Monday, December 22, 2025
Home Blog Page 566

आनंदाची बातमी ! कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टर मिळणार 5 हजार रुपयांचे अनुदान

Soyabin And Cotton

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांसाठी नेहमीच नवनवीन योजना घेऊन येत असतात. जेणेकरून शेतकऱ्यांना देखील फायदा होत असतो. अशातच आता सरकारने शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आणलेली आहे. ती म्हणजे आता 2023 च्या खरीप हंगामातील कापूस आणि उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसंकल्पामध्ये जी घोषणा केलेली आहे. त्याप्रमाणे प्रति हेक्टर 5000 रुपये अर्थसहाय्य देण्याच्या निर्णय कृषी विभागाने घेतलेला आहे. आणि याबद्दलची माहिती महाराष्ट्राची कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेली आहे.

2023 मध्ये अनेक ठिकाणी पावसाचे प्रमाण अगदी कमी होते. या सगळ्यामुळे कापूस आणि सोयाबीनचे भाव खूप कमी झाले. आणि शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागले. त्यानंतर आता सरकारने शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देण्याची निर्णय घेतला. लोकसभा निवडणुकीच्या आधीच या निर्णयाची घोषणा केली होती. तसेच जो अर्थसंकल्प पार पडला, त्यात देखील याची माहिती दिलेली होती. आता त्यानुसार आज शासन निर्णय देखील जारी करण्यात आलेला आहे.

त्यामुळे आता 2023 मध्ये ज्या शेतकऱ्यांचे कापूस उत्पादकांचे नुकसान झालेले आहे. त्यांना आर्थिक मदत मिळणार आहे. राज्यातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना किमान 1000 रुपये तर 2 हेक्टर पर्यंत जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 5000 रुपये अर्थसहाय्य देण्याच्या शासनाने निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे आता कापूस उत्पादक शेतकऱ्यांना 1548 कोटी 34 लाख रुपये मिळणार आहे. तर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 2646 कोटी 34 लाख रुपये एवढा निधी मिळणार आहे.

या अनुदानासाठी ईपीक पाहणी पोर्टलद्वारे पिकांची नोंदणी केलेले शेतकरी पात्र ठरणार आहे. त्यानंतर डीबीटी थेट शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम ट्रान्सफर करणार आहे. त्यामुळे कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे जे नुकसान झालेले आहे. त्यांना नुकसान भरपाई सरकारकडून मिळणार आहे

CT Scan | सिटी स्कॅनमुळे वैद्यकीय क्षेत्रात झाली अनोखी प्रगती; जाणून घ्या महत्व

CT Scan

CT Scan | सध्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाने खूप मोठ्या प्रमाणात प्रगती केलेली आहे. त्यामुळे अगदी प्रत्येक व्यक्तीला त्या तंत्रज्ञानाचा मोठा फायदा होत आहे. खास करून वैद्यकीय क्षेत्रामध्ये ही प्रगती झाल्यामुळे आजकाल अनेक लोकांची जीव वाचत आहे. कोणत्याही कठीणात कठीण असलेल्या रोगाचे निदान होते. आणि त्यातून डॉक्टरांना मार्ग काढणे देखील सोपे होत आहे. कारण आजकाल सगळ्या गोष्टी आधुनिक पद्धतीने खूप पटकन समजतात.

आधुनिक आरोग्य सुविधांमध्ये सिटीस्कॅन (CT Scan) ही खूप महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. यासाठी आपल्या शरीराला झालेले बदल किंवा कोणताही आजाराचे निदान होणे खूप शक्य. सिटीस्कॅन शरीराच्या प्रतिमा तयार करतात त्यामुळे अंतर्गत अवयवांचे परीक्षण करणे खूप सोपे झाले आहे. आणि त्या व्यक्तीला लवकरात लवकर उपचार मिळणे देखील शक्य झालेले आहे. यामुळे त्वरित आणि अचूक उपचार होते आणि रुग्ण देखील कोणत्याही आजारातून लगेच बरा होतो. आता याच सिटीस्कॅन (CT Scan) बद्दलची माहिती आज आपण जाणून घेऊया.

सिटीस्कॅनमुळे (CT Scan) कर्करोग हृदय विकार रक्तवाहिन्यांसंबंधी न्युरोलॉजिकल डिसऑर्डर यांसारख्या आजारांचे खूप लवकर निदान होते. आणि त्याच्यावर उपचार करणे देखील आता अगदी सहज शक्य झालेले आहे. सिटीस्कॅनमुळे आता त्याचे निदान करणे सोपे झालेले आहे.

या सिटीस्कॅनच्या सुविधेमुळे आता कोरोनरी आर्टरी डिसीज आणि रक्ताच्या गुठळ्या यांसारख्या रक्तभिसरण यंत्रणेचे आजार देखील लवकरात लवकर समजू लागलेले आहेत. तसेच पाठीच्या करण्याचे आजार मुतखडा अल्सरेटिव्ह यासंबंधीचे निदान देखील शक्य झालेले आहे. त्याचप्रमाणे एखादा मोठा अपघात घडला तसेच त्यामुळे डोके सांगाडा त्याचप्रमाणे इतर अंतर्गत अवयवांना जखमा झालेल्या आहेत की नाही याचे निदान लवकर होते. आणि त्या व्यक्तीला लवकरात लवकर उपचार मिळतात.

सिटीस्कॅनमुळे उच्च गुणवत्तेच्या थ्रीडी प्रतिमा तयार होतात. त्यामुळे आधुनिक सिटीस्कॅनलमुळे स्पायरल पद्धतीने त्यांचे फोटोज काढणे शक्य होते. त्यामुळे अंतर्गत अवयवातील सूक्ष्म बदल देखील लगेच समजतात. तसेच अपघातामुळे झालेले फ्रॅक्चर्स अवयवांचे नुकसान आणि अंतर्गत जर होत असेल, तर या जखमांची माहिती देखील सिटीस्कॅनमुळे अगदी लवकरात लवकर समजते.

घरबसल्या हे जॉब करून महिन्याला कमवू शकता 50 हजार रुपये; वाचा सविस्तर माहिती

Jobs

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आजकाल शिक्षणाला खूप जास्त महत्त्व आहे. परंतु तुमच्या शिक्षणाला जेवढे महत्त्व आहे, तेवढेच महत्त्व तुमच्यामधील असलेल्या कलेला आणि कौशल्याला देखील आहे. तुम्ही जर इतर काही गोष्टी शिकून घेतल्या, तर तुम्हाला अगदी घरबसल्या जगभरातील मोठ्या कंपन्यांच्या माध्यमातून काम करता येते. आणि तुम्ही महिन्याला लाखो रुपये कमवू शकता. यासाठी आपल्याला शैक्षणिक पात्रता असणे तर गरजेचे आहेच. परंतु त्यासोबत काही कौशल्य असणे देखील गरजेचे आहे . सध्या सोशल मीडिया आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अनेक जॉब्स आहेत. जे तुम्ही तुमच्या कौशल्याच्या आधारावर मिळू शकतात. अशा अनेक कंपन्या आहेत, ज्या उमेदवारांना अगदी घरी बसून काम उपलब्ध करून देतात. आणि चांगले पॅकेज देखील देतात. आता हे असे कोणते जॉब आहे? जे तुम्ही घरी बसून करू शकता. आणि महिन्याला चांगला इन्कम देखील घेऊ शकता हे आपण जाणून घेणार आहोत.

सॉफ्टवेअर डेव्हलपर

सध्या सॉफ्टवेअर डेव्हलपरची खूप जास्त मागणी आहे. एखाद्या एप्लीकेशन डिझाईन करणे, त्याचप्रमाणे कोडींग करण्यात देखील जे लोक एक्सपर्ट आहेत. त्यांना सॉफ्टवेअर डेव्हलपरची नोकरी खूप फायद्याची ठरते. या जॉब साठी तुम्हाला कोडींगची माहिती असणे गरजेचे असते. तुम्हाला जर कोडींगची माहिती असेल तर तुम्हाला घरबसल्या सहज नोकरी मिळेल.

डिजिटल मार्केटिंग स्पेशालिस्ट

सध्या डिजिटल मार्केटिंग हे एक मोठ्या प्रमाणात विस्तारलेले आहे. तुम्हाला विविध क्षेत्रात घरी बसून जाहिराती आणि प्रचार करता येतो. यासाठी संपूर्ण प्लॅनिंग असावे लागते. हा व्यक्ती ई-मेल कॅम्पेन त्याचप्रमाणे सोशल मीडिया, वेबसाईट यांसारख्या सगळ्या गोष्टींवर काम करतात. त्यामुळे तुम्ही जर डिजिटल स्पेशालिस्ट असाल, तर तुम्ही अगदी घरी बसून चांगले पैसे कमवू शकता.

ग्राफिक डिझायनर

सध्या ग्राफिक डिझायनरला खूप जास्त मागणी आलेली आहे. अनेकवेळा आपण आपल्या व्यवसायाची किंवा इतर कुठल्याही गोष्टीची जाहिरात ही सोशल मीडियावर करतो. त्यासाठी लोकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी ग्राफिक्स डिझाईन करणे खूप गरजेचे असते. यामध्ये विविध प्रकारचे लोगो, ब्राउझर्स, पोस्टर डिजिटल ग्राफिक्स करतात. वेगवेगळ्या प्रकारचे फॉन्ट उपलब्ध करून तुम्ही चांगल्या प्रकारे ग्राफिक करू शकता. तुम्ही जर ग्राफिक डिझाईन असाल, तर तुम्हाला घरबसल्या खूप चांगली कमाई करता येईल.

प्रोजेक्ट मॅनेजर

प्रोजेक्ट मॅनेजरवर विविध प्रकल्पाचे काम व्यवस्थित पाहणे कामावर नियंत्रण ठेवणे आणि एखादा प्रकल्प पूर्ण करण्याची जबाबदारी असते. या मॅनेजरच्या हाताखाली एक संपूर्ण टीम काम करत असते. परंतु त्यासाठी प्रोजेक्ट मॅनेजरकडे उत्तम संवाद कौशल्य, नियोजन कौशल्य हे गुण असणे गरजेचे आहे.

वर्चुअल असिस्टंट

वर्चुअल असिस्टंट हा एक ऑनलाईन सहाय्यक असतो. जो ईमेल मॅनेजमेंट आणि कागदपत्र या सगळ्या गोष्टींची तयारी करत असतो. आणि जबाबदारी सांभाळत असतो. तुम्ही इंटरनेटचा वापर करून अगदी घरबसल्या ही नोकरी करू शकता.

ऑनलाइन टीचर

आजकाल ऑनलाईन टीचिंग मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. अनेक लोक हे घरी बसूनच क्लासेस घेतात. अशा प्रकारे तुमच्याकडे जर चांगले शिकवण्याचे कौशल्य असेल, तर तुम्ही घरी बसून विद्यार्थ्यांची संवाद साधू शकता आणि त्यांना ज्ञान देऊ शकता.

वेब डिझायनर

वेब डिझायनर हा वेगवेगळ्या प्रकारचे वेबसाईट डिझाईन करण्याचे काम करत असतो. वेबसाईटची पूर्ण रचना त्याचप्रमाणे वेबसाईटचा कलर या सगळ्या गोष्टी तो घर बसून पाहू शकतो. अशा प्रकारे तुम्ही हा जॉब मिळून देखील घरबसल्या चांगला पैसा कमवू शकता.

कंटेंट रायटर

आजकाल विविध वेबसाईट, ब्लॉग, सोशल मीडिया पोस्टसाठी चांगली माहिती लिहिण्याच्या कामासाठी कंटेंट राईटरची गरज असते. यामध्ये तुमच्याकडे जर लेखन कौशल्य असेल तसेच विविध विषयांची चांगली जाण असेल, तर तुम्ही अशा परिस्थितीत घरबसल्या चांगला जॉब मिळवू शकता.

Fog Safety Device : रेल्वेच्या भौगोलिक आव्हानांना देणार टक्कर ‘फॉग सेफ्टी डिव्हाईस’ ; 933 ठिकाणी कार्यरत

Fog Safety Device : आपण गाडी चालवत असताना ज्याप्रमाणे आपल्यावर ऊन , पाऊस आणि धुक्याचा परिणाम होत असतो अगदी याच प्रमाणे रेल्वे च्या ड्रायव्हर ला होत असते. विशेषतः हिवाळ्याच्या दिवसात हे प्रमाण अधिक वाढते. रेल्वेचा प्रवास २४ तास सुरु असतो. त्यामुळे रेल्वे कर्मचाऱ्यांना डोळ्यात तेल घालून काम करावे लागते. अशा स्थितीत एक चांगली बातमी असून सुरक्षित रेल्वे संचालनासाठी दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेने धुके सुरक्षित करणारी ९३३ (फॉग सेफ्टी डिवाईस)उपकरणे बसविली आहेत. हे उपकरण धुके, पाऊस किंवा सूर्यप्रकाशापासून (Fog Safety Device) संरक्षण करते.

दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे भौगोलिकदृष्ट्या विविध भागात पसरलेली आहे. घनदाट जंगले आणि डोंगराळ भागातून रेल्वे जाते. हिवाळ्यात दाट धुके तयार होतात. धुके टाळण्यासाठी आणि लोको पायलटला सक्षम करण्यासाठी ही उपकरणे खास तयार(Fog Safety Device) केली गेली आहेत. फॉग सेफ्टी डिव्हाईस ही जीपीएस आधारित नेव्हिगेशन प्रणाली आहे.

काय आहेत फायदे ?(Fog Safety Device)

  • लोको पायलटला मार्गदर्शन आणि अचूक नेव्हिगेशन प्रदान करते.
  • या डिव्हाईसमुळे सिग्नल, लेव्हल क्रासिंग गेट अचूक पास करता येते.
  • न्युट्रल सेक्शन आदींची माहिती वेळेवर उपलब्ध होते.
  • भौगोलिक क्रमानुसार पुढे येणाऱ्या तीन स्थळांची सुमारे ५०० मीटर अंतरापर्यंत माहिती मिळते.
  • हे उपकरण पोर्टेबल आकाराने कॉम्पॅक्ट आहे. फॉग सेफ्टी डिव्हाईस हे बॅटरीवर चालणारे यंत्र आहे. यंत्र ट्रेनच्या इंजिनमध्ये ठेवले जाते.
  • १८ तासांसाठी इन-बिल्ट रिचार्जेबल बॅटरी बॅकअप श येते .
  • क्रॉसिंग सिग्नल माहितीची नोंद(Fog Safety Device)

क्रॉसिंग सिग्नल आणि रेल्वे स्थानकांची माहिती आधीच नोंदवली जाते. हे उपकरण लोको पायलटला सिग्नल, लेव्हल क्रॉसिंग गेट्स (मानवयुक्त आणि मानवरहित), तटस्थ विभाग इत्यादींबद्दल माहिती आधीपासूनच फिडींग असते. या उपकरणात (Fog Safety Device)अँटेना असतो, जो इंजिनच्या वरच्या भागावर स्थिर असतो. तो सिग्नल प्राप्त करतो. याव्यतिरिक्त, यात मेमरी चीप आहे ज्यामध्ये रेल्वे मार्गाची संपूर्ण माहिती दिली जाते.

Kitchen Tips : किचनमध्ये तेल सांडलं आहे का ? वापरा ‘ह्या’ सोप्या ट्रिक्स

Kitchen Tips : स्वयंपाक करीत असताना अनेकदा आपल्या हातून नकळत तेलाची संडासांडी होतेच. विशेषतः चापाती बनवताना जेव्हा तेल चपातीला लावले जाते तेव्हा ते ओट्यावर किंवा गॅस शेगडीवर सांडते. एवढेच काय तेलाच्या डब्यातून, पिशवीतून सुद्धा तेल सांडते. अधिक चिकट असलेले तेल कापडाने पुसताना पूर्णपणे पुसले जात नाही. तेलाचा चिकट अंश राहतोच. म्हणून आजच्या लेखात आम्ही अशा काही ट्रिक्स तुम्हाला सांगणार आहोत ज्यामुळे तेल आणि तेलाचे डाग (Kitchen Tips) सहज पुसले जातील.

फरशीवर सांडलेले तेल (Kitchen Tips)

फरशीवर तेल सांडले असेल आणि जर ते नीट पुसले गेले नाही तर त्यावरून पाय घसरून पडण्याची (Kitchen Tips) शक्यता असते. जमिनीवर किंवा किचनच्या ओठ्यावर तेल सांडले असेल तर तेलावर फक्त पीठ शिंपडा जर भरपूर तेल सांडलं असेल तर भरपूर पीठ टाकायची गरज नाही थोडेसे टाका. जेवढे तेल सांडले आहे ते पूर्णपणे पिठाने कव्हर करा, यानंतर साधारण पाच मिनिटं राहू द्या. या काळात पीठ तेल पूर्णपणे शोषून घेऊन आता एखाद्या वर्तमानपत्र किंवा टिशू च्या सहाय्याने पीठ गोळा करा. तुम्हाला दिसेल त्या पिठाबरोबर तेलही पूर्णपणे गोळा होत आहे. अगदी सहजपणे संपूर्ण तेल साफ (Kitchen Tips) होईल आणि आता दुसऱ्या स्वच्छ टिशूने पुन्हा एकदा पुसून टाका. तेल पडलेल्या ठिकाणी ग्रीस किंवा चिकटपणा सुद्धा राहणार नाही.

ओट्यावरील तेल (Kitchen Tips)

स्वयंपाक करताना किचनच्या गॅस वरती जास्त प्रमाणात तेल उडून पडले असतील किंवा किचनच्या ओट्याच्या कडांवर ग्रीस जमा झाला असेल तर ते स्वच्छ करण्यासाठी त्यावर शिंपडा. आता हे पाच ते दहा मिनिटे राहू द्या. हे सर्व तेल शोषून घेते (Kitchen Tips) नंतर स्वच्छ कापडाने पुसून घ्या. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही पावडर ऐवजी पीठ देखील वापरू शकता.

Pune News : विविध मागण्यांसाठी PMP कर्मचाऱ्यांचा संप ; प्रवाशांना फटका

Pune News : पुण्याची सद्यस्थिती बघता पुण्यामध्ये अद्यापही कमी अधिक प्रमाणात पावसाची ये – जा सुरुच आहे. आशातच पुण्यात पीएमपीच्या कर्मचाऱ्यांनी आजपासून (२९) संप पुकारला आहे त्यामुळे प्रवाशांचे हाल होताना दिसत आहे. त्यामुळे ” आधीच वनवास त्याच अधिक मास ” अशी पुणेकरांची (Pune News) अवस्था झाली आहे.

आज सोमवारपासून सुरु झालेल्या या संपाला शिवसेने देखील पाठिंबा दर्शवला आहे. कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या या संपामुळे पीएमपीच्या संचलनातील गाड्या कमी झाल्या आहेत त्यामुळे शहरातल्या नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागतोय. पुणे आणि पिंपरी चिंचवड (Pune News) मिळवून जवळपास 12 लाखांपेक्षा जास्त प्रवासी हे पीएमपीने प्रवास करीत असतात.

मिळालेल्या माहितीनुसार पीएमपी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात शिवसेनेचे शहर प्रमुख नाना भानगिरे यांच्या अध्यक्षतेखाली कृती समिती स्थापन करण्यात आली आहे. यापूर्वी समितीकडून मागण्या मांडण्यात आल्या होत्या. मागण्या मान्य नसल्यास (Pune News) सोमवारपासून काम बंद आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता त्यानुसार मध्यरात्रीपासून कर्मचाऱ्यांनी संप पुकारला असून याचा फटका शालेय विद्यार्थी आणि नोकरदारांना बसतो आहे.

काय आहेत मागण्या ? (Pune News)

  • सातव्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम विना विलंब मिळावी.
  • सहा वर्षांपासून सेवेत असणाऱ्या बदली रोजंदारी सेवकांना सेवेत कायम करावं.
  • कर्मचाऱ्यांना वेळोवेळी पदोन्नती द्यावी.

दरम्यान मिळालेला अधिकच्या माहितीनुसार संपाच्या पार्श्वभूमीवर जास्तीत जास्त गाड्या रस्त्यावर आणण्याचा (Pune News) प्रयत्न पीएमपी प्रशासनाकडून करण्यात येत असून चर्चेला सुरुवात करण्यात आल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे

भोसरीत हा चेहरा लढत देईल, पण महेश लांडगेंना हरवण अवघडय

Bhosari Constituency

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । येणाऱ्या विधानसभेला महेश लांडगे भोसरी विधानसभेतून आरामात आमदारकी काढतील, असा अंदाज असताना शरद पवारांनी एक खेळी केली… आणि पुन्हा फासे पलटले… पक्ष फुटीनंतर इरसाल पेटलेले आणि लोकसभेच्या विजयानंतर विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम करण्यासाठी फिल्डिंग करता करता पवारांनी आता भोसरी विधानसभेकडेही विशेष लक्ष दिलय… भाजपच्या महेश लांडगेंच्या येणाऱ्या विधानसभेतील विजयाच्या कॉन्फिडन्सची हवा बाहेर काढण्यासाठी पवारांनी आपल्या माणसाला भोसरीमध्ये बळ द्यायला सुरुवात केलीय… सलग दोन टर्म आमदार असल्यामुळे प्रस्थापित झालेल्या लांडगेंना चितपट करण्यासाठी शरद पवार नेमकी काय स्टेटर्जी आखतायेत? भोसरी विधानसभेचा वर्तमान टू इतिहास व्हाया राजकारण असा इंटरेस्टिंग आढावा…

2009 ला भल्यामोठ्या हवेली विधानसभा मतदारसंघातून स्वतंत्र भोसरी विधानसभा अस्तित्वात आला… लोकसभेला शिरूर मतदारसंघात मोडणाऱ्या भोसरीचे पहिले आमदार होण्याचा मान मिळाला तो विलास लांडे यांना… राष्ट्रवादीने मंगला कदम यांना तिकीट दिल्याने लांडे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरून ते भोसरीतून निवडून आले… 2014 ला ही असंच काहीसं घडलं… पण यावेळेस स्टँडिंग आमदार म्हणून राष्ट्रवादीने लांडे यांना तिकीट दिलं.. पण इथून पक्षाचे नगरसेवक आणि स्थायी समितीचे अध्यक्ष असणाऱ्या महेश लांडगे यांनी बंडखोरी केली.. आणि ते अपक्ष म्हणून निवडून आले… थोडक्यात अपक्षांना निवडून देणारा मतदारसंघ म्हणून भोसरीची काही काळ ओळख बनली होती…

पुढे लांडगेंनी भाजपशी संधान साधत पक्षात प्रवेश केला… आणि 2019 ला राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष उमेदवार विलास लांडे यांना पराभूत करून अनेक वर्षानंतर अपक्षांचा मतदारसंघ म्हणून भोसरीची ओळख पुसण्यात लांडगेंना यश आलं… पुढे बैलगाडा शर्यत, कुस्ती स्पर्धा, हिंदुत्वाची लाईन आणखीन गडद करत त्यांनी चालवलेली आंदोलन आणि विविध कार्यक्रम पाहता त्यांचा एक ठरावीक व्होट बँक आजही मतदार संघात पाहायला मिळतो… म्हणूनच लोकसभा निवडणुकीतही त्यांनी महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीशी लीड दिलं… या आकड्यातून हे क्लियर होतं की येणाऱ्या विधानसभेला महेश लांडगे यांचं पारड सध्यातरी जड आहे… पण रंगात आलेला डाव फासा टाकून उलटा कसा करायचा? याची परफेक्ट माहिती असणाऱ्या पवारांनी भोसरीसाठी फिल्डिंग लावली.. आणि मतदारसंघात नवा ट्विस्ट आला…

अजित पवार गटाचे नेते अजित गव्हाणे यांनी काही नगरसेवकांसह शरद पवार गटात प्रवेश केला. विधानसभा निवडणुक लढवण्याच्या दृष्टीनेच त्यांनी हे पाऊल उचलल्याचं त्यांनी स्वतः स्पष्ट केलं. अजित पवार गटाने आधी – घड्याळ तेच, वेळ नवी असं घोषवाक्य तयार केलं होतं. गव्हाणे यांनी शरद पवार गटात प्रवेश केल्यानंतर आता वेळ आली आहे बदल घडवण्याची… ही टॅगलाईन वापरायला सुरुवात केली. महायुतीत सध्या ज्या पक्षाचा आमदार आहे त्यालाच जागावाटपात संधी मिळेल हे गणित जवळपास पक्कं आहे. त्या नियमाने भोसरीची जागा भाजपला आणि पर्यायाने महेश लांडगे यांनाच मिळणार हे निश्चित होतं. त्यामुळे अजित पवार गटात राहून आपण उमेदवारी मागू शकणार नाही, किंबहुना पक्षाला ते मान्य नसेल याचा अंदाज आल्यानेच गव्हाणे यांनी पक्ष बदलला. पक्ष बदलत असताना त्यांनी १५ हून अधिक नगरसेवक सोबत नेल्याने गव्हाणे यांची ताकद मोठी आहे हे लक्षात आलं. महेश लांडगे यांच्या एकाधिकारशाही आणि हुकूमशाहीमुळे भाजप आणि इतर पक्षातील नेते त्यांच्यावर नाराज असल्याचं अजित गव्हाणे यांचं म्हणणं आहे. शिवाय मागील १० वर्षांत भोसरीमध्ये कुठल्याही सुधारणा झाली नसल्याची तक्रार गव्हाणे करतात.

मात्र महेश लांडगे यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेले विलास लांडे अद्यापही अजित पवार गटातच आहेत. महायुतीत अजित पवारांच्या समावेशानंतर अनेक गणितं बदललेली आहेत. अनेक भाजप नेते अजित पवारांवर नाराज असल्याचं उघडपणे बोललं जातं…कट्टर विरोधक असताना एकमेकांशी जुळवून घेण्याची किमया मागील काही वर्षांत लांडगे आणि लांडे यांना करावी लागली आहे. मात्र निवडणुकीच्या आधी विलास लांडे हे शरद पवार गटात प्रवेश करतील किंवा महाविकास आघाडीच्या उमेदवाराचं काम करतील अशी चर्चा, कुजबुज कार्यकर्त्यांमध्ये ऐकायला मिळत आहे…

अजित गव्हाणे यांच्याव्यतिरिक्त शिवसेना उद्धव ठाकरे गटातर्फे सुलभा उबाळे या निवडणुक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. २००९ आणि २०१४ ची निवडणुक लढवलेल्या उबाळे पराभवानंतरही शिवसेना पक्षाशी एकनिष्ठ राहिल्या. २००९ च्या निवडणुकीत विलास लांडे यांच्याकडून अवघ्या २ हजार मतांनी त्यांचा पराभव झाला होता. २०१९ ची निवडणुक त्यांनी लढली नाही, मात्र मागील काही काळापासून त्या मतदारसंघात सक्रिय झाल्या आहेत… तरी करंट स्टेटस पाहिलं तर विद्यमान आमदार महेश लांडगे यांच्या बाजूने कौल दिसत असला तरी अजित गव्हाणे यांनी त्यांच्या विरोधात रान तापवल्याने आणि सोबतच विलास लांडे, सुलभा काळे यांचीही नाव उमेदवारीसाठी चर्चेत आल्याने विरोधकांनी एकत्रित काम केल्यास इथे लांडगे यांना पराभवाचा धक्का बसू शकतो…बाकी महेश लांडगे यांना येणाऱ्या विधानसभेला पाणी पाजण्याची कुमक कोणत्या राजकीय नेत्यामध्ये आहे? तुम्हाला काय वाटतं? भोसरी चा पुढचा आमदार कोण? ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा…

Lakhpati Didi Yojana : ‘या’ योजनेअंतर्गत महिलांना मिळणार 5 लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज ; कसा कराल अर्ज ?

Lakhpati Didi Yojana : केंद्र सरकार कडून अनेक लोकोपयोगी अनेक योजना राबवल्या जातात. स्त्रियांना सक्षम बनवण्यासाठी केंद्र सरकार कडून योजना बनवण्यात आल्या आहेत. सध्या महाराष्ट्रात ‘ लाडकी बहीण’ योजनेचा बोलबाला असला तरी महिलांनी आपल्या पायावर सक्षमपणे उभे राहावे याकरिता केंद्र सरकार “लखपती दीदी योजना ” राबवत आहे. केंद्राकडून राबवली जाणारी लखपती दीदी योज़ना (Lakhpati Didi Yojana) काय आहे ? आजच्या लेखात आपण याचीच माहिती जाणून घेणार आहोत…

15 ऑगस्ट 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांना मोठी भेट देत लखपती दीदी योजना सुरू केली. सरकारची ही योजना महिला सक्षमीकरणांतर्गत आणण्यात आली. या योजनेअंतर्गत महिलांना प्रशिक्षण दिले जाते. त्यामुळे स्वत:चा (Lakhpati Didi Yojana)रोजगार सुरू करण्यासाठी त्यांना 5 लाख रुपयांपर्यंतचे कर्जही दिले जाते.

आपल्या देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी त्यांच्या भाषणात ०१ फेब्रुवारी रोजी घोषणा दिली की, ९ कोटी महिलांसोबत ८३ लाख बचत गट ग्रामीण सामाजिक व आर्थिक दृष्ट्या सक्षम होत आहेत. त्यांच्या या यशामुळेच जवळ जवळ १ कोटी महिलांना या लखपती दीदी योजनेचा (Lakhpati Didi Yojana) फायदा झालेला आहे. या योजनेचे यश बघून केंद्र सरकार कडून लखपती दीदी योजनेचे टार्गेट २ कोटी वरून ३ कोटी करण्यात आले आहे.

योजनेचा उद्देश

महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध (Lakhpati Didi Yojana) करून देणे, त्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ करणे, त्यांना स्वावलंबी बनवणे आणि त्यांचे राहणीमान सुधारणे हा या योजनेचा उद्देश आहे.

पात्रता

  • अर्जदार हा भारतातील कायमचा रहिवासी असायला हवा.
  • अर्जदाराची वयोमर्यादा ही १८ ते ५० वर्षांपर्यंत असावी .
  • महिलांना बचत गटामध्ये सहभाग घेणे अनिवार्य आहे.

आवश्यक कागदपत्रे

  • पासपोर्ट साईझ फोटो
  • आधार कार्ड
  • रहिवासी दाखला
  • मोबाईल नंबर
  • पॅन कार्ड
  • ई-मेल आयडी
  • बँक खाते

कसा कराल अर्ज ?

  • या योजनेसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा असल्यास, तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातील महिला आणि बाल विकास विभाग कार्यालयामध्ये जायचे आहे.
  • याठिकाणी आल्यानंतर तुम्हाला लखपती दीदी योजनेचा (Lakhpati Didi Yojana) अर्ज कार्यालयामधून घ्यायचा आहे.
  • अर्ज घेतल्या नंतर अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती तुम्हाला येथे भरायची आहे आणि त्यासोबत लागणारी आवश्यक कागदपत्रे जोडा.
  • सर्व कागदपत्र व अर्ज हे एकत्र करून त्याच कार्यालयामध्ये जमा करायचा आहे. त्यानंतर त्यांच्याकडून अर्जाची पोच पावती घ्यायची आहे.
  • या पद्धतीने तुम्ही या योजनेसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.

Redmi Pad Pro 5G टॅबलेट लाँच; मिळते 10,000 mAh बॅटरी, किंमत किती?

Redmi Pad Pro 5G

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकप्रिय मोबाईल ब्रँड Xiaomi ने भारतीय बाजारपेठेत एक नवीन टॅब लाँच केला आहे. Redmi Pad Pro 5G असं या टॅबलेटचे नाव असून यामध्ये तब्बल 10,000 mAh बॅटरी ची पॉवरफुल बॅटरी देण्यात आली आहे. हा टॅब एकूण २ स्टोरेज व्हेरिएन्टमध्ये लाँच करण्यात आला असून त्याची किंमतही वेगवेगळी आहे. Redmi Pad Pro 5G च्या 8GB + 128GB व्हेरिएंटची किंमत 24,999 रुपये आहे तर 8GB + 256GB व्हेरिएंटची किंमत 26,999 रुपये आहे. येत्या 2 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता हा टॅबलेट विक्रीसाठी उपलब्ध होईल. आज आपण Xiaomi च्या या नव्या टॅबचे खास फीचर्स आणि स्पेसिफिकेशन जाणून घेऊयात…

Redmi Pad Pro 5G मध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 12.1 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेला 600 Nits पीक ब्राईटनेस आणि स्क्रीन प्रोटेक्शन मिळतेय. कंपनीने या स्मार्टफोन मध्ये Snapdragon 7s Gen 2 चिपसेट वापरली आहे. त्यानुसार टॅबलेट मध्ये 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज आणि 8GB + 128GB स्टोरेज व्हेरिएन्ट असे २ पर्याय दिले आहेत. हा टॅबलेट Xiaomi HyperOS Android 14 या ऑपरेटिंग सिस्टीमवर चालतो.

Redmi Pad Pro 5G च्या कॅमेरा सेटअपबद्दल सांगायचं झाल्यास यामध्ये पाठीमागील बाजूल 8MP चा मुख्य कॅमेरा आहे, तर समोरील बाजूला 8MP चा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. खास बाब म्हणजे या टॅबलेटची बॅटरी, कारण यामध्ये तब्बल 10,000mAh बॅटरी बसवण्यात आली आहे. ही बॅटरी 33W वायर चार्जिंगला सपोर्ट करत असून कंपनीचा दावा आहे की हा मोबाईल 12 तासांचा बॅटरी बॅकअप देऊ शकतो. टॅबलेट मध्ये क्वाड स्पीकर सेटअप आहे, जो डॉल्बी ॲटमॉस सपोर्ट, WiFi 6, GPS आणि Bluetooth v5.2 यांसारखे फीचर्स मिळतात.

किंमत किती? Redmi Pad Pro 5G

Redmi Pad Pro 5G च्या 8GB + 128GB व्हेरिएंटची किंमत 24,999 रुपये आणि 8GB + 256GB व्हेरिएंटची किंमत 26,999 रुपये आहे. या टॅब्लेटची विक्री 2 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता सुरू होईल. टॅबलेट खरेदीवर कंपनीने काही बँक ऑफर देखील दिल्या आहेत, ज्यामध्ये यूजर्सना 2 हजार रुपयांची सूट मिळू शकते. यासाठी तुम्ही ICICI बँक आणि HDFC बँक कार्ड वापरू शकता.

Viral Video | आनंद महिंद्रा यांना आवडली ट्रॅफिक पोलिसाची काम करण्याची पद्धत; सोशल मीडियावर व्हिडीओ केला शेअर

Viral Video

Viral Video | आनंद महिंद्रा हे एक मोठे प्रसिद्ध असे भारतीय उद्योगपती आहेत. तसेच ते महिंद्रा समूहाचे अध्यक्ष देखील आहेत. आनंद महिंद्रा हे त्यांच्या व्यवसायाबद्दल जेवढे सिरीयस असतात, तेवढेच ते सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात. सोशल मीडियावर ते नेहमी काही ना काही व्हिडिओ किंवा पोस्ट शेअर करत असतात. त्यामुळे अनेक लोक देखील त्यांच्या या व्हिडिओला नेहमीच प्रतिसाद देत असतात. अशातच आज त्यांनी म्हणजे मोठी वर्षांसाठी एक व्हिडिओ (Viral Video) शेअर केला आहे. जो व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

रस्त्यावरून जाताना तुम्ही अनेक वाहतूक पोलीस पाहिले असतील जे तिथे त्यांचे काम करण्यासाठी तैनात असतात. पण तुम्ही सगळे शांतपणे उभे असलेले पहाल. पण सध्या एका ट्रॅफिक पोलिसाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) होत आहे. जो तुम्हाला खूप आवडेल. ट्रॅफिक पोलीस अतिशय अनोख्या पद्धतीने आणि डान्स करताना ट्रॅफिक कंट्रोल करत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. आणि याच कारणामुळे हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हा व्हिडिओ आनंद महिंद्रा यांनी मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म X (पूर्वी ट्विटर) वर शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करताना त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘या पोलिसाने हे सिद्ध केले आहे की कंटाळवाणे काम नाही. तुम्हाला जे काही करायचे आहे ते तुम्ही करू शकता. वृत्त लिहेपर्यंत हा व्हिडिओ १ लाखाहून अधिक लोकांनी पाहिला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर एका यूजरने लिहिले – काम तुम्हाला आनंदी आणि यशस्वी बनवते. दुसऱ्या युजरने लिहिले – तुम्हाला तुमच्या कामाची प्रचंड आवड आहे. तिसऱ्या वापरकर्त्याने लिहिले – त्यांच्या कामाचा आनंद घेणारे लोक पाहून आनंद झाला.