Thursday, January 1, 2026
Home Blog Page 5685

कोरोना झालेले दोन कैदी कोविड सेंटर मधून फिल्मी स्टाईल पसार

औरंगाबाद प्रतिनिधी | कोरोनाचा संसर्ग झालेले दोन कैदी किलेअर्क शासकीय वसतिगृह येथील कोविड सेंटरमधून रविवारी रात्री पावणेअकरा वाजेच्या सुमारास पळून जाण्यात यशस्वी झाले. अक्रम खान गयास खान (रा. जटवाडा) व सय्यद सैफ सय्यद असद अशी पळून गेलेल्या कैद्यांची नावे आहेत.

हर्सूल मध्यवर्ती कारागृहातील २९ कैद्यांना कोरोनाची लागन झाल्याचे शनिवारी उघड झाले होते. कारागृहातील अन्य कैद्यांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून त्यांना कित्लेअर्क येथील शासकीय वसतिगृहात उभारण्यात आलेल्या कोचिड सेंटरमध्ये २९ कैद्यांना ठेवण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरु असताना रविवारी रात्री पावणेअकराच्या सुमारास शौचालयाचा बहाणा करून अक्रम खान गयास खान आणि नेहरूनगरातील सय्यद सैफ सय्यद असद या दोघांनी बाथरूमच्या खिडकीच्या काचा फोडून बेडशीट च्या साहाय्याने खाली उतरत पलायन केले.

या प्रकरणी बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरोना संक्रमित कैदींच्या पलायनाच्या बातमीने नागरिकांत एकच खळबळ उडाली असून पोलिस पसार झालेल्या कैद्यांचा शोध घेत आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

अमित शहांच्या व्हर्च्य्युअल रॅलीवर ममता दीदी म्हणाल्या, ‘हे’ फक्त भाजपलाच परवडू शकत!

कोलकाता । केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या व्हर्च्य्युअल रॅलीसाठी ७० हजार एलईडी स्क्रीन वापरण्यात आल्याचे आपल्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून समजल्याचे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या. हे फक्त भारतीय जनता पक्षालाच परवडू शकते असा टोला ममता दीदींनी अमित शहा आणि भारतीय जनता पक्षाला लगावला आहे.

त्या पुढे म्हणाल्या, ३० जूनपर्यंत लॉकडाउनची अंमलबजावणी केली जाईल. यासह, कोरोनाने मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नातेवाईक देखील मृतदेहाचे अंतिम दर्शन करू शकतील. तसेच, आम्ही लग्नाच्या सोहळ्यामध्ये आणि मंदिरात एकत्र येण्यासाठी १० ते २५ लोकांना परवानगी दिली आहे, असेही त्या म्हणाल्या. बंगालमध्ये राहणारे स्थलांतरित मजूर येथे आनंदाने राहत आहेत याचा मला आनंद आहे. त्यांना त्यांच्या मूळ राज्यात परत यायचे नाही. परंतु आपल्या राज्यातील स्थलांतरित मजूर इतर राज्यांत अनेक संकटांना सामोरे जात आहेत, याकडेही ममता दीदींनी लक्ष वेधले आहे.

केवळ संघटित शक्तीच दु:ख सहन करू शकते हे कायम लक्षात ठेवा असेही त्या म्हणाल्या. आतापर्यंत २० पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. सीआयएसएफ आणि सीआरपीएफच्या जवानांनाही संसर्ग झाला आहे. या कठीण काळात हेच लोक कोरोनाशी थेट लढा देत आहेत, असेही ममतादीदी पुढे म्हणाल्या. ममता बॅनर्जी पुढे म्हणाल्या की, आम्ही जागतिक बँकेकडून विशेष कर्ज घेतले असून त्यापैकी १,०५० कोटी रुपये लॉजिस्टिक आणि पायाभूत सुविधांवर खर्च होणार आहेत. तर ८५० कोटी रुपये पेन्शन आणि सामाजिक पायाभूत सुविधांवर खर्च केले जातील अशी माहितीही ममता दीदींनी दिली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

राज्याचा कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर ४६.२८ टक्के- आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई । राज्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने पसरत असला तरी एक दिलासादायक बातमी आहे. राज्याचा कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर ४६.२८ टक्के आहे. आतापर्यंत राज्यात ४० हजार ९७५ कोरोना बाधित रुग्ण एकदम ठणठणीत झाले आहेत. तर ४४ हजार ३७४ कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्याचा सोमवारी १६६१ रुग्णांना घरी सोडण्यात आले. त्याचवेली कोरोनाच्या २५५३ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ४४ हजार ३७४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सोमवारपर्यंत पाठविण्यात आलेल्या ५ लाख ६४ हजार ३३१ नमुन्यांपैकी ८८ हजार ५२८ नमुने पॉझिटिव्ह (१५.६८ टक्के) आले आहेत. राज्यात ५ लाख ६४ हजार ७३६ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये ७५ हजार ७५९ खाटा उपलब्ध असून सध्या २६ हजार ७६० लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

दरम्यान, काल सोमवारी नोंद झालेल्या १०९ मृत्यूंपैकी ७१ पुरुष तर ३८ महिला आहेत. तर ६० वर्षे किंवा त्यावरील ५९ रुग्ण आहेत तर ४४ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ६ जण ४० वर्षांखालील आहे. या १०९ रुग्णांपैकी ७९ जणांमध्ये ( ७२.५ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता ३१६९ झाली आहे.

काल सोमवारी राज्यात नोंद झालेल्या १०९ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंपैकी आरोग्य मंडळ निहाय मृत्यू असे: ठाणे- ७० (मुंबई ६४, कल्याण-डोंबिवली २, उल्हासनगर १, वसई-विरार १, भिवंडी १, ठाणे १), नाशिक- १३ (नाशिक २, जळगाव ६, धुळे ४, अहमदनगर १), पुणे- १३ (पुणे ७, सोलापूर ६), कोल्हापूर- ३ (रत्नागिरी ३),औरंगाबाद-९ (औरंगाबाद ८, जालना १), लातूर-१ (नांदेड १).

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

चिंताजनक! जगभरातील कोरोना बाधितांचा आकडा ७० लाख पार

वृत्तसंस्था । जगभरात कोरोनाने थैमान घातलं आहे. कोरोनाच विषाणूचा फैलाव रोखायचा कसा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. अमेरिका, ब्राझिल, रशिया, स्पेन, यूके इटली, पेरु आदी देशात मोठ्या प्रमाणात कोरोनाव्हायरस साथीच्या आजारामुळे घबराट पसरली आहे. भारतातही चिंता व्यक्त करण्यात येत आहे. लॉकडाऊनमध्ये अनेक देशांनी कोरोनाला रोखण्याचा मोठा प्रयत्न केला आहे. मात्र, तरीही कोरोनाच्या रुग्णात सतत वाढ होताना दिसत आहेत.

एएफपीच्या वृत्तानुसार, जगभरात कोरोना प्रकरणांची संख्या ७० लाखांपेक्षा जास्त गेली आहे. त्यामुळे कोरोनाचा धोका अधिक वाढल्याचे या आकडेवारीवरुन दिसून येत आहे. तर worldometersच्या माहितीनुसार जगात ७१,९३,४७६ रुग्ण आहेत. अमेरिकेत २० लाख २६ हजार ४९३, ब्राझिल ७ लाख १० हजार ८८७, रशिया ४ लाख ७६ हजार, ६५८, स्पेन २ लाख, ८८ हजार ७९७, यूके २ लाख ८७ हजार३९९ आणि भारतात २ लाख ६५ हजार ९२८ इतकी रुग्ण संख्या आहे. जगात भारताचा क्रमांक सहावा आहे. त्यानंतर इटलीचा आहे. इटलीत २ लाख ३५ हजार २८७ रुग्ण संख्या आहे.

दुसरीकडे, भारतात सोमवारी कोरोनाचे ९ हजाराहून अधिक नवीन रुग्ण आढळले आहेत. सोमवारी, देशात कोरोना विषाणू बाधितांची संख्या अडीच लाखांपेक्षा जास्त असल्याचे दिसून आले आहे. ९ हजाराहून अधिक रुग्ण सापडण्याचे प्रमाण हे सतत सहा दिवसी दिसून आले आहे. त्यामुळे भारतात चिंता व्यक्त करण्यात येत आहे.जूनच्या पहिल्या आठवड्यात 60 हजाराहून अधिक नवीन कोरोनाचे रुग्ण सापडलेत. गेल्या २४ तासांत भारतात कोरोनाबाधित रुग्णांचा विक्रम नोंदवला गेला आहे. ९ हजार ९८३ नवीन रुग्ण सापडलेत. २ लाख ६५ हजार ९२८ इतकी रुग्ण संख्या आहे. कोरोना विषाणू संसर्गामुळे आणखी २०६ मृत्यू तर मृतांची संख्या ७ हजार १३५ वर गेली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

लॉकडाउनमध्ये गाडीच्या बोनटवर कोयत्याने कापला केक; माजी आमदाराविरुद्ध गुन्हा दाखल

नवी दिल्ली । उत्तर प्रदेशचे माजी आमदार भगवान शर्मा उर्फ ​​गुड्डू पंडित यांनी ईस्टर्न पॅरीफेरल एक्सप्रेस वेवर आपल्या एका समर्थकांचा वाढदिवस साजरा केला होता. पंडित आणि त्यांच्या समर्थकानीं यावेळी कोरोना संकटामध्ये सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडवत कोयत्याने केक कापल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यानंतर आता पंडित यांच्यावर दादरी कोतवाली येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती झोन ३ चे डीसीपी राजेश सिंग यांनी दिली आहे.

गुड्डू पंडित यांनी आपल्या समर्थकांसह गाडीच्या बोनटवर कोयत्याने केक कापला. यावेळी २० हुन अधिक लोक तेथे उपस्थित होते. मात्र यातील कोणीही तोंडाला मास्क लावलेला न्हवता. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर दादरी कोतवाली पोलिसांनी माजी आमदार आणि २० अज्ञात लोकांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. कोरोना साथीच्या आजारामुळे जिल्ह्यात कलम १४४ लागू असून सामाजिक अंतर पाळण्याचे व तोंडाला मास्क लावून बाहेर जाण्याचे कडक आदेश आहेत. मात्र माजी आमदार पंडित यांनी या आदेशांचे पालन न करत गर्दी जमावल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, माजी आमदार गुड्डू पंडित यांनी रविवारी आपल्या फेसबुक पेजवर लिहिले की आज त्यांचा वाढदिवस नाही. 10 जुलै रोजी त्याचा वाढदिवस आहे. सोमवारी व्हायरल झालेला व्हिडीओ हा आपल्या वाढदिवसाचा नसून मी द्रुतगती मार्गावरुन जात असताना काही तरुण वाढदिवस साजरा करताना दिसले. तेव्हा मी गाडी थांबवून त्यांना रोखले आणि सोशल डिस्टंसिंगचे पालन करण्याबाबत त्यांना सांगितले. मात्र व्हिडीओ व्हायरल झाल्याने आपलाच वाढदिवस असल्याचा गैरसमज काहींचा झाला असून ते चुकीचे आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

कोरोना रुग्णांवर आता घरच्या घरी उपचार; जाणून घ्या सरकारची नियमावली

मुंबई । राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र यामध्ये लक्षणे नसणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे. त्यामुळे अशा रुग्णांवर घरच्या घरी उपचार करण्याचे आदेश सार्वजनिक आरोग्य विभागाने दिले आहेत. याबाबत सरकारने एक नियमावलीही सादर केली आहे.

राज्यात अनलॉक सुरु झाला आणि सरकारने अनेक नियम शिथिल केले. त्यामुळे कोरोनाग्रस्तांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केली आहे. रुग्णांवर होणार खर्च जास्त असल्याने आणि रुग्णालयांत बेड्सची उपलब्धताही कमी असल्याने आता सरकारने कोरोना रुग्णांवर घरच्या घरी उपचार करण्याचे आदेश काढले आहेत.

यानुसार कोरोनाग्रस्तांचा वर्गीकरण करण्यात आले आहे. सौम्य आणि अतिसौम्य लक्षणे असलेले, माध्यम तीव्र लक्षणे आणि तीव्र लक्षणे असलेले असं वर्गीकरण करण्यात आले आहे. तसेच खालील नियमांचे रुग्णांना पालन करावे लागणार आहे

– उपचार करणाऱ्या अधिकाऱ्यांनी रुग्णाला अतिसौम्य किंवा लक्षणे नसल्याबद्दल प्रमाणित केलेले असावे.
– रुग्णाच्या घरी अलगीकरणासाठी योग्य सोई उपलब्ध असाव्यात.
– घरी दिवस रात्र काळजी घेणारी व्यक्ती उपलब्ध असावी.
– काळजी वाहू व्यक्ती आणि उपचार देणारे रुग्णालय यांच्यामध्ये संपर्क व्यवस्था उपलब्ध असावी.
– वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार आणि प्रोटोकॉलनुसार हायड्रॉक्सिक्लोरोक्वीनची मात्र घ्यावी.
– मोबाईलवर आरोग्य सेतू अप्लिकेशन डाउनलोड करावं.
– रुग्णांनी नियमितपणे प्रकृतीबाबत पाठपुरावा विषयी जिल्हा सर्वेक्षण अधिकारी आणि सर्वेक्षण पथकास माहिती देणे अनिवार्य आहे.
– रुग्णाने स्वतः गृह विलगीकरण करण्याविषयी प्रतिज्ञापत्रक भरून द्यावे आणि सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे.
– १७ दिवसांनंतर रुग्णाला लक्षणे नसतील तर त्याला गृह विलगीकरणातून मुक्त करावं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

धक्कादायक! मुंबईतील गायब झालेल्या कोरोनाग्रस्तांचा मृतदेह बोरिवली स्थानकात सापडला

मुंबई प्रतिनिधी । राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसागणिक झपाट्याने वाढ होत आहे. मुंबई शहरात राज्यातील सर्वाधिक कोरोनाबाधित असून तेथील परिस्थिती बिकट बनत आहे. अशात कांदिवली येथील शताब्दी रुग्णालयातून गायब झालेल्या एका कोरोनाग्रस्तांचा मृतदेह बोरिवली स्थानकात सापडल्याने एकाच खळबळ उडाली आहे.

कांदिवली येथील शताब्दी रुग्णालयातून कोरोना रुग्ण गायब झाला होता. यानंतर रुग्णांच्या नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनाशी संपर्क साधला असता त्यांना उडवाउडवीची उत्तरे मिळाली होती. त्यानंतर आता सदर ८० वर्षीय कोरोना रुग्णाचा मृतदेह बोरिवली स्थानकात सापडल्याने बोरिवली आणि परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान, यामुळे आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार उघड्यावर आला आहे. भाजप नेते आणि विरोधकांनी याआधीही अनेकदा मुंबईतील रुग्णालयात नियोजनाची वानवा असल्याचे ट्विट केले होते. आजच्या या घटनेमुळे पुन्हाएकदा रुग्णालयांचा बेजाबदारपणा उघड पडला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

शेतकऱ्यांना दिलासा! येत्या २ दिवसांत मान्सून महाराष्ट्रात होणार दाखल

मुंबई । निसर्ग चक्रीवादळामुळे मान्सून ला पोषक वातावरण तयार झाले असून यंदा मान्सून वेळेआधीच दाखल झाला आहे. केरळ येथे मान्सून दाखल झाला असून येत्या २ ते ३ दिवसांत मान्सून महाराष्ट्रात दाखल होणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

येत्या २ – ३ दिवसात मान्सून महाराष्ट्रात दाखल होणार असून यामुळे बळीराजा सुखावला आहे. सध्या शेतकऱ्यांची पेरणी सुरु असून मान्सून वेळेआधी दाखल होणार असल्याने यामुळे शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे. १० जून पर्यंत मान्सून राज्यात दाखल होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

दरम्यान, गोवा आणि दक्षिण कोकणाकडे मान्सूनची वाटचाल सुरु असून लवकरच तो महाराष्ट्रात दाखल होणार आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे मान्सून वेळे आधीच दाखल होणार आहे. तसेच पुढील ४८ तासात तेलंगणा, ओडिसा, महाराष्ट्र, गुजरात या चार राज्यांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! पीक कर्ज आता मिळणार ऑनलाईन

सोलापूर प्रतिनिधी । बळीराजाला शेतीतील कामे सोडून वारंवार हेलपाटे मारायला लागू नयेत, यासाठी त्यांना आता पीक कर्जासाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. या नव्या प्रयोगाला कालपासून सोलापूरमधून सुरुवात करण्यात आली आहे.

कोरोनामुळे सरकारी कार्यालये आणि विकास सोसायट्यांची कार्यालये बंद असल्याने सर्व उतारे संबंधित बँकांनी ऑनलाईन काढुन प्राप्त अर्जावर तीन दिवसात कार्यवाही करायची आहे. आता हा प्रयोग राज्यभर राबविला जाणार आहे. राज्यातील सुमारे 43 लाख शेतकरी महात्मा फुले शेतकरी कर्ज माफीस पात्र ठरले असून त्यापैकी 28 लाखाहून अधिक शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे.

दरम्यान, उर्वरित शेतकऱ्यांच्या याद्या तयार आहेत मात्र कोरोनामुळे काम थांबले आहे. तत्पूर्वी कोरोनाचा फटका बळीराजाला बसू नये या हेतूने सरकारी पातळीवर सर्वोतपरी प्रयत्न सुरु आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

सोलापुरात करोनाचे आणखी आठ बळी; ३३ नवे रूग्ण

सोलापूर प्रतिनिधी । सोलापूर शहरात आज आठ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाला. तर ३३ नव्या रूग्णांची भर पडली. एकूण करोना बळींची संख्या आता ११५ झाली आहे. तर करोनाबाधितांची एकूण संख्या १ हजार २२१ वर पोहोचली आहे.

तर जिल्हा ग्रामीणमध्ये आज दुपारपर्यंत दोन नवे रूग्ण सापडले आहेत. त्यामुळे तेथील एकूण रूग्णसंख्या ८२ झाली आहे. यात सहा मृतांचा समावेश आहे. त्यामुळे शहर व जिल्ह्यात मिळून एकूण मृतांचा आकडा आता १२१ वर पोहोचला आहे. तर रूग्ण संख्याही १ हजार ३०३ इतकी झाली आहे.

आज सायंकाळी प्राप्त झालेल्या माहितीनुसार करोनाबाधित सहा पुरूष व दोन महिला रूग्णांचा मृत्यू झाला. तर १३ महिलांसह ३३ नव्या रूग्णांची नव्याने भर पडली. काल रविवारी सायंकाळपर्यंत २४ तासांत १३ रूग्णांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा ८ रूग्णांचा मृत्यू झाल्यामुळे करोना विषाणूचे भयसंकट चिंताजनक ठरले आहे.

आज सोलापूर शहरातील ५५ तर ग्रामीण भागातील २५ रूग्ण करोनामुक्त झाले. आतापर्यंत शहर व जिल्ह्यातील मिळून ७१५ रूग्णांनी करोनावर मात केली. त्याची टक्केवारी ५४.८७ इतकी आहे.एकीकडे नवे रूग्ण व मृतांची संख्या वाढत असताना करोनामुक्त होणाऱ्या रूग्णांचे प्रमाणही वाढले आहे, हे चित्र आश्वासक मानले जात आहे.

Solapur

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.