Monday, December 22, 2025
Home Blog Page 552

केवळ 8499 रुपयांमध्ये खरेदी करा ‘हा’ स्मार्टफोन; मिळेल 256 GB स्टोरेज

Smartphone

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या अनेक इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवर त्याचप्रमाणे मोबाईलवर मोठ्या प्रमाणात ऑफर चालू झालेली आहे. जर तुम्ही देखील एक चांगला असा मोबाईल खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर आम्ही तुमच्यासाठी एक 16 जीबी रॅम असलेला फोन अगदी कमी किमतीत घेऊन आलेलो आहोत. ॲमेझॉनवर देखील हा फोन तुम्हाला खरेदी करता येईल. कोणतीही ऑफर नसताना हा 16 जीबी रॅम असलेला फोन तुम्ही केवळ 8499 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. या फोनचे नाव Itel P55 + 4G आणि Lava 02 आहे.

या फोनमध्ये तुम्हाला मेमरी फ्युजन सह 16 जीबीपर्यंत रॅम देखील मिळणार आहे. तसेच 256 जीबीचे स्टोरेज मिळेल या फोनमध्ये तुम्हाला एक जबरदस्त कॅमेरा आणि डिस्प्ले तसेच पावरफुल प्रोसेसर देखील मिळेल आता या दोन वेगवेगळ्या फोनचे फीचर्स आपण जाणून घेणार आहोत.

itel P55 + 4G

हा फोन तुम्ही ॲमेझॉन इंडियावर देखील खरेदी करू शकता. ऑनलाइन या फोनची किंमत 8499 रुपये आहेत. या फोनमध्ये मेमरी फ्युजन फीचर्स 16 जीबी रॅम आहे. तसेच 256 जीबी स्टोरेज देखील मिळेल. या फोनमध्ये डायनॅमिक बार 6.6 इंचचा डिस्प्ले देखील मिळणार आहे. तसेच हा डिस्प्ले 90 च्या रिफ्रेश रेटला देखील सपोर्ट करणार आहे.

या फोनमध्ये तुम्हाला एलईडी फ्लॅश सह 50 मेगापिक्सलचा AI ड्युअल रियर कॅमेरा देखील आहे. तसेच सेल्फीसाठी मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देखील आहे. फोनमध्ये 5 हजार MhA ची बॅटरी देखील देण्यात आहे
तसेच 45 watt फास्ट चार्जिंग देखील सपोर्ट करते.

lava 02

हा फोन तुम्ही ॲमेझॉन इंडियावरून देखील खरेदी करू शकता. याची ऑनलाइन किंमत केवळ 8499 रुपये एवढी आहे. तसेच यामध्ये कोणत्याही ऑफरचा समावेश नाही. या फोनमध्ये तुम्हाला 8 जीबी रियल रॅम देखील मिळणार आहे. तसेच 128 जीबी UFS 2.2 एवढे स्टोरेज आहे. या फोनमध्ये तुम्हाला 6.5 इंचाचा डिस्प्ले देखील मिळणार आहे.

त्याचप्रमाणे फोनचा डिस्प्ले हा 90 Hz या रिफ्रेश रेटला देखील आहे. फोनच्या मागील बाजूस एलईडी फ्लॅश सह 50 मेगापिक्सल AI ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आलेला आहे. तसेच या फोनची बॅटरी 18 व्हॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

BSNL बाबत मोदींचा मोठा निर्णय; 4G नेटवर्कच्या प्रसारासाठी स्वदेशी उपकरणे करणार विकसित

BSNL

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | जुलै महिन्यामध्ये भारतातील अनेक आघाडीच्या आणि लोकप्रिय टेलिफोन कंपन्या Jio, Airtel यांनी वोडाफोन आयडिया यांनी त्यांच्या रिचार्ज प्लॅनच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढवल्या आहेत. यामुळे त्यांच्या ग्राहकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्ती झालेली आहे. आणि याचा फायदा बीएसएनएल या कंपनीला झालेला आहे. ते म्हणजे गेल्या एक महिन्यात बीएसएनएलच्या युजर्समध्ये प्रचंड वाढ झालेली आहे. ग्राहकांची आता वाढती संख्या पाहता बीएसएनएलने देखील त्यांच्या नेटवर्कमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेतलेला आहे. बीएसएनएल ही एक सरकारी इत्यादी कंपनी आहे. यामुळे आता बीएसएनएल टाटासोबत 100 गावांमध्ये 4G नेटवर्क सुरू करण्याचा करार केलेला आहे. या संदर्भाची चाचणी देखील सुरू झालेली आहे. त्यामुळे आता लवकरच 1 हजार गावांमध्ये बीएसएनएलचा 4G नेटवर्कचा अनुभव मिळणार आहे.

इतर टेलिकॉम कंपनीचे रिचार्ज प्लॅन वाढल्यामुळे अनेक ग्राहक आता बीएसएनएलकडे वळलेले आहेत. आणि या संधीचा फायदा देखील बीएसएनएलने घेतला आहे. बीएसएनएलने त्यांची सेवा देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्यासाठी देखील चाचणी सुरू केलेली आहे. 4Gसेवा पुरवण्या सोबतच तयारी केलेली आहे. याबाबत भारताचे दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी एक खुलासा केलेला आहे. तो म्हणजे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक मोठा निर्णय घेतलेला आहे.

काय म्हणाले ज्योतिरादित्य सिंधिया ?

याबद्दल माहिती देताना ज्योतिरादित्य सिंधिया यांनी सांगितले की, बीएसएनएलद्वारे स्वदेशी 4G उपकरणे वापरण्याचा निर्णयाचा पंतप्रधान मोदींनी घेतलेला आहे. त्यामुळे बीएसएनएलचा वापर होण्यासाठी भारतात बनवलेल्या उपकरणांचा वापर व्हावा, अशी त्यांची इच्छा आहे. या निर्णयानुसार बीएसएनएल आता स्वदेशी विकसित उपकरणे वापरून देशांमध्ये 4G नेटवर्कचा देखील प्रचार करणार आहे. त्यामुळे दळणवळण सुविधा अत्यंत सोपी आणि सुरक्षित होणार आहे.

TATA आणि BSNl चा करार

अशातच आता टाटा आणि बीएसएनएलने एक मोठा करार केलेला आहे. या त्यांच्या करारानुसार 1000 खेड्यांमध्ये 4G नेटवर्क सेवा सुरू करण्यात येणार आहे. या दोघांमध्ये जवळपास 15000 कोटी रुपयांचा करार झालेला आहे. महिन्याभरापूर्वी हा करार झाला. त्यानंतर आता गावांमध्ये इंटरनेटची चाचणी देखील सुरू करण्यात आलेली आहे. अनेक लोकाची बीएसएनएलला पसंती देखील मिळालेली आहे.

Gautam Adani : गौतम अदानींचे निवृत्तीचे संकेत!! समूहाचा वारसदार म्हणून कोणाची निवड?

Gautam Adani retirement

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील सर्वात लोकप्रिय आणि श्रीमंतांच्या यादीत आघाडीवर असलेले अदानी (Adani Group) समूहाचे सर्वेसर्वा गौतम अदानी (Gautam Adani) यांनी त्यांच्या निवृत्तीबाबतचं नियोजन जाहीर केलं आहे. सध्या वय वर्ष ६२ असलेले अदानी वयाच्या ७० व्या वर्षी निवृत्ती जाहीर करणार आहेत. ब्लूमबर्गनं दिलेल्या वृत्तानुसार गौतम अदानींनी अदाणी समूहाची सूत्र कधी व कशी त्यांच्या वारसांकडे सोपवणार आहेत, यासंबंधी मोठं भाष्य केलं आहे. यानुसार, आगामी काळात अदानी यांचा पुढचा प्लॅन काय? जगभरात मोठं साम्राज्य असलेल्या अदानी समूहाची धुरा कोणाकडे असेल? याबाबत मोठी माहिती समोर आली आहे.

2030 पर्यंत अदानी समूहाचे अध्यक्षपद सोडणार – Gautam Adani

ब्लूमबर्गच्या हवाल्यानुसार. गौतम अदानी (Gautam Adani) 2030 पर्यंत अदानी समूहाचे अध्यक्षपद सोडणार आहेत. त्यांच्या निवृत्तीनंतर कंपनीची जबाबदारी त्यांची दोन मुले आणि दोन पुतण्यांवर असणार आहे. अहवालात म्हटले आहे की जेव्हा अदानी निवृत्त होतील तेव्हा त्यांचे चार वारस – मुलगे करण अदानी आणि जीत अदानी आणि त्यांचे पुतणे प्रणव आणि सागर अदानी या चौघांमध्ये अदाणी समूहाचं हस्तांतरण केलं जाईल. पण ते नेमकं कसं होईल? याविषयी अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही. ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, गौतम अदानी यांनी आपली दोन मुलं आणि दोन पुतण्यांना विचारले कि त्यांना अदानी समूहाचं विभाजन करून वेगळं होणं योग्य वाटतंय की एकत्र राहणंच योग्य वाटतंय ? तसेच यावर निर्णय घेण्यासाठी तीन महिन्यांची मुदत सुद्धा देण्यात आली आहे. सध्या गौतम अदानी यांचा मोठा मुलगा करण अदानी अदानी पोर्टचे व्यवस्थापकीय संचालक आहे, तर छोटा मुलगा जीत अदानी अदानी पोर्टचे संचालक आणि सागर अदानी ग्रीन अदानीचे कार्यकारी संचालक आहेत.

दरम्यान, अदानी समूह हा देशातील सरावात मोठा समूह आहे. देशातील जवळपास सर्वच क्षेत्रात अदानी समूहाचा वरचष्मा आहे. बंदरांच्या नियोजन व व्यवस्थापनाचं क्षेत्र असो, इंधन निर्मिती असो, बांधकाम क्षेत्र असो किंवा ग्रीन एनर्जी असो.. प्रत्येक ठिकाणी अदानी समूहाचा महत्वाचा वाटा राहिला आहे. याशिवाय केंद्र सरकारचे अनेक प्रकल्प सुद्धा अदानी ग्रुपकडे आहेत.

Indian Railway : तुम्ही प्लॅटफॉर्म तिकिटानेसुद्धा प्रवास करू शकता ? काय सांगतो भारतीय रेल्वेचा नियम ?

Indian Railway : भारतात रेल्वेचे मोठे जाळे देशभर पसरले आहे. लांब पल्ल्याच्या प्रवासाला सुद्धा रेल्वेला आधी पसंती दिली जाते. कारण रेल्वेचं तिकीट भाडे कमी आहे. शिवाय प्रवासही आरामदायी होतो. पण आपल्यापैकी बऱ्याचजणांना रेल्वेच्या काही नियमांबद्दल माहिती नसेल. अशाच एका महत्वाच्या नियमाविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. तुम्ही आपल्या नातेवाईकांना ट्रेनला सोडण्यासाठी जाता तेव्हा तुम्हाला प्लॅटफॉर्म तिकीट काढावे लागते. तुम्हाला या तिकिटावर रेल्वे प्रवास करता येऊ शकतो का ? चला पाहूया काय सांगतो नियम ?

बऱ्याचदा आपल्या सोबत असे झाले असेल की आपण आपल्या नातेवाईकांना रेल्वेला सोडण्यासाठी जात असाल आणि सामान ठेवण्याच्या घाई गडबडीत ट्रेन चालू होते. अशावेळी काय करायचे? तुमच्याकडे रेल्वेचे तिकीट नाही केवळ प्लॅटफॉर्म तिकीट आहे नेमक्या त्याच वेळेस जर टीटी आला तर ? अशावेळी घाबरू नका रेल्वेचा नियम काय आहे ? माहिती करून घ्या

काय आहे नियम ?

जर तुम्ही प्लॅटफॉर्म तिकीट घेऊन प्रवास करत असाल तर तुम्हाला कोणीही ट्रेनमधून बाहेर टाकू शकत नाही. भारतीय रेल्वेच्या नियमांनुसार, जर तुम्ही घाईगडबडीत किंवा आपत्कालीन परिस्थितीत ट्रेनमध्ये चढलात तर तुम्हाला प्रथम TTE ला भेटावे लागेल. TTE ला भेटल्यानंतर तुम्हाला पुढील स्टेशनसाठी तिकीट खरेदी करावे लागेल आणि 250 रुपये दंड भरावा लागेल.

SBI Customers Alert | SBI च्या करोडो ग्राहकांना सरकारचा इशारा, ‘या’ फ्रॉडपासून व्हा सावध

SBI Customers Alert

SBI Customers Alert | मित्रांनो तुमचे किंवा तुमच्या कुटुंबातील कुठल्याही व्यक्तीचे जर भारतातील सगळ्यात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये खाते असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. कारण आता सरकारने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या करोडो खातेधारकांना अलर्ट केले जारी केलेला आहे. कारण आजकाल स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI Customers Alert) ग्राहकांसोबत मोठ्या प्रमाणात स्कॅम आणि फसवणुकीची प्रकरणे वाढत चाललेली आहे. या संदर्भात आता प्रेस इन्फॉर्मेशन बिरो म्हणजे पीआयबी यांच्या चेक युनिटने सोशल मीडियावर फिरत असलेल्या मेसेजेस बद्दल ग्राहकांना सतर्क केलेले आहे. त्यामुळे तुम्ही जर एसबीआयचे ग्राहक असाल, तर तुम्ही अत्यंत सावधानगिरीने कोणतेही आर्थिक व्यवहार करणे खूप गरजेचे आहे आहे अन्यथा तुमची फसवणूक होऊ शकते.

आजकाल सायबर गुन्हे मोठ्या प्रमाणात वाढत आहे. सायबर गुन्हेगार देखील वेगवेगळ्या पद्धतीने लोकांना फसवत आहेत. अशातच आता रिवॉर्ड पॉईंट्स स्कॅम ही एक नवीन पद्धत आलेली आहे. ज्यामुळे ग्राहकांची फसवणूक होते. म्हणून ग्राहकांना पीआयबीने काळजी घेण्यात सांगितलेले आहे.

पीआयबीने जारी केलेल्या संदेशात स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नावाने येणाऱ्या मेसेजपासून सावध राहा, असे म्हटले आहे. यामध्ये रिवॉर्ड पॉइंट रिडीम करण्यासाठी ग्राहकांना एपीके फाइल डाउनलोड करण्यास सांगितले जाते. हा मेसेज एसबीआयने पाठवला आहे असे वाटत असले तरी हा मेसेज पूर्णपणे खोटा आहे. SBI कधीही SMS किंवा WhatsApp द्वारे लिंक्स किंवा APK फाईल्स पाठवत नाही. अशा परिस्थितीत, फसवणुकीपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी, अज्ञात फायली डाउनलोड करू नका किंवा संशयास्पद लिंकवर क्लिक करू नका. असा कोणताही संदेश नेहमी अधिकृत SBI चॅनेलद्वारे सत्यापित करा.

पीआयबीने ग्राहकांना सूचना दिल्या | SBI Customers Alert

पीआयबीने सांगितले की, कोणत्याही प्रकारच्या मेसेजची पडताळणी करणे अत्यंत आवश्यक आहे. हे फक्त अधिकृत फोन नंबरद्वारे संपर्क करून करा. तुम्ही तुमच्या बँकेची गोपनीय माहिती कोणाशीही शेअर करू नये. आपण सतर्क राहिल्यास, आपण आर्थिक फसवणुकीचे बळी होण्याचे टाळू शकता.

फसवणूक टाळण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा

  • तुम्हाला कोणताही संदेश मिळाला तर तो कोणी पाठवला आहे ते शोधा. कृपया बँकेच्या अधिकृत चॅनेलद्वारे याची पडताळणी करा.
  • जर तुम्हाला अनोळखी नंबरवरून मेसेज आला तर त्यामध्ये दिलेल्या लिंकवर कधीही क्लिक करू नका. त्यात दिलेली कोणतीही फाईल डाउनलोड करू नका.
  • बँकेच्या नावावर कोणताही संशयास्पद संदेश आल्यास, अधिकृत माध्यमांद्वारे बँकेशी संपर्क साधून त्याची पडताळणी करा.
  • अधिकृत ॲप किंवा वेबसाइटद्वारेच पेमेंट आणि इतर व्यवहार करा.
  • तुम्ही तुमची वैयक्तिक किंवा आर्थिक माहिती ईमेल, एसएमएस, व्हॉट्सॲप किंवा फोनद्वारे कधीही देऊ नये.

Ujani Dam Water | उजनी धरणातून 80 हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरु; पंढरपूरमधील नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Ujani Dam Water

Ujani Dam Water | यावर्षी महाराष्ट्रात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडलेला आहे. त्यातच सोलापूर या जिल्ह्यातील दुष्काळाच्या दृष्टीने जे अत्यंत महत्त्वाचे असे धरण आहे. ते उजनी धरण देखील आता भरलेले आहे. हे धरण भरल्या कारणाने गेल्या काही तासांपासून या धरणातून भीमा नदीमध्ये सातत्याने पाण्याचा विसर्ग देखील सुरू झालेला आहे. पाण्याचा विसर्ग जास्त प्रमाणात असल्याने आता पंढरपूर आणि भीमा नदीच्या काठावर जे लोक रहिवासी आहे.

त्या लोकांना देखील सतर्कतेच्या इशारा देण्यात आलेला आहे. सोमवारी सकाळी 8 वाजताच्या सुमारास उजनी धरणातून (Ujani Dam Water) भीमा नदीमध्ये जवळपास 80 हजार क्युसेक एवढ्या वेगाने विसर्ग सुरू झालेला आहे. आणि उजनी धरणात सध्या येणाऱ्या पाण्याचा प्रवाह 1,60000 क्यूसेक इतका आहे. त्याचप्रमाणे काल रात्री म्हणजेच 4 ऑगस्ट च्या रात्री 12 वाजेपर्यंत 60000 क्युसेक वेगाने हा पाण्याचा विसर्ग चालू होता. परंतु सकाळी या उजनी धरणाची पातळी जवळपास 96.70 टक्के भरलेली आहे.

उजनी धरण (Ujani Dam Water) देखील जास्त भरल्याने आतील त्यामुळे त्यातला पाण्याचा विसर्ग देखील जवळपास 80 हजार क्युसेकने सोडला आहे. या विसर्गामुळे आता पंढरपूरला पुराचा धोका देखील उद्भवला आहे. त्यामुळे आज दुपारपर्यंत चंद्रभागा नदीच्या पात्रातील पाण्याचा प्रवाह वाढणार असल्याचा अंदाज आणि लोकांकडून देण्यात आलेला आहे. त्यामुळे पंढरपूरमधील प्रशासनाने देखील लोकांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे. यामुळे नदीकाठच्या गावांना देखील धोका निर्माण होऊ शकतो. यामुळे चंद्रभागा काठावरील अंबाबाई पटांगण आणि व्यासा नारायण या ठिकाणावरील जवळपास 500 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलेले आहे.

जायकवाडी धरणात भरपूर पाणीसाठा | Ujani Dam Water

जायकवाडी धरणात देखील 24 हजार 697 क्युसेक वेगाने पाणी येत आहे. त्यामुळे या धरणातील पाणीसाठा आता 13.10% एवढा झालेला आहे. आज दुपारपर्यंत या पाण्याची आवाक देखील वाढण्याची शक्यता आहे. हा पाणीसाठा तेथील लोकांना जवळपास पुढील आठ महिने पुरू शकतो. त्यामुळे मराठवाड्यातील नागरिकांना आता मोठा दिलासा निर्माण झालेला आहे.

सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरण आता चांगले भरल्याने सोलापूरसह नगर, उस्मानाबाद आणि पुणे जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. उजनी धरणाची ही धरणाची क्षमता ही 117.23 आहे तर जिवंत साठ्यात 13.57 टीएमसी आणि मृत साठ्यात 63.66 टीएमसी पाणी साठवता येते. उजनी धरणात पूर नियंत्रणासाठी 110% पाणी साठवण्याची देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे. मागील वर्षी उजनी धरण हे केवळ 5% भरलेले होते. परंतु यावर्षी जवळपास 96.70% भरलेले आहे.

Travel : श्रावणी तीर्थाटन करा ‘लाल परी’ सोबत ; MSRTC ची खास योजना

Travel : आज दिनांक 5 ऑगस्ट पासून पवित्र श्रावण मास सुरु झाला आहे. या महिन्यात धार्मिक विधींना महत्व असते. शिवाय लोक उपवास करतात. धार्मिक स्थळांना भेटी देत असतात. म्हणूनच ST महामंडळाकडून श्रावण महिन्यामध्ये खास तीर्थाटनासाठी विशेष योजना जाहीर केली आहे. ‘श्रावणात एसटीने करा तीर्थयात्रा’ असे या मोहिमेचे नाव आहे. विशेष म्हणजे या याअंतर्गत ST च्या सर्व सुविधा प्रवाशांना (Travel ) मिळणार आहेत. चला तर मग पाहुयात नक्की काय आहे ही योजना

मिळालेल्या माहितीनुसार , श्रावणात प्रत्येक आगरातून एकदिवसीय धार्मिक यात्रा काढण्यात येत असून त्यात सर्व प्रकारची शिथिलता दिली जात आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी अमृत महोत्सव योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवासाची सुविधा आहे. महिला आणि १२ वर्षांखालील मुलांसाठी अर्धे तिकीट आहे. ग्रामस्थ महिला बचत गट, ज्येष्ठ नागरिक संघ, विविध सेवाभावी संस्था यांच्या पुढाकाराने (Travel ) अशा यात्रांचे आयोजन केले जाऊ शकते.

कोणत्या ठिकाणांचा समावेश ? (Travel )

एसटीने जाहीर केलेल्या यादीत त्र्यंबकेश्वर, भीमाशंकर, मार्लेश्वर, अष्टविनायक, नृसिंहवाडी या तीर्थक्षेत्रांसह दर गुरुवारी औदुंबर आणि दर शनिवारी मारुती दर्शन अशा प्रकारे तिर्थक्षेत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. या सवलतीमुळे सर्वसामान्यांना नाममात्र (Travel ) दरात यात्रेचा आनंद लुटण्याची संधी मिळणार आहे शिवाय ST देखील याचा फायदा होणार आहे.

चांगली सेवा मिळणार (Travel )

याबाबत माहिती देताना एसटीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक माधव कुसेकर म्हणाले (Travel ) यांनी सांगितले की, प्रवाशांचा ओघ वाढल्याने एसटीचे उत्पन्न वाढेल. मला आशा आहे की प्रवाशांची संख्या जसजशी वाढत जाईल तसतसे आमचे कर्मचारी लोकांना चांगली सेवा आणि नाविन्यपूर्ण उपक्रम देतील. श्रावण संदर्भात प्रचाराची तयारी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. श्रावणात लोकांना तीर्थयात्रेचा लाभ मिळावा हा आमचा उद्देश आहे.

काकांची निवृत्ती, पुतण्याला राजकीय वारसदार घोषित केलं; राष्ट्रवादीत मोठी घडामोड

prakash solanke political retirement

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातून (Ajit Pawar Group) एक मोठी बातमी समोर येत आहे. अजितदादा गटाचे माजलगावचे आमदार प्रकाश सोळंकी (Prakash Solanke) यांनी राजकारणातून निवृत्ती जाहीर केली आहे. इथून पुढे आपण कोणतीही निवडणूक लढवणार नाही असं म्हणत त्यांनी आपले पुतणे जयसिंह सोळंके यांचं नाव राजकीय वारसदार म्हणून जाहीर केलं आहे. भर निवडणुकीच्या तोंडावरच प्रकाश सोळंके यांनी राजकीय निवृत्तीचा निर्णय घेतल्याने चर्चाना उधाण आलं आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष आणि नेते तयारीला लागले आहेत. नेत्यांकडून मतदारसंघ पिंजून काढला जात आहे. त्याचाच भाग म्हणजे माजलगावचे अजित पवार गटातील विद्यमान आमदार प्रकाश सोळंके हे 2024 च्या आमदारकीच्या निवडणुकीच्या अनुषंगानं गावांचे दौरे करत आहेत. यादरम्यान, एका गावात बोलताना त्यांनी आपण आगामी विधानसभा निवडणूक लढवणार नसल्याचं जाहीर केलं आहे. वयोमानानुसार आपण हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितलं. तसेच, आपल्या ऐवजी पुतणे जयसिंह सोळंके (Jaisingh Solanke) हे विधानसभा निवडणूक लढणार असल्याची घोषणा केली आहे.

जयसिंह सोळंके कोण आहेत ?

जयसिंह सोळंके हे प्रकाश सोळंके यांचे कनिष्ठ बंधू धैर्यशील सोळंके यांचा मुलगा आहेत. म्हणजेच, प्रकाश सोळंके यांचे पुतणे. जयसिंह सोळंके धारूर पंचायत समितीचे उपसभापती राहिलेले आहेत. त्यासोबतच त्यांनी बीड जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून सुद्धा काम पाहिलेलं आहे. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेस युवकचे जिल्हाध्यक्ष म्हणून जयसिंह सोळंके यांनी यापूर्वी काम पाहिलं होतं. आता हेच जयसिंह सोळंके प्रकाश सोळंके यांचे वारसदार म्हणून आगामी विधानसभा निवडणूकीत आपल्याला पाहायला मिळू शकतात. मात्र अजित पवार गट जयसिंह सोळंके यांच्या नावाला मान्यता देतो का ते आता पाहायला हवं.

Maharashtra New Expressway | ‘या’ रस्त्यासाठी केंद्र सरकारकडून 8,000 कोटी रुपये मंजूर, महाराष्ट्रालाही होणार फायदा

Maharashtra New Expressway

Maharashtra New Expressway | गेल्या काही वर्षापासून महाराष्ट्रात विविध रस्त्याची आणि बांधकामाची सुरुवात झालेली आहे. काही रस्ते पूर्ण देखील झालेले आहेत. तर काही रस्त्यांची काम अजूनही चालू आहेत. 2014 पासून भारतातील महामार्ग (Maharashtra New Expressway) व्यवस्था सुधारण्यावर सरकारने जास्त लक्ष केंद्रित केलेले आहे. मोदी सरकारने देशाचे इन्फ्रास्ट्रक्चर खूप जास्त मजबूत बनवलेले आहे. मोदींनी तिसऱ्यांदा सत्ता स्थापन केलेली आहे. त्यानंतर आता देशाच्या इन्फ्रास्ट्रक्चर आणि दळणवळण सुविधा आणखी मजबूत व्हावी, यासाठी सरकारने आता पहिले पाऊल उचललेले आहे.

यावेळी आता देशात आठ नवीन हाय स्पीड कॉरिडॉर तयार केले जाणार आहे. आणि या प्रकल्पासाठी सरकारने देखील मंजुरी दिलेली आहे. हे कॉरिडॉर तयार झाल्यानंतर आता आपल्या देशाचे एक रूपच बदलणार आहे. आणि खास गोष्ट म्हणजे या प्रकल्पात आता महाराष्ट्रातील एक महत्वाचा प्रकल्पाचा देखील समावेश केला जाणार आहे. आणि राज्यातील सगळ्याच नागरिकांना याचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार आता नाशिक फाटा ते खेड म्हणजेच राजगुरुनगर यांच्या दरम्यानचा उन्नत मार्ग प्रकल्पाला मंजुरी दिलेली आहे.

या रस्त्यामुळे पुणे आणि खेड या दरम्यानची वाहतूक कोंडी होती. त्यापैकी त्या आता बऱ्यापैकी नियंत्रण येणार असल्याचा देखील सांगितले जात आहे. शुक्रवारी झालेल्या केंद्रातील बैठकीदरम्यान सरकारने या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. आणि या प्रकल्पासाठी तब्बल 8000 कोटी रुपये देखील मंजूर केलेले आहे. सरकारने मंजूर केलेला हा प्रकल्प आता बांधा वापरा आणि हस्तांतरित करा या तत्त्वावर पूर्ण केला जाणार आहे. या प्रकल्प अंतर्गत आठ पदरी उड्डाण पुलाच्या निर्मितीला देखील परवानगी देण्यात आलेली आहे. आणि येत्या काही काळातच आता हे काम देखील सुरू होणार आहे.

येत्या ऑक्टोबर महिन्यापासून या प्रकल्पाचे काम सुरू होण्याची माहिती समोर येत आहे. हा मार्ग 29 किलोमीटर लांबीचा असणार आहे. आणि त्यासाठी सरकारकडून 8000 कोटी रुपयांचा निधी देखील मंजूर करण्यात आलेला आहे. हा रस्ता एकूण आठ पदरी असणार आहे. त्यामुळे नाशिक ते पुणे हा प्रवास देखील आता अत्यंत जलद गतीने होऊ शकतो. सध्या हा मार्ग एकूण चार पदरी आहे. परंतु यामध्ये दोन लाईन वाढवल्या जाणार आहेत. तसेच सर्विस लेन देखील केल्या जाणार आहेत. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पुणे जिल्ह्यातील विकासाला देखील चालना मिळणार आहे.

Raj Thackeray On Reservation : महाराष्ट्रात आरक्षणाची गरजच नाही; राज ठाकरे असं का म्हणाले?

raj thackeray on reservation

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रात आरक्षणाची गरजच नाही असं स्पष्ट मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मांडलं आहे. राज ठाकरे आज सोलापूर दौऱ्यावर असताना त्यांनी पत्रकारांसोबत विविध प्रश्नांवर उत्तरे दिली. यावेळी महाराष्ट्र हे देशातील सर्वात प्रगत राज्य असल्याचे त्यांनी म्हंटल. महाराष्ट्रात सर्व गोष्टी मुबलक आहेत त्यामुळे इथे आरक्षणाची गरजच नाही असं मत राज ठाकरे यांनी व्यक्त केलं. महाराष्ट्रात भूमिपुत्रांना नोकऱ्या, चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे. यात जात येते कुठे? असा सवालही राज ठाकरेंनी केला. (Raj Thackeray On Reservation)

राज ठाकरे म्हणाले, महाराष्ट्रात भूमिपुत्रांना नोकऱ्या, चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे. मग, तो ओबीसी असो किंवा मराठा. कुठल्याही जातीचा असो, महाराष्ट्रात मुला-मुलींना चांगलं शिक्षण, रोजगार मिळाला पाहिजे. यात जात येते कुठे? मला जातीतील काही कळत नाही. माझ्याकडे याचं उत्तर नाही. महाराष्ट्रात सर्व गोष्टी मुबलक प्रमाणात आहेत. त्यामुळे आरक्षणाची गरजच नाही. महाराष्ट्रात किती शैक्षणिक संस्था आहे? तिथे आरक्षण आहे का?. नकिती जातींना मिळणार? किती नोकऱ्या उपलब्ध होणार? हे पण आपण तपासणार आहोत का? असा प्रश्न राज ठाकरेंनी केला.

राज्यात सध्या सुरु असलेलं मराठा आणि ओबीसी राजकारण हे कोणाच्या खांद्यावर बंदुका ठेवून सुरु आहे. या माध्यमातून मतं हातात घेणं सुरु आहे. हे फक्त मतांच राजकारण आहे. प्रत्येक समाजाने ही गोष्ट समजून घ्यायला हवी. हे आपल्याला मूर्ख बनवतायत. याने हाताला काही लागणार नाही असं राज ठाकरेंनी म्हंटल. मराठा-ओबीसी हा वाद समाजात विष कालवण्याचा प्रकार आहे असा आरोपही राज ठाकरेंनी केला. ज्या महाराष्ट्राने आजपर्यंत देशाला दिशा दिली तोच महाराष्ट्र आज जातीपातीच्या वादात खितपत पडला आहे, हे चित्र दुर्दैवी आहे. अशाप्रकारचं राजकारण करणाऱ्यांना प्रत्येक समाजाने निवडणुकीवेळी दूर ठेवले पाहिजे, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले.

शरद पवारांवर टीका –

दरम्यान, मणिपूरमध्ये जे घडलं तशी परिस्थिती महाराष्ट्रात सुद्धा निर्माण होते का? अशी भीती वाटतं आहे असं विधान राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी विधान केलं होते, त्याबाबत विचारला असता राज ठाकरेंनी पवारांवर निशाणा साधला. शरद पवार यांनी महाराष्ट्रात मणिपूरसारखी परिस्थिती निर्माण करायला हातभार लावू नये. महाराष्ट्राचा मणिपूर होणार नाही, याची काळजी शरद पवार यांनी घेतली पाहिजे. मात्र, त्यांचं आजपर्यंतचं राजकारण पाहता त्यांना महाराष्ट्राचा मणिपूर झालेला हवाय की नकोय, याबाबत नेमकं काही समजत नाही, असं राज ठाकरेंनी म्हंटल.