Friday, January 2, 2026
Home Blog Page 5666

चीनची राजधानी बिजिंगमध्ये पुन्हा संपुर्ण लाॅकडाउन जाहीर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | जगभरात कोरोनाने थोडासा ब्रेक घेतला असावा असे वाटत असतानाच पुन्हा एकदा नव्याने मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येत आहेत.  कोरोना साथीची सुरुवात जिथे झाली असे मानले जाते त्या चीनमध्ये संक्रमण आटोक्यात आल्याची चर्चा होती. पण पुन्हा एकदा चीनमध्ये कोरोनाचा कहर सुरु झाला असल्याची माहिती समोर आली आहे. चीनची राजधानी बीजिंग मध्ये २ रुग्ण तर संपूर्ण चीनमध्ये १० नवीन रुग्ण सापडले असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे बीजिंग मध्ये काही ठिकाणी पुन्हा एकदा संचारबंदी जाहीर करण्यात आली असून पहिली ते तिसरीच्या शाळा उघडण्याच्या निर्णयावरही स्थगिती आणण्यात आली आहे. जवळपास ५६ दिवसानंतर चीनमध्ये कोरोनाचे हे रुग्ण आढळून आले आहेत.

या रुग्णांना कोरोनाचे निदान झाल्याचे लक्षात आल्यावर आता कुठे सुरळीत जनजीवनाला सुरुवात केलेल्या चीनमध्ये पुन्हा चिंता वाढली आहे. चीनमधील शेवटच्या रुग्णाला ९ जुंरोजी डिस्चार्ज देण्यात आला होता. गेल्या काही महिन्यांत चीनमधील शहरांमध्ये अलगाव ठेवण्यात आला होता. तसेच विदेशातून परत आणलेल्या चीनी नागरिकांनाही बीजिंग मध्ये न उतरवता इतरत्र उतरवून १४ दिवसांच्या अलगावात ठेवण्यात आले होते. त्यामूळे तीन दिवसात समोर आलेल्या रुग्णांमुळे चीनमध्ये चिंता वाढली आहे. मात्र यावर तात्काळ कृती करीत काही ठिकाणी संचारबंदी करण्यात आली आहे.

माध्यमांद्वारे समोर आलेल्या माहितीनुसार पुन्हा कोरोनाच्या रुग्णांचे निदान झाल्यमुळे पहिली ते तिसरी पर्यंत शाळा उघडण्याचा निर्णयही स्थगित करण्यात आला आहे. शुक्रवारी बाहेरून बीजिंगमध्ये आलेल्या एका प्रवाशाला कोरोनाचे निदान झाले आहे. त्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा संपर्क शोधणे सुरु आहे. बीजिंग च्या शिचेन्ग जिल्ह्यात संक्रमित व्यक्ती सापडली आहे. या व्यक्तीच्या कुटुंबातील २ व्यक्ती सध्या निरीक्षणाखाली आहेत. तसेच या व्यक्तीचा मुलगा ज्या वर्गात शिकत होता त्याच्या वर्गातील ३३ विद्यार्थी आणि १५ शिक्षकांनाही निरीक्षणात ठेवण्यात आले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीला झाली कोरोनाची बाधा

इस्लामाबाद । पाकिस्तानात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेदिवस वाढत असताना एका माजी पाकिस्तानी क्रिकेटपटूला याची लागण झाली आहे. पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीला कोरोनाची लागण झाली आहे. खुद्द आफ्रिदीने ट्विटरवर ही माहिती दिली आहे. ”गुरुवारपासून माझी तब्येत बिघडली आहे. मला फार वेदना होत असून, दुर्दैवानं कोरोना चाचणी केल्यानंतर ती पॉझिटिव्ह आली. यातून बाहेर पडण्यासाठी तुमच्या प्रार्थनेची गरज आहे,” असे ट्टीट आफ्रिदीने केले आहे.

जागतिक क्रीडा क्षेत्रात आणि क्रिकेटमधील काही खेळाडूंना याआधी कोरोनाची लागण झाली होती. पण एखाद्या प्रसिद्ध क्रिकेटपटूला करोना व्हायरसची लागण होण्याची ही पहिलीच घटना आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी मोदी आणि भारतावर आगपाखड करणाऱ्या शाहिद आफ्रिदीवर कठोर टीका करण्यात आली होती. आफ्रिदीने काश्मीर संदर्भात देखील भारतावर टीका केली होती. भारतातील क्रिकेट विश्वातील खेळाडूंनी शाहीद आफ्रिदीच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला होता.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा.
ब्रेकिंग बातम्यासाठी : www.hellomaharashtra.in

‘त्या’ चिमुरडीसाठी आदित्य ठाकरे आले देवदूतासारखे धावून

मुंबई । मुलुंडमधील फोर्टिस रुग्णालयात अवघ्या ६ दिवसांची चिमुरडी मृत्यूला झुंज देत आहे. आरजू अंसारी नावाच्या या चिमुरडीच्या ह्रदयात जन्मतः ३ वॉल ब्लॉक आहेत. या गंभीर आजारावर मात करण्यासाठी तिच्यावर तात्काळ ह्रदय शस्त्रक्रिया होणं आवश्यक आहे. परंतू आरजूच्या आई-वडिलांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाखीची आहे. दरम्यान तिचे वडील मुलीला वाचवण्यासाठी पैसे जुळवण्यासाठी अथक प्रयत्न करत होते. सोशल मीडियातून आदित्य ठाकरे यांच्यापर्यंत ही बाब पोहचताच त्यांनी लगेचच युवा सेनेच्या स्थानिक कार्यकर्त्यांमार्फत याबाबत माहिती घेतली आणि अन्सारी यांना आर्थिक मदत केली.

मिळालेल्या माहितीनुसार, घणसोली इथं राहणाऱ्या अब्दुल अंसारी यांच्या ६ दिवसांची मुलगी आरजूच्या हृदयात जन्मतःच तीन ब्लॉकेज असल्याचं निदान लागताच तिच्या वडिलांनी तिला मुलुंडच्या फोर्टिस रुग्णालयात दाखल केलं. फोर्टिस रुग्णालयात मुलीला दाखल केल्यानंतर तिच्या उपचारासाठी दोन लाखांपेक्षा जास्त पैसे लागतील हे कळताच त्यांच्या पाया खालची जमीन सरकली. त्यानंतर त्यांनी आपल्या जवळच्या नातेवाईकांकडे मदतीची मागणी केली. परंतु त्यांच्या कठीण प्रसंगी नातेवाईकांनी त्यांची साथ दिली नाही.

अखेर आरजूच्या वडिलांच्या हाकेला राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे धावून आले आहेत. जेव्हा आदित्य ठाकरेंनी सोशल मीडियावर ही पोस्ट वाचली तेव्हा त्यांनी तात्काळ याची दखल घेत आरजूच्या शस्त्रक्रियेसाठी मदत केली. आदित्य ठाकरेंच्या मदतीनंतर आता आरजूवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यामुळे आरजूच्या आई-वडिलांनी आदित्य ठाकरेंचे आभार मानले आहेत. दरम्यान, सोशल मीडिया हे माध्यम अत्यंत प्रभावी माध्यम असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

धार्मिक स्थळे, मॉल आणि रेस्टॉरंट्ससाठी केंद्राची नवीन नियमावली

नवी दिल्ली । देशात अनलॉक -१ दरम्यान कोरोना विषाणूच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी रात्री रेस्टॉरंट्स, हॉटेल्स, धार्मिक स्थळे, शॉपिंग मॉल्स आणि कार्यालयांसाठी एक नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यापूर्वी ४ जून रोजी आरोग्य मंत्रालयाने सरकारी व निमशासकीय परिसरांसाठी प्रमाणित कार्यप्रणाली (एसओपी) जारी केली होती, परंतु आता जनतेला हे अधिक चांगल्या प्रकारे समजण्यासाठी मंत्रालयाने रंगीबेरंगी छायाचित्रांचे मार्गदर्शक सूचना नव्या स्वरूपात जारी केल्या आहेत. त्यात ते पुढे म्हणाले, “जसे आपण अनलॉक -1 मध्ये पुढे जात आहोत, कोरोना विषाणूचा प्रसार होण्यापासून रोखण्यासाठी आम्हाला यापुढे नेहमीच योग्य कोविड नियम पाळणे आवश्यक आहे.

मॉल,रेस्टॉरंट्स आणि सार्वजनिक ठिकांणासाठीची नियमावली
 –चेहरा झाकण्यासाठी फेस मास्क किंवा कापड वापरणे बंधनकारक आहे.
– सोशल डिस्टेंसिंग (एकमेकांमधील ठरावीक अंतर) पाळणे महत्वाचे.
– सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यावर निर्बंध
– साबण / सॅनिटायझरद्वारे नियमित काही वेळाने वारंवार हात धुणे.
– सार्वजनिक ठिकाणी वावरताना दुसऱ्यापासून किमान ६ फूट अंतर राखणे
– रुमाल किंवा इतर कापडाने तोंड आणि नाक चांगले झाकून घ्या.

धार्मिक स्थळी दर्शनासाठी जात आहात, तर या सूचनांवर नजर टाका
– केवळ लक्षणे नसलेल्या लोकांनाच मंदिरात प्रवेश करण्याची परवानगी
– सॅनिटायझरची व्यवस्था करणे अनिवार्य आहे.
– प्रवेशद्वाराच्या गेटवर थर्मल स्क्रीनिंग अनिवार्य आहे.
– शूज किंवा चप्पल आपल्या वाहनातून किंवा बाहेर काढाव्या लागतील.
– आत जाण्यापूर्वी हात पाय पूर्णपणे साबणाने धुवावेत.
– आपल्याला सोशल डिस्टेंसिंग (एकमेकांमधील ठरावीक अंतर) नियमांनुसार बसावे लागेल.
– मूर्ती, देव मूर्ती आणि पुस्तकांना स्पर्श करण्यास परवानगी नाही.
– समूह किंवा गटाने भक्तिपर संगीत, गीत गाण्यावर बंदी.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा.
ब्रेकिंग बातम्यासाठी : www.hellomaharashtra.in

कराड येथे 2 वर्षाच्या मुलासह आईची कोरोनावर मात

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

कराड येथील कृष्णा हॉस्पिटलच्या कोरोना विशेष वॉर्डमध्ये उपचार घेत असलेल्या 8 जणांनी कोरोनावर मात केली. यामध्ये 2 वर्षाच्या मुलासह त्याच्या आईचाही समावेश होता. या कोरोनामुक्त रूग्णांना टाळ्यांच्या गजरात डिस्चार्ज देण्यात आला. आत्तापर्यंत कृष्णा हॉस्पिटलमधून एकूण 185 कोरोनामुक्त रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

जांबेकरवाडी येथील 22 वर्षीय महिला व तिचा 2 वर्षाचा मुलगा, खराडे-हेळगाव येथील 55 वर्षीय पुरूष, 45 वर्षीय महिला, बहुलेकरवाडी येथील 60 वर्षीय पुरूष, कालेवाडी-पाटण येथील 46 वर्षीय पुरूष, मारूल-दिवशी येथील 27 वर्षीय युवक, सळवे-पाटण येथील 45 वर्षीय महिला हे रूग्ण गेले काही दिवस कृष्णा हॉस्पिटलच्या कोरोना विशेष वार्डमध्ये उपचार घेत होते. त्यांचे उपचारनंतरचे अहवाल निगेटीव्ह आल्याने आज त्यांना टाळ्यांच्या गजरात डिस्चार्ज देण्यात आला.

यावेळी आकाश चौगले, डॉ. नसिमा कणसे, डॉ. हर्षाली पाटील, डॉ. शालू शर्मा, कृष्णा हॉस्पिटलचे कर्मचारी शंकर पाटील, मुसा मुल्लाणी, दिपक कदम, पोपट जाधव, गणेश पाटोळे, जयंत शिंदे, अमोल कांबळे व बबन कदम यांच्या हस्ते कोरोनामुक्त रूग्णांचा पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी कृष्णा हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. ए. वाय. क्षीरसागर, डॉ. संजय पाटील, डॉ. व्ज़ी. सी. पाटील, डॉ. विनायक राजे, रोहिणी बाबर यांच्यासह हॉस्पिटलचा अन्य स्टाफ उपस्थित होता.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

शेतकऱ्यांसाठी खुशखबर! या स्कीमअंतर्गत ९ हजार करोड रुपये बळीराजाच्या खात्यांत जमा; ३१ जुलै नोंदणीसाठी शेवटची तारीख

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्र सरकारतर्फे शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या पीक विमा योजनेअंतर्गत आतापर्यंत देशभरात सुमारे १४,००० कोटी रुपयांचे पीक विमा दावे नोंदवले गेले आहेत, त्यापैकी आतापर्यंत फक्त ९,००० कोटी रुपयांच्या दावे हे निकाली काढले गेलेले आहेत. एका मीडिया रिपोर्टनुसार सर्वाधिक पीक विमा दावे हे हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात निकाली काढण्यात आले आहेत, जिथे जवळपास सर्वच दावे निकाली काढण्यात आलेले आहेत. याआधी पंतप्रधान पीक विमा योजना ही सर्व शेतकऱ्यांसाठी सक्तीची करण्यात आलेली होती, परंतु आता ती ऐच्छिक करण्यात आली आहे. आता जर शेतकरी विमा प्रीमियम बँकेत जमा करतील तरच त्यांना या योजनेचा लाभ मिळेल अन्यथा नाही.

रजिस्ट्रेशनची अंतिम तारीख ३१ जुलै २०२० आहे
जर तुम्हालाही या पंतप्रधान विमा योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर खरीप पिकांच्या विम्यासाठीची शेवटची तारीख ही ३१ जुलै २०२० आहे. ज्या कर्जदार शेतकऱ्यांना ही विमा सुविधा नको असेल त्यांनी या योजनेच्या शेवटच्या तारखेच्या ७ दिवस आधीच त्यांच्या बँक शाखेला लेखी स्वरूपात कळवावे. कर्ज नसलेले शेतकरी हा विमा स्वत:देखील सीएससी, बँक, एजंट किंवा विमा पोर्टलवरून थेट घेऊ शकतात.

योजनेत केला हा मोठा बदल
या वर्षापासून शेतकऱ्यांसाठी ही पंतप्रधान पीक विमा योजना ऐच्छिक करण्यात आलेली आहे. साध्या शब्दांत सांगायचे झाले तर याआधी ज्यांनी कर्ज घेतले आहे त्यांच्यासाठी देखील हा विमा घेणे सक्तीचे करण्यात आलेले होते, मात्र आता ते ऐच्छिक आहे. सर्व शेतकऱ्यांना आपल्या पीक विम्यासाठी बँकेत अर्ज करावा लागेल. जो शेतकरी बँकेत जाऊन पीक विम्याचा पर्याय निवडेल त्याचा विमा प्रीमियम वजा केला जाईल.

तसेच त्याला या पीक विम्याचा लाभही मिळेल. या विमा योजनेत पूर्वीप्रमाणे सर्व केसीसी धारकांना पीक विमा घेता येणार नाही तसेच त्यांचे प्रीमियमही कट केले जाणार नाहीत. येत्या खरीपासाठी पीक विमा प्रीमियम सादर करण्याची शेतकऱ्यांसाठी ३१ जुलै ही अंतिम तारीख आहे.

PMFBY मध्ये कसा फायदा मिळेल
पेरणीच्या १० दिवसांच्या आत, शेतकऱ्याला PMFBYचा अर्ज भरावा लागेल. तसेच जर नैसर्गिक आपत्तीमुळे तुमचे पीक खराब झाले असेल तरच या विम्याच्या रक्कमेचा लाभ देण्यात येईल. पेरणी आणि काढणी दरम्यान उभ्या पिकांना नैसर्गिक आपत्ती, रोग आणि कीटकांकडून नुकसान झाले तर या झालेल्या नुकसानीची भरपाई मिळते. उभ्या पिकांना स्थानिक आपत्ती, गारपीट, दरड कोसळणे, ढगफुटी, आकाशीय विजेमुळे होणारी हानी यांमुळे होणाऱ्या नुकसानीची देखील भरपाई मिळते. पीक काढणीनंतर १४ दिवस शेतात वाळववण्यासाठी ठेवलेल्या पिकांची अवकाळी, चक्रीवादळ, गारपिट आणि वादळामुळे होणाऱ्या नुकसानीची भरपाई देखील विमा कंपनी तुम्हांला देईल. प्रतिकूल हंगामी परिस्थितीमुळे पिकाची पेरणी झाली नाही तरीही याचा फायदा दिला जाईल.

प्रीमियम किती भरावा लागेल
खरीप पिकासाठी प्रत्येकी २% प्रीमियम आणि रब्बी पिकासाठी १.५% प्रीमियम भरावा लागतो. पीएमएफबीवाय योजना व्यावसायिक आणि बागायती पिकांसाठी विमा संरक्षण देखील प्रदान करते. यात शेतकऱ्यांना ५% प्रीमियम भरावा लागतो.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणत्या डॉक्यूमेंटची आवश्यकट असते
यासाठी शेतकर्‍याचा फोटो, ओळखपत्र, रहिवासी पुरावा, शेती क्रमांक, शेतातील पिकाचा पुरावा द्यावा लागतो.

या दाव्यासाठी शेतकरी विमा कंपनीच्या टोल-फ्री नंबर १८००२००५१४२ किंवा १८००१२०९०९०९० वर किंवा विमा कंपनी तसेच कृषी विभाग तज्ञाशी संपर्क साधू शकतात. यासाठी ७२ तासांचा कालावधी निश्चित केला गेलेला आहे. नुकसान झाल्यास, शेतीनिहाय नुकसानीचे मूल्यांकन करून पैसे दिले जातात.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

म्हणून पाकिस्तान चीनला पाठविणार ८० हजार गाढव  

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगभरात कोरोना महामारीचे संकट सुरु आहे. बहुतांश साऱ्याच देशांची अर्थव्यवस्था गंभीर झाली आहे. पाकिस्तानची अर्थव्यवस्थाही गंभीर झाली आहे. मात्र पाकिस्तानमधील आर्थिक सर्वेक्षणानुसार पाकिस्तानात गाढवांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचे समोर आले आहे. पाकिस्तानचे आर्थिक सल्लागार अब्दुल हाफिज शेख यांनी ही माहिती दिली आहे.

एका आर्थिक सर्वेक्षणानुसार २०१९ -२० मध्ये पाकिस्तानमध्ये १ लाख गाढवांची वाढ झाली आहे. या वाढलेल्या संख्येनुसार पाकिस्तानातील गाढवांची संख्या ५५ लाखांपेक्षा अधिक झाली आहे. चीनने आणि पाकिस्तान यांच्यामध्ये झालेल्या करारानुसार पाकिस्तान चीनला दरवर्षी ८० हजार गाढवांची रवानगी करण्यात आली आहे. चीनमध्ये गाढवांचा वापर मांसासाठी तसेच अन्य बाबींसाठी केला जातो. गाढवांच्या कातडीपासून मिळालेल्या जिलेटीनपासून चीनमध्ये विविध प्रकारची औषधे तयार केली जातात तसेच गाढवांची कातडीही वापरली जाते.

चीनच्या काही कंपन्यांनी पाकिस्तानातील गाढवांच्या व्यापारात लाखो डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. गाढवांची संख्या अधिक असलेला पाकिस्तान जगातील तिसऱ्या क्रमांकाचा देश आहे. गाढवांच्या प्रकारानुसार त्यांचे दर निश्चित केले जातात. काही अहवालांनुसार, पाकिस्तानात एका गाढवाच्या कातडीसाठी १५ ते २० हजार रूपये आकारले जातात. याची विक्री करून पाकिस्तान मोठ्या प्रमाणात नफा मिळवत आहे. तर दुसरीकडे गाढवांच्या उपचारांसाठी पाकिस्तानात विशेष रुग्णालयंदेखील आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

भारत कोरोना संसर्गाच्या डेटाबाबत ‘सडलेले सफरचंद’; अमेरिकन शास्त्रज्ञाची टीका

मुंबई । कोरोनाच्या संसर्गावर देखरेख ठेवणारी अमेरिकेतील जॉन हॉपकिन्स विद्यापीठातील शास्त्रज्ञ स्टीव हँक यांनी भारताला सडलेला सफरचंद असे संबोधले आहे. भारत करत असलेल्या कोरोनाच्या उपाययोजनांवर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. प्रा. स्टीव हँक यांनी ट्विटरवर भारतासह व्हेनेझुएला, इजिप्त, सीरिया, येमेन, तुर्की आणि चीनवर टीका केली आहे. हे पाचही देश कोरोना संसर्गाच्या डेटाबाबत ‘सडलेले सफरचंद’ असल्याची टीका त्यांनी केली आहे.

हे देश कोरोनाशी संबंधित आकडेवारी माहिती देत नाहीत अथवा संशयित आकडेवारी देत आहेत. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये विद्यापीठाच्या आकडेवारीचा ग्राफच शेअर केला आहे. त्यामध्ये भारतासह अन्य ५ देशांना प्रा. स्टीव हँक यांनी सडलेला सफरचंद म्हटले आहे. भारतात फार कमी प्रमाणावर कोरोनाची चाचणी होत असून इटलीसारखी परिस्थिती उद्भवणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. याआधीदेखील हँक यांनी भारत कोरोनाविरोधात करत असलेल्या उपाययोजनांवरही त्यांनी टीका केली होती.

दरम्यान, भारतात कोरोनाचे संकट अधिक गडद होताना दिसत आहे. गेल्या २४ तासांत ११ हजारांहून अधिक नवीन कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. तर मृत्यूचा आकडा धडकी भरवणारा आहे. त्यामुळे चिंतेत अधिक भर पडली आहे. भारत जगात चौथ्या क्रमांकावर आहे. असेच आकडे वाढत राहिले तर भारत चौथा क्रमांकही मागे टाकेल अशी शक्यता आहे. देशात कोरोना व्हायरसच्या संसर्गाची संख्या ३ लाखांच्या पुढे गेली आहे. जूनच्या पहिल्या दिवसापासून, दररोज सरासरी सुमारे १० हजार प्रकरणे नोंदविली जात आहेत. शनिवारी गेल्या २४ तासांत ११ हजारापेक्षा जास्त संसर्ग झाल्याची घटना घडली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

२३ जूनला परतू शकतात पाकिस्तानात अडकलेले ६९३ भारतीय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लॉकडाऊनमुळे पाकिस्तानमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. पाकिस्तानच्या विविध शहरांमध्ये अडकलेले ६९३ भारतीय नागरिक हे २३ जून रोजी भारतात परत येऊ शकतात. त्यासाठीची औपचारिकता ही नुकतीच सुरू करण्यात आलेली आहे. इस्लामाबादमधील भारतीय दूतावास या नागरिकांच्या सतत संपर्कात आहेत, असे एथिल उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले. त्यातील बहुतेक काश्मिरी विद्यार्थी आहेत, तर पंजाब, महाराष्ट्र आणि गुजरातमधील काही लोकही पाकमध्ये सहलीला गेले होते आणि लॉकडाऊनमुळे तेथे अडकले.

सूत्रांनी सांगितले की ते हवाई मार्गाने नाही,तर वाघा-अटारी सीमेवरुन परत येतील. लॉकडाऊन जाहीर होण्यापूर्वी मार्चमध्ये भारत-पाक सीमेला सील करण्यात आले होते, तसेच आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर देखील बंदी घालण्यात आलेली होती. त्यानंतर हे भारतीय नागरिक पाकिस्तानात अडकले. आपली ओळख लपवून ठेवण्याच्या विनंतीसह एका काश्मिरी विद्यार्थ्याने न्यूज चॅनेलला सांगितले की, तिला ईमेलद्वारे भारतीय उच्चायुक्तांकडून आपल्या मायदेशी जाण्यासंबंधीची चांगली बातमी मिळाली. त्या ईमेलमध्ये असे लिहिले आहे की, इस्लामाबादमधील भारतीय उच्चायुक्तांनी येथे अडकलेल्या भारतीय नागरिकांना त्यांच्या मायदेशी परत पाठवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

भारतीय उच्च आयोगाच्या ईमेलवरून मिळाली चांगली बातमी
ईमेलमध्ये असे म्हटले आहे की, भारतीय उच्चायुक्तांनी पाकिस्तान सरकारला २३ जून रोजी पाकिस्तानात अडकलेल्या भारतीय नागरिकांसाठी वाघा सीमा खुली करण्याची विनंती केलेली आहे. पण हातात ते पाकिस्तान सरकारच्या उत्तराची वाट पहात आहे. या ई-मेलमध्ये असे म्हटले आहे की, सर्व भारतीयांनी आपल्या देशात परत येण्यासाठी योग्य ती व्यवस्था केली पाहिजे, भारतात परत आल्यावर त्यांना पंजाबमध्ये १४ दिवसांच्या क्वारंटाइन राहावे लागेल.

पाकिस्तान उच्च आयोगातील सूत्रांनी न्यूज चॅनेलला सांगितले की, या संदर्भात भारताकडून त्यांना विनंती करण्यात आलेली आहे. तसेच, पाकिस्तान सरकार सध्या यावर विचार करीत आहे, परंतु अद्याप याची तारीख निश्चित झालेली नाही.

भारतात अडकलेले पाकिस्तानी नागरिक मायदेशी परतले आहेत
लॉकडाऊन असूनही भारताने पाकिस्तानच्या नागरिकांना मदतीचा हात दिला. दोन महिन्यांहून अधिक काळ सुरु असलेल्या या लॉकडाऊन दरम्यान ४३० हून अधिक पाकिस्तानी नागरिक आपल्या मायदेशी परतले आहेत. त्यांना अटारी-वाघा सीमेवरुन पाकिस्तानात जाण्याची परवानगी देण्यात आली होती.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या परीक्षा रद्द करण्याची मागणी

मुंबई । कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता सरकारने यंदाच्या पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम व द्वितीय वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने प्रथम व द्वितीय वर्षाच्या परीक्षेसंदर्भात काहीही खुलासा केला नसल्याने, लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य अधांतरी आहे. त्यामुळे विद्यापीठाने तातडीने खुलासा करत या परीक्षा रद्द कराव्यात असं महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी म्हटलं आहे.

राज्य सरकारच्या निर्णयास अनुसरून यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने त्यांच्या प्रथम व द्वितीय वर्षाच्या परीक्षा रद्द करून मागील सत्राच्या सरासरीइतके गुणांकन देऊन विद्यार्थ्यांना पुढच्या वर्षात प्रवेश देण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी तांबे यांनी मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इ. वायूनंदन यांच्याकडे शुक्रवारी केली. विद्यापीठाच्या एकूण १५२ विविध शिक्षणक्रमांसाठी सहा लाख २४ हजार २६० विद्यार्थी प्रविष्ट असून, त्यात ५ लाख ७० हजार व ५४ हजार २६० विद्यार्थी पुन: परीक्षार्थी आहेत.

हे विद्यार्थी ग्रामीण भागातील कष्टकरी समाजातील नोकरी व व्यवसाय सांभाळून शिक्षण घेणारे होतकरू युवक आहेत. अगोदरच करोनामुळे आर्थिक अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे विद्यापीठाने तातडीने प्रथम व द्वितीय वर्षांच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करून पुढच्या वर्षात प्रवेश दिला, तर या लाखो विद्यार्थ्यांना दिलासा मिळेल, असे तांबे यांचे म्हणणे आहे.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा.
ब्रेकिंग बातम्यासाठी : www.hellomaharashtra.in