Friday, January 2, 2026
Home Blog Page 5665

सावधान! कोट्यवधी सेव्हिंग खातेधारकांसाठी असलेला ‘हा’ महत्वाचा नियम ३० जून नंतर बदलणार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात पहिल्यांदा लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी मार्चच्या शेवटच्या आठवड्यात कोट्यावधी बँक खातेदारांसाठी एक विशेष घोषणा केली होती. २४ मार्च रोजी अर्थमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले होते की, कोणत्याही बँकेतील बचत खात्यात आता तीन महिने ‘एएमबी-एव्हरेज मिनिमम बॅलन्स’ ठेवणे बंधनकारक होणार नाही. एप्रिल, मे आणि जून या तीन महिन्यांसाठी हे अंमलात आणले गेले. आतापर्यंत वित्त मंत्रालय किंवा कोणत्याही बँकेकडून ही सूट पुढे वाढविली जाईल की नाही याबाबत कोणतेही स्पष्टीकरण समोर आलेले नाहीये.

सरकारच्या या निर्णयाचा अर्थ असा आहे की जर या तीन महिन्यांत आपल्या बँक खात्यात मिनिमम बॅलन्स नसेल तर बँका यासाठी आपल्याला कोणताही दंड आकारू शकणार नाहीत. प्रत्येक बँक ही त्यांच्या स्वत: च्या नियमांनुसार मिनिमम बॅलन्सची रक्कम सेट करते. ही मिनिमम बॅलन्सची रक्कम दरमहा आपल्या खात्यात ठेवावीच लागते. असे करण्यात जर खातेदार असमर्थ ठरला तर बँक ग्राहकांकडून दंड वसूल करते. मात्र, जूनपासून ही सूट वाढविण्याबाबत अद्यापही कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

एसबीआय मिनिमम बॅलन्स शुल्क आकारणार नाही
केंद्र सरकारच्या घोषणेपूर्वीच भारतीय स्टेट बँक म्हटले होते की, ते आपल्या सर्व बचत खात्यांवरील मिनिमम बॅलन्स ठेवण्याचा नियम काढून टाकत आहेत. देशातील या सर्वात मोठ्या बँकेने ११ मार्च रोजीच एक निवेदन जारी केले होते ज्यामध्ये असे सांगितले गेले होते की, “एसबीआयच्या सर्व ४४.५१ कोटी बचत बँक खात्यावर मिनिमम बॅलन्स न ठेवल्याबद्दल कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.” यापूर्वी मेट्रो शहरांमध्ये एसबीआयच्या बचत खात्यात किमान ३,००० रुपये रक्कम ठेवणे बंधनकारक होते. त्याचप्रमाणे नीम-शहरी आणि ग्रामीण भागासाठी ही रक्कम अनुक्रमे २,००० आणि १,००० रुपये होती. एसबीआय याआधी मिनिमम बॅलन्स नसल्यामुळे ग्राहकांकडून ५-१५ रुपये जास्तीचा टॅक्स आकारत असे.

एटीएम पैसे काढण्याच्या शुल्कावरूनही दिलासा मिळाला
मिनिमम बॅलन्स रक्कमेसोबतच केंद्र सरकारने एटीएममधून पैसे काढण्यासाठीचे शुल्कदेखील कमी केले होते. अर्थमंत्री यावेळी म्हणाल्या होत्या की, आता डेबिट कार्डधारक कोणत्याही बँकेच्या एटीएममधून तीन महिन्यांपर्यंत रोख रक्कम काढू शकतात. यासाठी त्यांना कोणतेही ज्यादाचे शुल्क द्यावे लागणार नाही. यावेळी वित्त राज्यमंत्री अनुरागसिंग ठाकूर यांनी सांगितले होते की, हा निर्णय घ्यावा लागला होता जेणेकरुन कमीत कमी लोकं पैसे काढण्यासाठी बँकांमध्ये जातील.

खासगी क्षेत्रातील दोन मोठ्या बँकांविषयी बोलताना एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँक मिनिमम बॅलन्स ठेवणे अनिवार्य आहे. असे न केल्यास ग्राहकांकडून एक निश्चित शुल्क दंड म्हणू आकारले जाते. मात्र, सरकारकडून मिळालेली ही तीन महिन्यांची सूट या बँकांनाही लागू आहे. या दोन्ही बँकांमध्ये मिनिमम बॅलन्सचे नियम काय आहेत ते जाणून घ्या.

एचडीएफसी बँकेत मिनिमम बॅलन्सचा नियम काय आहे?
एखाद्या ग्राहकाने मेट्रो किंवा शहरी भागात एचडीएफसी बँकेत बचत खाते उघडले असेल तर दरमहा त्यांच्या खात्यात किमान १०,००० हजार रुपये ठेवणे त्यांच्यासाठी बंधनकारक आहे. त्याचप्रमाणे नीम-शहरी आणि ग्रामीण भागात ही मर्यादा अनुक्रमे ५,००० आणि २,५०० रुपये आहे. ग्रामीण भागाच्या बचत खात्यात जर एखाद्याकडे २,५०० रुपये नसेल तर त्याला वर्षातील कोणत्याही एका दिवसासाठी किमान १०,००० रुपये फिक्स्ड डिपॉझिट ठेवणे बंधनकारक आहे.

आयसीआयसीआय बँकेत मिनिमम बॅलन्सचा काय नियम आहे?
मेट्रो किंवा शहरी भागातील आयसीआयसीआय बँकेत बचत खात्यासाठी मिनिमम बॅलन्सची आवश्यकता १०,००० रुपये आहे. हे नीम -शहरी भागांसाठी ५,००० हजार रुपये तर ग्रामीण भागासाठी २,००० हजार रुपये आहे. काही सुदूर ग्रामीण भागात किमान शिल्लक एक हजार रुपयांपर्यंत मर्यादित आहे. किमान शिल्लक न राखल्यास आयसीआयसीआय बँक मेट्रो, शहरी आणि अर्ध-शहरी भागातील ग्राहकांकडून १०० रुपये आणि त्यापेक्षा कमी रकमेच्या ५% शुल्क दंड म्हणून घेते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

कोरोनामुळे यंदाची ‘हज’ यात्रा रद्द; हज समितीकडून यात्रेकरूंना मिळणार पैसे परत

मुंबई । कोरोना संकटामुळं यावर्षीच्या सर्वच सण, यात्रा, उत्सवांवर विरजण पडलं आहे. कोरोना संसर्गामुळं यावर मर्यादा आल्या आहेत. दरम्यान, कोरोनाचा फटका यंदाच्या हज यात्रेलाही बसला आहे. यंदाची हज यात्रा कोरोनामुळं रद्द करण्यात आली आहे. याबाबत केंद्रीय हज समितीकडून माहिती देण्यात आली असून यात्रेकरूंना त्यांचे पैसे परत देण्यात येणार आहेत. सौदी प्रशासनाकडून कोणतीही सूचना मिळालेली नसल्याने यावर्षीची हज यात्रा रद्द करण्यात आली आहे. यात्रेकरूंनी भरलेली संपूर्ण रक्कम त्यांना परत दिली जाणार असल्याचे केंद्रीय हज समितीकडून घोषित करण्यात आले आहे. अशी माहिती भाजपाच्या अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाध्यक्ष सलीम बागवान यांनी दिली.

कोरोना संसर्गाचा वाढत असताना १३ मार्च २०२० पासून सौदी प्रशासनाने हज २०२० साठीची तयारी तात्पुरती थांबविली होती. यंदा जुलै-ऑगस्टमध्ये ही यात्रा होती. दरवर्षी हजची तयारी फार आधीपासूनच करावी लागते. त्यानंतर पुढील सूचना येणे अपेक्षित होते. मात्र, अद्याप यात्रेसंबंधी कोणताही सूचना आलेली नसल्याने आता यात्रा रद्द झाल्याचे आपल्या देशातील केंद्रीय हज समितीने घोषित केले आहे.

पैसे परत मिळवण्यासाठी असा करा अर्ज
यापूर्वी निवड झालेल्या उमेदवारांनी केंद्रीय हज समितीच्या संकेतस्थळावर असलेला यात्रा रद्द करण्याचा फॉर्म भरून तो [email protected] या इ-मेलवर पाठवावा. तसेच सोबत बँक पासबुक किंवा रद्द केलेल्या धनादेशाची फोटोकॉपी जोडावी. त्यानुसार त्यांना पैसे परत करण्यात येणार आहेत.

इतिहासात २२२ वर्षांनंतर ही यात्रा रद्द
यापूर्वी १७९८ ते १८०१ मध्येही हज यात्रेत खंड पडला होता. त्यानंतर यावर्षी दुसऱ्यांदा कोरोनामुळे २२२ वर्षांनी ती रद्द करण्यात आली आहे. हजपेक्षा वेगळी पण मक्का मदिनेतच होणारी ‘ उमरा ’ ही यात्रादेखील सौदी सरकारने फेब्रुवारीत रद्द केली होती.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा.
ब्रेकिंग बातम्यासाठी : www.hellomaharashtra.in

पृथ्वीवर कोरोना असताना ‘या’ देशाची चंद्राकडे झेप; मिशन मूनला भारतचा हातभार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाच्या सध्या सुरु असलेल्या संकटाच्या दरम्यान भारत आणि जपान हे एकत्रितपणे चांद्रयान मिशन सुरू करण्याची तयारी करत आहेत. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) या मोहिमेचे नेतृत्व करेल. जपानच्या अंतराळ संस्था JAXAच्या म्हणण्यानुसार हे अभियान २०२३ नंतर सुरू केले जाईल. त्याशिवाय २०२२ मध्ये इस्रोचा आणखी एक ह्यूमन स्पेसफ्लाइट प्रोग्रॅम (मानवी अभियान) देखील सुरू केला जाऊ शकतो. याला गगनयान असे नाव देण्यात आले आहे.

२०१७ मध्ये पहिल्यांदा झाली होती चर्चा
या मोहिमेबाबत दोन्ही देशांमध्ये २०१७ मध्ये पहिल्यांदा चर्चा झाली होती. बंगळुरुमध्ये या मल्टी स्पेस एजन्सींमध्ये संभाषण झालेले होते. आतापर्यंत जपानला असे कोणतेही अभियान करता आलेले नाही आहे. भारत आणि जपानचे हे अभियान पूर्णपणे रोबोटिक असेल. हे अभियान चंद्रावर बेस बनवण्यासाठीचे ग्राउंड वर्क असू शकेल. यामध्ये जागतिक अंतराळ संस्थांची देखील मदत घेतली जाऊ शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे.

गेल्या वर्षीच इस्रोचे अध्यक्ष एएस किरण कुमार यांनी सांगितले होते की,’ भारत आणि जपान हे एका संयुक्त चंद्र अभियानाचा विचार करीत आहेत. तसेच, दोन्ही देशांनी हवामान बदलाच्या देखरेखीची माहिती शेअर करण्याची आणि एकमेकांचे अवकाश विभाग वापरण्याची परवानगी द्यायला सहमती दर्शविली आहे. किरण कुमार यांच्या मते, ‘आम्ही हया संभाव्य संयुक्त चंद्र अभियानासाठी भविष्याकडे पहात आहोत. भविष्यात आम्ही हवामान बदलाच्या अभ्यासासाठी अधिक इनपुट कसे वापरू शकतो ते पाहू.’

चंद्रयान -२
याआधी भारताला आपल्या महत्त्वाकांक्षी मिशन चंद्रयान २ मध्ये ९५ टक्के यश मिळाले होते. मात्र अगदी शेवटच्या क्षणी एजन्सीचा विक्रम या लँडरशी असलेला संपर्क तुटला. यानंतर, यूएस स्पेस एजन्सी नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन (नासा) ने विक्रम लँडरबद्दल मोठा खुलासा केला. नासाच्या लूनर रेकनाइन्स ऑर्बिटरने चंद्राच्या पृष्ठभागावर चंद्रयान -२ विक्रम लँडरच्या तुटलेल्या पार्ट्सचा शोध घेतला होता. या चंद्रयान-२ च्या विक्रम लँडरचा तुटलेला भाग हा अपघातस्थळापासून ७५० मीटर अंतरावर सापडला होता. याबाबत नासाने ट्वीटद्वारे माहिती दिली होती. नासाने विक्रम लँडरचे हे तुटलेले भाग शोधण्यासाठीचे क्रेडिट चेन्नईच्या एका अभियंत्याला दिले होते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

कोरोनावर हे औषध रामबाण उपाय; पण भारतासमोर ‘या’ अडचणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनावर रेमडेसिविर हे औषध रामबाण उपाय ठरत आहे. काहीजण हे औषध बांग्लादेशमधून आयात करत आहेत. मात्र देशातील औषध निर्माता कंपन्या या औषधाच्या निर्मितीसाठी परवानगी मिळण्याची वाट बघत आहेत. सध्या हे औषध बांगलादेशमध्ये मिळत आहे. मात्र भारतात या औषध निर्मितीला अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही. हे औषध आयात करण्याची परवानगी मिळाली आहे. औषध आणि सौंदर्यप्रसाधने अधिनियम १९४५ मधील नियम ३६ नुसार, वैयक्तिक वापरासाठी औषध आयातीसाठी परवानगी दिली जाऊ शकते. मात्र यासाठी प्रिस्क्रिप्शन अनिवार्य असणार आहे. जगाला आपण औषध पुरवठा करत आहोत. पण या औषधाची निर्मिती करण्यास अद्याप भारतीय कंपन्यांना परवानगी देण्यात आलेली नाही.

सध्या हे औषध रुग्ण वैयक्तिकरित्या मागवीत आहेत. औषध कंपन्या हे औषध तयार करण्याची परवानगी कधी मिळते याची वाट पाहत आहेतच मात्र त्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्नही करीत आहेत. बांग्लादेशमधून आयात होणाऱ्या या लसीची औषध नियामक मंडळाने अजून चाचणीही केलेली नाही अशी माहिती समोर आली आहे. तसेच भारतीय यंत्रणांना बांग्लादेशच्या कंपन्यांवर जास्त विश्वास आहे का? असा प्रश्न देखील विचारला जातो आहे.

अमेरिकेतील रेमडेसिविरची निर्माता कंपनी जिलीड सायन्सेसने मे महिन्यात चार कंपन्यांना या औषधाच्या निर्मितीची परवानगी दिली होती. सिप्लाय, मायलॅन, हिटेरो आणि जुबिलन्ट लाइफ सायन्सेस या चार कंपन्यांना भारतात निर्मिती आणि विक्रीसाठी परवानगी मिळाली आहे. सिप्ला आणि हिटेरोने निर्मिती सुरू करण्यासाठी परवानगीचा अर्ज केला आहे. पण अजून परवानगी मिळालेली नाही. दरम्यान कंपन्यांच्या निर्मिती सुविधांचं सर्वेक्षण करण्यात आलं आहे. कंपन्यांकडून या उत्पादनाच्या नमुन्यांच्या चाचणीच्या निकालाची आता प्रतिक्षा आहे. असे नियामक मंडळाने म्हंटले आहे.  एकदा ही चाचणी झाली आणि इतर आवश्यक बाबी पूर्ण झाल्या की कंपन्यांना परवानगी मिळण्यास सुरू होईल, अशी माहिती डीसीजीआयच्या एका अधिकाऱ्याने दिली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

कोरोना टेस्ट झाली आणखी स्वस्त; ठाकरे सरकारनं केली ५० टक्के दर कपात

मुंबई । खासगी लॅबमध्ये होणाऱ्या कोविड चाचणीच्या दरात तब्बल ५० टक्क्यांनी कपात करण्याचा निर्णय राज्यातील ठाकरे सरकारनं घेतला आहे. कोविड रुग्णांसाठी हा मोठा दिलासा ठरणार आहे. आयसीएमआरनं निश्चित केलेले कोरोना चाचणीचे ४ हजार ५०० रुपये हे शुल्क रद्द करत नवीन दर ठरवण्याचे निर्देश राज्यांना दिले होते. या निर्देशानुसार ठाकरे सरकारनं चाचण्यांच्या दरात थेट ५० टक्क्यांनी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं यापुढं खासगी लॅबमध्ये चाचणीसाठी साडे चार हजारांऐवजी फक्त २,२०० रुपये मोजावे लागणार आहेत.

यासंदर्भात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले की, ‘खासगी लॅबमध्ये करण्यात येणाऱ्या कोरोना चाचणीच्या शुल्कात सरकारनं कपात केली आहे. हे शुल्क पूर्वी ४५०० रुपये इतके होते, ते आता २२०० रुपये घेतले जाईल. कमी दर निश्चित केल्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळेल,’ असं टोपे म्हणाले. कोविड चाचणीचे राज्यातील नवे दर हे देशात सर्वाधिक कमी आहेत, असा दावा त्यांनी यावेळी केला. व्हटीएमच्या माध्यमातून हॉस्पिटलमधून स्वॅब घेतल्यास २२०० रुपये शुल्क आकारले जाणार आहे. तर घरी जाऊन स्वॅब घेतल्यास २८०० रुपये शुल्क असेल. पूर्वी हॉस्पिटलमधून स्वॅब ४५०० शुल्क आकारले जात होते. तर घरी जाऊन स्वॅब घेतल्यास ५२०० रुपये इतकं शुल्क रुग्णाला द्यावं लागत होतं असं टोपे यांनी सांगितलं.

खासगी लॅबसाठी नवे दर बंधनकारक असणार आहेत. जिल्हाधिकारी आपापल्या जिल्ह्यातील खासगी लॅबशी संपर्क साधून यात आणखी कपात करण्याबाबत चर्चा करू शकतात. मात्र, सरकारनं ठरविलेल्या या दरापेक्षा एक पैसाही अधिक आकारता येणार नाही. तसा प्रयत्न कुणी केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा टोपे यांनी दिला आहे. सध्या राज्यात कोविडची चाचणी करणाऱ्या ९१ लॅब आहेत. आणखी पाच ते सहा लॅब लवकरच कार्यरत होतील. नव्या दरांमुळं रुग्णांना मोठा दिलासा मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

आयसीएमआरनं सर्व राज्यांना कोरोना चाचणीचे दर निश्चित करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर राज्य सरकारनं हे दर निश्चित करण्यासाठी एक समिती नेमली होती. महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे हे या समितीचे अध्यक्ष असून अन्य तीन सदस्यात आरोग्य संचालक डॉ. साधना तायडे, जे जे वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. अमिता जोशी व वैद्यकीय शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. अजय चंदनवाले यांचा समावेश होता. या समितीनं करोना चाचणीच्या सुधारित दरांच्या संदर्भातील अहवाल सरकारकडे सूपुर्द केला होता.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा.
ब्रेकिंग बातम्यासाठी : www.hellomaharashtra.in

लॉकडाउन काळात नोकरी गेली असेल तर चिंता करू नका; घरच्या घरी करा ‘हा’ उद्योग आणि कमवा लाखो रुपये

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरसच्या या काळात सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे लोकाना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागत आहेत. आपण जिथे जिथे पहाल तिथे अशी एक तरी बातमी असते की मोठ्या कंपन्या आपल्या लोकांना नोकर्‍यावरून काढत आहेत. त्यामुळे अशावेळी प्रत्येक व्यक्तीला या साथीच्या संकटाचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, आम्ही आपल्यासाठी घरातल्या घरातच बसून आपला व्यवसाय सुरु करण्याची कल्पना सुचवित आहोत. हा व्यवसाय अगदी कमी खर्चात सुरू केला जाऊ शकतो आणि त्याच्यातून भरपूर कमाई देखील मिळू शकते. यासाठी घराचे छप्पर आणि खुले अंगण याची आवश्यकता आहे. आजकाल,टेरेस फार्मिंग ही एक ट्रेंड होत आहे, ज्याच्यामुळे आपल्याला रोख पैसे मिळवण्याची चांगली संधी उपलब्ध होते आहे. या तंत्रामध्ये मातीचा वापर केला जात नाही आणि वनस्पतींसाठी आवश्यक असलेली पोषकद्रव्य पाण्याच्या मदतीने वनस्पतींच्या मुळांपर्यंत थेट पोचविली जातात, याला हायड्रोपोनिक्स असे म्हणतात.

आज आम्ही तुम्हाला व्यवसाय करण्यासाठी एक खास कल्पना सांगत आहोत. हा व्यवसाय सुरू करुन आपण चांगली कमाई करू शकता. घरातील छतावर शेती करण्याची ही कल्पना आहे, ती स्वीकारून आयआयटी पदवीधर कौस्तुभ खरे आणि साहिल पारीख यांनी आपला व्यवसाय सुरू केला आहे.

खेतीफाई ही त्यांची कंपनी अवघ्या १९ हजार रुपयात २०० चौरस मीटर टेरेसला फार्म बनवून ७०० किलोग्रॅमपर्यंतच्या भाज्या पिकवते. चला तर त्यांच्याबद्दल जाणून घेऊयात …

विना मातीची कमी पाण्याची शेती
या दोघांनीही एक असे मॉडेल तयार केले आहे ज्यामध्ये माती वापरली जात नाही आणि पाण्याचा वापर देखील कमीतकमी केला जातो. यामध्ये टेरेस फार्मिंगसाठी, एक बेड बनविला जातो जो वॉटर प्रूफ असतो आणि छतावरून पाणीही गळत नाही. जैविक गोष्टींचा वापर केल्यामुळे भेंडी, टोमॅटो,पालक ,मेथी ,वांगी, मिरच्याही येथे चांगल्या वाढतात. आणि शिवाय पाणीही गोड असल्याने भाज्याही चवदार असतात.

यामध्ये नारळाचे कवच (कोरडे साल) प्रामुख्याने घातले जाते. छतावर जास्त वजन पडू नये नाही आणि पाणी गळतीही होऊ नये यासाठी मातीचा वापर केला जात नाही. या बेडमध्ये, नारळाच्या कवट्यां बरोबरच काही मिश्रण ओतले जातात, ज्यामुळे पीक अगदी जलद आणि गुणवत्तेसह येते.

आपण हे देखील करू शकता
ज्या प्रकारे लागवडीसाठी जमीन कमी होत आहे, भविष्यात या बेड्सची मागणी आणखीनच वाढेल, एक कुटुंब ४ फूट बाय ४ फूटांचे चार बेड लावून आपल्या महिन्याभराचा भाजीपाला वाढवू शकतील. या बेडवर रोज एक तास वेळ घालवून भाजीपाला पिकवता येतो.

शेतजमीन कमी होत असल्याने आणि ऑर्गनिक फूड प्रोडक्टची वाढती मागणी यामुळे अर्बन फार्मिंगमध्ये नवीन आणि प्रभावी तंत्राचा वापर वाढत आहे. ही मागणी पूर्ण करण्यासाठी व्यापारी आणि शहरी शेतकरी छप्परांवर, पार्किंगमध्ये किंवा कोठेही उपलब्ध असलेल्या मर्यादित जागाही वापरत आहेत.

सध्या या तंत्रात जे तंत्र सर्वात यशस्वी आहे त्यामध्ये मातीचा वापर केला जात नाही. माती नसल्यामुळे,छतावरील छोट्याशा जागेतही हे सहजपणे करता येते. हे तंत्र इतके यशस्वी झाले आहे की आपण योग्य माहिती, योग्य सल्ल्यासह जवळपास १ लाख रुपयांच्या खर्चावर वर्षाकाठी आपण २ लाख रुपयांपर्यंतच्या भाज्या पिकवू शकतो.

टेरेस फार्मिंग
या तंत्राला हाइड्रोपोनिक्स असे म्हणतात. या तंत्राची एक खास गोष्ट अशी आहे की त्यात माती वापरली जात नाही. याद्वारे, वनस्पतींसाठी आवश्यक असलेली पौषणतत्त्वे पाण्याच्या मदतीने थेट वनस्पतींच्या मुळांपर्यंत पोहोचविली जातात.

हाइड्रोपोनिक्स तंत्र म्हणजे काय ?
हायड्रोपोनिक्स या तंत्रात भाज्या मातीच्या मदतीशिवाय पिकवल्या जातात. याद्वारे, वनस्पतींसाठी आवश्यक असलेली पौषणतत्त्वे पाण्याच्या मदतीने थेट वनस्पतींच्या मुळांपर्यंत पोहोचविली जातात. मल्टी-लेयर फ्रेमच्या मदतीने वनस्पती पाईपच्या साहाय्याने वाढतात आणि त्यांची मुळे पाईपच्या आत पोषक-तत्वांनी समृद्ध असलेल्या पाण्यात सोडली जातात. माती नसल्यामुळे छतावरील भारही वाढत नाही. त्याच वेळीया पूर्णपणे भिन्न प्रणालीमुळे, छतामध्ये कोणताही बदल देखील होत नाही.

नवीन तंत्रज्ञान
हाइड्रोपोनिक्स हा वनस्पती वाढविण्याचा एक पूर्णपणे नवीन मार्ग आहे ज्याला शेतकरी किंवा व्यावसायिक वेगवेगळ्या प्रकारे वापरुही शकतात. त्याच वेळी, या क्षेत्रात काम करणार्‍या बर्‍याच कंपन्या आपल्याला या हौशी बागकामापासून ते कमर्शियल फार्मिंग करण्यापर्यंत आपल्याला मदत देखील करू शकतात. याबाबतीत हाइड्रोपोनिक्स कंपनी ‘अवर एग्रीकल्चर’ म्हणते की, यासाठीचे रेडिमेड फ्रेम आणि टॉवर गार्डन याची ऑनलाईन विक्री केली जात आहे.

कंपनीच्या २ मीटर उंच टॉवरमध्ये ४० रोपे लावण्यासाठी जागा आहे. कंपनीच्या मते,४०० रोपट्यांसह १० टॉवर्सची किंमत ही १ लाखांच्या आसपास आहे. या किंमतीत टॉवर्स, सिस्टम आणि आवश्यक पोषक घटकांचा समावेश आहे.

कंपनीच्या म्हणण्यानुसार जर या प्रणालीचा योग्य पद्धतीने वापर केला गेला तर फक्त बियाणे आणि पोषकद्रव्ये यांचाच खर्च होतो. आपल्या छतावरच्या १५० ते २०० चौरस फूट क्षेत्रात असे १० टॉवर्स अगदी सहजपणे उभे राहू शकतील. छोट्या ठिकाणी ठेवलेल्या फ्रेम्स झाकून मोठ्या प्रमाणातील लागवडीसाठी नेट शेड तसेच पॉली हाऊस बनवून ठेवल्यास हवामानापासून संरक्षण मिळते.

कमाईची मोठी संधी
कृषी कंपनीच्या मते, हे तंत्रज्ञान लोकांना रोजगार देण्यासाठीचा एक चांगला मार्ग असू शकतो, कारण त्याचे मार्जिन हे पारंपारिक शेतीपेक्षा अधिक चांगले आहे. कंपनीच्या मते, सामान्य परिस्थितीत आपण एका वर्षामध्ये सहजपणे आपली गुंतवणूक काढून घेऊ शकता. पुढच्या वर्षी त्याची रिटर्न अधिक असेल कारण त्यावेळी आपल्यालाफक्त देखभाल, बियाणे आणि पोषकद्रव्ये यांवर खर्च करावा लागेल. म्हणजेच, आपल्या छतावरील केवळ १५० ते २०० चौरस फूट जागा वापरुन केवळ एका वर्षामध्ये आपली एक लाखांची गुंतवणूक काढून घेत आपण नफा कमवू शकतो.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

काँग्रेसचे नाराज मंत्री सोमवारी घेणार मुख्यमंत्र्यांची भेट, ‘या’ मुद्द्यांवर होणार चर्चा

मुंबई । महाविकास आघाडीमध्ये नाराज असलेल्या काँग्रेसच्या नेत्यांची गुरुवारी मुंबईमध्ये बैठक झाली होती. या बैठकीनंतर महाविकासआघाडी सरकारच्या निर्णय प्रक्रियेमध्ये स्थान देण्यात यावं, अशी मागणी बाळासाहेब थोरात यांनी केली होती. मात्र, आता काँग्रेस नेते त्यांची तक्रार घेऊन थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भेटायला जाणार आहेत.

शुक्रवारी रात्री काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्र्यांशी फोनवरून चर्चा केली. यावेळी काँग्रेसच्या नाराजीच्या कारणांबाबत सोमवारी चर्चा करण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी थोरात यांना दिलं आहे. त्यामुळे सोमवारी बाळासाहेब थोरात आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत.

काँग्रेसला सरकारमध्ये मिळत असलेलं दुय्यम स्थान, निर्णय प्रक्रियेतील सहभाग, विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त १२ जागांचे वाटप या मुद्यांवर चर्चा होणार असल्याचे समजत आहे. दरम्यान काल रात्री काँग्रेसचे मंत्री सुनिल केदार यांनीही मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. मात्र ही भेट त्यांच्या खात्यातील काही विषयासंदर्भात होती. सोबतच काँग्रेसच्या विषयाबाबत सुनिल केदार मुख्यमंत्र्यांना भेटले नसल्याचा खुलासाही प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केला आहे.दरम्यान, राज्यातल्या महाविकासआघाडी सरकारमध्ये निर्णय प्रक्रियेत सहभागी केलं जात नसल्यामुळे काँग्रेस नाराज आहे. यामुळे आता काँग्रेस नेते मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

‘या’ अजब कारणामुळे चीनमध्ये महिलांना एकाहून अधिक लग्न करण्याचा अधिकार देण्यात येणार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगात कोरोना चीनमुळे पसरला म्हणून चर्चा आहेतच. तसेच अनेकदाय ना त्या कारणाने चीन चर्चेत असतेच. आता चीनमधील स्त्री पुरुष संख्येच्या असमान प्रमाणामुळे चीन पुन्हा चर्चेत आले आहे. येथील पुरुषांची संख्या वाढत असून महिलांचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे चीनमध्ये बरेच पुरुष अविवाहित आहेत. त्यामुळे आता चीनमध्ये महिलांना एकापेक्षा अधिक विवाह करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी करण्यात येते आहे.

अर्थशास्त्रज्ञ कांग एनजी यांनी हा सल्ला दिला आहे. सध्या चीनमध्ये मोठ्या प्रमाणात लैंगिक असमानता दिसून येते आहे. पुढच्या तीसवर्षात अशीच परिस्थिती राहिली तर चीनमधील साधारण ३ कोटी पुरुष अविवाहित राहतील असे एका अहवालात सांगण्यात आले आहे. म्हणूनच काही काळ चीनमधील महिलांना एकापेक्षा अधिक नवरे करण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी होत आहे.

फुदान विद्यापीठात प्राध्यापक असणारे कांग यांच्या म्हणण्यानुसार सध्याच्या परिस्थितीत देशातील पुरुषांमध्ये मोठ्या प्रमाणात स्पर्धा होईल. यामध्ये वयाचे काही बंधन नसेल. आणि या स्पर्धेची तीव्रता वाढून अनेक पुरुषांना अविवाहित तथा एकटे राहावे लागेल. त्यामुळे येथील स्त्रियांना एकापेक्षा अधिक लग्न करण्याची परवानगी देण्याची मागणी त्यांनी केली आहे. अविवाहित पुरुषांच्या मनःस्वास्थ्याचा विचार करता याला कायदेशीर मान्यता द्यावी असे त्यांनी सांगितले. एखाद्याला पत्नी नसण्यापेक्षा एक सामायिक पत्नी हा उपाय त्यांनी सुचविला आहे. सोबत वेश्या व्यवसाय कायदेशीर करावा अशी मागणीही त्यांनी केली आहे. सध्या तिबेटमध्ये महिलांना एकापेक्षा अधिक लग्न करण्यास मान्यता आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

देवेंद्र फडणवीस आज सायंकाळी घेणार मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट; ‘हे’ आहे कारण

मुंबई । विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत. आज संध्याकाळी ५.३० वाजता शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारकात या दोघांची भेट होणार आहे. देवेंद्र फडणवीस हे मागचे २ दिवस निसर्ग चक्रीवादळाचा फटका बसलेल्या कोकण दौऱ्यावर होते. यानंतर आता निसर्ग चक्रीवादळाबाबत भाजपच्या मागण्यांचं निवेदन भाजप मुख्यमंत्र्याना देणार आहे. कोरोनावरील सर्वपक्षीय बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यी उद्धव ठाकरे यांच्यात आज प्रत्यक्ष भेट होत आहे. या भेटीकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

दरम्यान, कोकण दौऱ्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारने दिलेली मदत तोकडी असल्याचं सांगितलं. कोकणासाठी जाहीर केलेलं पॅकेज फायद्याचं नसल्याचं फडणवीस म्हणाले. चक्रीवादळात कोळी बांधवांचं नुकसान झालं, पण त्यांचा या पॅकेजमध्ये उल्लेखही नाही. कोळी बांधवांना बोटींच्या दुरुस्तीसाठी दीड लाख रुपये लागणार आहेत, पण त्यांच्यासाठी सरकारने काहीच दिलं नाही. कोळी बांधवांसाठी किमान १० हजारांची तातडीची मदत दिली पाहिजे, अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा.
ब्रेकिंग बातम्यासाठी : www.hellomaharashtra.in