Friday, January 2, 2026
Home Blog Page 5668

जपान हून आलेल्या पंढरपुरातील दोन वर्षाच्या मुलाला कोरोनाची लागण

सोलापूर प्रतिनिधी | पंढरपूर शहर व तालुका कोरोनामुक्त झालेला असतानाच आज पुन्हा जपान हून आलेल्या एका  दोन वर्षाच्या मुलाला कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. ऐन आषाढी वारीच्या तोंडावर पंढरपुरात कोरोनाचा रुग्ण आढळून आल्याने शहरात पुन्हा खळबळ उडाली आहे.

प्रशासनाने तातडीने शहरातील घनःशाम सोसायटीचा भाग सील केला आहे. य़ेथील एक दांम्पत्य नोकरीच्या निमित्ताने  जपान मधील  टोकियो शहरात स्थायिक झालेले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ते आपल्या दोन वर्षाच्या मुलाल घेवून भारत आले होते. ते मुळचे पंढरपूरचे असल्याने त्यांना सोलापुरात क्वारंटाईन केले होते. त्याचवेळी आई,वडील आणि त्यांच्या दोन वर्षाच्या मुलाचे स्वॅब घेतले होते. तपासणीमध्ये दोन वर्षाचा मुलगा कोरोना पाॅझीटीव्ह तर आई वडीलाचा अहवाल निगेटीव्ह आला आहे.

संबंधीत कोरोना बाधीत मुलावर वाखरी येथील कोविड केअर सेंटरमध्ये उपचार केले जाणार आहेत.  कोरोना बाधीत मुलाच्या संपर्कात आलेल्या चार व्यक्तींना  अति जोखमी खाली क्वारंटाईन करण्यात आले आहे.

धक्कादायक! संचारबंदी असतानाही पुण्यात अकरावीची परीक्षा 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील कोरोनाचे संकट लक्षात घेऊनच संचारबंदी जाहीर करण्यापूर्वीच शाळा आणि महाविद्यालये बंद करण्यात आली होती. सामुदायिक संसर्ग आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून हा निर्णय घेण्यात होता. त्यामुळे काही परीक्षाही रद्द करण्यात आल्या होत्या. सध्या तर राज्यातील परिस्थिती खूपच चिंताजनक बनली आहे. म्हणूनच संचारबंदीचे नियम शिथिल केले असूनही शाळा महाविद्यालयांना अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही असे असतानाही पुण्यातील तळेगावमधील स्नेहवर्धक मंडळ ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्समध्ये परीक्षा घेतली जात असल्याचे उघडकीस आले आहे.

वडगाव मावळचे तहसीलदार यांनी याठिकाणी छापा टाकून ही घटना उघडकीस आणली आहे. छापा टाकला त्यावेळेस येथे अकरावी वाणिज्य विभागाच्या परीक्षा सुरु होत्या. या कृत्यामुळे या महाविद्यालयाचे संचालक मंडळ, प्राध्यापक आणि तीन शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अकरावी वाणिज्य विभागात नापास झालेल्या विद्यार्थ्यांची ही परीक्षा होती. तळेगाव पोलीस निरीक्षक अमर वाघमोडे यांनी ही माहिती  दिली. तसेच ३३ विद्यार्थ्यांना व्हाट्सअप वर मेसेज टाकून बोलावण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यातील २७ विद्यार्थी परीक्षेस हजर होते.

काल एक पेपर झाला होता. त्यानंतर पुन्हा पेपर होण्याची माहिती मिळाल्यावर हा सापळा रचण्यात आला होता. राज्यातील वातावरण इतके गंभीर झाले असताना या अशा प्रकारचे कृत्य हे धक्कादायक असल्याचे बोलले जात आहे. तसेच विद्यार्थ्यांना परीक्षेस येण्यास भाग पाडणे चुकीचे असल्याचेही बोलले जात आहे. सरकारने परीक्षा रद्द केल्या आहेत तरीही या परीक्षा घेतल्याने संचारबंदीचे उल्लंघन ही करण्यात आले आहे. या विद्यार्थ्यांपैकी एकाला जरी कोरोनाची लागण झाली तर याला जबाबदार कोण? असाही प्रश्न पालक वर्गातून विचारला जात आहे. एकप्रकारे अशा विद्यालयांकडून विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचं पाहायला मिळतंय.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

आता कोरोना चाचणी २ हजार ८०० रुपयांत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना चाचणीसाठी सध्या ४५०० रु आकारले जातात. खाजगी प्रयोगशाळेत आकारले जाणारे हे दर कमी करण्यासाठी सरकारने एक समिती नियुक्त केली होती. या समितीने त्यांच्या अहवालात आता हे दर २२०० व २८०० रु करण्यास सांगितले असून हे दर निश्चित केले आहेत. ४५०० रु ही  रक्कम  गरीब रुग्णांना परवडू शकणारी नसल्याने हे दर ठरविण्यात आले आहेत. शासनाने २ जून रोजी या समितीची नियुक्ती केली होती. देशातील ८८ प्रयोगशाळांना कोरोना चाचणीची मान्यता आयसीएमआर ने दिली होती. देशातील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला होता. या प्रयोगशाळांमध्ये ते ४५००रु आकारतात.

या चाचण्यांसाठी लागणारे किट्स परदेशातून मागवावे लागतात असे कारण पूर्वी खासगी प्रयोगशाळा देत होत्या, मात्र आता भारतात हे किट्स तयार केले जात असल्याने दर कमी करावेत असे आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ प्रदीप व्यास यांनी प्रयोगशाळांना सांगितले. हे दर कमी करण्यासाठी त्यांनी चार सदस्यांची समिती सथापन केली आहे. महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे हे या समितीचे अध्यक्ष असून अन्य तीन सदस्यात आरोग्य संचालक डॉ. साधना तायडे, जे जे वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. अमिता जोशी व वैद्यकीय शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. अजय चंदनवाले यांचा समावेश आहे. आयसीएमआरने २५ मे रोजी सर्व राज्यांना पत्र पाठवून त्यांच्या राज्यात दर निश्चिती करण्यास परवानगी दिली होती. त्यानुसार कर्नाटक ने करोना चाचणीसाठी २२५० रुपये दर निश्चित केला तर तामिळनाडू ने २५०० रुपये व जम्मू- काश्मीर मध्ये २७०० रुपये दर निश्चित करण्यात आला.

महाराष्ट्र राज्यात सहा लाखांहून अधिक चाचण्या करण्यात आल्या आहेत. खाजगी प्रयोगशाळांचे अहवाल मिळण्यासाठी तीन ते सहा दिवस लागत होते आता हे अहवाल २४ तासाच्या आत देणे बंधनकारक करण्यात आले आहे. देशात सध्या दहा लाख लोकांच्या मागे २३६५ चाचण्या केल्या जातात. महाराष्ट्रात हे प्रमाण १३ हजार इतके आहे. देशात एकूण ५५५ प्रयोगशाळांना मान्यता देण्यात आली आहे ज्यामध्ये महाराष्ट्रातील ८८ प्रयोगशाळांचा समावेश आहे.  कोरोनासठी सॅम्पल गोळा करण्यापासून ते चाचणीचा निकाल देईपर्यंत येणाऱ्या प्रत्येक खर्चाचा सविस्तर आढावा या समितीने घेतला आहे.

त्यानंतर सॅम्पल थेट आरोग्य केंद्रातून गोळा करून चाचणी करावयाची झाल्यास २२०० रुपये चाचणीसाठी आकारावे तसेच जर रुग्णाकडून रुग्णालयात जाऊन अथवा घरी जाऊन सॅम्पल घेऊन चाचणी केल्यास २८०० रुपये आकारण्यात यावे अशी शिफारस डॉ. सुधाकर शिंदे यांच्या समितीने केली आहे. या शिवाय चाचणीसाठी लागणाऱ्या रिएजंट व अन्य गोष्टींवरील जीएसटी रद्द केल्यास चाचणीचे दर आणखी कमी होतील असे या अहवालात नमूद केले आहे. या समितीचा अहवाल शासनाने लागू केल्यास करोना चाचणीसाठी ४५०० रुपयांऐवजी २८०० रुपये आकारले जातील.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

१५०० रु च्या मृतदेहांच्या पिशव्या बीएमसी ६७१९ रु मध्ये खरेदी करतेय; नितेश राणेंचा आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या ट्विटर अकॉउंटवरून सतत कार्यरत असणारे नितेश राणे हे नेहमी काहीतरी सनसनाटी निर्माण करत असतात. आता असाच एक खुलासा त्यांनी त्यांच्या ट्विटर अकॉउंटवरून ट्विट करून केला आहे. नितेश राणे यांनी बृहन्मुंबई महापालिका खरेदी करत असलेल्या मृतदेहांच्या पिशव्यांची किंमत जाहीर केली आहे. जी तुलनेने पाचपट असल्याचे दिसून येत आहे. यावरून त्यांनी एवढ्या महाग किंमतीत बीएमसी या पिशव्या खरेदी करते? असा सवाल केला असून हे खूपच तिरस्करणीय असल्याचे म्हंटले आहे.

वेदांत इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडून बीएमसी या पिशव्या खरेदी करत आहे. यासंदर्भात नितेश राणे यांनी, वेदांत इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेड बीएमसी ला मृतदेहांच्या पिशव्या ६७१९ रु ला देते? असे म्हणत आश्चर्य व्यक्त केले. तर मुंबई, पुणे किंवा औरंगाबादच्या बाजारात या पिशव्यांची किंमत १५००रु पेक्षा जास्त नाही असेही सांगितले आहे. सहापट अधिक किंमतीत या पिशव्या खरेदी केल्या जात असल्याचे त्यांनी म्हंटले आणि हे तिरस्करणीय असल्याचा उल्लेख केला आहे.

 

दरम्यान महाराष्ट्रात ३,५९० रुग्ण कोरोनामुळे मृत्युमुखी पडले आहेत. एकीकडे अर्थव्यवस्था कोलमडली असताना महाग किंमतीच्या या पिशव्या घेणे हाही एक मुद्दा आहेच. आता यावर सरकार काय उत्तर देईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान या पोस्टवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. या ट्विटची चांगलीच चर्चा झाली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

भारतीय शास्त्रज्ञांनी बनवलं सर्वात स्वस्तातलं कोरोना टेस्टिंग किट; एका दिवसात २० हजार टेस्ट शक्य

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । साइंटिस्ट काउंसिल ऑफ साइंटिफिक एंड इंडस्ट्रियल रिसर्च अंतर्गत वैज्ञानिकांसाठी सेंटर फॉर साइंटिस्ट्स ने कोविड -१९ साठी “नवीन कमी किमतीची आणि कमी तंत्रज्ञानाची आवश्यकता असलेली चाचणी विकसित केली आहे.”

मात्र , ही नवीन चाचणीसाठी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदे कडून (आयसीएमआर) मान्यता मिळण्याची वाट पाहत आहे. एकदा मान्यता मिळाल्यानंतर ते दररोज २०,००० – ५०,००० कोविड -१९ च्या नमुन्यांची चाचणी घेऊ शकतात. दुर्गम भागात विशेषतः अशाठिकाणी जिथे तज्ञ वैद्यकीय कर्मचारी आणि चांगल्या मशीन्सची उपलब्धता कमी असते तिथे ही चाचणी खूपच प्रभावी सिद्ध होऊ शकते.

आयसीएमआर परवानगीनंतर पुढील महिन्यापासून चाचणी उपलब्ध होऊ शकते
हे नवीन चाचणी तंत्रज्ञान पुढील महिन्यापासून वापरासाठी उपलब्ध होईल अशी अपेक्षा करण्यात येत आहे. इन-हाऊस रिपोर्टच्या आधारे आरोग्य विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने म्हटले आहे की, रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन नेस्टेड पीसीआर (आरटी-एनपीसीआर) चाचणी म्हणून ओळखली जाणारी ही नवीन चाचणी सीसीएमबी रिसर्च टीम (आरटी-क्यूपीसीआर) च्या माध्यमातून विकसित केली गेली. या चाचणीचे प्रमाण प्रात्यक्षिक दाखविले गेले आहे. आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनीही या चाचणीचे कौतुक केले.

केंद्रीय आरोग्य आणि तंत्रज्ञान मंत्री हर्ष वर्धन म्हणाले, नेस्टेड पीसीआर या चाचणीची पद्धत RT-qPCR test वर आधारलेली नाहीये. अंतिम चाचणी म्हणून मानक RT-PCR चा वापर केला जातो आहे.

CCMB चे संचालक राकेश मिश्रा यांनी म्हटले आहे, ‘ या चाचणी साठी परवानगी मिळविण्यासाठी सध्या ही चाचणी प्रक्रिया ICMR कडे प्रलंबित आहे. ते म्हणाले की, ज्या ठिकाणी RT-qPCR test मशिन्स उपलब्ध नाहीत अशा ठिकाणी आम्ही आयसीएमआरला ते वापरण्यास सांगू शकतो’.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आता ICSE बोर्डाच्या परीक्षेलाही पालकांचा विरोध

नवी दिल्ली । देशभरात कोरोनाचे संक्रमण वाढत असताना CBSE आणि ICSE बोर्डाच्या परीक्षा जुलै महिन्यात होऊ घातल्या आहेत. या परीक्षांना पालकांना मोठ्या प्रमाणावर विरोध होताना दिसत आहे. शुक्रवारी १२ जून रोजी सकाळी ट्विटरवर या परीक्षा घेण्याविरोधात ही मोहिम सुरू झाली. #Cancel10thICSEboards या हॅशटॅगसह सुमारे २८ हजार टि्वटर मेन्शन होते. एक ते दीड तास हा हॅशटॅग ट्रेंड करत होता

ICSE बोर्डाच्या विद्यार्थ्यांच्या पालक असलेल्या सहा महिलांनी ही मोहिम सुरू केली आहे. या सहाही पालक दिल्लीतील आहेत. त्यांच्या मोहिमेला मोठ्या प्रमाणावर पाठबळ मिळत आहे. आयसीएसई बोर्डाच्या दहावीच्या परीक्षा १ ते १४ जुलै या कालावधीत होणार आहेत.या सहा महिला पालकांनी या मोहिमेच्या समर्थनार्थ व्हॉट्स अप ग्रुप तयार केले. काही तासांत २३०० हून अधिक पालक या ग्रुपमध्ये जॉइन झाले. पाल्यांच्या आरोग्याची काळजी असल्याने परीक्षांना विरोध करत असल्याचे या पालकांचे म्हणणे आहे.

१९ मार्च २०२० रोजी ICSE बोर्डाने सर्व परीक्षा स्थगित केल्या. त्यावेळी दहावीचे ६ विषयांचे पेपर शिल्लक होते (ही संख्या विद्यार्थ्यांगणिक बदलू शकते कारण विविध विद्यार्थी विविध विषय निवडतात.) त्यावेळी देशभरात कोरोना संक्रमणाच्या २३६ केसेस होत्या. आता देशभरात सुमारे ३ लाख कोरोनाबाधित झालेले रुग्ण आहेत. आणि अशा वेळी बोर्डाने सांगितले आहे की उर्वरित विषयांच्या परीक्षा जुलै महिन्याच्या पहिल्या २ आठवड्यात घेतल्या जाणार असल्याच्या आमच्या मुलांना कोरोनाची लागण होण्याचा धोका आहे असं या पालकांच म्हणणं आहे.

दरम्यान, CBSE दहावी, बारावीच्या परीक्षांनाही पालकांचा विरोध आहे. सीबीएसईच्या दहावी आणि बारावीच्या उर्वरित परीक्षा येत्या १ ते १५ जुलै दरम्यान आयोजित करण्यात आल्या आहेत. यापैकी सीबीएसई बारावीच्या परीक्षा देशभर होणार आहेत. या बारावीच्या परीक्षा रद्द करण्याची मागणी करत आता पालकांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. देशभरात कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे या परीक्षा घेतल्या जाऊ नयेत अशी पालकांची मागणी आहे.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा.
ब्रेकिंग बातम्यासाठी : www.hellomaharashtra.in

 

राजभवन वारी! आणखी एका भाजप नेत्यानं घेतली राज्यपालांची भेट; कारणही आहे तितकेच गंभीर

मुंबई । भाजप नेत्यांच्या राजभवन वाऱ्या सुरूच असून आज भाजपच्या आणखी एका नेत्याने शिष्टमंडळासह राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. या नेत्याने मुंबईतील कोरोनाच्या गंभीर स्थितीकडे राज्यपालांचे लक्ष वेधले. हे नेते म्हणजे भाजपचे डॉ. किरीट सोमय्या. मुंबईतील रुग्णालयांमधून कोरोनाबाधित रुग्णांचे मृतदेह गायब केले जात आहेत, असा खळबळजनक दावा करत डॉ. किरीट सोमय्या यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे याबाबत चिंता व्यक्त केली. यावेळी गृह व आरोग्य सचिवांना या प्रश्नी लक्ष घालण्यास सांगणार, असे आश्वासन राज्यपालांनी दिल्याची माहिती सोमय्या यांनी दिली आहे.

किरीट सोमय्या यांनी मुंबई महापालिका रुग्णालयांच्या भोंगळ कारभाराचा फटका बसलेल्या पीडित कुटुंबातील सदस्यांसह राज्यपालांची भेट घेतली. अतुल भातखळकरही त्यांच्यासोबत होते. यावेळी सोमय्या यांनी मुंबईतील रुग्णालयांत करोना बाधित रुग्णांची कशी हेळसांड सुरू आहे, हे राज्यपालांच्या निदर्शनास आणून दिले. मुंबईत किमान अर्धा डझन करोना बाधित रुग्णांच्या बाबतीत धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

हे रुग्ण आधी बेपत्ता वा पळून गेल्याचे जाहीर करण्यात आले. त्यानंतर संबंधित रुग्णालयातच या रुग्णांचे मृतदेह आढळले. या रुग्णांवरील उपचाराचे बिलही नंतर नातेवाईकांना देण्यात आले. हा सारा प्रकार चिंताजनक असून याप्रश्नी आपण लक्ष घालावे व सरकारला योग्य त्या सूचना द्याव्या, अशी मागणी सोमय्या यांनी राज्यपालांकडे केली. याबाबत एक निवेदन सोमय्या यांनी राज्यपालांना दिले असून याप्रश्नी लक्ष घालण्याचे आश्वासन राज्यपालांनी दिले आहे.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा.

ब्रेकिंग बातम्यासाठी : www.hellomaharashtra.in

 

डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘हा’ निर्णय घेतल्यास भारतीयांना बसू शकतो मोठा फटका

वॉशिंग्टन । कोरोना व्हायरसच्या संकटात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मोठा निर्णय घ्यायच्या तयारीत आहेत. ज्याचा फाटक भारतीयांना बसू शकतो. अमेरिकेतला H1B आणि रोजगार देणारे इतर व्हिसा रद्द करण्याचा ट्रम्प यांचा विचार आहे. अमेरिकेतली वाढती बेरोजगारी बघता ट्रम्प हा निर्णय घेऊ शकतात, असं वृत्त तिथल्या स्थानिक वर्तमानपत्रामध्ये आलं आहे. अमेरिकेनं H1B व्हिसा रद्द केल्यास याचा थेट फटका आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या भारतीयांना असणार आहे. भारतातले बरेच नागरिक अमेरिकेत रोजगारासाठी H1B व्हिसावर जातात.

अमेरिकेतल्या स्थानिक वृत्तांनुसार ट्रम्प सरकार पुढच्या आर्थिक वर्षात व्हिसा निलंबनाला मंजुरी देऊ शकते. अमेरिकेत आर्थिक वर्ष ऑक्टोबर महिन्यापासून सुरू होतं. याचवेळी अनेक नवे व्हिसा दिले जातात. प्रशासनातल्या एका अधिकाऱ्याने याबाबतची माहिती दिल्याचं वृत्तपत्राचं म्हणणं आहे. ट्रम्प सरकारने हा निर्णय घेतला तर H1B व्हिसा निलंबन संपत नाही तोपर्यंत कोणताही बाहेरचा नागरिक अमेरिकेत नोकरी करू शकणार नाही. दरम्यान, ज्यांच्याकडे आधीपासूनच H1B व्हिसा आहे, त्यांना या निर्णयामुळे चिंता करण्याची गरज नाही, असंही सांगण्यात आलं आहे.

H1B हा नॉन-इमिग्रेशन व्हिसा आहे. अमेरिकेतल्या कंपन्यांना परदेशी नागरिकांना नोकरी देण्याची सुविधा हा व्हिसा देतो. अमेरिकेतल्या आयटी कंपन्या हजारो कर्मचाऱ्यांना नोकरीवर ठेवण्यासाठी भारत आणि चीनवर अवलंबून असते. त्यामुळे अमेरिकन सरकारच्या या निर्णयाचा परिणाम अमेरिकेत जाऊ इच्छिणाऱ्या हजारो भारतीयांवर होऊ शकतो. अमेरिकेत आधीच H1B व्हिसा धारकांना नोकरी गमवावी लागली आहे. कोरोना व्हायरसच्या संकटात त्यांना भारतात परतावं लागत आहे.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा.
ब्रेकिंग बातम्यासाठी : www.hellomaharashtra.in

म्हणुन सर्वोच्च न्यायालयाने केले ठाकरे सरकारचे कौतुक

वृत्तसंस्था। एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्ताची दाखल घेत सर्वोच्च न्यायालयाने रुग्णांना मिळणाऱ्या उपचारासंबंधी सुनावणी घेतली आहे. दिल्लीमधील एका रुग्णालयात ढिसाळ कारभार सुरु असल्याचे एका वृत्तवाहिनीने निदर्शनास आणून दिले आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीतील गंभीर परिस्थितीचे रुग्णालयांनी उत्तर दिले पाहिजे असे म्हंटले आहे. दिल्लीसोबत सर्वोच्च न्यायालयाने ठाकरे सरकारलाही नोटीस बजावली आहे. मात्र मुंबईत दरदिवशी होणाऱ्या तपासण्यांचे कौतुकही त्यांनी केले आहे.

दिल्ली, महाराष्ट्र यासोबत तामिळनाडू, तसेच पश्चिम बंगाललाही सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली आहे. न्यायमूर्ती अशोक भूषण, संजय किशन कौल आणि एम आर शाह यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी करण्यात आली. रुग्णांची वाढती संख्या आणि कमी प्रमाणातील चाचण्यांचे उत्तर मागत सर्वोच्च न्यायालायने दिल्ली सरकारला स्पष्टीकरण मागितले आहे. तर मुंबईत १६ ते १७ हजार चाचण्या होत असताना तुलनेने केवळ सात हजार चाचण्या केल्या जात असल्याचे देखील त्यांनी म्हंटले आहे. प्रसारमाध्यमांनी ही माहिती समोर आणल्याचेही सर्वोच्च न्यायालयाने म्हंटले आहे.

 

“दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि अहमदाबादमध्ये रोज करोना रुग्णांची संख्या वाढत आहे. दिवसाला १० हजारांपेक्षा जास्त रुग्ण सापडत असताना चाचण्यांची संख्या कमी का केली जात आहे ? चाचण्या न करणे हा पर्याय नाही. चाचण्या वाढवणे हे राज्यांचं कर्तव्य आहे, जेणेकरुन लोकांना राज्यात नेमकी काय परिस्थिती आहे याची माहिती मिळेल,” असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे. करोना रुग्णांना मिळणारे उपचार आणि मृतदेहांची होणारी हेळसांडप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र आणि राज्य सरकारांना नोटीस पाठवली आहे. तसंच चाचण्यांची संख्या कमी होत असल्याचीही दखल घेतली आहे. न्यायालयाने केंद्र सरकारसबोत दिल्ली, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू सरकारला नोटीस पाठवली आहे. १७ जून रोजी याप्रकऱणी पुढील सुनावणी होणार आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांचे घर बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा व्यवस्थेत वाढ

लखनऊ । उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे लखनऊमधील कालिदास मार्गावरील घर बॉम्बने उडवून देण्याची धमकी आल्यानंतर कालिदास मार्गाची सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे. एका कॉल सेंटरवरून ही धमकी आल्याने खळबळ उडाली आहे. आज तक या वृत्तवाहिनीनं याबाबतच वृत्त दिल आहे. यापूर्वीही त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. कॉल सेंटरवरील या धमकीनंतर लखनऊच्या कालिदास मार्गावर हाय अलर्ट घोषित करण्यात आला आहे. ही सुरक्षा वाढवण्याबरोबरच बॉम्ब स्क्वॉड आणि श्वानपथकाच्या मदतीने तपासणी करण्यात येत आहे.

डायल -११२ वर कॉल करून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे निवासस्थान बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे. फोन करणारा कोण आहे आणि त्या व्यक्तीने कोठून फोन केला आहे, याचा शोध घेण्याचा पोलिस प्रयत्न करीत आहेत. या फोन कॉलची सत्यता काय आहे हे स्पष्ट होईपर्यंत कालिदास मार्गाची सुरक्षा कडक करण्यात आली आहे. कालिदास मार्गावर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याव्यतिरिक्त कॅबिनेट मंत्री श्रीकांत शर्मा आणि इतर काही मंत्र्यांची शासकीय निवासस्थाने आहेत.

काही दिवसांपूर्वीच योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या एका तरुणाला मुंबईतून अटक करण्यात आली होती. कामरान असे या तरुणाचे नाव होते. त्याने उत्तर प्रदेश पोलिसांच्या सोशल मीडिया हेल्प डेस्कवर फोन करुन ही धमकी दिली होती. यानंतर उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र एटीएसने संयुक्तपणे कारवाई करत कामरानला ताब्यात घेतले होते.

ब्रेकिंग बातम्यासाठी : www.hellomaharashtra.in