Thursday, January 1, 2026
Home Blog Page 5682

कोरोनाचे निदान झालेल्या मुंबई महापालिकेच्या उपायुक्तांचे निधन 

मुंबई । मुंबई महापालिकेच्या विशेष अभियांत्रिकी विभागाचे उपायुक्त शिरीष दीक्षित यांचे निधन झाल्याचे समोर आले आहे. त्यांच्या माहीम येथील राहत्या घरी मध्यरात्री त्यांचे निधन झाल्याची माहिती मिळाली आहे. महापालिकेने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. शिरीष दीक्षित यांचे कोरोना चाचणीचे अहवाल सकारात्मक आले होते. मात्र त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप समजले नसून त्यांचा मृतदेह सायन रुग्णलयात नेण्यात आला आहे. ते ५५ वर्षाचे होते.

महत्वाची गोष्ट अशी समोर आली आहे, की दीक्षित सोमवारपर्यंत कामावर हजर होते.  ते पाणीपुरवठा खात्याचे प्रमुख होते तसेच त्यांच्याकडे विशेष अभियांत्रिकी विभागाची उपायुक्त पदाची अतिरिक्त जबाबदारी देखील होती.  १९८७ मध्ये त्यांनी त्यांचा कार्यकाळ सुरु झाला होता. त्यांनी आपल्या कार्यकाळात पाणीपुरवठा विषयक महत्वाचे प्रकल्प सुरु करण्यात महत्वाची भूमिका बजावली होती. तसेच कोरोना काळातही अनेक महत्वपूर्ण कामात ते सहभागी होते. कोरोनाच्या उपचारांसाठी एनएससीआय येथे उभारण्यात आलेल्या जम्बो फॅसिलिटी आणि रेस्को येथे तयार करण्यात आलेल्या विलगीकरण केंद्राच्या उभारणीत त्यांचा मोठा वाटा होता. याठिकाणी वेळोवेळी  भियांत्रिकी विषयक विविध बाबींची पूर्तता करण्‍यातही त्यांचा पुढाकार होता.

संचारबंदीच्या काळात मुंबई शहराला अविरत पाणीपुरवठा करण्‍याची जबाबदारी त्‍यांच्‍यावर असताना मनुष्यबळाचे आव्हान असूनदेखील त्यांनी ही जबाबदारी अगदी समर्थपणे पेलली होती. पाणीपुरवठा प्रकल्‍पांपैकी, मध्‍य वैतरणा प्रकल्‍पांतर्गत असणा-या भांडुप जलाशय, भांडुप जलप्रक्रि‍या केंद्र, उदंचन केंद्र प्रकल्‍प यासारखे अनेक प्रकल्‍प यशस्‍वीपणे राबविण्‍यात त्‍यांचा मोलाचा वाटा होता. गुंदवली ते भांडुप संकुलापर्यंतचा तब्‍बल १५ किलोमीटर लांबीचा जलबोगदा करण्‍यात आणि गारगाई प्रकल्‍पाला गती देण्‍यात त्‍यांचे मोठे योगदान होते. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पश्चात पत्नी आणि एक मुलगी असा परिवार आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

नवऱ्याच्या प्रेयसीला बायकोने झाडल्या गोळ्या; युटूबवरून घेतले प्रशिक्षण 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विवाहबाह्य संबंधांमुळे पती पत्नीमध्ये वाद झालेले, त्यांच्यामध्ये घटस्फोट झाल्याच्या, पतीने पत्नीचा खून केल्याच्या अनेक घटना यापूर्वी घडल्या आहेत. अशीच एक नाट्यमय आणि सिनेमाच्या कथेला साजेशी घटना उत्तरप्रदेशमधून समोर आली आहे. पत्नीने नवऱ्याच्या प्रेयसीचा तिच्याच घरी जाऊन तिच्यावर चार गोळ्या झाडून तिचा खून केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर ती निडरपणे हातात बंदूक घेऊन परिसरात फिरत होती अशी माहितीही समोर आली आहे.

उत्तरप्रदेशमधील मुरादाबाद मुहम्मद जफर याने शबाना हिच्याशी विवाह केला होता. त्यांना पाच मुले आहेत. शबानाला दीड वर्षांपूर्वी तिच्या नवऱ्याचे एका तरुणीशी अनैतिक संबंध असल्याचे समजले होते. त्यानंतर तिने वारंवार आपल्या पतीला तिच्यापासून दूर राहण्यास आणि संबंध तोडण्यास सांगितले होते. मात्र त्याने तिचे ऐकले नाही. जेव्हा शबानाला आपल्या पतीची प्रेयसी गरोदर असल्याचे समजले तेव्हा तिने तिला मारण्याचे नियोजन केले. काही दिवसांपूर्वी तिच्या नवऱ्याने घरात चोरी झाली होती म्हणून संरक्षणासाठी तिला बंदूक आणून दिली होती. तिने त्याच बंदुकीचा वापर करत त्याच्या प्रेयसीचा खून केला.

शबानाने युट्युब वरून बंदूक चालविण्याचे प्रशिक्षण घेतले. तिने घरी सरावही केला. आणि पतीच्या प्रेयसीच्या घरी जाऊन हे कृत्य केले. सर्वप्रथम तिने तिला घराबाहेर बोलावले. तिच्यावर चार गोळ्या झाडल्या आणि निडरपणे परिसरात फिरत राहिली. स्थानिकांनी पोलिसांना कळवले असता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तिला अटक केले दरम्यान तरुणीला रुग्णालयात नेत असताना तिचा मृत्यू झाला. ही तरुणी बिजनौरमधील नूरपूर येथे राहत होती. तिचे लग्नही झाले होते तसेच पतीशी वाद झाल्याने ती वेगळीकडे राहत होती अशी माहिती मिळाली असून या तरुणीला अनेक जण वेगवेगळ्या नावाने ओळखत असल्याची माहिती मिळाली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

लक्षणे नसलेल्या लोकांकडून कोरोनाचा संसर्ग नाहीच; जागतिक आरोग्य संघटनेचं स्पष्टीकरण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जागतिक आरोग्य संघटनेच्या कोरोना विषाणूच्या प्रतिक्रियांसाठीच्या तांत्रिक प्रमुख आणि उदयोन्मुख रोग (इमर्जिंग डिसीज) च्या प्रमुख Maria Van kerkhove यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की कोणतीही लक्षणे नसणाऱ्या लोकांकडून कोरोना विषाणूचे संक्रमण झाल्याच्या घटना दुर्मिळ आहेत. विविध देशांच्या सतत संपर्कात राहून आम्ही ही माहिती मिळविली असल्याचे त्यांनी सांगितले. असे काही देश आहेत जे अगदी तपशिलात जाऊन काम करत आहेत. त्यांच्याकडून कोणतीच लक्षणे नसणाऱ्या लोकांच्या संपर्कात आलेल्या लोकांची माहिती आम्ही घेत आहोत मात्र अशा व्यक्तींकडून दुसऱ्या व्यक्तीला संक्रमण झाल्याचे  फारसे दिसून आले नाही असे त्यांनी सांगितले.

लक्षणे नसणाऱ्या रुग्णांचे सर्व संपर्क तपासण्याचे काम काही देश करत आहेत. आम्ही त्या सर्व डाट्यावर खूप लक्षपूर्वक काम करत आहोत. मात्र अद्याप अशा व्यक्तींमुळे दुसऱ्या कोणाला विषाणू संक्रमण झाले नसल्याचे समोर आले आहे. हे खूपच दुर्मिळ आहे. अशी माहिती त्यांनी दिली आहे. लक्षणे नसणाऱ्या रुग्णांपर्यंत जाऊन आम्ही माहिती घेतली असता त्यांना कोणतीच लक्षणे नव्हती काहीतरी सौम्य आजार होते हे दिसून आले असे त्यांनी सांगितले. त्यांना अद्याप ताप आला नव्हता, त्यांना कोणत्याच प्रकारची सर्दी झाली नव्हती अगदी श्वास घेण्यातही त्रास होत नव्हता. पण काहींना सौम्य आजार होते. असे काही रुग्ण सापडले आहेत ज्यांना ठराविक लक्षणे दिसून आली नाहीत पण सौम्य आजार होते.

 

एप्रिल महिन्याच्या एका अभ्यासात असे दिसून आले आहे की, लोकांना लक्षणे दिसून आल्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी ते संक्रमण करण्याची सुरवात करू शकतात. यूएस रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्र यांनी देखील असा अंदाज व्यक्त केला आहे की ४०% कोरोना विषाणूचे संक्रमण हे आजारी असण्याची लक्षणे असल्यावर होऊ लागते. थोडक्यात आपण असे संपर्क शोधले जे कोणतीही लक्षणे न दाखविलेल्या कोरोना विषाणू संक्रमित व्यक्तींच्या संपर्कात आले आहेत आणि त्यांना विलगीकरणात ठेवले तर आपण ही साखळी तोडू शकतो. दरम्यान जगभरातील कोरोना रुग्णांची संख्या आता ७० लाख पार झाली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

भाजप नेत्यांनी लवकर दौरे करून नारळाची झाडं उभी केली, यासाठी अभिनंदन; पवारांचा उपरोधक टोला

रत्नागिरी । भाजपने निसर्ग चक्रीवादळानंतर तातडीने कोकणात मदत पोहोचवली. यानंतर शरद पवारांना जाग आल्याने ते आता कोकण दौरा करत आहेत, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली होती. या टीकेची शरद पवार यांनी मंगळवारी रत्नागिरीत प्रसारमाध्यमांशी बोलताना सव्याज परतफेड केली. शरद पवार यांनी म्हटले की, भाजपच्या लोकांनी लवकर दौरे केले. त्यांनी अनेक नारळाची झाडं उभी केली. मला आनंद आहे, त्यांचं अभिनंदन, असा उपरोधिक टोला पवारांनी भाजपला हाणला. निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा बसललेल्या कोकणातील वादळग्रस्त भागाला भेट देण्यासाठी म्हणून पाहणी दौऱ्यावर असताना शरद पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली.

गेल्या आठवड्यात कोकण किनारपट्टीवर धडकलेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड आणि रत्नागिरीत मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकताच रायगड जिल्ह्याचा दौरा केला होता. यानंतर आता शरद पवार सध्या रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या मुद्द्यावरून पाटील यांनी सोमवारी पवारांसह मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका करत भाजपने आधी सक्रियता दाखवत कोकण दौरा केल्याचे सांगितलं. आम्ही मदत केल्यानंतर आणि आमचे दौरे झाल्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे व पवारांना उशिरा जाग आल्याचा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला होता.

दरम्यान, राज्यात सत्तेत असणाऱ्या महाविकास आघाडी सरकारचा उल्लेख सर्कस म्हणून करणाऱ्या केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनाही शरद पवारांनी यावेळी सडेतोड उत्तर दिलं आहे. आमच्या सर्कसमध्ये प्राणी आहेत, मात्र एका विदुषकाची कमतरता आहे, या शब्दांत त्यांनी राजनाथ सिंहांचा खरपुस समाराच घेतला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

अरविंद केजरीवालांचा कोरोना टेस्टचा अहवाल आला आणि..

नवी दिल्ली । गेल्या काही दिवसांपासून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ताप आणि खोकल्याचा त्रास जाणवत होता. त्यामुळे केजरीवाल यांनी कालपासून स्वत:ला आयसोलेट करुन घेतले होते. त्यांच्या सर्व नियोजित बैठकाही रद्द करण्यात आल्या होत्या. यानंतर त्यांची कोरोना टेस्ट झाली होती. या टेस्टचा निकाल काय लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, आता अरविंद केजरीवाल कोरोना टेस्ट नेगेटिव्ह आल्यानं सर्वांच्या जीवात जीव आला आहे. मंगळवारी संध्याकाळी अरविंद केजरीवाल यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल समोर आल्यानंतर ही बाब स्पष्ट झाली.

दरम्यान, दिल्लीत गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री केजरीवाल यांनी राज्यातील सरकारी रुग्णालयांत केवळ दिल्लीकरांनाच उपचार मिळतील, असा आदेश काढला होता. मात्र, नायब राज्यपाल यांनी हा आदेश रद्द केल्यामुळे दिल्लीत सध्या केंद्र विरुद्ध राज्य सरकार संघर्षाची ठिणगी पडली आहे. दिल्लीत समूह संसर्गाला सुरुवात झाल्याची शक्यताही आज दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी बोलून दाखविली होती. एम्सच्या संचालकांनी दिल्लीत कोरोना विषाणूचा कम्युनिटी स्प्रेड सुरु झाल्याचे मान्य केले आहे. परंतु केवळ केंद्र सरकारच त्याची घोषणा करू शकते, असेही जैन यांनी सांगितले होते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

‘आमच्या सर्कशीत प्राणी आहेत, फक्त एक विदुषक हवाय’; पवारांचा राजनाथ सिंहांना दे धक्का!

मुंबई । राज्यात सत्तेत असणाऱ्या महाविकास आघाडी सरकारचा उल्लेख सर्कस म्हणून करणाऱ्या केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना खुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीच सडेतोड उत्तर दिलं आहे. आमच्या सर्कसमध्ये प्राणी आहेत, मात्र एका विदुषकाची कमतरता आहे, या शब्दांत त्यांनी राजनाथ सिंहांचा खरपुस समाराच घेतला तोही अगदी आपल्याच शैलीत. निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा बसललेल्या कोकणातील वादळग्रस्त भागाला भेट देण्यासाठी म्हणून पाहणी दौऱ्यावर असताना शरद पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली.

राजनाथ सिंह यांनी व्हर्च्युअल रॅलीद्वारे महाराष्ट्रातील भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधला त्याचवेळी त्यांनी महाराष्ट्रात सध्या सत्तेत असणाऱ्या महाविकास आघाडीच्या कारभारावर निशाणा साधला होता. आपल्या वक्तव्यादरम्यान त्यांनी सर्कशीची उपमा देत एका नव्या वादाला वाचा फोडली. ज्याचे पडसाद आता राज्यातील राजकीय वर्तुळात उठू लागले आहेत.

एकीकडे शरद पवारांनी राजनाथ सिंहांना सणसणीत टोला दिला असतानाच राजनाथ यांच्या या टीकेला राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनीही चांगलाच समाचार घेतला. महाराष्ट्रात लोकशाही पद्धतीने चाललेलं सरकार चांगलं काम करत आहे. कोविड १९ च्या बाबतीत आयसीएमआरने मुंबई मॉडेलची प्रशंसा केली आहे, असं मलिक म्हणाले. रिंगमास्टरच्या हंटरने चालणाऱ्या सरकारचे मंत्री लोकशाही पद्धतीने चालणाऱ्या सरकारला सर्कस म्हणत आहेत. हे त्यांचे अनुभवाचे बोल आहेत, असं प्रत्युउत्तर मलिक यांनी दिले आहे.

दुसरीकडे शिवसेनेकडूनही राजनाथ सिंहांच्या या वक्तव्यावर नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं काम अगदी सुसूत्रतेने सुरु असून, उलटपक्षी मध्य प्रदेश, गुजरातमध्येच सर्कस सुरु असल्याची प्रतिक्रिया शिवसेनेच्या अरविंद सावंत यांनी दिली. सोबतच केंद्रातील सत्ताधाऱ्यांनी लडाख मुद्द्यावर जास्त लक्ष द्यावं असा सूरही त्यांनी आळवला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Paytm ची युजर्सला खास भेट; १ लाखाची खरेदी करा आणि पुढच्या महिण्यात पैसे भरा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जर आपण पेटीएमचा वापर करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे. कारण अलीकडेच कंपनीने आपली पोस्टपेड सेवा (पेटीएम पोस्टपेड सर्व्हिस) वाढविली आहे. आता या सेवेमध्ये आपण आपल्या शेजारच्या जनरल स्टोअर तसेच इतर रिटेल चेन वरून रिलायन्स फ्रेश, हळदीराम, अपोलो फार्मसी, टाटा क्रोमा, शॉपर्स स्टॉप वरून वस्तूंची खरेदीकरून एका महिन्यासाठी पैसे न देण्याची सूट मिळेल. पेटीएम युझर्स त्यांची सर्व प्रकारची बिले भरण्यासाठी तसेच किराणा सामान आणि घरगुती वस्तू खरेदी करण्यासाठीदेखील याचा वापर केयू शकतात. याबाबत कंपनीचे असे म्हणणे आहे की, सध्याच्या कोरोना साथीच्या काळात ग्राहकांच्या कर्जाची मागणी वाढली आहे. हे लक्षात घेता कंपनीने फर्निचर आणि कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स या मोठ्या वस्तूंसाठी मासिक पेमेंट मर्यादा वाढवून एक लाख रुपये इतकी केली आहे.

पेटीएम पोस्टपेडचा फायदा काय ? (What is Paytm Postpaid Service) – यासंदर्भात पेटीएम अधिकारी म्हणाले की,’या सेवेमुळे पेटीएम युझर्सना वाढीव कर्जाची मर्यादा मिळू शकेल. यासाठी दररोजचा खर्च भागविण्यासाठी तुम्हांला पुन्हा पुन्हा पैसे काढण्याची गरज भासणार नाही.

कंपनीने या पोस्टपेडचे ३ प्रकार सादर केले आहेत. यामध्ये लाईट, डिलाईट आणि एलिटचा समावेश आहे. जेथे पोस्टपेड लाईटची सुविधा फीसह २०,००० रुपयांपर्यंत आहे.

त्याच वेळी डिलाईट आणि एलिट डिलाईटचे मासिक क्रेडिट लिमिट २०,००० रुपयांपासून ते १ लाखांपर्यंत आहे. यासाठी कोणत्याही प्रकारची सुविधा शुल्क नाही आहे. या पेटीएम पोस्टपेड सेवेचा लाभ घेण्यासाठी फाइनांशियल सर्विसेस सेक्‍शन मध्ये ‘पोस्टपेड’ हा आयकॉन दिसेल. यासाठी पार्टनर असलेल्या एनबीएफसीसह ऑनलाइन केवायसी पूर्ण करावे लागेल. हे पूर्ण झाल्यानंतर आयकॉन दिसेल. या बिलाची प्रत्येक महिन्याच्या ७ तारखेपर्यंत परतफेड करण्याची आवश्यकता असेल.

ही सेवा दोन एनबीएफसी (नॉन-बँकिंग फायनान्शिअल कंपन्या) च्या पार्टनरशिप मध्ये देण्यात येत आहे. हा पेटीएम अ‍ॅप युझर्सना वेगवेगळ्या देयकासाठी त्वरित कर्जाची सुविधा देते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

किरकोळ कार्यकर्त्यांसारखे राजनाथ सिंग टीव्हीवर टीका करतायत – पृथ्वीराज चव्हाण 

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

भाजपाचे नेते आणि केंद्रीय संरक्षणमंत्री यांनी महाराष्ट्रात सरकारच्या नावाखाली सर्कस सुरु असल्याचे वक्तव्य केले होते. या वक्तव्यावर आता महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते यांनी व्हिडिओच्या माध्यमातून राजनाथ सिंह यांना उत्तर दिले आहे. आणि अशा पद्धतीने स्वतःचे काम करण्यास अपयशी ठरल्यामुळे लोकांचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी छोट्या राजकीय कार्यकर्त्यांसारखी टीका करणे शोभत नाही अशा शब्दांत चव्हाण यांनी राजनाथ सिंह यांना सुनावले आहे. तसेच त्यांनी आपले काम करावे, ते आपली जबाबदारी टाळत आहेत. असा अप्रत्यक्षरीत्या टोलाही चव्हाण यांनी लगावला आहे.

भाजपाच्या जनसंवाद कार्यक्रमात बोलत असताना राजनाथसिंह यांनी हे वक्तव्य केले होते. त्यांनी आम्ही त्यांना सर्वोतोपरी मदत करूनही महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची संख्या नियंत्रणात येत नसल्याचेही म्हंटले होते. यावर आता महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांना चांगलेच सुनावले आहे. ‘केंद्र सरकारने या अत्यंत गंभीर परिस्थतीत अनेक संकटे त्यांच्यावर असणारी जबाबदारी ही लडाखमध्ये सीमेवर जो प्रकार सुरु आहे त्याबाबत अधिकृत माहिती देणे ही आहे ती दिली पाहिजे. चीनी सैनिक भारताच्या हद्दीत घुसले आहेत का? त्यांना आपण बाहेर काढू शकलो आहोत का? अतिक्रमण झाले असेल तर ते आपण निमूटपणे सहन करतोय का? हे सांगण्याची जबाबदारी संरक्षण मंत्र्यांची आहे. ते ही जबाबदारी ते टाळत आहेत.’ असे चव्हाण यांनी म्हंटले आहे.

चव्हाण यांनी त्यांना केंद्रातील सत्ताधारी पक्ष म्हणून असणाऱ्या जबाबदारीचे पालन केले पाहिजे. असे सांगितले. तसेच राष्ट्रीय आपत्तीच्यावेळी कशा प्रकारे वक्तव्य केले पाहिजे, देशाला एक करण्यासाठी कसे प्रयत्न केले पाहिजेत. यासाठी आपल्याकडे संकेत आहेत, असे सुनावले. स्वतःची जबाबदारी पार पाडण्यात अपयशी ठरल्यामुळे दुसरीकडे कुठेतरी टीका करण्याचे साधन ते शोधत आहेत. त्यांना हे शोभत नाही आहे. असा आरोप चव्हाण यांनी केला आहे. आज देश एका बाजूला Covid च्या महामारीचा मुकाबला करतो आहे. दुसऱ्या बाजूला लडाखमध्ये भारत चीन सीमेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे याबाबत सरकारकडून कोणतीच अधिकृत माहिती दिली जात नाही. आत्ताच महाराष्ट्र निसर्ग या चक्रीवादळाच्या दुष्परिणामांचा सामना करतो आहे. अशा तिहेरी संकटांचा देश सामना करत असताना देशाला जोडण्याचे काम करण्याऐवजी छोट्या राजकीय कार्यकर्त्यांसारखी टीव्हीवर भाजपाच्या प्रवक्त्याने टीका करणे शोभत नाही. असे ते म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

मुंबईत आतापर्यंत १८७१ पोलिसांना कोरोनाची लागण, तर २१ जणांचा मृत्यू

मुंबई । मुंबईत आतापर्यंत १८७१ पोलिसांना करोनाची बाधा झाली आहे. त्यापैकी आतापर्यंत ८५३ पोलिसांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर २१ पोलिसांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. एएनआयने यासंदर्भातले वृत्त दिले आहे. याचबरोबर राज्य राखीव पोलीस दलाच्याही ८२ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे अशीही माहिती समोर आली आहे. या पोलिसांना लॉकडाऊन काळात मुंबईत बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आलं.

सध्या कोविड केअर सेंटरमध्ये एकूण ५७१ पोलीस आहेत. तर २३१ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यापैकी १६४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर होम आयसोलेशनमध्ये ३१ जणांना ठेवण्यात आलं आहे. आतापर्यंत ६३४ पोलीस कोरोनातून बरे झाले आहेत.

मात्र त्यांनी अजून ड्युटी जॉईन केलेली नाही. जे बरे झाले आहेत आणि ड्युटी जॉईन केली असे २१९ जण आहेत. तर २१ जणांचा आत्तापर्यंत मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे आतपर्यंत ८५३ पोलिस बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

आईनेच पोटच्या मुलीची गळा दाबू केली हत्या; पतीने माहेरी जाण्यापासून रोखले होते

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उत्तर प्रदेशमधील बस्ती जिल्ह्यातून नुकतेच एक चकित करणारे प्रकरण समोर आले आहे. येथे आईनेच तिच्या दीड वर्षाच्या मुलीची हत्या केली कारण तिच्या नवऱ्याने तिला माहेरी जाण्यास नकार दिला. हा गुन्हा केल्यावर आरोपी आई घरातून फरार झाली आहे. सदर घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि पुढील तपास सुरू केला. फरार झालेल्या त्या आरोपी आईचा पोलिस आता शोध घेत आहेत.

सदर घटना हि बस्ती जिल्ह्यातील नगर पोलीस स्टेशन परिसरातील प्रसादपूर गावातली आहे. दीपमाला या महिलेने तिच्या दीड वर्षाच्या मुलीची गळा आवळून हत्या केली. वास्तविक दीपमाला अनेक दिवसांपासून आपल्या माहेरी जायच म्हणू हट्ट धरून बसली होती, पण लॉकडाऊन सुरु असल्याचे सांगून तिचा नवरा तिला माहेरी जाण्यास नकार देत होता. त्या दिवशी या नवऱ्या बायकोचेमध्ये कडाक्याचे भांडण झाले. सोमवारी दीपमालाने याच रागाने तिच्या दीड वर्षाच्या मुलीचा आयशाचा गळा दाबून खून केला आणि त्यानंतर घरातून पळून गेली.

तिचा नवरा दुर्गाप्रसाद याने सांगितले की,’ सोमवारी सकाळी नऊच्या सुमारास तो कामासाठी घराबाहेर पडला. यावेळी आपली पत्नी आणि १५ महिन्यांची मुलगी आयशा यांच्याशिवाय त्याची वृद्ध आई देखील घरी होती. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास मला घरातून फोन आला की त्याची पत्नी बरच वेळ झाला घराबाहेर गेली आहे आणि तपासल्या नंतरही ती कुठे गेली असल्याचे काहीच कळले नाही. मुलगी आयशा खोलीत अजूनही झोपली आहे. आणि येथे, जेव्हा खूप वेळ झोपल्यानंतर जेव्हा आयशाला जागे करण्याचा प्रयत्न करण्यात आला तेव्हा तिचा मृत्यू झाल्याचे समजले. दुर्गाप्रसाद लगेंचक घरी पोहोचले आणि त्यांनी शहर पोलिस ठाण्यात याची माहिती दिली. सदर घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिस आता त्या आईचा शोध घेत आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.