Thursday, January 1, 2026
Home Blog Page 5681

जालन्यात पीपीई किट, मास्क घालून चोरी; पोलिसही चक्रावले

जालना । कोरोनाशी दोन हात करताना डॉक्टर आणि नर्स या कोविड योध्यांचे कवच असलेल्या पीपीई किट, मास्कचा गैरवापरची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. लॉकडाऊन सुरू असताना मध्यरात्री चोरट्यांनी पिपीई किट आणि मास्क बांधून एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. हा संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

जालना शहरातील शिवाजी पुतळा परिसरात चोरट्यांनी एका खाजगी कंपनीचे एटीएम आणि बँकिंग ग्राहक सेवा केंद्राचे एटीएम फोड्याचा प्रयत्न केला. मात्र एटीएम मशीन उघडत नसल्याने जवळच असलेल्या समृद्धी ग्राहक सेवा केंद्राचे शटर फोडून 22 हजार रुपयांवर डल्ला मारल्याची घटना देखील उघडकीस आली आहे.

ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्याने खळबळ उडाली असून चोरट्यांना शोधण्याचे मोठे आव्हान पोलिसांपुढे उभे ठाकले आहे. या प्रकरणी समृद्धी ग्राहक सेवा केद्र संचालकांच्या तक्रारीवरून सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

सातारा जिल्ह्यात आज 20 नवीन कोरोग्रस्त; एकुण रुग्णसंख्या 669 वर

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

रात्री उशिरा प्राप्त झालेल्या अहवालानुसार सातारा जिल्ह्यातील विविध कोरोना केअर सेंटर, उपजिल्हा रुग्णालय येथे अनुमानित म्हणून भरती असलेल्या 20 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये कराड तालुका – 12, वाई तालुका – 3, सातारा तालुका – 3, जावली तालुका – 1, फलटण तालुका – 1 असे एकूण 20 जणांचे रिपोर्ट कोरोना बाधित आल्याची  माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.

बाधित रुग्णांमध्ये  फलटण तालुक्यातील तांबवे येथील 25 वर्षीय पुरुष, जावळी तालुक्यातील ओझरे येथील 75 वर्षीय पुरुष. कराड तालुक्यातील  तुळसण येथील 26, 60, 51 वर्षीय पुरुष, 28, 40 वर्षीय महिला, केसे येथील 50,42,64,20 व 60 वर्षीय महिला, 20 वर्षीय पुरुष. शिंदेवाडी येथील 42 वर्षीय् महिला. वाई तालुक्यातील वेरुळी  येथील 46 वर्षीय पुरुष, 11 वर्षीय मुलगा , 26 वर्षीय महिला. सातारा तालुक्यातील कुसवडे येथील 19 व 47 वर्षीय महिला, देगांव येथील 55 वर्षीय पुरुष.

दरम्यान, सातारा जिल्ह्यातील एकुण कोरोनाग्रस्तांची संख्या आता 669 वर पोहोचली आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात 239 कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत तर 401 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. तसेच जिल्ह्यात आत्तापर्यंत 28 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

बिनकामाचा, बोलघेवडा राष्ट्रसेवक परत आलाय; नुसरत जहाँची अमित शहांवर सडकून टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पश्चिम बंगालमध्ये केंद्र सरकारच्या कोणत्याच योजना राबविल्या जात नाहीत असा आरोप करीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला होता. त्यांच्या या वक्तव्यावर तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहाँ यांना चांगलाच राग आल्याचे दिसून आले. त्यांनी अमित शहा यांना यावर सडकून उत्तर देत काहीही काम न करता, केवळ बोलणारा कैवारी परत आला आहे असे विधान केले. 

नुसरत जहाँ यांनी त्यांच्या ट्विटर अकॉउंटवरून अमित शहा यांच्यावर आरोप केले आहेत. त्यांनी ‘अहा, काहीही काम न करता, केवळ बोलणारा कैवारी परत आला आहे’ असे ट्विट केले आहे. तसेच आम्हाला जेव्हा अ‍म्फान चक्रीवादळात आणि कोरोनाच्या संकटात जेव्हा आम्हांला केंद्र सरकारच्या मदतीची गरज होती. तेव्हा तुम्ही कुठे होता. असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे. “२०१४ मध्ये अच्छे दिनचं आश्वासन देण्यात आलं होतं. यानंतर नोटाबंदी, वाढती महागाई, बेरोजगारी, एनआरसी, सीएए, बेजबाबदरीने हाताळलेली करोना परिस्थिती, दुर्लक्षित मजूर या गोष्टी समोर आल्या. बंगालमधील लोक तुमच्या जाळ्यात अडकायला काही आंधळे नाहीत,” असंही नुसरत जहाँ यांनी म्हटलं आहे.

https://twitter.com/nusratchirps/status/1270272925166268422   

केंद्र सरकारची चांगली आयुष्यमान भारत योजना आजही पश्चिम बंगालमध्ये लागू नाही, अगदी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही ही योजना लागू केल्याचे ते म्हणाले होते. मात्र ममता बॅनर्जी ही योजना का लागू करत नाहीत हे आम्हाला आणि पश्चिम बंगालच्या जनतेला ऐकायचं आहे. अशा बाबींमध्ये राजकारण करू नये. असेही ते म्हणाले होते. त्यांनी मोदींकडे ६ वर्षांचा हिशोब मागण्याआधी तुमच्या दहा वर्षांचा हिशोब द्या असे विधान केले होते.  यावरून नुसरत जहाँ यांनी हे ट्विट केले होते. 

सिंथिया डी रिचीकडून पाकिस्तानी नेत्यांचा लंपटपणा उघड; कारवाईची कोणतीच नोटीस न मिळाल्याचा खुलासा  

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।  पाकिस्तान स्थित अमेरिकन ब्लॉगर सिंथिया रिची हिने पाकिस्तानचे माजी मंत्री रहमान मलिक यांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला होता. सध्या सत्तेत असणाऱ्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यावरील या आरोपामुळे सर्वत्र खळबळ उडाली होती. यावर राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर झालेल्या बदनामीच्या दाव्याने रहमान मलिक यांच्या वकिलाने तिला कायदेशीर नोटीस पाठविली आहे. मलिक यांनी रिची यांच्याकडून पाकिस्तानी ५० अब्ज पाकिस्तानी रुपये  (अंदाजे २३ कोटी रुपये) नुकसान भरपाईचा दावा ठोकला आहे. यावर ट्विट करत रिची यांनी मला पहिली नोटीस मिळालीच नसल्याचे सांगितले आहे. 

रिची यांनी माजी पंतप्रधान युसूफ रझा, एका माजी मंत्र्यावर देखील २०११ मध्ये तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला होता. रहमान यांच्या वकिलाने रिची यांना ही दुसरी नोटीस पाठविला असल्याचा दावा केला होता यावर त्यांनी माझे शोषण करत असताना माझा नंबर आणि पत्ता शोधणाऱ्यांनी चुकीच्या पत्त्यावर कशी नोटीस पाठविली? असे म्हणत मला पहिली नोटीस मिळालीच नाही असे सांगितले आहे.  

https://twitter.com/CynthiaDRitchie/status/1270339267865251841  

त्यांनी केलेल्या ५० अब्ज पाकिस्तानी रुपयांसंदर्भात एक ट्विट केले आहे, ज्यात त्या म्हणतात, माझे गणित इतके चांगले नाही आहे पण या पैशात मी दारिद्र्य निर्मूलन आणि बलात्कार प्रतिबंधाचे बरेच काम करू शकेन. मी तुम्हाला कोर्टात भेटेन असेही त्यांनी म्हंटले आहे. रिची यांनी शुक्रवारी पाकिस्तान पीपल्स पार्टीच्या तीन नेत्यांवर तिच्या फेसबुक अकॉउंटवरून आरोप करणारी व्हिडीओ क्लिप जाहीर केली होती. जी खूप वेगाने व्हायरल झाली होती. या तीनही नेत्यांनी हे आरोप फेटाळले असून रिची यांच्याविरोधात कायदेशीर रित्या बलात्काराची तक्रार दाखल करणार आहेत असे त्यांनी सांगितले आहे. 

https://twitter.com/CynthiaDRitchie/status/1270348552913539082

जॉर्ज फ्लॉइड प्रकरण | निषेध करणाऱ्यांच्या गाड्यांचे टायर पंक्चर करुन पोलिसांचा ‘अतिशहाणपणा’

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मिनियापोलीस येथील कायदा अंमलबजावणी एजन्सीनी निषेध आंदोलनाच्या वेळी येथील पोलीस अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या अनेक वाहनांचे टायर पंक्चर केल्याचे सांगितले आहे. जॉर्ज फ्लाईडच्या मृत्यूनंतर येथील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात निषेध आंदोलन केले होते. इथला जनसमुदाय संतप्त झाला होता. या अशांततेच्या वेळी येथील पोलीस अधिकाऱ्यांनी असे कृत्य केले असलेल्या गोष्टीवर आता शिक्कामोर्तब झाले आहे. 

सार्वजनिक सुरक्षा विभाग मिनेसोटाचे ब्रूस गार्डन म्हणाले, पोलीस या आंदोलनकर्त्यांना थांबविण्याचा तसेच त्यांनी वाहने धोकादायक पद्धतीने चालवू नयेत यासाठी प्रयत्न करत होते. वाहने वेगाने चालविणे रोखण्यासाठी त्यांनी हे कृत्य केले असल्याचे ब्रुसनी सांगितले. तसेच आंदोलनात आणलेल्या दगड, काँक्रीट, लाठी यासारख्या हिंसक साधनांवरही पोलिसांनी कोणतीच हानी होऊ नये यासाठी हल्ला चढविला असे त्यांनी सांगितले. 

अनोखा काऊंटीमधील प्रतिनिधींनीही फ्लाईडच्या मृत्यूनंतर उसळलेल्या आंदोलनात पोलिसांनी टायर बदलल्याचे सांगितले आहे. राज्य सरकारच्या नेतृत्वाखालील मल्टीएजेन्सी कमांड सेंटरच्या आदेशांचे पालन करण्याचे काम हे प्रतिनिधी होते, जे निषेधाच्या वेळी कायदा अंमलबजावणीचा समन्वय साधत होते, त्यांनी सांगितले की, स्टार ट्रिब्यूनच्या रिपोर्टरच्या कारवरील चारही टायर्स निषेध व अशांततेच्या पार्श्वभूमीवर एका कार पार्किंगमध्ये पंक्चर करण्यात आले होते. जॉर्ज फ्लाईड या आफ्रिकन वंशाच्या व्यक्तीची गौरवर्णीय पोलिसाने निर्घृण हत्या केली होती. त्यानंतर हे आंदोलन उसळले होते.

नुसतं सीमेवरच नाही, तर आतील भागातही सैन्य कमी करा; भारताची चीनला मागणी, अन्यथा..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लडाख मधील रस्तेबांधणी वरून चीनने सुरु केलेला सीमावाद आता चीनच्याच अंगलट आला आहे. भारताने आता एक नवा डाव टाकला आहे. ६ जून रोजी झालेल्या चुशुल-मोल्दो मध्ये झालेल्या बैठकीत भारताने ५ महत्वाचे मुद्दे ठेवल्याचे लष्करी सूत्रांनी सांगितले आहे. यामध्ये भारताने केवळ सीमारेषेवरील नाही तर सीमाभागातील सैन्यही कमी करण्याची मागणी केली आहे. साधारण महिनाभरापासून भारत चीन सीमेवर हा वाद सुरु आहे.  

भारताने चीनला सीमारेषेवर तणावाचा नेमका मुद्दा काय आहे? तसेच वास्तविक सीमारेषेची हद्द काय आहे? त्या जमिनीवर त्यांची हद्द काय असेल? हे कायदेशीर रित्या सांगण्यास सांगितले आहे. यामुळे भविष्यात या विषयावरून चीन वाद करू शकणार नाही. त्याबरोबर ज्यापद्धतीने चीनने या तणावाची सुरुवात केली होती. त्याप्रमाणे चीननेच सर्वप्रथम माघार घेतली पाहिजे असे म्हणणे भारताने समोर ठेवले आहे. चीनच्या सैनिकांनी आधी तंबू लावले होते. त्यामुळे त्यांनीच आधी ते काढावेत अशी मागणी भारताने केली आहे. तसेच केवळ वास्तविक नियंत्रण रेषेवरून नाही तर सीमाभागातून सैन्य मागे जाईल असे भारताकडून सांगण्यात आले. जर चीनने असे नाही केले तर चर्चेचे वातावरण बिघडेल असेही सांगण्यात आले. 

भारताकडून सांगण्यात आले की, जर चीनला सीमेवरचा तणाव कमी करायचा आहे तर त्यांच्या सैनिकांना मागे जावे लागेल. म्हणजे आता मागे जायचे की तिथेच थांबायचे हे चीनच्या हातात आहे.  अर्थात सीमेवरील तणाव वाढविणे किंवा संपवणे भारताने चीनवर सोपविले आहे. तसेच चीनने रस्ते बांधले तर भारताने बांधल्यावर चीनला काय समस्या आहे? हा मुद्दाही मांडण्यात आला. त्याबरोबर जर स्थानिक लोकांच्या गरजेसाठी चीन रस्ते बांधू शकते तर भारत देखील स्थानिकांच्या गरजेसाठी रस्तेबांधणी करत आहे. या विषयावर हरकत घेण्याचे काही कारण नसल्याचे भारताकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

साताऱ्यात आहात, नोकरी नाहीये? मग हजार नोकऱ्यांची ही संधी तुमच्यासाठीच..!! त्वरा करा..!!

सातारा प्रतिनिधी | योगेश नंदा सोमनाथ

कोरोना संकटाच्या काळात अनेक लोकांना आपली नोकरी गमवावी लागली. अनेकांनी आपल्या सुरक्षिततेसाठी मोठ-मोठाली शहरं दूर करुन गड्या आपला गाव बरा म्हणत गावांना जवळ केलं. इतर राज्यांतील कामगार वर्गानेही आपल्या घरच्यांची आणि स्वतःच्या जीवाची काळजी लक्षात घेऊन मिळेल त्या पद्धतीने गाव गाठण्याचा प्रयत्न केला. कष्टकरी आणि श्रमिक वर्गासाठी मागील ३ महिने हे आत्यंतिक हलाखीचे राहिले असले तरी आता झालेल्या प्रकारावर शोक व्यक्त करण्याऐवजी काम करणं, त्यावर उपाय शोधणं जास्त गरजेचं आहे.

साताऱ्यातील औद्योगिक क्षेत्रात अशाच पद्धतीने काम उपलब्ध करुन देण्यासाठी उद्योजकांनी आणि जिल्हाधिकारी शेखर सिंग यांनी पुढाकार घेतला आहे. साताऱ्यात कामासाठी असणारे इतर जिल्ह्यातील तसेच राज्यांतील हजारो मजूर आपापल्या गावी गेले आहेत. त्यामुळे औद्योगिक क्षेत्रात रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत. वाढणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात आणण्यासोबतच रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करुन देण्यासाठी एक नवीन उपक्रम जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत सुरु करण्यात आला आहे. विशेषतः पुण्या-मुंबईहून स्वगृही परतलेल्या मुला-मुलींच्या मोबाईल नंबरवर एका संदेशाद्वारे जिल्ह्यातील नवीन रोजगाराच्या संधींची माहिती देणारी लिंक पाठवण्यात आली आहे.

हॅलो महाराष्ट्रच्या वाचकांसाठी सातारा जिल्ह्यातील नोकरीसाठी लिंक – https://bit.ly/3dLLA1j

जिल्हाधिकारी शेखर सिंग यांचे आवाहन

वर दिलेल्या लिंकवर क्लिक करुन सातारा जिल्ह्यातील विविध तालुक्यांत उपलब्ध असणाऱ्या कंपन्या, त्या कंपन्यांमध्ये शिल्लक असणाऱ्या जागा, कामाचं स्वरुप याविषयीची माहिती मिळू शकते. या उपक्रमात उद्योजकांनी घेतलेला पुढाकारही महत्वाचा आहे. भूमिपुत्रांना स्थानिक ठिकाणी काम उपलब्ध करुन देण्यासाठी सुरु असलेल्या प्रयत्नांचं हे पहिलं पाऊल म्हणायला हरकत नाही. स्वतः जिल्हाधिकारी शेखर सिंग यांनी याबाबतीत लक्ष घातलं असून यासंदर्भात ‘महास्वयम’ पोर्टलवर नावनोंदणी करण्याच्या सूचना केल्या आहेत. नोकरीसाठी इच्छुक नागरिकांनी अडचण आल्यास 02162-239938 (कार्यालय), 8999089322 (दीपक लोंढे), 9371608764 (सहकारी) या क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन केलं आहे.

‘या’ कारणामुळे सलग तिसर्‍या दिवशी वाढले पेट्रोल-डिझेलचे दर; जाणुन घ्या आजचे भाव

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये वाढ सुरूच आहे. ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी (एचपीसीएल, बीपीसीएल, आयओसी) सलग तिसर्‍या दिवशीही पेट्रोलच्या दरात वाढ केली आहे. दिल्लीत एक लिटर पेट्रोलची आजची किंमत ही ५४ पैशांनी वाढून ७३ रुपये प्रतिलिटर झाली आहे. त्याचबरोबर, आजची डिझेल किंमत देखील जोरदार वाढली आहे. दिल्लीत एक लिटर डिझेलची किंमत प्रतिलिटर ७१.१७ रुपये झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती पुन्हा वाढल्यामुळे देशात पेट्रोल आणि डिझेल महाग होत आहेत. भारत आपल्या गरजेच्या ८० टक्के तेल आयात करतो. बाजारात तेलाच्या किंमती वाढल्यामुळे याचा फटका सर्वसामान्यांना बसेल तसेच महागाई देखील वाढेल.

पेट्रोल-डिझेलच्या सुधारित किंमती – आयओसीनुसार दिल्लीत पेट्रोलची किंमत प्रतिलिटर ७३ रुपयांवर गेली आहे. त्याचबरोबर डिझेलची किंमत प्रतिलिटर ७१.१७ रुपये झाली आहे. मंगळवारी नोएडामध्ये एक लिटर पेट्रोलची किंमत प्रति लिटर ७५.३८ रुपयांवर गेली. तर त्याचबरोबर डिझेलची किंमत ही प्रति लिटर ६५.३४ रुपये झाली आहे. मुंबईत पेट्रोलचे दर प्रतिलिटर ८०.०१ रुपये केले आहेत. डिझेलची किंमत प्रति लीटर ६९.९२ रुपये आहे. चेन्नईमध्ये पेट्रोलची किंमत प्रतिलिटर ७७.०८ रुपये आहे. डिझेलची किंमत प्रति लिटर ६९.७४ रुपये आहे. कोलकातामध्ये पेट्रोलची किंमत प्रतिलिटर ७४.९८ रुपये आहे तर डिझेलची किंमत ही प्रतिलिटर ६७.२३ रुपये आहे.

आपल्या शहरातील पेट्रोल-डिझेलची किंमत – देशातील तीन ऑईल मार्केटिंग कंपन्या एचपीसीएल, बीपीसीएल आणि आयओसी या सकाळी ६ नंतर पेट्रोल-डिझेलचे नवीन दर जाहीर करतात. नवीन दरांसाठी आपण वेबसाइटला भेट देऊनही माहिती मिळवू शकता. त्याच वेळी, आपण मोबाइल फोनवर एसएमएसद्वारे देखील हे दर तपासू शकता. ९२२४९ ९२२४९ या क्रमांकावर एसएमएस पाठवून आपण पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल जाणून घेऊ शकता. आपल्याला RSP <स्पेस> पेट्रोल पंप डीलरचा कोड लिहून ९२२४९ ९२२४९ या क्रमांकावर पाठवावा लागेल. जर आपण दिल्लीत असाल आणि एसएमएसद्वारे पेट्रोल आणि डिझेलची किंमत जाणून घेऊ इच्छित असाल तर आपल्याला आरएसपी १०२०७२ लिहावे लागेल आणि ते ९२२४९ ९२२४९ वर पाठवावे लागेल.

पेट्रोल-डिझेलच्या किमती का वाढत आहे- तज्ञ म्हणतात की रशियाबरोबरील किंमतीच्या युद्धामुळे मार्च महिन्यात तेलाच्या किंमतींमध्ये सौदीने गेल्या ३० वर्षांतली सर्वात मोठी कपात केली होती. तसेच आताही पुन्हा कच्च्या तेलाचे उत्पादन कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. म्हणूनच किमतींमध्ये वेगाने वाढ झाली आहे.

OPEC आणि त्याच्याशी संलग्न देशांनी जुलै अखेरपर्यंत कच्च्या तेलाच्या उत्पादनात सुमारे एक कोटी बॅरल केलेल्या कपातीमध्ये एका महिन्याने वाढ केली आहे. कोरोनाव्हायरसमुळे उद्भवणारी सध्याची परिस्थिती लक्षात घेता बाजार स्थिर होण्याच्या दिशेने हे पाऊल उचलले गेले आहे. चीनमध्ये तेलाची वाढती मागणी असल्याने सौदीने किंमती वाढवल्या आहेत. सौदीने आशिया खंडात अरब लाइट्सची किंमत प्रति बॅरल ६.१० डॉलर प्रति बॅरल वाढ केलेली आहे.

बेंचमार्कच्या प्राइसमध्ये २० टक्क्यांनी प्रीमियम वाढ झाली आहे. आशिया खंडात निर्यात झालेल्या सर्व ग्रेडसाठी कंपनीने जुलैचे दर ५.६० डॉलर वरून ७.३० डॉलर्सपर्यंत वाढवले ​​आहेत. मीडिया रिपोर्टनुसार पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दररोज होणाऱ्या बदलांची प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात आली आहे. सरकारी तेल कंपन्या विमानांच्या इंधन आणि देशांतर्गत एलपीजी (एलपीजी) च्या दरांमध्ये नियमित अंतराने बदल करत आहेत. पण १६ मार्चपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर राहिले.

क्रूड तेलाच्या किंमतींबाबत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील प्रचंड गडबड हे त्याचे कारण होते. सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात प्रतिलिटर ३ रुपये वाढ केल्यावर लवकरच किंमती स्थिर झाली आहेत. ६ मे रोजी पेट्रोलवर उत्पादन शुल्कात आणखी १० आणि डिझेलवर १३ रुपये वाढ करूनही त्यांचे दर स्थिर राहिले. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील कंपन्यांनी केलेल्या नफ्यात कच्च्या तेलाचे दर खाली नोंदविले गेल्यामुळे त्यांनी सरकारने वाढवलेल्या उत्पादन शुल्कात वाढ केली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

कोरोनामुळे यंदाचा योगा दिवसही होणार ऑनलाईन; जिंकू शकता ‘ही’ मोठी बक्षिसे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगभरातील सर्व देशात पसरलेल्या कोविड -१९ च्या पार्श्वभूमीवर यंदाचा आंतरराष्ट्रीय योगा दिवस हा डिजिटल मीडिया प्लॅटफॉर्मवर साजरा केला जाईल. या संदर्भात सरकारने सांगितले की, यावर्षी योगा दिनावर कोणताही सामूहिक सोहळा किंवा कार्यक्रम होणार नाही. दरवर्षी योग दिन हा एका विशिष्ट थीमवर साजरा केला जातो. यंदाची थीम ‘योगासहित घर आणि योगासहित कुटूंब’ अर्थात ‘योगा अ‍ॅट होम अँड योगा विथ फॅमिली’ असेल. २१ जून रोजी सकाळी ७ वाजता लोकं या योग दिनाच्या उत्सवात सामील होऊ शकतील.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, विदेशातील भारतीय मिशन लोकांना डिजिटल माध्यमांद्वारे तसेच योगास समर्थन देणार्‍या संस्थांच्या नेटवर्कद्वारे लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहेत. आयुष मंत्रालयाने यापूर्वीच लेहमध्ये एक भव्य कार्यक्रम आयोजित करण्याची योजना आखली होती, जे कि या साथीच्या आजारामुळे रद्द करावी लागली. याव्यतिरिक्त, पंतप्रधानांनी ३१ मे रोजी सुरू केलेल्या ‘माय लाइफ – माय योगा’ या व्हिडिओ ब्लॉगिंग स्पर्धेच्या माध्यमातून आयुष मंत्रालयाने आणि आयसीसीआरने योगाबद्दल जागरूकता निर्माण केली तसेच लोकांना त्यासाठी तयार व सक्रीय भागीदार केले.

ही स्पर्धा दोन टप्प्यांत चालविली जाईल – पहिली आंतरराष्ट्रीय व्हिडिओ ब्लॉगिंग स्पर्धा, ज्यामध्ये देशातील विजेत्यांची निवड केली जाईल. त्यानंतर ग्लोबल अ‍ॅवॉर्ड विजेत्यांची निवड वेगवेगळ्या देशांकडून केली जाईल. या स्पर्धेत भाग घेण्यासाठी सहभागींनी आपल्या ३ मिनिटांचा ३ योग व्यायाम प्रकाराचा व्हिडिओ (क्रिया, आसन, प्राणायाम, बंधा किंवा मुद्रा) अपलोड करणे आवश्यक आहे, तसेच या योगा क्रियामुळे त्यांच्या जीवनावर कसा परिणाम झाला याचा एक लहानसा व्हिडिओ संदेश / वर्णन समाविष्ट आहे.

आयुष सचिव, वैद्य राजेश कोटेचा म्हणाले की, यामध्ये सहभागी झालेल्या व्यक्ती कोणत्याही भाषेत हे व्हिडीओ करू शकतात, सहभागींनी सादर केलेल्या नोंदी या तीन वयोगटातील असतील – युवा (१८ वर्षांखालील पुरुष आणि महिला), प्रौढ (१८ वर्षाखालील) अधिक पुरुष आणि स्त्रिया) आणि योग प्रोफेशनल.

ते म्हणाले की हे सर्व एकत्र मिळून या सहा श्रेणी तयार केल्या जातील. भारतातील स्पर्धकांना प्रत्येक प्रवर्गातील १, २ आणि ३ पदांसाठी १ लाख, ५० हजार आणि २५ हजार अशी बक्षिसे दिली जातील.

परदेशातील भारतीय मिशन हे प्रत्येक देशात बक्षिसे देतील. प्रथम, द्वितीय तसेच तृतीय क्रमांक धारकांना जागतिक पातळीवर ट्रॉफी आणि प्रमाणपत्रे तसेच २,५००,USD १,५०० USD आणि १,००० USD डॉलर्सची रोख बक्षिसे दिली जातील.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

नीरव मोदींची १,४०० कोटींची मालमत्ता भारत सरकारच्या ताब्यात; संपत्तीत ‘या’ महागड्या वस्तू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । फरारी हिरे व्यापारी नीरव मोदी याला कोर्टाने मोठा धक्का दिला आहे. कोर्टाने आता आदेश दिले आहेत की, नीरव मोदी याच्या सर्व मालमत्ता जप्त कराव्यात. नुकताच पीएमएलए कोर्टाने हा आदेश दिला आहे, जेथे नीरव मोदीविरूद्ध मनी लॉन्ड्रिंग कायद्यांतर्गत खटला चालविला जात होता. कोर्टाच्या आदेशानंतर आता नीरव मोदींच्या सुमारे १४०० कोटींच्या मालमत्तेवर भारत सरकारचा अधिकार असेल. नीरव मोदींचा खजिना किती मोठा आहे आणि त्यात कोण कोणत्या गोष्टी आहेत, ते जाणून घेउयात.

ग्रॉसवार्नर हाऊस फ्लॅट
कोर्टाच्या या आदेशानुसार नीरव मोदींच्या ग्रॉसवार्नर हाऊसचे फ्लॅटही जप्त केला जाऊ शकेल. त्याची किंमत सुमारे १७ कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे.

कोहिनूर सिटीतले फ्लॅटस कुर्ला पश्चिम, मुंबईतील कोहिनूर सिटीमधील तळ मजला, तिसरा मजला आणि चौथा मजला हे संपूर्ण नीरव मोदी याचे आहेत, ज्याची किंमत ९० कोटी रुपये आहे. हे फ्लॅट्सही जप्त केले जाऊ शकते असे सांगण्यात येते आहे. या मालमत्तांवर सुमारे ९ कोटी रुपयांचा प्रॉपर्टी टॅक्स भरणे बाकी आहे.

पेनिंसुला बिझिनेस पार्कची प्रॉपर्टी
नीरव मोदी यांची पेनिंसुला बिझिनेस पार्कमध्ये कमर्शियल प्रॉपर्टी आहे, सरकार त्यासही जप्त करू शकेल जेणेकरुन त्यांना पीएनबी बँक घोटाळ्याची रक्कम वसूल करता येईल. या मालमत्तेची किंमत सुमारे ७९ कोटी रुपये इतकी आहे.

समुद्रमहाल फ्लॅट्स
मुंबईतील वरळी भागातील गगन चुंबी इमारती असलेले सी फेसिंग असलेले समुद्र महाल फ्लॅट्स बर्‍याचदा चर्चेत असतात. नीरव मोदी आणि त्याची पत्नी एमी मोदी यांच्या नावावर येथे अनेक फ्लॅट्स आहेत. नुकत्याच माध्यमांमधील वृत्तानुसार त्यांचे मूल्य सुमारे ९०० कोटी रुपये असल्याचे सांगितले जात होते.

मफतलाल सेंटरचा ६ वा मजला
नीरव मोदी याच्याकडे मफतलाल सेंटरचा सहावा मजलाही आहे, जो कोर्टाच्या आदेशानुसार ताब्यात घेतला जाण्याची शक्यता आहे. असे म्हटले जात आहे की त्याची किंमत सुमारे ५५ कोटी रुपये आहे. यापूर्वीच्या कोर्टाच्या आदेशानुसार ही जागा जप्त करण्यास मनाई करण्यात आली होती.

रिदम हाउस
नीरव मोदी याचे मुंबईच्या काळा घोडामध्ये रिदम हाउस आहे, ज्याला सरकार जप्त करू शकते. याची किंमत सुमारे ३२ कोटी रुपये आहे.

कर्जतची जमीन, इमारत, मशीनरी
नीरव मोदीकडून घोटाळ्याची रक्कम वसूल करण्यासाठी त्याच्या कर्जतमधील सुमारे ५३ एकर जमीन, इमारत तसेच मशीनरी जप्त करता येईल. त्याची किंमत अंदाजे ७० कोटी रुपये इतकी आहे. एवढेच नव्हे तर कर्जत येथे नीरव मोदी याच्या नावावर सुमारे १३५ एकर जमीन असून, सुमारे ५२ कोटी रुपये किंमतीची ही जमीन आहे. हि जमीनही जप्त केली जाऊ शकते.

ईडीने यापूर्वीच ताब्यात घेतले आहे
यापूर्वीच ईडीने नीरव मोदीची संपत्ती जप्त करण्यासाठी कारवाई केली आहे. मार्च २०२० मध्ये त्यातील काही मालमत्तांचा लिलावही करण्यात आला आहे, ज्याच्यामधून ५१ कोटी रुपये मिळाले आहेत, ज्याला ईडीने जप्त केले. यामध्ये रोलिंग रॉयस कर, एमएफ हुसेन आणि अमृता शेर-गिल यांच्या पेंटिंग्ज आणि डिझायनर हँडबॅग्जचा समावेश होता.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.