Sunday, December 21, 2025
Home Blog Page 567

Indian Railways : गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी रेल्वेचा मास्टर प्लॅन; खुद्द रेल्वे मंत्र्यांनी दिली माहिती

Indian Railways : आपल्याला माहितीच आहे की रेल्वेने प्रवास करणारा एक मोठा वर्ग भारतात आहे. त्यातही लोकल जनरल डब्ब्यात प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. सध्या भारतीय रेल्वेवर गाड्यांमध्ये एसी कोचच जास्त असल्याचा आरोप होत आहे. या आरोपावर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी भारतीय रेल्वे यावर्षी १० हजार नॉन-एसी डबे तयार करत असल्याचे म्हंटले (Indian Railways) आहे. त्यामुळे नॉन एसी डब्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी राज्यसभेत खासदार हरिस बिरन यांच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले की, भारतीय रेल्वे जास्तीत जास्त नॉन-एसी कोच वापरत आहे. हरीस बिरन यांनी गाड्यांमध्ये गर्दी होत आहे का असा सवाल केला (Indian Railways) होता. या आव्हानाचा सामना करण्यासाठी सरकार काय पावले उचलत आहे? तसेच नॉन एसी गाड्यांची संख्या कमी केली जात आहे का? असा सवाल त्यांनी केला होता.

या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री वैष्णव यांनी सांगितले की, कोविड 19 मुळे 2019 ते 2024 दरम्यान प्रवासी वाहतुकीत मोठा बदल झाला आहे. भारतीय रेल्वे प्रवाशांच्या गरजेनुसार वेगवेगळ्या प्रकारच्या गाड्या चालवत आहे. वंदे भारत एक्सप्रेससोबत आम्ही अमृत भारत एक्सप्रेस देखील चालवली आहे. अमृत ​​भारत ही नॉन एसी ट्रेन आहे. याद्वारे रेल्वेने प्रवाशांना उच्च दर्जाची सेवा (Indian Railways) दिली आहे.

रेल्वेमंत्र्यांनी सांगितले की, गर्दीवर नियंत्रण (Indian Railways) ठेवण्यासाठी, सण, सुट्टी आणि पीक सीझनमध्ये मागणी वाढते तेव्हा रेल्वे विशेष गाड्या चालवते.याशिवाय गाड्यांची क्षमताही वाढवली जात आहे. भारतीय रेल्वे सध्या सुमारे 10 हजार नॉन-एसी जनरल क्लास आणि स्लीपर क्लास डबे तयार करत आहे.असे त्यांनी सांगितले.

कमळाच्या आकाराचं चक्रव्यूह, त्यात 6 लोकं; राहुल गांधींनी नावे घेताच सभागृहात गदारोळ

rahul gandhi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी आज सभागृहात जोरदार बॅटिंग केली. देशातील शेतकरी, पेपर लीक, देशातील दहशतीचं सावट, बजेट आणि टॅक्सबाबत विविध मुद्द्यांवरून मोदी सरकारला राहुल गांधींनी अक्षरशः धारेवर धरले. यावेळी राहुल गांधी यांनी महाभारतातील चक्रव्यूहचा उल्लेख करत मोदींवर निशाणा साधला. चक्रव्यूव्ह कमळाच्या आकाराचं होते, आणि पंतप्रधान मोदी आज ते चक्रव्यूव्ह छातीला लावून फिरतात असं म्हणत राहुल गांधींनी आणखी ६ लोकांची नावे घेतली आणि सभागृहात एकच गदारोळ पाहायला मिळाला.

राहुल गांधी नेमकं काय म्हणाले?

चक्रव्यूहमध्ये भीती, हिंसा असते, अभिमन्यूला चक्रव्यूहामध्ये फसवत 6 लोकांनी मारलं. चक्रव्यूहाचं दुसरं नावही आहे ते म्हणजे पद्मव्यूह म्हणजेच लोटस फॉरमेशन. यामधलं चक्रव्यूह हे कमळाच्या आकाराचं असतं. २१ व्या शतकात नवं चक्रव्यूह असून कमळाच्या आकाराचे आहे. त्याचं चित्र पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या छातीवर लावून चालतात. ज्या चक्रव्यूहात अभिमन्यूला अडकवलं होतं. तिथे आता देशातील जनता आहे. देशातील युवा, शेतकरी, माता-भगिनी, लघु-मध्यम उद्योजक हे त्या चक्रव्यूहात अडकले आहेत. महाभारतातील चक्रव्यूहात ६ जण होते, द्रोणाचार्य, कर्ण, कृपाचार्य, क्रूतवर्मा, अश्वधामा आणि शकुनी नियंत्रित करत होते. आजही ६ लोक आहेत ज्यात नरेंद्र मोदी, अमित शाह, मोहन भागवत, अजित डोवाल आणि अंबानी-अदानी आहेत असा आरोप राहुल गांधींनी केला.

राहुल गांधीही या व्यक्तींची नावे घेताच सभागृहात गोंधळ पाहायला मिळाला. यांनतर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सर्वांना शांत करण्याचा प्रयत्न केला.तसेच जी लोकं सभागृहाची सदस्य नाहीत त्यांची नावे घेऊ नका, असं ओम बिर्ला म्हणाले. त्यावर मी त्यांना A1, A2 बोलू शकतो का? असा उलट सवाल राहुल गांधींनी केला आणि सभागृहात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात गोंधळ उडाला

PDEA Bharti 2024 | पुणे जिल्हा शिक्षण मंडळात 160 रिक्त पदांसाठी नोकरीची मोठी संधी; असा करा अर्ज

PDEA Bharti 2024

PDEA Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही नेहमीच नोकरीच्या विविध संधी घेऊन येत असतो. आज देखील आम्ही अशीच एक संधी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता पुणे जिल्हा शिक्षण मंडळ पुणे अंतर्गत (PDEA Bharti 2024) एक मोठी भरती निघालेली आहे. या भरती अंतर्गत सहाय्यक प्राध्यापक या पदासाठी जागा आहे. या पदाच्या एकूण 160 रिक्त जागा आहे. त्यांच्या भरण्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. ही भरती ऑनलाईन पद्धतीने होणार आहेत. त्याचप्रमाणे 2 ऑगस्ट 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे उमेदवारांनी लवकरात लवकर या भरतीचा अर्ज करत आहे. भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.

महत्वाची माहिती | PDEA Bharti 2024

  • पदाचे नाव –सहायक प्राध्यापक
  • पद संख्या – 160 जागा
  • नोकरी ठिकाण –पुणे
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • मुलाखतीचा पत्ता – पुणे जिल्हा शिक्षण संघ, मुख्य कार्यालय
  • मुलाखतीची तारीख – 02 ऑगस्ट 2024

अर्ज कसा करावा ? | PDEA Bharti 2024

  • या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करावा लागेल.
  • तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून देखील अर्ज करू शकता
  • अर्ज करण्यापूर्वी पीडीएफ जाहिरात सविस्तर वाचा
  • 2 ऑगस्ट 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा

पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Seafood Export | भारतातून होणार एवढ्या सागरी खाद्यपदार्थांची निर्यात; अर्थसंकल्पात केली मोठी घोषणा

Seafood Export

Seafood Export | आपल्या भारताला सगळ्यात जास्त समुद्रकिनारा लाभल्याने आपल्याकडे सीफूडची देखील मोठ्या प्रमाणात उत्पत्ती होते. सी फूड भारताबरोबर बाहेरच्या देशात देखील मोठ्या प्रमाणात निर्यात केली जाते. यावर्षी निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी कोळंबी शेती आणि विपणनासाठी सरकार वित्तपुरवठा करण्यात असल्याचे देखील सांगितलेले आहे. त्यामुळे आता सरकारने या कोळंबीवरील सीमा शुल्क हे पाच टक्के एवढे लावलेले आहे. सागरी खाद्यपदार्थाची आपल्या देशातून जास्त प्रमाणात निर्यात होते. ही निर्यात 17.54 एवढी होती. ती आता 18.19 लाख टन एवढी झालेली आहे. महाराष्ट्रातून तब्बल एक लाख 70 हजार 75 टनांची निर्यात होत आहे.

यावर्षी सागरी खाद्यपदार्थांची (Seafood Export) निर्याती करण्यासाठी आता मालवाहतुकीच्या खर्चात देखील मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. महाराष्ट्राला तब्बल 720 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे. त्यामुळे सागरी खाद्यपदार्थ त्यांची निर्यात वाढल्याचे देखील वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने सांगितलेले आहे. त्यामुळे सीफूड निर्यात करण्यासाठी अनेक आव्हाने येत होती. परंतु या सगळ्या आव्हानांना मात देऊन आता सीफुडने निर्यात उच्चांक बांधलेला आहे. भारताला 811 किलोमीटर पेक्षा जास्त लांबीचा समुद्रकिनारा आहे. त्यामुळे भारतातील सगळ्यात जास्त निर्यात केली जाते.

दरवर्षी भारतातून जगभरात तब्बल 13, 77,284 टन सी फूड निर्यात (Seafood Export) केली जाते. यामध्ये आशिया, मध्यपूर्व यूएसए युकेजी, आणि युरोपीय देश आहेत. ज्यामध्ये सी फूडची निर्यात केली जाते. त्याचप्रमाणे महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक तमिळनाडू, आंध्र प्रदेश, केरळ आणि गुजरात या भारतातील प्रमुख राज्यांमध्ये सी फूडचे उत्पादन घेतले जाते. त्यामुळे सी फूड आपल्या निर्यात उद्योग देशाच्या अर्थव्यवस्थेत सुमारे 40 टक्के एवढे योगदान आहे

पुणे बरबाद व्हायला वेळ लागणार नाही, पूरस्थितीवरून राज ठाकरेंचा सरकारवर संताप

raj thackeray pune rain (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मागील ४ दिवसात मुसळधार पावसामुळे पुणे शहरात अगदी भीषण परिस्थिती निर्माण झाली होती. अनेक सखल भागात पाणी साचल्याने सर्वसामान्य माणसाचे जीवन विस्कळीत झालं होते. याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यातील एकूण परिस्थितीची पाहणी करण्यासाठी पुण्याचा दौरा केला. यानंतर राज ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील महायुती सरकारवर संताप व्यक्त केला. जर कोणतीही पूर्वसूचना न देता जर पाणी सोडलं असेल आणि यामुळे जर नुकसान झालं असेल तर मग राज्य सरकारने यात लक्ष देणे गरजेचे आहे असं राज ठाकरे यांनी म्हंटल.

राज ठाकरे म्हणाले, मी गेल्या अनेक वर्षांपासून सांगतो की मुंबई बरबाद व्हायला वेळ लागला. पुणे बरबाद व्हायला वेळ लागणार नाही. त्याचेच हे सर्व चित्र आहे. राज्य सरकारकडून प्रत्येक वेळेला डेव्हलपमेंट प्लॅन येतो. पण टाऊन प्लॅनिंग नावाची काहीही गोष्ट नसते. किती गाड्या येतात, किती विद्यार्थी येतात, लोक राहणार कसे याचं काहीही प्लॅनिंग नसतं. त्यामुळे ही शहर अशीच नष्ट होत जाणार, हे कधीही थांबणार नाही. केवळ एका अधिकाऱ्याने निलंबन करुन हा प्रश्न सुटणार नाही असं राज ठाकरे यांनी म्हंटल. राज्य सरकार, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना स्वतः लक्ष घालावं लागणार आहे. माजी नगरसेवकांनी नीट जाणीवपूर्वक लक्ष दिले पाहिजे. आपापसातले हेवेदावे बाजूला ठेवून सर्व राजकीय पक्षांनी एकत्र बसले तर हा प्रश्न सुटेल. कोण्या एकट्या पक्षाच हे काम नाही.

अजित पवारांना टोला –

यावेळी राज ठाकरेंनी उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनाही टोला लगावला. ज्यात दोन उपमुख्यमंत्री आहेत, एक तर पुण्यातीलच आहेत. ते या ठिकाणी नसतानाही धरणातून पाणी वाहिलंय. त्यांनी याच्यामध्ये लक्ष घालायला नको का? असा टोला राज ठाकरेंनी अजितदादांना लगावला. गेले दोन तीन वर्ष केंद्र सरकार महापालिकेच्या निवडणुका घेत नाही. इथे नगरसेवक नाही. निवडणुका लागतील तेव्हा आमदारांबद्दल ठरवलं जाईल. त्यामुळे ही जबाबदारी घेणार कोण, प्रशासनाशी बोलायचं कोणी? असे एकामागून एक सवाल राज ठाकरेंनी केले. तसेच पुण्यातील एकूण परिस्थितीवरून चिंता व्यक्त केली.

Ola Electric IPO : ठरलं तर!! या दिवशी येणार Ola Electric चा IPO; पहा प्राईज बँडसह संपूर्ण डिटेल्स

Ola Electric IPO

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इलेक्ट्रिक टू-व्हीलर मार्केटमधील आघाडीची कंपनी असलेली OLA इलेक्ट्रिक चा IPO सबस्क्रिप्शनसाठी (Ola Electric IPO) लवकरच खुला होणार आहे. कंपनीने या IPO च्या प्राईज बँडसह इतर महत्त्वाचे डिटेल्स समोर आणलेत. 2 ऑगस्ट ते 6 ऑगस्ट दरम्यान ओला इलेक्ट्रिकच्या आयपीओ साठी बोली लावण्यात येणार असून या आयपीओचा प्राईज बँड 72-76 रुपये प्रति शेअर असेल तर IPO चा फेस व्हॅल्यू 10 रुपये असेल. या आयपीओच्या माध्यमातून कंपनी सुमारे ६ हजार कोटी रुपये उभारण्याचा विचार करत आहे.

Ola Electric IPO चा प्राइस बँड 72 ते 76 रुपये निश्चित करण्यात आला असून या प्राइस बँडनुसार कंपनीचे मूल्यांकन ३३,५२२ कोटी रुपये असल्याचे दिसत आहे. या IPO मध्ये 5,500 कोटी रुपयांचा इश्यू जारी केला जाईल. तर ८.४९ कोटी इक्विटी शेअर्स ऑफर फॉर सेल (OFS) असतील. अँकर गुंतवणूकदार 1 ऑगस्ट 2024 रोजी IPO मध्ये बोली लावू शकतात. कंपनीने IPO चा लॉट साइज १९५ शेअर्सवर निश्चित केला आहे. याचा अर्थ गुंतवणूकदाराला किमान 195 इक्विटी शेअर्स घ्यावी लागतील. एकूणच काय तर तुम्हाला कमीत कमी एका लॉटसाठी 14,820 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. ओला इलेक्ट्रिक मोबिलिटी ही पहिली भारतीय इलेक्ट्रिक वाहन कंपनी आहे जिचा IPO येत आहे.

ओला इलेक्ट्रिक IPO मध्ये काही भाग कर्मचाऱ्यांसाठी राखीव असेल. या अंतर्गत 5.5 कोटी रुपयांचे शेअर्स कर्मचाऱ्यांसाठी राखीव असतील. इश्यूमधील सुमारे 75 टक्के शेअर्स पात्र संस्थात्मक खरेदीदारांसाठी म्हणजे QIB साठी राखीव असतील. 15% हिस्सा गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी म्हणजे NII साठी राखीव असेल आणि उर्वरित 10% किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव असेल.

पहा संपूर्ण माहिती ? Ola Electric IPO

प्राइस बँड: 72 – 76 रुपये प्रति शेअर
लॉट साइज: 195 इक्विटी शेअर्स
IPO ओपन कधी होणार : 2 ऑगस्ट 2024
IPO बंद कधी होणार : 6 ऑगस्ट 2024
IPO चा फेस व्हॅल्यू : 10 रुपये

Mosaic Virus Disease | टोमॅटो पिकावर झपाट्याने पसरतोय हा धोकादायक विषाणू, ही आहेत लक्षणे

Mosaic Virus Disease

Mosaic Virus Disease | आपण सध्या भाज्यांच्या बाजारांमध्ये पाहिले, तर टोमॅटोची किंमत दिवसेंदिवस वाढलेली दिसत आहे. परंतु जे शेतकरी टोमॅटो करत आहेत, त्यांच्या टोमॅटोला काकडी मोझॅक विषाणू नावाचा एक रोग लागत आहे. आणि ही एक मोठी समस्या बनलेली आहे. या रोगामुळे टोमॅटोच्या लागवडीवर देखील मोठ्या प्रमाणात परिणाम होतो. आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक नुकसान देखील होते मागील काही वर्षापासून मध्यम प्रदेशातील बुरहान जिल्ह्यात आणि महाराष्ट्रातील जळगावमध्ये ही काकडी मोझॅक विषाणू (Mosaic Virus Disease) मोठ्या प्रमाणात समस्या बनत चाललेली आहे. आधी हा रोग कमी प्रमाणात होता परंतु आज काल या रोगाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले होत दिसत आहे. त्यामुळे हा रोग नक्की कसा होतो? याबद्दल शेतकऱ्यांना माहिती असणे खूप गरजेचे आहे. आता या पिकावर पडणाऱ्या रोगाची आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया.

काकडी मोझॅक व्हायरस रोग म्हणजे काय? | Mosaic Virus Disease

काकडी मोझॅक व्हायरस (CMV) हा एक वनस्पती रोगजनक आहे जो टोमॅटोसह वनस्पतींच्या विस्तृत श्रेणीवर परिणाम करतो. हा टोमॅटोचा सर्वात सामान्य आणि आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचा विषाणूजन्य रोग आहे. CMV मुळे उत्पन्नात लक्षणीय घट होते आणि टोमॅटोच्या फळांची गुणवत्ता कमी होते.

टोमॅटोमध्ये CMV मुळे होणाऱ्या रोगाची लक्षणे

CMV मुळे टोमॅटोच्या झाडांमध्ये विविध लक्षणे दिसतात, ज्यामध्ये पानांवर मोज़ेक पॅटर्न (हलके आणि गडद हिरवे डाग), पानांची विकृती, बौनेपणा आणि फळांचा आकार कमी होतो. टोमॅटोच्या प्रकारावर आणि सीएमव्हीच्या प्रकारानुसार लक्षणांची तीव्रता बदलू शकते.

टोमॅटोमध्ये सीएमव्ही रोग कसा पसरतो?

CMV प्रामुख्याने ऍफिड्सद्वारे पसरते, जे लहान कीटक आहेत जे वनस्पतींचे रस खातात. जेव्हा ऍफिड्स एखाद्या संक्रमित वनस्पतीवर खातात तेव्हा ते विषाणू प्राप्त करतात आणि नंतर ते फिरताना निरोगी वनस्पतींमध्ये प्रसारित करतात. CMV दूषित उपकरणे, वनस्पती रस आणि बियांद्वारे देखील पसरतो.

टोमॅटोमध्ये सीएमव्ही रोग कसे व्यवस्थापित करावे? | Mosaic Virus Disease

CMV साठी कोणताही उपचार नसल्यामुळे, व्यवस्थापन धोरणे प्रतिबंध आणि नियंत्रणावर लक्ष केंद्रित करतात. टोमॅटोमधील सीएमव्ही रोग प्रतिरोधक वाण यासारखे काही उपाय तुम्ही अवलंबू शकता.

Mhada Mumbai : खुशखबर ! म्हाडाकडून लवकरच 2 हजार घरांसाठी लॉटरी ; गोरेगाव सह ‘या’ घरांचा समावेश

Mhada Mumbai : प्रत्येकालाच आपलं हक्काचं घर असावं अशी इच्छा असते. मात्र सध्या घरांचे वाढलेले दर पाहता हे स्वप्न पूर्ण करणं म्हणजे एका चॅलेंज शिवाय काही कमी नाही. त्यातही पुणे, मुंबईसारख्या शहरांमध्ये स्वतःचे घर घ्यायचं म्हटलं तर लाखो करोडो रुपये मोजावे लागतात. त्यामुळे मध्यमवर्गीयांच्या स्वप्नांना बळ देण्याचं काम म्हाडाकडून केलं जातं. म्हाडा कडून परवडणाऱ्या किमतीमध्ये घरांची (Mhada Mumbai) उपलब्धता करून दिली जाते.

मुंबईच्या बाबतीत बोलायचे झाल्यास मुंबईमधल्या मोक्याच्या जागांवर म्हाडा घरं उपलब्ध करून देत आल्यामुळे म्हाडामधून मुंबईमध्ये घरं घेणाऱ्यांची संख्या मोठी असते. मुंबईकरांसाठी एक खुशखबर असून म्हाडा प्राधिकरण लवकरच दोन हजार घरांची लॉटरी (Mhada Mumbai) काढणार असून यामध्ये गोरेगाव, पवई आणि विक्रोळी येथील घरांचा यामध्ये समावेश असणार आहे. तर सर्वाधिक घरं ही गोरेगाव भागातील असणार असून या घरांच्या किमती या 34 लाखांपासून सुरू होतील अशी माहिती म्हाडाच्या सूत्रांकडून देण्यात आली आहे. यासाठीची जाहिरात लवकरच प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे.

असे असले तरी अद्याप या लॉटरीची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र सूत्रांच्या म्हणण्यानुसार विधानसभा निवडणुकीनंतर ही लॉटरी काढली जाणार असल्याची शक्यता अधिक आहे म्हाडाकडून (Mhada Mumbai) पूर्णपणे संगणकीकृत पद्धतीचा वापर केला जात असून पारदर्शकता यावी यासाठी एकात्मिक संगणकीय प्रणाली अंमलात आणण्यात आली आहे.

2023 मध्ये म्हाडा कडून गोरेगाव आणि विक्रोळी या दोन जागांसाठी सोडत काढण्यात आली होती. मात्र यंदाच्या (Mhada Mumbai) सोडती मध्ये उपलब्ध असणाऱ्या घरांमधून उरलेल्या घरांच्या बरोबरच इतरही ठिकाणच्या घरांचा समावेश असण्याची शक्यता आहे.

Gold Price Today : सोन्याची चमक वाढली, चांदीच्या किमतीही गगनाला; आजचे भाव जाणून घ्या

Gold Price Today 29 july

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काही दिवसांच्या घसरणी नंतर सोन्या- चांदीच्या किमतींनी (Gold Price Today) पुन्हा एकदा आघाडी घेतली आहे. भारतीय बाजारात सलग दुसऱ्या दिवशी सोने- चांदीचे भाव पुन्हा एकदा वाढलेले आहेत. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर २४ कॅरेट १० ग्राम सोने 68425 रुपयांवर व्यवहार करत असून आधीच्या तुलनेत या दरात 252 रुपयांची किरकोळ वाढ झाली आहे. तर चांदीच्या किमती सुद्धा 698 रुपयाची वाढल्या असून असून सध्या एक किलो चांदी 82180 रुपयांवर व्यवहार करत आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.

आज मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर २४ कॅरेट १० ग्राम सोन्याचा भाव ६८३७५ रुपयांपासून (Gold Price Today) सुरु झाला. मात्र थोड्याच वेळात या किंमत वाढत वाढत गेल्या. ९ वाजून १८ मिनिटांनी सोन्याचा भाव ६८५०१ रुपयांच्या उच्चांकी पातळीवर गेला. मात्र त्यानंतर सोन्याच्या दरात चढ उतार पाहायला मिळाले. सध्या १ तोळा सोने 68425 रुपयांवर व्यवहार करत आहे. तर गुड रिटर्न वेबसाईट नुसार, २२ कॅरेट १० ग्राम सोन्याचं दर ६३४०० रुपये आहे तर २४ कॅरेट सोने ६९१६० रुपये तोळा आहे. तुम्ही घरबसल्या मिस्ड कॉलद्वारे सुद्धा सोन्या-चांदीची किंमत तपासू शकता. 22 कॅरेट सोन्याचे आणि 18 कॅरेट सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी तुम्ही 8955664433 वर मिस कॉल करू शकता.

गुड रिटर्न नुसार सोन्याचा भाव – Gold Price Today

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)-

पुणे- 63,400 रुपये
मुंबई – 63,400 रुपये
नागपूर – 63,400 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)

पुणे- 69,160 रूपये
मुंबई – 69,160 रूपये
नागपूर – 69,160 रूपये

सोन्याची शुद्धता कशी तपासाल?

साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.

Airtel New Recharge Plan | Airtel ने आणला 365 दिवसांचा सगळ्यात स्वस्त रिचार्ज प्लॅन; एवढी आहे किंमत

Airtel New Recharge Plan

Airtel New Recharge Plan | एअरटेल ही आपल्या देशातील एक सगळ्यात मोठी टेलिकॉम कंपनी आहे. जवळपास अनेक लोक एअरटेलला पसंती देतात. airtel चे कितीतरी कोटी ग्राहक आहेत. परंतु नुकतेच काही टेलीकॉम कंपन्यांनी त्यांच्या रिचार्ज प्लॅनच्या किमती वाढवलेले आहेत. जिओ, एअरटेल आणि VI ने देखील त्यांच्या किमती वाढवलेल्या आहेत. 3 जुलै पासून नवीन नियम लागू झालेले आहेत. त्यामुळे त्यांच्या ग्राहकांचा देखील हिरमोड झालेला दिसत आहे.

परंतु रिचार्ज प्लॅनचे दर वाढल्यानंतर तुम्हाला वर्षभराचा प्लॅन अगदी कमी किमतीत करायचा असेल, तर यासाठी एअरटेलने खास प्लॅन लॉन्च केलेला आहे. एअरटेलच्या (Airtel New Recharge Plan) या प्लॅनची वैधता 365 दिवसांची असणार आहे. एअरटेलच्या कंपनीमध्ये इतर अनेकही प्लॅन्स आहेत. ज्यांची व्हॅलिडीटी 365 दिवसांची आहे. परंतु आम्ही ज्या प्लॅनची माहिती देणार आहोत, त्या प्लॅनची किंमत केवळ 1999 रुपये एवढी आहे. आणि तुम्हाला 365 दिवस याचा फायदा होऊ शकतो. यामध्ये तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंगची देखील सुविधा मिळत आहे. त्यामुळे ग्राहकांना कमीत कमी किमतीमध्ये जास्त लाभ मिळणार आहे.

तुम्ही कोणत्याही नेटवर्कवर तुम्हाला हवे तितक्या वेळ कॉलिंग करू शकता. त्याशिवाय तुम्हाला दररोज 100 एसएमएस देखील फ्री असणार आहे. त्याचप्रमाणे या वर्षभराच्या प्लॅनमध्ये तुम्हाला 24 जीबी डेटा मिळणार आहे. त्याचप्रमाणे या प्लॅनमध्ये तुम्ही अतिरिक्त डाटा देखील खरेदी करू शकता. ज्या ग्राहकांना अगदी कमी डेटा पाहिजे असतो. आणि जास्त कालावधी लागतो आणि कॉलिंगची सुविधा लागते. त्यांच्यासाठी हा अत्यंत चांगला प्लॅन आहे. या प्लॅनचा आणखी एक फायदा असा आहे की, यामध्ये युजरला सर्कलमध्ये तीन महिन्याच्या फ्री एक्सेस देखील मिळत असतो. तसेच युजर विंग आणि विंग म्यूजिकवर मोफत हॅलो टिन ची सुविधा मिळते.