Thursday, January 1, 2026
Home Blog Page 5686

शिक्षक पती पत्नीच्या घरात चोरी; कराड तालुक्यात चोरट्यांचेही अनलाॅन १.० सुरु

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

मलकापूर ता. कराड गावच्या हद्दीत बंद घराचे कुलूप कशानेतरी तोडून आत प्रवेश करून घरातील सोन्या-चांदीचे दागिने व सॅमसंग कंपनीचा टीव्ही व रोख रक्कम असा एकूण 21 हजार 500 रूपयाचा मुद्देमाल चोरणार्‍या दोन चोरट्याना कराड शहर गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने अटक केली आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सुनिल चंद्रकांत धरागडे (वय 33 रा. आझाद कॉलनी, आगाशिवनगर), श्रावण राजेश कांबळे (वय 26 रा. घारेवाडी, ता. कराड) असे अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, फिर्यादी पती-पत्नी हे दोघेही शिक्षक असून ते मलकापूर ता. कराड गावच्या हद्दीत राहत असून त्यांच्या बंद घराचे कुलूप सुनिल धरागडे व श्रावण कांबळे या दोघांनी कशानेतरी तोडून आत प्रवेश करून घरातील सोन्या-चांदीचे दागिने व सॅमसंग कंपनीचा टीव्ही व रोख रक्कम असा एकूण 21 हजार 500 रूपयाचा मुद्देमाल चोरून नेला होता. याप्रकरणी पोलीस उपअधिक्षक सुरज गुरव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांच्या आदेशान्वये गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गोडसे यांच्या अधिपत्याखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेची वेगवेगळी पथके तयार करण्यात आली होती.

दरम्यान, पोलीस हवालदार जयसिंग राजगे व मारूती लाटणे यांच्या पथकास तपासा दरम्यान घरफोडी ही घारेवाडी व आगाशिवनगर येथील रेकॉर्डवरील गुन्हेगारांनी केली असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांचा शोध घेऊन त्यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून गुन्ह्यात चोरीस गेलेले सोन्या-चांदीचे दागिने, टीव्ही व रोख रक्कम असा संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केला आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता दोन दिवसाची पोलीस कोठडी मिळाली असून अधिक तपास पोलीस हवालदार सुभाष फडतरे व तानाजी बागल करीत आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

बाबासाहेबांचा पुतळा मेड इन इंडियाच हवा; रामदास आठवलेंचा मेड इन चायनाला विरोध

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रिपब्लिकन पक्षाच्या आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री पदावर असणाऱ्या रामदास आठवले यांनी सोमवारी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या इंदूमिल इथे उभारण्यात येत असलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकाच्या कामाच्या आढाव्याची बैठक घेतली. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांनी आज सर्वांशी चर्चा केली. या स्मारकाचा चौथरा चीन मध्ये बनविले जाणार होते. हा निर्णय रद्द करावा आणि हा पुतळा भारतात अर्थात मेड इन इंडिया असावा अशी मागणी आठवलेंनी केली आहे. सध्या चीनमध्ये कोरोनाचे संक्रमण मोठ्या प्रमाणात सुरु असून अशा परिस्थितीत तिथे पुतळा बनविणे योग्य नाही असे आठवले म्हणाले.

भारतात हा पुतळा बनविण्यासाठी भारतातील ख्यातनाम शिल्पकार राम सुतार यांची तयारी असल्याचे सांगत त्यामुळे भारतातील अनेकांना रोजगार मिळेल असे त्यांनी सांगितले. इंदुमिल आणि चैत्यभूमीच्या दरम्यान समुद्राजवळून रस्ता तयार केला जाणं महत्त्वाचं असल्याचं सांगत त्यासाठी लागणारी सीआरझेडची पर्यावरण मंत्रालयाची परवानगी मिळवून देण्यास आपण पुढाकार घेणार असल्याचा विश्वास आठवले यांनी दिला. या स्मारकातील नियोजित विविध सभागृहांच्या कामांपैकी ७०% काम पूर्ण झाले असल्याचे आणि स्मारकाच्या फाउंडेशनचे काम १००% पूर्ण झाले आहे,  तसेच बेसमेंटचे ७२% काम पूर्ण झाले असून स्मारकाच्या कामाचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. अशी माहिती शापूरजी पालनजी कंपनीचे व्यवस्थापक उमेश साळुंखे यांनी दिली.

या स्मारकाच्या कामासाठी जवळपास ३ वर्षे कालावधी लागणार असून सध्या संचारबंदीमध्ये हे काम दोन महिने थांबविण्यात आले आहे. स्मारकाच्या कामासाठी १ हजार ८९ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. सध्या कामगारांची कमतरता आहे मात्र युद्धपातळीवर काम सुरु आहे अशी माहिती मिळाली आहे. याबरोबर “दरवर्षी पावसाळयाच्या दिवसांमध्ये चैत्यभूमीच्या स्तूपाला हानी पोहोचते, म्हणूनच चैत्यभूमीसारखा भव्य स्तूप उभारण्यात यावा” अशी विचारणा त्यांनी केली आहे. तसेचशिवाय चैत्यभूमीपाशी समुद्राच्या दिशेने रस्ता वाढवण्यासाठी सध्या उभारण्यात आलेली भिंत वाढवावी अशी सूचनाही त्यांनी केली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

माजी कर्णधार राहुल द्रविड कडून विराट कोहलीचे कौतुक; म्हणाला,” तो कसोटी क्रिकेटचे महत्त्व जाणतो”

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनामुळे जगभरातील क्रीडा स्पर्धांवर गंडांतर आले होते. कोरोनाला रोखण्यासाठी जगभरात लॉकडाऊन सुरु करण्यात आलेला होता. त्यामुळे जवळपास सर्वच देशातील खेळाडू हे घरातच होते. आता बहुतेक करून सर्व देशांमध्ये हळूहळू लॉकडाऊन मध्ये शिथिलता देण्यास सुरुवात झाली आहे. अशातच भारतीय क्रिकेट संघानेही मैदानावर पुन्हा परतण्याची घोषणा केली आहे. अशातच भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविड याने नुकतेच कर्णधार विराट कोहली याचे कौतुक केले आहे. भारताचा कर्णधार विराट कोहली हा कसोटी क्रिकेटचा मोठा चाहता असून त्याला कसोटी सामन्यांत खेळण्याचे महत्त्व चांगलेच ठाऊक आहे, अशा शब्दांत माजी क्रिकेटपटू राहुल द्रविडने कोहलीवर स्तुतीसुमने उधळली आहेत.

कोहलीच्याच कर्णधारपदाखाली भारतीय संघाने तब्बल तीन वर्षे जागतिक क्रमवारीतील आपले अग्रस्थान टिकवून ठेवले होते. ‘‘विराट कोहली हा कसोटी सामन्यांचे महत्त्व जाणून आहे. कसोटी क्रिकेटच्या दृष्टीने ही फारच आनंदाची गोष्ट आहे. जेव्हा एखाद्या संघाचा कर्णधार हा क्रिकेटच्या या पारंपरिक प्रकाराचे महत्त्व जाणतो, त्या वेळी त्याची आणि संघाचीही त्या प्रकारातील कामगिरी सर्वोतम होते,’’ असे द्रविड याने सांगितले.या माजी क्रिकेटपटूने संजय मांजरेकर यांच्याशी साधलेल्या ऑनलाइन संवादादरम्यान कोहलीविषयीचे आपले मत मांडले.

‘‘कोणताही क्रिकेटपटू हा कसोटी सामन्यांत अशी कामगिरी करतो यावरूनच जास्त ओळखला जातो. आमचा जेव्हा कधी संवाद होतो, त्या वेळी कोहली कसोटी क्रिकेटचा आवर्जून उल्लेख करतो. कसोटी सामन्यांमधील त्याची गेल्या काही वर्षांतील कामगिरी अत्यंत कौतुकास्पद आहे. भारताच्या अनेक युवा खेळाडूंनी त्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवायला पाहिजे,’’ असेही द्रविडने यावेळी सांगितले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

कोरोनाचा धोका कायम; ‘या’ दोन राज्यांनी पुन्हा वाढवला लाॅकडाउन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात कोरोना ग्रस्त रुग्णांची संख्या वाढतेच आहे. त्याचप्रमाणे देशातील अर्थव्यवस्था देखील ढासळते आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आता संचारबंदीच्या पाचव्या टप्प्यात नियम शिथिल केले आहेत. कंटेन्मेंट झोन सोडून इतर ठिकाणी आता हळूहळू गोष्टी सुरु केल्या जात आहेत. हे सर्व सुरु करत असताना सामाजिक अलगाव चे नियम मात्र बंधनकारक असणार आहेत. दुसरीकडे देशातील रुग्णसंख्या वाढतेच आहे. काही राज्यांमध्ये रुग्णसंख्या पूर्वी कमी होती मात्र आता वाढते आहे.

पश्चिम बंगाल आणि मिझोराम या दोन राज्यांनी वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन राज्यातील संचारबंदी आणखी वाढविली आहे. केंद्र सरकारने नियम शिथिल केले असले तरी देशातील रुग्णसंख्या काही कमी होत नाही आहे. केंद्र सरकारने नियमांसाठी राज्यांना स्वातंत्र्य दिल्यामुळे आता या दोन राज्यांनी संचारबंदी वाढविली आहे.

शिथिल केलेल्या नियमामुळे कोरोनाग्रस्तांची संख्या राज्यांची चिंता वाढवीत आहेत. स्थलांतरित मजूर आणि केंद्र सरकारने प्रवासी वाहतुकीला परवानगी दिल्यानंतर अनेक राज्यात करोनाग्रस्त रुग्ण वाढले आहेत. मिझोराममध्येही गेल्या काही दिवसात रुग्णसंख्या वाढत आहे. म्हणून मिझोरामचे  मुख्यमंत्री झोरमथंगायांनी त्यांच्या ट्विटर अकॉउंटवरून संचारबंदी दोन आठवडे वाढविली असून विलगीकरणाचा कालावधी २१ दिवसांचा केला असल्याची माहिती दिली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

सरकारच्या नावाखाली महाराष्ट्रात सर्कस सुरु आहे – राजनाथ सिंह 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाच्या संकटकाळात महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच पेटले आहे. आरोप प्रत्यारोप यामुळे महाराष्ट्रातील राजकारण देशभरात गाजते आहे. रोज नव्याने एकमेकांवर आरोप केले जातात त्याला उत्तरे दिली जातात. पुन्हा त्यावर काहीतरी विधाने केली जातात. आता केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनीदेखील यावर आता टीका केली आहे. ते म्हणाले “महाराष्ट्रात सरकारच्या नावाखाली सर्कस सुरु आहे.”

भाजपच्या जनसंवाद कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी ते म्हणत होते. या संकटकाळात जे काही महाराष्ट्रात सुरु आहे, ते सर्व काही चांगले दिसत नाही. असे ते म्हणाले. त्यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचा उल्लेख करत, शरद पवारांच्या हाती या सरकारची सूत्र आहेत तरीही असे घडते आहे ही बाब आश्चर्य वाटण्याजोगी आहे असे म्हणाले. महाराष्ट्रात सरकार नावाची काही गोष्ट अस्तित्वात आहे का? महाराष्ट्र कोरोनाच्या बाबतीत आता चीनला मागे टाकेल अशी भीती व्यक्त होते आहे. या सगळ्याला सरकारची अकार्यक्षमता म्हणायचं का? असा प्रश्नही राजनाथ सिंह यांनी उपस्थित केला आहे.

या सरकारमध्ये काहीही समन्वय नाही अशी टीका करत त्यांनी आम्ही सर्वतोपरी मदत करत असूनही महाष्ट्रातील संख्या नियंत्रणात नाही ही दुर्दैवाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली आहे. जबाबदारी झटकून टाकणे ही काँग्रेसची जुनी परंपरा आहे असे म्हणत त्यांनी राहुल गांधींसहित काँग्रेसवरदेखील निशाणा साधला. सोनू सुदवरच्या टिकेवरून त्यांनी शिवसेनेवरही टीका केली. यावेळी त्यांनी विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेनेने आमचा विश्वासघात केल्याचा आरोप देखील केला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

कराड तालुक्यात १८ कोरोना मुक्त रुग्णांना कृष्णा हॉस्पिटलमधून डिस्चार्ज

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी |

 कराडच्या कृष्णा हास्पिटलमध्ये कोरोनाग्रस्त रुग्ण उपचार घेत आहेत. शेणोली स्टेशन येथील 7, म्हासोली येथील 3, वानरवाडी येथील 3, करपेवाडी, तामिनी-पाटण, साकुर्डी, सदुर्पेवाडी आणि गलमेवाडी येथील प्रत्येकी अशा एकूण 18 कोरोनामुक्त रूग्णांना आज कृष्णा हॉस्पिटलमधून टाळ्यांच्या गजरात डिस्चार्ज देण्यात आला. याच्याबरोबर आत्तापर्यंत कृष्णा हॉस्पिटलमधून एकूण 162 कोरोनामुक्त रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोरोनाची लढाई जिंकत हे लोक आज कोरोनमुक्त होऊन आपापल्या घरी गेले.

कराड तालुक्यातील शेणोली स्टेशन येथील 36 वर्षीय पुरूष, 28 वर्षीय पुरूष, 26 वर्षीय महिला, 34 वर्षीय पुरूष, 24 वर्षीय युवक, 7 वर्षीय मुलगी, 13 वर्षीय मुलगी, म्हासोली येथील 15 वर्षीय मुलगा, 14 वर्षीय मुलगा, 12 वर्षीय मुलगा, वानरवाडी येथील 40 वर्षीय पुरूष, 17 वर्षीय मुलगा, 29 वर्षीय मुलगा, करपेवाडी येथील येथील 16 वर्षीय मुलगा, कामिनी-पाटण येथील 25 वर्षीय युवती, साकुर्डी येथील 27 वर्षीय युवक, सदुर्पेवाडी येथील 4 वर्षीय मुलगी, गलमेवाडी येथील 12 वर्षीय मुलगी असे हे रुग्ण आहेत. या रुग्णांना डिस्चार्ज देताना येथील तहसीलदार अमरदीप वाकडे यांनी हजेरी लावली होती.

यावेळी कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संगीता देशमुख, प्रसुतीरोग तज्ज्ञ डॉ. एन. एस. क्षीरसागर, डॉ. अमोल गौतम, डॉ. अर्चना रोकडे, डॉ. दिग्विजय कदम, डॉ. अश्वती विश्वनाथ, डॉ. विनीत चौधरी, डॉ. श्रद्धा शेटे, डॉ. सुशील घारगे, डॉ. स्तुती उगीले, डॉ. आशुतोष बंडगर, डॉ. अनिकेत सुरुशे यांच्या हस्ते कोरोनामुक्त रूग्णांचा पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. कोरोनारुग्ण मोठ्या संख्येने बरे होत आहेत हे सकारत्मक चित्र आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

म्हणुन फडणवीसांनी मानले शिवसेनेचे आभार 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संचारबंदीच्या काळात अभिनेता सोनू सूद याने स्थलांतरितांना घरी पोहोचविण्यासाठी गाड्यांची उपलब्धता करून दिली होती. यानंतर माध्यमांमध्ये आणि सोशल मीडियावर त्याचे भरभरून कौतुक झाले होते. मात्र काही दिवसांपूर्वी शिवसेना नेते संजय राऊत यांनी ‘सोनू सूदचा भाजपने प्यादा म्हणून वापर करून त्याला समाजसेवकाचा मुखवटा लावला’ असे विधान केले होते. त्यांच्या या विधानाला उत्तर देत विरोधी पक्षनेते आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेचे आभार मानले आहेत. चांगले काम करणारे भाजपचे असतात हा शिवसेनेला आहे, याचा आम्हाला आनंदच आहे असे ते म्हणाले. निसर्ग चक्रीवादळात नुकसान झालेल्या भागात बचाव साहित्य पाठवीत असताना ते माध्यमांशी बोलत होते.

निसर्ग चक्रीवादळामुळे कोकणात मोठ्या प्रमाणात झालेल्या नुकसानीसाठी त्यांनी हे बचाव साहित्य पाठविले आहे. म्हणून मुंबई, ठाणे, पनवेलमधून पाठविण्यात आलेल्या या साहित्यात अन्नधान्य, तेल, सिमेंटच्या शीट, कौलं आणि सोलारचे कंदील यांचा समावेश आहे. जसजसे हे साहित्य जमा होईल तसा हे पाठविले जाईल अशी माहिती त्यांनी दिली. हे साहित्य पोहोचविण्याची व्यवस्था करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी सोनू सूद यांच्यावरील टीकेचा प्रश्न विचारला असता त्यांनी शिवसेनेचे आभार मानले तसेच सोनू सूद यांच्यावर अन्याय होता काम नये असे ते म्हणाले.

 

‘सोनू सूद यांनी स्वयंप्रेरणेने ही मदत केली आहे. त्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. एखादा व्यक्ती चांगले काम करत असेल तर त्याला प्रोत्साहन दिले पाहिजे. आमच्या सरकारच्या काळातही आम्ही जेव्हा जलशिवाराचे काम करत होतो तेव्हा नाम फौंडेशन आणि पाणी फौंडेशन च्या माध्यमातून ही काम केले जात होते. मात्र आम्ही त्यांचा हेवा नाही केला. त्यामुळे सोनू सूद वर अन्याय होता काम नये’ असे ते यावेळी म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

मुंबई महापालिकेच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनाही ५० लाखांचे विमा कवच

मुंबई । कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी मुंबई महानगरपालिकेने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. त्यानुसार कोरोनाशी संबंधित कर्तव्य बजावताना मृत्यू झालेल्या पालिका कर्मचाऱ्यांच्या वारसांना ५० लाखांचे सानुग्रह सहाय्य मिळणार आहे. पालिकेच्या एक लाखाहून अधिक कर्मचाऱ्यांना या विमा योजनेचा लाभ मिळणार आहे. हे विमाकवच केवळ पालिका कर्मचारी नव्हे तर कंत्राटी तत्त्वावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही मिळणार आहे. त्यामुळे आपला जीव धोक्यात घालून मुंबईकरांची सेवा करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना फार मोठा दिलासा मिळणार आहे.

गेल्याच महिन्यात वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनीही कोरोनाच्या संकटकाळात मुंबई महानगरपालिकेने कंत्राटी कामगारांबाबत भेदभाव करु नये, अशी मागणी केली होती. त्यांनाही महापालिकेच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे प्रोत्साहन भत्ता मिळावा, असे त्यांनी म्हटले होते. त्यांची ही मागणी मान्य झाली नसली तरी ५० लाखांचे विमासंरक्षण मिळणे, ही कंत्राटी कर्मचाऱ्यांच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण बाब आहे.

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. येत्या काही दिवसांत मुंबईतील कोरोनाचा प्रादुर्भाव शिगेला पोहोचण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत मुंबई मनपाचे आपत्कालीन कर्मचारी जीवावर उदार होऊन लोकांच्या सेवेसाठी रस्त्यावर उतरून काम करत आहेत. हे कर्मचारी आपल्याला २४ तास पाणी, वीज मिळावी यासाठी कार्यरत आहेत. तर शहरात कचऱ्याची, सांडपाण्याची समस्या निर्माण होऊ नये म्हणून चतुर्थश्रेणी कामगार आपले कर्तव्य बजावत आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

डोंगरातील खडकात सापडला ७.५ कोटींचा खजिना, कवितांच्या शब्दात लपविला गेला होता नकाशा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध कला आणि पुरातन वस्तू जमा केलेल्या फॉरेस्ट फेन यांनी सांगितले की, एक दशकांपूर्वी रॉकी माउंटनच्या जंगलात त्याला दहा लाख डॉलर्सचा एक खजिना सापडला होता. गेल्या रविवारीच त्यांनी याबाबत विधान केले होते. जर हे दहा लाख डॉलर्स रुपयामध्ये मोजले गेले तर ते सुमारे ७.५ कोटी रुपये इतके होतात.

८९ वर्षीय फॉरेस्ट फेन यांनी “सांता फे न्यू मेक्सिकन” या मीडिया हाऊसला सांगितले की,’काही दिवसांपूर्वीच त्यांना हा खजिना मिळाला होता. मात्र, ज्याला हा खजिना सापडला त्याला त्याचे नाव बाहेर येऊ द्यायचे नाही आहे.’ तो म्हणाला की,’ या खजिन्याला शोधणाऱ्याने त्याला त्याचे छायाचित्र पाठवले आहे, ज्यामुळे याची पुष्टी मिळते आहे की ती व्यक्ती खजिन्यापर्यंत पोहोचली आहे.’

Ancient Treasures by Dekogon Studios in Props - UE4 Marketplace

फॉरेस्ट फेनने या खजिन्याच्या लोकेशनबद्दल अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही. त्याने २०१० मध्ये प्रकाशित झालेल्या “द थ्रील ऑफ द चेस” या आपल्या आत्मचरित्रामध्ये खजिन्यापर्यंतच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी २४ ओळींची एक कविता लिहिली होती. जी एका कोड्या सारखीच होती आणि जी व्यक्ती ते कोडे सोडवेल तीच व्यक्ती त्या खजिन्यापर्यंत जाऊ शकत होती.

या खजिन्यात अनेक सोन्याचे नाणी, भरपूर दागदागिने आणि इतरही अनेक मौल्यवान वस्तू आहेत. अशा या खजिन्याला शोधण्यासाठी पश्चिमी अमेरिकेतील दुर्गम भागातील हजारो लोकांनी प्रयत्न केला आहे. यासाठी बर्‍याच लोकांनी आपली नोकरी देखील सोडली. या व्यतिरिक्त असेही म्हटले जाते की त्याच्या शोधत आतापर्यँत किमान चार जणांचा मृत्यू झाला.

Ancient Treasures by Dekogon Studios in Props - UE4 Marketplace

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

पाकिस्तानी वृत्तपत्राकडून योगींचे कौतुक; इम्रान खान यांना घरचा आहेर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होत आहे. विविध देश त्यांच्या पातळीवर या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व देशातील स्थिती नियंत्रणाखाली आणण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. काहींना यश येते आहे तर काहींचे प्रयत्न सुरु आहेत. असे असताना पाकिस्तानातील एका वृत्तपत्राने उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे कौतुक त्यांच्या वृत्तपत्रातून केले असल्याची घटना समोर आली आहे. ‘डॉन’ असे या वृत्तपत्राचे नाव आहे.

उत्तरप्रदेश सारख्या लोकसंख्येने मोठ्या असणाऱ्या राज्यात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कोरोना विषाणूच्या संक्रमणाची परिस्थिती अतिशयउत्तम हाताळली आहे. म्हणून पाकिस्तानी वृत्तपत्र डॉन ने योगींवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. पाकिस्तानी माध्यमातून योगींचे कौतुक ही बाब आश्चर्यकारक अशीच आहे. या वृत्तपत्राचे संपादक फहद हुसैन यांनी योगींचे तोंडभरून कौतुक केले आहे. ते डॉनच्या इस्लामाबाद आवृत्तीचे संपादक आहेत.

दरम्यान पाकिस्तान ला कोरोना संक्रमणातून बाहेर पडण्यासाठी मोठ्या प्रमाणात संघर्ष करावा लागत आहे असे म्हणत त्यांनी इम्रान खान यांच्या सरकारवर टीकाही केली आहे. याचवेळी त्यांनी पाकिस्तान आणि उत्तरप्रदेश यांची तुलना करीत योगींचे कौतुक केले. रविवारी सकाळी फहद हुसैन यांनी पाकिस्तान आणि उत्तर प्रदेश यांच्या करोना व्हायरसच्या हाताळणीमधला फरक दाखवून देणारा एक आलेख टि्वट केला. संचारबंदीचे काटेकोर पालन केल्यामुळे उत्तरप्रदेशमधील मृतांची संख्या कशी कमी आहे हेही या आलेखात त्यांनी म्हंटले आहे. उत्तर प्रदेश आणि पाकिस्तानची लोकसंख्या जवळपास सारखीच असल्याचे त्यांनी म्हंटले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.