हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मागील अनेक दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मन की बात हा कार्यक्रम रेडिओच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत असतो. अशातच आता नरेंद्र मोदी यांनी 28 जुलै रोजी या कार्यक्रमाच्या 112 व्या भागांमध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. नरेंद्र मोदी 2024 ची लोकसभा निवडणूक लढल्यानंतर आता हा दुसरा एपिसोड रिलीज झालेला आहे. नरेंद्र मोदी हे नेहमीच्या त्यांच्या कार्यक्रमातून अनेक गोष्टी सांगत असतात. अशातच या कार्यक्रमाच्या वेळीस त्यांनी संपूर्ण देशासाठी मानस या विशेष मोहीम योजनेची माहिती देखील दिलेली आहे. या मोहिमेचा फायदा आता देशातील सर्व वयोगटातील लोकांना होणार आहे. .
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात या कार्यक्रमात पॅरिस ऑलिंपिकपासून सुरुवात केली त्यांनी मॅच ओलंपियाडमध्ये जे स्पर्धक विजयी झाले, त्या भारतीय सर्व खेळाडूंना फोनवरून शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्यासोबत त्यांनी ड्रग्स विरोधातील लढाईसाठी मानस नावाच्या एका विशेष केंद्राचा देखील उल्लेख या कार्यक्रमांमध्ये केलेला आहे.
मन की बात या कार्यक्रमातून नरेंद्र मोदी यांनी मानस या मोहिमेचा उल्लेख केला आहे. ही मोहिम आता आम्ल पदार्थ विरोधी असणार आहे. मोदी देखील या लढाईत एक मोठे पाऊल उचलत आहेत. यावेळी नरेंद्र मोदी म्हणाले की, आपला मुलगा अमली पदार्थाच्या आहारी जाऊ नये, असे प्रत्येक कुटुंबाला वाटत असते. त्यामुळे आता या लोकांना मदत करण्यासाठी सरकारने मानस नावाचे एक खास केंद्र सुरू केलेले आहे. त्यामुळे आता अमली पदार्थांविरुद्धच्या लढाईत हे एक मोठी पाऊल असणार आहे.
या अमली पदार्थ विरोधाच्या लढाईत सरकारने एक टोल फ्री क्रमांक देखील जारी केलेला आहे. 1933 हा टोल क्रमांक आहे. या क्रमांकावर कॉल करून कोणताही व्यक्ती आवश्यक तो सल्ला घेऊ शकतो. तसेच ड्रग्स संबंधित काही माहित असेल देखील तरी या क्रमांकावर कॉल करून देखील ते माहिती देऊ शकतात. यावेळी पंतप्रधान म्हणाले की, अमली पदार्थातून मुक्त करण्यासाठी हा प्रयत्न केला जात आहे.त्यामुळे सगळ्या लोकांनी मानस हेल्पलाइनचा पुरेपूर उपयोगी हवा आणि तुमच्या कुटुंबाला अंमली पदार्थाच्या सेवनापासून वाचवावे.
Samrudhi Expressway : राज्य सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या मुंबई -नागपूर समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचे काम वेगाने पूर्णत्वास येत आहे. त्यानंतर मुंबई – नागपूर एकूण 701 किमीचा हा महामार्ग पूर्णपणे खुला होईल, मुंबई ते नागपूर हे आंतर या महामार्गामुळे एवढ्या 7-8 तासात गाठता येणार आहे. सध्या खुल्या असलेल्या मार्गाला देखील वाहकांनी चांगली पसंती दाखवली असल्याची एका आकडेवारीवरून समोर येत आहे. मागच्या दीड वर्षात या महामार्गावरून (Samrudhi Expressway ) तब्बल 1 कोटी वाहनांनी प्रवास केला असून त्यामुळे MSRDC च्या तिजोरीत 826 कोटींचा गल्ला जमा झाला आहे. चला पाहूया काय संगीतीये नेमकी ही आकडेवारी…
सर्वाधिक वाहतूक मे महिन्यात (Samrudhi Expressway )
समृद्धी महामार्गाच्या बाबतीत बोलायचे झाल्यास नागपूर ते इगतपुरी या 625 किलोमीटरच्या मार्गावर सध्या वाहन धावत आहेत. आकडेवारीनुसार या महामार्गावरून दर दिवशी साधारणपणे वीस हजार वाहने धावतात. मिळालेल्या माहितीनुसार आतापर्यंत या महामार्गावरून उच्चांकी वाहतुक ही मे महिन्यात झाली असून मे महिन्यात 8, 22,166 वाहनांनी समृद्धी महामार्गावरून प्रवास केला (Samrudhi Expressway ) आहे.
मारग खुला झाल्यानंतर पहिल्या महिन्यात या महामार्गावरून दोन लाख वीस हजार वाहनांनी प्रवास केला होता. त्यातून एमएसआरडीसीच्या तिजोरी 13 कोटी 17 लाख रुपयांचा महसूल जमा झाला होता. त्यानंतर या महामार्गावरून नऊ महिन्यात म्हणजेच ऑगस्ट 2023 मध्ये दरमहा पाच लाख वाहनांचा टप्पा पार केला होता. समृद्धी महामार्ग सुरू झाल्यापासून डिसेंबर 2023 मध्ये पहिल्यांदा या महामार्गावरून वाहनांनी सात लाखांचा टप्पा ओलांडला. आता या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येत आहे. शिवाय गेल्या काही महिन्यांपासून या महामार्गावरून (Samrudhi Expressway ) दरमहा सात लाखांपेक्षा जास्त वाहने प्रवास करतात.
महामार्गावरील अपघातात 213 जणांनी गमावले प्राण (Samrudhi Expressway )
समृद्धी महामार्ग हा अपघातांच्यामुळे देखील चर्चेत आहे. समृद्धी महामार्ग झाल्यापासून तब्बल 123 अपघातांच्या घटना घडल्या आहेत ज्यामध्ये 213 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये मुख्यत्वाने गाडीवरील नियंत्रण सुटणे, चालकाला झोप लागणे, टायर फुटणे आणि दोन वाहनांमध्ये योग्य अंतर न राखणे, भरधाव वेग अशी करणे असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
समृद्धी महामार्ग हा राज्यातला दुसरा प्रवेश नियंत्रित मार्ग असून 150 किलोमीटर वेगाने वाहने इथं जाऊ शकतात. अशा रीतीने त्याची निर्मिती करण्यात आली आहे. सद्यस्थितीला या महामार्गावर 120 ही वेग मर्यादा आहे. मात्र त्याहून अधिक वेगाने वाहन चालवली जात असल्याचा देखील निदर्शनास येत आहे. त्यामुळे अपघातांची संख्या वाढताना दिसत आहे.वेगाने वाहन चालल्यामुळे आतापर्यंत आठ अपघात (Samrudhi Expressway ) झाले असून त्यात 11 जणांचा मृत्यू झालाय. तर सर्वाधिक अपघात गाडीवरील नियंत्रण सुटल्याने झाले आहे. तसेच 37 अपघात घडले असून त्यात 55 जणांचा मृत्यू झाला आहे. तर वाहनांना आग लागण्याच्या दोन घटना घडल्या असून त्यामध्ये 26 जणांनी आपला जीव गमावला आहे. याबाबतची माहिती एम एस आर डी सी कडून देण्यात आली आहे.
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारत आणि पाकिस्तान या कट्टर विरोधी देशांमध्ये युद्ध होण्याची चिन्हे दिसत आहे. पाकव्याप्त काश्मीरमधील सर्वपरिचित कार्यकर्ते डॉ. अमजद अयुब मिर्झा (Amjad Ayub Mirza) यांनी जम्मू आणि काश्मीवर लकरच हल्ला होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. महत्वाची बाब म्हणजे हा हल्ला दहशतवाद्यांकडून नव्हे तर पाकिस्तान लष्कराकडून होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. पाकिस्तानचे सुमारे 600 सैनिक कुपवाडा परिसरात घुसल्याचे त्यांनी म्हंटल आहे. स्थानिक जिहादी दहशतवाद्यांना आणि पाकिस्तानी लष्कराला मदत करत असल्याचंही डॉ. अमजद यांनी सांगितलं आहे त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. अमझद मिर्झा यांनी याबाबत एक ट्विट केलं आहे.
अमझद मिर्झा यांचे ट्विट काय?
एका संपूर्ण SSG बटालियनने घुसखोरी केल्याचे सांगितले जाते याचा अर्थ कुपवाडा आणि इतर ठिकाणी किमान 600 कमांडो आहेत.
स्थानिक जिहादी स्लीपर सेल सक्रिय आहेत आणि भारतीय हद्दीत SSG चळवळीला मदत करत आहेत.
लेफ्टनंट कर्नल शाहीद सलीम जंजुआ हे सध्या जम्मूच्या भारतीय हद्दीत हल्ल्यांचे नेतृत्व करत आहेत.
त्यांचे लक्ष भारतीय सैन्याच्या 15 कॉर्प्सला गुंतवून ठेवण्यावर आहे.
SSG च्या आणखी दोन बटालियन मुझफ्फराबादमध्ये जम्मू आणि काश्मीर मार्गे भारतीय हद्दीत प्रवेश करण्यास तयार आहेत.
1. Allegedly SSG General Officer Commanding (GOC) Maj General Adil Rehmani is conducting the attacks in Jammu region. 2. one whole SSG battalion is said to have infiltrated that means at least 600 commandos are in Kupwara region and else where. 3. local jihadi sleeper cells… pic.twitter.com/ZI1yz63GdP
एका बटालियनमध्ये सुमारे 500 सैनिक असतात. पाकिस्तानच्या या बटालियन स्थानिक जिहाद्यांच्या मदतीने भारतातही घुसल्या तर पुन्हा एकदा पीर पंजाल डोंगरात कारगिलसारखे युद्ध होण्याची शक्यता आहे. उल्लेखनीय आहे की, कुपवाडा परिसर पिरपंजाल आणि शामबारी पर्वताच्या मध्ये वसलेला आहे, जो दहशतवादी आणि पाकिस्तानी लष्करासाठी लपण्यासाठी खूप उपयुक्त आहे. त्यामुळे भारतीय लष्कराला सावध राहण्याची गरज आहे.
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणुकीत शिवसेनेकडून शिवाजीराव आढळराव पाटलांना दिल्ली दरबारी पाठवणाऱ्या जुन्नरने विधानसभा मतदारसंघाने मात्र आमदारकीला नेहमीच वेगळा चेहरा निवडून दिला… त्यात राष्ट्रवादीकडून आमदार असणाऱ्या अतुल बेनके यांनी अजित दादा जिंदाबाद… म्हणत शरद पवारांना अंगावर घेतलं खरं… पण घड्याळाच्या म्हणजेच दादांच्या उमेदवाराला याच जुन्नरनं तब्बल 51 हजार मतं ही मायनस मते दिलीयेत… याचाच अर्थ बेनके यांची आमदारकी हवामान खात्याचा अंदाजानुसार रेड झोन मध्ये आहे… त्यामुळे जुन्नरच्या शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या रांगड्या मातीत यंदा राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणारय… आणि याची स्क्रिप्ट लिहिणारयत ते शरद पवार…
छत्रपती शिवरायांचा जन्म झालेल्या शिवनेरी किल्ल्याचा सहवास लाभलेला जुन्नर विधानसभा मतदारसंघ अनेक अर्थाने महत्त्वपूर्ण आहे… पुणे नाशिक आणि कल्याण अहमदनगर या दोन्ही हायवेला समांतर पसरलेल्या या मतदारसंघात शिवनेरी गड, जीवधन गड, हडसर गड, नाने घाट असा ऐतिहासिक ठेवा तर आहेच पण सोबतच कांदा, टोमॅटो, द्राक्ष, ऊस उत्पादक शेतकऱ्यांची देखील मोठी संख्या आहे… त्यामुळे जुन्नरच्या राजकारणात जम बसवायचा असेल तर शेतीमातीच्या प्रश्नांशी प्रामाणिक राहावं लागतं…मतदार संघाचा इतिहास पाहायचा झाला तर नेहमी आघाडीच्या बाजूने कौल देणाऱ्या मतदारसंघाने राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून घड्याळाशी इमान दाखवलं… 2004 आणि 2009 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे वल्लभ बेनके इथून आमदार राहिले… पण इथून लोकसभेला मात्र शिवसेनेच्या आढळराव पाटलांना लीड मिळायचं… थोडक्यात लोकसभेला शिवसेना… आणि विधानसभेला राष्ट्रवादी… असा या मतदारसंघाचे एकूणच ट्रेंड होता… ठरल्यानुसार 2014 ला लोकसभेला जुन्नरनं आढळरावांच्या बाजूने झुकतं माप दिलं… मात्र विधानसभेला इंटरेस्टिंग रित्या इथून मनसेच्या शरद सोनवणे यांनी गुलाल उधळत इतिहास बनवला…
2014 ला मनसेला ज्या काही मोजक्या जागा मिळाल्या होत्या. त्यातली जुन्नर विधानसभा ही एक… यानंतर आमदार साहेब शिवसेनेच्या गोटात गेले… शिवसेनेकडून आमदारकीच्या रिंगणात असणाऱ्या आणि प्रत्येक निवडणुकीत नंबर दोन ला राहणाऱ्या आशा बुचके यांच्यासाठी हा मात्र मोठा धक्का होता… 2019 च्या विधानसभेला स्टँडिंग आमदार असल्याने शिवसेना शरद सोनवणे यांना तिकीट देणार हे कन्फर्म होतं… म्हणूनच आशा बुचके यांनी आपली ताकद लावून विधानसभेच्या आधीच लोकसभेला राष्ट्रवादीच्या कोल्हेंच्या बाजूने तब्बल 41 हजारांचं लीड देत छुपी मदत केली… अर्थात हे मातोश्रीच्या कानावर जाताच त्यांनी आशा बुचके यांची पक्षातून हकालपट्टी करत विधानसभेला शरद सोनवणे यांचंच नाव कन्फर्म केलं… त्यामुळे 2019 ला शिवसेनेकडून शरद सोनवणे तर राष्ट्रवादीकडून अतुल बेनके यांच्यात अटीतटीची लढत झाली… पण यावेळेस लोकसभेचं लीड विधानसभेला कायम राहत आमदार झाले ते अतुल बेनके… मतदारसंघात राष्ट्रवादीला पुन्हा एकदा नवसंजीवनी मिळाली.. आमदार, खासदार घड्याळाचाच असल्याने जुन्नरमध्ये राष्ट्रवादीचा कार्यक्रम एकदम ओक्के असाच होता… पण राष्ट्रवादीत फूट पडली आणि पुन्हा एकदा जुन्नरमधील सत्तेचा सारा सारीपाट बिघडून गेला…
विद्यमान आमदार अतुल बेनके यांनी अजितदादांची वाट धरली.. पण असं असूनही राष्ट्रवादीत आलेल्या आढळरावांना त्यांना लोकसभेला लीड देता आलं नाही… याउलट जुन्नर मध्ये तुतारीला तब्बल 51 हजारांचं लीड मिळाल्याने बेनकेंच्या पायाखालची वाळू सरकलीय… त्यात विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगत असल्याने जुन्नरमध्ये तुतारी विरुद्ध घड्याळ असा अटीतटीचा संघर्ष पाहायला मिळू शकतो… सध्या अतुल बेनके यांनीच शरद पवारांची घेतलेली भेट आणि शरद पवार आणि अजितदादा एकत्र येण्याच्या चर्चेला फोडलेलं तोंड पाहता जुन्नरचं राजकारण चांगलंच गरमा गरमीचं झालंय… या सोबतच मोहित चव्हाण, अनंतराव चौगुले, तुषार थोरात हे शरद पवार गटाकडून तर उध्दव ठाकरे गटाकडून माजी आमदार बाळासाहेब दांगट आणि माऊली खंडाळे यांची नावं इच्छुकांच्या यादीत असल्यानं तिकीट वाटपापासून प्रत्यक्ष मतमोजणी पर्यंत जुन्नरमध्ये घासाघीस असेल, त्यात शरद सोनवणे यांची भूमिका नेमकी काय असेल? यावरही इथल्या राजकारणाला कलाटणी मिळू शकते… पण सध्यातरी तुतारीच्या चिन्हावर निवडणूक लढवेल, तो जुन्नरमध्ये प्लस मध्ये राहण्याची शक्यता आहे… त्यामुळे शरद पवार जुन्नर मध्ये कोणावर विश्वास टाकतात? ते पहावं लागेल…
मतदारसंघाच्या वैशिष्ट्यांबद्दल बोलायचं झालं तर तालुक्याचा अर्धा भाग डोंगरी तर अर्धा पठारी असल्याचं दिसतं… मतदारसंघातील शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याला असणारी आंतरराष्ट्रीय दर्जाची शिवसृष्टी हे जुन्नर मधील खास क इजीरून आकर्षणाचा मुद्दा आहे… शेतीच्या मुद्द्यावरून शेतकरी बांधव… तर मराठा आरक्षण आणि इतर प्रश्नांच्या आधारे इथला मराठा समाज हा शरद पवारांच्या पाठीशी इथे खंबीरपणे पाठीशी असल्याचं पाहायला मिळतं… त्यामुळे सत्यशील शेरकर जर इथून शरद पवार गटाकडून उमेदवार असतील तर स्टँडिंग आमदार अतुल बेनके यांच्यासाठी जिंकून येणं कठीण होऊन जाईल, असं मत राजकीय विश्लेषकही व्यक्त करतायत…त्यामुळे जुन्नर मध्ये सध्याच्या घडीला तरी आमदारकीची लढाई राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी असल्याने जुन्नरकरांचा कौल कोणत्या राष्ट्रवादीच्या पाठीशी राहतो? हे येत्या काळात पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे…बाकी तुम्हाला काय वाटतं? जुन्नरचा यंदाचा आमदार कोण आणि कोणत्या राष्ट्रवादीचा असेल? तुमचं पॉलिटिकल प्रिडक्शन आम्हाला कमेंट करून नक्की कळवा…
Cryopreservation Technique | या पृथ्वीवर जन्मलेल्या प्रत्येक जीवाचा मृत्यू हा कधी ना कधी होतच असतो मृत्यू हा एक निसर्गाचा नियम आहे. त्याचा जन्म झाला आहे त्याचे मृत्यू देखील होतच असतो. परंतु आजकाल मानवाने एवढी प्रगती केली आहे की, मृत व्यक्तीला पुन्हा एकदा जीवनच करण्याचे तंत्रज्ञान देखील मानवाने शोधून काढलेले आहे. सध्या असे एक तंत्रज्ञान विकसित झालेले आहे. ज्याच्या माध्यमातून मृत झालेला व्यक्ती भविष्यात जाऊन पुन्हा एकदा जिवंत होऊ शकतो. परंतु आता हे तंत्रज्ञान नेमके काय आहे आणि ते कसे काम करते याबद्दलची आपण माहिती जाणून घेऊया.
माणूस विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या सहाय्याने झपाट्याने प्रगती करताना दिसत आहेत. त्यामुळे आता मृत व्यक्तीला जिवंत करणे देखील सोपे झालेले आहेत. ज्या व्यक्तींना मृत्यूनंतर पुन्हा जिवंत व्हायचे आहे, त्यांचे मृतदेह हे क्रायोप्रीजर्वेशन (Cryopreservation Technique) या तंत्रज्ञानाने साठवून एका विशिष्ट टेंपरेचरला फ्रिज करून ठेवले जाते. या टेक्नॉलॉजी चा वापर करून संशोधकांनी मृत्यू झालेल्या व्यक्तीला पुन्हा एकदा जिवंत करण्याचे तंत्रज्ञान शोधून काढलेले आहे. परंतु हे अमलात कधी येईल याबद्दल कोणालाही माहीत नाही.
क्रायोप्रिझर्वेशन म्हणजे काय ? | Cryopreservation Technique
या प्रक्रियेमध्ये तुमचे शरीर सडण्यापासून रोखले जाते. यावर सगळ्या जैविक प्रक्रिया देखील थांबतात. यानंतर शरीराचे विटरीफिकेशन केले जाते. या प्रक्रियेत शरीरात असलेल्या रक्ताच्या जागी एका विशिष्ट प्रकारचे सोल्युशन सोडले जाते. त्यामुळे मृत व्यक्तीच्या शरीरात बर्फाच्या गती तयार होण्यापासून रोखले जाते. बर्फ गोठल्यामुळे शरीरातील पेशी आणि उतींचे नुकसान होऊ शकते त्यामुळे हे सगळे केले जाते. या प्रक्रियेत शरीराला मायनस – 960 ° तापमानात नेले जाते.
खर्च किती येतो ?
क्रायोफिजर्वेशन ही प्रक्रिया खूप महागडी आहे. यामध्ये फक्त मेंदू जपण्यासाठी 66 लाख रुपये खर्च आहे. तर संपूर्ण शरीरासाठी एक लाख 66 हजार रुपये एवढा खर्च येतो. हे पैसे अमेरिकेच्या अल्कोहोल लाईफ एक्सटेंशन फाउंडेशनचा आहे. जो एक जीवन ट्रस्ट देखील चालवतो. ज्यांना पुन्हा जिवंत व्हायचे आहे. त्यांच्यासाठी हे पैशाचे व्यवस्थापन केले जाते या पैशातून शरीराची काळजी घेतली जाते.
Dark Oxygen | हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन अनेक लोकांना समुद्र खूप आवडतो. अत्यंत अथांग आणि शांत वाटणारा हा समुद्र आतून मात्र खूपच भयावह रूप दाखवतो. समुद्रबाबत नेहमीच सगळ्यांना कुतहूल असते. आपल्या समुद्रात नक्की काय आहे? अनेक वेळा असे म्हटले जाते की, समुद्राच्या तळाशी एक वेगळे जग निर्माण होते. किंवा याव्यतिरिक्त ही अनेक अफवा आतापर्यंत पसरवला गेलेले आहेत. परंतु आता शास्त्रज्ञांना पहिल्यांदा समुद्राच्या तळाशी डार्क ऑक्सिजन सापडलेला आहे. म्हणजेच हा ऑक्सिजन सूर्यप्रकाश आणि प्रकाश संश्लेषणाशिवाय तयार होत आहे. सूर्यप्रकाशाची किरणे ही समुद्राच्या तळापर्यंत पोहोचत नाही. आणि त्यामुळे त्याला डार्क ऑक्सिजन (Dark Oxygen) असे म्हणतात. हे धातूचे गोळे तयार केले जात आहे. या जागेचा शोध लागल्यानंतर शास्त्रज्ञांना आश्चर्य झालेले आहे. .
आत्या शास्त्रज्ञांनी आतापर्यंत अनेक शोध लावलेले आहे. परंतु पहिल्यांदाच समुद्राच्या तळाशी त्यांना डार्क ऑक्सिजन (Dark Oxygen) सापडलेला आहे. शास्त्रज्ञाना उत्तर पॅसिफिक महासागराच्या क्लेरियन क्लिप रिटर्न झोनमध्ये धातूचे छोटे नोड्यूल म्हणजे छोटे गोळे सापडलेले आहे. यामध्ये हे गोळे स्वतः ऑक्सिजन तयार करतात. ज्याला शास्त्रज्ञांनी डार्क ऑक्सिजन असे नाव दिलेले आहे. शास्त्रज्ञांना सापडलेले हे धातूचे गोळे एका बटाट्याच्या आकाराप्रमाणे आहेत जे संपूर्ण अंधार असताना देखील ऑक्सिजन तयार करू शकतात.
शास्त्रज्ञांनी केलेल्या पुढील अभ्यासानुसार असे आढळून आलेले आहे की, हे धातूचे गोळे इलेक्ट्रोलिसिस द्वारे ऑक्सिजन तयार करतात. म्हणजेच इलेक्ट्रिक उपस्थितीत ऑक्सिजन आणि हायड्रोजन तयार होतो. क्लेरियन clipritten झोनमध्ये समुद्राच्या आत काही मैदानी आहेत. हे हवाई आणि मिस्की को दरम्यान सुमारे 45 लाख चौरस किलोमीटर पर्यंत पसरलेले दिसत आहे. आणि समुद्राच्या तळाशी ऑक्सिजन हळूहळू कमी होत आहे. कारण या ठिकाणी प्रकाश संश्लेषण ही प्रक्रिया घडत नाही समुद्राच्या तळापर्यंत सूर्यप्रकाश न पोहोचल्याने अनेक जीव देखील या ठिकाणी जगत नाही. परंतु या गाठी आता डार्क ऑक्सिजन तयार करत आहेत.
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर पुन्हा एकदा गंभीर आणि खळबळजनक आरोप केला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याशी अत्यंत जवळचे संबंध असलेला समित कदम नावाचा व्यक्ती मी गृहमंत्री असताना माझ्या घरी आला आणि त्याने माझ्यकडे इन्व्हलप दिले. त्यामध्ये काही प्रतिज्ञापत्रावर सही करण्यास सांगितलं. मी जर सही केली असती तर उद्धव ठाकरे अडचणीत आले असते आणि आदित्य ठाकरे जेलमध्ये असते मात्र मी सही केली नाही असा गौप्यस्फोट अनिल देशमुख यांनी केला. देशमुखांच्या या आरोपांनी फडणवीसांचा पाय खोलात जाण्याची शक्यता आहे.
अनिल देशमुख यांनी आज पत्रकार परिषद घेत अनेक महत्वाचे खुलासे केले. यावेळी त्यांनी समित कदम आणि देवेंद्र फडणवीस यांचे काही फोटो सुद्धा मीडियासमोर आणले. समित कदम हा देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचा माणूस आहे. त्यामुळेच समित कदम साधा नगरसेवक नसतानाही त्याला Y दर्जाची सुरक्षा देण्यात देण्यात आली आहे. असं अनिल देशमुख म्हणाले. मी राज्याचा गृहमंत्री असताना समित कदम हा ५ ते ६ वेळा मला भेटायला आला होता, लिफाफा घेऊन तो माझ्याकडे आला होता. त्यातील प्रतिज्ञापदावर मला स्वाक्षरी करण्यासाठी दबाव टाकला जात होता. मी जर तेव्हा सही केली असती तर विनाकारण उद्धव ठाकरे हे प्रचंड अडचणीत आले असते आणि आदित्य ठाकरे तर जेलमध्ये गेले असते. ठाकरे सरकार सुद्धा तेव्हाच कोसळलं असते. मात्र मी दबावाला बळी न पडता सही केली नाही. राजकीय नेत्यांच्या मुलाला खोट्या आरोपात अडकवता येईल याप्रकारचा प्रयत्न ३ वर्षापूर्वी देवेंद्र फडणवीसांनी केला असं त्यांनी सांगितले.
एकतर जेलमध्ये जा, नाहीतर भाजपात या असं यांचे धोरण होते. माझ्यावर पहिला प्रयोग करण्यात आला तो यशस्वी झाला नाही म्हणून दुसरा प्रयोग एकनाथ शिंदेंवर केला तो यशस्वी झाला. तिसरा प्रयोग अजित पवारांवर आणि तो यशस्वी झाला असं अनिल देशमुख यांनी म्हंटल. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला कितीही धमक्या दिल्या तरी आपण घाबरत नाही. बात निकलेगी तो दूर तक जायेगी, सर्वकाही हळूहळू बाहेर येईल. मी योग्य वेळी सर्व बाहेर काढेन, मी घाबरत नाही असा इशारा अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस याना दिला.
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आपली पृथ्वी निसर्गाने नटलेली आहे. अनेक ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी पाहायला मिळतात. निसर्गात अनेक चमत्कारिक गोष्टी पाहून नागरिकांना नेहमीच आनंदाने कुतुहूल देखील वाटत असते. त्यामुळे पृथ्वीचे अवकाशातून काढलेले असे कितीतरी व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. परंतु सध्या नासाने एक पृथ्वीचा व्हिडिओ शेअर केला आहे. जो पाहून सगळ्यांनाच धडकी भरलेली दिसत आहे. नासाला भारतासह काही देशांवरील आकाशात असं काही दिसले आहे की, ज्यामुळे अनेकांना भीती वाटू लागलेली आहे.
यावेळी नासाच्या सायंटिफिक विजेलायझेशन स्टुडिओने गोदार्ड अर्थ मॉनिटरी सिस्टीमचा वापर करून एक नकाशा तयार केलेला आहे. हे एक उच्च रिझल्ट हवामान मॉडेल आहे. ते सुपर कम्प्युटरद्वारे तयार केले जाते. या मॉडेलचा वापर वातावरणात नक्की काय बदल घडत आहे? याबद्दल सांगण्यात आलेले आहे. याद्वारे जमिनीवरील निरीक्षण आणि उपग्रह साधनांमधून आपल्याला अनेक डेटा पाहता येतो.
आपल्या पृथ्वीमध्ये खूप सूक्ष्म बदल घडत असतात आणि ते अगदी काही सेकंदात घडतात. या सगळ्या हालचाली तुम्हाला या मॉडेल द्वारे पाहता येतील पृथ्वीवर एका सेकंदात किती वेळा वीज कोसळते? त्याचप्रमाणे वातावरणातील कार्बन डाय-ऑक्साइडच्या हालचाली या सगळ्याचे निरीक्षण या मॉडेल द्वारे केले जाते.
शास्त्रज्ञांनी काय पाहिले ?
नासाने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये ब्राऊन रंगाचे ढग फिरताना दिसत आहेत. हे ढग अत्यंत वेगाने पसरत आहे. भारतासह इतर अनेक देशांमध्ये हे ढग फिरताना दिसले. हे ढग म्हणजे कार्बन-ऑक्साइडचा वायू आहे. जो पृथ्वीवर भयानक पद्धतीने पसरताना दिसत आहे.
कार्बन डाय-ऑक्साइड कुठून आला ?
सध्या भारतासह जगभरात मोठ्या प्रमाणात औद्योगिकीकरण होत आहे. यामध्ये चीन युनायटेड स्टेट्स दक्षिण आशियामध्ये सर्जन पॉवर प्लांट्स त्याचप्रमाणे अनेक औद्योगिक सुविधा आणि कार आणि ट्रक मधून होते या ठिकाणी उत्सर्जन मोठ्या प्रमाणात आगीमुळे होते. आणि या आगीतून कार्बन-डाय-ऑक्साइड बाहेर पडतो. आणि या कार्बन-डाय-ऑक्साइडमुळेच आपल्याला आकाशात असे ढग तयार झालेले दिसत आहे.
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी मणिपूरमधील घटनांप्रमाणे महाराष्ट्रातही अशांततेची भीती व्यक्त केली आहे. मणिपूरमध्ये सामाजिक अशांतता झाल्यानंतर पंतप्रधानांना आपण तिकडे चक्कर टाकावी, लोकांना दिलासा द्यावा असे कधी वाटले नाही. आजूबाजूच्या राज्यांतही हे घडले. खाली कर्नाटकातही घडले. अलीकडच्या काळातही महाराष्ट्रात काही घडेल की काय, अशी चिंता शरद पवारांनी व्यक्त केली. नवी मुंबईतील वाशी येथे आयोजित ‘सामाजिक एकता परिषदे’च्या कार्यक्रमात ते बोलत होते.
शरद पवार म्हणाले, माझ्याशी कोणाच्यातरी संभाषणात मणिपूरचा उल्लेख झाला. त्यावर देशाच्या संसदेतही चर्चा झाली. मणिपूरचे विविध जाती, धर्म, भाषांचे लोक आम्हाला भेटायला दिल्लीत आले. हे चित्र काय सांगतं? पिढ्यानपिढ्या एकसंध असलेला प्रांत अशांत झाला, घरे पेटवली गेली. पिढ्यानपिढ्या एकत्र राहून सौहार्द जपणारे मणिपुरी आज एकमेकांशी बोलायला तयार नाहीत. आज एवढं मोठं संकट राज्यावर आलेलं असताना त्याची काळजी घेण्याची जबाबदारी राज्यकर्त्यांची आहे.पण दुर्दैवाने आजच्या राज्यकर्त्यांनी याकडे ढुंकूनही पाहिले नाही असं म्हणत पवारांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला.
शरद पवार पुढे म्हणाले, आज जे काही घडले, त्यानंतर देशाच्या पंतप्रधानांनी तिथे जाऊन जनतेला दिलासा द्यावा, असे त्यांना कधीच वाटले नाही. हा प्रकार मणिपूरमध्ये घडला. शेजारील राज्यांमध्येही असेच घडले. कर्नाटकातही तेच दिसले आणि अलीकडच्या काळात महाराष्ट्रातही असेच घडण्याची भीती व्यक्त होत आहे त्यामुळे जात, धर्म, भाषा याच्या पलीकडे जाऊन एकसंघ राष्ट्र निर्माणासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज आहे, चांगली गोष्ट म्हणजे महाराष्ट्राला समरसतेची आणि समतेची दिशा देणाऱ्या अनेक दिग्गजांचा वारसा आहे.”असे शरद पवार यांनी म्हंटल.
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकनाथ शिंदे यांच्या महायुती सरकारने राज्यातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना दर महिन्याला १५०० रुपयांची आर्थिक मदत केली जाणार आहे. मात्र दुसरीकडे याच महाराष्ट्रात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न चिंतेचा विषय बनला आहे. गेल्या महिनाभरात नवी मुंबई आणि पनवेल-उरण परिसरात दोन महिलांचे निर्घृण खून झालेत. उरणमधील येथील 22 वर्षीय तरूणी यशश्री शिंदे 25 जुलै रोजी बेपत्ता झाली होती. तिचा शोध सुरू असतानाच तिचा छन्नविछिन्न झालेला मृतदेह सापडला. यावरून मनसेचे प्रवक्ते योगेश चिले यांनी सरकारवर निशाणा साधत राज्यातील महिलांना लाडक्या बहीण योजनेची नव्हे तर सुरक्षित बहीण योजनेची गरज अधिक आहे.त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आवश्यक ती पावलं उचलली पाहिजेत, असं म्हटलं आहे.
योगेश चिले यांनी ट्विटरवर एक विडिओ शेअर करत म्हंटल, गेल्या महिनाभरात नवी मुंबई आणि पनवेल-उरण परिसरात दोन बहिणींचे निर्घृण खून झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वत:ला धर्मवीर आनंद दिघे साहेबांचे शिष्य म्हणवतात. त्यांनी धर्मवीर-1 आणि धर्मवीर-2 असे दोन चित्रपट काढले. या दोन्ही चित्रपटात धर्मवीर आनंद दिघे यांच्या दोन्ही हातात राखी भरल्याचे दाखवण्यात आले आहे. उद्देश एकच की, आनंद दिघे साहेब कशाप्रकारे बहिणींचे रक्षण करायचे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तु्म्ही आनंद दिघे यांचे शिष्य आहात. तुम्ही राज्यातील बहिणींसाठी लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Scheme) आणली. या योजनेतून बहिणींना महिन्याला 1500 रुपयांचे आर्थिक सहाय्य मिळेल. पण तुमच्या या लाडक्या बहिणींना महिन्याला 1500 रुपयांची गरज नाही. त्या पैसे कमावू शकतात. फक्त त्या जिथे पैसे कमवायला जातात, जिथे नोकरी करतात, जिथे शिक्षण घ्यायला जातात, तिथे त्या सुरक्षित असल्या पाहिजेत. ती सुरक्षा तुम्ही दिली पाहिजे. त्यांना लाडकी बहीण योजनेची नव्हे तर सुरक्षित बहीण योजनेची गरज आहे. त्यासाठी तुम्ही काय पावलं उचलणार, हे महाराष्ट्र पाहणार आहे, असे योगेश चिले यांनी व्हीडिओत म्हटले आहे.
— Yogesh J Chile (योगेश चिले) (@chileyog) July 28, 2024
दरम्यान, उरणमधील येथील 22 वर्षीय तरूणी यशश्री शिंदे 25 जुलै रोजी बेपत्ता झाली होती. तिचा शोध सुरू असतानाच तिचा छन्नविछिन्न झालेला मृतदेह सापडला. आरोपीने यशश्रीच्या चेहऱ्यावर,शरीरावर आणि गुप्तांगावर धारदार शास्त्राने वार करून तिची निर्घृण हत्या केली होती. रक्ताच्या थारोळ्यात मुलीचा मृतदेह पडला असून कुत्रे तिच्या शरीराचा चावा घेत होते. कुत्र्यांमुळे मुलीचा चेहरा विद्रुप झाला होता. तिच्या मासं देखील कुत्र्यांने खाल्ले होते. तिच्या चेहऱ्यावर,शरीरावर आणि गुप्तांगावर वार होते. यशश्रीच्या वडिलांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात दाऊद शेख नावाच्या व्यक्तीवर हत्या केल्याचा आरोप केला आहे.