Monday, December 22, 2025
Home Blog Page 559

Viral Video | रीलसाठी तरुणाने रेल्वेरुळावर बांधला चक्क जिवंत कोंबडा; व्हिडिओ पाहून भरेल धडकी

Viral Video

Viral Video | सोशल मीडियावर रोज नवनवीन कंटेंटचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. आणि आजकाल लोक सोशल मीडियावर प्रसिद्ध मिळवण्यासाठी काहीही करायला तयार झालेले आहेत. अगदी लाईक मिळवण्यासाठी आणि व्ह्यूज वाढण्यासाठी कोणतेही धोकादायक कृत्य करायला देखील ते मागेपुढे पाहत नाहीये. सध्या असाच एक वेळेस सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये (Viral Video) एक तरुण रेल्वे रुळावर चक्क धोकादायक स्टंट करताना दिसत आहे. जो पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल.

व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये एक तरुण मुलगा रेल्वे अपघात घडवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, हा तरुण रेल्वे रुळावर सायकल ठेवत आहे. त्यानंतर त्यावर तो काही दगड ठेवतो. आणि काही वेळाने लहान गॅस सिलेंडर देखील रूळावर ठेवल्यास दिसत आहे. इथपर्यंत या गोष्टी खूप धोकादायक होत्या. परंतु त्याने पुढे असे कृत्य केले की ज्यामुळे सगळ्यांनाच धक्का बसेल.

या सगळ्या गोष्टी त्याने रुळावर ठेवल्यानंतर त्याने चक्क जिवंत कोंबडा त्या रेल्वेवर ठेवला. रेल्वे रुळावर त्याने जिवंत कोंबडा बांधला आणि रेल्वेची वाट पाहताना दिसत आहे. सध्या सोशल मीडियाच्या अनेक अकाउंटमधून हा व्हिडिओ व्हायरल झालेला दिसत आहे. याआधी देखील त्याने सोशल मीडियावर अनेक असे धोकादायक एक व्हिडिओ शेअर केलेले आहे.

या तरुणाचे नाव गुलजार शेख असे आहे. तो यूपीतील आहे. तो सध्या युट्युबर आहे आणि youtube द्वारे पैसे मिळवण्यासाठी तो रेल्वे रुळावर अशा घातक गोष्टी ठेवत असतो. आणि प्रवाशांचा जीव धोक्यात घालत असतो. त्यामुळे आता त्याच्यावर लवकरात लवकर कारवाई व्हावी असे देखील म्हणण्यात आलेले आहे. अनेक लोक सोशल मीडियावर त्याच्या या व्हिडिओवर संताप व्यक्त करत आहेत. त्याच्या फेमस होण्यासाठी अनेक गोष्टी तो करताना दिसत आहेत. आणि अशा गोष्टींना आळा घातला पाहिजे असे देखील लोक म्हणत आहेत.

देशपांड्या, चिल्या, खोपकर यांची औकात काय? अमोल मिटकरींचा हल्लाबोल

amol mitkari on mns leaders

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यातील वाद आता विकोपाला गेला आहे. अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर टीका केल्यानंतर मनसे नेत्यांनी मिटकरींवर हल्लाबोल केला होता. त्यांची गाडीही फोडण्यात आली. अमोल मिटकरी जर राज ठाकरेंना आणखी काय बोलला तर त्याला कपडे काढून मारणारा असा सज्जड दम अमेय खोपकर यांनी दिला. तसेच संदीप देशपांडे आणि योगेश चिले यांनीही अजितदादा आणि अमोल मिटकरी यांच्यावर विखारी टीका केली होती. आता या सर्वाना अमोल मिटकरी यांनीही जशाच तस उत्तर दिले आहे. देशपांड्या, चिल्या, खोपकर यांची औकात काय? बायको तरी घरात विचारते का? असं म्हणत त्यांनी जहरी वार केला आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना अमोल मिटकरी म्हणाले, मनसे हा पक्ष पळपुट्यांचा, सोंगाड्यांचा आहे. सुपारीबाज, गुंडशाही, झुंडशाही आणि बेवडेशाही असलेल्यांचा हा पक्ष आहे. देशपांड्या, चिल्या, खोपकर यांची औकात काय? घरात बायको इज्जत देत नाय आणि हे अजित पवारांवर भुंकायला लागलेत. अरे, चिल्या तुझे दुधाचे ओठ सुकलेले नसतील. बेट्या, जर अजितदादांनी तुझ्या राज ठाकरेने टीका करण्यास सुरुवात केली ना तर तुमच्या अंडरपॅन्ट शिल्लक राहणार नाहीत, लक्षात ठेव असा इशारा अमोल मिटकरी यांनी दिला.

योगेश चिले नेमकं काय म्हणाले होते?

शरद पवार कोर्टात केस जिंकले, तर अजितदादांना कटोरा घेऊन फिरावं लागेल, माझ्या पक्षाला नाव द्या, चिन्ह द्या करत… दुसर्याकडून भिकेने मिळालेल्या पक्षाच्या जीवावर जास्त उडू नका . अमोल मिटकरी, तुला पण जी विधान परिषद मिळालेली आहे ना ती सुद्धा शरद पवारांना भीक मागूनच मिळालेली आहे. त्यामुळे कधीतरी उभा रहा आणि जिंकून येऊन दाखव असे आव्हान योगेश चीले यांनी अमोल मिटकरी याना दिले. तसेच तुझ्या दादामध्ये जर हिम्मत असेल तर सगळे आमदार बाजूला ठेव, भाजपला बाजूला ठेव, शिंदेला बाजूला ठेव आणि सर्वसामान्य तरुणांना आमदार बनवून दाखव बघू किती यशस्वी होतोय असं म्हणत चीले यांनी अजित पवारांवरही निशाणा साधला होता.

Mumbai Sea Level Rise | 2040 पर्यंत मुंबईचा 10 टक्के भाग समुद्राच्या पाण्याखाली जाणार; तज्ज्ञांनी व्यक्त केली चिंता

Mumbai Sea Level Rise

Mumbai Sea Level Rise | यावर्षी जुलै महिन्यात दरवर्षीपेक्षा खूप जास्त पाऊस पडला. आणि यामुळे समुद्राच्या पाणी पातळीत देखील मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसून येत आहे. परंतु जर आता या समुद्राच्या पाण्याच्या पातळी जास्त वाढ झाली, तर मुंबई शहराला याचा खूप मोठा धोका बसू शकतो. अशी भीती अनेकजण व्यक्त करत आहेत. जर समुद्राच्या पाण्याची पातळी (Mumbai Sea Level Rise) ही त्याच क्षमतेने वाढत राहिली, तर मुंबईचा जवळपास 10 टक्के भाग हा पाण्याखाली जाईल, असा देखील अंदाज व्यक्त केला जात आहे. मुंबईसोबत पणजी आणि चेन्नईला देखील हा धोका आहे.

याबाबत एक अभ्यास करण्यात आलेला आहे आणि या अभ्यासात समुद्रकिनारी असलेल्या देशातील जवळपास 15 शहरांना धोका असल्याचे सांगितलेले आहे. आणि त्या शहरांची सविस्तर माहिती देखील दिलेली आहे. यामध्ये मुंबई, चेन्नई, मंगळुरू, कोची, विशाखापटनम, कोझिकोड हल्दीया, कन्याकुमारी, पणजी, पुरी, उडपी, पारादीप, तुतुकुडी यांचा समावेश आहे.

सध्या हवामान बदल आणि पावसाची क्षमता जास्त असल्याने समुद्राच्या पाण्याच्या पातळीत देखील मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसत आहे. त्यामुळे आता 2040 पर्यंत मुंबईच्या जवळपास 10 टक्के भाग हा पाण्याखाली जाणार आहे. अशी देखील माहिती सांगण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे या पाण्याच्या वाढत्या पातळीमुळे 2040 पर्यंत मुंबई पुद्देचेरीतील यानम आणि तमिळनाडूमधील तुतुकुडी मधील 10 टक्के पेक्षा अधिक जमीन ही पाण्याखाली जाऊ शकते.त्याचप्रमाणे चेन्नई मधील देखील पाच ते दहा टक्के जागा ही पाण्याखाली जाण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.

2040 च्या शेवटपर्यंत या शहरांमधील पाण्याची पातळी वाढणार असल्याचा धोका देखील वर्तवण्यात आलेला आहे. त्यामुळे समुद्राच्या आजूबाजूला असणारी लोक यांना देखील हा धोका निर्माण होऊ शकतो. सध्या पश्चिम बंगालमधील हलदीया समुद्राच्या पातळीत ही 2.726 सेंटीमीटर एवढी वाढ झालेली आहे. त्याचप्रमाणे विशाखापटनम मध्ये 2.381 cm कोचीमध्ये 2.213 सेंटीमीटर पारादीपमध्ये 0.717 सेंटीमीटर आणि चेन्नई मधील समुद्र पातळी 0.679 मीटर एवढी वाढ नोंद करण्यात आलेली आहे

अशाप्रकारे निवडा तुमच्या आवडीचा BSNL मोबाईल नंबर; या स्टेप्स फॉलो करा

BSNL favourite Mobile Number

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Jio, Airtel आणि Vodafone या देशातील आघाडीच्या टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या मोबाईल रिचार्जच्या किमतीत भरमसाठ वाढ केल्यानंतर सर्वसामान्य ग्राहक मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे पैसे वाचवण्यासाठी अनेक ग्राहकांनी देशी टेलिकॉम कंपनी BSNL ची वाट धरली आहे. मागील महिन्यापासून अनेक ग्राहकांनी नवीन बीएसएनएलचे सिमकार्ड खरेदी केलं आहे तर काही जणांनी आपलं Jio, Airtel आणि Vodafone चे सिमकार्ड बीएसएनएल मध्ये पोर्ट केलं आहे. बीएसएनएलचे रिचार्ज प्लॅन हे तुलनेनं खूपच स्वस्त असल्याने सर्वसामान्य ग्राहकांना चांगलंच परवडत आहे. यामुळेच कंपनी देशभरात आपल्या सेवांचा विस्तार करत आहे आणि विशेषतः 4G सेवांचे नेटवर्क वाढवत आहे.

अशावेळी जर तुम्ही सुद्धा रिचार्जच्या वाढत्या किमतीने वैतागून BSNL चे नवीन सिमकार्ड घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी हि बातमी अतिशय उपयुक्त आहे. कारण कंपनी आता आपल्याला हवा तो आवडीचा मोबाईल नंबर निवडण्याची संधी देत आहे. म्हणजेच तुम्हाला जो मोबाईल नंबर हवा आहे तो तुम्ही घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. चला तर याबाबत आम्ही तुम्हाला स्टेप बाय स्टेप माहिती देतो.

या स्टेप फॉलो करा –

सर्वात आधी तुम्हाला Google वर जाऊन ‘BSNL Choose Your Mobile Number’ वर जावे लागेल.
यानंतर ‘cymn’ लिंकवर क्लिक करा.
येथे तुम्हाला तुमचा झोन निवडावा लागेल.म्हणजेच तुम्ही कोणत्या ठिकाणी राहता किंवा तुमचा झोन कोणता ते टाका.
आता ‘Fancy Number’ वर क्लिक करा आणि तुमच्या आवडीचा मोबाईल क्रमांक निवडा.
पसंतीच्या क्रमांकानंतर तुम्हाला ‘रिझर्व्ह नंबर’चा पर्यायही दिला जातो. तुम्ही हा पर्याय सुद्धा निवडू शकता.
आता तुमचा सध्याचा नंबर टाकून OTP मिळवा आणि त्याठिकाणी टाका
पसंतीचा क्रमांक निवडल्यानंतर, तुम्हाला सिम घेण्यासाठी बीएसएनएल स्टोअरमध्ये जावे लागेल.

दरम्यान, टाटा समूहाची आघाडीची आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्विसने BSNL सोबत 1500 कोटी रुपयांचा 4G नेटवर्कचा करार केलेला आहे. या करारा अंतर्गत TCS आणि BSNL या दोन कंपन्या मिळून 4G नेटवर्क सर्विस 1000 गावापर्यंत घेऊन जाणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील ग्राहकांना सुद्धा फास्ट इंटरनेट सेवेचा लाभ घेता येणार आहे. टाटा आणि BSNL यांच्या करारामुळे BSNL ची 4G इंटरनेट सेवा आणखी मजबूत होणार आहे. आतापर्यंत Jio आणि Airtel सारख्या दूरसंचार कंपन्यांचे 4G नेटवर्कवर वर्चस्व होते, परंतु BSNL च्या या करारामुळे जिओ आणि एअरटेलच टेन्शन वाढण्याची चिन्हे आहेत.

Punjab National Bank | पंजाब नॅशनल बँकेने ग्राहकांना दिली भेट! FD व्याजदरात केली एवढी वाढ

Punjab National Bank

Punjab National Bank | पंजाब नॅशनल बँक सार्वजनिक क्षेत्रातील एक मोठी बँक आहे. ही बँक त्यांच्या ग्राहकांसाठी नेहमीच नवनवीन योजना त्याचप्रमाणे संधी घेऊन येत असतात. आता देखील पंजाब नॅशनल बँकेने त्यांच्या करोडो ग्राहकांसाठी एक चांगली बातमी आणलेली आहे. 1 ऑगस्ट पासून या बँकेचे अनेक नियम बदललेले आहेत. पंजाब नॅशनल बँक (Punjab National Bank) त्यांच्या ग्राहकांना एफडीवर (FD) खूप चांगले व्याजदर देते. आता त्यांच्या हे व्याजदर बदल झालेले आहेत. पंजाब नॅशनल बँक सामान्य नागरिकांना 7 दिवसापासून ते 10 वर्षापर्यंतच्या एफडीची सुविधा देत असते. त्याचप्रमाणे आता पंजाब नॅशनल बँकेने त्यांच्या सामान्य नागरिकांना त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांच्या एफडीवरील व्याजदरात मोठ्या प्रमाणात वाढ केलेली आहे. आता ते व्याजदर नक्की कसे आहे? हे आपण जाणून घेणार आहोत.

बँकेचे FD दर | Punjab National Bank

  • 15 दिवस ते 29 दिवस: सामान्य लोकांसाठी – 3.50 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 4 टक्के
  • 30 दिवस ते 45 दिवस : सामान्य लोकांसाठी – 3.50 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 4 टक्के
  • ४६ दिवस ते ६० दिवस: सामान्य लोकांसाठी – 4. 50 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 5 टक्के
  • 61 दिवस ते 90 दिवस: सामान्य लोकांसाठी – 4.50 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 5 टक्के
  • 91 दिवस ते 179 दिवस: सामान्य लोकांसाठी – 4.50 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 5 टक्के
  • 180 दिवस ते 270 दिवस: सामान्य लोकांसाठी – 6.25 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 6.75 टक्के
  • 271 दिवस ते 299 दिवस: सामान्य लोकांसाठी – 6.50 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 7 टक्के
  • 300 दिवस: सामान्य लोकांसाठी – 7.05 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 7.55 टक्के
  • 301 दिवस ते 1 वर्षापेक्षा कमी: सामान्य लोकांसाठी – 6.50 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 7 टक्के
  • 1 वर्ष: सामान्य लोकांसाठी – 6.80 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 7.30 टक्के
  • 1 वर्ष ते 399 दिवसांपेक्षा जास्त: सामान्य लोकांसाठी – 6.80 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 7.30 टक्के
  • 400 दिवस: सामान्य लोकांसाठी – 7.25 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 7.75 टक्के
  • 400 ते 2 वर्षे: सामान्य लोकांसाठी – 6.80 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 7.30 टक्के
  • 2 वर्ष ते 3 वर्षांपेक्षा जास्त: सामान्य लोकांसाठी – 7.00 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 7.50 टक्के
  • 1204 दिवस : सामान्य लोकांसाठी – 6.40 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 6.90 टक्के
  • 1895 दिवस : सामान्य लोकांसाठी – 6.35 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 6.85 टक्के
    5 वर्षे ते 10 वर्षे: सामान्य लोकांसाठी – 6.50 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 7.30 टक्के.

Crop Insurance | राज्यातील पिकविम्याची अर्ज प्रक्रिया पूर्ण; तब्बल 1 कोटी 65 लाख 70 हजार 437 शेतकऱ्यांनी केली नोंदणी

Crop Insurance

Crop Insurance | सरकारकडून शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवल्या जातात. त्यातीलच एक महत्त्वाची आणि फायद्याची योजना म्हणजे प्रधानमंत्री पिक विमा योजना. (Crop Insurance) या योजनेअंतर्गत जर नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले, तर त्याची आर्थिक भरपाई सरकारकडून शेतकऱ्यांना मिळत असते. अशातच आता खरीप हंगाम 2024 च्या पीक विमा भरण्याची अंतिम तारीख उलटून गेलेली आहे. 31 जुलै 2024 ही पीक विमा भरण्याची शेवटची तारीख होती. त्यामुळे आता 31 जुलै पर्यंत राज्यातून जवळपास 1 कोटी 65 लाख 70 हजार 437 पिक विमा अर्ज शेतकऱ्यांकडून दाखल झालेले आहे. या पिक विमासाठी शेतकऱ्यांना केवळ एक रुपया विमा हप्ता भरायचा आहे. त्यामुळे त्यांचे पीक विमा संरक्षण केले जाते. याची माहिती देखील राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी दिली आहे.

31 जुलै पर्यंत केलेली मुदतवाढ | Crop Insurance

प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत पिक विमा भरण्याची शेवटची तारीख ही 15 जुलै ही ठेवण्यात आलेली होती. परंतु अनेक तांत्रिक अडचणी आले आणि शेतकऱ्यांना पिक विमा भरता आला नाही. यामुळेच कृषीमंत्र्यांनी केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंग चव्हाण यांना विनंती करून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी पिक विमा भरण्याची मुदत वाढ 31 जुलै पर्यंत करण्यात आलेली होती. 15 जुलै पर्यंत महाराष्ट्रातील 21 लाख 90 हजार अर्जांची दाखल झालेले होते. परंतु आता अनेक शेतकऱ्यांनी हा पीक विमा भरलेला आहे. जवळपास राज्यातील 97% खरीप हंगामातील पेरणी देखील पूर्ण झालेली आहे.

मागील वर्षी म्हणजे 2023 मध्ये खरीप हंगामामध्ये पिक विमासाठी शेतकऱ्यांचे राज्यातून जवळपास 1 कोटी 71 लाख विमा अर्ज दाखल झाले होते. त्यानंतर या संपूर्ण हंगामा शेतकऱ्यांचे नैसर्गिक आपत्तीमुळे जे काही नुकसान झाले. त्यामध्ये शेतकऱ्यांना जवळपास 7280 कोटी रुपये मंजूर झाले होते. आणि त्यातील 4271 कोटी रुपयांचे वाटप देखील करण्यात आलेले होते.

Satara Tourism Places : राज्यातील ‘ही’ पर्यटनस्थळे 5 ऑगस्टपर्यंत बंद; पहा कोणकोणत्या ठिकाणाचा समावेश

Satara Tourism Places

Satara Tourism Places । राज्यात पावसाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. अनेक ठिकाण वरुणराजा जोरदार बरसत असून सर्वसामान्य माणसाचे जनजीवन विस्कळीत झालं आहे. नद्या- नाले ओसंडून वाहत आहेत. तर अनेक सखल भागातही पाणी साचत असून नागरिकांना सुरक्षित ठिकाणी पोच करण्यात येत आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात खास करून पावसाचा जोर आणखी वाढला आहे. याच पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून सातारा जिल्ह्यातील काही प्रमुख पर्यटन स्थळांवर जाण्यास 5 ऑगस्टपर्यंत बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे तुम्हीही जर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर त्यापूर्वी हि बातमी वाचा…

हवामान विभागाने 1 ते 5 ऑगस्ट 2024 पर्यंत सातारा जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीचा रेड व ऑरेंज अलर्टचा इशारा दिला आहे. साताऱ्यात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी होत असून घाट क्षेत्रात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व पर्यटनस्थळांच्या ठिकाणी (Satara Tourism Places) कोणतीही अनुचित घटना घडू नये तसेच जिवीत व वित्तहानी होऊ नये या करिता सर्व पर्यटनस्थळे पर्यटकांसाठी तात्पुरते स्वरुपात बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी आज दिले आहेत. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं.

कोणकोणत्या पर्यटनस्थळांवर जाण्यास बंदी? Satara Tourism Places

जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिलेल्या आदेशानुसार सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील- लिंगमळा व भिलार धबधबा तसेच सर्व पर्यटनाचे पॉइंट, पाटण तालुक्यातील – ओझर्डे (नवजा) व सडावाघापूर धबधबा, सातारा तालुक्यातील- ठोसेघर, केळवली, वजराई-भांबवली धबधबे व कास तलाव तसेच जावली तालुक्यातील- ऐकीव या धबधब्यांच्या ठिकाणी जाण्यास बंदी आहे. मान्सून कालावधीत वर्षाविहारासाठी मोठ्या प्रमाणात याठिकाणी पर्यटक येत असतात. मात्र सदर धबधब्यांच्या ठिकाणी 02/08/2024 ते 04/08/2024 अखेर जाण्यास मनाई आहे. सदर ठिकाणी जाणारे मार्ग / रस्ते बंद करण्यात आलेत. पोलीस विभाग व संबंधीत गावातील वन हक्क समितीने धबधब्याच्या ठिकाणी पर्यटक जाणार नाहीत तसेच सदर ठिकाणी कोणतीही अनुचित घटना घडू नये याबाबत दक्षता घ्यावी. पर्यटन स्थळी आवश्यकतेनुसार पोलीस बंदोबस्त नेमण्यात यावा व आवश्यक त्या ठिकाणी पेट्रोलिंग करावे. पोलीस बंदोबस्तासाठी आवश्यकतेनुसार होमगार्ड विभागाची मदत घेण्यात यावी. आवश्यकता भासलेस नियमांचा भंग करणा-या विरुध्द आवश्यक ती कठोर कारवाई करावी, असे आदेश देखील जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

Foods Prevent Cancer | कॅन्सरपासून वाचण्यासाठी रोज आहारात करा या पदार्थांचा समावेश; होतील अनेक फायदे

Foods Prevent Cancer

Foods Prevent Cancer | आजकाल लोकांची जीवनशैली मोठ्या प्रमाणात बदलत चाललेली आहे. त्यामुळे नवनवीन आजार देखील लोकांना होत आहे. त्यात कॅन्सर (cancer) हा एक जीवघेणा आजार आजकाल मोठ्या प्रमाणात पसरताना दिसत आहे. अनेक वेगवेगळ्या प्रकारचे कॅन्सर लोकांना होतात. जगभरात अनेक लोकांचा एक कॅन्सरमुळे मृत्यू देखील होताना दिसत आहे. त्यामुळे हा कॅन्सल हा रोग अत्यंत गंभीर असे रूप धारण करताना दिसत आहे. कर्करोगाच्या पेशी शरीरातील वेगवेगळ्या अवयवांवर घात करतात. आणि लोक कॅन्सरला बळी करतात. परंतु यावेळी जर तुम्ही तुमचे जीवनशैली योग्य ठेवली आणि योग्य पदार्थांचा (Foods Prevent Cancer) आहारात समावेश केला जर तुम्ही कर्करोग्याच्या धोकापासून काही प्रमाणात बचावू शकता. आज आपण या लेखांमध्ये असे काही पदार्थ जाणून घेणार आहोत. ज्यामुळे तुम्ही कॅन्सर पासून थोडे लांब राहाल.

ग्रीन टी | Foods Prevent Cancer

सामान्यतः वजन कमी करण्यासाठी वापरला जाणारा ग्रीन टी कॅन्सरपासून बचाव करण्यासाठी देखील उपयुक्त ठरतो. ग्रीन टीमध्ये कॅटेचिन नावाचे अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असते, जे पेशींचे नुकसान टाळण्यास मदत करतात. नियमितपणे ग्रीन टी प्यायल्याने स्तन, प्रोस्टेट आणि कोलोरेक्टल कर्करोगासह विविध कर्करोग होण्याचा धोका कमी होऊ शकतो.

टोमॅटो

टोमॅटोचा वापर जवळपास प्रत्येक डिशमध्ये केला जातो. जेवणाची चव वाढवण्यासोबतच याचा तुमच्या आरोग्यालाही फायदा होतो. त्यात शक्तिशाली लाइकोपीन अँटीऑक्सिडंट आहे, जो त्याच्या लाल रंगासाठी जबाबदार आहे. हार्वर्ड स्कूल ऑफ पब्लिक हेल्थच्या अभ्यासानुसार, आठवड्यातून दोन किंवा अधिक टोमॅटो-आधारित पदार्थ खाल्ल्याने प्रोस्टेट कर्करोगाचा धोका 30% कमी होतो.

​लसूण

लसूण हे एक शक्तिशाली अन्न आहे जे कर्करोगाशी लढण्यास मदत करू शकते. त्यात ॲलिसिनसारखे सल्फर संयुगे असतात, ज्यात कर्करोगविरोधी गुणधर्म असतात. ही संयुगे कर्करोगाच्या पेशींची वाढ थांबवून कर्करोग टाळण्यास मदत करू शकतात.

बीन्स

फायबरचा उत्कृष्ट स्त्रोत असल्याने, बीन्स कर्करोग प्रतिबंधासाठी एक उत्तम अन्न असल्याचे सिद्ध होते. अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशनमध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासात असे आढळून आले आहे की उच्च फायबरयुक्त पदार्थांमुळे कोलोरेक्टल कर्करोग होण्याचा धोका कमी होतो.

​हळद | Foods Prevent Cancer

हळदीमध्ये कर्क्युमिन, शक्तिशाली विरोधी दाहक आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म असलेले एक संयुग असते. कर्क्युमिन स्तन, आतडी, पोट आणि त्वचेच्या कर्करोगासह विविध प्रकारच्या कर्करोगाच्या पेशींच्या वाढीस प्रतिबंध करू शकते.

महिला बॉक्सरविरुद्ध पुरुषाची लढत? पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खळबळ

imane khelif vs angela carini

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संपूर्ण जगाचे लक्ष्य असलेल्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये (Paris Olympics 2024) मोठी खळबळजनक घटना घडली आहे. 1 ऑगस्ट रोजी झालेल्या महिलांच्या 66 किलो वजनी गटाच्या लढतीवरून नव्या वादाला तोंड फुटलं आहे. इटलीची अँजेला कॅरिनी आणि अल्जेरियाची इमान खलीफ (imane khelif vs angela carini) यांच्यात हा सामना सुरु झाला मात्र अँजेलाने अवघ्या 46 सेकंदात या सामन्यातून माघार घेतली. यामुळे अल्जेरियन बॉक्सर इमान खलीफला विजेता घोषित करण्यात आले. मात्र अँजेलाच्या माघारीचे खरं कारण आहे ते म्हणजे इमान खलीफच्या ‘लिंग तपासणी संदर्भात.. कारण इमान खलीफच्या शरीरात टेस्टोस्टेरॉन हार्मोनचे प्रमाण असामान्य असल्याने तिची लिंग तपासणी यशस्वी ठरली होती. यामुळेच तिला 2023 च्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमधून ‘अपात्र’ करण्यात आले होते,तरीही ऑलिम्पिक सारख्या स्पर्धेत तिला संधी मिळालीच कशी असा प्रश्न निर्माण होतोय.

कॅरिनी आणि खलीफ यांच्यात थोडाच वेळ सामना झाला. दोघीनी एकमेकींना पंच मारले, मात्र अँजेला कॅरिनीने मध्येच डाव सोडला. त्यानंतर कॅरिनीने खलिफचा हस्तांदोलन करण्यासही नकार दिला आणि खेळाचं रिंगणातच ती ओक्साबोक्शी रडू लागली. मला कधीच इतके कठोर मुक्रे मारले गेले नव्हते. मी नेहमीच माझ्या देशाचा सन्मान केला आहे. यावेळी मी यशस्वी झाली नाही, कारण मी यापुढे लढू शकत नाही. मला माझ्या नाकात तीव्र वेदना होऊ लागल्या. त्यामुळे मला माघार घ्यावी लागली, असं अँजेला कॅरिनीने सांगितले.

दरम्यान, या संपूर्ण घडामोडीनंतर सोशल मीडियावर जेला कॅरिनीच्या समर्थनार्थ चाहते उभे राहिलेत. तसेच ऑलिम्पिकच्या एकूण नियोजनावरही सडकून टीका केली जात आहे. एका महिलेसमोर पुरुषाला का उभे केले, असा प्रश्न सोशल मीडियावर उपस्थित केला जात आहे. गेल्या वर्षी नवी दिल्लीत झालेल्या महिलांच्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये इमाने ही टेस्टोस्टेरॉन आणि जेंडर एलिजिबीलिटी टेस्ट मध्ये अपात्र ठरली होती. त्यामुळेच तिला स्पर्धेतून बाद ठरवण्यात आले होते. असे असूनही ऑलिम्पिकमध्ये तिला सहभागी होण्याची परवानगी का देण्यात आली? अशी चर्चा निर्माण झाली आहे. इटलीच्या पंतप्रधान ज्योर्जिया मेलोनी यांनीही या वादात उडी घेत म्हंटल कि, ज्या खेळाडूंमध्ये पुरुष अनुवांशिक वैशिष्ट्ये आहेत त्यांना महिलांच्या स्पर्धांमध्ये प्रवेश देऊ नये असं मत व्यक्त केलं. या सामन्यानंतर #IStandWithAngelaCarini सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे.

राहुल गांधीच्या ट्विटने देशभरात खळबळ!! म्हणाले, आतल्या गोटातून समजतंय की…

rahul gandhi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेस खासदार आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केंद्रातील मोदी सरकारवर मोठा आरोप केला आहे. मी संसदेत चक्रव्यूहावर केलेलं भाषण दोघांमधील एकाला आवडलं नाही, आणि त्यामुळे आपल्यावर ईडी कारवाई करण्यात येणार असल्याचे राहुल गांधी यांनी म्हंटल. तसेच मी यासाठी तयार सुद्धा असेही असेही त्यांनी सांगितलं. याबाबत राहुल गांधी यांनी ट्विट केलं आहे. त्यांच्या या ट्विटनंतर संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. तसेच खरच राहुल गांधी यांच्यावर ईडीची कारवाई होणार का? ते आता पाहायला हवं.

राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी संसदेत जोरदार भाषण करत मोदी शहांसह संपूर्ण भाजपवर हल्लाबोल केला होता. २१ व्या शतकात नवं चक्रव्यूह असून कमळाच्या आकाराचे आहे. त्याचं चित्र पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या छातीवर लावून चालतात. ज्या चक्रव्यूहात अभिमन्यूला अडकवलं होतं. तिथे आता देशातील जनता आहे. देशातील युवा, शेतकरी, माता-भगिनी, लघु-मध्यम उद्योजक हे त्या चक्रव्यूहात अडकले आहेत. महाभारतातील चक्रव्यूहात ६ जण होते, द्रोणाचार्य, कर्ण, कृपाचार्य, क्रूतवर्मा, अश्वधामा आणि शकुनी नियंत्रित करत होते. आजही ६ लोक आहेत ज्यात नरेंद्र मोदी, अमित शाह, मोहन भागवत, अजित डोवाल आणि अंबानी-अदानी आहेत असा आरोप राहुल गांधींनी केला होता. त्यानंतरच आता आपल्यावर ईडीची कारवाई होणार आहे अस राहुल गांधी यांनी सांगितलं.

राहुल गांधींनी ट्विट करत म्हंटल, दोघांपैकी एकाला माझे चक्रव्यूहचे भाषण आवडले नाही. ईडीमधील आतील गटाने मला सांगितले की, तुमच्यावर छापेमारी केली जाणार आहे. त्यासंदर्भात योजना तयार केली जात आहे. मी तयार आहे. ईडीची वाट पाहत आहे. चहा आणि बिस्कीटे माझ्याकडून.. राहुल गांधी यांच्यावर खरोखरच ईडीची कारवाई होणार का? नेमक्या कोणत्या प्रकरणात हि कारवाई होईल यावरून चर्चाना उधाण आलं आहे.