Friday, January 2, 2026
Home Blog Page 5667

मुंबईत स्मशानभूमींची माहिती ऑनलाईन मिळणार

मुंबई । मुंबईकरांना आता स्मशानभूमींची सद्यस्थिती तात्काळ ऑनलाईन उपलब्ध होणार आहे. यासाठी मुंबई महापालिकेने संगणकीय ‘डॅश बोर्ड’ तयार केलं आहे. याचं काम अंतिम टप्प्यात असून या महिन्याच्या अखेरीपर्यंत हे ‘डॅश बोर्ड’ कार्यान्वित होणार आहे. १९१६ या नागरी सेवा सुविधाविषयक दूरध्वनी क्रमांकाशी हा ‘डॅश बोर्ड’ जोडण्यात आला आहे. या क्रमांकावरून सगळी माहिती मिळणार आहे. जशी की कुठल्या स्मशानभूमीत किती अंत्यसंस्कार सुरू असून, पुढील अंत्यसंस्काराची वेळ ऑनलाइन घेता येणार आहे.

मुंबई पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याद्वारे प्रत्येक स्मशानभूमीवर अंत्यसंस्कारासाठी आणलेल्या मृतदेहांची आकडेवारी ‘अपडेट’ केली जाणार आहे. यासाठी डॅशबोर्ड तयार करण्यात आलं आहे. या डॅशबोर्डच्या मदतीने अंत्यसंस्कारासाठी मृतदेह स्मशानभूमीत नेण्यापूर्वी संबंधित नातेवाईकांना स्मशानभूमीची सद्यस्थिती दूरध्वनीद्वारे कळणार आहे. त्याचप्रमाणे मुंबई महापालिकेद्वारे ४६ ठिकाणी पारंपरिक स्मशानभूमीसह विद्युत आणि गॅसदाहिनी असणाऱ्या स्मशानभूमी आहेत.

या प्रकारची १८ चितास्थाने पालिका क्षेत्रात असून, त्यात २४ तासांत १४४ मृतदेहांवर अंत्यसंस्कार करता येतात.पारंपरिक पद्धतीनुसार जळाऊ लाकूड वापरून अंत्यसंस्कार करण्यासाठी मुंबईत २१९ चितास्थाने आहेत. या प्रत्येक चितास्थानाची कमाल क्षमता २४ तासांत सहा मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची आहे. २१९ चितास्थानांची एकत्रित क्षमता ही २४ तासांत एक हजार ३१४ मृतदेहांवर अत्यंसंस्कार करण्याची आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर स्मशानभूमींवर ताण येत असल्याने मृतांच्या नातेवाईकांना वस्तूस्थिती कळावी यासाठी ही माहिती पालिकेच्या वतीने देण्यात आली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

देशात कोरोनाबाधितांची संख्या ३ लाख पार; मागील २४ तासात रेकॉर्ड ११ हजार नवे रुग्ण

नवी दिल्ली । देशातील कोरोनाचे संकट अधिक गडद होताना दिसत आहे. मागील २४ तासांत ११ हजारांहून अधिक नवीन कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. शनिवारी सकाळी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Health Ministry) जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, मागील २४ तासात ११४५८ नवीन रुग्ण सापडले आहेत. तर ३८६ लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूचा हा आकडा धडकी भरवणारा आहे. जूनच्या पहिल्या दिवसापासून, दररोज सरासरी सुमारे १० हजार प्रकरणे नोंदविली जात आहेत. दरम्यान, देशात कोरोनाबाधितांची ३,०८,९९३ संख्या नोंदली गेली आहेत. त्यामुळे चिंतेत अधिक भर पडली आहे. कोरोनाचा सर्वात जास्त फटका बसलेल्या देशांच्या यादीत भारत जगात चौथ्या क्रमांकावर आहे. असेच आकडे वाढत राहिले तर भारत चौथा क्रमांकही मागे टाकेल अशी शक्यता आहे.

दिलासादायक बाब म्हणजे यापैकी १५४३३०रुग्ण बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ४९.९४ टक्के आहे. परंतु दुःखाची बाब म्हणजे देशात आतापर्यंत ८८८४ लोकांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे.जून महिन्यापासून संक्रमण खूप वेगाने पसरले आहे. याचा अंदाज लावला तर कोरोना इन्फेक्शनची संख्या अधिक वाढेल. १ जूनपर्यंत १९०५३५ रुग्ण होते. आता १३ दिवसानंतर हा आकडा तीन लाखांच्या पुढे गेला आहे. येथे कोरोना संसर्ग रोखण्यासाठी केंद्र सरकार देशात प्रयोगशाळांची संख्या वाढवत आहे. काल २४ तासात १ लाख ४३ हजार ७३७ नमुन्यांची चाचणी घेण्यात आली. आयसीएमआरनुसार आतापर्यंत देशात ५५ लाख ७ हजार १८२ नमुने चाचण्या घेण्यात आल्या आहेत.

तेरा दिवसात सव्वा लाख रुग्ण वाढलेत. त्याचवेळी १ जूनपासून आतापर्यंत ३००० हून अधिक लोक मरण पावले आहेत. ही आकडेवारी केवळ धक्कादायकच नाही तर धडकी भरवणारी आहे. या नव्या आकडेवाडीवरुन असे दिसून येते की लोक सोशल डिस्टेंसिंग गंभीरपणे पालन करीत नाहीत. यामुळे, कोरोना संसर्ग वेगाने पसरत आहे. हे असेच होत राहिले तर जून महिन्याच्या अखेरीस देशात संसर्ग होण्याच्या घटनांमध्ये वाढ होत हा आकडा १० लाखांच्या पुढे जाऊ शकतो. महाराष्ट्रात कोरोना रूग्णांची संख्या एक लाखांच्या पुढे गेली आहे. राज्यात कोरोना संसर्गाची प्रकरणे १०११४१ पर्यंत वाढली आहेत. गेल्या २४ तासांत महाराष्ट्रात ३४९३ नवीन रुग्णांची नोंद झाली. एकट्या मुंबईतच १३७२ नवीन प्रकरणांची नोंद झाली. गेल्या २४ तासांत १७१८ रुग्ण बरे झाले. आतापर्यंत ४७७९३ लोक या साथीने बरे झाले आहेत.

तामिळनाडूमध्ये कोरोना रूग्णांची संख्या ४० हजारांपर्यंत पोहोचली आहे. १८२८४ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत बरे झालेल्या २२०४७ लोकांना घरी पाठविण्यात आले आहे. राज्यात कोरोना संक्रमणामुळे ३६७ लोकांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीतही कोरोनाचा धोका वाढत आहे. कोरोनामुळे संक्रमित लोकांची संख्या ३६ हजारांच्या पुढे गेली आहे. गेल्या २४ तासांत दिल्लीत विक्रमी २१३७३७ घटना घडल्या आहेत. दिल्लीत कोरोना रूग्णांची एकूण संख्या ३६८२४ वर गेली आहे. २२२१२ लोकांवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. १३३९८ लोक बरे झाले आहेत. राज्यात आतापर्यंत १२१४ लोकांचा मृत्यू झाला आहे.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा.
ब्रेकिंग बातम्यासाठी : www.hellomaharashtra.in

आदित्य ठाकरेंच्या वाढदिवशी दिशा पटानीचं खास ट्विट; म्हणाली

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रातील कमी वयातील आमदार अशी ओळख असणारे तरुण नेते म्हणजे आदित्य ठाकरे होय. लहानपणापासूनच राजकीय वातावरणात राहिल्यामुळे खूप लवकर त्यांनी राजकीय वाटचालीस सुरुवात केली आहे. महाराष्ट्रातील तमाम तरुणवर्ग त्यांचा चाहता आहे. यंदाच्या निवडणुकीत प्रथम प्रयत्नातच मोठ्या फरकाने ते विधानसभेवर निवडून आले होते. राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. राज्यभरातून विविध क्षेत्रातील मान्यवर त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटाणी हिनेदेखील आपल्या ट्विटर अकॉउंटवरून आदित्य ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

‘आदित्य, वाढदिवसाच्या शुभेच्छा, आहेस तसाच अमेझिंग राहा आणि चमकत राहा,’ अशा आशयाचं ट्विट करत तिने आदित्य ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आदित्य ठाकरे यांच्यासोबत एकदा डिनरला गेल्यापासून तिच्या आणि आदित्य ठाकरे यांच्या नात्याविषयी बरीच चर्चा सुरू आहे. अनेकदा आदित्य यांना दिशाविषयी विचारलं गेलं आहे पण आदित्य यांनी आणखीही उघड-उघड त्यांच्या नात्याविषयी सांगितलेलं नाहीये.

दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी आपला वाढदिवस अतिषय साधेपणाने करण्याचा निर्णय घेतला आहे. कार्यकर्त्यांनी कोणत्याही प्रकारच्या कार्यक्रमांचं नियोजन करू नये तसंच समाजातील दुर्बल घटकांना मदतीचं आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केलं आहे. दिशा पटाणी हिने शुभेच्छा दिल्यामुळे आता परत आदित्य ठाकरे आणि दिशा पटाणी यांच्या नात्याबद्दल चर्चेला पुन्हा एकदा उधाण येईल. दिशा पटाणी आणि टायगर श्रॉफ यांच्या नात्याचीही चर्चा होती. मात्र त्यांचे ब्रेकअप झाल्याच्याही बातम्या आल्या होत्या.

पेट्रोल-डिझेलच्या दरात सलग ७व्या दिवशी वाढ; जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली । देशात इंधन दरवाढीचा भडका उडाला आहे. भारतीय तेल कंपन्यांनी मागील ७ दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या दरात सतत वाढ होत आहे. पेट्रोल-डिझेलच्या सततच्या वाढत्या दरांमुळे सर्वसामान्य जनतेच्या खिश्याला कात्री बसत आहे. दरम्यान कच्च्या तेलाच्या किंमतीत दिवसागणिक घट होत असताना देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये सतत वाढ होताना दिसत आहे.

शनिवारी राजधानी दिल्लीत पेट्रोलचे दर ७५ रूपये प्रती लिटरवर पोहोचले आहेत. तर दुसरीकडे मध्य प्रदेशमध्ये शिवराज सरकारने पेट्रोल आणि डिझेलवर प्रत्येकी एक-एक रूपये अतिरिक्त कर लावला आहे. देशातील प्रमुख शहरांमध्ये पेट्रोलच्या दरात ५९ ते ६० पैशांनी वाढ झाली असून डिझेलच्या दरात ५० ते ६० पैशांची वाढ झाली आहे. गेल्या ६ महिन्यांपासून पेट्रोलच्या दरात ३.९० रूपये प्रती लिटर तर डिझेल ४ रूपये प्रती लिटरने वाढ झाली आहे.

दिल्लीत पेट्रोलचे आजचे दर ७५ रूपये प्रती लिटर आहे. तर डिझेल ७३.३९ रूपये प्रती लिटरनुसार मिळत आहे. मुंबईत पेट्रोल-डिझेलचे दर अन्य शहरांच्या तुलनेत जास्त आहे. मुंबईत पेट्रोलचे आजचे दर ८२.१० रूपये प्रती लिटर आहे. तर डिझेल ७२.०३ रूपये प्रती लिटरनुसार मिळत आहे. चेन्नई आणि कोलकातामध्ये पेट्रोलचे दर क्रमशः ७८.९९रूपये आणि ७७.०५ प्रती लिटर आहे. डिझेलचे दर क्रमशः ७१.६४ रूपये आणि ६९.२३ रूपये प्रती लिटर आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

कोरोनावर रामबाण औषध सापडले; रामदेव बाबांचा दावा

नवी दिल्ली |  कोरोना विषाणुने जगभर थैमान घातले आहे. जगात कोरोनाबाधितांची संख्या ७७ लाखांवर पोहो्ली आहे. तर देशात कोरोना बाधित रुग्णांची संख्या ३ लाखांच्या पुढे गेली आहे. कोरोनावर लवकरात लवकर लस तयार करण्यासाठी जगभरात युद्धपातळीवर संशोधन सुरू आहे. अशात आता योगगुरु रामदेव बाबा यांनी कोरोनावर औषध तयार केल्याचा दावा केला आहे.

‘पतंजलीच्या औषधाने शेकडो रुग्ण बरे झाले आहेत. या औषधाचा क्लिनिकल कंट्रोल ट्रायलचा रिझल्ट देखील येणार आहे. मात्र, आतापर्यंत औषध घेतलेल्या 80 टक्के रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे’. या औषधाच्या सेवनाने कोरोनावर मात करणे शक्य होणार असा दावाही रामदेव बाबा यांनी केला आहे.

दरम्यान, आतापर्यंत पतंजली रिसर्च इन्स्टिट्यूटने त्यांच्या औषधाने बरे झालेल्या कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांचा डेटा तयार केला आहे. त्याचपद्धतीने कोरोनामधील वेगवेगळ्या टप्प्यांचा आणि सर्व वयोगटातील लोकांचा डेटा आहे. यासह, शेकडो लोकांवर क्लिनिकल चाचण्या सुरु करण्यात आल्या आहेत.

अश्लील कमेंट्स च्या विरोधात ‘या’ अभिनेत्रींनी सुरु केली #IngnorNoMore मोहीम 

मुंबई । सध्या सोशल मीडियावर बहुतांश कलाकार कार्यरत असतात. बऱ्याच अभिनेत्री देखील यामध्ये समाविष्ट आहेत. सोशल मीडियावर आपले फोटो व्हिडीओ अभिनेत्री शेअर करत असतात. बऱ्याचदा या फोटोंवर अश्लील कमेंट्स मिळतात. खूपदा याकडे दुर्लक्ष केले जाते. मात्र आता काही अभिनेत्रींनी याविरुद्ध उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी पुढे येऊन #IngnorNoMore ही मोहीम सुरु केली आहे. आपल्या चाहत्यांशी संवाद करण्यासाठी त्या सोशल मीडिया वापरतात. मात्र अनेकजण यावर अश्लील कमेंट करतात असे बऱ्याचदा दिसून येते. 

अभिनेत्री आश्का गोरडिया आणि पती ब्रेंट गोबले गेल्या काही दिवसांपासून चाहत्यांना योगाचे धडे इन्स्टा लाइव्हद्वारे देत आहेत. नुकताच झालेल्या एका सेशनमध्ये अश्काच्या चॅटवर एक मुलाने अश्लिल कमेंट केल्या आहेत. त्यानंतर अश्काच्या मैत्रीणी श्वेता साळवे, नारायणी शास्त्री, मेघना नायडू यांनी या विरोधात पाऊल उचलत #IgnoreNoMoreला सुरुवात केली आहे. या अभिनेत्रींनी त्यांच्या फोटो आणि व्हिडीओवर करण्यात आलेल्या अश्लिल कमेंटचे स्क्रिनशॉर्ट शेअर केलेल आहेत. श्वेता साळवेने स्क्रिन शॉट शेअर करत, ‘मी गेल्या काही दिवसांपासून अशा कमेंटकडे दुर्लक्ष करीत आहे, कमेंट बॉक्स बंद करत आहे, काहींना मी ब्लॉकही केले आहे. पण आम्हाला असे का करावे लागत आहे? माझ्या ओळखीमधील एकही महिला अशी नाही जिला या लैंगिक अत्याचाराला समोरे जावे लागलेले नाही’ असे तिने या पोस्टमध्ये म्हटले आहे.

https://www.instagram.com/p/CBUayCVnLd6/

‘पुरुषांना त्यांच्या अश्लिल कृतीसाठी कधी जबाबदार धरले जाणार? कारवाई करण्याइतके सुरक्षित स्त्रियांना केव्हा वाटेल? एखाद्या गोष्टीची वाट पाहण्यापेक्षा त्या विरोधात बोलण्यासाठी मी तुम्हाला प्रोत्साहन देते. #IgnoreNoMore’ असे तिने पोस्टमध्ये पुढे म्हटले आहे.त्यानंतर श्वेताने तिच्या मैत्रीणीच्या इन्स्टा लाईव्हवर एका १६ वर्षांच्या मुलाने अश्लिल कमेंट केल्याचा स्क्रिन शॉर्ट शेअर केला. तसेच हा बाबात तक्रार करणार असल्याचे म्हणताच त्या मुलाने माफी मागितली असल्याचे म्हटले आहे. त्यानंतर अभिनेत्री हिना खानने देखील #IgnoreNoMore म्हणत एक पोस्ट केली आहे.

राज्यातील कोरोनाग्रस्तांनी गाठला १ लाखाचा टप्पा; दिवसभरात सापडले ३ हजार ७१७ नवे रुग्ण

मुंबई । राज्यात अनलॉक केल्यानंतर करोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. आज ३ हजार ४९३ नवे रुग्ण सापडल्याने राज्यातील करोना रुग्णांची संख्या १ लाख १ हजार १४१ झाली आहे. तर आज १२७ रुग्ण दगावल्याने राज्यातील करोनाने दगावलेल्यांची संख्या ३ हजार ७१७ झाली आहे. तर मुंबईत आज सर्वाधिक ९० रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यात आज १ हजार ७१८ रुग्ण बरे झाल्याने करोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ४७ हजार ७९६ झाली आहे.

राज्यात आज ३ हजार ४९३ रुग्ण सापडल्याने रुग्णसंख्या १ लाख १ हजार १४१ झाली असली तरी आतापर्यंत ४७ हजार ७९६ रुग्ण करोनामुक्त होऊन घरी गेल्याने राज्यातील उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या ४९ हजार ६१६ एवढीच असल्याचं आरोग्य विभागानं स्पष्ट केलं.

राज्यात आज १२७ रुग्ण दगावले असून त्यात सर्वाधिक मृतांची नोंद मुंबईत झाली आहे. मुंबईत आज ९०, ठाण्यात ११, कल्याण-डोंबिवलीत ३, वसई-विरार, मिरा-भायंदर, धुळे आणि अमरावतीत प्रत्येकी एक, नाशिक आणि औरंगाबादमध्ये प्रत्येकी दोन, सांगलीत ३ आणि पुण्यात १२ रुग्ण दगावले आहेत. आज दगावलेल्यांमध्ये ९२ पुरुष आणि ३५ महिलांचा समावेश आहे. आज नोंद झालेल्या मृतांपैकी ६७ रुग्ण ६० वर्षांवरील, ५२ रुग्ण हे ४० ते ५९ वयोगटातील आणि ८ रुग्ण ४० वर्षाखालील आहेत. तर ८९ जणांना मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोगासह इतर आजार होते, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

आज नोंद झालेल्या एकूण मृत्यूपैकी ५० मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहेत तर उर्वरित मृत्यू २० मे ते ९ जून या कालावधीतील आहेत. या कालावधीतील ७७ मृत्यूंपैकी मुंबई ५५, ठाणे -१०, सांगली -३, कल्याण डोंबिवली – २, पुणे -२, मीरा भाईंदर – १, वसई विरार – १, नाशिक -१, धुळे -१आणि अमरावती – १ मृत्यू असे आहेत.

राज्यात सध्या ५३ शासकीय आणि ४२ खाजगी अशा एकूण ९५ प्रयोगशाळा कोरोना निदानासाठी कार्यरत आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ६ लाख २४ हजार ९७७ नमुन्यांपैकी १ लाख ०१ हजार १४१ नमुने पॉझिटिव्ह (१६.१८ टक्के ) आले आहेत राज्यात ५ लाख ७९ हजार ५६९ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात १५५३ संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये ७५ हजार ६७ खाटा उपलब्ध असून सध्या २८ हजार २०० लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

पुण्यात २२२ रुग्णांची स्थिती गंभीर; ४९ जण व्हेंटिलेटरवर – महापौर

पुणे । राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते आहे. पुण्यातही रुग्णसंख्या वाढते आहे. त्यातच आज पुण्यातील २२२ रुग्ण गंभीर असल्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी त्यांच्या ट्विटर अकॉउंटवरून सांगितले आहे. पुणे जिल्ह्यात काही परिसरात मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडत आहेत.

पुणे शहरात सध्या २ हजार ७३३ रुग्ण उपचार घेत आहेत. या रुग्णांपैकी २२२ रुग्ण गंभीर आहेत. त्यामधील ४९ रुग्ण हे व्हेंटिलेटर वर आहेत तर १७३ रुग्ण हे अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत. मुंबईपाठोपाठ सर्वाधिक रुग्ण पुणे शहरात सापडले आहेत. जिल्ह्यात ५ हजाराहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

जिल्ह्यातील गंभीर रुग्णांचा आकडा हा चिंतादायक आहे. जिल्ह्यातील संक्रमण रोखण्यासाठी सामाजिक अलगाव चे नियम पाळले जात आहेत. जिल्ह्यात प्लाझ्मा थेरपीही यशस्वीरीत्या झाली आहे.

बायकोसाठी काहीपण! मिलिंद सोमणनं पत्नीसाठी उचललं ‘हे’ मोठं पाऊल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या सदाबहार व्यक्तिमत्त्वामुळे नेहमीच चर्चेत असणारा अभिनेता मिलिंद सोमण हा सध्या एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे. त्याचे राहणीमान, मॉडेलिंगचे करिअर आणि अभिनय या सर्वांचीच चर्चा असते. आजही तो त्याच्या फिटनेस मुळे अनेकांना भुरळ घालतो. आपल्यापेक्षा वयाने खूपच कमी असणाऱ्या अंकिता कोनवार हिच्याशी लग्न केल्यानंतर तो बायकोसाठी बरंच काही करताना दिसतो आहे. आता तो बायकोच्या इच्छेसाठी केलेल्या एका गोष्टींमुळेच पुन्हा चर्चेत आला आहे.

मिलिंद आणि अंकिताचे कपल गोल्स जरा हटके आहेत. कारण, केवळ प्रेमाच्या आणाभाकांपुतेच सीमीत न राहता ही जोडी शारीरिक सुदृढता, पर्यावरणाचं महत्त्वं, कलेचं महत्त्वं यांची सांगड घालत त्या माध्यमातून अनोखे आदर्श सर्वांपुढं प्रस्थापित करत आहे. नेहमी नवं काहीतरी करत असणाऱ्या मिलिंदने पत्नीची ईच्छा पूर्ण करण्यासाठी शेतकरी रूप धारण केले आहे. त्याने त्याच्या सोशल मीडिया अकॉउंटवरून फोटो पोस्ट करून त्याखाली लिहिले आहे, ‘अखेर….. दाढीवाला शेतकरी…. अंकिताला हवा होता अगदी तसाच’, या पोस्टमुळे त्याच्या पत्नीची ईच्छा पूर्ण करण्यासाठी तो काहीही करू शकतो अशी चर्चा सुरु आहे.

https://www.instagram.com/p/CBUuWyAnpYD/

शेअर करण्यात आलेल्या या फोटोंमध्ये तो घरातच उगवलेल्या एका छोटेखानी शेतामध्ये उगवलेली भाजी तोडताना दिसत आहे. आपणच आपल्या हातांनी उगवलेली ही भाजी तो मोठ्या कौतुकानं सर्वांना दाखवतही आहे. दैनंदिन जीवनशैलीत कायमच लहान कृतींतून आनंद मिळवणाऱ्या मिलिंदनं पत्नीच्या आऩंदासाठी म्हणून घेतलेलं शेतकऱ्याचं रुप चाहत्यांनाही भावलं आहे. त्याच्या पोस्टवर करण्यात आलेल्या असंख्य कमेंट्स हेच सांगून जात आहेत.

लपाछपी खेळताना चिमुकल्याच्या डोक्यात अडकला कुकर; त्यानंतर डॉक्टरांना करावं लागलं ‘हे’ काम

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरसमुळे देशातील सर्व शैक्षणिक संस्था सध्या बंद आहेत. शैक्षणिक संस्था बंद असल्यामुळे मुलांना घराच्या चार भिंतीत राहण्यास भाग पाडले जात आहे. अशा परिस्थितीत मुले घरालाच शाळा, खेळाचे मैदान,उद्याने सर्वकाही समजत आहेत, मात्र बर्‍याच वेळा हि लहान मुले खेळता खेळता अशा काही करामती करून जातात ज्यामुळे त्यांचे आयुष्यच धोक्यात येते. अशीच एक घटना गुजरातच्या भावनगरातही दिसून आली आहे.

भावनगरमध्ये एक मुलगा आपल्या कुटूंबातील काही लोकांसह लपाछपी खेळत होता. हा लपाछपी खेळत असतानाच या मुलाने कुकरने आपले डोके झाकून घेतले आणि बाकीच्या कुटूंबापासून स्वत: ला लपवून ठेवले. मात्र असे केल्याने त्याचे डोके कुकरमध्ये अडकले. मुलाने कुकरमधून डोके बाहेर काढण्यासाठी बर्‍याचदा प्रयत्न केला पण तो अयशस्वी झाला. मुलाने जेव्हा पुरेशी प्रतिक्रिया दिली नाही, तेव्हा कुटुंबातील सदस्यांनी त्याचा शोध घेतला.

त्यावेळी मुलाचे डोके कुकरमध्ये अडकलेले पाहून कुटुंबातील लोक चकित झाले आणि त्यांनी त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात पोहोचल्यानंतर डॉक्टरांच्या बर्‍याच प्रयत्नांनंतर मुलाचे डोके कुकरमधून बाहेर काढण्यात आले. सध्या मुलाची अवस्था चांगली असल्याचे सांगितले जात आहे. डॉक्टरांनी नंतर या मुलाची तपासणी करून त्याला परत घरी पाठवले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.