Monday, December 22, 2025
Home Blog Page 565

Mumbai University Bharti 2024 | मुंबई विद्यापीठ अंतर्गत होणार 156 रिक्त पदांची भरती; येथे करा अर्ज

Mumbai University Bharti 2024

Mumbai University Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही नेहमीच नोकरीच्या विविध संधी घेऊन येत असतो. आज देखील आम्ही अशीच एक संधी घेऊन आलेलो आहोत. अनेक लोकांची मुंबई विद्यापीठात नोकरी करण्याची इच्छा असते. आता त्यांची ही इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. कारण मुंबई विद्यापीठ मुंबई (Mumbai University Bharti 2024)अंतर्गत एक मोठी भरती निघालेली आहे. ही भरती संचालक प्राध्यापक या पदासाठी आहे. या पदाच्या एकूण चार रिक्त जागा आहेत आणि त्या भरण्यासाठी इच्छुकानी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. या भरतीचा अर्ज तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाइनच्या माध्यमातून करू शकता. त्याचप्रमाणे 17 ऑगस्ट 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे उमेदवारांनी लवकरात लवकर या तारखे अगोदर अर्ज करा. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.

महत्वाची माहिती | Mumbai University Bharti 2024

  • पदाचे नाव – संचालक, प्राध्यापक
  • पदसंख्या – 04 जागा
  • नोकरी ठिकाण – मुंबई
  • वयोमर्यादा – 60 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन/ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता -कुलसचिव, मुंबई विद्यापीठ, कक्ष क्र. 25, फोर्ट, मुंबई-400032
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 ऑगस्ट 2024

अर्ज कसा करावा ?

  • या भरतीचा अर्ज तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाइन पद्धतीने भरू शकता.
  • तुम्ही वर दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवू शकता.
  • किंवा खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून देखील अर्ज करू शकता.
  • अर्ज करण्यापूर्वी पीडीएफ जाहिरात सविस्तरपणे वाचा.
  • 17 ऑगस्ट 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या तारखे अगोदर अर्ज करा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा

पीडीएफ जाहिरात वाचण्यासाठी इथे क्लिक करा

Mahanirmiti Khaparkheda Bharti 2024 | महानिर्मिती खापरखेडा अंतर्गत मोठी भरती सुरु; असा करा अर्ज

Mahanirmiti Khaparkheda Bharti 2024

Mahanirmiti Khaparkheda Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही एक नोकरीची अतिशय महत्त्वाची संधी घेऊन आलेलो आहोत. त्यामुळे हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा. आता महाराष्ट्र औष्णिक विद्युत केंद्र खापरखेडा (Mahanirmiti Khaparkheda Bharti 2024) नागपूर अंतर्गत एक मोठी भरती निघालेली आहे. या भरती अंतर्गत ट्रेड अप्रेंटिस या पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या पदाच्या एकूण 93 रिक्त जागा आहेत. आणि त्या जागा भरण्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. ही भरती ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. त्यामुळे उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे. त्याचप्रमाणे 30 जुलै 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे या तारखे अगोदरच लवकरात लवकर अर्ज करा. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.

महत्वाची माहिती | Mahanirmiti Khaparkheda Bharti 2024

  • पदाचे नाव – ट्रेड अप्रेंटिस
  • पद संख्या – 93जागा
  • नोकरी ठिकाण – खापरखेडा, नागपूर
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 जुलै 2024
  • शैक्षणिक पात्रता – ITI पास
  • वेतनश्रेणी – 7000 रुपये दरमहा

अर्ज कसा करावा ?

  • या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून देखील अर्ज करू शकता.
  • ३० जुलै 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या तारखे अगोदरच अर्ज करा.
  • अर्ज करण्यापूर्वी पीडीएफ जाहिरात सविस्तरपणे वाचा

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा

पीडीएफ जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा

ST Bus Strike : लालपरी पुन्हा संपावर जाणार ; काय आहेत कर्मचाऱ्यांच्या मागण्या ?

ST Bus Strike : शहरी भागाशिवाय ग्रामीण भागातील वाड्यावस्त्यांवर पोहोचणारी लालपरीची चाकं आता थांबतील की काय ? अशा स्थितीमध्ये आहेत. कारण राज्य परिवहन मंडळाचे कर्मचारी पुन्हा एकदा संपावर जाणार असल्याची बातमी आहे. येत्या 9 ऑगस्ट पासून एसटी महामंडळातील 13 संघटनांनी संप पुकारला आहे.

त्यामुळे राज्यात लाल परीची चाकं थांबणार की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या प्रमाणात एसटीच्या कर्मचाऱ्यांना वेतन देण्यात यावे या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांवरून हा (ST Bus Strike) संप पुकारण्यात आला आहे.

यापूर्वी एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी 2021 मध्ये दीर्घ आंदोलन (ST Bus Strike) केलं होतं. त्यावेळी एसटी बंद झाल्यामुळे अनेकांची गैरसोय झाली होती. हा संप तब्बल 54 दिवस चालू राहिला होता. या संपानंतर राज्य शासनाने काही मागण्या मान्य केल्या होत्या मात्र कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर करण्याचे आश्वासन दिले गेले होते. परंतु त्या सर्व मागण्या पूर्ण झाल्या नाहीत असा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा कर्मचाऱ्यांनी (ST Bus Strike) संपाची हाक दिली आहे. आता ऑगस्ट महिन्यात अनेक सण येणार आहेत त्यामुळे या काळात प्रवाशांच्या संख्यांमध्ये मोठी वाढ होते पण एकूणच संपामुळे प्रवाशांची गैरसोय होऊ शकते

काय आहेत मागण्या (ST Bus Strike)

सर्वच कामगारांच्या मूळ वेतनामध्ये सरसकट पाच हजार रुपयांची वाढ करावी,

  • राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटीच्या कर्मचाऱ्यांना वेतन देण्यात यावं.
  • सन 2016 ते 2020 या कालावधीसाठी जाहीर केलेल्या 4849 कोटी मधील शिल्लक रक्कम वाटप करावी.
  • कामगार कराराच्या तरतुदीनुसार शासकीय कर्मचाऱ्यांना देय होणारी थकबाकी महागाई भत्ता देण्यात यावा.
  • घरभाडे भत्ता व वार्षिक वेतन वाढ थकबाकी अदा (ST Bus Strike) करावी.

Ola Electric Motorcycle | ओला बाजारात आणणार नवी इलेक्ट्रिक बाईक; सोशल मीडियावर दिली मोठी हिंट

Ola Electric Motorcycle

Ola Electric Motorcycle | सध्या इलेक्ट्रिक गाड्यांचा ट्रेंड मोठ्या प्रमाणात चालत आहे. अनेक लोक हे डिझेल आणि पेट्रोलच्या गाड्या घेण्याऐवजी आता इलेक्ट्रिक गाड्या घेत आहेत. आता या सेगमेंटमध्ये ओला देखील इलेक्ट्रिक बाइकमध्ये त्यांचे आढळ स्थान निर्माण करणार आहे. ती म्हणजे आता ओलाने इलेक्ट्रिक बाइक ग्राहकांसाठी बाजारात लॉन्च करणार आहे. ओला कंपनीचे (Ola Electric Motorcycle) सीईओ आणि संस्थापक भावीश अग्रवाल यांनी याबाबतची माहिती सोशल मीडियावर दिलेली आहे. या आधीओला कंपनीने इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात लॉन्च केली होती. त्यामुळे खूप मोठा धमाका झाला होता. परंतु आता त्यांच्या बाईकमध्ये नक्की काय वैशिष्ट्य असणार आहे? काय फीचर्स असणार आहेत? या गोष्टीची माहिती आपण जाणून घेऊया.

सोशल मीडियावर शेअर केलेल्या या इमेजमध्ये एक बॅटरी दिसत आहे. ज्याबद्दल सगळेजण असा अंदाज लावत आहे की, बॅटरी व्हायब्रंटच्या आगामी ओला इलेक्ट्रिक मोटरसायकलची असू शकते. काही काळापूर्वी या कंपनीने सांगितले होते की कंपनी हायमेंडहेड, रोडस्टर एडवेंचर आणि क्रूजर या चार इलेक्ट्रिक बाइक्स मॉडेलवर देखील काम करत आहेत.

ही इमेज शेअर करत भाविश अग्रवाल यांनी वर्किंग ओन समथिंग असे कॅप्शन देखील दिलेले आहे. त्यामुळे आता सगळ्यांमध्ये उत्साहते वातावरण निर्माण झालेले आहे. गेल्या वर्षी ओलाने पहिली कन्सेप्ट बाईक प्रदर्शित केली आणि त्याचवेळी कंपनीने 2024 मध्ये काहीतरी नवीन आणि खास लॉन्च करू असे देखील सांगितले होते.

सीईओ भाविश यांनी शेअर केलेल्या या फोटोमध्ये शक्तिशाली बॅटरी पॅक दिसत आहे. जी आकाराने खूप मोठी दिसते. यासोबतच इथे स्प्रकिटचेनही दिसत आहे. त्यामुळे ओलाची ही बाईकखूप सुंदर असू शकते, असे सगळेजण अंदाज लावत आहे. त्यामुळे आता येत्या 15 ऑगस्ट रोजी ओला ही त्यांची बाईक बाजारात लॉन्च करू शकते. असे देखील सगळेजण अंदाज लावत आहेत.

BSNL Recharge Plan | BSNL चा नवीन प्लॅन होतोय 18 रुपयापासून सुरु; जाणून घ्या फायदे

BSNL Recharge Plan

BSNL Recharge Plan | जुलै महिन्याच्या सुरुवातीला जिओ, एअरटेल आणि व्हिआय या खाजगी लोकप्रिय नेटवर्क कंपन्यांनी त्यांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये मोठ्या प्रमाणात दरवाढ केली आहे. रिचार्ज प्लॅनमध्ये मोठ्या संख्येने वाढ झाल्याने त्यांचे ग्राहक देखील नाराज झालेली दिसत आहे. त्याबरोबर बीएसएनएल (BSNL Recharge Plan) ही भारतातील सर्वात मोठी सरकारी दूरसंचार सेवा असलेली कंपनी आहे. जी ग्राहकांना देखील चांगले रिचार्ज प्लॅन ऑफर करत असते. 18 रुपयांपासून ते 1099 रुपयांच्या पर्यंतच्या सगळ्या प्लॅन्स तुम्हाला ऑफर करत. यामध्ये तुम्हाला डेटा अनलिमिटेड व्हाईज कॉलिंग तसेच एसएमएस यांसारखे फायदे मिळतात.

बीएसएनएलच्या आकर्षक ऑफर्स | BSNL Recharge Plan

एसएमएस पॅक

बीएसएनएल त्यांच्या ग्राहकांसाठी अतिरिक्त एसएमएस पॅक देखील ऑफर करते. या पॅकमध्ये तुम्हाला अत्यंत कमी दरात एसएमएस पाठवायला मिळतात. त्यामुळे जे लोक जास्त एसएमएस वापरतात त्यांच्यासाठी हा चांगला पॅक आहे.

फुल टॉक टाइम टॉप

बीएसएनएल हे फुल टॉकटाईम रिचार्ज प्लॅन देखील देत असते. या पॅकमध्ये तुम्हाला फोनवर बोलता येऊ शकते. हा रिचार्ज प्लॅन केवळ कॉलिंगसाठी वापरला जातो. त्यामुळे तुम्ही तुमच्या गरजेनुसार बीएसएनएलच्या प्लॅन सक्रिय करू शकता.

बीएसएनएलचे रिचार्ज प्लॅन | BSNL Recharge Plan

  • 18 रुपये – 2 दिवसासाठी दररोज एक जीबी डेट
  • 87 रुपये – 14 दिवसांसाठी एक जीबी डेटा अनलिमिटेड वोईस कॉल आणि दररोज 100 एसएमएस
  • 99 रुपये – 18 दिवसांसाठी अनलिमिटेड वाईस कॉल आणि फ्री प्रिविटी
  • 105 रुपये – 18 दिवसांसाठी आम्ही अनलिमिटेड वाईज कॉलनीतून दोन जीबी डेटा.
  • 18 रुपये – 20 दिवसांसाठी दररोज 0.5 जीबी डेटा आणि अनलिमिटेड वाईज कॉल
  • 139 रुपये – 28 दिवसांसाठी अनलिमिटेड बॉइज कॉल आणि दररोज दीड जीबी डेटा तसेच 100 sms फ्री
  • 147 रुपये – 30 दिवसांसाठी 10 जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग
  • 184 ते 187 रुपये – 28 दिवसांसाठी दररोज एक जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग
  • 228 ते 299 रुपये – यामध्ये तुम्हाला दररोज 3 जीबी डेटा अनलिमिटेड वाईस कॉल आणि 100 sms
  • 319 रुपये – 75 दिवसांसाठी अनलिमिटेड व्हॉइस कॉल
  • 347 ते 769 रुपये – 56 ते 84 दिवसांसाठी दररोज दोन ते बारा जीबी डेटा तसेच अनलिमिटेड कॉलिंग.

Kitchen Tips : तुम्ही सुद्धा चुकीच्या पद्धतीने डाळ शिजवता का ? वाचा योग्य पद्धत

Kitchen Tips : भारतात जवळपास प्रत्येक घरात डाळ शिजत असते. भारतीय खाद्यसंस्कृतीमध्ये डाळींना खूप महत्व आहे. म्हणूनच डाळ ही भारतीय जेवणातील प्रमुख घटक आहे. प्रोटिन्सचा सोर्स म्हणजे डाळ. पण याच बरोबर यात मिनरल आणि व्हिटॅमिन्स पण असतात. म्हणूनच डाळ अगदी लहान मुलांपासून , वृद्ध आणि आजारी व्यक्तींना सुद्धा दिली जाते. पण तुम्हाला माहितीये का ? एका विशिष्ट पद्धतीने डाळ शिजवली तर त्यामधील पोषकतत्व टिकून राहतात. शिवाय चवीला सुद्धा अशी डाळ अप्रतिम होते चला तर मग जाणून घेऊया ही डाळ (Kitchen Tips) शिजवण्याची पद्धत…

डाळ शिजवण्यासाठीच्या टिप्स (Kitchen Tips)

  • तुम्ही ज्या डाळीचा वापर करत आहात ती डाळ शिज वण्याआधी दोन ते तीन वेळा पाण्याने धुऊन घ्या. जेणेकरून डाळीवरील केमिकल्स आणि पॉलिश निघून जाईल
  • डाळ शिजायला टाकण्याआधी डाळ 15 ते 20 मिनिटे पाण्यात भिजत ठेवा. असं केल्यामुळे डाळ फुलेल आणि शिजायलाही जास्त वेळ लागणार नाही.
  • कोणताही अन्नपदार्थ बनवताना तो प्रमाणात असावा म्हणजे जर तुम्ही डाळ बनवणार असाल तर डाळीच्या (Kitchen Tips) प्रमाणात पाणी घ्यावे लागेल. तुम्ही एक वाटी डाळ बनवत असाल तर आधी पॅन किंवा प्रेशर कुकरमध्ये तीन ते साडेतीन कप पाणी टाका.
  • भांड्यात किंवा प्रेशर कुकरमध्ये आधी पाणी टाका या आता एक चमचा मीठ अर्धा चमचा हळद पावडर टाका पाण्याला चांगली उकळी येऊ द्या आणि नंतर त्यामध्ये डाळ टाका. आता यावर छान झाकण ठेवा किंवा प्रेशर कुकर चे झाकण लावा. गॅस कमी आचेवरच असू द्या (Kitchen Tips) काही वेळाने डाळीला फेस आला तर झाकण लावण्या आधी तो फेस काढून टाकावा.
  • दुसरी गोष्ट म्हणजे डाळ शिजवत असताना त्यामध्ये थोडसं तेल टाकलं तर यामुळे डाळीची चमक वाढते तसेच डाळीला (Kitchen Tips) टेस्टही चांगली येते.
  • आता जर तुम्ही कुकरमध्ये डाळ शिजवत असाल तर कमीत कमी तीन ते चार शिट्या होऊ द्यात. गॅस वरून कुकर खाली काढा. शिट्टी आपोआप (Kitchen Tips)खाली पडू द्या. जर तुम्ही पातेल्यात डाळ शिजवत असाल तर कमी आचेवर ही डाळ पंधरा मिनिटे शिजू द्या.

HDFC Bank | HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी मोठा धक्का; 1 ऑगस्टपासून बदलणार क्रेडिट कार्डसंबंधित नियम

HDFC Bank

HDFC Bank | ऑगस्ट महिना सुरू होणार आहे. कोणताही महिना सुरू झाल्यावर अनेक नियम बदलत असतात. एक ऑगस्टपासून देखील अनेक नियमानमध्ये बदल होणार आहे. यामध्ये फायनान्सच्या नियमानमध्ये देखील मोठ्या प्रमाणात बदल होणार आहे. एचडीएफसी बँकेच्या (HDFC Bank) क्रेडिट कार्ड धारकांना या बदलाचा मात्र चांगलाच फटका बसणार आहे. ती म्हणजे बँकेच्या आता क्रेडिट कार्ड धारकांना थर्ड पार्टी पेमेंट ॲपच्या माध्यमातून होणाऱ्या सर्व रेंटल व्यवहारांवर जवळपास 1 टक्के एवढी रक्कम आकारली जाणार आहे.

त्याचप्रमाणे तुम्हाला कोणताही व्यवहार करायचा असेल तर त्यासाठी कमाल मर्यादा ही 3 हजार रुपये एवढी ठेवण्यात आलेली आहे. आजकाल पेटीएम क्रेड यांसारखे थर्ड पार्टी पेमेंटचा वापर करून देखील डेंटल व्यवहार करता येतो. परंतु आता या रेंटल व्यवहारावर तुम्हाला 1 टक्के शुल्क आकारण्यात येईल. युटिलिटी ट्रांजेक्शन करायचे असेल, तर 50000 पेक्षा कमी व्यवहारांवर तुम्हाला कोणत्याही प्रकारचे अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाहीत. परंतु जर तुम्ही 50 हजारांपेक्षा जास्त रकमेचे व्यवहार केले, तर त्यावर तुम्हाला एक टक्के शुल्क आकारले जाणार आहे. प्रत्येक व्यवहाराची मर्यादा ही 3 हजार रुपये आहे.

इंधन व्यवहार | HDFC Bank

इंधन व्यवहारांमध्ये तुम्हाला 15 हजार रुपयांपेक्षा जास्त व्यवहार केला, तर तुम्हाला एक टक्का शुल्क आकारले जाईल. तसेच इतर या खालील व्यवहारांवर तुम्हाला कोणतेही प्रकारची अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही. या व्यवहारांची कमाल मर्यादा ही तीन हजार रुपये प्रति व्यवहार एवढी आहे. परंतु तुम्ही जर थर्ड पार्टी पेमेंट ॲपद्वारे ट्रांजेक्शन केले तर त्यावर तुम्हाला 1 टक्का शुल्क आकारले जाईल.

प्रत्येक व्यवहारासाठी 3 हजारांची मर्यादा

एचडीएफसी (HDFC Bank) बँकेच्या क्रेडिट कार्ड धारकांसाठी कोणतेही व्यापारांसाठी 3 हजार रुपयांची मर्यादा ठेवण्यात आलेली आहे. यावर आंतरराष्ट्रीय शिक्षण देयके या शुल्कातून वगळण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे क्रेडिट सुविधा वापरणाऱ्या ग्राहकांना दर महिन्याला 3.75 टक्के शुल्क आकारण्यात येणार आहे.

ईएमआय प्रोसेसिंग फी

तुम्हाला जर कोणत्याही ऑनलाईन किंवा ऑफलाइन स्टोअर मध्ये ईएमआय पर्यायचा लाभ घेण्यासाठी 299 रुपयांची ईएमआय प्रोसेसिंग फी भरावी लागेल. तसेच आता एचडीएफसी बँकेने टाटा न्यू इन्फिनिटी आणि टाटा न्यू प्लस क्रेडिट कार्डच्या नियमांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात बदल केलेले आहे. आणि हे बदल आता 01 ऑगस्ट 2024 पासून लागू होणार आहेत

Google Map | गुगल मॅपच्या नियमांमध्ये 1 ऑगस्टपासून होणार बदल; सेवांसाठी मोजावे लागणार अतिरिक्त पैसे

Google Map

Google Map | आपल्या भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 23 जुलै 2024 रोजी अर्थसंकल्प सादर केलेला आहे. त्यामुळे अर्थसंकल्पातील काही नियम हे ऑगस्ट महिन्यापासून चालू होणार आहेत. आता काही दिवसातच ऑगस्ट महिना सुरू होईल. दर महिन्याच्या पहिल्या दिवशी काही ना काही बदल होत असतात. आता या बदलानुसार ऑगस्ट महिन्यात काही वस्तूंच्या किमती वाढण्याची देखील शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. आणि त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर अतिरक्त तान पडणार आहे. अशातच आता गुगल मॅपने देखील त्यांच्या काही नियमांमध्ये बदल केलेले आहेत.

गुगल मॅप्सच्या (Google Map) अनेक नियम बदललेले आहेत. आणि हे नियम 1 ऑगस्ट 2024 पासून संपूर्ण देशात लागू होणार आहे. गुगल मॅपने त्यांची किंमत 70% पर्यंत कमी केलेली आहे यासोबत गुगल मॅपचे शुल्क डॉलर ऐवजी आता भारतीय रुपयांमध्ये देखील करण्याची घोषणा त्यांनी केलेली आहे. तसेच आता ऑलम्पिक नकाशा देखील तुम्ही विनामूल्य वापरू शकता.

सर्वसामान्य नागरिकांना आता या गुगल मॅपमधील (Google Map) बदलांचा जास्त काही परिणाम होणार नाही. परंतु जर तुम्ही तुमच्या व्यवसायासाठी गुगल मॅपचा वापर करत असाल, तर यासाठी तुम्हाला जास्त पैसे मोजावे लागणार आहे. तसेच तुम्ही आता इथून पुढे भारतीय रुपयांमध्ये देखील हे पेमेंट करू शकता. सर्वसामान्य नागरिकांसाठी गुगल मॅपची सेवा ही मोफत आहे. परंतु तुम्ही जर त्याचा व्यवसायासाठी वापर केला, तर त्यासाठी तुम्हाला शुल्क द्यावे लागेल

रॅपिडो ही राइडिंग शेअर कंपनी आहे. कंपनी नेवीगेशनसाठी गुगल मॅप वापरत असते. अशावेळी जर तुम्ही गुगल मॅप वापरत असाल, तर तुम्हाला पैसे द्यावे लागणार आहेत. आणि आता त्या किमती बदलण्यात आलेल्या आहे. गुगल नेवीगेशन भारतीयांकडून दर महिन्याला जवळपास चार ते पाच डॉलर्स शुल्क आकारत होते. परंतु आता 1 ऑगस्टपासून तुम्हाला डॉलर ऐवजी भारतीय रुपयांमध्ये पैसे भरता येणार आहे.

Diabetes Treatment | पुण्यातील कंपनीने मधुमेहावर शोधले औषध; पायाच्या जखमांवर होणार प्रभावी उपचार

Diabetes Treatment

Diabetes Treatment | आजकाल लोकांचे जीवनशैली बदलल्यामुळे अनेक आजार देखील होत आहे. त्यात मधुमेह हा आजार आज काल प्रत्येक वयोगटातील लोकांना होत आहे. त्याचप्रमाणे ज्या लोकांना मधुमेह होतो, त्या रुग्णांना जर काही जखमा झाल्या, तर त्या लवकर बऱ्या होत नाही. त्याचप्रमाणे यावर जास्त काही उपचार देखील उपलब्ध नाही आहे. जागतिक पातळीवर ही एक मोठी वैद्यकीय समस्या बनलेली आहे. परंतु आता मधुमेहाच्या रुग्णांसाठी ही एक मोठी आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे आता पुण्यात असणाऱ्या कंपनीच्या नवीन औषधाला डायबेटिक फूट अल्सरच्या उपचारासाठी आता मंजुरी दिलेली आहे. पुणे स्थित नोव्हालीड फार्मा कंपनीचे एकच अधिकार प्राप्त हे एक नवीन औषध आहे. हे औषध हृदयविकारासाठी वापरत आहे.

डायबेटिक फूट अल्सर या उपचारासाठी आता देशांतर्गत बाजारपेठेसाठी ही औषधे नियंत्रण संस्थेकडून वितरणासाठी मंजुरी देखील देण्यात आलेली आहे. त्यामुळे ही औषधे आता मधुमेहाच्या रुग्णांच्या पायाला आणि पावलांना काही जखमा झाल्या, तर त्या पूर्णपणे बरे करू शकतात. अनेक वैद्यकीय चाचण्या पूर्ण करून हे औषध बनवण्यात आलेले आहे.

याबद्दलची माहिती नोव्हालीड फार्माचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुप्रीत देशपांडे यांनी दिलेले आहे. त्यांनी सांगितलेले आहे की, मधुमेह रुग्णांपैकी 15 ते 25 टक्के रुग्णांना एकदा तरी डायबिटीस फूट अल्सरचा त्रास होतो. परंतु या अशा जखमा बऱ्या न झाल्यामुळे त्यांना काही भाग गमवावा लागतो. भारतात दरवर्षी अशी लाखो प्रकरणासमोर येत आहेत. परंतु आता या जगात जखमा बऱ्या करणाऱ्या या औषधाला देखील मान्यता मिळालेली आहे.

Travel : अनुभवा महाराष्ट्रातल्या ‘Dark Forest’ मधला थरार; भेट द्या ‘या’ ठिकाणाला

Travel : ‘Dark Forest’ असं नाव जरी घेतलं तरी लगेचच आपल्या नजरेसमोर अमेझॉनची जंगलं येतील मात्र तुम्हाला माहितीये का ? आपल्या महाराष्ट्रात हो आपल्या महाराष्ट्रात सुद्धा ‘Dark Forest’ आहे जिथे दिवसा सूर्याची किरणे पोहचत नाहीत. जंगल म्हणजे काय ? तिथला थ्रिल अनुभवायचा असेल तर महाराष्ट्रातल्या या ठिकाणाला भेट द्यायलाच पाहिजे. ok आता तुमची उत्सुकता जास्त ताणत नाही… तर आम्ही बोलत (Travel) आहोत महाराष्ट्रातलं Dark Forest म्हणजेच आडराई जंगलबद्दल …

हे जंगल म्हणजे खूप प्राचीन असं वर्षा वन. (rainforest) हे ठिकाण थोडंसं अलिप्त असं आहे. इथे जायचे असेल तर अनेक ट्रेकिंग ग्रुप्स येथे ट्रेकिंगचे नियोजन करतात. त्यामुळे तुम्ही येथे ट्रेकर्सच्या ग्रुप सोबत जाऊ शकता. ट्रेक करताना कधी डोंगर दऱ्या, कधी शेतवड , कधी नदी, ओढे पार करावे (Travel) लागतात.

पाच पठारांचा समावेश (Travel)

आडराई जंगल ट्रेकमध्ये पाच पठारांचा समावेश आहे जो हरिश्चंद्रगड आणि तारामती शिखराच्या मागे पसरलेला आहे. प्रत्येक पठाराचे स्वतःचे स्थानिक नाव आहे, परंतु एकत्रितपणे ते आडराई जंगल म्हणून ओळखले जातात. पवित्र आडराई जंगल ट्रेकचा ताजेपणा अनुभवा, जिथे अनेक वर्षे जुने असलेले वर्षावन आहे. अगदी आपल्या अस्तित्वाच्या खूप आधीपासून. हे निर्जन नंदनवन बाहेरील जगापासून अलिप्त आहे, जे तुम्हाला (Travel) खरोखरच डिस्कनेक्ट आणि निसर्गाशी पुन्हा कनेक्ट होऊ देते.

कसे जाल? (Travel)

आडराई जंगल हे पुण्यापासून जवळ असलेल्या जुन्नर येथील माळशेज घाटात असलेलं जंगल आहे. तुम्ही जर पुण्यावरून येत असाल तर जुन्नर मार्गच आणि माळशेज घाटाच्या अगोदरच असलेलं खुबी फाट्यावरून खिरेश्वर गावातून जंगलात जायला ट्रेक सुरू करावा. आणि जर का तुम्हाला मुंबईहून यायचं असेल आणि स्वतःच्या वाहनातून यायचं असल्यास माळशेज घाट ओलांडून खुबी फाट्यावरून खिरेश्वर गावातून तुम्ही ट्रेक सुरू करू शकता. शिवाय मुंबईवरून कल्याण मार्गे नगरला जाणाऱ्या बस ने तुम्ही खुबी फाट्यावर उतरू शकता खुबी फाट्यावरून खिरेश्वर (Travel) गावातून हा ट्रेक सुरू होतो.

औषधी वनस्पतींचा खजिना

दाट अशी वनराई किर्रगर्द झाडी जबरदस्त वेगळा अनुभव असेल तर अडराई जंगल ट्रेक नक्की करावा. विशेष म्हणजे याच जंगलात महाराष्ट्रातला प्रसिद्ध असा काळु धबधबा देखील आहे. उंचावरून पडणारा हा जलप्रपात अतिशय मनमोहक आणि सुंदर दिसतो यात काही शंकाच नाही या जंगलाचं वैशिष्ट्य म्हणजे आडराई या रावांना हे घनदाट जंगल ओळखले जातात या जंगलात सूर्यप्रकाशही फारसा (Travel) पोहोचत नाही त्यामुळे झाडांची दाट अशी दाटी-वाटी येथे बघायला मिळते. शिवाय इथे तुम्हाला असंख्य अशा औषधी वनस्पती बघायला मिळतील.

पावसाळ्याच्या दिवसांमध्ये इथे जाणं थोडं अवघड आहे मात्र थोडा पाऊस कमी झाल्यानंतर तुम्ही इथे जर ट्रेकला जाणार असाल तर तुम्हाला असंख्य असे वेगवेगळे छुपे धबधबे सुद्धा इथे पाहायला मिळतील. येताना तुम्ही खिरेश्वर परिसरातील प्राचीन आणि ऐतिहासिक नागेश्वर मंदीरालाही भेट देऊ शकता. त्यामुळे आयुष्यात जर तुम्हाला थ्री एक्सपीरियंस करायचा असेल तर या ठिकाणी नक्की ट्रेक (Travel) करा.