Monday, December 22, 2025
Home Blog Page 562

Minimum Balance Penalty: मिनिमम बॅलेन्सच्या नावाखाली ग्राहकांची लूट? बँकांनी कमावले 8500 कोटी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Minimum Balance Penalty: जेव्हा जेव्हा आपण बँकेत नवीन खाते काढतो तेव्हा वेगवगेळ्या बँकांच्या नियमानुसार आपल्या अकाउंट मध्ये मिनिमम बॅलेन्स म्हणजेच कमीत कमी रक्कम ठेवावी लागते. जर आपल्या अकाउंट वर किमान बॅलेन्स नसेल तर बँका दंड म्हणून मोठी रक्कम वसूल करतात. मात्र तुम्हाला माहितेय का देशभरातील सरकारी बँकांनी अशाप्रकारे दंड वसुलीतून मागील पाच वर्षांत सुमारे तब्बल 8,500 कोटी रुपये कमावल्याचे समोर आलं आहे. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी लोकसभेत याबाबत (Minimum Balance Penalty) माहिती दिली आहे .

सध्या देशात सार्वजनिक क्षेत्रातील 12 बँका कार्यरत आहेत. यामध्ये केंद्रीय मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 5 वर्षांत सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी ग्राहकांकडून किमान शिल्लक दंडाच्या स्वरूपात 8,494 कोटी रुपये कमावले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे . 2023-24 या आर्थिक वर्षातील हा आकडा गेल्या 5 वर्षातील सर्वाधिक आहे आणि एका आर्थिक वर्षात प्रथमच सार्वजनिक (Minimum Balance Penalty) क्षेत्रातील बँकांची किमान शिल्लक दंडातून कमाई 2 हजार कोटींच्या पुढे गेली आहे. त्यापूर्वी, 2022-23 या आर्थिक वर्षात मिनिमम बैंक बैलेंस न राखल्याच्या दंडातून 1,855 कोटी रुपये कमावले होते. 2021-22 मध्ये 1,429 कोटी रुपये, 2020-21 मध्ये 1,142 कोटी रुपये आणि 2019-20 मध्ये 1,738 कोटी रुपये दंडाच्या स्वरूपात कमवले आहेत. जर हि सर्व रक्कम एकत्रित केली तर गेल्या पाच वर्षांत दंडातून वसूल केलेली रक्कम अंदाजे 8,500 कोटी (Minimum Balance Penalty) रुपये होते.

आता पाहुयात या लिस्टमध्ये कोणत्या बँकांनी किती रक्कम कमावली आहे. तसे पाहायला गेले तर सर्वात आघाडीची बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने मिनिमम बॅलेन्सवर दंड आकारणे बंद केलं आहे. शिवाय उर्वरित 11 सरकारी बँकांवर नजर टाकल्यास पंजाब नॅशनल बँक मिनिमम बॅलन्स पेनल्टीमधून सर्वात जास्त कमाई करत आहे. गेल्या आर्थिक वर्षात म्हणजे 2023-24 मध्ये, सार्वजनिक क्षेत्रातील (Minimum Balance Penalty) दुसरी सर्वात मोठी बँक PNB ने अशा प्रकारे 633 कोटी रुपये कमावले आहेत . बँक ऑफ बडोदा ३८७ कोटी रुपयांसह दुसऱ्या स्थानावर आहे. इंडियन बँकेने 369 कोटी रुपये कमावले. त्याचप्रमाणे कॅनरा बँकेने 284 कोटी रुपये आणि बँक ऑफ इंडियाने किमान शिल्लक दंडातून 194 कोटी रुपये कमावले.

Railway News: CR कडून होणाऱ्या सँडहर्स्ट रोडवरील हार्बर लाईन आणि भायखळ्याच्या बाबतीतल्या निर्णयाला तीव्र विरोध

Railway News : भारतीय रेल्वे ही सार्वजनिक वाहतुकीचा अविभाज्य घटक आहे. त्यातही मुंबई मध्ये रेलवे वाहतुकीचे किती महत्व आहे हे काही वेगळे सांगायला नको. मात्र रेल्वे विभागाकडून मुंबईत अनेक नवनवीन गोष्टी विकसित करण्यात येत आहेत. रेलवे खात्याकडून (Railway News) आधिकाधिक सेवा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

मध्य रेल्वेच्या (CR) नुकत्याच सँडहर्स्ट रोडवरील हार्बर लाईन उपनगरीय सेवा संपुष्टात आणण्याच्या आणि भायखळा येथील जलद गाड्यांचे थांबे काढून टाकण्याच्या प्रस्तावाला प्रवासी संघटना आणि तज्ञांकडून मोठा विरोध झाला आहे. “छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) पर्यंत पाचव्या आणि सहाव्या लाईन्सचा विस्तार सुलभ करण्यासाठी बदलांवर विचार केला जात आहे” एका अधिकाऱ्याने सांगितले की ही कल्पना अद्याप (Railway News) प्राथमिक टप्प्यात आहे.

सीआरच्या नव्या कल्पनेवर टीका करताना मध्य रेल्वेचे माजी महाव्यवस्थापक आणि रेल्वे बोर्डाचे निवृत्त सदस्य सुबोध जैन यांनी एका माध्यमाशी बोलताना सांगितले की , “सँडहर्स्ट रोडवरील हार्बर लाईन संपुष्टात आणण्याच्या प्रस्तावाचे मला कौतुक करावे असे वाटत नाही. नवी मुंबईतील वाढ आणि पश्चिम उपनगरांशी संपर्क वाढल्यामुळे हार्बर मार्गावरील वाहतूक वेगाने वाढत आहे. 40,000 प्रवासी सँडहर्स्ट रोडला पोहोचतील (Railway News) असे गृहीत धरणे आणि गर्दीच्या वेळेत बोर्ड लावणे मूर्खपणाचे आहे”

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रस्तावित बदल सीएसएमटीपर्यंत पाचव्या आणि सहाव्या मार्गाच्या विस्तारासाठी जागा बनवण्याच्या उद्देशाने आहेत. सध्या कल्याण ते एलटीटी दरम्यान पाचवी आणि सहावी लाईन अस्तित्वात असून पाचवी सहावी लाईन पटेल पर्यंत वाढवण्याचे काम सुरू आहे.”हे सामावून घेण्यासाठी, CR सँडहर्स्ट रोडवरील हार्बर लाईन सेवा थांबवण्याचा आणि CSMT आणि मस्जिद येथे प्लॅटफॉर्म 1 आणि 2 मेनलाइन स्लो सेवांसाठी पुनर्प्रस्तुत करण्याचा विचार करत आहे. यामध्ये नवीन ट्रॅकसाठी जागा तयार करण्यासाठी भायखळा येथील जलद कॉरिडॉर प्लॅटफॉर्म पाडणे (Railway News) देखील समाविष्ट आहे, ज्यामुळे सीएसएमटी आणि दादर दरम्यान जलद ट्रेनचे थांबे काढून टाकले जातील,” असे रेल्वेच्या वरिष्ठांनी सांगितले.

तीव्र आक्षेप (Railway News)

या प्रस्तावांवर प्रवासी संघटनांनीही तीव्र आक्षेप घेतला आहे.रेल यात्री परिषदेचे अध्यक्ष सुभाष गुप्ता यांनीही हा प्रस्ताव नाकारला आणि त्याला “मूर्ख” म्हणून लेबल केले आणि पर्यायी पर्यायांवर पुनर्विचार करण्याची मागणी केली.

Indian Railway : मध्य रेल्वेचा तब्बल 10 दिवस मेगाब्लॉक ; पहा कोणत्या गाड्या होणार रद्द ?

Indian Railway : जून महिन्याच्या शेवटच्या टप्प्यापासून महाराष्ट्रातल्या विविध भागामध्ये रेल्वे कडून ब्लॉक घेण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी पुणे -मुंबई दरम्यान दौंड जवळ काम असल्यामुळे ब्लॉक घेण्यात आला होता. शिवाय त्यानंतर सोलापूर मार्गावरील सुद्धा काही गाड्या चार दिवसांसाठी रद्द करण्यात आल्या होत्या. तर काही ठिकणी पावसामुळे सुद्धा रेल्वे वाहतुकीवर थोड्या फार प्रमाणात परिणाम (Indian Railway) झाल्याचे दिसून येत आहे. आता पुन्हा एकदा मध्य रेल्वेकडून मेगाब्लॉक घेण्यात येणार असल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात हा मेगाब्लॉक घेण्यात येणार असून येत्या 1 ऑगस्ट ते 11 ऑगस्टपर्यंत हा मेगाब्लॉक असणार आहे. त्यामुळे मध्य रेल्वेच्या भुसावळ केंद्रातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होणार आहे. विशेष म्हणजे या ब्लॉक (Indian Railway) दरम्यान नागपूर -भुसावळ मार्गावरील तब्बल ११ गाड्यांच्या फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत.

म्हणून घेतला जातोय मेगाब्लॉक (Indian Railway)

सेलू रोड स्थानक येथे ‘इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग’ कार्यासाठी विशेष ब्लॉक घेतला जात आहे. सेलू रोड स्थानक येथे ‘यार्ड रिमोडूलिंग’ आणि ‘इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग’ कार्यासाठी ‘प्री नॉन इंटरलॉकिंग’ आणि ‘नॉन इंटरलॉकिंग’ कार्य यादरम्यान केले जाणार आहे. तसेच तिसरी मार्गिका आणि चौथी मार्गिका, वर्धा-नागपुर दरम्यान ‘लाँग हॉल लूप लाईन’ला ‘कनेक्टिव्हिटी’ प्रदान करण्यात येत आहे. त्याचे कामही (Indian Railway) या विशेष ब्लॉक दरम्यान केले जाणार आहे.

कोणत्या गाड्या होणार रद्द ? (Indian Railway)

  • गाडी क्रमांक 12119 अमरावती -अजनी एक्सप्रेस 1 ते 3, 5, 6, 10 आणि 11 ऑगस्ट रोजी रद्द करण्यात आली आहे.
  • गाडी क्रमांक 12120 अजनी -अमरावती एक्सप्रेस 1 ते 3, 5, 6, 10 आणि 11 ऑगस्ट रोजी रद्द असेल.
  • गाडी क्रमांक 12159 अमरावती -जबलपूर एक्सप्रेस 04, 05, 09, 10 ऑगस्ट रोजी रद्द केली.
  • गाडी क्रमांक 12160 जबलपूर -अमरावती एक्सप्रेस 05, 06, 10 आणि 11 ऑगस्ट रोजी रद्द असणार आहे.
  • गाडी क्रमांक 22124 अजनी -पुणे हमसफर एक्सप्रेस 6 ऑगस्ट
  • गाडी क्रमांक 22117 पुणे -अमरावती एक्सप्रेस 7 ऑगस्ट
  • गाडी क्रमांक 22141 पुणे -नागपुर हमसफर 08 ऑगस्ट
  • गाडी क्रमांक 22118 अमरावती -पुणे एक्सप्रेस 08 ऑगस्ट
  • गाडी क्रमांक 22142 नागपुर – पुणे हमसफर एक्सप्रेस 9 ऑगस्ट
  • गाडी क्रमांक 22139 पुणे – अजनी हमसफर एक्सप्रेस 10 ऑगस्ट
  • गाडी क्रमांक 22140 अजनी – पुणे हमसफर एक्सप्रेसची 11 ऑगस्टला धावणारी फेरी रद्द करण्यात येणार आहे.
  • गाडी क्रमांक 12140 नागपुर – मुंबई एक्सप्रेस 5 ऑगस्ट रोजी नागपूर विभागात 01.45 तास नियमित केली जाईल

अशी माहिती मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाकडून देण्यात आली. दरम्यान (Indian Railway) या मेगाब्लॉकचा सर्वाधिक फटका भुसावळ विभागातून प्रवास करणाऱ्या नागरिकांना बसणार आहे.

Banking Locker | बँकेच्या लॉकरमध्ये ठेवलेले दागिने खरंच सुरक्षित असतात का? जाणून घ्या RBI चे हे नियम

Banking Locker

Banking Locker | भारतीय स्त्रियांना दागिन्यांची खूप जास्त आवड असते. प्रत्येक घरामध्ये सोने आणि चांदीचे दागिने पाहायला मिळतात. अनेक लोक हे मौल्यवान वस्तू दागिने त्यांच्या घरी ठेवतात. परंतु आता बँकांनी नागरिकांच्या दागिने आणि मौल्यवान गोष्टी ठेवण्यासाठी देखील लॉकरची सुविधा उपलब्ध केलेली आहे. हे मौल्यवान वस्तू घरात ठेवणे कधी कधी धोक्याचे असते. त्यामुळे अनेक लोक हे बँकेमध्ये वस्तू ठेवण्यात सुरक्षित मानतात. परंतु आता बँकेच्या लॉकर (Banking Locker) खरोखर सुरक्षित आहेत का? तुम्ही बँक लॉकरमध्ये सामान ठेवत असाल, तर त्या आज त्याचे नियम चालून घेणे खूप गरजेचे असते. आता आपण बँकेच्या लोकांबद्दल सगळे नियम जाणून घेऊया.

अनेकांना वाटते की ते बँकेत काहीही ठेवू शकतात. पण रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (आरबीआय) नियमांनुसार त्यात काही गोष्टींना मनाई आहे. रिझव्र्ह बँकेच्या म्हणण्यानुसार बँक लॉकर्सचा वापर केवळ वैध कामांसाठीच केला जाऊ शकतो. दागिने, कागदपत्रे अशा मौल्यवान वस्तू त्यात ठेवता येतात. तुमच्या या वस्तू लॉकरमध्ये पूर्णपणे सुरक्षित राहतात.

हे आहेत बँक लॉकरचे नवे नियम | Banking Locker

नवीन नियमांनुसार बँकांना रिकाम्या लॉकरची यादी आणि प्रतीक्षा यादी दाखवणे अत्यंत आवश्यक आहे. याशिवाय बँकांना लॉकरसाठी ग्राहकांकडून एका वेळी जास्तीत जास्त तीन वर्षांचे भाडे आकारण्याचा अधिकार आहे. विशेष बाब म्हणजे ग्राहकाचे नुकसान झाल्यास बँका अटींचा हवाला देऊन नकार देऊ शकत नाहीत. उलट ग्राहकाला पूर्ण भरपाई द्यावी लागेल. बँकांनी हे सुनिश्चित केले पाहिजे की त्यांनी केलेल्या लॉकर करारामध्ये कोणत्याही अयोग्य अटी नाहीत. जेणेकरून ग्राहकांचे नुकसान झाल्यास बँक ग्राहकांना टाळेल. बँका स्वत:च्या अटींचे कारण देत ग्राहकांना पाठ फिरवल्याचे अनेकवेळा दिसून आले आहे.

बँकेचे लॉकर दोन चावीने उघडते

बँक लॉकर उघडण्यासाठी दोन चाव्या लागतात. एक किल्ली ग्राहकाकडे राहते. दुसरी चावी बँक व्यवस्थापकाकडे राहते. दोन्ही कळा गुंतल्याशिवाय. लॉकर उघडणार नाही.

बँक लॉकरमध्ये काय ठेवता येत नाही?

सर्वप्रथम, तुम्ही तुमच्या लॉकरमध्ये रोख किंवा चलन ठेवू शकत नाही. याशिवाय शस्त्रे, स्फोटके, ड्रग्ज इत्यादी वस्तू कोणत्याही बँकेच्या लॉकरमध्ये ठेवता येणार नाहीत. सडलेली वस्तू असेल तर ती लॉकरमध्ये ठेवता येत नाही. बँक लॉकरमध्ये अशी कोणतीही सामग्री ठेवता येणार नाही, ज्यामुळे बँकेला किंवा तिच्या ग्राहकांना धोका निर्माण होऊ शकतो.

Viral Video | मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा ! पाण्यात वाहून जाणाऱ्या मित्राचे तरुणाने असे वाचवले प्राण

Viral Video

Viral Video | येत्या काही दिवसातच मैत्री दिन साजरा होणार आहे. या दिवशी सगळेचजण आपल्या मित्राला मैत्री दिनाच्या शुभेच्छा देतात. मित्र हा आपल्या आयुष्यातील एक असा व्यक्ती असतो, जो प्रत्येक सुखदुःखात आपल्या सोबती असतो. परंतु अनेकजण खऱ्या मदतीच्या वेळेस मित्रांना साथ देत नाही. परंतु सोशल मीडियावर सध्या एक असा व्हिडिओ व्हायरल होत आहे. जो व्हिडिओ पाहून अनेकजण खऱ्या मैत्रीचे प्रतीक असे संबोधत आहे. अनेकवेळा आपल्या आयुष्यात असे प्रसंग येतात. ज्यावेळी आपल्याला स्वतःला देखील त्यातून वाचता येत नाही. परंतु अशावेळी आपला मित्रच असतो, जो आपल्या एका हाकेवर धावून येतो. सोशल मीडियावर सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत आहे. ज्यामध्ये एक व्यक्ती त्याच्या जीवाची पर्वा न करता त्याच्या मित्राला वाचवत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होणारे या व्हिडिओमध्ये (Viral Video) तुम्ही पाहू शकता की, एक तरुण पुलावर उभा आहे. आणि त्या पुलाच्या खालून प्रचंड प्रमाणात पाण्याचा प्रवाह वाहत आहेत. त्या पाण्याचा प्रभाव इतका आहे की, कोणीही त्या पाण्यावर टिकू शकत नाही. आणि त्याच पाण्याच्या प्रवाहावर त्या मुलाचा मित्र वाहताना दिसत आहे.

https://www.instagram.com/reel/C-Ce6Y3NUSI/?utm_source=ig_embed&ig_rid=dcb216e4-5713-425d-89db-e158b6f2def1

त्यावेळी त्या मुलाने स्वतःच्या जीवाचा विचार न करता त्या तरुणाला वाचवलेले आहे. पुलाच्या पाण्यात वाहून येताना पाहताना त्या तरुणांनी त्याच्या हातातला कपडा खाली टाकला. यावेळी वाहत येणाऱ्या तरुणांनी त्यात तो कपडा पकडला. आणि दुसऱ्या मुलाने कपड्याने त्या मुलालावर काढलेले आहे. आणि अशा प्रकारे त्यांनी त्याच्या जीवाची भाजी लावून त्या मित्राचे प्राण वाचवले आहे.

त्या मुलाने जर हजरजबाबीपणा दाखवून त्या मुलाला वाचवले नसते, तर आज त्याच्या मित्राचा जीव गेला असता. सोशल मीडियावर हा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आणि अनेकजण या व्हिडिओवर भावनिक कमेंट करत आहेत.

Natural Farming | शेतकऱ्यांना दिले जाणार नैसर्गिक शेतीचे प्रशिक्षण; ‘या’ ठिकाणी उभारली जाणार केंद्रे

Natural Farming

Natural Farming | आपला भारत हा एक कृषिप्रधान देश आहे. भारतातील बहुतांश लोकसंख्या ही शेती या व्यवसायावर अवलंबून असते. उदाहरनिर्वाहासाठी अनेक लोक हे शेती करतात. त्यामुळे आपले सरकार देखील शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना आणत असतात. सरकारकडून आणलेल्या या नवीन योजनांचे शेतकऱ्यांना प्रशिक्षण देखील दिले जाते. त्यामुळे आता भारतातील अनेक तरुण वर्ग देखील शेती करत आहेत. सरकारचा कल हा आता नैसर्गिक शेतीकडे (Natural Farming) वाढलेला आहे.

यावर्षीचा अर्थसंकल्प सादर झाला. त्या अर्थसंकल्पात देखील नैसर्गिक शेतीबाबत (Natural Farming) मदत देण्याची घोषणा केलेली आहे. त्यामुळे आता या नैसर्गिक शेतीचे प्रशिक्षण कसे दिले जाईल आणि कुठे दिले जाईल हा प्रश्न शेतकऱ्यांना पडलेला आहे याबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत.

नैसर्गिक शेतीच्या प्रशिक्षणात या गोष्टी शिकवल्या जाणार | Natural Farming

भारत सरकारच्या कृषी मंत्रालयाकडून भारतीय शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीचे प्रशिक्षण दिले जाईल. या प्रशिक्षणात शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीशी संबंधित सर्व माहिती दिली जाणार आहे. यासोबतच शेतकऱ्यांना रसायनमुक्त शेती करण्याचे फायदेही देण्यात येणार आहेत. यासोबतच रासायनिक खतांच्या वापरामुळे लोकांचे आरोग्य बिघडत असल्याचेही त्यांना सांगण्यात येणार आहे. खरे तर रासायनिक शेतीमुळे शेतातील मातीही खराब होते. या प्रशिक्षणात शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीचे वेगवेगळे तंत्रही शिकवले जाणार आहे.

10 हजार केंद्रे सुरू होणार

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात विशेषतः शेतकऱ्यांसाठी अनेक गोष्टी जाहीर केल्या आहेत. शेतकऱ्यांना शेतीतील विविध प्रकारच्या तंत्रांची माहिती मिळावी, त्यांचे उत्पन्न वाढावे आणि त्यांची वाढ व्हावी यासाठी कृषी संशोधन केंद्रे सुरू करण्याबाबत अर्थसंकल्पात माहिती देण्यात आली आहे. यासोबतच नैसर्गिक शेतीला चालना देण्यासाठी नैसर्गिक शेतीसाठी सुमारे 10,000 प्रशिक्षण केंद्रेही उघडली जातील, जिथे शेतकऱ्यांना राष्ट्रीय शेतीशी संबंधित विविध पद्धती शिकवल्या जातील, असेही सांगण्यात आले आहे. मात्र ही केंद्रे कुठे सुरू होणार याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

नैसर्गिक शेतीचे फायदे?

नैसर्गिक शेती केवळ शेतकऱ्यांसाठीच नाही तर शेतजमिनीसाठीही चांगली आहे. नैसर्गिक शेती केल्यास शेतकऱ्याला रसायने आणि खतांवर पैसे खर्च करावे लागत नाहीत. यासोबतच नैसर्गिक शेती पद्धतीचा वापर करून शेती करून मिळणारे उत्पन्न. त्याचा भाजीपाला बाजारात चांगला भाव मिळतो. शेतकऱ्यांना कमी खर्चात चांगला नफा मिळतो.

Shivajinagar Vidhan Sabha : शिवाजीनगरमध्ये भाजपच्या सिद्धार्थ शिरोळे यांच्यावर पराभवाची टांगती तलवार

shivajinagar siddharth shirole

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुरलीधर मोहोळ यांच्या पुण्यातील विजयातच भाजपच्या एका विद्यमान आमदाराच्या पराभवाची दाट शक्यता आणखीनच गडद झाली… होय मी बोलतोय… शिवाजीनगर विधानसभेचे (Shivajinagar Vidhan Sabha) विद्यमान भाजप आमदार सिद्धार्थ शिरोळे (Siddharth Shirole) यांच्या बद्दल… मोहोळ यांनी दमदार कामगिरी करत भाजपाला पुन्हा एकदा शहरात बस्तान बांधून दिलं… अगदी कसब्यातूनही त्यांना लीड मिळाल्यानं सबकुछ भाजप अशी परिस्थिती असताना शिवाजीनगर मधून लीड मिळूनही आमदार साहेबांची आमदारकी धोक्यात आहे… भाजपचा पारंपारिक मतदारसंघ म्हणून ओळखला जाणारा शिवाजीनगर मतदारसंघ पक्षाच्याच हातातून कसा निसटत चाललाय? हेच जाणून घेऊयात

2009 च्या विधानसभा पुनर्रचनेत शिवाजीनगर मतदारसंघाची नव्याने निर्मिती झाली… पण या मतदारसंघाने कायम युतीच्या बाजूनेच आपला कौल दिला… शशिकांत सुतार , विनायक निम्हण यांच्या आमदारकीनं मतदार संघावर शिवसेनेचा दबदबा कायम राहिला…. भाजपच्या अनेक पदाधिकारांच्या राजकीय इच्छा आकांक्षा त्यांना स्वस्थ बसू देत नव्हत्या… पण युतीचा धर्म पाळायचा म्हणून इथं शिवसेनेच्याच उमेदवाराला तिकीट मिळायचं आणि तो आमदार व्हायचा… टर्न टू २०१४. कायम शिवसेना भाजप अशा युतीमध्ये लढणाऱ्या दोन्ही पक्षांनी युती तोडत स्वतंत्र निवडणूक लढवली… तेव्हा त्याचे बरेच तोटे असले तरी शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात भाजपला आपली ताकद आजमावता आली… त्यातही भाजपच्या बाजूने असणारे जनमत, मोदी लाट या सगळ्यांची गोळा बेरीज विजय काळे यांच्या पथ्यावर पडली… आणि 2014 ला पहिल्यांदाच शिवाजीनगर विधानसभेतून भाजपचा झेंडा आमदारकीला फडकला…

यानंतर भाजपने या मतदारसंघावरची पकड आणखीनच घट्ट करत पक्ष संघटन वाढीवर भर दिला… पक्षाची तरुण, उमदी फळी तयार केली… या सगळ्याचं रिफ्लेक्शन 2019 च्या विधानसभेलाही पाहायला मिळालं… भाजपनेही 2019 ला शिवाजीनगर विधानसभेचा चेहरा बदलून नगरसेवक सिद्धार्थ शिरोळे यांच्यावर विश्वास टाकला… अगदी आपल्यावर टाकलेल्या विश्वासाला सार्थ न्याय देत शिरोळेही आमदार झाले… पण अवघ्या 5000 च्या निसटत्या लीडनं… सगळं वातावरण भाजपच्या बाजूने प्लसमध्ये असतानाही मिळालेलं हे तुटपुंज लीड पाहता भाजप हाय कमांडचाही हिरमोड झाला… अर्थात सिद्धार्थ शिरोळे यांच्या उमेदवारी सोबतच अनेक कारण याला कारणीभूत होतीच… पण शिवाजीनगरच्या जनतेनं आम्हाला गृहीत धरत जाऊ नका.. असा जणू अप्रत्यक्ष हिसकाच या निकालातून दिला होता.. यानंतर भाजपने या निसटत्या पराभवावर बराच खल केला, पक्षाला मतदारसंघात मजबूत बनवण्यासाठी मागील पाच वर्षात बरेच प्रयत्न झाले, विकास कामे मार्गी लावण्यात आली… स्वतः आमदार साहेब शिरोळे यांनी लोकसभा निवडणुकीत शिवाजीनगरची जनता मोहोळांच्या पाठीशी रेकॉर्ड ब्रेक लीड देईल, हे त्यांनी बोलू नाही दाखवलं होतं… त्यांचा त्यांच्या कामावर – आणि मतदारसंघातील आपल्या ताकदीवर मोठा विश्वास होता… पण गेम उलटाच झाला… मुरलीधर मोहोळ निवडून आले खरे पण शिवाजीनगर मतदारसंघातून ते अवघं चार हजार च्या आसपास लीड घेऊन थांबले… या निकालाचं साध्या सोप्या भाषेत विश्लेषण करायचं झालं तर येणाऱ्या विधानसभेला सिद्धार्थ शिरोळे यांचे आमदारकी काठावर किंवा धोक्यात तर आहेच, पण सोबतच भाजपचा शिवाजीनगरचा बालेकिल्लाही ढासळण्याची शक्यताही नाकारता येत नाही…

औंध, भोसलेनगर, मॉडर्न कॉलनी, जंगली महाराज रस्ता, आपटे रस्ता, प्रभात रस्ता हा उच्चभ्रू सोसायटीचा भाग… हा शिवाजीनगर मतदारसंघातला भाजपचा कोअर ओटर… हा नेहमीच भाजपाला मतदान करत आलाय… पण सुशिक्षित मतदारांची संख्या जास्त असल्याने या पट्ट्याला ग्राह्य धरता येत नाही… दुसऱ्या बाजूला पाहायचं झालं तर शिवाजीनगर, गोखले नगर, वडारवाडी, खडकी, कॅन्टोन्मेंट बोर्ड, बोपोडी, झोपडपट्टी आणि वस्ती भाग इथला मतदार हा काँग्रेसचा पारंपारिक मतदार राहिलाय… इथला मतदानाचा टक्का वाढला की समजायचं भाजपाचा इथे करेक्ट कार्यक्रम झाला… त्यात भाजपच्या कोअर ओटरने मतदानाकडे फिरवलेली पाठ इथे लोकसभेला काँग्रेसच्या पथ्यावर पडताना दिसली… हाच ट्रेंड कायम राहिला तर येणाऱ्या विधानसभेला इथं काँग्रेसचा आमदार विजयाचा गुलाल उधळताना दिसला तर आश्चर्य वाटायला नको…

काँग्रेसकडून दत्ता बहिरट हे येणाऱ्या विधानसभेला इच्छुक आहेत.. दलित – मुस्लिम आणि काँग्रेसचा पारंपारिक वोटर हा यंदा काँग्रेसच्या पाठीशी असल्याने आणि त्यातही वंचित इफेक्ट यंदा विधानसभेला मारक ठरणार नसल्याने मतदार संघातून काँग्रेसला विजयाचे चान्सेस जास्त आहेत… पण भाजप आपल्या हा हक्काचा मतदारसंघ सहजासहजी आपल्या हातातून निसटू देणार नाही… त्यामुळे शिरोळे यांना जास्तीत जास्त बळ देऊन ते निवडणूक रिंगणात उतरतील की नव्या चेहऱ्याला संधी देतील, हे येणारा काळच ठरवेल… त्यामुळे भाजप आपल्या हक्काचा पारंपारिक मतदारसंघ यंदाही कायम राखून प्रतिष्ठा वाचवणार की काँग्रेस याला फाटा देत शिवाजीनगरमधून आमदारकीचा गुलाल उधळणार? तुम्हाला याबद्दल काय वाटतं? तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा…

Ayodhya Ram Mandir | अयोध्येतील राम मंदिराच्या कामाचा वेग झाला कमी; समोर आलं महत्वाचे कारण

Ayodhya Ram Mandir

Ayodhya Ram Mandir | काही महिन्यापूर्वी आयोध्येतील श्री राम मंदिरात रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली असली, तरी मंदिराचे उर्वरित बांधकाम बाकी होते. परंतु सध्या बांधकामाची गती मंदावलेली आहे. कारण या ठिकाणी मजुरांची कमतरता भासत आहे. याबाबत आता राम मंदिर बांधकाम समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी या प्रकरणात एक बैठक घेतलेली आहे. आणि राम मंदिर बांधकाम कंपनीला 2024 डिसेंबर पर्यंत मंदिराचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी निर्देश दिलेले आहेत. यासाठी त्यांना मजूर वाढवण्यात देखील सांगितलेले आहे.

अयोध्येतील राम मंदिराचे (Ayodhya Ram Mandir) काम चांगल्या प्रकारे चालू होते. परंतु गेल्या तीन महिन्यापासून या बांधकामाचा वेग हळूहळू कमी झालेला आहे. या मंदिराचे बांधकाम करण्यासाठी जवळपास आठ ते नऊ हजार मजूर होते. परंतु त्यापैकी जवळपास निम्मे मजुरांनी काम सोडलेले आहे. त्यामुळे काम करण्यासाठी माणसांची कमी पडत आहे.

या मंदिरात अनेक कामे आहेत. आणि ती वेगवेगळी कामे करण्यासाठी मंदिराच्या ट्रस्टचे शंभर वेंडर युक्त केलेले आहेत. यासाठी वेगवेगळे मजूर देखील ठेवलेले आहे. अशातच आता 30 जुलै रोजी हे मजूर टंचाईच्या समस्येवर मात करण्यासाठी मीटिंग घेऊन चर्चा देखील करण्यात आलेली आहे.

मीटिंग नंतर मिश्रा यांनी सांगितले की, सगळ्यात महत्त्वाचे काम हे मंदिराच्या कळसाचे बांधकाम आहे. त्याचप्रमाणे दुसऱ्या मुजऱ्यावरील घुमटाच व इतर बांधकाम पूर्ण झाल्यानंतरच कळसाचे बांधकाम पूर्ण होऊ शकतं. सध्याच्या गतीने काम चालू आहे. त्याच गतीने जर काम सुरूच राहिले, तर हे बांधकाम पूर्ण होण्यासाठी दोन महिने जास्त लागू शकतात. त्यामुळे आता बांधकाम कंपनीला मजूर यांची संख्या वाढवण्यास देखील सांगितलेली आहे. हे बांधकाम करण्यासाठी आणखी 200 ते 250 कामगार वाढवावे लागणार आहे. अन्यथा डिसेंबर 2024 पर्यंत हे काम पूर्ण होणार नाही.

सप्टेंबरपर्यंत पूर्ण होणार ऑडिटोरियम | Ayodhya Ram Mandir

अयोध्येमध्ये ऑडिटेरियम ट्रस्ट कार्यालय आणि साधू संतांसाठी विश्रामगृह बांधण्याचे काम देखील चालू झालेले आहे. हे बांधकाम उत्तर प्रदेश राज्य बांधकाम महामंडळाच्या वतीने बांधण्यात येणार आहे. राम मंदिर परिषदेच्या बांधकाम मंडळाला देखील जागा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. आणि ते कार्यालयाचे काम देखील आता पूर्ण झालेले आहे. त्यामुळे आता ऑडिटोरियमचे बांधकाम देखील 2024 सप्टेंबर पर्यंत पूर्ण होईल असे सांगण्यात आलेले आहे.

Tecno CAMON 30S Pro : 50MP कॅमेरा, 8GB रॅमसह लाँच झाला नवा मोबाईल; पहा संपूर्ण डिटेल्स

Tecno CAMON 30S Pro

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध मोबाईल निर्माता कंपनी टेक्नोने बाजारात Tecno CAMON 30S Pro नावाचा नवा मोबाईल लाँच केला आहे. 50MP कॅमेरा, 8GB रॅमसह हा मोबाईल अनेक भन्नाट फीचरने सुसज्ज आहे. कंपनीने हा फोन आपल्या अधिकृत वेबसाइटवर लिस्ट केला आहे. ग्रे, ग्रीन आणि सिल्वर रंगात हा मोबाईल लाँच करण्यात आलाय. आज आपण टेक्नोच्या या स्मार्टफोनचे खास फीचर्स आणि स्पेसिफिकेशन याबाबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

डिस्प्ले –

Tecno CAMON 30S Pro मध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.78 इंचाचा FHD + AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेला 1080*2436 पिक्सेल रिझोल्युशन आणि 1300 निट्स पीक ब्राईटनेसचा सपोर्ट मिळतो. मोबाईलमध्ये AquaTouch टेक्नॉलॉजी वापरण्यात आली आहे. टेक्नोने आपल्या या नव्या स्मार्टफोनमध्ये Helio G100 Octa-Core प्रोसेसर बसवण्यात असून हा मोबाईल Android 14 OS या ऑपरेटिंग सिस्टीमवर काम करतो. या मोबाईलमध्ये 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज देण्यात आलं आहे.

कॅमेरा – Tecno CAMON 30S Pro

मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास, Tecno CAMON 30S Pro मध्ये पाठीमागील बाजूला 50MP मुख्य कॅमेरा आणि 2MP चा डेप्थ सेन्सर आहे तर सेल्फी आणि विडिओ कॉल साठी समोरील बाजूला 50MP चा मुख्य कॅमेरा उपलब्ध आहे. मोबाईल मध्ये 5000mAh बॅटरी देण्यात आली असून हि बॅटरी 45W सुपर चार्जला सपोर्ट करते.

टेक्नोचा हा स्मार्टफोन तीन कलर व्हेरियंटमध्ये सादर करण्यात आला आहे ज्यामध्ये इंटरस्टेलर ग्रे, पर्ल गोल्ड आणि शिम सिल्व्हर ग्रीन या रंगाचा पर्याय उपलब्ध आहेत. कंपनीने अधिकृत वेबसाइटवर हा मोबाईल जरी लिस्टेड केला असला तरी त्याच्या किमतीबाबत कोणतेही डिटेल्स समोर आलेले आहेत. तसेच स्मार्ट फोनच्या उपलब्धतेबद्दल सुद्धा येथे कोणतीही माहिती दिलेली नाही.

Beauty Tips : तुकतुकीत कोरियन ग्लास स्किन हवीय ? मग बनवा होम मेड आइस क्यूब

Beauty Tips : आपल्याला माहितीच असेल की कोरियन ड्रामा जगभर किती ट्रेंड मध्ये आहे. अगदी त्याचप्रमाणे कोरियन स्किन सुद्धा जगभर ट्रेंड मध्ये आहे. तुकतुकीत , डाग विरहित आणि काचेसारखी चकाकी देणारी नॅचरल स्किन कुणाला हवीहवीशी वाटणार नाही.

जर तुम्ही कोरियन ब्युटी प्रोडक्ट बाजारात घ्यायला गेलात तर त्याची किंमत परवडणारी नसते. वारंवार हे प्रोडक्ट वापरण्यासाठी खर्चिक आहेत म्हणूनच आम्ही आज तुम्हाला कोरियन स्किन बाबत होम रेमिडी सांगणार आहोत जी आजकाल ट्रेंडमध्ये आहेत, त्यापैकी एक म्हणजे ग्लास स्किन (Beauty Tips) आइस क्यूब. चला तर मग जाणून घेऊया…

कोरियन स्किन केअर प्रॉडक्ट मध्ये तांदळाचे पाणी आणि तांदूळ हे अतिशय कॉमन आणि महत्त्वाचा घटक आहेत. कोरियन स्त्रीया त्यांच्या रोजच्या स्क्रीन केअर रुटीन मध्ये तांदळाचे पाणी वापरतात. सहज सोप्या पद्धतीने उपलब्ध (Beauty Tips) असलेलं तांदळाचे पाणी तुमच्या सौंदर्यात मोठी भर घालू शकते. तुम्हाला सुद्धा सुंदर ग्लोइंग आणि नितळ त्वचा हवी असेल तर तांदळाच्या पाण्यापासून बनवलेलं राईस वॉटर आईस क्यूब तुम्ही वापरू शकता. चेहरा हायट्रेटेड आणि फ्रेश ठेवण्यासाठी तांदळाच्या पाण्यापासून तयार केलेले आईस क्यूब फारच उपयोगी ठरतात. ते कसे तयार (Beauty Tips) करायचे पाहूयात.

  • सर्वप्रथम, एक ग्लास तांदूळ उकळल्यानंतर तुम्हाला उरलेले पाणी (Beauty Tips) लागेल.
  • आता त्यात एक चमचा ग्लिसरीन घाला.
  • आता त्यात एक चमचा एलोवेरा जेल टाका आणि फेटून घ्या.
  • आता त्यात दोन व्हिटॅमिन ई कॅप्सूल कापून घ्या.
  • आता या सर्व गोष्टी चांगल्या प्रकारे फेटा.
  • आता हे तयार मिश्रण फ्रीजरमधील (Beauty Tips) आइस क्यूब ट्रेमध्ये काळजीपूर्वक ओता.
  • तुमचे होममेड स्किन केअर आइस क्यूब तयार आहे. तुम्ही हे मोठ्या प्रमाणात बनवू शकता आणि महिनाभर (Beauty Tips) साठवून ठेवू शकता आणि दररोज वापरू शकता.

कसे वापराल ?

  • रात्री एक बर्फाचा तुकडा घ्या आणि स्वच्छ चेहरा आणि मानेवर पूर्णपणे मसाज करा.
  • आता किमान 15 मिनिटे चेहऱ्यावर राहू द्या.
  • नंतर कोमट पाण्याने नीट धुवा.
  • एक दिवस आड या बर्फाच्या क्यूबने तुमचा चेहरा आणि मान मसाज करा.
  • हे लावल्यानंतर चेहऱ्यावर खाज सुटली किंवा जळजळ होत असेल तर लगेच वापरणे (Beauty Tips) बंद करा.