Friday, January 2, 2026
Home Blog Page 5663

सोलापूरातील ‘या’ हॉस्पिटलमधील १३३ जणांवर गुन्हे दाखल

सोलापूर प्रतिनिधी | सोलापूर मधील कोरोना संसर्गाच्या कालावधीत रुग्ण सेवा न देणार्या अश्विनी हॉस्पिटल मधील 133 वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी आणि इतर सेवकांवर आज गुन्हा दाखल करण्यात आला. कोविड हॉस्पिटलसाठी नियुक्त सनियंत्रण अधिकारी धनराज पांडे यांनी ही माहिती दिली.

कोरोना संसर्गामध्ये रुग्णालयात उपस्थित राहून रुग्णसेवा न देता गैरहजर राहिल्यामुळे त्यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन कायदामधील कलम 188, 51 b,57 ,269, 336 यानुसार सदर बझार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे श्री. पांडे यांनी सांगितले.

कोरोना संसर्गात खासगी दवाखाने बंद राहिल्याने रुग्णांना सेवा मिळाली नाही. त्यामुळे सिव्हील हॉस्पिटलवरही ताण आला होता. दरम्यान यशोधरा हॉस्पिटल, सिद्धेश्वर स्पेशालिटी हॉस्पिटल, चिडगुपकर हॉस्पिटल आणि धनराज गिरजी हॉस्पिटल खास कोविड रुग्णांवर उपचारासाठी घोषित करण्यात आली आहेत. मात्र या हॉस्पिटलमध्ये काही डॉक्टर, अधिकारी, कर्मचारी, सेवक गैरहजर असल्याचे निदर्शनास आले आहे. हे जर उद्या, रविवारी दुपारी बारा वाजेपर्यंत हजर राहिले नाही तर त्यांच्यावरही गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया करण्यात येईल, असे पांडे यांनी सांगितले.

कोविड रुग्णांवर उपचारासाठी जाहीर करण्यात आलेल्या हॉस्पिटलमध्ये रुग्णांना दाखल करून घेतले पाहिजे. कोणत्याही हॉस्पिटलमध्ये रुग्णांना दाखल करून घेण्यात हयगय करु नये, काही समस्या असल्यास त्या प्रशासनाकडून सोडविण्यात येतील, असेही पांडे यांनी सांगितले.

लाॅकडाऊनमध्ये बागेत भुतं करतायत व्यायाम? व्हायरल व्हिडिओ पाहून पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | रात्रीची वेळ झाली की लोकांना घाबरवण्यासाठी वेगवेगळ्या भयपटांची, मालिकांची निर्मिती केली जाते, हे आपण वर्षानुवर्षे अनुभवत आलेलो आहोतच. दूरदर्शनवरील आप बीती, झी टीव्हीवरील आहट, झी मराठीवरील रात्रीस खेळ चाले या मालिका त्याचं परफेक्ट उदाहरण म्हणून ओळखल्या जातात. आता लॉकडाऊनमध्ये मालिकांचं चित्रीकरण बंद असलं तरी लोकांच्या डोक्यात या ना त्या पद्धतीने भूत घुसवण्याचा प्रकार सोशल मीडियातून चालूच असल्याचं पाहायला मिळत आहे. अंगावर काटा येणारं, मनात धडकी भरवणारं चित्रण पाहून दर्शकही काही काळासाठी घाबरल्याचं या व्हायरल व्हिडियोतून समोर आलं.

एका पार्कमध्ये जिम करण्यासाठी ठेवण्यात आलेली साधने अदृश्य भूतांकडून वापरली जात असल्याची बातमी व्हाट्सअप्प, ट्विटर आणि फेसबुकवर व्हायरल झाली होती. खांद्याचा व्यायाम करण्यासाठी असलेल्या मशीनमधून आवाज येणे, कुणीही व्यायाम करत नसताना यंत्रं काही वेळेकरता सुरु राहणे अशा गोष्टी घडत असल्याची बातमी व्हायरल करण्यात आली होती. ही घटना झाशी आणि दिल्लीमध्ये असलेल्या पार्कशी मिळतीजुळती असल्याचं वाटल्याने तेथील पोलिसांनी तात्काळ याची दखल घेतली.

पोलिसांनी शोध घेतलेल्या ठिकाणी व्हिडियोत दिसत असल्याप्रमाणे काहीच आढळलं नाही. मशीनचा येणारा आवाज हा नुकत्याच लावलेल्या ग्रीसमुळे येत असल्याचा खुलासा पोलिसांनी केला. आणि कोणतीही व्यक्ती नसल्याचं व्हिडियोत दाखवत कुणीतरी मशीनला तात्पुरता धक्का देऊन हा व्हिडीओ शूट केल्याचं समोर आलं आहे. या व्हिडियो बनवून व्हायरल करणाऱ्याचा शोध पोलीस घेत असून बागेत कुठल्याही प्रकारचं भूत नसल्याचा खुलासा त्यांनी केला आहे.

कराड तालुक्यातील घारेवाडीत सापडला मृत बिबट्या; ७२ तास उलटून गेल्याने लागल्या होत्या माशा

कराड प्रतिनिधी | कराड तालुक्यातील घारेवाडी येथे शिवम प्रतिष्ठान जवळ असलेल्या डोंगरात एका उताराच्या भागावर मृत अवस्थेत एक बिबट्या सापडला. सायंकाळी 5.30 ला एक धनगराला मेंढ्या घेऊन परतत असताना हा प्रकार दिसला. त्याने गावात सरपंचांना सांगितले, तातडीने वनक्षेत्रपाल विलास काळे यांना त्यांनी याची खबर दिली.

माहिती मिळताच वनक्षेत्रपाल विलास काळे हे पाटणहुन घटनास्थळी रवाना झाले. तत्पूर्वी वन विभागाचे इतर वनरक्षक व वनपाल हे घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. मा.मानद वन्यजीव रक्षक व पशुवैद्यकीय डॉ संजय हिंगमीरे हे दोघे कराड हुन घटनास्थळी तकाळ दाखल झाले. बिबट्या सडलेल्या अवस्थेत होता. त्याचे सर्व भाग म्हणजे नख्या, मिश्या दात सुस्थित होते.

दरम्यान, डॉ यांनी प्राथमिक तपासणी केली, बहुदा 72 तास हुन अधिक काळ मृत्यू होऊन झाले होते असे त्यांचे म्हणणे होते. बिबट्या मादी सुमारे 1.5 ते 2 वर्ष वय असलेली होती. बिबट्यास निमोनिया झाले होते व आतडयाचे विकार होते हे दिसले. बिबट्या च्या संपुर्ण शरीरात माशी, किडे, व मगोत(आळी) झालेल्या होत्या. अधिक तपास सुरू आहे. घटनास्थळी सहायक वनसंरक्षक किरण कांबळे, वनक्षेत्रपाल विलास काळे, मा मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे, डॉ संजय हिंगमीरे, वनरक्षक रमेश जाधवर, व इतर वन कर्मचारी उपस्थित आहेत.

अभिजित बिचुकले आमदार होणार? राज्यपालांना पत्र पाठवल्याने चर्चेला उधाण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मराठी बिगबॉस सिझन २ मध्ये सर्वात चर्चेत असणारे नाव म्हणजे अभिजित बिचुकले होय. बिगबॉस च्या घरात जाण्यापासून ते चर्चेत आलेच मात्र त्याआधीही त्यांच्या निवडणुकीला उभे राहण्याच्या जोशामुळे आणि आपण मुख्यमंत्री होणार या आत्मविश्वासामुळे ते चर्चेत होतेच. बिगबॉसच्या घरातही ते अनेकविध कारणांनी वादातीत राहिले. तसेच त्यांनी प्रेक्षकांचे खूब मनोरंजन ही केले. त्यानंतर यंदाच्या विधानसभा निवडणुकीतही त्यांची चांगलीच चर्चा रंगली होती. मात्र गेल्या काही दिवसात बिचुकले फारसे दिसले नाहीत. आता राज्यपालांना पत्र लिहून ते पुन्हा चर्चेत आले आहेत. त्य‍ांनी पत्रातून विधानपरिषदेवर आमदार म्हणुन जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

सतत वादातीत अभिजित बिचुकले यांना आता विधानपरिषदेवर आमदार म्हणून जाण्याची ईच्छा झाली आहे. आणि नेहमीप्रमाणे त्यांना याचा पूर्ण आत्मविश्वास आहे. म्हणूनच त्यांनी वेळ न दवडता महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पत्र लिहून आपली ईच्छा व्यक्त केली आहे. महाराष्ट्र विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त सदस्यांचा कार्यकाळ आता संपत आला आहे. म्हणूनच कला विभागातून आपली विधानपरिषदेवर आमदार म्हणून निवड करावी असे त्यांनी राज्यपालांना या पत्रात लिहिले आहे.

कवी मनाचे अभिजित बिचुकले यांनी आपल्या मागणीचे पत्र राज्यपालांना पाठविले असले तरी प्रत्यक्ष राज्यपाल नियुक्त आमदार होण्यासाठी प्रथम मुख्यमंत्र्यांना अर्ज करावा लागतो. त्यानंतर मुख्यमंत्री राज्यपालांकडे शिफारस करतात. अशी प्रक्रिया असते. मात्र बिचुकलेनी थेट राज्यपालांना पत्र लिहिले आहे. आणि विशेष म्हणजे शिवसेना, राष्ट्रवादी नेत्यांवर टीकादेखील या पत्रात त्यांनी केली आहे. आता राज्यपाल या पत्राला काय उत्तर देतात याकडे नक्कीच साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

म्हणुन देवेंद्र फडणवीसांनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट

मुंबई । जून महिन्याच्या अगदी सुरुवातीलाच महाराष्ट्राला ‘निसर्ग’ या चक्रीवादळाचा फटका बसला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीवरील परिसरात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या चक्रीवादळानंतर कोकणातील नुकसान पाहण्यासाठी माजी मुख्यमंत्री तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काही सहकाऱ्यांसमवेत कोकण दौरा केला होता. यानंतर त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन बाधितांना मदत करण्याचे निवेदन दिले आहे.

मुंबईतील शिवाजी पार्क परिसरातील बाळासाहेब ठाकरे स्मारक येथे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील समितीदेखील त्यांच्यासमवेत उपस्थित होती. दोन दिवसाच्या कोकणदौऱ्यात त्यांनी केलेल्या पाहणीनुसार तेथील बाधित नागरिकांना मदत देण्याच्या दृष्टीने एक निवेदन त्यांनी यावेळी मुख्यंमत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केले. यावेळी त्यांनी एक बैठक घेतली ज्यामध्ये चक्रीवादळाच्या एकूण नुकसान आणि पुढील उपाययोजनांची चर्चा करण्यात आली.

दौऱ्यामध्ये फडणवीस यांना  फलोत्पादकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्यांच्यापर्यंत पोहोचणारी शासकीय मदत अपुरी असल्याचे निदर्शनास आले आहे. तेही त्यांनी या बैठकीत सांगितले. जून महिन्याच्या सुरुवातीला आलेल्या या चक्रीवादळामुळे कोकण किनारपट्टीवरील परिसराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनीही परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी कोकण दौरा केला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

जॉर्ज फ्लॉयडच्या मृत्यूनंतर ‘चॉकहोल्ड’च्या तंत्रावर बंदी आणण्याचे ट्रम्प यांचे सूतोवाच

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे की, काही विशिष्ट परिस्थिती व्यतिरिक्त पोलिसानी ‘चॉकहोल्ड’ (एखाद्या व्यक्तीवर नियंत्रण ठेवण्यासाठी त्याच्या गळ्यावर हाताने घट्ट करण्याचे तंत्र)चा वापर थांबवावा अशी त्यांची इच्छा आहे. ट्रॉक्स फॉक्स न्यूज चॅनलवर शुक्रवारी प्रसारित झालेल्या मुलाखतीत ते म्हणाले, “मला चॉकहोल्ड आवडत नाहीत. हे तंत्र थांबवलेच पाहिजे. “

मात्र, पोलिस अधिकारी जेव्हा एकटे असतात एक एक करत जेव्हा ते अनेक लोकांविरूद्ध लढत असतात तेव्हा अशा परिस्थितीत त्याच्या या वापरास ट्रम्प यांनी पाठिंबा दर्शविला आहे. ते म्हणाले की, अशा परिस्थितीत ते या तंत्राचा वापर करु शकतील. जॉर्ज फ्लॉयडचा मृत्यू झाल्यानंतर ‘चॉकहोल्ड’ या तंत्राच्या वापराबाबत अनेक प्रश्न विचारले जाऊ लागले आहे.

एका गोऱ्या पोलिस अधिकाऱ्याने फ्लॉईड याच्या मानेवर गुडघे टेकवले त्याच्या या कृतीमुळे त्याचा मृत्यू झाला. यानंतर देशभरातील आंदोलनांच्या पोलिस सुधारणांसह या तंत्रावर बंदी घालण्याची मागणी होत आहे. देशातील अनेक विभागात याला यापूर्वीच बंदी घालण्यात आलेली आहे.

‘चॉकहोल्ड’ या तंत्रामध्ये अधिकारी संशयिताच्या मानेला हाताने घट्ट पकडतो ज्यामुळे त्याला श्वास घेण्यास त्रास होतो. यामुळे २०१४ मध्ये एरिक गार्नर या नागरिकाचा मृत्यू झाला आहे. देशभर झालेल्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर व्हाईट हाऊस पोलिस सुधारणांच्या शासकीय आदेशावर काम करत आहे. मात्र , त्यात ‘चॉकहोल्ड’ चा उल्लेख केला जाईल की नाही हे अजूनही स्पष्ट झालेले नाही.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

अमेरिकेच्या पहिल्या हिंदू खासदार तुलसी गॅबार्ड म्हणाल्या,”अशा कठीण काळात भगवद्गीता शक्ती आणि शांती देईल”

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेच्या पहिल्या हिंदू खासदार असलेल्या तुलसी गॅबार्ड म्हणाल्या की, कोरोना संकटाच्या या अशांत काळामध्ये भगवद्गीतेतून निश्चितता, सामर्थ्य तसेच शांती मिळू शकते. हवाई येथील कॉंग्रेसच्या या ३९ वर्षीय सदस्याने आपल्या ऑनलाइन केलेल्या आवाहनात सांगितले की सध्याचा हा अराजकतेचा काळ आहे आणि उद्या काय होईल हे कुणालाही ठामपणे सांगता येत नाही आहे. गॅबार्ड यांनी २०२० च्या हिंदू वर्गातील विद्यार्थ्यांसाठी म्हटले आहे की, “भगवद्गीतेत श्री कृष्णाने शिकवलेल्या भक्ती योग आणि कर्मयोगातून आपल्याला निश्चितता, सामर्थ्य आणि शांती मिळते.”

अमेरिकेच्या मिनियापोलिसमध्ये एका गोऱ्या पोलिस अधिकाऱ्याकडून एका कृष्णवंशीय आफ्रिकन-अमेरिकन जॉर्ज फ्लॉइडच्या हत्येच्या विरोधात झालेल्या निषेधाच्या वेळी त्यांनी संबोधित केले. हिंदू विद्यार्थी परिषदेने ७ जून रोजी पहिले ऑनलाइन हिंदू संबोधन आयोजित केले होते ज्यामध्ये कोविड -१९ च्या या संकट काळात एकजुटता दाखवण्यासाठी फेसबुक आणि यूट्यूबवर हजारो प्रेक्षक आले होते.

जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटीच्या म्हणण्यानुसार, जगभरात साथीच्या रोगाने ७६,००,००० पेक्षा जास्त लोकांना संसर्ग बसला आहे आणि ४,२५,००० हून अधिक लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. अमेरिका या आजाराने सर्वाधिक बळी पडलेला देश आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

पोलीस ठाण्यासमोरच रिक्षा चालकांची फ्री स्टाईल हाणामारी

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे

सांगली शहर पोलीस ठाण्यासमोरच शुक्रवारी दुपारच्या सुमारास रिक्षामध्ये प्रवासी घेण्याच्या कारणावरून दोन रिक्षा चालकांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी झाली. दुपारी भर रस्त्यात पोलिसांसमोर घडलेल्या प्रकारामुळे महापालिका चौकात एकच गोंधळ उडाला होता.

मारहाण सुरू होताच पोलिसांनी तेथे धाव घेत या दोघा रिक्षा चालकांना पोलीस ठाण्यात आणत त्यांची चांगलीच चौकशी केली. दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. सार्वजनिक ठिकाणी अशा पद्धतीने हाणामारी करणाऱ्या या दोघांवर सध्या कारवाई करण्याचं काम सध्या सुरू आहे. मात्र पोलीस ठाण्यासमोरच घडलेल्या फ्रीस्टाईल हाणामारीच्या प्रकारामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

सांगली शहर पोलीस ठाण्यासमोर रिक्षा थांबा आहे. या ठिकाणी बाजारपेठेत येणारे नागरिक रिक्षा थांब्यावर येत असतात. शुक्रवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास एक प्रवासी घरी जाण्यासाठी येथील रिक्षा स्टॉप जवळ आला. तो जाण्यासाठी एका रिक्षामध्ये बसला. त्याठिकाणी असणाऱ्या दुसऱ्या रिक्षाचा ड्रायव्हरने येत त्या प्रवाशाला आपल्या रिक्षात बसा माझा नंबर आहे असे सांगितले. यावरून दोन रिक्षाचालकांमध्ये जोरदार वाद सुरु झाला. वादाचे रूपांतर पुन्हा हाणामारी मध्ये झाले. भर दुपारी शहरातील प्रमुख मार्गावर असणाऱ्या वर्दळीच्या चौकामध्ये हा प्रकार सुरु होता. एकमेकांचे कॉलर पकडून एकमेकांना मारहाण करत हे रिक्षा चालक शिवीगाळी करत हा सर्व प्रकार सुरु होता. दुपारची वेळ असल्याने मोठ्या प्रमाणावर नागरिक या रस्त्यावरून येजा करत होते. सर्वांसमोर हा हाणामारीचा प्रकार घडत असल्याने गोंधळच वातावरण निर्माण झालं होत.

दरम्यान या हाणामारीमुळे भारती कॉलेज चौकात वाहतूक काहीकाळ विस्कळीत झाली होती. पोलिसांच्या निदर्शनास हा प्रकार येताच त्यांनी तातडीने धाव घेत दोघाही रिक्षा चालकांना पोलीस ठाण्यात आणत चांगलीच समाज दिली. अश्या वर्दळीच्या ठिकाणी पोलीस ठाण्यासमोरच फ्रीस्टाईल हाणामारी झाल्याने आश्र्चर्य व्यक्त केलं जात आहे. दरम्यान, या दोघाही रिक्षा चालकांवर कारवाई करण्याचं काम सध्या सुरु आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

भारतात कोरोनाच्या समूह संसर्गाला सुरवात? तज्ञांनी सरकारला दिला ‘हा’ इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतात संचारबंदीचा पाचवा टप्पा सुरु झाल्यापासून काही नियम शिथिल करण्यात आले आहेत. लोक आता हळूहळू घराबाहेर पडत आहेत. यानंतर देशात मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे भारतात समूह संसर्ग झाल्याची चर्चा सुरु होती. मात्र भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने हा दावा फेटाळून लावला होता. मात्र तज्ञांनी सरकारच्या अडथळ्यामुळे न स्वीकारले जाणारे हे सत्य स्विकारण्याच्या सूचना दिल्या आहेत.

संचारबंदीचे नियम शिथिल केल्यापासून वाढणारे रुग्ण पाहता हा दावा करण्यात आला होता. मात्र आयएमसीआर ने हा दावा फेटाळून लावल्यानंतर देशातील काही तज्ज्ञ डॉक्टरांनी देशात समूह संसर्ग झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस चे माजी संचालक डॉ एम.सी मिश्रा यांनी आयएमसीआर च्या एकूण पाहणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांनीही संचारबंदीचे नियम शिथिल झाल्यापासून जसे लोक बाहेर पडले तशी रुग्णसंख्या वाढली असल्याचे सांगितले. ज्या भागात रुग्ण नव्हते अशा भागातही संसर्ग झाल्याचे समर आले आहे. त्यामुळे हा समूह संसर्गच आहे असे त्यांनी म्हंटले आहे.

समूह संसर्गाची परिस्थिती लक्षात घेऊन सरकारने ती मान्य करण्याची गरज आहे, म्हणजे लोक गैरसमजात राहणार नाहीत असे त्यांनी सांगितले.  आयएमसीआरच्या पाहणीतच असे दिसून आले आहे की, कोणताच प्रवास इतिहास नसणाऱ्या ४०% लोकांना कोरोनाबाधा झाली आहे. तसेच ते इतर कोरोना संक्रमित रुग्णांच्याही संपर्कात आलेले नाहीत. तर मग हा समूह संसर्ग नाही तर काय आहे? असा प्रश्न विष्णुशास्त्रज्ञ शहीद जमाल यांनी विचारला आहे. दिल्लीतील गंगा राम रुग्णालयात कार्यरत असणारे डॉ अरविंद कुमार यांनीही आयएमसीआर चे म्हणणे स्वीकारले तरी दिल्ली, मुंबई आणि अहमदाबाद सारख्या शहरात समूह संसर्गच झाला असल्याचे म्हंटले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

अमरावतीत धरणात बुडून दोन बहिणींचा मृत्यू

अमरावती प्रतिनिधी | आशिष गवई

अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यातील पथ्रोट नजीकच्या गोंडवाघोली गावाला लागुन असलेल्या भुलेश्वरी धरणात दोन सख्या बहीणींचा बुडून मृृत्यु झाल्याची दुर्देवी घटना घडली. कुणबी वाघोली येथील रश्मीता राजेश बेलसरे वय १० वर्षे व कावेरी राजेश बेलसरे वय ८ वर्षे अशी सदर बहिणींची नावे आहेत.

हाती आलेल्या माहितीनुसार, दोघी बहीणी व दोन मावस बहीणी खेळत खेळत धरणा वर पोहचल्या. तिथे पाण्यात उतरुन आंघोळ करत असताना खोल पाण्यात पाय घसरुन पडल्याने दोघी बहिणींचा पाण्यात बुडुन मृृृृत्यु झाला. बाकी दोघी मात्र सुखरूप बचावल्या. सदर विद्यार्थीनी जि.प शाळा गोंडवाघोली शाळेच्या असल्याची माहीती आहे.

पोलिसांनी दोनही मृतदेह धरणांतून काढून शवविच्छेदना करिता ग्रामीण रुग्णालयात पाठवले आहे. पुढील तपास पथ्रोट चे एपी आय खेडेकर सह पथ्रोट पोलीस करत आहेत. मात्र या दुर्देवी घटनेनेने पथ्रोट येथे हळहळ व्यक्त केल्या जात आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.