबंध करणे कठीण जाते. परंतु अनेकांना प्रश्न पडतो की, हा कर्करग नक्की कशामुळे होतो? तर यासाठी अनेक कारणं आहेत. यामध्ये तुमची असलेली जीवनशैली, (Lifestyle) जंक फूड, प्रक्रिया केलेले फूड, प्लास्टिकचा वापर, कमी हालचाली, तणाव, कॉस्मेटिक वापर धूम्रपान इत्यादी अनेक गोष्टींचा यामध्ये समावेश असतो. आणि या चुकीच्या गोष्टींचा आपण अवलंब केला, तर आपल्या शरीरात कॅन्सरच्या पेशी तयार होतात. आता आपण जाणून घेऊया खास करून असे कोणते घटक आहेत ज्यामुळे आपल्याला कॅन्सरचा धोका वाढतो.

प्लास्टिक

प्लॅस्टिकमध्ये असलेले बीपीए, मायक्रोप्लास्टिक, बिस्फेनॉल, फॅथलेट यांसारखे पदार्थ कर्करोगाला आमंत्रण देतात. हे सर्व अंतःस्रावी व्यत्यय आणणारी रसायने मानले जातात, जे शरीरातील हार्मोन्समध्ये व्यत्यय आणतात आणि स्तनाच्या कर्करोगासारख्या कर्करोगाचा धोका वाढवतात. त्याऐवजी काच निवडा आणि प्लास्टिकची भांडी किंवा प्लास्टिकच्या बाटल्या वापरू नका. अन्न प्लास्टिकमध्ये पॅक करू नका आणि डिस्पोजेबल प्लास्टिकची भांडी वापरू नका.

कीटकनाशक

कीटकनाशकांसह काम करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये प्रोस्टेट कर्करोगाचा धोका वाढतो आणि त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या महिलांमध्ये गर्भाशयाच्या आणि मूत्राशयाच्या कर्करोगाचा धोका वाढतो. कीटकनाशके असलेली भाज्या आणि फळे देखील कर्करोगास कारणीभूत ठरू शकतात, त्यामुळे नेहमी भाज्या किंवा फळे नीट धुवून खावीत.

धातूचा वापर

आर्सेनिक, कॅडमियम, क्रोमियम, निकेल यासारख्या जड धातू मुख्य कार्सिनोजेन्समध्ये आहेत, जे डीएनएशी छेडछाड करतात आणि कर्करोगाच्या पेशी तसेच त्यांच्या मेटास्टेसिसच्या प्रक्रियेस प्रोत्साहन देतात, ज्यामुळे कर्करोग होण्याची शक्यता वाढते तसेच ती पसरते. त्यामुळे त्वचेचा कर्करोग आणि जठरासंबंधी कर्करोग होण्याची शक्यता वाढते. पालक, तांदूळ, फळांचा रस, मासे इत्यादी हेवी मेटलयुक्त पदार्थ जास्त प्रमाणात खाणे टाळावे.

Vinesh Phogat : याच मुलीला तिच्या देशात लाथ मारून… ; विनेश फोगटच्या विजयानंतर बजरंग पुनियाची केंद्रावर टीका

Vinesh Phogat Bajarang Punia

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगटने (Vinesh Phogat) जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकाच्या कुस्तीपटूसह एकूण तीन कुस्तीपटूंचा पराभव अंतिम फेरी गाठली आहे. या ऐतिहासिक कामगिरीच्या जोरावर विनेश फोगटने रौप्यपदक तर निश्चित केलंच आहे. मात्र आजच्या सामन्यात जर तिने विजय मिळवला तर ती गोल्ड मेडल जिंकेल आणि नवा इतिहास रचेल. तत्पूर्वी संपूर्ण देशभरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. परंतु दुसरीकडे तिचा एक सहकारी कुस्तीपटू बजरंग पुनिया याने मात्र केंद्र सरकारवर टीका केली आहे. हि तीच मुलगी आहे जिला तिच्या देशात लाथ मारून चिरडण्यात आले असं म्हणत बजरंग पुनियाने मोदी सरकारला लक्ष्य केलं आहे.

बजरंग पुनियाचे ट्विट काय? Vinesh Phogat

याबाबत बजरंग पुनियाने ट्विट करत म्हंटल, विनेश फोगट, भारताची सिंहीण जिने आज मागच्या पुढच्या सामन्यांमध्ये विजय मिळवला. 4 वेळा जागतिक चॅम्पियन आणि विद्यमान ऑलिम्पिक चॅम्पियनचा पराभव केला, त्यानंतर उपांत्यपूर्व फेरीत माजी विश्वविजेत्याचा पराभव केला. पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, या मुलीला तिच्या देशात लाथ मारून चिरडण्यात आले, या मुलीला तिच्या देशात रस्त्यावर ओढले गेले ही मुलगी जग जिंकणार आहे पण या देशातील व्यवस्थेने तिचा पराभव केला असं म्हणत बजरंग पुनिया याने एकप्रकारे मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.

यानंतर बजरंगने आणखी एक ट्विट केलं, त्यामध्ये तो म्हणतो, विनेशच्या (Vinesh Phogat) विजयावर काय प्रतिक्रिया द्यावी हे मला समजत नाहीये. आपण आनंदी आहोत की रडत आहोत हे समजत नाही. संपूर्ण भारताला या पदकाची प्रतीक्षा आहे. सर्वांचे डोळे ओले आहेत. जणू काही विनेश एकटी नसून संपूर्ण देशातील सर्व महिला लढत आहेत. विनेश, तुझा जन्म खऱ्या अर्थाने विक्रम करण्यासाठी झाला आहे. इतक्या अडचणींचा सामना करूनही तुमची नजर ध्येयाकडे वळलेली असते. हे गोल्ड मेडल भारतात यावे हीच आमची प्रार्थना आहे.

Weather Update | पुढील 3 दिवस अशी असणार पावसाची स्थिती; हवामान खात्याने दिली माहिती

Weather Update

Weather Update | गेल्या दोन दिवसापासून महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कमी झालेला दिसत आहे. त्याचप्रमाणे आजही राज्यातील पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. भारतीय हवामान खाते रोजच पावसाबद्दलचा अंदाज व्यक्त करत असतात. आज देखील हवामान विभागाने म्हणजे 7 जुलै रोजी पुढील दोन दिवस हवामान कसे असेल? याबद्दलची माहिती दिलेली आहे. राज्यात बहुतांश ठिकाणे आज पाऊस विश्रांती घेणार आहे. तर काही ठिकाणी मात्र पावसाची (Weather Update) शक्यता आहे.

पुण्यातील घाट परिसरात आज मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. तर इतर जिल्ह्यांमध्ये आज हलका पाऊस पडेल. त्यामुळे पुण्यात येल्लो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. पुण्यात पुढील तीन दिवस येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे.

त्याचप्रमाणे कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये देखील मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. या जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याने येलो अलर्ट जारी केलेला आहे. परंतु पुढील तीन दिवस या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कमी होण्याची देखील शक्यता आहे. त्याचप्रमाणे कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यातील देखील घाट परिसरात मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडेल. या दोन्ही जिल्ह्यांना येल्लो अलर्ट देण्यात आलेला आहे. परंतु 9 ऑगस्ट पासून या जिल्ह्यातील पावसाचा जोर देखील कमी होणार आहे.

विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये देखील आज पावसाचा (Weather Update) येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. या ठिकाणी वादळी वारा येण्याची देखील शक्यता आहे. परंतु पुढील दोन ते तीन दिवस या ठिकाणी देखील पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. छत्रपती संभाजी नगर, जालना, लातूर, धाराशिव या ठिकाणी देखील तुरळक पाऊस पडेल. परंतु 9 ऑगस्टनंतर राज्यातील अनेक जिल्ह्यांमधील पावसाचा जोर कमी होणार आहे.

Vegetables | ऑगस्टमध्ये करा या भाज्यांची लागवड; होईल बक्कळ नफा

Vegetables

Vegetables | अनेक शेतकरी हे आजकाल कमी कालावधीत येणारी पिके घेत आहेत. त्यातून त्यांना चांगला नफा देखील मिळतो. यामुळे अनेक शेतकरी आता भाजीपालाच्या पिकांची उत्पादन मोठ्या प्रमाणात घेत आहे. भाजीपाला हा अत्यंत कमी कालावधीत येतो. आणि या भाजीपाल्यांना चांगला भाव देखील मिळतो. आर्थिक दृष्टिकोनातून हे शेतकऱ्यांचे फायद्याचे ठरते. आता जर तुम्ही या कालावधीत भाजीपाला लावण्याचे काही प्लॅन करत असाल, तर आज आम्ही तुम्हाला अशा काही भाजीपाल्यांची माहिती देणार आहोत.

भेंडी | Vegetables

भेंडी ही अनेक लोकांना आवडते. आणि आर्थिक दृष्टिकोनातून देखील शेतकऱ्यांसाठी भेंडीचे पैकी अत्यंत फायद्याचे पीक आहे. महाराष्ट्रातील बऱ्याच भागांमध्ये भेंडीची लागवड केली जाते. तुम्ही जर ऑगस्टमध्ये बहिणीची लागवड केली, तर नोव्हेंबरपर्यंत भेंडी परिपक्व होईल आणि त्यातून चांगला नफा देखील मिळवता येईल.

कोबी

कोबीच्या लागवडीसाठी ऑगस्ट महिना खूप चांगला मानला जातो. रोपवाटिकेत देखील तुम्हाला याची रोपे मिळतील. कोबी हे पीक 70 ते 80 दिवसांमध्ये परिपक्व होते. कोबीला बाजारपेठेत जास्त मागणी असते. आणि त्यातून चांगली कमाई देखील होते.

पालक

पालकच्या लागवडीसाठी ऑगस्ट हा महिना चांगला आहे. लागवडीनंतर साधारणपणे 25 ते 30 दिवसांमध्ये पालक पीक तयार होते. यातून चांगला नफा देखील मिळतो. त्यामुळे पालक हा एक लागवडीसाठी उत्कृष्ट पर्याय आहे.

टोमॅटो

सध्या बाजारामध्ये टोमॅटोला चांगली मागणी आहे. त्यामुळे शेतकरी देखील टोमॅटोची लागवड करताना दिसत आहे. तुम्ही जर सुरुवातीला टोमॅटोची लागवड केली तर 65 ते 70 दिवसांमध्ये टोमॅटोची तयार होतात.

ढोबळी मिरची

ढोबळी मिरचीच्या लागवडीसाठी ऑगस्ट हा महिना अत्यंत अनुकूल मानला जातो. यामध्ये पाण्याचा निचरा होण्यासाठी जमिनीमध्ये रूपांची लागवड करता येऊ शकते. जवळपास 70 ते 80 दिवसानंतर ढोबळी मिरची काढणीस येथे बाजारपेठेत देखील ढोबळी मिरचीला चांगली मागणी असते.

Mumbai Metro : मेट्रो 11 च्या मार्गिकेमध्ये बदल ; काय असेल नवा मार्ग ?

Mumbai Metro : मुंबईकरांसाठी आता एक चांगली बातमी असून मुंबई मेट्रो आता नव्या मार्गिकेवरून धावणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार मेट्रो 11 ही भायखळा, भेंडी बाजार, क्रॉफर्ड मार्केट या गर्दीच्या परिसरामधून धावणार असल्याची माहिती एका इंग्रजी माध्यमातून देण्यात आली आहे. या नव्या (Mumbai Metro) मार्गिकेमध्ये कोणती नवी स्थानके येतील ? आणि याचा कोणाला फायदा होणार आहे चला पाहूया…

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून नव्या संरेखनाची पडताळणी सुरु करण्यात आली आहे. या नव्या मार्गिकेमुळे कासारवडवली ते वडाळा मेट्रो 4 मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना थेट दक्षिण मुंबईत सीएसएमटी येथे पोहोचता येणार आहे. यासाठीच वडाळा ते सीएसएमटी मेट्रो 11 मार्गिका प्रस्तावित (Mumbai Metro) करण्यात आली होती.

गर्दीच्या भागातून धावणार मेट्रो

यापूर्वी मेट्रो 21 मार्गिकेची लांबी 12.7 किमी प्रस्तावित करण्यात आली होती. मात्र, आता सरेखनात योग्य मजुरी मिळाल्यामुळे या मेट्रो मार्गिकेची लांबी आता 28 किमी असेल, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. ही मेट्रो गर्दीच्या भागातून धावणार आहे. त्या दृष्टीने या नव्या संरेखनातील संपूर्ण 18 किमी मार्गावर जिओ टेक्निकल (Mumbai Metro) तपासणी सुरू केली जाणार आहे. यामुळे आता प्रवाशांचा प्रवास हा सुखकर होणार आहे.

कोणत्या भागांचा समावेश

आणिक बस डेपो, वडाळा डेपो, सीजीएस कॉलनी, गणेश नगर, बीपीटी हॉस्पिटल, शिवडी, हाय बंदर, दारुखाना, भायखळा, नागपाडा, भेंडी बाजार, क्रॉफर्ड मार्केड, सीएसएमटी, हार्मोनियम सर्कल, कुलाबा या भागातून मेट्रो धावणार आहे.

Mahavitaran Beed Bharti 2024 | महावितरणमध्ये 10 वी पास उमेदवारांना नोकरीची मोठी संधी; असा करा अर्ज

Mahavitaran Beed Bharti 2024

Mahavitaran Beed Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही नेहमीच नोकरीच्या विविध संधी घेऊन येत असतो. ज्याचा अनेक विद्यार्थ्यांना फायदा होतो. आज देखील आम्ही अशीच एक संधी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता महाराष्ट्र राज्य वितरण कंपनी लिमिटेड अंतर्गत एक मोठी भरती निघालेली आहे. या भरती अंतर्गत इलेक्ट्रिशियन, वायरमन या पदांच्या रिक्त जागा आहे. त्या पदांच्या एकूण 46 रिक्त जागा आहेत आणि त्या भरण्यासाठी इच्छुकानी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. ही भरती ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. त्यामुळे उमेदवारांना अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अर्ज करायचा आहे. त्याचप्रमाणे 8 ऑगस्ट 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर अर्ज करायचा आहे. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.

महत्वाची माहिती | Mahavitaran Beed Bharti 2024

  • पदाचे नाव – इलेक्ट्रिशियन, वायरमन
  • पदसंख्या – 46 जागा
  • इलेक्ट्रिशन – 23 जागा
  • वायरमन – 23 जागा
  • वयोमर्यादा – 18 वर्ष
  • नोकरीचे ठिकाण – बीड
  • अर्ज पद्धती- ऑनलाइन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 8 ऑगस्ट 2024
  • शैक्षणिक पात्रता – दहावी आणि आयटीआय उत्तीर्ण

अर्ज कसा करावा ? | Mahavitaran Beed Bharti 2024

  • त्या भरतीचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा
  • 8 ऑगस्ट २०२४ अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या तारखे अगोदरच अर्ज करा.
  • खाली दिलेल्या लिंक वरून देखील तुम्ही थेट अर्ज करू शकता

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा

पीडीएफ जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा

PM Matrutv Vandana Scheme | काय आहे सरकारची मातृत्व वंदना योजना? गरोदर महिलांना मिळतात 6 हजार रुपये

PM Matrutv Vandana Scheme

PM Matrutv Vandana Scheme | सरकार हे सामान्य नागरिकांसाठी नेहमीच नवनवीन योजना राबवत असतात. ज्याचा सगळ्यांना फायदा होत असतो. भारत सरकार हा नेहमीच महिलांना केंद्रस्थानी ठेवून योजना आणत असतात. अशातच आता महिलांसाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत. यातील एक योजना म्हणजे प्रधानमंत्री मातृत्व योजना. सरकारच्या प्रधानमंत्री मातृत्व योजनेमध्ये (PM Matrutv Vandana Scheme) सरकार गरोदर महिलांना आर्थिक मदत करत असतात.

सरकारच्या या प्रधानमंत्री मातृत्व योजनेअंतर्गत (PM Matrutv Vandana Scheme) गरोदर महिलांना सरकारकडून 6 हजार रुपयांच्या आर्थिक मदत केली जाते. अनेकवेळा गर्भवती महिलांची योग्य प्रकारे काळजी न घेतल्यामुळे होणारे बाळ देखील कुपोषित होते. त्याला अनेक आजार होतात. त्यामुळे बाळाच्या आणि महिलेच्या आरोग्याची काळजी घेतली जावी. यासाठी ही आर्थिक मदत केली जाते. गर्भवती महिलेला आणि बाळाला सुदृढ आणि चांगले पोषण मिळावे. म्हणून भारत सरकारने ही योजना सुरू केलेली आहे.

1 जानेवारी 2017 रोजी भारत सरकारने ही योजना सुरू केलेली आहे. या मातृत्व वंदना योजनेचे लाभ घेण्यासाठी महिलेचे वय हे 19 पेक्षा जास्त असावे लागते. यासाठी तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने देखील अर्ज करू शकता. या योजनेअंतर्गत गर्भवती महिलांना तीन हप्त्यांमध्ये सहा हजार रुपये दिले जातात. पहिल्या टप्प्यात एक हजार रुपये दिले जातात. त्यानंतर दोन टप्प्यात दोन हजार रुपये दिले जातात. या योजनेचे पैसे महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होतात.

Pune : पुणेकरांची होणार ट्रॅफिकपासून सुटका ! शहरातल्या प्रमुख 30 ठिकाणी अवजड वाहनांना बंदी

Pune : पुण्यामध्ये पावसाने काल आणि आज अशी थोडी उसंत घेतली आहे. मात्र मागच्या काही दिवसात वरून कोसळणारा पाऊस , रस्त्यावरील खड्डे , मेट्रोची कामे याने प्रचंड वाहतूक कोंडीला पुणेकरांना सामोरे जावे लागत आहे. मात्र वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी पुणे शहर (Pune) वाहतूक पोलिसांनी एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. येत्या 12 ऑगस्ट पर्यंत शहरातल्या प्रमुख ३० ठिकाणांवर अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. चला याबाबत अधिक जाणून घेऊया…

पुणे पोलिसांकडून शहरातील अनेक प्रमुख रस्त्यांवर होणाऱ्या वाहतूक कोंडीवर उपाय करण्यासाठी रविवारी एक अधिसूचना जाहीर करण्यात आली. यामध्ये शहरातील 30 ठिकाणी सकाळी नऊ ते रात्री दहा वाजेपर्यंत अवजड वाहनांना बंदी लागू करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले. शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण उपाययोजना म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. हा (Pune) निर्णय दिनांक 5 ऑगस्ट ते 12 ऑगस्ट या काळापर्यंत असणार आहे.

आपत्कालीन सेवा देणाऱ्या वाहनांना सूट (Pune)

याबाबतचा निर्णय रविवारी रात्री डीसीपी ट्राफिक रोहिदास पवार यांनी जाहीर केला. या निर्णयानुसार अवजड वाहनांवरील बंदीचा नियम हा ट्रक डंपर्स काँक्रीट मिक्सर आणि इतर अवजड वाहनांना लागू राहणार आहे. असे असले तरी पोलिसांनी जाहीर केलेल्या पत्रकानुसार आपातकालीन सेवांमध्ये सहभागी वाहनांना या नियमातून सूट देण्यात आल्याचं स्पष्ट करण्यात आलं (Pune) आहे.

‘या’ ठिकाणांचा समावेश

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील संचेती चौक, पौडफाटा चौक, राजाराम पूल, दांडेकर पूल, निलायम पूल, सावरकर पुतळा चौक, लक्ष्मीनारायण सिनेमा चौक, सेवन लव्ह चौक, खणे मारुती चौक, पावर हाऊस चौक, आरटीओ चौक, पाटील इस्टेट चौक, ब्रेमन चौक, शास्त्रीनगर, आंबेडकर चौक, चंद्रमा चौक, मुंढवा चौक, नोबेल चौक, लुल्ला नगर ते गोळीबार मैदान, लुल्ला नगर ते गंगाधाम पुष्पा मंगल चौक, राजस सोसायटी, पोल्ट्री चौक, उंड्री ,पिसोळी, हांडेवाडी ,अभिमनाश्रे बाणेर आणि अभिमनाश्रे पाषाण या ठिकाणी सकाळी नऊ ते रात्री दहा या वेळेत अवजड (Pune) वाहनांना प्रवेश बंदी असेल.