Weight Loss | भारतीय जेवणामध्ये आपण वरण-भात, चपाती, भाजी असे सगळे पदार्थ खातो. यामध्ये योग्य प्रमाणात कॅलरीज देखील आपल्या शरीराला मिळतात. परंतु आजकाल लोकांची जीवनशैली मोठ्या प्रमाणात बदलली आहे. फास्ट फूड खाण्याचे प्रमाण देखील वाढलेले असल्याने अनेक लोकांमध्ये वजन वाढण्याची समस्या निर्माण होते. त्यामुळे हे वजन नियंत्रित करण्यासाठी (Weight Loss) अनेक लोक डायट फॉलो करतात. यासाठी अनेक लोक हे त्यांच्या जेवणातील चपाती कमी करतात. आणि त्या बदल्यात फायबरयुक्त पदार्थ खातात. जेणेकरून तुमचे शरीर तुम्हाला निरोगी ठेवता येईल. आणि तुम्हाला डाएट देखील फॉलो करता येईल.
फायबर्स हे वजन कमी करतात. त्यामुळे आपली पचनक्रिया देखील चांगली राहते. चपातीत फायबरचे प्रमाण वाढवण्यासाठी खाता. अनेकांचे असे म्हणणे असते की, जर गव्हाच्या चपात्या खाल्या तर त्यामुळे तुमचे वजन वाढू शकते. परंतु तुम्ही या गव्हाच्या पिठात इतर धान्यांचा समावेश करतो जसं की बाजरी नाचणी या पिठाचा देखील फायदा करू शकता. तसेच तुम्ही चपातीमध्ये गाजर, मुळा कोबी यांसारखे पदार्थ घालून मस्त चपाती बनवू शकता.
जर तुम्हाला वजनही वाढवायचे नसेल आणि चपाती खायची असेल तर तुम्ही साधी चपाती खाऊ शकता. चापतीला कोणत्याही प्रकारचे तेल किंवा तूप लावू नका. यामध्ये कमी कॅलरीज असतात. तसेच मल्टीग्रेन पिठाच्या आहारात समावेश करून देखील तुम्ही कॅलरीज कमी करू शकता. आणि तुमचे वजन देखील नियंत्रणात राहील. परंतु जर तुम्ही जास्तच ओव्हरवेट असाल, तर तुम्ही नाचणी आणि बाजरी किंवा ज्वारीच्या पिठाचा जेवणात समावेश करू शकता.
जरी तुम्ही लठ्ठपणाने ग्रस्त असाल आणि तुम्हाला चपाती देखील खायची असेल, तर तुम्ही जास्तीत जास्त रोज व्यायाम करणे गरजेचे आहे तसेच दोन जेवणांमध्ये कमीत कमी दोन ते तीन तासांच्या अंतर ठेवावे. तसेच तेलकट पदार्थांपासून आणि पॅक केलेल्या पदार्थांपासून लांब राहा तरच तुमचे वजन कमी होईल.
Benefits of Indian Spices | आपल्या भारतातील मसाले हे अत्यंत स्वादिष्ट असतात. अगदी देशाबाहेर देखील भारतीय मसाल्यांचे निर्यात केली जाते. भारतीय मसाले हे चवीला जितके चांगले असतात. तितकेच ते मसाले आरोग्याच्या दृष्टीने देखील खूपच जास्त लाभदायी असतात. भारतीय मसाल्यामुळे आपल्या जेवणाला चव तर येतेच, परंतु आरोग्याच्या दृष्टिकोनातूनच खूप जास्त फायदे होतात. आज आम्ही तुम्हाला आपल्या स्वयंपाक घरातील अशा मसाल्यांबद्दल (Benefits of Indian Spices) माहिती सांगणार आहोत. जे तुमच्या आरोग्यासाठी आणि पचनसंस्थेसाठी खूप फायदेशीर असतात. या मसाल्यांमुळे आपल्या जेवणाची चव तर वाढतेच, तसेच आरोग्य संबंधी असलेल्या अनेक समस्या देखील दूर होतात.
दालचिनी | Benefits of Indian Spices
तुम्हालाही अनेकदा गॅस किंवा अपचनाची तक्रार असेल तर दालचिनी चहा किंवा जेवणात घालून सेवन करणे खूप फायदेशीर आहे. यामुळे नैसर्गिकरित्या तुमची पचनक्रिया मजबूत होते आणि जेवणाची चवही दुप्पट होते.
हिंग
जर तुम्हालाही आम्लपित्त आणि आंबट ढेकर याने त्रास होत असेल तर यासाठी हिंगाचे सेवन करणे खूप फायदेशीर ठरू शकते. हिंग अपचन, आम्लपित्त आणि पोटाशी संबंधित सर्व प्रकारच्या समस्यांवर उपयुक्त ठरते. त्यात दाहक-विरोधी गुणधर्म आढळतात, जे उपचारासाठी खूप प्रभावी आहेत.
सेलेरी
पोटाशी संबंधित सर्व प्रकारच्या समस्यांवरही सेलेरीचे सेवन फायदेशीर आहे. गॅस आणि ॲसिडिटी बरा करण्यासाठी हे खूप प्रभावी मानले जाते. त्यात असलेले थायमॉल तेल गॅस्ट्रिक ज्यूस सोडते ज्यामुळे ॲसिडिटीमध्ये आराम मिळतो. हे प्रत्येक स्वयंपाकघरात सहज उपलब्ध आहे.
आले
पचनसंस्था मजबूत होण्यासाठी आल्याचे सेवन अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. पोट फुगणे किंवा फुगणे यासारख्या समस्यांपासून आराम मिळवून देण्यासाठी देखील हे खूप उपयुक्त आहे. हे सर्दी-खोकल्यांवरही रामबाण उपाय म्हणून काम करते.
जिरे | Benefits of Indian Spices
जिऱ्याशिवाय कोणत्याही पदार्थाची चव मंद राहते. भारतीय खाद्यपदार्थातील बहुतेक पदार्थांमध्ये याचा समावेश होतो. तुम्ही ते गॅसवर कोरडे भाजूनही गरम पाण्यासोबत खाऊ शकता. त्याच वेळी, सकाळी लवकर रिकाम्या पोटी याचे सेवन केल्याने पचन सुधारते.
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राहुल द्रविडच्या जागी गौतम गंभीर (Gautam Gambhir) भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक झाल्यानंतर भारतीय संघात अनेक बदल पाहायला मिळाले. सध्याचा श्रीलंका दौरा हा गंभीर युगाचा पहिलाच दौरा आहे. यावेळी भारतीय संघातील टॉप ऑर्डर फलंदाजांनी चक्क बॉलिंग टाकल्याचे पाहायला मिळालं. आश्चर्य तर तेव्हा वाटलं जेव्हा कालच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात कर्णधार रोहित शर्मानेच (Rohit Sharma Bowling) हातात बॉल घेतला. रोहितने २ ओव्हर टाकल्या आणि सर्वानाच आश्चर्यचकित केलं, कारण याच रोहितने बॉलिंग करणार नाही असं म्हंटल होते. त्यामुळे प्रशिक्षक गंभीरपुढे रोहितचे काय चालेना का? असा प्रश्न यामुळे निर्माण झाला आहे.
श्रीलंकेविरुद्ध दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात कर्णधार रोहित शर्माने 2 ओव्हर्स टाकलया, यादरम्यान त्याने 11 धावा दिल्या. मात्र रोहितला एकही विकेट मिळाली नाही. 8 वर्षांत रोहित शर्माला वनडे सामन्यात गोलंदाजी करताना पाहण्याची ही दुसरी वेळ होती. यापूर्वी रोहितने 2023 च्या वर्ल्डकपमध्ये नेदरलँड्सविरुद्ध एक ओव्हर टाकली होती आणि तेव्हा विकेट मिळ्वण्यातही त्याला यश आलं होते. त्यानंतर श्रीलंकेविरुद्ध गोलंदाजी केली. मात्र रोहितच्या गोलंदाजी करण्यामागे गौतम गंभीरची स्ट्रॅटजी होती का? अशी शंका निर्माण झाली आहे. कारण टी-20 सिरीजमधील शेवटच्या सामन्यात सूर्यकुमार यादव आणि रिंकू सिंग यांनी गोलंदाजी केल्यानंतर आता तू सुद्धा गोलंदाजी करणार का? असा सवाल केला असताना रोहितने स्पष्टपणे नकार देत आपण केवळ फलंदाजीवर फोकस करणार असल्याने म्हंटल होते.
भारताचा पराभव –
दरम्यान, दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाचा अनपेक्षित पराभव झाला. श्रीलंकेच्या टीमने निर्धारित 50 ओव्हर्समध्ये 9 विकेट्स गमावून 240 रन्स केल्या, मात्र श्रीलंकन फिरकीपटूंसमोर टीम इंडियाच्या फलंदाजांनी लोटांगण घातलं. रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांच्या ९७ धावांच्या सलामीनंतरही टीम इंडियाचा डाव अवघ्या २०७ धावांत गुंडाळला. टीम इंडियाची ,मधली फळी पूर्णपणे निष्प्रभ ठरली. जेफ्री वंडरसे यांच्या लेगस्पिन फिरकीपुढे भारतीय फलंदाज पुरते चाचपडले, त्याने ६ बळी घेतलं श्रीलंकेच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. आणि संघाला अश्यक्यप्राय असा विजय मिळवून दिला.
Amazon Great Freedom Festival Sale | कोणताही सण आला की, अनेक ई कॉमर्स वेबसाईटवर नवनवीन ऑफर्स चालू होतात. अशातच आता श्रावण महिना चालू झालेला आहे. आणि अनेक सण आता लागोपाठ येणार आहेत. त्यामुळे जर तुम्ही या सणांनिमित्त काही नवीन वस्तू तयार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर लवकरात लवकर तुमची लिस्ट तयार करा. कारण आता ॲमेझॉनवर प्राईम डे नंतर आता एक Amazon great freedom festival sale date सेल सुरू होणार आहे.
या सेल दरम्यान ग्राहकांना जवळपास 80 टक्के सवलत मिळणार आहे. Amazon great freedom festival sale date प्राईम मेंबरसाठी 5 ऑगस्ट च्या मध्यरात्री म्हणजे 6 ऑगस्टला सुरू होणार आहे. तर इतर सर्व ग्राहकांसाठी हा सेल दुपारी 12 वाजता सुरू होणार आहे. या ॲमेझॉन सेलसाठी एसबीआय बँकेसोबत त्यांचा करार झालेला आहे. त्यामुळे या सेल दरम्यान तुम्ही खरेदी करताना पेमेंटसाठी एसबीआय बँकेच्या कार्डचा देखील वापर करू शकता. यामध्ये तुम्हाला 10 टक्के इंटरेस्ट डिस्काउंट देखील फायदा मिळणार आहे.
या प्रॉडक्ट्सवर मोठी सूट | Amazon Great Freedom Festival Sale
दरम्यान तुम्हाला लॅपटॉप खरेदी करायचा असेल तर तुम्हाला तो 45 हजार रुपयांपर्यंत मिळणार आहे. त्याचप्रमाणे होम अप्लायन्सेस वर तुम्हाला 65 टक्के सूट मिळणार आहे. तर हेडफोन्सवर 75 टक्के सूट मिळणार आहे. टॅबलेटवर तुम्हाला 60% तर नवीन स्मार्टवॉचवर तुम्हाला 80% डिस्काउंट मिळणार आहे. तसेच स्मार्ट टीव्ही मॉडेल्स तुम्हाला 65% पर्यंत डिस्काउंट मिळणार आहे. म्हणजेच तुम्हाला जर कोणत्याही इलेक्ट्रॉनिक्स गोष्टी खरेदी करायचा असेल, तर तुमच्यासाठी हा सेल अत्यंत उत्तम आहे.
24 महिन्यापर्यंत नो कॉस्ट ईएमआय
या सेलमध्ये मोबाईल फोनवर सुद्धा ग्राहकांना चांगल्या प्रकारे डील्स मिळणार आहेत. यामध्ये तुम्हाला चांगले ऑफर्स मिळणार आहे. ग्राहकांना 24 महिन्यापर्यंत नो फर्स्ट इयर 50000 पर्यंत एक्सचेंज ऑफर आणि कुपनच्या माध्यमातून 5 हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट मिळणार आहे. म्हणजेच हा असेल तुमच्यासाठी अत्यंत फायद्यासाठी ठरणार आहे.
यामध्ये तुम्हाला अनेक मोबाईल फोन देखील अत्यंत कमी प्राईजमध्ये मिळतील. या सेलमध्ये तुम्ही या डिस्काउंटचा फायदा घेऊन नवीन मोबाईल फोन देखील खरेदी करू शकता. यात तुम्हाला OnePlus Nord CE4, OnePlus Nord CE4 Lite 5G, iQOO Z9 Lite 5G, OnePlus Nord 4 5G, iQOO 12 5gG, Redmi 13 5G, Realme Narzo 70 Pro 5G, Realme Narzo 70x 5G, Tecno Spark 20 Pro 5G, Samsung Galaxy M35 5G आणि Honor 200 5G सह अजूनही मॉडल्स आहेत, जे सेलमध्ये तुम्हाला कमी किंमतीत मिळतील.
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीला (Maha Vikas Aghadi) लोकसभेला दमदार यश मिळाल्यानंतर आता विधानसभा निवडणुकीच्या तयारीला महाविकास आघाडी लागली आहे. येत्या ३ महिन्यात विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता असून निवडणूक आयोग कधीही या तारखा जाहीर करू शकते. त्यापार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या गोटातून एक मोठी बातमी समोर येत आहे. येत्या २० ऑगस्टला महाविकास आघाडीची मुंबईत महत्वपूर्ण बैठक होणार आहे. राहुल गांधींच्या उपस्थितीत हि बैठक होणार असून आगामी विधानसभा निवडणुकीचे जागावाटप आणि मुख्यमंत्रीपदाचा चेहरा यावर या बैठकीत चर्चा होईल.
काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला (Ramesh Chennithala) यांनी याबाबत माहिती दिली आहे. २० ऑगस्ट रोजी स्वर्गीय राजीव गांधी यांची जयंती आहे. त्याच दिवशी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे मुंबईत येणार असुन विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील नेत्यांसोबत चर्चा करणार आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सुद्धा या बैठकीला उपस्थित राहतील. कोणत्या पक्षाला किती जागा द्यायच्या आणि मुख्यमंत्री कोण असेल याबाबत या बैठकीत महत्वपूर्ण चर्चा होऊ शकते. ज्याप्रमाणे महाविकास आघाडीने लोकसभा निवडणूक एकत्रितपणे लढवली त्याचप्रमाणे विधानसभा निवडणूक सुद्धा आम्ही एकत्र लढू आणि यश मिळवू असा विश्वास चेन्निथला यांनी व्यक्त केला.
दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी यापूर्वीच उद्धव ठाकरे यांचं नाव मुख्यमंत्री पदासाठी अप्रत्यक्षपणे सुचवलं आहे. या महाराष्ट्राने महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंचं काम बघितलं आहे. लोकसभेतील अनेक घटकांचे मतदान उद्धव ठाकरेंच्या चेहऱ्याकडे बघूनच झालेलं आहे. अर्थात तिघांची ताकद महत्व्वाची आहेच मात्र बिन चेहऱ्याचे सरकार अजिबात चालणार नाही असं राऊतांनी सांगितलं. संजय राऊतांनी एकप्रकारे उद्धव ठाकरेंनाच मुख्यमंत्री पदासाठी समोर केलं होते. तर राऊतांच्या या विधानावर काँग्रेस आणि राष्ट्रवादीने कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती, त्यामुळे मुख्यमंत्री पदावरून महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
Weather Update | गेल्या आठवड्यापासून महाराष्ट्रामध्ये पावसाला चांगलाच वेग आलेला आहे. परंतु आज पावसाचा जोर काहीसा कमी कमी झाला आहे. आणि दिवसभरही आज कमी प्रमाणात पाऊस पडेल अशी माहिती हवामन विभागाने दिलेली आहे. हवामान विभागाकडून रोज पावसाबद्दलचा अंदाज व्यक्त होत असतो. अशातच हवामान विभागाने (Weather Update) आज म्हणजे 5 ऑगस्ट रोजी हवामान कसे असेल? याची माहिती देखील दिलेली आहे. हवामान विभागांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी देखील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. आणि त्या जिल्ह्यांना रेड अलर्ट देखील जारी करण्यात आलेला आहे.
आज अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा (Weather Update) जोर कमी झालेला दिसत आहे. तरी देखील बाकी काही जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार स्वरूपाचा पाऊस तसेच वादळी वारा आणि विजासहित पाऊस बरसणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज पुणे, सातारा या जिल्ह्यांमध्ये अति मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. त्यामुळे या विभागांना ऑरेंज कलर देण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे घाट माथ्यावर देखील अति मुसळधार तर इतर ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे आज मुंबईत देखील मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईला देखील अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. कोकणामध्ये देखील काही ठिकाणी मुसळधार त्यातील मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडू शकतो.
या विभागांना पावसाचा अलर्ट | Weather Update
त्याचप्रमाणे पालघर, ठाणे, रायगड,रत्नागिरी, सिंधुदुर्ग यांसारख्या जिल्ह्यांमध्ये देखील आज पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे नाशिक आणि कोल्हापूरमध्ये देखील आज मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच अमरावती, अकोला, वर्धा आणि यवतमाळ या ठिकाणी देखील वादळी वाऱ्याचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी आज पावसाचा येलो अलर्ट देखील जारी करण्यात आलेला आहे. तसेच इतर अनेक जिल्ह्यांमध्ये आज पाऊस येण्याची शक्यता जरा कमी आहे.
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना ठाकरे गटाने सामना अग्रलेखातून सर्वोच्य न्यायालयाचे सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्यावर उपहासात्मक टीका केली आहे. जानेवारी 2024 पर्यंत सर्वोच्च न्यायालयात 85 हजार खटले प्रलंबित असल्याचे समोर आले, यावरून सामनातून सरन्यायाधीश याना लक्ष्य करण्यात आलं आहे. शिवसेनेची फूट व पक्षांतराची सुनावणी ही न्यायालयाने ठरवले तर चार दिवसांत निकाली लागेल, पक्षबदलूंना धडा मिळू शकेल असे कायदा सांगतो, पण सरन्यायाधीशांच्या न्यायालयात तीनेक वर्षे फक्त तारखाच पडत आहेत. चंद्रचूड साहेबांची नातवंडे सर्वोच्च न्यायालयात विराजमान झाल्यावर या प्रकरणात न्याय मिळेल असा टोला ठाकरे गटाचे लगावला.
सामना अग्रलेखात काय म्हंटल?
भारताचे सरन्यायाधीश हे अधूनमधून न्यायव्यवस्थेवर चांगले प्रवचन देत असतात, पण अशा पोकळ प्रवचनांनी काय होणार? याआधी अनेक सरन्यायाधीशांनी न्यायव्यवस्थेच्या भ्रष्टाचारावर, कासवगतीवर, राजकीय दाबदबावावर प्रवचने झोडली आहेत. त्यामुळे सरन्यायाधीश चंद्रचूड साहेबांनी आता जणू काही नवीनच माहिती दिली आहे असे नाही. लोक ‘तारीख पे तारीख’ला कंटाळले आहेत. त्यांना तडजोड हवी आहे, असे चंद्रचूड साहेबांनी सांगितले. न्यायमूर्तीनी असे सांगणे हा आपल्या न्यायव्यवस्थेचा पराभव आहे. जानेवारी 2024 पर्यंत सर्वोच्च न्यायालयात 85 हजार खटले प्रलंबित असल्याचे समोर आले. सर्वोच्च न्यायालयाची ही अवस्था असेल तर जिल्हा न्यायालये, सत्र न्यायालये, हायकोर्टाची अवस्था काय असेल? देशातील उच्च न्यायालयांत साधारण साठ लाख खटले प्रलंबित आहेत व लोक कोर्टाच्या उंबरठय़ावर चपला झिजवून थकले आहेत, काही तर मरण पावले. देशभरातील जिल्हा न्यायालये, मॅजिस्ट्रेट न्यायालयांतील प्रलंबित खटल्यांचा आकडा साधारण साडेचार कोटी इतका आहे व हा आकडा न्यायव्यवस्थेस धडकी भरवणारा आहे.
चंद्रचूड म्हणतात ते खरेच आहे. लोक ‘तारीख’ प्रकरणास कंटाळले आहेत, पण या तारखा देतंय कोण? न्यायालयातील ‘तारीख’ प्रकरण ही एक गूढ अंदाधुंदी आहे. त्यामुळे न्यायाची, कायद्याची बूज राखली जात नाही. महाराष्ट्रात एक घटनाबाह्य सरकार अडीच वर्षांपासून सुरू आहे, सर्वोच्च न्यायालयाने त्यावर मोहोर उठवली. राज्यपालांची तेव्हाची कार्यवाही, बहुमत चाचणी, व्हिप गटनेतेपदी झालेली शिंदे-मिंधे मंडळाची निवड हे सर्व बेकायदेशीर आहे हे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट करून सर्व प्रकरण निकालासाठी विधानसभा अध्यक्षांकडे पाठवले, पण विधानसभा अध्यक्ष ही राजकीय व्यक्ती आहे व त्यांनीच घटनाबाह्य सरकारला वाचवण्यासाठी घटनेच्या दहाव्या शेडयूलमधील तरतुदीस न जुमानता शिवसेना व पक्षाचे चिन्ह फुटीर गटास दिले. याबाबत निवडणूक आयोगही न्यायाने वागला नाही. हे सर्व प्रकरण सर्वोच्च न्यायालयाने वेळीच निकाली काढून राज्यघटनेची बूज राखायला हवी होती, पण तेथेही ‘तारीख पे तारीख’च सुरू आहे. चंद्रचूड साहेबांची नातवंडे सर्वोच्च न्यायालयात विराजमान झाल्यावर या प्रकरणात न्याय मिळेल असा टोला ठाकरे गटाचे लगावला.
अशा प्रकरणात दिल्लीतील राज्यकर्त्यांचा दबाव सर्वोच्च न्यायालयावर नाही ना? अशा शंका निर्माण होतात. कारण देशाचे एकंदरीत वातावरण असा संशय वाढावा असेच आहे. न्यायालये निष्पक्ष राहिलेली नाहीत व न्यायालयांवर दबाव आहे असे अनेक न्यायमूर्तीनी निवृत्तीनंतर सांगितले, निवृत्त झालेल्या न्यायमूर्तीना सरकारकडून राज्यपाल, हायकमिशनर, ट्रिब्युनलची अध्यक्षपदे हवी असतात, लोकसभा व राज्यसभेत जायचे असते, अशा वृत्तीच्या न्यायमूर्तीकडून कायदा व न्यायाची बूज राखली जात नाही. ‘तारीख पे तारीख’ या खेळात ते अडकून पडतात. शिवसेनेची फूट व पक्षांतराची सुनावणी ही न्यायालयाने ठरवले तर चार दिवसांत निकाली लागेल, पक्षबदलूंना धडा मिळू शकेल असे कायदा सांगतो, पण सरन्यायाधीशांच्या न्यायालयात तीनेक वर्षे फक्त तारखाच पडत आहेत. हे घटनाबाह्य आहे. लोक ‘तारीख पे तारीख’ला कंटाळले आहेत माय लॉर्ड!
Mukhamantri Ladaki Bahin Yojana | राज्य सरकारने विधानसभा निवडणुकीचा विचार करून राज्यातील अनेक लोकांसाठी नवनवीन योजना सुरू केलेल्या आहेत. यावेळी विधानसभा निवडणुकीसाठी राज्य सरकारने राज्यातील महिलांना केंद्रस्थानी ठेवले आहे. महिलांचा विचार करूनच सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण (Mukhamantri Ladaki Bahin Yojana) योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये मिळणार आहेत. आता या योजनेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. तसेच 15 ऑगस्टपर्यंत महिलांच्या खात्यात पैसे देखील जमा होणार आहे. परंतु आता या लाडकी बहिणी योजनेचा अर्ज भरताना काही कागदपत्रांची कमतरता असल्यामुळे अनेक अर्ज हे रिजेक्ट झाल्याची माहिती समोर येत आहे.
अनेक महिलांनी अर्ज भरताना आधार कार्ड, रेशन कार्ड, बँक खाते क्रमांक, रहिवासी पुरावा, हमीपत्र, उत्पन्नाचा दाखला यांसारख्या कागदपत्रांची माहिती स्पष्टपणे पूर्ण भरलेली नाही. याच कारणामुळे अनेक महिलांचे अर्ज आता रद्द करण्यात आलेले आहे. ज्या महिलांचे अर्ज रिजेक्ट झालेले आहे. त्या महिलांना त्यामध्ये दुरुस्ती करण्याची एकच संधी दिली जाणार आहे. त्या महिलांनी आता 31 ऑगस्टपर्यंत आपले अर्ज दुरुस्त करून घ्यायचे आहेत. त्यानंतर शासनाने नियुक्त केलेल्या संस्थेत किंवा ज्या फोन नंबरवर अर्ज भरला आहे, त्या क्रमांकाच्या माध्यमातूनच हा अर्ज पुन्हा एकदा सबमिट करायचा आहे.
ज्या महिलांचा अर्ज रिजेक्ट झालेला आहे. त्या महिलांना याबाबतची माहिती मेसेज करून पाठवत आहे. तसेच या महिलांचे अर्ज स्वीकारले आहे. त्यांना देखील असा मेसेज येत आहे. त्यामुळे ज्या महिलांची कागदपत्रची पूर्तता नीट केलेली नाही. त्यांनी या अर्जामध्ये दुरुस्ती करायची आहे. आणि लवकरात लवकर शासनाच्या या योजनेचा लाभ घ्यायचा आहे.
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मराठा आरक्षणाचं रान तापवणारे मनोज जरांगे पाटील बीड मधल्या ज्या मतदारसंघातून येतात तो हाच आष्टी विधानसभा मतदारसंघ… मुंडे कुटुंबावर डोळे झाकून विश्वास ठेवणाऱ्या आष्टीत यंदा मात्र जरांगे इफेक्ट पाहायला मिळाला आणि मुंडेंच्या पारड्यात आष्टीनं तोडकं मोडकं लीड दिलं… स्टँडिंग आमदार बाळासाहेब आजबे, भीमराव धोंडे, सुरेश धस अशा राजकारणातील या मुरलेल्या नेत्यांनी महायुतीचं काम केलं खरं… पण आष्टीनं या राजकारण्यांचं न ऐकता जरांगेंच्या बाजूने कौल दिला… येणाऱ्या विधानसभेला आष्टी मतदारसंघातून नेमकी कुणाला उमेदवारी द्यायची? एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी अन् राजकीय विरोधक महायुतीच्या एकाच ताटात आल्याने उमेदवारी कोणाला द्यायची? याचा मोठा सस्पेन्स असणार आहेच… पण जरांगेंनीही आष्टीतून आपला उमेदवार रिंगणात दिसेल, याचे संकेत दिलेत… त्यामुळे आजबे, धस, धोंडे या बड्या राजकारण्यांना पुरून उरेल, असा तगडा उमेदवार जरांगे पाटलांना मिळेल का? महाविकास आघाडीकडून नव्या चेहर्याला संधी दिली जाईल की, महायुतीतून एकाचं इनकमिंग करत त्याच्या पाठीशी ताकद देण्याचा पवार डाव टाकतील? महायुतीत कट टू कट स्पर्धेत तिकीट मिळवण्यात कुणाला यश येईल? इथपासून ते आष्टीच्या आमदारकीचा गुलाल कुणाच्या अंगाला लागेल? याच सगळ्या प्रश्नांची ग्राउंड वरची उत्तर जाणून घेऊया
सुरेश धस, बाळासाहेब आजबे आणि भीमराव धोंडे तीनही नेते महायुतीमध्ये आहेत. बाळासाहेब आजबे हे विद्यमान आमदार… तर सुरेश धस यांचा विधान परिषदेचा कार्यकाळ नुकताच संपलाय…. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत महायुतीकडून भीमराव धोंडे यांनी तिकीट आपल्या पदरात पाडून घेतलं होतं… परंतु त्यांचा पराभव झाला… आणि तो केला राष्ट्रवादी अजित पवार गटाचे विद्यमान आमदार बाळासाहेब आजबे यांनी… पण एकमेकांच्या विरोधात राजकारण करून मोठे झालेले हे तिन्ही मंडळी सध्या महायुतीच्या एका छताखाली असल्याने तिकीट कुणाला मिळणार? याचा मोठा सस्पेन्स सध्या आष्टी मध्ये दिसतोय…
तसं पाहायला गेलं तर बीड जिल्ह्यातला सर्वात मोठा मतदारसंघ म्हणून ओळख असणाऱ्या आष्टीत आष्टी – पाटोदा – शिरूर असे एकूण तीन तालुके येतात… राष्ट्रवादीच्या सुरेश धस यांचा हा पारंपारिक बालेकिल्ला समजला जायचा… 2009 ला त्यांनी भाजपच्या बाळासाहेब आजबे यांना पराभवची धूळ चारत आमदारकी आपल्याजवळ ठेवली… खरंतर कायम सत्तेत असल्याने आणि राजकीय पद उपभोगणारे धस यांचं नाव जिल्ह्याच्या राजकारणात आदराने घेतलं जायचं… पण 2014 ला सुरेश धस यांना एका मागून एक धक्के बसले… 2014 ला लोकसभेच्या निवडणुकीत त्यांनी गोपीनाथ मुंडेंना टक्कर दिली.. त्यात त्यांचा दीड लाखाने पराभव झाल्यानंतर त्यांनी आपला मोर्चा विधानसभेकडे वळवला.. पण मोदी लाट, लोकसभेतील पराभवामुळे डॅमेज झालेली इमेज, युती आणि आघाडी वेगवेगळ्या लढल्याने झालेलं मत विभाजन भाजपच्या पथ्यावर पडलं आणि सुरेश धस यांच्या राजकारणाचा वारू आमदारकीलाही मागे पडून भाजपचे भीमराव धोंडे आमदार झाले..
पण 2019 येईपर्यंत आष्टीतील राजकारण बऱ्याच पातळ्यांवर बदललं… धनंजय मुंडे हे जिल्ह्यात कुणाचं चालून देत नाही, असं म्हणत राष्ट्रवादीचा हा मोठा असामी भाजपात आला.. अर्थात त्यांच्या राजकारणाला योग्य न्याय देण्यासाठी भाजपने त्यांची विधानपरिषदेवर वर्णी लावली… आमदार होण्याचं स्वप्न काहीही केल्या पूर्ण करण्यासाठी राजकारणात तग धरून राहिलेल्या भाजपच्या बाळासाहेब आजबेंसाठी हा मोठा धक्का होता… म्हणून लांबच राजकारण पाहून आजबे हे भाजपमधून राष्ट्रवादीत आले.. आणि आष्टी विधानसभेचं तिकीटही पदरात पाडून घेतलं… दुसरीकडे भाजपकडून सुरेश धस यांचे चिरंजीव जयदत्त धस यांच्या नावासाठी बरीच लॉबिंग झाली, पण शेवटी स्टँडिंग आमदार भीमराव धोंडे यांच्याच नावावर अखेर शिक्कामोर्तब झाला… त्यामुळे 2019 ला राष्ट्रवादी विरुद्ध भाजप, युती विरुद्ध आघाडी, भीमराव धोंडे विरुद्ध बाळासाहेब आजबे अशी घासून लढत झाली… खरंतर तेव्हाच्या लोकसभेला प्रीतम मुंडे यांच्या पारड्यात आष्टी विधानसभेनं तब्बल 70 हजारांचं लीड दिल होतं… त्यामुळे भाजपचाच उमेदवार म्हणजेच धोंडे आरामात जिंकतील, असा कयास बांधला जात असताना मैदान मारलं ते राष्ट्रवादीच्या बाळासाहेब आजबेंनी… त्यांच्या राजकारणातील पराभवाचा डाग पुसला गेला, आणि पहिल्यांदाच आमदारकीची माळ त्यांच्या गळ्यात पडली…
पण हेच आमदार साहेब आजबे राष्ट्रवादीच्या फुटीत अजित दादांसोबत महायुतीत आल्याने आजबे प्लस धोंडे प्लस धस अशा तिघांना आता उमेदवारी मिळवण्यासाठी कसरत करावी लागणार आहे… ज्याचा आमदार त्याला तिकीट… असं फॉर्मुला वापरला तर बाळासाहेब आजबे यांच्या नावाचा विचार होऊ शकतो… पण मतदारसंघात सुरेश धस हे एक मोठं प्रस्थ आहे… त्यांच्या विधान परिषदेचा कार्यकाळही नुकताच संपलाय… त्यात लोकसभा निवडणुकीत बुथ कमिटी, सरपंच मीटिंग, कार्यकर्त्यांचा कनेक्ट या सगळ्या पातळ्यांवर सुरेश धस यांनी आघाडी घेतली होती… म्हणूनच लोकसभेला कोणी काम केलं? याचा फिल्टर लावला तर सुरेश धस यांच्याच नावाचा प्राधान्य क्रमाने महायुती विचार करू शकते… मराठा आरक्षणाचा बीड विधानसभेतही महायुतीला फटका बसल्याने मराठा चेहरा म्हणूनही धस यांच्या नावाला भाजपकडून ग्रीन सिग्नल दिला जाऊ शकतो… जर असं झालं तर इथे बाळासाहेब आजबे आणि भीमराव धोंडे नेमका काय पॉलिटिकल स्टॅन्ड घेणार ते पाहणंही इंटरेस्टिंग ठरणार आहे…
पण जरांगे इफेक्ट प्रभावी राहिल्याने आष्टीमध्ये भाजपचे लीड गेल्या लोकसभेच्या तुलनेने डायरेक्ट निम्म्यावर आलं आहे… अर्थात यांचं नीट डीकोडींग केलं, तर ही गोष्ट महाविकास आघाडीच्या पथ्यावर पडू शकते… मेहबूब शेख, साहेबराव दरेकर यांची नावं सध्या मविआच्या उमेदवारीसाठी फ्रंटला आहेत… आष्टीमध्ये सर्वाधिक मतदान हे मराठा समाजाचे आहे. त्या खालोखाल ओबीसी समाजाचे मतदान आहे. यात वंजारी समाजाचे मतदान हे निर्णायक असत. या मतदारसंघातील वंजारी समाजावर पंकजा मुंडे यांचा मोठा प्रभाव कायमच राहिलाय… त्यामुळे आष्टीचा उमेदवारीचा तिढा सुटल्यानंतरच इथल्या निकालाबाबत सध्या आपल्याला क्लियर कट अंदाज येऊ शकतो… पण यात तिकीट कुणाला मिळतं? नाराज कोण होतो? बंडखोरी कोण करतं? जरांगे भूमिका काय घेतात? आणि ओबीसी बांधव कुणाच्या पाठीशी उभा राहतो? या सगळ्या समीकरणांची बेरीज ज्याला पक्की जमली, तोच आष्टी विधानसभेचा पुढचा आमदार होणार, एवढं मात्र नक्की…
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ३ जुलैपासून देशातील आघाडीच्या टेलिकॉम कंपन्या असलेल्या एअरटेल आणि जिओने आपल्या मोबाईल रिचार्जच्या किमती वाढवल्या आहेत. कंपन्यांच्या या निर्णयाचा मोठा फटका सर्वसामान्य ग्राहकांना बसत असून आधीच महागाईने त्रस्त झालेला सर्वसामान्य माणूस आता रिचार्जच्या किमतींनी हैराण झाला आहे. त्यामुळे पैसे वाचवण्यासाठी कमीत कमी खर्चात कोणता रिचार्ज उपलब्ध आहे याचा शोध सर्वजण घेत आहेत. तुम्हीही जर एअरटेलचे ग्राहक असाल आणि स्वस्तात मस्त रिचार्ज प्लॅनच्या शोधात असाल तर आज आम्ही तुम्हाला एअरटेलचा सर्वात कमी किमतीच्या रिचार्ज (Airtel Mobile Recharge) प्लॅनबाबत सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊयात…..
रिचार्जच्या किमती वाढल्यानंतरही, जर तुम्ही Airtel च्या पोर्टफोलिओवर नजर टाकली तर, कंपनी अजूनही आपल्या वापरकर्त्यांना वेगवेगळ्या किमतीनुसार अनेक परवडणारे रिचार्ज प्लॅन सुद्धा ऑफर करत आहे. काही रिचार्ज प्लॅन हे अनलिमिटेड कॉलसह येतात तर काही प्लॅन हे भरपूर इंटरनेटसह येतात. तस बघितलं तर एअरटेलचा सामना हा जिओशी असतो, त्यामुळे जिओला टक्कर देण्यासाठी कंपनीने 199 रुपयांचा सर्वात स्वस्त रिचार्ज लाँच केला आहे. या रिचार्ज प्लॅनची व्हॅलिडिटी २८ दिवसांची असल्याने नक्कीच तो सर्वसामान्याना परवडतोय.
Airtel च्या 199 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये २८ दिवसांची व्हॅलिडिटी मिळते. या कालावधीमध्ये अनलिमिटेड कॉलिंगचा लाभ मिळतो, म्हणजेच तुम्ही २८ दिवस कोणालाही कितीही वेळ कॉल करू शकता. तसेच ग्राहकांना १०० एसएमएसची सुविधा सुद्धा मिळतेय. याशिवाय 2 GB इंटरनेट डेटा ग्राहक या संपूर्ण व्हॅलिडिटी मध्ये वापरू शकतात. एअरटेलच्या या रिचार्ज प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना Hello Tunes आणि Wynk Music वर फ्री एक्सस मिळतो. एकूणच काय तर या प्लॅनमध्ये, वापरकर्त्यांना कोणत्याही नेटवर्कवर अतिरिक्त फायदे, संपूर्ण कॉलिंग आणि संदेश पाठवण्यासह एकूण 2GB डेटा मिळतो.