Thursday, January 1, 2026
Home Blog Page 5683

मुंबईतील लाॅकडाउन नियमावलीत बदल; BMC ने जारी केले ‘हे’ नवे निर्देश

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूचा सर्वाधिक परिणाम महाराष्ट्रातील मुंबई शहरात झालेला आहे. येथे कोरोना-संक्रमित रुग्णांची संख्या ही ५० हजारांच्या जवळपास पोहोचली आहे. त्याचबरोबर मृतांचा आकडा ही १७०० वर पोहोचला आहे. या व्हायरसला रोखण्यासाठी इथे लॉकडाऊन नियमांचे काटेकोरपणे पालन केले जात आहे. दरम्यान, बृहन्मुंबई महानगरपालिकेने लॉकडाऊनशी संबंधित काही सुधारित मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. ज्यामध्ये लॉकडाऊनमध्ये घालण्यात आलेले निर्बंध कसे कमी केले जातील हे सांगण्यात आलेले आहे. तसेच ते टप्प्याटप्प्याने कसे उघडण्यात येतील हेही सांगण्यात आलेले आहे.

ही सुधारित मार्गदर्शक तत्त्वे खालीलप्रमाणे आहेत-

सर्व दुकाने त्यांच्या वेळेनुसार उघडली जातील. परंतु मॉल आणि मार्केट कॉम्प्लेक्सची दुकाने बंद राहतील.
रस्त्याच्या कडेला असलेल्या दुकानांबाबतच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये असे म्हटले आहे की, ही दुकाने आळीपाळीने उघडली जातील. एका दिवशी एका बाजूची तर दुसऱ्या दिवशी दुसऱ्या बाजूची दुकाने उघडली जातील.
सर्व दुकानांना सोमवार ते शनिवार या कामकाजाच्या वेळी उघडण्याची परवानगी दिलेली आहे मात्र ते रविवारी बंद राहतील.
खाजगी कार्यालयांमध्ये केवळ १०% कर्मचारीच काम करतील. म्हणजे फक्त १० लोक. उर्वरित लोकांना घरातूनच काम करावे लागेल.
ऑफिसमधील कर्मचार्‍यांच्या सॅनिटायजेशनची व्यवस्था करण्याची काळजी घ्यावी, जेणेकरुन संसर्ग त्यांच्या घरी पोहोचू नये.
वृत्तपत्रांच्या छपाई व वितरणाच्या संदर्भातही सूट देण्यात आली आहे. मात्र यादरम्यान, हे लक्षात घेतले पाहिजे की वृत्तपत्र घेणार्‍या आणि देणाऱ्यांना मास्क घालावे लागतील, तसेच आपले हात वारंवार स्वच्छ करावे लागतील आणि याबरोबरच सोशल डिस्टंसिंगची काळजीही घ्यावी लागेल.

कोरोना विषाणूच्या संसर्गाचा धोका संपूर्ण देशात वाढतो आहे. सर्वाधिक प्रभावित राज्य महाराष्ट्र आहे. आतापर्यंत येथे ८८,५२८ संक्रमित रुग्णांची नोंद झाली असून आतापर्यंत ३१६९ लोकांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत राज्यात ४०९७५ लोक या विषाणूपासून मुक्त झाले आहेत आणि घरी गेले आहेत. अद्यापही येथे ४४,३८४ सक्रिय प्रकरणे आहेत.

संपूर्ण देशाबद्दल बोलताना आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने मंगळवारी सकाळी सांगितले की, गेल्या २४ तासांत भारतात कोविड -१९ ची सुमारे ९९८७ प्रकरणे नोंदली गेली आहेत आणि त्यात ३३१ लोकांचा मृत्यू झाला आहे. देशात सध्या पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या २,६६,५९८ इतकी आहे. यात १,२९,९१७ सक्रिय प्रकरणे, १,२९,२१५ बरे /डिस्चार्ज/ मायग्रेट आणि ७४६६ मृत्यूंचा समावेश आहे.

 

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

ज्योतिरादित्य सिंधिया आणि त्यांची आई माधवीराजे सिंधिया कोरोना पॉझिटीव्ह

नवी दिल्ली । भारतीय जनता पक्षाचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया आणि त्यांची आई माधवीराजे सिंधिया यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यांना दिल्लीच्या मॅक्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सिंधिया यांना खोकला आणि ताप ही लक्षणं दिसत होती. त्यानंतर त्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली.

लॉकडाऊनपासूनच ज्योतिरादित्य सिंधिया हे दिल्लीत आहेत. ते त्यांच्या कुटुंबियांसोबत दिल्लीत आहेत. पण ४ दिवसांपूर्वी अचानक ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यात कोरोनाचे लक्षण आढळल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं.ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यात कोरोनाची लक्षणं दिसत होती. पण त्यांच्या आई माधवीराजे सिंधिया यांच्यात कोणतीच लक्षणं दिसत नव्हती. पण दोघांचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे.

काही दिवसांपूर्वीच ज्योतिरादित्य सिंधिया यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिट्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. सिंधिया भाजपच्या गोटात सामील झाल्यानंतर मध्यप्रदेशमधील काँग्रेस सरकार पडलं. दरम्यान, भाजपने ज्योतिरादित्य सिंधिया यांना मध्य प्रदेशमधून राज्यसभेची उमेदवारी दिली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

लॉकडाऊनमध्ये मजुरांनी ‘पार्ले-जी’ बिस्किटांवर शमवली भूक; कंपनीनं विक्रीचा 82 वर्षांचा विक्रम मोडला!

मुंबई । लॉकडाऊनदरम्यान शहरातून गावाला जाणाऱ्या स्थलांतरित मजुरांसाठी पार्ले-जी बिस्कीटं संजिवनी देणारी ठरली. लॉकडाऊन काळात आर्थिक संकटात सापडलेल्या मजुरांना परवडणाऱ्या पार्ले-जी बिस्किटांवरच आपली भूक शमवावी लागली. याचाच परिणाम म्हणून पार्ले-जीची एवढी विक्री झाली की मागील ८२ वर्षांचा विक्रम मोडला आहे. केवळ ५ रुपयांचा पार्ले-जी बिस्किटाचा पुडा शेकडो-हजारो किमी पायपीट करणाऱ्या मजुरांच्या भुकेला आधार होतं. काहींनी स्वत: खरेदी करुन खाल्लं तर काहींनी दुसऱ्यांसाठी मदत म्हणून बिस्किटं वाटली. लॉकडाऊनदरम्यान बहुतांश लोकांनी आपल्या घरी पार्ले-जी बिस्किटांचा स्टॉकच करुन ठेवला होता.

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू केलेल्या लॉकडाऊनदरम्यान पार्ले-जीची विक्री विक्रमी स्तरावर पोहोचली आहे. पार्ले-जी हे १९३८ पासूनच ओळखीचं नाव असून अनेकांचा आवडता ब्रॅण्ड आहे. पार्ले प्रॉडक्ट्सने पार्ले-जी बिस्किटांच्या विक्रीचे आकडे देण्यास नकार दिला. परंतु यंदाच्या मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात पार्ले-जी बिस्किटांची विक्री ही मागील आठ दशकांमधील सर्वाधिक ठरल्याचं सांगितलं.

“कंपनीचा एकूण मार्केट शेअर जवळपास ५ टक्क्यांनी वाढला आहे. यापैकी ८० ते ९० टक्के वाढ पार्ले-जी बिस्किटांच्या विक्रीतून झाली आहे,” असं पार्ले प्रॉडक्ट्सचे कॅटेगरी हेड मयांक शाह म्हणाले. “पार्ले-जी हे सामान्यांचं बिस्कीट आहे, ज्या लोकांना ब्रेड परवडत नाही ते पार्ले-जी खरेदी करु शकतात. कोरोना संकटादरम्यान अनेक राज्य सरकारांनी आणि सामाजिक संस्थांनी मोठ्या प्रमाणात पार्ले-जी बिस्किटांची खरेदी केली,” असंही त्यांनी सांगितलं.

याशिवाय लॉकडाऊन दरम्यान, सकस अन्न विकत न घेऊ न शकणाऱ्या लाखो मजुरांनी याकाळात केवळ बिस्किटांवर गुजराण केली. म्हणूनच गुड्डे, बॉरबोन, टायगर, मारी, मिल्क बिकीज या बिस्किटांसह पार्ले प्रॉडक्ट्सच्या मोनॅको या बिस्किटाच्या विक्रीतही वाढ पाहायला मिळाली. मागणी वाढल्यामुळे बिस्किट कंपन्यांन्या लॉकडाऊनच्या काळातही मॅन्युफॅक्चरिंग आणि डिस्ट्रिब्युशनची साखळी मजबूत करावी लागली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

मुळशी पॅटर्न हिंदींत; गन्स ऑफ नॉर्थ मध्ये सलमान खानही दिसणार 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ओम भुतकर, प्रवीण तरडे, महेश मांजरेकर, उपेंद्र लिमये, मोहन जोशी या मराठीतील कलाकारांच्या अभिनयाने समृद्ध मराठी सिनेमा मुळाशी पॅटर्न होय. या सिनेमाने महाराष्ट्रात चांगलीच पसंती मिळवली होती.  सिनेमागृहात हाऊसफुल्ल झालेल्या या सिनेमाने मराठी प्रेक्षकांचे मन जिकंले आहे. मुळशी भागात शेतजमीनी विकल्यानंतर उद्भवलेली विषण्ण करणारी गुन्हेगारी दुनिया या चित्रपटातून प्रवीण तरडे यांनी दाखविली आहे. त्यांनी या सिनेमात साकारलेल्या डॉनने तर अक्षरशः धुमाकूळ घातला होता. या सिनेमातील कलाकार आणि सिनेमा दोन्ही प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला होता. आता या सिनेमाचा रिमेक हिंदीमध्ये बनविला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

या सिनेमातील आररारारा खतरनाक गाणे आजही तितकेच प्रसिद्ध आहे. आता हिंदीमध्ये या सिनेमाच्या रिमेकचे नाव ‘गन्स ऑफ नॉर्थ’ असे देण्यात आले आहे. यामध्ये उपेंद्र लिमये यांनी साकारलेली पोलिसाची भूमिका सलमान खान करणार असल्याच्याही चर्चा होत आहेत. मराठीतील या सिनेमाचे यश पाहून हा सिनेमा हिंदीत केला जात आहे. यामधील ओम भुतकरची भूमिका सलमान खानच्या बहिणीचा नवरा आयुष्य शर्मा करणार आहे अशी माहिती मिळाली आहे. या सिनेमाचे नाव धाक ठेवण्यात येणार होते. मात्र आता ते बदलले असून ते ‘गन्स ऑफ नॉर्थ’ असे ठेवण्यात येणार आहे.

सिनेमाची पूर्वतयारी झाली आहे. एप्रिल महिन्यात शूटिंग सुरु होणार होते मात्र संचारबंदीमुळे ते पुढे ढकलण्यात आले आहे. आता संचारबंदी उठल्यावर ते सुरु होईल. ओम भुतकर व उपेंद्र लिमये यांच्या भूमिका कोण करणार हे ठरले असले तरी प्रवीण तरडे यांनी साकारलेला डॉन कोण साकारणार आहे याची माहिती अद्याप उघड करण्यात आलेली नाही. या सिनेमामध्ये प्रवीण तरडे ही समाविष्ट असणार आहेत पण ते नेमकी कोणती जबाबदारी घेणार आहेत हे अद्याप सांगण्यात आलेले नाही. मराठीतील यशामुळे हिंदीतही या सिनेमाकडून प्रेक्षकांच्या अनेक आशा असतील.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

उद्या होणार आयसीसीची बैठक, टी -२० विश्वचषक स्पर्धेबाबत घेणार ठोस निर्णय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद बुधवारी ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या टी -२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या भविष्यकाळातील योजनेबद्दल घोषणा करण्याची शक्यता आहे. आयसीसी या बैठकीत पुढील चेअरमन पदासाठी नामांकन प्रक्रिया सुरू करण्याची घोषणादेखील करण्याची शक्यता आहे. कोविड -१९ या साथीच्या आजाराने ऑस्ट्रेलियामध्ये यावेळी होणार्‍या टी -२० विश्वचषक स्पर्धेबाबत मंडळाचे सदस्य एखांदा ठोस निर्णय घेऊ शकतात.

अशा परिस्थितीत भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) २०२१ ऐवजी २०२२ मध्ये क्रिकेट ऑस्ट्रेलियाला याचे आयोजन करण्यास सहमती देणार का ? या प्रश्नाला उत्तर देताना बीसीसीआयचे खजिनदार अरुण धुमाळ यांनी पीटीआयला सांगितले की, “पहिले आयसीसीला यावर्षीच्या वर्ल्ड टी -२० बाबतचा त्यांचा हेतू काय ते जाहीर करू द्या. यावर्षीच्या स्पर्धेबाबत अद्याप कोणतीही औपचारिक अशी घोषणा झालेली नाही आहे.”

आयसीसी बोर्डाच्या एका वरिष्ठ अधिका-याने गोपनीयतेच्या अटीवर सांगितले की, “भारत एकतर पूर्व नियोजित कार्यक्रमानुसार ऑस्ट्रेलिया च्या आग्रहाने २०२१ मध्ये स्पर्धा आयोजित करेल किंवा २०२२ मध्ये करेल. मात्र काहीही झाले तरी द्विपक्षीय मालिका लक्षात घेऊन हा निर्णय घ्यावा लागेल. “

दुसरा पैलू म्हणजे स्टार इंडिया, ज्याने आयपीएल आणि आयसीसी स्पर्धांमध्येही आपली गुंतवणूक केली आहे. या अधिकाऱ्याने पुढे सांगितले की,“स्टार हा एक भागधारक देखील आहे. त्यांचे मतही महत्त्वाचे ठरेल. टी -२० विश्वचषक पुढे ढकलल्यास किंवा रद्द केल्यास इंडियन प्रीमियर लीग ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होऊ शकते, अशीही एक शक्यता आहे.

आयसीसीचे सध्याचे अध्यक्ष शशांक मनोहर आणि मंडळ त्यांच्या वारसदारांसाठी नामांकन प्रक्रियेची औपचारिक घोषणा करणार की नाही ही आणखी एक महत्त्वाची बाब असेल. या पदासाठी अनेक दावेदार आहेत. महिनाभरापूर्वीपर्यंत इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाच्या (ईसीबी) कॉलिन ग्रेव्हस यांची एकमताने निवड झाल्यासारखे दिसत होते आणि आताही तेच मुख्य दावेदार आहेत. मात्र आता बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या एहसान मनी यांचीही नावे या पदासाठी रिंगणात आहेत. ज्यामुळे हे प्रकरण रंजक बनले आहे.

बीसीसीआयने अद्याप गांगुलीला उमेदवारी देण्याचा औपचारिक निर्णय घेतलेला नाहीये. धुमाळ म्हणाले, ” यात घाई काय आहे?” ते पहिले निवडणूक प्रक्रिया घोषित करतील. यासाठी वेळ मर्यादा असेल. आम्ही योग्य वेळी याबाबत निर्णय घेऊ. “

आणखी एक मुद्दा म्हणजे भारतातील २०२१ टी -२० विश्वचषक करमुक्तीशी संबंधित आहे. बीसीसीआय आधीपासूनच भारतात २०१६ मध्ये खेळवल्या गेलेल्या टी -२० वर्ल्डकपशी संबंधित करांबाबत लढाई लढत आहे. यासाठी देय असलेल्या दोन कोटी ३७ लाख डॉलर्सचा मुद्दा अजूनही विवाद निराकरण समिती खाली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

पिंपरी चिंचवडमध्ये ऑनर किलिंग; प्रेमप्रकरणातून एका २० वर्षीय तरूणाचा निर्घृण खून

पुणे । शहरात प्रेमप्रकरणातून एका २० वर्षीय तरूणाचा खून झाला आहेविराज विलास जगताप असं या २० वर्षीय तरूणाचं नाव आहे.हा खून मुलीच्या कुटुंबातील ६ जणांनी केला असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे मुलीच्या कुटुंबातील सहा जणांनी हल्ला केला. ही घटना रविवारी रात्री घडली आहे. या घटनेमुळे शहरात संतापाच वातावरण आहे. मारेकऱ्यांमध्ये मुलीचे वडिल, काका, सख्या आणि चुलत भाऊ अशा एकूण ६ जणांचा खुनात समावेश असून यामध्ये दोन अल्पवयीन देखील आहेत. यापैकी ४ जणांना पोलिसांनी अटक केलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवडमधील सांगवी परिसरातील पिंपळे सौदागर येथील ही घटना आहे. मयत तरूणाचं आपल्या मुलीवर प्रेम असल्याचं लक्षात आल्यावर तरूणीच्या वडिलांनी विराजवर हल्ला केला. प्रकार असा घडला की, तरूण दुचाकीवरून जात असताना तरूणीच्या कुटुंबियांनी टेम्पोने धडक दिली. या धडकेत तरूण खाली कोसळला.

यानंतर त्याने पळून जाण्याचा प्रयन्त केला मात्र, मुलीच्या नातलगांनी त्याचा पाठलाग करत तरूणाला लोखंडी रॉडने मारहाण केली. यामध्ये तरूण जबर जखमी झाला. तात्काळ विराजला खासगी रूग्णालयात घेऊन जाण्यात आलं. परंतु सोमवारी दुपारी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात खून, अनुसुचित जाती जमाती कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

पीसीबीने इंग्लंड दौर्‍यासाठी युनूस खानला टीमची दिली हि खास जबाबदारी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पाकिस्तानने इंग्लंड दौर्‍यासाठी मंगळवारी माजी कर्णधार युनूस खान याची फलंदाजी प्रशिक्षक म्हणून आणि राष्ट्रीय संघाचा मुश्ताक अहमद यांची फिरकी गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली. ११८ कसोटी सामन्यांत खेळलेला युनूस पाकिस्तानच्या दृष्टीने अत्यंत यशस्वी फलंदाज ठरला आहे. त्याच्या कारकीर्दीतील सर्वाधिक धावा ३१३ धावा आहेत. आयसीसी क्रमवारीत तो जगातील पहिल्या क्रमांकाचा कसोटी फलंदाजही ठरला आहे.

इंग्लडमध्ये पाकिस्तानला इंग्लंडविरुद्ध तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. ८ जुलै रोजी हा दौरा सुरू होईल. दोन्ही संघ २९ ऑगस्टपासून तीन टी -२० सामन्यांची मालिका देखील खेळतील. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (पीसीबी) चीफ एक्झिक्युटिव्ह वसीम खान म्हणाले की, “मी युनिस खानसारख्या जागतिक फलंदाजाची राष्ट्रीय संघाचा फलंदाजी प्रशिक्षक म्हणून निवड केल्याचा मला आनंद झाला आहे.” ‘

माजी लेगस्पिनर मुश्ताक अहमदने पाकिस्तानकडून ५२ कसोटी सामन्यांमध्ये १८५ गडी बाद केले आहेत. यापूर्वी तो इंग्लंड आणि वेस्ट इंडीज या संघांचा फिरकी गोलंदाजी प्रशिक्षकही होता. वसीम म्हणाला, “मुश्ताक इंग्लंडमधील परिस्थितीला चांगल्याप्रकारे समजतो. तेथे त्याने काउन्टी क्रिकेट खेळण्यात आणि इंग्लंड क्रिकेट संघाबरोबर काम करण्यासाठी बराच वेळ घालवला आहे. फिरकीपटूंना मदत करण्याबरोबरच मुश्ताक सामनाच्या रणनीतीमध्ये (मुख्य प्रशिक्षक) मिसबाह उल हकला मदत करू शकेल. “

युनूस म्हणाला की, पुन्हा पाकिस्तान क्रिकेटमध्ये काम करण्याची संधी मिळाल्याचा मला अभिमान वाटतो. तो म्हणाला, “पाकिस्तानी संघात काही अतिशय हुशार क्रिकेटपटू आहेत. मिसबाह-उल-हक, मुश्ताक अहमद आणि वकार युनूस यांच्यासह आम्ही त्यांचात सुधार करण्याचा प्रयत्न करू आणि आमच्या वतीने चांगली तयारी करू. “युनिस व मुश्ताक यांचा प्रशिक्षक टीममध्ये समावेश केल्याबद्दल मिसबाहने त्यांचे स्वागत केले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

रिंगमास्टरच्या हंटरने चालणाऱ्या सरकारचे मंत्री महाविकास आघाडीला सर्कस म्हणतात- नवाब मलिक

मुंबई । राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारला सर्कस म्हणून संबोधणाऱ्या देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना राष्ट्रवादी काँग्रेसने सडेतोड उत्तर दिले आहे. रिंगमास्टरच्या हंटरने चालणाऱ्या सरकारचे मंत्री लोकशाही पद्धतीने चालणाऱ्या सरकारला सर्कस म्हणत आहेत. हे त्यांचे अनुभवाचे बोल आहेत, असा पलटवार राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी केला आहे.

राजनाथ सिंह यांनी व्हर्च्युअल रॅलीद्वारे महाराष्ट्रातील भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधला तेव्हा ठाकरे सरकार आणि शिवसेनेवर हल्लाबोल केला होता. यावेळी महाराष्ट्रातलं सरकार हे तीन पक्षांचं सरकार आहे. हे सरकार पाहून असं वाटतं की सरकारच्या नावाने सर्कस सुरु आहे. केंद्र सरकार प्रत्येक बाबतीत मदत करत असले तरी विकासाचं व्हिजन जसं असायला हवं तसं महाराष्ट्र सरकारकडे नाही, अशी टीका राजनाथ सिंह यांनी केली होती.

राजनाथ यांच्या या टीकेला राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी चांगलाच समाचार घेतला. महाराष्ट्रात लोकशाही पद्धतीने चाललेलं सरकार चांगलं काम करत आहे. कोविड १९ च्या बाबतीत आयसीएमआरने मुंबई मॉडेलची प्रशंसा केली आहे, असं मलिक म्हणाले. रिंगमास्टरच्या हंटरने चालणाऱ्या सरकारचे मंत्री लोकशाही पद्धतीने चालणाऱ्या सरकारला सर्कस म्हणत आहेत. हे त्यांचे अनुभवाचे बोल आहेत, असं प्रत्युउत्तर मलिक यांनी दिले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

‘पेंग्विन’चित्रपटाचा टीझर रिलीज; दक्षिणात्य अभिनेत्री कीर्ती दिसणार सुरेश मुख्य भूमिकेत; पहा व्हिडीओ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर १९ जून रोजी ‘पेंग्विन’ या चित्रपटाचा विशेष वर्ल्ड प्रीमिअर होणार आहे. हा एक सायको लॉजिकल थ्रिलर चित्रपट असणार आहे. ‘पेंग्विन’ हा चित्रपट आपल्या मुलाला वाचविण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या एका आईच्या शारीरिक आणि भावनिक प्रवासावर आधारित आहे. कार्तिक सुब्बाराज, स्टोन बेंच फिल्म्स आणि पॅशन स्टुडिओ प्रोडक्शन यांच्या या चित्रपटाच्या पोस्टरने यापूर्वीच प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण केली आहे.

अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओने सोशल मीडियावरील आपल्या एका पोस्टमध्ये लिहिले आहे की, “आईचे दु: स्वप्न खरे ठरले. ट्रेलर ११ जूनला प्रदर्शित होणार आहे. कार्तिक सुब्बाराज, स्टोन बेंच फिल्म्स आणि पॅशन स्टुडिओ प्रॉडक्शनच्या या चित्रपटात साऊथची अभिनेत्री कीर्ती सुरेश मुख्य भूमिकेत आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

दिल्लीत ३१ जुलैपर्यंत साडेपाच लाख रुग्ण होतील – मनीष सिसोदिया 

नवी दिल्ली । देशातील कोरोना रुग्णसंख्या दिवसागणिक वाढते आहे. देशाची राजधानी दिल्ली येथील रुग्णसंख्या गेल्या काही दिवसात वाढते आहे. आता उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी येत्या ३१ जुलैपर्यंत दिल्लीत साडेपाच लाख रुग्णसंख्या होण्याची शक्यता वर्तविली आहे. आज माध्यमांशी बोलताना त्यांनी हा आकडा सांगितला. एकूणच या आकड्यावरून दिल्लीतील स्थिती आणखी भयंकर होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दिल्लीत आता सामूहिक संसर्गाला सुरुवात झाली असल्याचे यावेळी सिसोदिया यांनी सांगितले. त्यांनी पुढच्या काही दिवसांमध्ये रुग्णसंख्या आणि किती बेडची आवश्यकता असेल याची माहिती दिली.

१५ जूनपर्यंत दिल्लीत करोना रुग्णांची संख्या ही ४४ हजारापर्यंत जाऊ शकते. हा आकडा ३० जूनपर्यंत वाढून १ लाखपर्यंत जाऊ शकतो. आणि १५ जुलैपर्यंत दिल्लीत करोनाचे सव्वा लाख रुग्ण असतील. तर ३१ जुलैपर्यंत ही संख्या साडेपाच लाखांवर जाईल, असं सिसोदिया म्हणाले. कोरोना विषाणूमुळे दिल्लीकरांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. सोमवारी झालेल्या कोरोना चाचणीमध्ये २७% रुग्ण हे कोरोनाग्रस्त सापडले आहेत.  दिल्लीतील रुग्णसंख्या आता ३० हजारांपर्यंत जाऊन पोहोचली आहे.

दिल्लीतील रुग्णालयांमध्ये केवळ दिल्लीकरांवर उपचार केले पाहिजेत असा निर्णय  घेण्यात आला होता. हा निर्णय दिल्लीच्या नायब राज्यपालांनी रद्द केला आहे. राज्यपाल अनिल बैजल यांना यावर विचार करण्यास विनंती करण्यात आली होती. मात्र त्यांनी यासाठी नकार दिला आहे. या एकूण आकड्यांमुळे दिल्लीकरांना आता काळजी घेणे आवश्यक आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.