Monday, December 22, 2025
Home Blog Page 558

Vande Bharat Express : पुणेकरांना लवकरच वंदे भारत स्लीपर ट्रेनची भेट ? दोन केंद्रीय मंत्र्यांमध्ये महत्वाची बैठक

Vande Bharat Express : देशाभरात रेल्वेचं मोठे जाळं पसरलेलं आहे. त्यातही संपूर्णपणे स्वदेशी बनावटीची असलेली वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन प्रवाशांच्या पसंतीस उतरली आहे. सध्या देशभरातल्या काही मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस चालवली जाते. मात्र कमी वेळेत आरामदायी प्रवास अशी ओळख असलेल्या वंदे भारत रेल्वेला देशभरातून मागणी होत आहे. लवकरच वंदे भारत स्लीपर कोच रुळावरून धावणार आहेत. मात्र त्या कोणत्या भागांना जोडतील किंवा कोणत्या मार्गावरून धावतील हे निश्चित झाले नाही. मात्र पुण्यासाठी वंदे भारत स्लीपर ट्रेन च्या दृष्टीने आशा पल्लवित झाल्या आहेत. कारण केंद्रीय राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन याबाबत मागणी (Vande Bharat Express) केल्याची माहिती आहे.

कोणत्या मार्गावरून धावणार ? (Vande Bharat Express)

पुण्याच्या बाबतीत बोलायचं झाल्यास अद्यापही पुणे शहरातून स्वतंत्र अशी वंदे भारत एक्सप्रेस अजूनही सुरू झालेली नाही. मुंबई – सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस पुण्यावरून जाते. परंतु आता पुणे – दिल्ली वंदे भारत स्लीपर ट्रेन साठी वेगवान हालचाली सुरू झाल्याच्या दिसून येत आहेत. या संदर्भात केंद्रीय नागरिक उड्डयन आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुढाकार घेतला असून त्यासाठी त्यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान पुण्यावरून वंदे भारत स्लीपर ट्रेन, वंदे मेट्रो ट्रेन बाबत चर्चा झाली आहे आणि त्यामुळे येत्या काही (Vande Bharat Express) दिवसात पुणे दिल्ली स्लीपर वंदे भारत ट्रेन सुरू होण्याची शक्यता आहे.

रेल्वेच्या पुणे आणि विभागातील विविध प्रलंबित विषय मार्गी लावण्या संदर्भात केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी भेट घेऊन सविस्तर चर्चा केली गेली. अनेक वर्ष प्रलंबित असणारे प्रश्न मार्गी लावतानाच पुण्यातून (Vande Bharat Express) वंदे भारत ट्रेन सुरू करण्यात यावी यावर सकारात्मक चर्चा झाली असल्याची माहिती आहे.

‘या’ विषयांवर चर्चा (Vande Bharat Express)

याबाबत माहिती देताना केंद्रीय मंत्री मोहोळ म्हणाले, पुणे-दिल्ली वंदे भारत स्लिपर ट्रेन, पुणे-लोणावळा रेल्वे मार्गाचे विस्तारीकरण, पुणे-अहिल्यानगर रेल्वे कनेक्टिव्हिटी, पुणे रेल्वे स्थानकाचे नूतनीकरण, उरुळी कांचन येथे नवे टर्मिनल आदी विषयांवर सविस्तर चर्चा झाली. या सर्व विषयांवर वैष्णव यांनी सविस्तर माहिती दिली. तसेच आगामी काळातील कृती आराखड्याबाबतही चर्चा केली. गुरुवारी लोकसभेतील भाषणात रेल्वेमंत्र्यांनी देशातील महत्वाच्या महानगरांना जोडणारी वंदे भारत मेट्रो सेवा लवकरच सुरू होणार असल्याची घोषणा केली. या अनुषंगाने पुण्याहून नाशिक, मुंबई, सोलापूर, नागपूर या महानगरांसाठी वंदे भारत मेट्रोचा विचार व्हावा, या संदर्भातही चर्चा केली, अशीही माहिती (Vande Bharat Express) मोहोळ यांनी दिली.

Pune News : वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांची खैर नाही ; पुण्यातल्या चौकाचौकात AI ठेवणार वॉच

Pune News : ‘ पुणे तिथे काय उणे ‘ ही उक्ती आपण बऱ्याचदा ऐकली असेल. संपूर्ण देशात सर्वाधिक वाहनांची संख्या पुण्यात आहे. पण पुण्यात ट्रॅफिकची समस्याही मोठी आहे . तासंतास ट्रॅफिकमध्ये पुणेकरांना ताटकळत बसावे लागते. शिवाय वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांचीही इथे काही कमी नाही. मात्र आता वाहतुकीचे नियम तोडणाऱ्यांची सुट्टी नाही… कारण आता पुण्यातल्या चौका चौकात ट्राफिक पोलिसांना तंत्रज्ञानाची मदत मिळणार आहे. त्यामुळे नियम तोडल्यास अवघ्या 5 मिनिटात पावती मिळणार आहे. इथे भाऊ, दादा काही चालणार (Pune News) नाही. असं नक्की काय होणार आहे पुण्यात चला पाहुयात…

AI टेक्नॉलॉजी ठेवणार वॉच (Pune News)

पुण्यातल्या चौका चौकामध्ये वाहतूक नियमांचे पालन न करणाऱ्यांवर आता इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम या प्रणाली द्वारे कारवाई करण्यात येणार आहे. तंत्रज्ञान आधारित ही यंत्रणा असणार आहे त्यामुळे वाहतूक नियमांचे उल्लंघन केलं तर अवघ्या पाचव्या मिनिटाला दंडाची पावती थेट तुमच्या मोबाईलवर फोटोसह मिळणार आहे. त्यासाठी पोलीस ऑटोमॅटिक नंबर प्लेट रेकीग्नेशन कॅमेरा ची मदत (Pune News) घेणार आहेत.

खरंतर पुणे पोलिसांकडून प्रायोगिक तत्त्वावर सर्वेक्षणाला सुरुवात झाली आहे. यासाठी सल्लागाराची नेमणूकही करण्यात येणार आहे. पुण्यातल्या चौका चौकात आधुनिक कॅमेरा द्वारे पुणे पोलिसांची यंत्रणा राबवण्यात येणार आहे. त्यामुळे जर तुम्ही चुकूनही नियम तोडण्याच्या विचारात असाल तर लगेच तुम्ही पकडले जाणार आहात. AI तंत्रज्ञानाच्या मदतीने लगेचच तुमच्या दंडाची पावती आणि फोटो देखील मिळणार (Pune News) आहे. त्यामुळे पुण्यात वाहन चालवताना नियमांचे पालन हे करावंच लागणार आहे. अन्यथा दंड भरण्याची तयारी ठेवावी लागणार आहे. तसंच जे वाहनधारक वारंवार नियम मोडतात त्यांच्या परवाना रद्द करण्याची सुद्धा कारवाई करण्यात येणार आहे.

Honor Magic 6 Pro : 180MP कॅमेरासह लाँच झाला Honor Magic 6 Pro; किंमत किती पहा

Honor Magic 6 Pro

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अखेर बहुप्रतीक्षित Honor Magic 6 Pro मोबाईल भारतीय बाजारात लाँच झाला आहे. मागील अनेक दिवसांपासून या स्मार्टफोनची जोरदार चर्चा सुरु होती. आज कंपनीने हा स्मार्टफोन लाँच केला आहे. या मोबाईल मध्ये 180MP झूम कॅमेरा,12GB रॅम आणि 5600mAh ची बॅटरी यांसारखे अनेक भन्नाट फीचर्स मिळतात. कंपनीने या स्मार्टफोन काळा आणि हिरवा अशा २ रंगात आणला असून येत्या 15 ऑगस्टपासून Amazon आणि Honor च्या वेबसाइटवरून तुम्ही हा मोबाईल खरेदी करू शकता. चला या स्मार्टफोनबाबत संपूर्ण डिटेलस जाणून घेऊयात.

6.8 इंचाचा डिस्प्ले –

Honor Magic 6 Pro मध्ये 120hz रिफ्रेशरेटसह 6.8 इंचाचा OLED डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेला 5000 nits पर्यंत पीक ब्राईटनेस मिळतो. यात डॉल्बी व्हिजन आणि ऑनरचे नॅनो क्रिस्टल शील्ड देखील आहे, ज्यामुळे मोबाईल पडला तरी मोबाईलला व्यवस्थित ठेवते. कंपनीने या स्मार्टफोन मध्ये Snapdragon 8 Gen 3 प्रोसेसर बसवला आहे. त्याअंतर्गत मोबाईलमध्ये 12GB रॅम आणि 512GB पर्यंत स्टोरेज देण्यात आलं आहे. खास बाब म्हणजे यामध्ये Adreno 750 ग्राफिक्स चिप देखील मिळतेय ज्यामुळे गेम खेळताना आणि विडिओ बघताना आनंद मिळतो. honar चा हा मोबाईल एंड्रॉइड 14 वर आधारित मैजिकओएस 8.0 या ऑपरेटिंग सिस्टीमवर काम करतो.

कॅमेरा – Honor Magic 6 Pro

मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास, Honor Magic 6 Pro मध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप पाहायला मिळतो ज्यामध्ये 50-मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा, 50-मेगापिक्सेलचा वाइड-एंगल कॅमेरा आणि तिसरा 180-मेगापिक्सेल झूम कॅमेरा आहे. तर सेल्फी आणि व्हिडिओ कॉल साठी समोरील बाजूला 50-मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. पॉवरसाठी मोबाईल मध्ये 5600mAh बॅटरी बसवण्यात आली असून हि बॅटरी 80 वॉटच्या चार्जर आणि 66 वॅट्स वायरलेस चार्जरला सपोर्ट करते. Honor ने या स्मार्टफोनसाठी 4 वर्षांसाठी सॉफ्टवेअर अपडेट्स आणि 5 वर्षांसाठी सुरक्षा अपडेट्स देण्याचे आश्वासन दिले आहे.

किंमत किती?

Honor Magic 6 Pro फक्त 12GB + 512GB या एकाच स्टोरेज व्हेरियंट मध्ये लाँच करण्यात आला असून या मॉडेलची किंमत 89,999 रुपये ठेवण्यात आली आहे. हा स्मार्टफोन ब्लॅक आणि ईपी ग्रीन कलर पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. या स्मार्टफोनची पहिली विक्री 15 ऑगस्ट रोजी Amazon, मेनलाइन स्टोअर्स आणि Honor च्या ई-स्टोअरवर होईल.

मातोश्रीत बसून धमकीची भाषा षंढच करू शकतो; राणेंचा ठाकरेंवर प्रहार

narayan rane uddhav thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणुकीत असा लढलो कि नरेंद्र मोदींना घाम फोडला अशा शब्दात शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मोदींवर निशाणा साधल्यानंतर भाजप खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी उद्धव ठाकरेंचा जोरदार समाचार घेतला आहे. नरेंद्र मोदी यांच्याब‌द्दल हे वाक्य उदगारताना जनाची नाही तर मनाची तरी ठेवावी असं म्हणत नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. तसेच आपल्या अडीच वर्षाच्या कालावधीत विकासाच्या बाबतीत महाराष्ट्र १० वर्ष मागे गेला तेव्हा लोक म्हणायचे अडीच वर्षात दोनदा मंत्रालयात जाणाऱ्या मुख्यमंत्र्याची कीव करावीशी वाटते असेही राणेंनी म्हंटल. याबाबत नारायण राणे यांनी थेट ट्विट केलं आहे.

काय आहे राणेंचं ट्विट ?

नारायण राणे आपल्या ट्विटमध्ये म्हणतात कि, उद्धव ठाकरे यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चॅलेंज देण्याची औकात आणि लायकी नाही. लोकशाहीमध्ये निवडणुकीत जागा कमी-जास्त होतात. भाजपने काही पहिल्यांदा निवडणूक लढलेली नाही. नरेंद्र मोदी अनेक निवडणुकांना सामोरे गेलेले आहेत. त्यामुळे त्यांना घाम फुटण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. नरेंद्र मोदी यांच्याब‌द्दल हे वाक्य उदगारताना जनाची नाही तर मनाची तरी ठेवावी. उद्धव वाकड्‌यात शिरले तर वाकडे पणाला चोख उत्तर देवून भाजप सरळ केल्याशिवाय राहणार नाही. राजकारणातील माणसे षंड आहेत, असे आपण म्हणालात. आपण आत्मपरीक्षण करा, षंढ शब्दाचा अर्थ कोणाशी जवळीक साधतो? आपले मुख्यमंत्री पद हे महाराष्ट्रासाठी कलंक होते. आपल्या अडीच वर्षाच्या कालावधीत विकासाच्या बाबतीत महाराष्ट्र १० वर्ष मागे गेला तेव्हा लोक म्हणायचे अडीच वर्षात दोनदा मंत्रालयात जाणाऱ्या मुख्यमंत्र्याची कीव करावीशी वाटते”,असा घणाघात राणेंनी केला .

“काही झाले तरी आपले स्वप्न आम्ही पुरे होवू देणार नाही. भविष्यकाळात महाराष्ट्रात कोण राहील हे महाराष्ट्राची जनता ठरवेल. स्वत:चे कौतुक करून घेवून आपण अडीच वर्षात भीम पराक्रम केल्याच्या फुशारक्या मारत आहात त्याला लवकरच चोख उत्तर देऊ. एक लक्षात ठेवा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकटे नाहीत. आम्ही त्यांच्यासोबत आहोत. भाजप आणि आर.एस.एस. त्यांच्या सोबत आहे. मातोश्रीत बसून धमकीची भाषा षंढच करू शकतो अशा शब्दात नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला.

ठाकरेंनी काय टीका केली होती?

मुंबईतील रंगशारदा सभागृहात झालेल्या ठाकरे गटाच्या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस यांच्यासहित भाजपवर तुफान हल्लाबोल चढवला होता. उद्धव ठाकरे म्हणाले, अनिल देशमुखांनी सांगितलं की, कसं मला आणि आदित्यला तुरुंगात टाकण्यासाठी या फडणवीसाचे डाव होते. हे सगळं सहन करुन मी हिंमतीने उभा राहिलेलो आहे. आता एकतर तू तरी राहशील नाहीतर मी तरी राहीन. जोपर्यंत आपण सरळ होतो, तोपर्यंत सरळ असतो. पण एकदा वाकड्यात घुसलो की आपण वाकडं करतो. लोकसभा निवडणुकीत आपण असा नडलो की मोदींना घाम फोडला. नरेंद्र मोदींचे भाषण बघताना आता किव येते असं म्हणत उद्धव ठाकरेंनी मोदी आणि फडणवीसांवर तोफ डागली आहे.

Mhada Lottery : खुशखबर ! म्हाडाकडून लवकरच ‘या’ मंडळासाठी 3 हजार घरांची लॉटरी

Mhada Lottery : सध्याच्या घरांच्या वाढत्या किमती पाहता घर घेणे सर्वसामान्यांच्या खिशाला न परवडणारी गोष्ट आहे. त्यातही घरे जर मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी घ्यायची असतील तर मोठी रक्कम हाती असावी लागते. मात्र हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी म्हाडा सारख्या संस्थांचे मोठे योगदान आहे. म्हाडा कडून मुंबई पुण्यासह राज्यातील विविध मंडळांसाठी लॉटरी काढण्यात येते. मुंबई म्हाडाची (Mhada Lottery) सोडत लवकरच निघण्याची शक्यता आहे. याच बरोबर कोकण मंडळाची सुद्धा लवकरच लॉटरी निघण्याची शक्यता आहे.

कोकण मंडळात 3 हजार घरांसाठी लॉटरी (Mhada Lottery)

आगामी विधानसभा निवडणुकांच्या आधी ही लॉटरी काढली जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सध्याचा विचार करता कोकण मंडळाकडे 2 हजार घरे आहेत. मात्र आणखी घरांची जुळवाजुळव सुरू आहे. त्यामुळं 3 हजार घरांसाठी लॉटरी (Mhada Lottery) जाहिर होऊ शकते. यात 900 घरे पंतप्रधान आवास योजनेतील असून इतर घरे म्हाडा योजनेतील आहेत. तसंच, यापूर्वी काढण्यात आलेल्या लॉटरीमध्ये विक्री न झालेल्या 4 हजारांहून अधिक घरांचा यामध्ये समावेश असण्याची शक्यता आहे.

मुंबई मंडळाचीही लॉटरी (Mhada Lottery)

मुंबईच्या बाबतीत बोलायचे झाल्यास मुंबईमधल्या मोक्याच्या जागांवर म्हाडा घरं उपलब्ध करून देत आल्यामुळे म्हाडामधून मुंबईमध्ये घरं घेणाऱ्यांची संख्या मोठी असते. मुंबईकरांसाठी एक खुशखबर असून म्हाडा (Mhada Lottery) प्राधिकरण लवकरच दोन हजार घरांची लॉटरी (Mhada Mumbai) काढणार ऑगस्ट मध्ये आठवड्यात म्हाडा तर्फे गोरेगाव, विक्रोळी, पवई, ताडदेव, जुहू येथील दोन हजार घरांसाठी जाहिरात काढली जाणार आहे. या घरांच्या किंमती 34 लाखांपासून सुरू होणार आहेत. अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. तसंच, अनामत रक्कम जमा करण्याची प्रक्रियादेखील पूर्ण करण्यात येणार आहे. म्हाडा लॉटरीसाठी पूर्णपणे संगणीकृत पद्धतीचा वापर केला जाणार आहे. अशी माहिती समोर येत आहे.

Bacchu Kadu : अपंगांसाठी बच्चूभाऊ कडू…. संपूर्ण महाराष्ट्राला बच्चू कडूंची गरज

bacchu kadu

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्राच्या पावन भूमीत दिव्यांग कल्याण मुद्दा कायम दुर्लक्षित व्हावा हे जरा भुवया उंचावणारं आहे पण याच बांधवांच्या कल्याणासाठी आपलं आयुष्य समर्पित करणारा माणूस म्हणजे आमदार बच्चूभाऊ कडू (Bacchu Kadu) होय. पुण्याच्या सरकारी कार्यालयात एका दिव्यांग बांधवांना मिळालेल्या दुय्यम वागणुकीने त्यांच हृदय ढवळून निघालं. आणि तिथूनच आरंभ झाला दिव्यांग बांधवाना त्यांचे हक्क मिळवून देण्याच्या निर्धाराचा. देहू ते वर्षां बंगला असं त्यांनी दिव्यांग बांधवांच प्रथम आंदोलन केलं. ज्याचं नाव होतं प्रहार अपंग क्रांती आंदोलन . विखूरलेल्या दिव्यांग बांधवांना बच्चूभाऊ कडू यांच्या रूपाने पहिले सक्षम नेतृत्व मिळाले.

त्यांच्या या आंदोलनाची दखल अखेर केंद्र सरकारलाही घ्यावी लागली. त्यांच्या आंदोलनाचं फलित म्हणजे 1995 साली संजय गांधी निराधार योजनेचा मासिक हप्ता 600 रुपयावरून 1000 रुपयांपर्यंत गेला. दिव्यांग बांधवासाठीचा 3% राखीव निधी 5% पर्यंत गेला. 1995 च्या अपंग पुनर्वसन कायद्याची कडक अंमलबजावणी सुरु झाली. ग्राम पंचायत, नगर परिषद, महानगरपालिका येथे 3% निधी, 3% गाळे वाटप, स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये 3% आरक्षण या सर्व हक्कांना नवसंजीवनी मिळाली.

https://www.facebook.com/reel/3680621232187851

दिव्यांग बांधवासाठी करत असलेल्या धडक आंदोलनामुळे त्यांच्यावर 350 पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहे. बच्चू भाऊंच्या या सर्व कार्याची पोचपावती म्हणजे महाराष्ट्र राज्य सरकारने स्थापन केलेलं दिव्यांग मंत्रालय होय. आजही बच्चूभाऊ कडू यांचा आवाज दिव्यांग बांधवासाठी महाराष्ट्र विधानसभेत घुमतो आहे. दिव्यांगांसाठी झटणाऱ्या अशा या दमदार नेतृत्वाची आता फक्त अपंगानाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राला गरज आहे.

Mazi Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेला ब्रेक? कोर्टात याचिका दाखल, मंगळवारी सुनावणी

Mazi Ladki Bahin Yojana petition

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी राज्यातील शिंदे सरकारने माझी लाडकी बहीण योजना (Mazi Ladki Bahin Yojana) सुरु केली आहे. या योजनेच्या माध्यमातून २१ ते ६५ वयोवर्ष गटातील महिलांच्या बँक खात्यात दर महिन्याला १५०० रुपये जमा होणार आहेत. येत्या १४ ऑगस्टला म्हणजेच रक्षाबंधनच्या दिवशी हे पैसे महिलांना मिळणार आहेत. त्यामुळे राज्यभरातील महिलावर्गात आनंदाचे वातावरण आहे. मात्र आता लाडकी बहीण योजनेला ब्रेक लागणार का? अशा चर्चा सुरु झाल्यात कारण माझी लाडकी बहीण योजनेच्या विरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. मंगळवारी या याचिकेवर तातडीची सुनावणी होणार आहे.

मतदारांना आमिष दाखवण्याचा प्रकार- Mazi Ladki Bahin Yojana

नावेद मुल्ला (Naved Mulla) नावाच्या याचिकाकर्त्याने माझी लाडकी बहीण योजनेच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल ( Petition Against Mazi Ladki Bahin Yojana) केली आहे. विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून राज्य सरकारने ही योजना सुरु केली आहे. ही भ्रष्ट कृती असून हा मतदारांना आमिष दाखवण्याचा प्रकार आहे त्यामुळे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता थांबवण्याची मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. लाडकी बहीण योजना म्हणजे करदात्यांच्या पैशांचा अपव्यय आहे, असे याचिकाकर्त्यांनी म्हटले आहे. सामान्य जनता 28 टक्क्यांपर्यंत GST कर भरते. हे पैसे फुकट वाटण्यासाठी नाहीत असं नावेद मुल्ला यांनी आपल्या याचिकेत म्हंटल आहे. या प्रकरणातील पुढील सुनावणी मंगळवारी 6 सप्टेंबर रोजी होणार आहे. त्यामुळे सरकारची ही महत्त्वाकांक्षी योजना कायद्याच्या कचाट्यात सापडणार का? हे पाहायला हवं. असं झाल्यास राज्यभरातील महिलावर्गाला हा सर्वात मोठा धक्का असेल.

दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरून (Mazi Ladki Bahin Yojana) सरकारवर टीका केली होती. ही योजना म्हणजे जनतेची फसवणूक आहे. आता विधानसभा निवडणूक आहे पण दोन महिन्यांनी लाडक्या बहिणीला काही मिळणार नाही, असा दावा संजय राऊत यांनी केला. महायुती सरकार राज्यावर कर्जाचा डोंगर करेल आणि पळून जाईल. लाडक्या बहीण योजनेसाठी राज्य सरकारच्या तिजोरीतील पैसा वापरला जात आहे. पण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि आमदारांकडे ठेकेदार आणि जनतेकडून लुटलेले पैसे आहेत, असे म्हणत संजय राऊतांनी शिंदे सरकारवर तोफ डागली.

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार सुनील टिंगरे यांची आमदारकी धोक्यात?

sunil tingare

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अजित पवार गटाचे विद्यमान आमदार सुनील टिंगरे (Sunil Tingare) यांना चितपट करण्यासाठी अनेक इच्छुकांनी दंड थोपटलेत…. त्यात काही माजी आमदारांसह अगदीच नवख्या चेहऱ्यांनाही आपण वडगाव शेरीचे आमदार होऊ शकतो, असा कॉन्फिडन्स आलाय… अजित पवार गटात गेल्यामुळे राष्ट्रवादीची एक फळी त्यांच्या विरोधात आहेच… पण महायुतीत आल्याने भाजपच्या इच्छुकांनी लावून धरलंच तर त्यांना तिकीट मिळण्यासही बराच अडसर ठरू शकतो… मतदारसंघात टिंगरेंची ताकद असली तरी त्यांना चितपट करेल, इतकी मतदारसंघात कुणाची धमक आहे? टिंगरेंना भिडू पाहणारे वडगाव शेरीतील इच्छुक उमेदवार कोण? आणि त्यांची ताकद खरंच किती आहे? त्याचाच हा आढावा…

पुण्यातल्या पॉर्शे कार देशात गाजलं… यासोबतच एक नाव या घटनेसोबत चर्चेत आलं ते म्हणजे वडगाव शेरीचे आमदार सुनील टिंगरे यांचं… टिंगरे यांनी पोलिसांवर दबाव टाकत अल्पवयीन मुलाला वाचवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांच्यावर झाला… खरं काय खोटं काय? हा वादाचा मुद्दा… पण पोर्शे पाठोपाठ आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीतही त्यांची आमदारकी धोक्यात आल्यानं वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाचं राजकारण गरमा गरमीचं झालंय… कारण टिंगरे यांचा महायुतीत उमेदवारीसाठी तरी विचार केला जाऊ शकतो का? असा विरोधी सुर उमटत असल्याने टिंगरे यांच्या आमदारकीवर आभाळ आलंय, असं म्हणायला हरकत नाही….

वडगाव शेरीत 2014 ला भाजपच्या जगदीश मुळीक यांनी आपलं वर्चस्व सिद्ध करत पहिल्यांदाच मतदार संघात कमळ खुलवलं… यावेळेस राष्ट्रवादीने बापूसाहेब पठारे यांना उमेदवारी दिल्यामुळे नाराज सुनील टिंगरे यांनी पक्षातून बंद करत मनसेत आणि अगदी अखेरच्या क्षणी का होईना पण शिवसेनेकडून तिकीट मिळवलच… यावेळी झालेल्या चौरंगी लढतीत मुळीक जिंकले… पण राजकीय अस्थिरतेतून जाऊनही टिंगरे यांनी दुसऱ्या क्रमांकाची मतं घेतली… तर राष्ट्रवादीचे पठारे तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले… अर्थात हा राष्ट्रवादीच्या बालेकिल्लासाठी मोठा धक्का होता… पण पुढे पुन्हा 2019 च्या निवडणुकीआधी सुनील टिंगरे यांनी राष्ट्रवादीत पुन्हा प्रवेश करत तिकीट मिळवलं… दुसरीकडे युतीकडून जगदीश मुळीक होतेच.. त्यात प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात भाजपने राष्ट्रवादीचे माजी आमदार बापू पठारे यांचा पक्षप्रवेश घडवून आणला… यामुळे मुळीक पुन्हा एकदा कमळ फुलवणार अशा शक्यता असताना सुनील टिंगरे जायंट किलर ठरले… आणि राष्ट्रवादीकडून आमदार झाले…

त्यामुळे प्रत्येक टर्मला चेहरा आणि पक्ष बदलणाऱ्या वडगाव शेरीत यंदा आमदार म्हणून कुणाचा नंबर लागणार? ते पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे… टिंगरे यांच्या कार्यकाळात मतदारसंघाच्या विकासाला खिळ बसल्याचं स्थानिक जनतेचे मत आहे… त्यात राष्ट्रवादीत अजित पवार गटाला दिलेली साथ, इच्छुकांनी थोपटलेले दंड आणि पोर्श कार प्रकरणात डागळलेली इमेज यामुळे सुनील टिंगरे यांना महायुतीकडून उमेदवारी मिळेल का? याबाबत मोठं प्रश्नचिन्ह आहे… टिंगरे यांच्यासाठी सर्वात मोठा अडथळा असणार आहेत ते भाजपचे माजी आमदार जगदीश मुळीक… खरंतर पुणे लोकसभेसाठीच भाजपकडून मुळीक इच्छुक होते… त्यांनी यासाठी बरीच फिल्डिंगही लावली होती… मात्र पक्षाच्या आदेशानुसार दोन पावलं मागे घेत त्यांनी मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी प्रामाणिकपणे काम केलं… त्यामुळे आता बॅक टू विधानसभा म्हणत त्यांनी वडगाव शेरीतून पुन्हा एकदा आमदारकीसाठी काहीही झालं तरी दावा ठोकलाय…

त्यात 2009 ला राष्ट्रवादीकडून आमदार असलेले बापू पठारे सध्या भाजपात आहेत… आमदार सुपुत्र सुरेंद्र पठारे सध्या आमदारकीसाठी इच्छुक आहेत… त्यामुळे या दांडग्या आणि आपापलं राजकीय प्रभावक्षेत्र असणाऱ्या इच्छुकांची भाऊ गर्दी झाल्यामुळे तिकीट वाटपापासून ते प्रत्यक्ष निकालापर्यंत वडगाव शेरीत राजकारण घासून पाहायला मिळेल… जगदीश मुळीक यांना डावलणं अर्थात भाजपाला महाग पडू शकतं… त्यामुळे ज्याचा आमदार त्याला तिकीट… हे बोलायला जरी सोपं वाटत असलं तरी वडगाव शेरीमध्ये महायुतीसाठी मोठं किचकट असणार आहे… त्यात राष्ट्रवादीकडून शरद पवारांनीही वडगाव शेरीत विशेष लक्ष दिलय.. इच्छुकांपैकीच एकाच्या हातात तुतारी देण्याचा राष्ट्रवादीचा प्लॅन आहे… त्यामुळे जर महायुतीकडून सुनील टिंगरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला… तर वडगाव शेरीत राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी अटीतटीची लढत पाहायला मिळू शकते… विशेष करून वडगाव शेरीतून उमेदवारी कोणाला द्यायची, याची सर्वस्वी जबाबदारी सुप्रिया सुळे यांच्याच खांद्यावर असल्यानं आता ते अजित पवार गटातून की भाजपतून इनकमिंग करत निवडणुक लढवणार? की एकनिष्ठ राहिलेल्या कार्यकर्त्याला मतदारसंघातून बळ देणार? हे पहावं लागेल…

त्यामुळे सुनील टिंगरे यांचा कार्यक्रम करण्यासाठी जगदीश मुळीक, बापू पठारे, अनिल टिंगरे येणाऱ्या काळात मैदानात दिसू शकतात… त्यामुळे अपेक्षित बंडखोरी, मतांचं होणारं विभाजन, महायुतीतील अंतर्गत संघर्ष, शरद पवार गटाकडे अद्याप नसलेला तगडा उमेदवार आणि विद्यमान आमदारांच्या अंगलट आलेली प्रकरण हे सगळं प्लस करून पाहिलं तर वडगाव शेरीचा यंदाचा निकाल हा अनप्रेडिक्टेबल आणि अनपेक्षित वळण घेणारा असेल, हे वेगळ्या शब्दात सांगायला नको… बाकी तुम्हाला काय वाटतं? वडगाव शेरीतून यंदाचा आमदार कोण असेल? टिंगरे, मुळीक, पठारे की आणखी कुणी? वडगाव शेरी चा बालेकिल्ला यंदा कोणत्या राष्ट्रवादीकडे राहील? तुमचं याबद्दलचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा

शिरोळमध्ये ट्रॅक्टरची ट्रॉली झाली पलटी; पुराच्या पाण्यात 2 लोक बेपत्ता

Shirol Incident

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे. परंतु या पावसामध्ये अनेक दुर्घटना होताना देखील आपण गेल्या काही दिवसांपासून पाहत आहोत. अशातच एक दुर्घटना आता शिरोळ तालुक्यामध्ये घडलेली आहे. ती म्हणजे गावात वाहतूक मार्गावर ट्रॅक्टरची ट्रॉली महापुराच्या पाण्याच्या वेगाने पलटी झालेली घटना समोर आलेली आहे.

या घटनेमध्ये ट्रस्टच्या ट्रॉलीमध्ये गावचे सरपंच पती सुहास पाटील हे होते. त्यांच्यासह इतर दोन गंभीर दोघांना गंभीर दुखावत झाल्याची माहिती समोर आलेली आहे. एकूण 8 जण होते त्यातील 5 जण सुखरूप आहेत तर दोन जण पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून गेलेली गेल्याची माहिती समोर आलेली आहे. त्या दोघांनाही शोधण्याचे शोध कार्य चालू आहे. परंतु अजूनही त्या दोघांची काहीच माहिती लागलेली नाही.

ट्रॅक्टर चालकाचा ताबा सुटल्याने ट्रॉली पलटी

या ठिकाणी एनडीआरएफचा पथक देखील तैनात केलेले आहे. आणि पाण्यात वाहून गेली. त्या दोन लोकांना शोधण्याचे कार्य देखील चालू झालेले आहे. शिरोळ तालुक्यातील अकिवाट या गावात ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठ्याची मोटर सुरू करण्यासाठी आणि शेतात कामासाठी जाण्यासाठी ट्रॅक्टरचे ट्रॉलीमध्ये आठ जण होते. परंतु यावेळी चालकाला पाण्याचा अंदाज आला नाही. आणि त्याचा ताबा सुटल्याने ट्रॉली घसरून पलटी झाली. या ट्रॉलीत एकूण 7 जण होते त्यातील पाच जण पाण्याच्या प्रवाहात पोहून एका बाजूला झाले. परंतु यामध्ये सरपंच पती सुहास पाटील यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. तर इतर दोन लोकांचा अजूनही शोध लागलेला नाही. त्यांची शोध मोहीम चालू आहे.

Air India Express : 2 हजार रुपयांच्या आत करा विमान प्रवास ; एअर इंडिया एक्सप्रेसचा खास “Freedom Sale”

Air India Express : 15 ऑगस्ट म्हणजेच भारतीय स्वातंत्र्यदिन अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. यंदाचा हा 77 वा स्वातंत्र्यदिन असणार आहे. यानिमित्ताने देशभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. एवढेच नाही तर ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट सह सर्वत्र काही ना काही ऑफर्स सुरु होतात. याचप्रकारे स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने टाटाच्या एअर इंडिया एक्सप्रेसने फ्रीडम सेल (Air India Express) सुरू केला आहे. या सेल अंतर्गत तुम्ही केवळ २००० रुपयांच्या आत विमान प्रवास सुरु करू शकता. चला तर मग जाणून घेऊया या ऑफर बद्दल…

15 आंतरराष्ट्रीय आणि 32 देशांतर्गत उड्डाणांचा समावेश

म्हणजेच एअर इंडिया एक्सप्रेसचे सुरुवातीचे भाडे 1947 रुपये असेल. या ऑफर चा कालावधी मर्यादित असून तुम्ही केवळ 30 सप्टेंबर 2024 पर्यंत या ऑफर चा लाभ घेउ शकता. एअर इंडियाची ही ऑफर देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय दोन्ही (Air India Express) ठिकाणांसाठी आहे. यामध्ये दिल्ली-जयपूर, बेंगळुरू-गोवा आणि दिल्ली-ग्वाल्हेर सारख्या लोकप्रिय मार्गांचा देखील समावेश आहे. एअर इंडिया एक्सप्रेस ही ऑफर 15 आंतरराष्ट्रीय आणि 32 देशांतर्गत उड्डाणांसाठी देत ​​आहे.

झिरो चेक-इन बॅगेज (Air India Express)

या कालावधीत प्रवासी एक्सप्रेस लाईटच्या सुविधेचा सुद्धा आनंद घेऊ शकतात. यासाठी प्रवाशांना विमान कंपनीच्या वेबसाइटवरून तिकीट बुक करावे लागेल. या अंतर्गत, तुम्ही झिरो चेक-इन बॅगेज शुल्काचा लाभ घेऊ शकता. एक्सप्रेस लाइटच्या (Air India Express) भाड्यांमध्ये कोणतेही शुल्क न घेता अतिरिक्त 3 किलो केबिन बॅगेजची प्री-बुकिंग करण्याचा पर्याय आणि देशांतर्गत फ्लाइटसाठी 15 किलोसाठी 1000 रुपये आणि आंतरराष्ट्रीय फ्लाइटसाठी 20 किलोसाठी 1300 रुपये सवलतीचे चेक-इन बॅगेज शुल्क यामध्ये समाविष्ट आहे.

नेहमी प्रवास करणाऱ्यांकरिता अतिरिक्त सवलत (Air India Express)

त्याच वेळी, एअर इंडियाच्या नेहमीच्या सदस्यांना अतिरिक्त सवलत मिळेल. लॉयल्टी सदस्य एअर इंडियाच्या वेबसाइटवरून (Air India Express) केलेल्या तिकीट बुकिंगवर ८% पर्यंत न्यूकॉइन मिळवू शकतात. याशिवाय, तुम्ही ॲड-ऑन पॅकवर बिझ आणि प्राइम सीट, गरम जेवण, थंड पेय आणि मिठाईचा आनंद घेऊ शकता. विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, डॉक्टर, परिचारिका आणि सशस्त्र दलाचे सदस्य (आणि त्यांचे आश्रित) देखील या सवलतीचा लाभ घेऊ शकतात.