Monday, December 22, 2025
Home Blog Page 557

Ghee | तूप खाल्याने वजन होते कमी; अशाप्रकारे रोज करा सेवन

Ghee

Ghee | तूप हा भारतीय जेवणातील एक खूप महत्त्वाचा आणि पौष्टिक असा पदार्थ आहे. परंतु चवीला अत्यंत चांगला आणि शरीरासाठी पौष्टिक असणारे हे तूप खावे की नाही? असा प्रश्न अनेक लोकांना पडतो. अनेक लोकांच्या मते तुम्ही जर तूप खाल्ले, तर तुमचे वजन वाढते. परंतु काही आहार तज्ञांनी असे स्पष्ट केलेले आहे की, तूप (Ghee ) खाऊन तुमचे वजन अजिबात वाढत नाही. अनेक वेळा आपण थोडे जरी तूप खाताना विचार करतो की, त्याचा आपल्या शरीरावर परिणाम होईल. आणि आपले वजन वाढेल. परंतु तूप आणि आपल्या शरीरातील जास्त फॅट्स वाढत नाही, तर आपल्या शरीराला पौष्टिकतत्व प्राप्त होतात.

आहार तज्ञांनी तुपाबद्दल माहिती देताना सांगितलेले आहे की, तूप खाऊन तुमचे वजन अजिबात वाढत नाही. तर तूप हे तुमचे फॅट्स बन करण्याचे काम करतात. त्याचप्रमाणे तुपामध्ये त्यामध्ये कार्बनचा एक बॉण्ड असतो. जो शरीरातील चरबी कमी करण्यासाठी मदत करतो. त्यामुळे तुमच्या शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी तुपाचा गुणधर्म तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. त्यामुळे तूप खाऊन वजन वाढते. असं म्हणणं अत्यंत चुकीचा आहे.

तूप खाऊन वजन कमी कसे करायचे ? | Ghee

तुम्हाला जर तूप खाऊन तुमचे वजनही कमी करायचे असेल, तर तुम्ही दैनंदिन जेवनामध्ये तुमच्या पोळ्या, पराठे त्याचप्रमाणे इतर काही पदार्थ खातो. त्यामध्ये तेलाऐवजी तुपाचा वापर करा. त्यामुळे तेलामुळे तुमच्या शरीरातील कोणतेही इतर गोष्टींना काहीच त्रास होणार नाही.

त्याचप्रमाणे तुमचे कॉलेस्ट्रॉल देखील नियंत्रणात राहतील. त्याचप्रमाणे तुम्ही सकाळी उठल्यानंतर गरम पाण्यात एक चमचा तूप घालून पिऊ शकता. हा देखील वजन कमी करण्याचा एक चांगला पर्याय आहे. त्याचप्रमाणे गरम पाण्यात तूप टाकून प्यायल्याने बद्धकोष्ठतेचा त्रासही बंद होतो. त्याचप्रमाणे तुम्ही घरी तूप बनवण्याचा प्रयत्न करा. कारण घरच्या तुपामध्ये जे गुणधर्म आढळतात. ते बाहेरून विकत घेतलेल्या तुपामध्ये आढळत नाही. अशा प्रकारे तुम्ही तूप खाऊन तुमचे वजन कमी करू शकता.

Poco M6 Plus 5G : 108MP कॅमेरासह Poco ने लाँच केला स्वस्तात मस्त मोबाईल; किंमत किती पहा

Poco M6 Plus 5G

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकप्रिय मोबाईल निर्माता कंपनी Poco चे मोबाईल हे त्याच्या स्वस्त किमतीसाठी ओळखले जातात. इतर कंपन्यांच्या तुलनेत पोकोचे स्मार्टफोन कमी पैशात उपलब्ध असल्याने ग्राहक सुद्धा मोठ्या प्रमाणावर हे मोबाईल खरेदी करत असतात. याच पार्श्वभूमीवर कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी आणखी एक कमी बजेट मधील मोबाईल लाँच केला आहे. Poco M6 Plus 5G असे या स्मार्टफोनचे नाव असून हा मोबाईल अवघ्या 11,999 रुपयांत लाँच करण्यात आलाय. आज आपण या मोबाईलचे खास फीचर्स आणि स्पेसिफिकेशन जाणून घेऊयात….

6.79 इंचाचा डिस्प्ले –

Poco M6 Plus 5G मध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.79 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेला 2400 x 1080 पिक्सेल रिझोल्युशन आणि 550Nits पीक ब्राईटनेसचा सपोर्ट मिळतो. संरक्षणासाठी डिस्प्लेला कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 3 चे प्रोटेक्शन मिळते. कंपनीने आपल्या या बजेट स्मार्टफोनमध्ये Qualcomm Snapdragon 4 Gen 2 AE चिपसेट वापरली असून पोकोचा हा मोबाईल Android 14 आधारित HyperOS या ऑपरेटिंग सिस्टीमवर काम करतो.

कॅमेरा – Poco M6 Plus 5G

मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास, Poco M6 Plus 5G मध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप उपलब्ध आहे. यामध्ये 108MP चा मुख्य कॅमेरा आणि 2MP मॅक्रो सेन्सर आहे. तर सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी समोरील बाजूला 13MP चा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. पॉवरसाठी या स्मार्टफोनमध्ये 5,030mAh बॅटरी बसवण्यात आली असून हि बॅटरी 33W फास्ट चार्जरला सपोर्ट करते. या मोबाईलसोबत कंपनीने 2 वर्षांसाठी ओएस अपडेट आणि 4 वर्षांसाठी सिक्युरिटी अपडेट दिलेत.

किंमत किती?

Poco M6 Plus 5G च्या 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरियंटची किंमत 11,999 रुपये आहे तर 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरियंटची किंमत 13,499 रुपये आहे. SBI, HDFC आणि ICICI बँकेच्या क्रेडिट कार्डवर ग्राहकांना 1,000 रुपयांची सूट मिळतेय.

एका दिवसात किती पाणी प्यावे? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

Water

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पाणी (Water) हे आपल्यासाठी जीवन असते. एक वेळी आपल्याला जेवायला नाही मिळाले, तरी चालेल. पण आपण पाण्याशिवाय जगू शकत नाही. त्याचप्रमाणे आपण दिवसाला भरपूर पाणी प्यायला हवे. असे अनेकदा आपल्याला डॉक्टरांनी देखील सांगितलेले आहे. सोशल मीडियावर देखील अशा अनेक पोस्ट वायरल होत असतात. ज्यामुळे जास्त पाणी पिले की, आपले शरीर डिटॉक्स होते. आणि आपली त्वचा देखील चांगली होते. परंतु तुम्हाला माहित आहे का? जास्त पाणी पिणे ही कमी पाणी पिण्या इतकेच हानीकारक आहे. म्हणजे जर तुम्ही प्रमाणापेक्षा जास्त पाणी पिले, तर त्याचे तुमच्या शरीराला तोटे देखील होऊ शकतात. आता तुम्ही दिवसाला किती पाणी पिणे योग्य आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत.

आपल्या शरीराचे 50-70% वजन हे पाण्यामुळे होते. पेशी ही आपल्या शरीराची बिल्डिंग युनिट्स आहेत, ज्यांना जिवंत राहण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते. पाण्याच्या कमतरतेमुळे पेशींमधील द्रवपदार्थ नष्ट होऊ लागतात, ज्यामुळे ते नीट कार्य करू शकत नाहीत. त्यामुळे शरीरात पाण्याचे योग्य प्रमाण असणे गरजेचे आहे.

तसेच, पाणी (हायड्रेशनचे आरोग्य प्रभाव) आपल्या शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास आणि शरीराचे तापमान नियंत्रित करण्यास मदत करते. आपल्या प्रत्येक शारीरिक कार्यात पाण्याचा वापर केला जातो. या कारणास्तव वाया जाणाऱ्या पाण्याची कमतरता भरून काढणे आवश्यक आहे.

एखाद्याने किती पाणी प्यावे?

मेयो क्लिनिकच्या मते, एखाद्या व्यक्तीने किती पाणी प्यावे या प्रश्नाचे उत्तर अनेक घटकांवर अवलंबून असते. तुम्हाला माहिती आहेच, प्रत्येकाचे आरोग्य सारखे नसते. प्रत्येक व्यक्तीची जीवनशैली, खाण्याच्या सवयी, जीवनशैली आणि वैद्यकीय परिस्थिती वेगवेगळी असते, त्यामुळे पाण्याची गरजही वेगळी असते. एसीमध्ये बसलेल्या व्यक्तीपेक्षा जास्त वेळ उन्हात राहणाऱ्या व्यक्तीला जास्त पाणी लागते.

त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने त्याच्या शारीरिक, भौगोलिक आणि वैद्यकीय स्थितीनुसार पाण्याचे प्रमाण ठरवावे. यूएस नॅशनल ॲकॅडमी ऑफ सायन्सेस, इंजिनीअरिंग अँड मेडिसिननुसार, पुरुषांनी दररोज 3.7 लिटर द्रवपदार्थ सेवन केले पाहिजे. तर महिलांना दररोज २.७ लिटर द्रवपदार्थाची गरज असते. हे देखील लक्षात ठेवणे आवश्यक आहे की द्रवपदार्थ केवळ पाण्याचा संदर्भ देत नाही तर अन्न आणि इतर पेयांमधून मिळवलेले पाणी देखील समाविष्ट आहे.

वाझेचे आरोप म्हणजे फडणवीसांची चाल; अनिल देशमुखांचा हल्लाबोल

anil deshmukh on sachin vaze

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) हे पीएच्या माध्यमातून पैसे घ्यायचे असा खळबळजनक आरोप सचिन वाझे (Sachin Vaze) याने केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली. तसेच याबाबत आपण देवेंद्र फडणवीस याना पत्र लिहून संपूर्ण माहिती दिली आहे असेही त्याने म्हंटल होते. मात्र अनिल देशमुख यांनी तातडीने पत्रकार परिषद घेत हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. तसेच सचिन वाझे जे काही बोलला ती एकप्रकारे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची चाल आहे अशा शब्दात अनिल देशमुख यांनी हल्लाबोल केला.

अनिल देशमुख म्हणाले, मी चार, पाच दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केले होते आणि वस्तूस्थिती जनतेसमोर आणली होती. कि कशाप्रकारे देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना तुरुंगात टाकण्यासाठी कशा पद्धतीने मला प्रतिज्ञापत्र पाठवले होते. आणि माझ्यावर दबाव आणला होता हि परिस्थिती महाराष्ट्राच्या जनतेसमोर आणली. त्यानंतर फडणवीस यांनी नवीन चाल खेळली आहे. सचिन वाझे जे काही बोलला ते फडणवीसांची चाल आहे. देवेंद्र फडणवीस यांना माहित नाही कि मुंबई उच्च न्यायालयाने सांगितलं आहे कि, सचिन वाझे हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा व्यक्ती असून त्याला याच आरोपाखाली सध्या तो तुरुंगात आहे. त्याच्या कोणत्याही विधानावर विश्वास ठेवावा असा तो व्यक्ती नाही. असं कोर्टाने म्हंटल आहे. अशा या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीला हाताशी धरून देवेंद्र फडणवीस माझ्यावर आरोप करत आहेत. मी फडणवीस यांच्यावर आरोप केले होते म्हणून सचिन वाझेला हाताशी धरून फडणवीस माझ्यावर आरोप करत आहेत असं अनिल देशमुख यांनी म्हंटल.

वाझेचे आरोप काय?

जे जे रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेत असताना सचिन वाझे याने प्रथमच प्रसारमाध्यांशी संवाद साधत खळबळ उडवून दिली. त्यावेळी ते म्हणाले, अनिल देशमुख हे गृहमंत्री असताना पीएच्या माध्यमातून पैसे घ्यायचे. देशमुख पैसे घ्यायचे याचे सीबीआयकडे पुरावे आहेत. मी देवेंद्र फडणवीस याना पत्र लिहून सर्व माहिती दिली आहे असा खुलासा सचिन वाझे याने केला. महत्वाची बाब म्हणजे एकीकडे अनिल देशमूख हे फडणवीसांवर १०० कोटीच्या वसुली प्रकरणी आरोप करत असताना सचिन वाझेने ध्यानी मनी नसताना थेट देशममुखांवरच आरोप केल्याने त्याने साधलेल्या टायमिंगची सर्वत्र चर्चा होत आहे.

नितीन गडकरी यांचा मेगाप्लॅन!! 3 लाख कोटींचे रस्ते उभारणार

Nitin Gadkari Expressway

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मागील काही वर्षात देशातील रस्ते (Expressways In India) मोठ्या प्रमाणात विकसीत झाले आहेत. अजूनही ठिकठिकाणी रस्त्याची कामे सुरूच आहे. रस्ते विकासामुळे संपूर्ण देशाचा कायापालट झाला आहे. आता देशात आणखी मोठमोठे राष्ट्र उभारताना पाहायला मिळणार आहेत. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी याबाबत माहिती देत म्हंटल कि, येत्या तीन महिन्यांत 3 लाख कोटी रुपयांच्या रस्ते प्रकल्पांच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात येईल. यासोबतच या आर्थिक वर्षात रस्तेबांधणीत 5 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची योजना असल्याचे त्यांनी सांगितले.

दिल्लीतील एका कार्यक्रमाला संबोधित करताना नितीन गडकरी म्हणाले की, लोकसभा निवडणुकीमुळे चालू आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला काम थोडे संथ होते. यासोबतच येत्या तीन महिन्यांत तीन लाख कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे कंत्राट दिले जातील. मार्च 2025 पर्यंत रस्ते बांधण्यासाठी 5 लाख कोटी रुपये खर्च करण्याची योजना आहे. मंत्रालयाचे अनेक प्रकल्प पाइपलाइनमध्ये आहेत. रस्तेबांधणीसाठी निधीची कमतरता नसून भविष्यात सुद्धा हि कमतरता पडणार नाही असे आश्वासन नितीन गडकरी यांनी दिले.

गडकरी पुढे म्हणाले, अलीकडच्या काळात NHAI टोलमधून 45000 कोटी रुपये कमवत आहे. येत्या दोन वर्षांत ही कमाई १.४ लाख कोटी रुपयांवर पोहोचेल. रस्त्यांच्या मालमत्तेचे मुद्रीकरण केले जात आहे, ज्यामुळे मंत्रालयाला चांगले उत्पन्न मिळत आहे. त्यामुळे आमच्याकडे पैशांची कमतरता नाही, आमच्याकडे रस्ते प्रकल्पांसाठी पुरेसा निधी आहे. चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत 3 रस्ते प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. ज्याची एकूण लांबी 47.04 किलोमीटर आहे अशी माहिती नितीन गडकरी यांनी दिली.

सचिन वाझेचा अनिल देशमुखांवर गंभीर आरोप; राजकारणात खळबळ, चर्चा मात्र टायमिंगची

sachin vaze anil deshmukh

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) हे पीएच्या माध्यमातून पैसे घ्यायचे असा खळबळजनक आरोप मुख्य आरोप सचिन वाझे (Sachin Vaze) याने केला आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. महत्वाचे म्हणजे हे आरोप यावेळी करण्यात आलेत जेव्हा अनिल देशमुख आणि देवेंद्र फडणवीस हे या संपूर्ण प्रकरणावर एकमेकांवर आरोप करत आहेत. त्याच दरम्यान आता सचिन वाझे यांनी अचूक टायमिंग साधत अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर अनिल देशमुख यांचा पाय खोलात जाण्याची शक्यता आहे.

जे जे रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेत असताना सचिन वाझे याने प्रथमच प्रसारमाध्यांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले, अनिल देशमुख हे गृहमंत्री असताना पीएच्या माध्यमातून पैसे घ्यायचे. देशमुख पैसे घ्यायचे याचे सीबीआयकडे पुरावे आहेत. मी सुद्धा देवेंद्र फडणवीस याना पत्र लिहून सर्व माहिती दिली आहे असं म्हणत सचिन वाझे याने खळबळ उडवून दिली आहे. महत्वाची बाब म्हणजे आत्ताच सचिन वाझे याने हा आरोप केला आहे. एकीकडे अनिल देशमूख हे फडणवीसांवर आरोप करत असताना सचिन वाझेने ध्यानी मनी नसताना थेट देशममुखांवरच आरोप केल्याने या संपूर्ण प्रकरणाला नवं वळण लागण्याची शक्यता आहे. तसेच सचिन वाझेने देशमुखांवर आरोप केल्यानंतर गृहमंत्री फडणवीस आता काय भूमिका घेणार ते सुद्धा पाहायला हवं.

अनिल देशमुख यांनी काय आरोप केले होते?

मी गृहमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांच्या एका खास व्यक्तीने मला उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे याना अडकवण्यासाठी काही प्रतिज्ञापत्रावर सही करण्यास सांगितलं होत. १०० कोटी वसुली प्रकरणात उद्धव ठाकरेंचं नाव घ्या, आदित्य ठाकरे यांनी दिशा सालियन या मुलीवर बलात्कार केला. त्यानंतर तिचा खून केला असं या प्रतिज्ञापत्रात लिहिले होते. मी जर तेव्हा सही केली असती तर विनाकारण उद्धव ठाकरे हे प्रचंड अडचणीत आले असते आणि आदित्य ठाकरे तर जेलमध्ये गेले असते. ठाकरे सरकार सुद्धा तेव्हाच कोसळलं असते. मात्र मी दबावाला बळी न पडता सही केली नाही. राजकीय नेत्यांच्या मुलाला खोट्या आरोपात अडकवता येईल याप्रकारचा प्रयत्न ३ वर्षापूर्वी देवेंद्र फडणवीसांनी केला असं अनिल देशमुख यांनी म्हंटल होते.

Moon Drifting Away | पृथ्वीपासून चंद्र चाललाय दूर, दिवस होणार 25 तासांचा; अभ्यासात मोठी माहिती समोर

Moon Drifting Away

Moon Drifting Away | आपल्या आकाशात विविध तारे त्याचप्रमाणे ग्रह दिसतात. त्यातील चंद्र हा गेल्या अनेक दशकांपासून लहान मुलांपासून ते कवयित्री, कलाकारांना आपलंसं करणार आहे. अगदी लहान मुलांना चांदोबा चांदोबा म्हणून भागलास का असे म्हटले जाते. तर अनेक जिव्हाळ्याची प्रेमवीरांना एकत्र आणणारी चंद्राची गाणी देखील आपल्याकडे आहे. या चंद्राला बघूनच अनेक लहान मुलं रात्रीचे जेवण करत असतात. परंतु आता आपल्याला अगदी जवळ वाटणारा हा चंद्र पृथ्वीपासून (Moon Drifting Away) हळूहळू लांब जात आहे. आणि असाच दावा करण्यात आलेला आहे की, चंद्र दरवर्षी 3.8 सेंटीमीटर या गतीने पृथ्वीपासून दूर जात आहे. चंद्र हा पृथ्वीपासून असाच जर लांब लांब जात राहिला, तर पृथ्वीवरचा दिवस हा 24 तासाने ऐवजी 25 तासांचा होईल. असा जाणकारांनी दावा देखील केलेला आहे. त्याचप्रमाणे एका नवीन अभ्यासात अशी माहिती समोर आलेली होती की, एकेकाळी पृथ्वीवरचा दिवस हा केवळ 18 तासांचा होता. परंतु चंद्र हा पृथ्वीपासून दरवर्षी थोडा थोडा लांब गेला आणि त्यामुळे हा दिवस 24 तासांचा झालेला आहे.

काय सांगतो अभ्यास ? | Moon Drifting Away

अमेरिकेतील एका विद्यापीठात एका टीमने चंद्राचा सखोल अभ्यास केलेला आहे. आणि त्यांना जाणवलेल्या निरीक्षणावरून त्यांनी असे सांगितलेले आहे की, पृथ्वीपासून चंद्र हा दरवर्षी हळूहळू लांब जात आहे. परंतु चंद्राच्या तसा पृथ्वीपासून लांब गेला, तसतसा त्याचा परिणाम पृथ्वीवर झालेला आहे. पृथ्वीपासून दूर गेले आहे.. एकेकाळी 18 दिवसांचा असणारा पृथ्वीवरचा दिवस हा 24 तासांचा झालेला आहे. आणि हे जर असेच राहिले तर आपला पृथ्वीवरील दिवस हा 25 तासांचा देखील होऊ शकतो.

अनेक विद्यापीठातील संशोधकांनी चंद्राचा सखोल अभ्यास केलेला आहे. त्याचप्रमाणे पृथ्वीवर असलेल्या डोंगरांचा खडकांचा देखील अभ्यास केलेला आहे. त्यानुसार असे निष्कर्ष काढण्यात आलेला आहे की, चंद्र हा हळूहळू पृथ्वीपासून दूर (Moon Drifting Away) जायला लागलेला आहे. पृथ्वी स्वतःभोवती फिरते, या प्रक्रियेला सध्या 24 तासांचा कालावधी लागतो. परंतु भविष्यात जर असेच चालू राहिले, तर पृथ्वीला स्वतःभोवती फिरण्यासाठी 25 तास लागतील आणि दरवर्षी 365 दिवसाऐवजी कमी दिवस लागतील.

यावर असा अभ्यास करण्यात आलेला आहे की पृथ्वीवरचा दिवस हा 25 तासांचा झाला, तर त्याचा परिणाम आपल्या कालगणनेवर देखील होऊ शकतो. म्हणजेच सध्या पृथ्वीवर एक वर्षाला 365 दिवस असतात दिवस हा पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्यासाठी लागणारा कालावधी असेल तर पृथ्वीवरचा दिवस हा 25 तासांचा झाला तर वर्ष हे 365 दिवसांनी 350 दिवसांचेच होणार आहे.

Weather Update | पुण्यासह ‘या’ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता; हवामान विभागाने दिली माहिती

Weather Update

Weather Update | दोन-चार दिवसांची सुट्टी घेतल्यानंतर आता पावसाने पुन्हा एकदा महाराष्ट्रात हजेरी लावलेली आहे. अनेक ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडताना दिसत आहे. पुण्यात देखील हवामान खात्याने आज पावसाचा (Weather Update) रेड अलर्ट जारी केलेला आहे. त्यामुळे आता विनाकारण पुणेकरांनी बाहेर झालं टाळावे असे देखील सांगितलेले आहे. हवामान विभागाने आज म्हणजे 3 ऑगस्ट 2024 रोजी महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज व्यक्त केलेला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुणे जिल्ह्यामध्ये घाट माथ्यावर अति मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे इतर भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज देखील वर्तवण्यात आलेला आहे.

पुण्या व्यतिरिक्त सातारा जिल्ह्यातही आज अतिमुसळधार पावसाचा (Weather Update) इशारा हवामान विभागाकडून देण्यात आलेला आहे. घाट माथ्यावर देखील अति मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडेल. त्याचप्रमाणे कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये देखील स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे. तसेच रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये देखील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे. कारण या भागात देखील पावसाचा इशारा आज देण्यात आलेला आहे.

त्याचप्रमाणे सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर हे जिल्हे जर वगळले तर संपूर्ण महाराष्ट्रातच पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. उरलेल्या सगळ्या जिल्ह्यांना आज हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे मराठवाड्यातील जिल्ह्यात देखील आज अनेक ठिकाणी पाऊस पडणार आहे. या ठिकाणी सोसाट्याचा वारा देखील वाहणार आहे. वाऱ्याचा वेग हा 36 ते 40 किलोमीटर प्रतितास एवढा असणार आहे. मुंबई शहर आणि उपनगरात देखील आज मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. त्याचप्रमाणे विदर्भातील जिल्ह्यात देखील आज पावसाचा अंदाज आणि सोसाट्याचा वाऱ्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. तसेच मध्य महाराष्ट्रातील घाट भागत देखील अनेक ठिकाणी पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेली आहे.

लाडकी बहीण योजनेनंतर आता आशा सेविकांना फायदा; मोबाइलसोबत रिचार्जही फ्री

Asha Sevika

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता, राज्य सरकारने महिला मतदारांवर विशेष लक्ष दिलेले आहे. सरकार राज्यामध्ये अनेक नवनवीन योजना राबवत आहे. त्यामध्ये महिलांना ते केंद्रस्थानी ठेवत आहे. सरकारने काही दिवसांपूर्वीच महिलांसाठी लाडकी बहीण योजना आणलेली आहे. आता अशातच आता अशा सेविकांना देखील निवडणुकीपूर्वी एक भेट दिलेली आहे. ती म्हणजे आता मोबाईल सोबत त्यांच्या रिचार्जची ही व्यवस्था सरकारकडून केली जाणार आहे. आणि यासंबंधीची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या माहितीनुसार खनिज विकास निधीमधून वर्षभर आशा सेविकांना रिचार्ज रक्कम दिली जाणार आहे. यासोबतच मानधन देखील वाढवण्यासंबंधात जीआर निघालेला आहे. परंतु त्याबाबतचे पैसे अजून आलेले नाहीत. अशी तक्रार लक्षात घेता आता या महिन्यात ते सर्व पैसे जमा होतील, अशी माहिती देखील फडणवीस यांनी दिलेली आहे.

उपमुख्यमंत्री तसेच नागपूरचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज नागपूर जिल्ह्यातील आशा सेविकांसाठी मोबाईल वितरण तसेच पारशिवनी तालुक्यातील घाट पेंढरी आणि कटोल तालुक्यातील शिल्पा आणि भोरगड येथील नवनिर्मित प्राथमिक आरोग्य केंद्र इमारतीचा लोकार्पण सोहळा पार पडला. यामध्ये आशा सेविकांना मोबाईल आणि टॅब दिलेले आहेत. ते मिळाल्याने त्यांचे ग्रामीण भागात आरोग्य सेवेचे काम देखील गतिमान होणार आहे. आणि सरकारी आरोग्य सुविधांचा लाभ आता कमीत कमी वेळेत नागरिकांना देखील मिळणार आहेत. तसेच तीन नवीन आरोग्य केंद्र नागरिकांच्या सेवेत सुरू झाल्याने आता नागपूर जिल्ह्यामध्ये आरोग्य सेवेचा विस्तार झालेला आहे.

Mukhyamantri Vayoshri Yojana | जेष्ठ नागरिकांना मिळणार 3 हजार रुपये; जाणून घ्या सरकारची नवी योजना

Mukhyamantri Vayoshri Yojana

Mukhyamantri Vayoshri Yojana | विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असताना राज्य सरकारने सामान्य नागरिकांसाठी वेगवेगळ्या योजना आणलेल्या आहेत. ज्या मधून सामान्य नागरिकांना नक्कीच फायदा होणार आहे. सरकारच्या लाडकी बहीण योजनेची सध्या सर्वत्र चर्चा चालू आहे. अशातच आता सरकारने आणखी एक योजना आणलेली आहे. या योजनेचे नाव मुख्यमंत्री वयोश्री योजना (Mukhyamantri Vayoshri Yojana ) अशी आहे. नुकतेच सरकारने या योजनेची घोषणा केलेली आहे.

सरकारने केलेल्या घोषणेनुसार या योजनेत आता 65 वर्षांवरील जेष्ठ नागरिक आहे. त्यांच्या खात्यात तीन हजार रुपये जमा केली जाणार आहेत. परंतु आता या योजनेचा लाभ नक्की कोणाला होणार आहे? यात पात्र कोण ठरणार आहे? आणि कोण कोणती कागदपत्रे लागतील?याची सविस्तर माहिती आज आपण जाणून घेऊया.

ज्येष्ठ नागरिकांना कोणत्याही प्रकारची नोकरी किंवा काम करता येत नाही. अनेक लोकांनी त्यांच्या निवृत्तीनंतर आयुष्याची आर्थिक तयारी केलेली असते. परंतु अनेक लोकांनी ही तयारी केलेली नसते. त्यामुळे त्यांना दैनंदिन जीवनात अनेक समस्या येतात. तसेच वयोमानानुसार येणारे आजार देखील असतात. त्यामुळे या सगळ्या गोष्टीवर उपचार करण्यासाठी योगाचार्य केंद्र उपलब्ध करणे मानसिक संतुलन ठेवण्यासाठी मन स्वास्थ्य केंद्र यांचा प्रशिक्षण देण्यासाठी आता पात्र लाभार्थ्यांना तीन हजार रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहेत.

या योजनेअंतर्गत वृद्ध असणाऱ्या लाभार्थ्यांना त्यांची शारीरिक असमर्थता दुर्बलतेनुसार साधने उपकरणे आणि चष्मा, श्रवण यंत्र, ट्रायपॉड, स्टिक, व्हीलचेअर, फोल्डिंग वर्कर, कमोड खुर्ची, सर्वाइकल कॉलर यांसारख्या गोष्टी खरेदी करता येणार आहेत.

योजनेसाठी कागदपत्रे | Mukhyamantri Vayoshri Yojana

या योजनेसाठी तुम्हाला आधारकार्ड/ मतदान कार्ड, पासपोर्ट आकाराचे 2 फोटो, राष्ट्रीयकृत बँकेच्या बँक पासबूकची झेरॉक्स, स्वयं-घोषणाफत्र, शासनाने ओळखपत्र पटवण्यासाठी विहीत केलेली अन्य कागदपत्रे.

योजनेचे निकष

या योजनेत पात्र होण्यासाठी 31 डिसेंबर 2024 अखेर उमेदवाराचे वय 65 पूर्ण असणे गरजेचे आहे.
उमेदवाराच्या आधार कार्ड असणे गरजेचे आहे. आधार कार्ड नसल्यास स्वतंत्र ओळखपत्र कागदपत्र असणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे रेशन कार्ड किंवा राष्ट्रीय सामाजिक सहाय्यक कार्यक्रमांतर्गत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापण निवृत्ती वेतन योजनेचे अंतर्गत अंतर्गत किंवा राज्य / केंद्रशासित सरकारच्या इतर कोणत्याही पेन्शन योनजे अंतर्गत वृद्धापकाळ निवृत्तीवेतन मिळाल्याचा पुरावा सादर करु शकतो. लाभार्थ्याचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न 2 लाख रुपयांच्या आत असावे.