Weather Update | आठवड्याभरात संपूर्ण महाराष्ट्रात धुमाकूळ घातल्यानंतर आता पावसाचा जोर जरा ओसरला आहे. अनेक ठिकाणी आता पावसाने विश्रांती घेतलेली आहे. सततच्या पावसाने नागरिक हैराण झाले होते. अगदी घराबाहेर पडणे देखील कठीण झाले होते. परंतु पावसाने थोडीशी विश्रांती घेतलेली आहे. हवामान विभाग देखील दररोज पावसाबद्दलचा (Weather Update) अंदाज व्यक्त करत असतात. आज म्हणजेच 6 ऑगस्ट रोजी पावसाचा पावसाचा अंदाज कसा असणार आहे. याबद्दलची माहिती हवामान विभागाने व्यक्त केलेली आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज रायगड आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांमध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. त्यामुळे यांना येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे उर्वरित जिल्ह्यांमध्ये आज हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल. त्यामुळे या जिल्ह्यांना कोणताही अलर्ट दिलेला नाही. त्याचप्रमाणे पुण्यातील घाट परिसरात देखील आज मुसळधार स्वरूपाचा पाऊस (Weather Update) पडेल. तसेच इतर भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे आज मुंबई ते शहर ते मुंबई उपनगर या ठिकाणी देखील मध्यम असा पाऊस पडेल. या ठिकाणी कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस ते किमान तापमान 26 अंश सेल्सिअस एवढे असणार आहे.
आज विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक पाऊस पडणार आहे. परंतु पावसासोबत सोसाट्याचा वारा आणि विजांचा कडकडाट देखील पाहायला मिळणार आहे. याचबरोबर यवतमाळ, वर्धा, गोंदिया, चंद्रपूर, भंडारा,अकोला, अमरावती, बुलढाणा, गडचिरोली, नागपूर, वाशिम या जिल्ह्यांमध्ये देखील आज वादळीवारा आणि पावसाची शक्यता आहे. त्यामुळे येथील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील दोन ते तीन दिवस राज्यात पावसाचा जोर कमी होणार आहे. त्यानंतरच पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.
LIC New Shanti Plan | वाढती महागाई आणि भविष्याचा विचार करता काहीतरी गुंतवणूक करणे खूप गरजेचे आहे. सध्या मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या आणि एक पर्याय उपलब्ध आहे. परंतु बाजारातील अनेक मार्केटमध्ये जोखीम देखील असते. त्यामुळे अनेक लोक हे त्यांचा योग्य परतावा मिळेल. आणि पैसे सुरक्ती स्थित असतील अशा ठिकाणी गुंतवणूक करतात. एलआयसीच्या योजनांमध्ये देखील आजकाल गुंतवणूकदारांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. यामध्ये चांगला परतावा मिळतो, तसेच तुम्हाला विमा कव्हरेज देखील दिले जाते. अनेक योजना सध्या मार्केटमध्ये आहे. परंतु त्यातील न्यू जीवन शांती प्लॅन (LIC New Shanti Plan) ही एक गुंतवणुकीच्या दृष्टीने अत्यंत फायद्याची अशी योजना आहे. या योजनेमध्ये गुंतवणुकीनंतर तुम्हाला जवळपास एक लाख रुपयांपर्यंतचे पेन्शन मिळू शकते. आता या योजनेची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.
न्यू जीवन शांती प्लॅन योजना | LIC New Shanti Plan
भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजेच एलआयसीच्या माध्यमातून अनेक योजना आहेत. ज्या प्रत्येक वयोगटातील व्यक्तींसाठी राबवल्या जातात. एलआयसीच्या माध्यमातून निवृत्तीनंतरच्या काळासाठी आपल्या आर्थिक सुविधा व्हावी. यासाठी अनेक महत्त्वपूर्ण योजना राबवल्या जातात. यातीलच एक महत्त्वपूर्ण योजना म्हणजे न्यू जीवन शांती प्लॅन योजना. या योजनेअंतर्गत गुंतवणूकदाराला दरवर्षाच्या शेवटी 1 लाख रुपये एवढी पेन्शन मिळते. त्यामुळे ही योजना अत्यंत फायद्याची योजना आहे.
योजनेसाठी लागणारी वयोमर्यादा
एलआयसीच्या या योजनेमध्ये जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल, तर गुंतवणूकदाराचे वय हे 30 ते 79 दरम्यान असणे गरजेचे आहे. या योजनेमध्ये पेन्शन नाही तर इतर अनेक फायदे देखील मिळतात. तुमच्या पुढे दोन पर्याय उपलब्ध असतात. तुमची इच्छा असेल तर तुम्ही एकाच योजनेत गुंतवणूक करू शकता किंवा एकत्र गुंतवणुकीचा पर्याय देखील घेऊ शकता.
फायदा कसा होतो ? | LIC New Shanti Plan
या योजनेमध्ये समजा एखाद्या व्यक्तीने 55 व्या वर्षी 11 लाख गुंतवले आणि ते पाच वर्षासाठी गुंतवले तर 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक वर्षी त्याला 1 लाख 2 हजार 850 रुपये एवढी पेन्शन मिळेल. ही पेन्शन गुंतवणूकदाराला दर सहा महिन्यांनी किंवा दर महिन्याला देखील मिळू शकते. म्हणजे तुम्हाला दर महिन्याला जवळपास 8217 रुपये एवढी पेन्शन मिळेल, तर 6 महिन्याला 50 हजार 365 रुपये एवढी पेन्शन मिळेल.
Ayushman Bharat Card Scheme | सरकारने भारतीयांसाठी अनेक योजना आणलेले आहेत. त्यातीलच एक योजना म्हणजे आयुष्मान भारत कार्ड योजना. (Ayushman Bharat Card Scheme) या योजनेअंतर्गत देशातील गरीब घटकातील नागरिकांना मोफत उपचार दिले जातात. आता आयुष्यमान कार्ड असणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. ती म्हणजे आता या योजनेत मोठे बदल होणार आहे. त्यामुळे आता मध्यमवर्गीय लोकांना देखील त्याचा चांगलाच फायदा होणार आहे.
आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (Ayushman Bharat Card Scheme) चालू झालेली आता पाच वर्षे पूर्ण झालेली आहेत. या योजनेचा आतापर्यंत दहा कोटी लोकांनी लाभ घेतलेला आहे. तसेच पाच लाखांपर्यंत उपचार या योजनेअंतर्गत फ्रीमध्ये मिळतात. परंतु आता पाच वर्षानंतर सरकारी या योजनेत मोठी मोठे बदल करण्याची तयारीत आहे.
येणाऱ्या काळात या आयुष्मान योजनेची व्याप्ती आणि त्याचे पॅकेज देखील बदलणार आहे. यानुसार आता विशिष्ट वयामध्ये नुसार गरीब आणि श्रीमंत प्रत्येकाला हा लाभ दिला जाईल. तसेच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने देखील या योजनेत सुधारणा करण्याचे सल्ला दिलेला आहे. सध्या देशातील अनेक रुग्णालय हे ही या आयुष्मान योजनेअंतर्गत जोडलेली आहे. त्यामुळे आता या छोट्या शहरातील रुग्णालयांचा देखील या योजनेमध्ये समावेश केला जाणार आहे. जेणेकरून लोकांना उपचार लवकर मिळतील आणि जवळ मिळतील. या योजनेअंतर्गत सध्या पाच लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार दिले जातात. परंतु ही रक्कम आता 7 ते 10 लाख रुपयापर्यंत वाढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या योजनेअंतर्गत रुग्णालयातील बिले लगेच भरण्यासाठी नवीन प्रणाली देखील विकसित केली जाणार आहे. अशी कोणतीही पेमेंट सिस्टीम विकसित करायची याचा निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे आता या योजनेची व्याप्ती देखील वाढणार आहे. योजनेचा सगळ्यात मोठा फायदा हा वृद्धांसाठी होण्याची शक्यता आहे. असे मानले जाते की, 70 पेक्षा जास्त वयाच्या लोकांना या योजनेमध्ये समाविष्ट केले जाणार आहे. जेणेकरून वृद्धांना देखील रुग्णालयामध्ये मोफत उपचार मिळू शकतील.
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इंदापूर. हर्षवर्धन पाटलांचा (Harshvardhan Patil) बालेकिल्ला… राज्याच्या राजकारणातल्या उंच भराऱ्या त्यांना याच इंदापूरच्या आमदारकीमुळे शक्य झाल्या… पण अजित दादांनी दत्तात्रय भरणे हे आपल्या भिडूला बळ दिलं… आणि पाटलांच्या राजकारणाला खीळ बसून तब्बल एक दशक त्यांना राजकारणाच्या बाहेर राहावं लागलं… पण अजित दादांच्या सोबत भरणे आल्याने इंदापूरचं महायुतीचं तिकीट कुणाला? भरणे की हर्षवर्धन पाटील? असा मोठा गुंता असताना शरद पवारांनी मास्टर स्ट्रोक खेळून एका नव्या भिडुला मैदानात आणून इंदापूरच्या राजकारणात मोठा ट्विस्ट आणलाय… शरद पवारांचा हा भिडू नेमका आहे तरी कोण? आणि हर्षवर्धन पाटील – दत्ता भरणे यांच्या राजकारणावर फुल्या मारत इंदापूरचा आमदार होण्याची ताकद खरच त्याच्यात कितपत आहे? शरद पवारांनी इंदापूरच्या राजकारणात एकाच दगडात तीन पक्षी कसे मारलेत? तेच पाहूया आजच्या व्हिडिओमध्ये…
जिल्हा परिषदेचे माजी सभापती आणि सोनई उद्योगाच्या संचालक प्रवीण माने हे लवकरच अजित पवार गटातील शरद पवारांच्या गोटात येत राष्ट्रवादीची तुतारी हाती धरणार आहेत… खरंतर इंदापूरच्या राजकारणात स्पर्धा ही नेहमी हर्षवर्धन पाटील विरुद्ध दत्ता मामा भरणे यांच्यातच पाहायला मिळाली… या तिघांना पुरून उरेल, असा तिसरा चेहरा मतदार संघात उदयास आला नाही, किंवा तशी राजकीय परिस्थितीही इंदापुरात कधी आली नाही… पण राष्ट्रवादीत फूट पडली… पाटील आणि भरणे हे पारंपारिक विरोधक झालं गेलं सारं विसरून महायुतीच्या एका छताखाली आले… नाईलाजाने का होईना पण त्यांनी लोकसभेला महायुतीच्या उमेदवाराचा खांद्याला खांदा लावून प्रचार केला…
पण या सगळ्यात एक नाव चर्चेत आलं होतं… ते म्हणजे प्रवीण माने यांचं… जिल्हा परिषद, उद्योग संस्था यांचं जाळू उभारून माने हे तालुक्याच्या राजकारणात जम बसवू लागले… म्हणूनच जेव्हा खासदारकीला मानेंनी सुप्रिया ताईंचे काम करायला सुरुवात केली… तेव्हा दस्तूर खुद्द फडणवीसांनी प्रवीण मानेंच्या घरी भेट देत चर्चा केली होती… तेव्हा लोकसभेला ते पुन्हा महायुतीच्या म्हणजे सुनेत्रा पवार यांच्या बाजूने प्रचार करताना दिसले… एवढेच काय तर हर्षवर्धन पाटील – दत्तामामा भरणे – प्रवीण माने हे एकमेकांच्या विरोधात असणार त्रिकूट एकाच गाडीत अजित दादांसोबत सेल्फी मध्ये दिसले… पण सारी शक्ती पणाला लावूनही इंदापुरातून सुनेत्रा पवार या मायनसमध्ये गेल्या… अर्थात येणाऱ्या विधानसभेला विद्यमान आमदार दत्तामामा भरणे आणि हर्षवर्धन पाटील यांच्या पुन्हा एकदा आमदार होण्याच्या स्वप्नांचा चकनाचूर झाला… या दोघांपैकी एक जण निवडणुकीच्या रणधुमाळीत शरद पवारांची तू तरी हाती धरेल, असाही एक अंदाज लावला जात असताना… शरद पवारांनी तिसराच मोठा गेम करत प्रवीण माने यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेतल्याचं समजतंय…
यामुळे काट्याने काटा काढावा अशी चाललेली पाटील विरुद्ध भरणे अशा लढतीत आता माने हा नवा खिलाडी आमदारकीसाठी टफ फाईट देताना दिसेल.. सोनाई संस्थेच्या माध्यमातून त्यांचा तालुक्यात चांगला कनेक्ट आहे.. दुष्काळी चारा छावणी, सामुदायिक लग्न सोहळे, आरोग्य शिबिरेअशा अनेक सामाजिक उपक्रमातून त्यांनी आपला जनसंपर्क चांगलाच दमदार केलाय… त्यामुळे मानेंच्या या जनसंपर्क आणि संस्थात्मक राजकारणाला शरद पवारांची साथ मिळाली तर कदाचित इंदापूरचा निकाल अनपेक्षित वळणावर जातानाही पाहायला मिळू शकतो…
धनगर समाज आजही एक गठ्ठा भरणे मामांसाठी निर्णायक मतदान करतो. या त्यांच्या जमेच्या बाजू आहेतच. पण मागील काही दिवसांपासून तालुक्यातील त्यांचा कनेक्ट कमी झालाय, आरक्षणाच्या निमित्ताने मराठा समाजाचं ध्रुवीकरण झाल्यानं हा समाज यंदा भरणे मामांच्या विरोधात जाऊ शकतो. त्यात विरोधकांनी मलिदा गॅंग आणि टक्केवारीचा मुद्दा उचलून धरल्याने आणि संस्थात्मक राजकारणात भरणे मामा फार मागे असल्याने यंदा हर्षवर्धन पाटलांसाठी घोडे मैदान तुलनेने सोपं झालं होतं… कार्यकर्त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरण्याचा हट्ट धरलाय, अस स्टेटमेंट करून त्यांनी कुठल्या पक्षाकडून नाही तर आपली वैयक्तिक ताकद येणाऱ्या विधानसभेला आजमावण्याची भाषा आधीच बोलून दाखवलीये… पण हर्षवर्धन पाटलांच्या हातात तोंडाशी आलेला आमदारकीचा घास आता शरद पवारांच्या मदतीने प्रवीण माने हिसकावून घेतात का? ते पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे…
इंदापूर बाजार समितीचे माजी सभापती आप्पासाहेब जगदाळे हे देखील शरद पवार गटाकडून उमेदवारीसाठी ठाण मांडून बसल्याचं समजतंय… बहुदा मानेंच्या शरद पवार गटातील एन्ट्रीच्या चर्चेआधी त्यांचंच नाव जवळपास शरद पवार गटाकडून फिक्स समजले जात होतं… पण आता प्रवीण माने स्वतः शरद पवार गटात आल्याने… मतदारसंघात तुतारीचा आवाज जोरदार काढण्यासाठी लागणारी संघटनात्मक यंत्रणा आणि राजकीय जनसंपर्क यामध्ये माने हे कधीही उजवे ठरतात… त्यामुळे इंदापूर मध्ये यंदा दुरंगी नाही तर तिरंगी खत्रुड सामना पाहायला मिळणार आहे… सध्या तरी महायुतीकडून राष्ट्रवादीचे दत्तामामा भरणे – अपक्ष म्हणून हर्षवर्धन पाटील – तर शरद पवार गटाकडून प्रवीण माने किंवा आप्पासाहेब जगदाळे निवडणूक रिंगणात दिसतील…त्यामुळे एकूणच इंटरेस्टिंग वळणावर जाऊन पोचलेल्या इंदापूरच्या राजकारणाचा आमदारकीचा गुलाल यंदा कोणाच्या कपाळाला लागतोय? हर्षवर्धन पाटील, दत्तामामा भरणे, प्रवीण माने की आप्पासाहेब जगदाळे? इंदापूर चा 2024 चा आमदार कोण? तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा…
हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । WhatsApp हे जगातील सर्वात लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. वापरायला अतिशय सोप्प आणि उपयुक्त असल्याने जवळपास प्रत्येकाच्याच मोबाईल मध्ये आपल्याला व्हाट्सअप बघायला मिळते. अगदी तरुण मुलांपासून ते जेष्ठ नागरिकांपर्यंत सर्वच जण व्हाटसप वापरत असतात. मात्र व्हाट्सअप यूजर्ससाठी एक महत्वाची बातमी आहे. जवळपास ३५ मोबाईल मधून व्हाट्सअप बंद होणार आहे. त्यामुळे यामध्ये तुमचा मोबाईल तरी नाही ना याची माहिती जाणून घ्या..
WhatsApp मध्ये सतत नवनवीन व्हर्जन अपडेट्स होत असतात आणि त्यामुळे वेगवगळे फीचर्स मिळतात.परंतु यामुळे जुन्या ऑपरेटिंग सिस्टमवर चालणाऱ्या स्मार्टफोनला सपोर्ट करणे बंद होते. अँड्रॉइड आणि आयओएससाठी वेळोवेळी अपडेट्स दिले जातात. परंतु असे अनेक वापरकर्ते आहेत जे खूप जुने सॉफ्टवेअर वापरत आहेत. व्हॉट्सॲपने अशा उपकरणांसाठी आपला सपोर्ट बंद करण्याची तयारी केली आहे. म्हणजेच आता या अपडेटमुळे काही स्मार्टफोनमधील व्हॉट्सअप बंद होणार आहे.कंपनीकडून यापूर्वी सुद्धा अनेक मोबाईल यामधील अँपचा सपोर्ट बंद करण्यात आला आहे. लोकांची गोपनीयता आणि सुरक्षितता लक्षात घेऊन आम्ही जुन्या डिव्हाइसेसवरून आमचा सपोर्ट काढून टाकतो असा दावा कंपनी वेळोवेळी करत असते.
आताही व्हाट्सअप कडून Android 4 किंवा त्याहून जुने, iOS 11 किंवा त्याहून जुने आणि Kai OS 2.4 आणि त्याहून जुन्या डिव्हाइसेसमध्ये आपली सेवा बंद करण्यात आली आहे. सध्या WhatsApp फक्त Android 5 किंवा iOS 11 व्हर्जन असलेल्या स्मार्टफोनला सपोर्ट करत आहे. नेमकं कोणकोणत्या मोबाईल मधील व्हाट्सअप बंद होईल याबाबत ठोस माहिती कंपनीने दिलेली नाही. मात्र, कॅनालटेक या वेबसाइटनुसार या यादीत 35 स्मार्टफोन आहेत. ज्यावर व्हॉट्सॲपची सुविधा बंद करण्यात आली आहे. यामध्ये Apple, Samsung, Huawei, Motorola या कंपन्यांच्या स्मार्टफोनचा समावेश आहे.
या डिव्हाइसमधील WhatsApp बंद होणार –
Samsung Galaxy Ace Plus Samsung Galaxy Core Samsung Galaxy Express 2 Samsung Galaxy Grand Samsung Galaxy Note 3 N9005 LTE Samsung Galaxy Note 3 Neo LTE+ Samsung Galaxy S 19500 Samsung Galaxy S3 Mini VE Samsung Galaxy S4 Active Samsung Galaxy S4 mini I9190 Samsung Galaxy S4 mini I9192 Duos Samsung Galaxy S4 mini I9195 LTE Samsung Galaxy S4 Zoom Apple
IOCL Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही नेहमीच नोकरीच्या विविध संधी घेऊन येत असतो. ज्याचा नागरिकांना फायदा देखील होत असतो. आज देखील आम्ही अशीच एक संधी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL Bharti 2024)अंतर्गत एक मोठी भरती जाहीर झालेली आहे. ही भरती नॉन एक्झिक्यूटिव्ह या पदासाठी आहे. या पदाच्या एकूण 467 रिक्त जागा आहेत. आणि त्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. ही भरती ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. त्यामुळे उमेदवारांना लवकरात लवकर अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अर्ज करायचे आहेत. त्याचप्रमाणे 21 ऑगस्ट 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे या तारखे अगोदरच उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करा. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.
महत्त्वाची माहिती | IOCL Bharti 2024
पदाचे नाव – नॉन एक्झिक्यूटिव्ह
पदसंख्या – 467 जागा
अर्ज पद्धती – ऑनलाइन
अर्ज शुल्क – 300 रुपये
वयोमर्यादा – 18 ते 26 वर्ष
अर्ज सुरू होण्याची तारीख – 22 जुलै 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 ऑगस्ट 2024
शैक्षणिक पात्रता – दहावी पास इंजीनियरिंग डिप्लोमा किंवा आयटीआय
पदसंख्या
जूनियर इंजीनियरिंग असिस्टंट – 379 जागा
ज्युनियर कॉलिटी कंट्रोल अनॅलिसिस – 21जागा
इंजीनियरिंग असिस्टंट – 38 जागा
टेक्निकल अटेंडंट – 29 जागा
अर्ज कसा करावा ?
या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करावा लागेल.
तुम्ही खाली दिलेल्या लिंक वरून देखील अर्ज करू शकता.
अर्ज करण्यापूर्वी पीडीएफ जाहिरात सविस्तरपणे वाचा.
21 ऑगस्ट 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या तारखे अगोदरच अर्ज करा.
Agricultural pricing policy | शेती हा भारतातील प्रमुख व्यवसाय आहे. अनेक शेतकरी हे शेती करतात. भारताची बहुतांश अर्थव्यवस्था ही शेती या व्यवसायावर अवलंबून आहे. भारतीय अर्थव्यवस्थेत आणि कृषी क्षेत्रात देखील मूल्य धोरण खूप महत्त्वाचे आहे. त्यामध्ये नेहमी चढ-उतार होत असते. सरकारच्या नवीन धोरणाचे आता मुख्य उद्दिष्ट हे उत्पादक आणि ग्राहक या दोघांचे संरक्षण करणे हे आहे. घरगुती आणि राष्ट्रीय दोन्ही स्तरावर अन्नसुरक्षा मिळवणे हे भारतासमोरील प्रमुख आव्हानंपैकी एक मोठे आव्हान आहे. यासाठी अन्नसुरक्षा व्यवस्था आणि मूलभूत धोरणांमधील खरेदी आधारभूत किंमत यांचा समावेश महत्त्वाचा असतो. बफर स्टॉक आणि सार्वजनिक वितरण व्यवस्था, कृषी मूल्य धोरण हे उत्पादन, रोजगार आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न सुधारून अन्न सुरक्षा साधण्याचे एक महत्त्वाचे साधन आहे. अन्नसुरक्षा राखण्यासाठी आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी शेतकऱ्यांना मोबदला देणारे स्त्रोत उपलब्ध करून देण्याची गरज आहे.
शेतीमालाच्या किमतीतील तीव्र चढउतारांचे हानिकारक परिणाम होतात. उदाहरणार्थ, काही वर्षांत विशिष्ट पिकाच्या किमतीत मोठी घसरण झाल्यास त्या पिकाच्या उत्पादकांचे मोठे नुकसान होऊ शकते. यामुळे उत्पन्न तर कमी होईलच पण येत्या वर्षभरात तेच पीक घेण्याचा उत्साहही कमी होईल. जर ते लोकांचे मुख्य अन्न असेल, त्यामुळे मागणीपेक्षा पुरवठा कमी होईल. हे सरकारला आयात करून फरक भरून काढण्यास भाग पाडेल (बफर स्टॉक नसल्यास). विशिष्ट कालावधीत एखाद्या पिकाच्या किमती झपाट्याने वाढल्या तर ग्राहकाचे नुकसान निश्चितच होते. एखाद्या विशिष्ट पिकाच्या किमती वाढत राहिल्यास त्याचा अर्थव्यवस्थेच्या इतर क्षेत्रांवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.
मंदीच्या वेळी (सामान्यतः कापणीच्या वेळेस) शेतकऱ्यांना कमी किमतीत विक्री करण्यास भाग पाडले जात नाही, जे भारतासारख्या कमी क्रयशक्ती आणि कमी बाजार मागणी असलेल्या देशात अनेकदा घडते.पीक अपयशाच्या एका वर्षात शेतीमालाचे भाव नियंत्रणाबाहेर जात नाहीत. अर्थव्यवस्थेच्या दीर्घकालीन वाढीला जास्तीत जास्त वाढवणाऱ्या किंमती प्रचलित आहेत.
कृषी मूल्य धोरणाची उद्दिष्टे
कृषी किंमत धोरणाची उद्दिष्टे राष्ट्रीय अर्थव्यवस्थेतील शेतीच्या स्थितीनुसार देशानुसार भिन्न असतात. सामान्यतः, विकसित देशांमधील मूलभूत धोरणाचा मुख्य उद्देश कृषी उत्पन्नात तीव्र घट रोखणे हा आहे, तर विकसनशील अर्थव्यवस्थांमध्ये ते कृषी उत्पादन वाढवणे आहे.
भारतातील कृषी किंमत धोरणाची प्रमुख उद्दिष्टे
अन्नधान्य आणि बिगर अन्नधान्य आणि कृषी माल यांच्या किमती यांच्यातील योग्य संबंध सुनिश्चित करणे.
उत्पादक आणि ग्राहक यांचे हित संतुलित करणे
किमान मर्यादेपर्यंत किमतीतील चक्रीय हंगामी चढउतार नियंत्रित करण्यासाठी.
देशाच्या विविध क्षेत्रांमधील उत्पत्तीचे अधिक एकत्रीकरण घडवून आणणे जेणेकरून विक्रीयोग्य अधिशेषाचा नियमित प्रवाह चालू ठेवता येईल
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बांग्लादेशमधून एक मोठी घडामोड समोर येत आहे. बांगलादेश मध्ये मोठी अराजकता माजली असून परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. या पार्श्वभूमीवर बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना (Sheikh Hasina Resign) यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आहे. एवढच नव्हे तर शेख हसीना बांगलादेश सोडून भारतात दाखल झाल्या आहेत. बांगलादेशातील वादग्रस्त कोटा प्रणालीवरून ढाका विद्यापीठातील विद्यार्थी कार्यकर्त्यांची पोलिस आणि सरकार समर्थक निदर्शकांशी हिंसक झटापट झाली होती तेव्हापासूनच बांगलादेश मध्ये अराजकारता पसरायला सुरूवात झाली होती. आता संपूर्ण परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली असून लष्कर संपूर्ण देशाची सत्ता हातात घेण्याची शक्यता आहे.
हजारो आंदोलक रस्त्यावर –
आरक्षणाच्या मुद्द्यावरून बांगलादेश मध्ये मोठं आंदोलन सुरु आहे. सरकारी नोकरीत सध्या असलेला आरक्षणाचा कोटा रद्द करावा, अशी या विद्यार्थ्यांची मागणी होती. या आंदोलनानंतर शेख हसीना सरकारने काही कोटा कमी केला, मात्र तरीही आक्रमक आंदोलकांनी शेख हसीना यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती. बांगलादेशचे लष्करप्रमुख वकार-उझ-झमान यांनी सुद्धा शेख हसिना यांना जनतेच्या भावना लक्षात घेऊन राजीनामा देण्यास सांगितले आहे. यानंतर शेख हसीना यांनी आज राजीनामा देत देशातून पळ काढला आहे. बांगलादेश मध्ये जाळपोळ आणि हिंसाचाराने परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. त्यामुळे देशात अनिश्चित काळासाठी कर्फ्यू लावण्यात आला असून इंटरनेटदेखील बंद करण्यात आलं आहे. ढाका शहरात हजारो आंदोलक रस्त्यावर उतरले आहेत. ३०० पेक्षा जास्त नागरिकांचा यामध्ये मृत्यू झाला आहे. या एकूण सर्व परिस्थितीमुळे पंतप्रधान शेख हसीना यांच्यावर देश सोडण्याची वेळ आली आहे. हसीना या भारतात दाखल झाल्यात अशाही बातम्या समोर येत आहेत.
Bangladesh Prime Minister Sheikh Hasina departed from Bangabhaban at around 2:30pm on Monday on a military helicopter, accompanied by her younger sister, Sheikh Rehana for a “safer place.”: Bangladesh media reports pic.twitter.com/cAzcRgwvul
शासकीय नोकरीत मिळणाऱ्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून बांगलादेशमध्ये अराजकता माजली आहे . 1971 साली बांगलादेशची निर्मिती झाली. या लढ्यात ज्या लोकांनी आपले योगदान दिलेले आहे, त्यांच्या वंशजांना मिळत असलेले आरक्षण कायम राहावे, असे आंदोलकर्त्यांचे मत आहे. तर हे आरक्षण आता बंद करावे, असे दुसऱ्या एका गटाचे मत आहे. बांगलादेशच्या स्वातंत्र्य संग्रमात सामील झालेल्या लोकांच्या कुटुंबीयांना बांगलादेशमध्ये 30 टक्के आरक्षण मिळते. या देशात धर्माच्या आधारावर अल्पसंख्यांकांना 5 टक्के आरक्षण दिले जाते. एक टक्का आरक्षण दिव्यांगांना दिले जाते. मात्र आरक्षणाचा मुद्दा तापल्याने देशातील संपूर्ण वातावरण बिघडलं आणि हिंसाचार, जाळपोळीच्या घटनांनी बांगलादेशच्या पंतप्रधानांना देश सोडण्याची वेळ आली.
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतात मोबाईलचे वेड जवळपास सर्वच व्यक्तींना असून नवनवीन मोबाईल घेण्याकडे अनेकांचा कल असतो. मात्र कमी पैशात जास्तीत जास्त फीचर्स असणारा मोबाईल खरेदी करण्याकडे ग्राहक भर देत असतात. तुम्हीही नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याच्या विचारात असाल आज आम्ही तुम्हाला अशा मोबाईलबद्दल सांगणार आहोत जो अवघ्या 13,499 रुपयांत लाँच झाला आहे. Infinix Note 40X 5G असं या स्मार्टफोनचे नाव असून यामध्ये 108MP कॅमेरा, 12GB रॅमसह अनेक भन्नाट फीचर्स देण्यात आले आहेत. चला तर मग याबाबत अगदी सविस्तर जाणून घेऊयात…
6.78 इंचाचा डिस्प्ले –
Infinix Note 40X 5G मध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.78 इंचाचा FHD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेला 500 निट्स पीक ब्राइटनैसचा सपोर्ट मिळतो. मोबाईल मध्ये MediaTek Dimension 6300 प्रोसेसर बसवण्यात आला असून हा स्मार्टफोन Android 14 वर आधारित ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. स्मार्टफोनमध्ये पंच-होल डिझाइन देण्यात आली आहे. इनफिनिक्सचा हा नवा हँडसेट 8 GB + 256 GB स्टोरेज आणि 12GB रॅम, 256GB स्टोरेज अशा २ स्टोरेज व्हेरिएन्टमध्ये लाँच करण्यात आला आहे.
कॅमेरा – Infinix Note 40X 5G
कोणताही मोबाईल खरेदी करत असताना फोटोग्राफीसाठी त्यातील कॅमेरा कसा आहे याकडे ग्राहकांचे लक्ष्य असते. हीच गोष्ट डोळ्यासमोर ठेऊन कंपनीने Infinix Note 40X 5G मध्ये फोनमध्ये 108MP ट्रिपल AI कॅमेरा सेटअप दिला आहे. असा दावा केला जात आहे की कॅमेरा ॲप 15 पेक्षा जास्त मोडला सपोर्ट करतो, ज्यामध्ये ड्युअल व्हिडिओ, सुपर नाईट, फिल्म मोड इ.मोड आहेत. तर सेल्फी आणि विडिओ कॉल साठी समोरील बाजूला ८ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. पॉवरसाठी स्मार्टफोनमध्ये 5000mAh बॅटरी बसवण्यात आली असून हि बॅटरी 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. मोबाईल अनलॉक करण्यासाठी यामध्ये साइड-माउंट फिंगरप्रिंट सेन्सर आहे. तसेच फेस अनलॉक फीचर देण्यात आले आहे.
किंमत किती?
Infinix 40X 5G मोबाईलच्या 12GB आणि 256GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 14,999 रुपये आहे. तर 8 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 13,499 रुपये आहे. येत्या 9 ऑगस्ट 2024 पासून हा स्मार्टफोन विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. तुम्ही प्रसिद्ध ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्ट तसेच रिटेल स्टोअरमधून हा मोबाईल खरेदी करू शकता.
Pune News : मागच्या दोन-तीन दिवसांमध्ये पुणे विभागात जोरदार पाऊस पडत आहे. त्यातही पुण्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे नद्या दुधडी भरून वाहत असून भाटघर धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. परिणामी नीरा (Pune News) नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार रविवारी (४) दुपारी भाटघर धरणाच्या जवळ असलेल्या सांगवी गुमा आणि हरताळी (तालुका खंडाळा जिल्हा सातारा) या गावांना जोडणाऱ्या पुलावरून पाणी वाहू लागल्यामुळे प्रशासनाने हा पूल वाहतुकीसाठी बंद केला आहे. त्यामुळे भोर-पुणे मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे तुम्ही जर या मार्गावरून प्रवास करण्याचा विचार करीत असाल तर हा मार्ग बंद (Pune News) करण्यात आलेला आहे ही बाब लक्षात घ्या.
रविवारी सकाळी पुलाच्या दोन फूट खाली पाणी होते परंतु पावसाचा जोर अचानक वाढल्यामुळे पाण्याच्या पातळीमध्ये झपाट्यांने वाढ झाली. रविवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास पुलावरून पाणी वाहू लागले आणि याची माहिती मिळताच तहसीलदार सचिन पाटील यांनी पूल वाहतुकीसाठी बंद करण्याच्या सूचना दिल्या. पोलिसांनी व सांगवीच्या ग्रामस्थांनी लगेचच पुलाच्या दोन्ही बाजूंकडे बांबू लावून पूल (Pune News) वाहतुकीसाठी बंद केला.
काय आहे पर्यायी मार्ग ? (Pune News)
याबाबत माहिती देताना भोर येथील निवासी नायब तहसीलदार अरुण कदम यांनी सांगितले की, हरताळी येथील पुलावरून पाणी वाहू लागल्यामुळे हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे. भोर होऊन पुण्याला जाणारी वाहतूक ही भोर शिंदेवाडी सारोळा कापूरहोळ मार्गे(Pune News) वळवण्यात आली आहे.