Monday, December 22, 2025
Home Blog Page 564

Nashik Police Bharati | नाशिक विभागात पोलीस भरतीसाठी मराठा उमेदवारांच्या भरतीला तात्पुरती स्थगिती; हे आहे कारण

Nashik Police Bharati

Nashik Police Bharati | गेल्या अनेक दिवसांपासून पोलीस भरतीला (Police Bharati) सुरुवात झालेली आहे. अनेक तरुणांनी अर्ज देखील केलेले आहे. परंतु आता पोलीस भरतीसाठी ज्या मराठी समाजाच्या तरुणांनी अर्ज केलेले आहेत, त्यांच्यासाठी एक मोठी बातमी आहे. ती म्हणजे आता पोलीस भरती प्रक्रियेसाठी आर्थिक दुर्बल घटकातून अर्ज केलेल्या उमेदवारांच्या निवडीला सध्या तात्पुरती स्थगिती देखील देण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे जे राहिलेले उमेदवार आहेत त्यांची निवड प्रक्रिया सुरू ठेवण्याचे आदेश अप्पर पोलीस महासंचालकांनी देखील दिलेले आहेत. या भरती संदर्भातील महासंचालका संबंधित विभागांना अप्पर पोलिसांनी पत्र लिहिलेले आहेत. या पत्रामध्ये त्यांनी मराठा आरक्षणाचा गोंधळ असल्याचा निर्णय घेत सांगितलेले आहे. त्यामुळे आता पोलीस भरतीसाठी आर्थिक दुर्बल घटकातील अर्ज केलेल्या मराठी उमेदवारांच्या निवडीला स्थगिती आलेले दिसत आहे.

महाराष्ट्र पोलीस दलामध्ये गेल्या दोन महिन्यापासून पोलीस शिपाई या पदासाठी अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे. अनेक ठिकाणी अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे. परंतु नाशिक जिल्ह्यातील शहर आणि ग्रामीण पोलीस दलातील भरतीची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आलेली आहे. या ठिकाणी मैदानी चाचणी त्याचप्रमाणे लेखी परीक्षा देखील पार पडलेल्या आहे. आणि आता अंतिम निवडीची यादी देखील लवकरच जाहीर होणार आहे.

परंतु आता मराठी समाजाच्या उमेदवारांनी ईडब्लूएस प्रवर्गातून पोलीस भरतीसाठी अर्ज केलेले आहे. परंतु त्यांचा पेच अजूनही तसाच आहे. परंतु शासन निर्णय होईपर्यंत आता ईडब्ल्यूएस वर्गातून अर्ज करणाऱ्या उमेदवारांची उमेदवारी तात्पुरता स्थगित करण्याचा निर्णय घेतलेला आहे. नाशिक जिल्ह्यातील आता तात्पुरत्या निवड यादीतील ई.डब्ल्यू.एस या प्रवर्गातील सहा पैकी चार उमेदवारांना हमीपत्र देण्यास नकार दिलेला आहे.

Rashid Khan : राशीद खानचा मोठा कारनामा; T20 क्रिकेटमध्ये घेतले 600 बळी

Rashid Khan 600 Wickets

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अफगाणिस्तानचा अष्टपैलू खेळाडू आणि T20 फॉरमॅटचा कर्णधार राशिद खानने( Rashid Khan) मोठा भीमपराक्रम केला आहे. T20 क्रिकेटमध्ये 600 बळी घेण्याचा कारनामा राशिद खानने केला आहे. द हंड्रेड मेन्स कॉम्पिटिशन 2024 सिरीजमध्ये ट्रेंट रॉकेट्सकडून खेळताना राशिद खानने हा माईलस्टोन गाठला आहे. पॉल वॉल्टर हा राशिद खानचा 600 वा बळी ठरला आहे. राशिद खानपूर्वी वेस्ट इंडिजचा अष्टपैलु खेळाडू ड्वेन ब्राव्होने T20 क्रिकेटमध्ये 600 बळींचा टप्पा पूर्ण केला आहे.

रशीद खान (Rashid Khan) हा आजच्याघडीला जगातील टॉपचा फिरकीपटू मानला जातो. अफगाणिस्तान सारख्या तुलनेनं हलक्या संघाचे प्रतिनिधित्व करत असूनही संपूर्ण जागतिक क्रिकेटमध्ये त्याने आपल्या खेळाचा ठसा उमटवला आहे. त्याच्या लेग ब्रेक फिरकीपुढे अनेक दिग्गज फलंदाजांनी गुडघे टेकलेत. राशिद खानने 441 व्या T20 सामन्यात 600 बळींचा टप्पा गाठला आहे. तर ड्वेन ब्राव्होच्या नावावर 578 टी-20 सामन्यात 630 बळी आहेत. या दोघांच्या व्यक्तिरिक्त वेस्ट इंडिजच्या सुनील नारायण (557) आणि इम्रान ताहिर (502) यांनी ५०० बळींचा टप्प्पा पार केलाय. मात्र राशिद खानने अतिशय कमी वयात हा माईलस्टोन गाठला आहे. त्यामुळे त्याच्यासाठी आणि अफगाणिस्तान क्रिकेटसाठी हि मोठी गौरवाची बाब आहे.

राशिदचा इकॉनॉमी रेट अवघा 6.47- Rashid Khan

राशिद खानने २०१५ मध्ये टी-२० क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. आतापर्यंत त्याने 441 टी-20 सामन्यात 600 बळी घेतले आहेत. या कालावधीत त्याची सरासरी १८.२५ इतकी आहे. तर इकॉनॉमी रेट सुद्धा अवघा 6.47 आहे. गोलंदाजी शिवाय रशीद हा वेळप्रसंगी आक्रमक फलंदाजी सुद्धा करण्यास सक्षम आहे. अनेकदा त्याने तळाला फलंदाजीला येऊन मोठमोठे फटके मारून अफणिस्तानला अशक्यप्राय विजय मिळवून दिलेत. त्यामुळे प्रत्येक संघाला राशिद खान हा आपल्याकडे असावा असं वाटत.

T20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज

543 डावात 630 विकेट – ड्वेन ब्राव्हो
438 डावात 600 बळी – राशिद खान
509 डावात 557 बळी – सुनील नारायण
388 डावात 502 विकेट – इम्रान ताहिर
436 डावात 492 विकेट – शकिब अल हसन
461 डावात 462 विकेट – आंद्रे रसेल

Free Gas Cylinder : ‘या’ महिलांना मोफत गॅस सिलेंडर मिळणार; पहा काय आहे पात्रता निकष?

Free Gas Cylinder

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी महायुती सरकारने माझी लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) सुरु केली आहे. या योजनेच्या माध्यमातून २१ ते ६५ वर्षाच्या पात्र महिलांना दर महिन्याला १५०० रुपयांची आर्थिक मदत केली जाणार आहे. येत्या १९ ऑगस्टला रक्षाबंधनच्या निमित्ताने हे पैसे महिलांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. या योजनेमुळे महिलावर्गात आनंदाचे वातावरण आहे. आता या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना दरवर्षी ३ मोफत गॅस सिलेंडर (Free Gas Cylinder) सुद्धा मिळणार आहेत. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या अंतर्गत हे गॅस सिलेंडर महिलांना मिळणार आहेत. त्यासाठी पात्रता निकष काय आहेत ते आपण जाणून घेऊयात…

अन्न व नागरी पुरवठा विभागाने मंगळवारी यासंदर्भातील शासन निर्णय प्रसिद्ध केला. केंद्र सरकारच्या पंतप्रधान उज्ज्वला योजनेतील तब्बल 52 लाख 16 हजार पात्र लाभार्थ्यांना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेतंर्गत वर्षाला 3 गॅस सिलिंडर मोफत दिले जातील. यामध्ये आता लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांचाही समावेश झाला आहे. लाडक्या बहीण योजनेतील पात्र लाभार्थ्यांची यादी लवकरच जाहीर होईल. त्यानंतर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ राज्यातील किती महिलांना मिळेल ते स्पष्ट होईल. राज्यात सध्या 3 कोटी 49 लाख कुटुंबांकडे घरगुती गॅस सिलिंडर जोडणी आहेत. मात्र, दोन्ही योजनांचे निकष पाहता यापैकी 2 कोटी कुटुंबाना संबंधित योजनेचा लाभ मिळू शकतो, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

काय आहे पात्रता निकष ?

  • या योजनेचा लाभ मिळण्यासाठी गॅस जोडणी महिलेच्या नावाने असणे आवश्यक आहे.
  • राज्यातील प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत पात्र असलेले लाभार्थी या योजनेसाठी पात्र असणार आहेत.
  • मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेस पात्र असलेल्या लाभार्थ्यांचे कुटुंब या योजनेस पात्र असणार आहे.
  • एका कुटुंबात शिधापत्रिकेनुसार केवळ एक लाभार्थी या योजनेस पात्र असेल.
  • तसेच फक्त १४.२ किलेग्रॅम वजनाच्या गॅस सिलेंडरची जोडणी असलेल्या गॅस ग्राहकांना ही योजना लागू असेल.

आता स्वस्तात मिळणार 5G मोबाईल; लाँच झाला नवा प्रोसेसर

Qualcomm Snapdragon 4s Gen 2 processor

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जेव्हा आपण एखादा मोबाईल खरेदी करतो तेव्हा त्यामध्ये २ प्रकारचे प्रोसेसर पाहायला मिळतात. एक म्हणजे MediaTek आणि दुसरा म्हणजे Qualcomm प्रोसेसर…. यातील Qualcomm हा सर्वात मुरलेला प्रोसेसर आहे. मात्र मागील काही दिवसांपासून MediaTek ने वेगवेगळे प्रोसेसर मार्केट मध्ये लाँच करत Qualcomm समोर आव्हान निर्माण केलंय. अनेक मोबाईल निर्माता कंपन्यांनी सुद्धा आपल्या स्मार्टफोनमध्ये MediaTek चे प्रोसेसर वापरण्यास सुरुवात केल्याने Qualcomm चा बाजारच अडचणीत आला. मात्र आता Qualcomm ने स्वस्तात मस्त असा नवा प्रोसेसर लाँच करत पुन्हा एकदा मार्केटमध्ये मुसंडी मारण्याच्या दिशेने पाऊल टाकलं आहे.

Snapdragon 4s Gen 2 असं Qualcomm च्या या नव्याने लाँच झालेल्या प्रोसेसरच नाव असून गेल्या वर्षी आलेल्या स्नॅपड्रॅगन 4 Gen 2 चे स्वस्त व्हर्जन आहे. Qualcomm चा हा प्रोसेसर खास करून एंट्री-लेव्हल 5G उपकरांसाठी वापरण्यात येणार आहे. एका रिपोर्टनुसार, Snapdragon 4s Gen 2 या वर्षाच्या अखेरच्या काळात शिपिंग सुरू होईल. हा प्रोसेसर सुमारे $100 म्हणजेच 8,375 रुपये किमतीच्या उपकरणांमध्ये दिले जाऊ शकते. रिपोर्ट्सनुसार, Qualcomm Snapdragon 4s Gen 2 चा वापर करणारा Xiaomi हा भारतीय बाजारातील पहिला ब्रँड असून शकतो. म्हणजेच देशातील ग्राहकांना आता स्वस्तात आणि कमी किमतीत 5G मोबाईल खरेदी करता येईल.

काय आहे खास?

Snapdragon 4s Gen 2 हा प्रोसेसर Samsung 4nm 4LPX प्रोसेस टेक्‍नॉलजीवर तयार करण्यात आला आहे. हा प्रोसेसर 1Gbps 5G स्पीड क्षमतेचा मोबाईल बनवतो, म्हणजेच इतका वेगवान डाउनलोड स्पीड उपलब्ध आहे. त्यामुळे तुमची सर्व कामे अगदी जलद पद्धतीने होतील. Qualcomm चा हा नवा प्रोसेसर 90 हर्ट्झ रिफ्रेश रेटसह फुल HD प्लस डिस्प्लेला सपोर्ट करतो. या प्रोसेसरनुसार, फास्ट चार्जिंग सुद्धा मोबाईल मध्ये मिळेल. कॅमेरा सपोर्टबद्दल बोलायचे झाले तर Qualcomm Snapdragon 4s Gen 2 सह मोबाईल मध्ये 16 MP + 16 MP ड्युअल कॅमेरे बसवले जाऊ शकतात. हा प्रोसेसर जास्तीत जास्त 108 MP फोटो कॅप्चर करू शकतो. महत्वाची बाब म्हणजे या नव्या प्रोसेसरमुळे 5G मोबाईलच्या किमती कमी होण्याची शक्यता असून मोबाईल खरेदीदार ग्राहकांसाठी हि मोठी आनंदाची गोष्ट आहे.

Maharashtra Rain : 3-4 दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा पावसाचे थैमान; 1 ऑगस्टपासून वरुणराजाची बॅटिंग सुरूच राहणार

Maharashtra Rain 31 august

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जुलै महिन्याच्या सुरुवातीला महाराष्ट्रात पावसाने (Maharashtra Rain) जोरदार हजेरी लावली. त्यानंतर काही काळ पावसाने विश्रांती घेतली होती परंतु आता पावसाचा जोर आणखी एकदा मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. 1 ऑगस्टपासून संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केलेली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार गुरुवारपासून पुढील दोन-तीन दिवस मुंबई, ठाणे त्याचप्रमाणे इतर जिल्ह्यांमध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

जून महिन्यात महाराष्ट्रात जास्त पाऊस (Maharashtra Rain) पडला नाही, परंतु जुलै महिन्याच्या सुरुवातीला संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर थोडी विश्रांती घेतल्यानंतर आता पावसाने पुन्हा एकदा महाराष्ट्रात जोरदार हजेरी लावलेली आहे. मराठवाडा वगळता संपूर्ण राज्यात यावर्षी जुलै महिन्यात समाधानकारक पाऊस पडलेला आहे. राज्यातील धरणांमधील पाणीसाठा देखील चांगला जमा झालेला आहे.

पावसाने पुन्हा एकदा चांगलाच महाराष्ट्रात जोर धरलेला आहे. त्यामुळे मुंबईसह अनेक भागात देखील पाऊस पडणार आहे. सध्या अरबी समुद्राने सौराष्ट्राच्या भागात चक्रकार वाऱ्याप्रमाणे स्थिती निर्माण होत आहे. त्यामुळे पुढील दोन-तीन दिवस मुंबईमध्ये देखील मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

कोणत्या जिल्ह्याना अलर्ट? Maharashtra Rain

हवामान खात्याने महाराष्ट्रासाठी पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे. गुरुवारपासून कोकण, मध्य महाराष्ट्र विदर्भात देखील पावसाचा जोर चांगलाच वाढणार आहे. त्याचप्रमाणे मुंबई, रत्नागिरी, पुणे, रायगड, सातारा ठाणे या जिल्ह्यांमध्ये येल्लो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ, अमरावती, वर्धा, नागपूर, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा या जिल्ह्यांना देखील पावसाचा येल्लो अलर्ट देण्यात आलेला आहे.

Cooking Tips : भजीचं मिश्रण फिस्कटतं ? वापरा सोप्या टिप्स , भजी होतील कुरकुरीत अन यम्मी

Cooking Tips : पावसाळा सुरु झाला की, बाहेर पडणारा पाऊस आणि बाल्कनी मध्ये बसून गरम गरम कांदा भजीचा आस्वाद घेण येतंच. मात्र अनेकदा कांदा भजी बनवत असताना काहीतरी फिस्कटतं आणि कांदा भजी बिघडते.

असं तुमच्या बाबतीतही होतं का ? एक तर भजी मऊ पडते किंवा मग म्हणावी तशी टेस्ट त्याला येत नाही. पण आता काळजी करू नका कारण आम्ही तुमच्यासाठी काही टिप्स घेऊन आलो आहोत ज्याच्यामुळे भजी परफेक्ट होतील यात शंका नाही. या टिप्स एका प्रसिद्ध शेफनी सांगितल्या आहेत. चला तर मग (Cooking Tips) जाणून घेऊया…

फॉलो करा टिप्स (Cooking Tips)

  • भजीसाठी बनवण्यात येणारे मिश्रण हे त्यातील सर्वात महत्त्वाचं इन्ग्रेडियंट आहे. त्यामुळे ते जास्त जाड आणि जास्त पातळ असायला नको. हे पीठ कांद्याला कोट करण्यासाठी पुरेसं जाड असावे परंतु जास्त घट्ट नसावे .
  • जर पिठात जास्त प्रमाणात पाणी असेल तर पकोडे मऊ होतात.
  • मिश्रण तयार केल्यानंतर तुम्हाला ते 20-25 ठेवायचं आहे जेणेकरून ते मिश्रण चांगल्या (Cooking Tips) प्रकारे मुरतं
  • भजी च्या मिश्रणात बेकिंग सोडा किती प्रमाणात घालणं हे पिठावर अवलंबून असतं. जर तुम्ही अगदी कमी प्रमाणात पदार्थ बनवत असाल तर भजी बाहेरून कुरकुरीत करण्यासाठी चिमूटभर सोडा पुरेसा आहे.
  • भजी च्या पिठात जर गरम तेल घातलं तर भजी कुरकुरीत होण्यास मदत होते. आता हे तेल घालत असताना (Cooking Tips) प्रमाण पिठाच्या प्रमाणानुसार घ्यायला लागेल घरगुती वापरासाठी बनवत असल्यास एक वाटी पीठ असेल तर एक चमचा तेल पुरेसं आहे.
  • दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कांदा भजी करत असताना केवळ बेसन किंवा चण्याचे पीठ वापरू नका तर या मिश्रणामध्ये तांदळाचे पीठ घातलं तर पीठ घट्ट व्हायला मदत होते आणि कुरकुरीतपणा सुद्धा टिकून राहतो.
  • जर तुमच्या भाज्या ह्या कुरकुरीत होत नसतील तर तळलेले पकोडे पुन्हा एकदा तळण्यासाठी टाकावे लागतील.
  • आणि तळत असताना महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकदा तेल गरम झाल्यानंतर गॅस मंद आचेवर ठेवून (Cooking Tips) भजी तळून घ्याव्यात.

Amazon : वर सुरु होतोय ‘Great Freedom Sale’ ; अवघ्या 99 रुपयांपासून वस्तू खरेदीची संधी

Amazon : भारतातील प्रसिद्ध इ कॉमर्स वेबसाईट ॲमेझॉन वर लवकरच ‘द ग्रेट फ्रीडम फेस्टिवल’ हा सेल सुरू होणार आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर ॲमेझॉन हा सेल डिक्लेअर केला आहे. या सेल ची सुरुवात 6 ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजल्यापासून होणार आहे. मात्र नेहमीप्रमाणे प्राईम मेंबर्स एक दिवस आधी या सेलचा फायदा घेऊ शकतात. चला तर मग जाणून घेऊया या सेलचे काही (Amazon) खास वैशिष्ट्य

मोबाईल फोन्सवर ऑफर

येथून तुम्हाला अनेक लेटेस्ट ब्रँडचे फोन अतिशय स्वस्त दरात खरेदी करण्याची संधी आहे. फोनवर किती डिस्काउंट मिळेल याची माहिती सध्या तरी मिळालेली नाही, पण हो, सेलमध्ये कोणते फोन डिस्काउंटमध्ये उपलब्ध करून दिले जातील हे मात्र नक्की (Amazon) दिले आहे. OnePlus Open Fold, OnePlus 12, iQOO Neo 9 Pro, iQOO 12, Realme Narzo 70 Pro, Redmi 13 5G, Redmi Note 13 Pro 5G, Samsung Galaxy S24, Galaxy M15 5G आणि बरेच काही फोन खरेदी केले जाऊ शकतात.

स्मार्ट TV परवडणाऱ्या दरात (Amazon)

जर तुम्ही घरासाठी स्मार्ट टीव्ही घेण्याचा विचार करत असाल, तर तुम्हाला सेलमध्ये स्मार्ट टीव्हीवर जोरदार सूटही दिली जाईल. विक्रीमध्ये परवडणाऱ्या किमतीच्या टीव्हीवरही मोठी बचत केली जाऊ शकते. सेलमध्ये, ग्राहकांना 55 इंच, 43 इंच सारख्या आकाराच्या टीव्हीवरही सूट (Amazon) मिळेल.

अगदी 99 रुपयांतही खरेदी … (Amazon)

तुम्ही येथून 99 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत खरेदी करू शकतील. येथून, हेडफोन्स 699 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत, 799 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत स्मार्ट घड्याळे, 99 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत कॉम्प्युटर ॲक्सेसरीज आणि 799 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत कॅमेरा ॲक्सेसरीज खरेदी करता (Amazon) येतील.

Amazon डिव्हाइसेस स्वस्त किमतीत

Amazon च्या ग्रेट फ्रीडम सेलमध्ये, Amazon डिव्हाइसेस देखील स्वस्त किमतीत खरेदी करता येतात. या श्रेणीतून 2,799 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत खरेदी करता येईल.येथून, फायर टीव्ही डिव्हाइसेस 2,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत, Alexa स्मार्ट स्पीकर 3,449 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत, Alexa स्मार्ट होम 3,749 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत आणि 5,499 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत स्क्रीन केलेले स्मार्ट स्पीकर खरेदी करण्याची संधी आहे.

Realme : तोबा…! तोबा…! Realme ने आणले दोन जबरदस्त फोन; पहा फीचर्स आणि किंमत

Realme : मोबाईलच्या जगात Realme ची चांगलीच चालती आहे. आता या कंपनीने आणखी दोन नवे फोन लॉन्च केले आहेत. हे दोन्ही फोन Realme 13 Pro सिरीज मधील असून त्यांचे नाव Realme 13 Pro 5G आणि Realme 13 Pro+ 5G असे आहे. कंपनीने Realme 13 Pro + 5G तीन प्रकारांमध्ये लॉन्च केले आहे – 8 GB + 256 GB, 12 GB + 256 GB आणि 12 GB + 512 GB. चला जाणून घेऊया याची वैशिष्ट्ये आणि फीचर्स

याच्या बेस व्हेरिएंटची किंमत २९,९९९ रुपये आणि मिड व्हेरिएंटची किंमत ३१,९९९ रुपये आहे. फोनच्या टॉप एंड वेरिएंटसाठी तुम्हाला 33,999 रुपये खर्च करावे लागतील. या फोनच्या किमती 3 हजार रुपयांच्या बँक ऑफरसह आहेत. हा फोन मोनेट गोल्ड आणि एमराल्ड ग्रीन (Realme) या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये येतो.

Realme 13 Pro 5G

Realme च्या या फोनमध्ये तुम्हाला फुल एचडी+ रिझोल्यूशनसह 6.7 इंचाचा OLED डिस्प्ले मिळेल. हा डिस्प्ले 120Hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. या फोनमध्ये Snapdragon 7s Gen 2 प्रोसेसर असून 12 GB रॅम आणि 512 GB इंटरनल स्टोरेज आहे. फोटोग्राफीसाठी कंपनी या फोनमध्ये दोन रियर कॅमेरे देत आहे. यामध्ये 50-मेगापिक्सलच्या मुख्य लेन्ससह 8-मेगापिक्सेल अल्ट्रा-व्हाइट अँगल लेन्सचा समावेश आहे. सेल्फीसाठी फोनच्या समोर 32-मेगापिक्सलचा कॅमेरा बसवण्यात आला आहे. या फोनची बॅटरी 5200mAh आहे, जी 45 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

Realme 13 Pro बद्दल बोलायचे तर ते तीन प्रकारात लॉन्च केले गेले आहे. त्याच्या 8 GB + 128 GB व्हेरिएंटची किंमत 23,999 रुपये आहे आणि 8 GB + 256 GB व्हेरिएंटची किंमत 25,999 रुपये आहे. त्याच वेळी, कंपनीने त्याच्या 12 जीबी रॅम आणि 512 जीबी इंटरनल स्टोरेजसह व्हेरिएंटची किंमत 28,999 रुपये ठेवली आहे. या किमतीत हा फोन 3 हजार रुपयांच्या बँक डिस्काउंटसह उपलब्ध असेल.

Realme 13 Pro+ 5G

कंपनीने या फोनमध्ये 1080×2412 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.7-इंचाचा फुल HD+ डिस्प्ले देत आहे. हा डिस्प्ले 120Hz पर्यंत रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. फोन 12 GB रॅम आणि 512 GB पर्यंत अंतर्गत स्टोरेज पर्यायात येतो. प्रोसेसर म्हणून, यात Snapdragon 7s Gen 2 चिपसेट आहे. फोटोग्राफीसाठी फोनच्या मागील बाजूस OIS सह 50-मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा देण्यात आला आहे.याशिवाय, कंपनीने या फोनमध्ये 50-मेगापिक्सलचा पेरिस्कोप टेलीफोटो कॅमेरा आणि 8-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स समाविष्ट केला आहे. सेल्फीसाठी कंपनी फोनमध्ये 32-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देत आहे. फोनमध्ये कॅमेरे अनेक उत्कृष्ट AI वैशिष्ट्यांसह येतात. या Realme फोनची बॅटरी 5200mAh आहे, जी 80W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

कुठून खरेदी कराल ?

  • या फोनची अर्ली बर्ड सेल आज संध्याकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत चालणार आहे.
  • प्री-बुकिंग उद्या दुपारी 12 वाजता सुरू होईल.
  • पहिला सेल 6 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता सुरू होईल.
  • हा मोबाईल Flipkart आणि Realme वेबसाइटवरून खरेदी करू शकता.
  • पहिल्या सेलमध्ये फोनवर 3000 रुपयांपर्यंतची बँक ऑफर आहे.

Mukhyamantri Ladaki Bahin Yojana | लाडकी बहीण योजनेचे मोठे अपडेट; अर्ज मंजूर होण्यास शासनाकडून सुरुवात

Mukhyamantri Ladaki Bahin Yojana

Mukhyamantri Ladaki Bahin Yojana | विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असतानाच राज्य सरकारने देशातील राज्यातील महिलांसाठी माझी लाडकी बहीण योजना (Mukhyamantri Ladaki Bahin Yojana ) आणलेली आहे. आता या योजनेचा अर्ज भरण्याचे काम जवळपास महिन्यापासून सुरू झालेले आहे. आणि महिलांनी हा अर्ज देखील भरलेला आहे. परंतु आता भरला असेल, तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची माहिती येत आहे. ती म्हणजे आतापर्यंत आपण जर अर्ज भरला असेल, तर त्यात पेंडिंग टू सबमिट असे येत होते. परंतु आता हे अर्ज मंजूर होण्यास सुरुवात झालेली आहे. त्यामुळे आता तुम्हाला घरबसल्या तुमचा अर्ज मंजूर झाला आहे की, ना मंजूर झाला आहे. हे कळणार आहे. तुमच्या फॉर्ममध्ये काही आवश्यक बदल करायचे असल्यास ते देखील सांगितले जाणार आहे. आता ते कसे सांगितलं जाणार आहे. याबाबतची माहिती आपण जाणून घेणार आहोत.

तुम्ही लाडकी बहीण योजनेचा (Mukhyamantri Ladaki Bahin Yojana ) फॉर्म भरला, तेव्हा तो अर्ज भरताना सबमिट केल्यानंतर तुमच्या समोर इन पेंडिंग टू सबमिट असा पर्याय येत असेल. परंतु याचा नेमका अर्थ काय होतो असे अनेकांना प्रश्न पडला होता.याचा अर्थ असा आहे की तुमचा अर्ज सबमिट झालेला आहे आणि आता सरकारी अधिकारी तुमच्या अर्जाची पडताळणी करत आहे. तुमचा हा अर्ज मंजूर झाल्यानंतर तुम्हाला त्याची माहिती देखील मिळणार आहे.

तुमचा अर्ज सबमिट केल्यानंतर तिथे आणखी एक पर्याय दिसेल. त्यात एसएमएस व्हेरिफिकेशन असा पर्याय असेल. याचा अर्थ की तुमचा अर्जाची पडताळणी झालेली आहे. आणि दुसरा पर्याय येतो तो म्हणजे एडिट त्यावर क्लिक करून तुम्ही तुमच्या अर्जात देखील दुरुस्ती करू शकता. यात तुम्हाला आणखी एक पर्याय दिसेल यात तुम्हाला इंग्रजीमधील i हे चिन्ह दिसेल, त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या अर्जाची स्थिती पाहायला मिळेल.

मंजूर / Approved | Mukhyamantri Ladaki Bahin Yojana

जर तुमचा अर्ज पूर्ण तपासला गेला असेल, आणि त्यात कोणत्याही प्रकारची चूक नसेल, तर महाराष्ट्र राज्य सरकार द्वारे हा अर्ज मंजूर केला जातो. असे झाल्यास तुम्हाला अप्रूव्ह अशी स्थिती दिसेल.

ना मंजूर / Rejected

जर तुम्ही या अर्जात तुमच्या पात्रतेचे निकस पूर्ण केले नसतील, किंवा अर्जामध्ये चुका असेल, तर महाराष्ट्र राज्य सरकार अर्ज तुमचा नाकारेल तेव्हा तुम्हाला तिथे रिजेक्टेड अशी स्थिती दिसेल.

प्रलंबित / Pending

तुमच्या कागदपत्राची तपासणी जर सरकारकडून होत असेल तर त्यावेळी तुम्हाला पेंडिंग असा पर्याय तुमच्या स्क्रीनवर दिसेल.

1 ऑगस्टला अंतिम यादी जाहीर होणार

लडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2024 पर्यंत आहे. पण या योजनेचा अर्ज केलेल्या पात्र लाभार्थ्यांची अंतिम यादी 1 ऑगस्टला प्रसिद्ध केली. जाणार आहे त्यामुळे आता लाडकी बहीण योजनेचे पैसे 14 ऑगस्टला महिलांच्या खात्यात जमा होण्याची प्रक्रिया सुरू होईल . आणि 15 ऑगस्टपर्यंत सर्व लाभार्थी महिलांनाही रक्कम मिळणार आहे. त्यानंतर दर महिन्याला महिलांच्या खात्यात दीड हजार रुपयांची रक्कम होईल.

Fastag Rule : महत्वाची बातमी !!! 1 ऑगस्ट पासून लागू होणार Fastag चे नवे नियम

Fastag Rule : तुम्ही जर कामानिमित्त वारंवार हायवे वरून प्रवास करीत असाल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. टोलनाक्यावर प्रवाशांना ताटकळत उभे राहावे लागू नये यासाठी फास्टॅग अनिवार्य करण्यात आले आहे. मात्र येत्या 1 ऑगस्ट पासून फास्टॅग संदर्भात नवे नियम लागू करण्यात येणार आहेत. शिवाय जर हे नियम पाळले गेले नाहीत तर तुम्हाला दंडही ठोठावण्यात येऊ शकतो. चला तर मग जाणून घेऊया (Fastag Rule) या नियमांबद्दल

90 दिवसात फास्टॅग करा अपडेट (Fastag Rule)

वाहन घेतल्यावर 90 दिवसात फास्टॅग क्रमांकावर वाहन नोंदणी क्रमांक अपलोड करावा लागणार आहे अन्यथा नंबर हॉटलिस्ट मध्ये जाणार आहे. एकदा का तुमचे वाहन हॉ लिस्ट मध्ये आले त्यानंतर तुम्हाला 30 दिवसांचा अतिरिक्त वेळ दिला जातो. या दिवसांमध्ये देखील जर तुमचा आवाहन नोंदणी क्रमांक अपलोड केला नाही तर मात्र तुम्हाला फास्टॅगच्या काळ्या यादीमध्ये टाकलं (Fastag Rule) जाईल.

मुदत केवळ 31 ऑक्टोबर पर्यंत

नॅशनल पेमेंट्स कार्पोरेशन ऑफ इंडिया ने जून मध्ये फास्टॅग बद्दल तपशीलवार मार्गदर्शक तत्व जारी केली होती. ज्यामध्ये फास्टॅग सेवा पुरवतात कंपन्यांची केवायसी प्रक्रिया सुरू करण्यासाठी एक ऑगस्ट ही तारीख निश्चित करण्यात आली (Fastag Rule) होती. आता कंपन्यांकडे सर्व अटी पूर्ण करण्यासाठी एक ऑगस्ट ते 31 ऑक्टोबर अशी मुदत असेल. नवीन अटींनुसार नवीन फास्टॅग जारी करणे आणि री-फास्टॅग, सुरक्षा ठेव आणि किमान रिचार्जशी संबंधित शुल्क देखील एनपीसीआयद्वारे निर्धारित केले आहे.

3 महिन्यांपर्यंत फास्टॅगद्वारे व्यवहार न केल्यास बंद

दुसरीकडे काही फास्टॅग कंपन्यांनीही फास्टॅग सक्रिय असायला हवे असा नियम जोडला आहे. यासाठी तीन महिन्यांत व्यवहार होणे आवश्यक आहे. जर व्यवहार झाला नाही तर तो निष्क्रिय होईल, त्यासाठी पोर्टलवर जावे लागेल. या नियमामुळे जे लोक (Fastag Rule) आपली वाहने मर्यादित अंतरासाठी वापरतात त्यांच्यासाठी अडचणी निर्माण करणार आहेत, ज्यामध्ये कोणतीही टोल कपात केली जात नाही.

हे नियम 1 ऑगस्टपासून लागू होतील

  • कंपन्यांना पाच वर्षे जुना फास्टॅग प्राधान्याने बदलावा लागेल.
  • तीन वर्षे जुन्या फास्टॅगचे केवायसी पुन्हा करावे लागेल
  • वाहन नोंदणी क्रमांक, चेसिस क्रमांक फास्टॅगशी जोडलेला असावा
  • नवीन वाहन खरेदी केल्यानंतर त्याचा नंबर 90 दिवसांच्या आत अपडेट करावा लागेल.
  • फास्टॅग सेवा पुरवठादार कंपन्यांनी वाहनांचा डेटाबेस सत्यापित करायला हवा.
  • केवायसी करताना तुम्हाला वाहनाच्या समोर आणि बाजूचे (Fastag Rule) स्पष्ट फोटो अपलोड करावे लागतील.
  • फास्टॅग मोबाईल नंबरशी लिंक करणे अनिवार्य असेल
  • केवायसी पडताळणी प्रक्रियेसाठी ॲप, व्हॉट्सॲप आणि पोर्टलसारख्या सेवा उपलब्ध करून द्याव्या लागतील.
  • कंपन्यांना 31 ऑक्टोबर 2024 पर्यंत केवायसी नियम पूर्ण करावे लागतील

फास्टॅग सेवेवर बँका आकारणार शुल्क (Fastag Rule)

स्टेंटमेंट – 25 रुपये प्रति एक
फास्टॅग बंद करणे – 100 रु
टॅग व्यवस्थापन – रु 25/तिमाही
ऋण शिल्लक – रु 25/तिमाही