Friday, January 2, 2026
Home Blog Page 5662

मुंबई लोकल पुन्हा रुळांवर; अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सेवा सुरू

मुंबई । कोरोनामुळं निर्माण झालेल्या परिस्थितीमुळं तीन महिन्यांच्या विश्रांतीनंतर मुंबई लोकल सोमवारपासून धावणार आहे. पण लोकल ट्रेन फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सुरू होणार आहे. रेल्वेकडून रविवारी रात्री उशिरा अधिकृत माहिती देण्यात आली. पश्चिम रेल्वे, मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावर लोकल धावणार आहेत.

असे असेल वेळापत्रक
पश्चिम रेल्वे
पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, १५ जून २०२० पासून ही सेवा सुरू होणार आहे. पश्चिम रेल्वेच्या माध्यमातून ७३ फेऱ्या होणार आहेत. यातील ८ फेऱ्या या विवार आणि डहाणू मार्गे धावणार आहे. या रेल्वेतून फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच परवानगी देण्यात येणार आहे. या लोकल सकाळी ५.३० ते रात्री ११.३०पर्यंत धावणार आहेत. यामध्ये १५ मिनिटांची विश्रांती घेतली जाईल. महत्वाच्या फेऱ्या या चर्चगेट ते विरार या स्टेशनांमध्ये होणार आहे. पण काही लोकल मात्र डहाणूवरून ही धावतील. या लोकल सेवा पश्चिम मार्गावर जलद गतीने धावतील. चर्चगेट ते बोरिवली अशी जलद लोकल असे ती लोकल बोरिवलीच्या पुढे धीम्या गतीने धावेल.

मध्य रेल्वे
मध्य रेल्वेच्या मार्गावर देखील फक्त अत्यावश्यक सेवेसाठी लोकल धावणार आहे.
या रेल्वे मार्गावर २०० फेऱ्या होणार आहेत १०० अप आणि १०० डाऊन. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स ते कसारा / कर्जत / कल्याण / ठाणे या मार्गावर १३० फेऱ्या होणार आहे. ६५ अप आणि ६५ डाऊन. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स ते पनवेल अशा ७० फेऱ्या होणार आहते ३५ अप आणि ३५ डाऊन. जलद लोकल ही फक्त महत्वाच्या स्थानकांवर थांबेल. कामाच्या अनुषंगाने सीएसएमटी येथे अप आणि डाऊन मार्गाची ट्रेनची वेळ शिफ्ट अर्थात ७ तास, ९ तास, १० तास, १५ तास, २१ तास, २३ तास अशी असणार आहे.

 

प्रवास करतानाचे नियम आणि अटी
पश्चिम रेल्वेवर ५० हजार रेल्वे कर्मचाऱ्यांसह अत्यावश्यक सेवेतील सव्वा लाख‌ कर्मचारी प्रवास करू शकतील. राज्य सरकारने दिलेल्या आदेशानुसार फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच प्रवेश दिला जाणार आहे. यामध्ये सामान्य नागरींना प्रवेश नाकारण्यात येणार आहे. प्रवास करण्याबरोबरच तिकिट खिडकी देखील अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठीच खुली असणार. हे सर्व नियम पश्चिम रेल्वे, मध्य रेल्वेतून प्रवास करणाऱ्यांसाठी असणार आहेत. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना लोकल मधून प्रवास करताना ओळख पत्र दाखवण बंधनकारक असणार आहे. प्रवासाकरता योग्य ते तिकिट असणं देखील गरजेचं आहे.अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांची निश्चिती राज्य सरकार करणार आहे. राज्य सरकारने ठरवलेल्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच‌ प्रवास करता येणार आहे.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा.
ब्रेकिंग बातम्यासाठी : www.hellomaharashtra.in

 

खबरदार! सुशांत सिंहच्या मृतदेहाचे फोटो व्हायरल कराल तर; महाराष्ट्र सायबर सेलचा कारवाईचा इशारा

मुंबई । अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर त्याच्या डेथ बॉडीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. व्हायरल झालेल्या या फोटोवर बॉलीवूड आणि कलाकारांनी आणि त्याच्या चाहत्या वर्गाने संताप आणि विरोध दर्शवला आहे. यावर महाराष्ट्र सायबर सेलने तात्काळ दाखल घेत हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले तर कारवाई करू असा कडक इशाला दिला आहे.

महाराष्ट्र सायबर सेलने केलेल्या ट्विटमध्ये, ‘सोशल मीडियावर एक चिंतेत टाकणारा ट्रेंड पाहायला मिळत आहे. यामध्ये दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतचे फोटो व्हायरल होत आहे. ते अतिशय धक्कादायक आहे. असे फोटो व्हायरल केल्यास कडक कारवाई केली जाईल’ असा इशारा सायबर सेलने दिला आहे. दुसऱ्या एका ट्विटमध्ये सायबर सेलने म्हटलं आहे की, ‘असे फोटो व्हायरल करणं हा गुन्हा आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार यावर कारवाई केली जाईल.’

अभिनेता सुशांत सिंह राजपूतने रविवारी वांद्रे येथील राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. ही माहिती समोर येताच साऱ्यांना धक्का बसला. सिनेसृष्टीपासून ते अगदी क्रिडा क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी आपली हळहळ सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केली. मात्र असं असताना सोशल मीडियावर सुशांत सिंह राजपूतच्या मृतदेहाचे फोटो व्हायरल झाले. ही अतिशय धक्कादायक बाब आहे. अनेकांनी या प्रवृत्तीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. असे फोटो व्हायरल करणं हा गुन्हा आहे. यावर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा.
ब्रेकिंग बातम्यासाठी : www.hellomaharashtra.in

 

राज्यात मान्सून दाखल झाला, पण कोसळणार कधी?

मुंबई । राज्यात मान्सून दाखल झाला असला तरी तो पूर्ण सक्रियतेने बरसणार कधी याची वाट सर्वजण पाहत आहेत. दरम्यान, भारतीय हवामान शास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार वाऱ्याच्या वेगाने मान्सून पुढे सरकत मुंबईसह महाराष्ट्रात व्यापला आहे. येत्या ४८ तासांत मान्सून उत्तर अरबी समुद्र, गुजरातसह मध्य प्रदेशात दाखल होणार आहे.

मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार १४ जून रोजी मान्सूनने वेगाने संपूर्ण महाराष्ट्र व्यापला आहे. येत्या ५ दिवसांत कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात चांगला पाऊल पडणार आहे. काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार आहे.

मुंबईत मान्सून रविवारी दाखल झाला असला तरीही अजून त्यानं विश्रांती घेती आहे. मान्सून दाखल झाल्यानंतर सोमवारी आणि मंगळवारी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तसेच पुढील १० दिवसांत मध्य आणि उत्तर महाराष्ट्र, विदर्भात मान्सून येणार आहे. उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा या भागांमध्ये दरवर्षी पाण्याचा प्रश्न उद्भवतो. या परिसरात यंदा मान्सून चांगला लागणार असल्यामुळे दिलासादायक बाब आहे.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा.
ब्रेकिंग बातम्यासाठी : www.hellomaharashtra.in

पूल तुटल्याने कारसह पुरात वाहून जाणाऱ्या दोघांचे शेतकऱ्यांनी प्राण वाचविले

औरंगाबाद प्रतिनिधी | जोरदार झालेल्या पावसामुळे अचानकपणे पूर आल्याने पूल खचला दरम्यान अंदाज न आल्याने कार सह त्यामधील दोघेही पुरात वाहून जात असताना परिसरातील शेतकऱ्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा नकरता त्या दोन जणांचा जीव वाचविला.तिसगाव जवळील ए.एस.क्लब जवळील ही मध्यरात्रीची थरारक घटना कॅमेरात कैद झाली. विशेष म्हणजे ज्याचा प्राण शेतकऱ्यांनी वाचविला त्याचा वाढदिवस होता. जॉन सक्रिया व वर्गीस सक्रिया (दोन्ही राहणार म्हाडा कॉलोनी,) असे पुरातून वाचविलेल्या दोघांची नावे आहेत.

शहर व आजूबाजूच्या परिसरात काल रात्री जोरदार पासून झाला होता. जॉन्सन कंपनीत काम करणारे जॉन आणि वर्गीस हे दोघेही त्यांच्या (एम.एच.20.ए.टी.6019) या चारचाकी वाहनाने घरी म्हाडा कॉलोनी येथे जात असताना ए.एस.क्लब कडे जाणाऱ्या मार्गावर असलेल्या छोट्या पुलावर पूर आले आणि काही वेळातच त्या पुलाचा काही भाग पाण्यात वाहून गेल्याने दोघेही चारचाकी सह पुराच्या पाण्यात वाहून जाऊ लागले. दोघांची आरडाओरडा ऐकताच परिसरात राहणारे बिरजूलला ताराईएवाले, मोहनसिंग सलामपुरे, हे दोघेही धावत आले व त्यांनी लाकडी ओंढे पाण्याच्या प्रहवात फेकले. पाण्याचा जोर वाढतच चालला होता. जॉन ला पोहतायेत न्हवते, आणि वर्गीस दुसऱ्या ठिकाणी वाहून जात होता. जोरदार पाऊस सुरू असा परिस्थितीत भरतसिंग सलामपुरे, रामसिंग सलामपुरे, अमृतसिंग सलामपुरे,लालाचंद सूर्यवंशी, अक्षय सूर्यवंशी, हिरालाल सूर्यवंशी, सुरज सुर्यवंशी या सर्वांनी परिसराला वेढा घातला. त्यामधील एकाने सुमारे एक किलोमीटर धावत जात शेता मधील मोठी दोरी आणली. त्या दोरीच्या साहाय्याने जॉन ला पाण्याच्या प्रवाहातून बाहेर काढण्यात आले व वर्गीस हे ओंढक्याच्या साहाय्याने कठड्यावर आले. आणि सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.

विशेष म्हणजे जॉन चा शनिवारी वाढदिवस होता. वाढदिवसाच्या दिवशीच शेतकऱ्यांनी त्यास जीवनदान दिले. दोघांनीही या शेतकऱ्यांचे आभार मानले.

३४ हे काय जाण्याचं वय नाही; सुशांतच्या आत्महत्येवर पाकिस्तानी क्रिकेटरचं ट्विट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बाॅलीवुड अभिनेता सुशांत सिंह राजपुत याने आज त्याच्या मुंबईतील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या बातमीने बाॅलीवुड अगदी सुन्न झालेलं आहे. तर अचानक सुशांत सारख्या अभिनेत्यानं आत्महत्या करण्याचा टोकाची निर्णय का घेतला असा प्रश्न त्याच्या संपुर्ण चाहत्यावर्गाला पडलेला आहे. सुशांतच्या अचानक जाण्याने भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह प्रसिद्ध क्रिकेटर महेंद्रसिंह धोनी यांनी सुद्धा त्याच्या जाण्याने हळहळ व्यक्त करत करत ट्विट केले. आता पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक त्यानेसुद्धा ३४ हे काय जाण्याचे वय नाही असे म्हणत सुशांतच्या आत्महत्येवर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलीक यांनी नुकतेच एक ट्विट करून सुशांतच्या आत्महत्येने आपल्याला दुःखच झाल्याची भावना व्यक्त केली आहे. ३४ वय हे निघून जाण्याचं वय नाही असं भावनिक विधान शोएबने केले आहे. सूशांत सारखा चांगला नायक एवढी टोकाची भुमीका घेत आत्महत्या करतो ही अतिशय धक्कादायक बाब असल्याचेही सानिया मिर्झाचा पती तथा पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलीकने म्हटले आहे. त्याच्या आत्म्याला शांती देवो अशीही भावनिक साद शोएब याने ट्विटर च्या माध्यमातुन दिली आहे.

दरम्यान, सुशांतने आतापर्यंत पि. के . मधे एका पाकीस्तानी विद्यार्थ्याची भूमिका साकारली होती. तर सुपहीट एम एस डी मधे महेंद्र सिंह धोनीची भुमीकाही अगदी उत्कृष्ट पद्धतीने साकारली होती. त्य‍ाच्या अभिनयामुळे सुशांतचा चाहतावर्ग मोठा आहे. मात्र त्याच्या जाण्याने भारतासह विदेशातूनही दुःख व्यक्त होत आहे. मुळचा पाटना बिहार येथील असणारा सुशांत अगदी शांत स्वभावाचा असल्याचे त्याचे अनेक सहकारी सांगत आहेत. तसेच ३ दिवसांपूर्वी सुशांतच्या मेनेजर ने सुद्धा आत्महत्या केल्याची माहीती आहे.

सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येमागचं रहस्य ‘या’ पेंटिंगमध्ये लपलंय

मुंबई । बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सुशांत सिंग राजपूत याने आज सकाळी मुंबई येथील राहत्या घरात आत्महत्या केली. सुशांतच्या आत्महत्येमुळे संपूर्ण बॉलिवूड इंडस्ट्रीला धक्का बसला आहे. सुशांतने अशी अचानक आत्महत्या करण्याचा निर्णय का घेतला असा प्रश्न सर्वानाच सतावत आहे. अशात आता सुशांतच्या ट्विटर अकाउंटवरील कव्हर फोटोत त्याच्या आत्महत्येचे रहस्य लपले असल्याचे बोलले जात आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरील पोस्ट मागे काही दिवसांपूर्वी डिलीट केल्या होत्या. तसेच तो त्याच्या ट्विटर अकाऊनलाही अनेक दिवसांपासून ऍक्टिव्ह असल्याचे दिसत नाहीये. आता त्याच्या ट्विटर अकाउनवरील कव्हर फोटो चर्चेचा विषय ठरतो आहे. Starry Night नावाचे प्रसिद्ध पेंटिंग सुशांतने त्याच्या कव्हरला ठेवले आहे. व्हिन्सेंट वॅन गॉग नावाच्या चित्रकाराने १८८९ साली वेड्यांच्या दवाखान्यात भरती असताना हे पेंटिंग बनवले होते. हे पेंटिंग बनवले तेव्हा व्हिन्सेंट प्रचंड मानसिक तणावातून जात होता. त्याच्या खोलीतून दिसणाऱ्या दृश्यातून त्याने हे चित्र रेखाटले. हे पेंटिंग काढल्यानंतर विन्सेंटने १८९० साली आत्महत्या केली. आता सुशांतच्या कव्हरवर हे पेंटिंग असल्याने तो मानसिक तणावातून जात असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, करिअरच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचलेल्या सुशांत ने अचानक आत्महत्या केल्याने अनेकांना धक्का बसला आहे. पोलिसांनी त्याच्या घराची तपासणी केली असता त्यांना काहीही संशयास्पद सापडले नाही. मात्र सुशांतच्या मृत्यूचे कारण पोस्ट मार्टेम रिपोर्टनंतरच स्पष्ट होणार असल्याची प्रतिक्रिया मुंबई पोलिसांनी दिली आहे.

हे पण वाचा –

सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येमागचं कारण काय? मुंबई पोलीस म्हणतात..

लाॅकडाऊनमध्ये बागेत भुतं करतायत व्यायाम? व्हायरल व्हिडिओ पाहून पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि…

Big Breaking News | बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतची आत्महत्या

अभिजित बिचुकले आमदार होणार? राज्यपालांना पत्र पाठवल्याने चर्चेला उधाण

सलग सातव्या दिवशीही पेट्रोल डिझेल दरात वाढ 

लक्षणे नसणारे रुग्ण कोरोनाचे संक्रमण करत नाहीत – WHO

सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येमागचं कारण काय? मुंबई पोलीस म्हणतात..

मुंबई । बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत याने आज सकाळी मुंबई येथील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. सुशांतच्या अशा अचानक जाण्याने अनेकांना मोठा धक्का बसला आहे. सुशांतने आत्महत्या करण्यामागचे कारण काय असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. यावर आता मुंबई पोलिसांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्ये मागे काही घातपात आहे का अशी शंकाही मुंबई पोलिसांना होती. मात्र सुशांतच्या घराची तपासणी केल्यानंतर पोलिसांना काहीच संशयास्पद आढळलेले नाही. मात्र अभिनेता सुशांतसिंग राजपूत यांचा मृत्यू फाशीमुळे झाला असावा परंतु पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतरच त्याच्या मृत्यूचे नेमके कारण समजणार आहे असे अभिषेक त्रिमुखे, डीसीपी झोन ​​9, मुंबई यांनी म्ह्टले आहे. तसेच आतापर्यंत आम्हाला कोणतीही संशयास्पद वस्तू सापडली नाही असंही मुंबई पोलिसांनी म्हटले आहे.

सुशांतने ‘किस देश में है मेरा दिल’ मालिकेत पहिल्यांदा काम केलं. मात्र त्याला खरी ओळख एकता कपूरच्या पवित्र रिश्ता या मालिकेतून मिळाली. यानंतर त्याने बॉलिवूडमध्ये काम करण्यास सुरुवात केली. काय पो छे हा सुशांतचा पहिला सिनेमा होता. पहिल्याच सिनेमातील अभिनयाबद्दल त्याचं मोठ्या प्रमाणात कौतुक करण्यात आलं होतं. यानंतर सुशांतने परिणीती चोप्रासोबत शुद्ध देसी रोमांस सिनेमात काम केलं. पण त्याच्या नावाची सर्वात जास्त चर्चा भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा बायोपिक एम एस धोनी एनटोल्ड स्टोरी या सिनेमातून झाली. हा सुशांतच्या करिअरमधला पहिला सिनेमा होता ज्याने १०० कोटींपेक्षा जास्तची कमाई केली होती. सोनचिडिया आणि छिछोरे या सिनेमांमध्येही त्याने काम केलं आहे. सारा अली खानसोबतच्या केदारनाथ सिनेमानेही बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती.

हे पण वाचा –

लाॅकडाऊनमध्ये बागेत भुतं करतायत व्यायाम? व्हायरल व्हिडिओ पाहून पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि…

Big Breaking News | बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतची आत्महत्या

अभिजित बिचुकले आमदार होणार? राज्यपालांना पत्र पाठवल्याने चर्चेला उधाण

सलग सातव्या दिवशीही पेट्रोल डिझेल दरात वाढ 

लक्षणे नसणारे रुग्ण कोरोनाचे संक्रमण करत नाहीत – WHO

लक्षणे नसणारे रुग्ण कोरोनाचे संक्रमण करत नाहीत – WHO

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । २०१९ च्या डिसेंबरपासून जग कोरोना विषाणूशी लढतो आहे. या विषाणूने आधी चीन, इटली आणि आता जगाला हादरवून सोडले आहे. गेल्या तीन महिन्यात मोठ्या प्रमाणात रुग्ण जगभरात पसरले आहेत. जगभरातील शास्त्रज्ञ या विषाणूची लस शोधण्यात व्यस्त आहेत. यासोबतच या विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी जगभरातील देशांमध्ये संचारबंदी करण्यात आली आहे. या विषाणूचे संक्रमण झालेल्या प्रत्येक व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या लोकांना शोधणे त्यांना विलगीकरणात ठेवणे असे सर्व उपाय यंत्रणा जगभरात राबवित आहेत. असे काही रुग्णही सापडले आहेत. ज्यांना कोरोनाची कोणतीच लक्षणे दिसत नाहीत. मात्र त्यांना कोरोनाचे निदान झाले आहे. या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांनाही विलगीकरणात ठेवले जात आहे. मात्र आता जागतिक आरोग्य संघटनेने अभ्यासाअंती लक्षणे नसणारे रुग्ण हा आजार परसवत नाहीत असा मोठा खुलासा केला आहे. ज्यामुळे थोडासा दिलासा मिळाला आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या या खुलाशानंतर आता जे रुग्ण कोणतीच लक्षणे दाखवीत नाहीत. अशा रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांना कोरोना होण्याची शक्यता बऱ्याच अंशी कमी झाल्याने साऱ्यांनाच दिलासा मिळाला आहे. न्यूज मॅक्स या चॅनेलवरील मुलाखतीत फ्रान्सिस हॉस्पिटल च्या मेन्स हेल्थ सेक्शन चे संचालक डॉ डेविड समदी यांनी ही माहिती दिली आहे. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या ट्विटर अकॉउंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. डॉ डेव्हिड यांनी हा ३६० डिग्रीतील यु टर्न असल्याचे म्हंटले आहे. त्यामुळे आता ज्यांना कोरोनाची लक्षणे नाहीत मात्र त्यांना कोरोनाचे निदान झाले आहे अशा लोकांच्या संपर्कात आलेल्या लोकांना घाबरण्याचे काही कारण नाही.

जागतिक आरोग्य संघटना विविध देशांच्या संपर्कात राहून लक्षणे नसणाऱ्या रुग्णांकडून होणाऱ्या संक्रमणाचा अभ्यास करत आहे. नुकतेच त्यांनी या रुग्णांकडून खूप कमी प्रमाणात संसर्ग होत असल्याचे जाहीर केले होते. तसेच लक्षणे नसणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही कमी असल्याचे सांगण्यात आले होते. त्यानंतर आता या नव्या खुलाशाने साऱ्यांनाच दिलासा मिळाला आहे.

सलग सातव्या दिवशीही पेट्रोल डिझेल दरात वाढ 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या सात दिवसांपासून देशातील पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी व्हायचे नावच घेत नाहीत. सातत्याने हे दर वाढत आहेत. तर कच्च्या तेलाच्या किंमतीत दरदिवशी घटच होते आहे. तरीही पेट्रोल डिझेलचे दर वाढतच आहेत. त्यामुळे नागरिकांच्या खिशाला चांगलीच कात्री लागली आहे.

आज (शनिवारी) राजधानी दिल्लीत पेट्रोल प्रतिलिटर ७५रु झाले आहे. तर मध्यप्रदेशमध्ये शिवराज सरकारने पेट्रोल आणि डिझेलवर १-१ रुपये कर लावला आहे. देशातील प्रमुख मोठ्या शहरांमध्ये पेट्रोलच्या दरात ५९ ते ६० पैशांची वाढ झाली आहे तर डिझेलच्या दरात ५० ते ६० पैशांची वाढ झाली आहे. गेल्या सहा महिन्यात पेट्रोलच्या दरात ३.९० रुपये प्रति लिटर आणि डिझेलच्या दरात ४ रुपये प्रतिलिटर वाढ झाली आहे.

आज दिल्लीतील पेट्रोलचा दर ७५ रु प्रति लिटर आहे. तर डिझेल ७३.३९ रु प्रति लिटर झाले आहे. इतर शहरांच्या तुलनेत मुंबईत डिझेलचे दर अधिक आहेत. मुंबईत  पेट्रोलचे आजचे दर ८२.१० रूपये प्रती लिटर आहे.  तर डिझेल ७२.०३ रूपये प्रती लिटरनुसार मिळत आहे. चेन्नई आणि कोलकातामध्ये पेट्रोलचे दर क्रमशः ७८.९९रूपये आणि ७७.०५ प्रती लिटर आहे. डिझेलचे दर क्रमशः ७१.६४ रूपये  आणि ६९.२३ रूपये प्रती लिटर आहे.

Big Breaking News | बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतची आत्महत्या

मुंबई- प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतने त्यांच्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येचं कारण समोर आलं नसून यासंबंधी पोलीस तपास करत आहेत. रिपोर्टनुसार, काल रात्री सुशांतचे काही मित्र त्याच्या घरी होते. आज सकाळी बराचवेळ सुशांतने घरचा दरवाजा उघडला नाही म्हणून त्याच्या घरी काम करणाऱ्या नोकराने दरवाजा तोडला. यावेळी सुशांतचा देह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला. हाती मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या सहा महिन्यांपासून सुशांत डिप्रेशनमध्ये होता.त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात एक टीव्ही अभिनेता म्हणून केली.

सुशांतने ‘किस देश में है मेरा दिल’ मालिकेत पहिल्यांदा काम केलं. मात्र त्याला खरी ओळख एकता कपूरच्या पवित्र रिश्ता या मालिकेतून मिळाली. यानंतर त्याने बॉलिवूडमध्ये काम करण्यास सुरुवात केली. काय पो छे हा सुशांतचा पहिला सिनेमा होता. पहिल्याच सिनेमातील अभिनयाबद्दल त्याचं मोठ्या प्रमाणात कौतुक करण्यात आलं होतं.

यानंतर सुशांतने परिणीती चोप्रासोबत शुद्ध देसी रोमांस सिनेमात काम केलं. पण त्याच्या नावाची सर्वात जास्त चर्चा भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा बायोपिक एम एस धोनी एनटोल्ड स्टोरी या सिनेमातून झाली. हा सुशांतच्या करिअरमधला पहिला सिनेमा होता ज्याने १०० कोटींपेक्षा जास्तची कमाई केली होती. सोनचिडिया आणि छिछोरे या सिनेमांमध्येही त्याने काम केलं आहे. सारा अली खानसोबतच्या केदारनाथ सिनेमानेही बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.