Wednesday, December 31, 2025
Home Blog Page 5694

मुंबई, दिल्ली पेक्षा ‘या’ शहरात कोरोनाचा मृत्यू दर सर्वाधिक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिल्ली आणि मुंबई हे भारतातील कोरोनाव्हायरसचा सर्वाधिक प्रादुर्भाव असलेली राज्ये आहे. देशातील एकूण कोरोना प्रकरणांपैकी २० टक्के प्रकरणे ही एकट्या मुंबईतून समोर आली आहेत. पण भारतातील दर दहा लाख लोकसंख्येच्या मागे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण हे गुजरातमधील अहमदाबाद शहरात घडले आहे. इतकेच नाही तर अहमदाबादमध्येही शंभर कोरोना प्रकरणातील सर्वाधिक मृत्यूचे प्रमाण (सीएफआर) आहे.

दर दहा लाख लोकसंख्येच्या मागे होणाऱ्या मृत्यूच्या बाबतीत मुंबई अहमदाबादनंतर दुसर्‍या क्रमांकावर आहे. देशातील सर्व मेट्रो शहरांपैकी बेंगळुरूचे स्थान हे कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूदराच्या बाबतीत सर्वात चांगले आहे. येथे कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचा दर शहरातील दहा लाख लोकसंख्येपैकी केवळ १४ इतकेच आहे. त्याच वेळी, चेन्नईमध्ये देखील दर शंभर कोरोना प्रकरणातील होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण सर्वात कमी आहे (सीएफआर). येथे होणाऱ्या मृत्यूचा दर हा दर शंभर कोरोना प्रकरणांमध्ये ०.९ टक्के इतकाच आहे.

हाय टेस्टिंग स्पीडमुळे मृत्यूचे प्रमाण होते कमी
तज्ञांच्या मते, मृत्यूचे प्रमाण कमी होणे हे व्यापक प्रमाणात घेतलेल्या टेस्टिंग आणि कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचा परिणाम आहे. टेस्टिंगचा स्पीड जास्त असल्यास, संसर्गाच्या प्रकरणातील होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण हे कमी केले जाऊ शकते. अहमदाबाद मध्ये होणाऱ्या मृत्यूची संख्या (६.९) हे हाय टेस्टिंग स्पीडमुळे कोरोना टेस्टिंगची संख्या कमी असल्याचे म्हटले जाते आणि एकूण मृत्यूच्या बाबतीतही अहमदाबाद दुसर्‍या क्रमांकावर आहे.

जर आपण कोरोनामुळे झालेल्या एकूण मृत्यूंकडे नजर टाकली तर अहमदाबादमध्ये आतापर्यंत ९५३ मृत्यू झाले आहेत, जे की मुंबईपेक्षा कमी आहेत. मुंबईत कोरोनामुळे १६९८ मृत्यू झाले आहेत. त्याच वेळी देशाच्या राजधानीत एकूण ६५० लोकांनी प्राण गमावले आहेत. या प्रकरणात बेंगळुरूमधील परिस्थितीही नियंत्रणात असून कोरोनामुळे इथे फक्त १४ च मृत्यू झाले आहेत.

महाराष्ट्रात आहे सर्वाधिक प्रकरणे
संपूर्ण भारतात कोरोना रूग्णांची संख्या ही अडीच लाखांच्या पुढे गेलेली आहे. सध्या देशातील सर्वात जास्त रुग्ण हे महाराष्ट्रात आहेत. राज्यातील मुंबई आणि पुणे शहरांमध्ये या साथीचा सर्वाधिक परिणाम झालेला आहे. नुकत्याच झालेल्या आकडेवारीनुसार मुंबई शहरातील नवीन प्रकरणांपेक्षा कोरोनाच्या टेस्टिंगचा स्पीड कमी राहिला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

WHO चा भारताला दिलासा; अपेक्षेपेक्षा कोरोना प्रसाराचा वेग कमीच

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । चीनपासून जगभर पसरलेल्या कोरोनाव्हायरसने भारतातही आपल्या संसर्गाचा परिणाम वेगाने दाखवायला सुरवात केली आहे. आतापर्यंत देशातील २.२६ लाख लोकांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. या सर्वांच्या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेने एक दिलासा देणारी बातमी दिली आहे. डब्ल्यूएचओने म्हटले आहे की, आम्ही भारताच्या कोरोनाच्या परिस्थितीतबाबत जे अंदाज बांधले होते त्यापेक्षा येथील परिस्थिती खूपच चांगली आहे. भारतात कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत ६,३४८ लोक मरण पावले आहेत.

भारतात कोरोना विषाणूच्या संसर्गाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून संक्रमित लोकांची संख्या ही ९ हजाराहून अधिक झालेली दिसून येत आहे. कोरोनाने संक्रमित होण्याच्या संख्येच्या बाबतीत भारताने आता इटलीला मागे टाकत जगातील सहाव्या स्थानावर झेप घेतली आहे. मात्र, जागतिक आरोग्य संघटनेच्या वतीने माहिती देताना असे म्हटले आहे की, हा विषाणू फार वेगाने भारतासह इतर दक्षिण आशियाई देशांमध्ये पसरला नाही.

वृत्तसंस्था रॉयटर्सच्या वृत्तानुसार, जागतिक आरोग्य संघटनेने अहवाल दिला आहे की, भारतात कोरोना विषाणूच्या संसर्गाची संख्या दर तीन आठवड्यांनी दुपटीने वाढत आहे, परंतु आतापर्यंत भारत आणि दक्षिण आशियाई प्रदेशांमध्ये कोरोना विषाणूच्या वाढीचा परिणाम हा तितकासा दिसून आलेला नाही. जागतिक आरोग्य संघटनेच्या आपत्कालीन पथकाचे प्रमुख डॉ. माईक रायन यांच्या म्हणण्यानुसार, दक्षिण आशियातील भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश येथे अतिशय दाट लोकवस्ती असूनही कोरोना विषाणूचा परिणाम अगदीच सौम्य झाला आहे. असे असले तरीही जोखीम मात्र अजूनही कायम आहे.

जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख वैज्ञानिक डॉ. सौम्या स्वामीनाथन म्हणतात की भारतातील दोन लाखांहून अधिक लोकांना कोरोना विषाणूची लागण झाली असली, तरी एक अब्ज तीस कोटी लोकसंख्या असलेल्या या देशात ते प्रमाण फारसे नाही आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

UNSC मध्ये भारताची जागा सुनिश्चित करण्यासाठी जयशंकरांनी अभियान केलं सुरु; ‘हा’ आहे अजेंडा

नवी दिल्ली । संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत बिगर स्थायी सदस्य म्हणून भारताची निवड निश्चित आहे. या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी भारताचा अजेंडा सांगितला आणि प्रचाराची सुरुवात केली. भारत यावेळी आशिया-प्रशांत समुहातून एकमेव देश असल्यामुळे बिनविरोध निवड होण्याची शक्यता आहे.यासाठी संयुक्त राष्ट्र महासभेकडून १७ जूनला मतदान होईल. या निवडणुकीत १० बिगर स्थायी सदस्यांपैकी ५ सदस्यांच्या निवडणुकीत भारत बिनविरोध सदस्य आहे. भारत बिनविरोध असला तरीही जयशंकर यांनी यूएनएससीमध्ये भारताची जागा सुनिश्चित करण्यासाठी अभियान सुरू केलं आहे.

आशिया-प्रशांत समूह क्षेत्रात भारत यावेळी एकमेव उमेदवार आहे. त्यामुळे भारताचा विजय निश्चित आहे. एस जयशंकर यांनी शुक्रवारी ब्रोशर जारी करत यूएनएससीमध्ये भारताच्या प्राथमिकता जाहीर केल्या. यापूर्वीही भारताने यूएनएससीमध्ये बिगर स्थायी सदस्य म्हणून २११ आणि २०१२ या दरम्यान काम केलं आहे. भारताने आतापर्यंत सात वेळा यूएनएससीचा बिगर स्थायी सदस्य म्हणून प्रतिनिधित्व केलं आहे. १९५०-१९५१, १९६७-१९६८, १९७२-१९७३, १९७७-१९७८, १९८४-१९८५, १९९१-१९९२ आणि २०११-२०१२ अशा सात वेळा भारताने प्रतिनिधित्व केलं.

१० वर्षांपूर्वीही भारताची यूएनएससीसाठी निवड झाली होती. आपण आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षेसाठी चार विविध आव्हानांचा सामना करत आहोत. अंतर्गत शासनच्या सामान्य प्रक्रियेतील तणावातही वाढ होत आहे, असं जयशंकर म्हणाले. करोना व्हायरससारख्या संकटामुळे जागतिक समुदाय अत्यंत संकटात आहे. त्यामुळे जानेवारी २०२१ मध्ये निवडून आल्यानंतर भारताचा ५ एस म्हणजेच संन्मान, संवाद, सहयोग, शांती आणि समृद्धी हाच जगासाठी दृष्टीकोन असेल असं जयशंकर यांनी सांगितलं.

आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये तातडीने सुधारणांची गरजही जयशंकर यांनी बोलून दाखवली. या परिस्थितीमध्ये भारत एक सकारात्मक जागतिक भूमिका निभावणारा देश आहे. भारताने नेहमीच आंतरराष्ट्रीय कायद्यांचा आदर केला आहे. आम्ही जागतिक मुद्द्यांवर बातचित, समाधान आणि निष्पक्षतेच्या बाजूने आहोत आणि आम्ही जागतिक विकासावर जोर देतो, असं ते म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाला शिवसेना प्रमुखांचे नाव द्यावे – गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई 

सातारा प्रतिनिधी | सह्याद्री व्याघ्र संवर्धन प्रकल्पाची व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेण्यात आली. संवर्धनमंत्री संजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. संबंधित अधिकारी, पदाधिकारी आणि सचिव यांच्यासोबत गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनीही या बैठकीला उपस्थिती लावली होती. यावेळी त्यांनी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव द्यावे अशी मागणी केली आहे.

यावेळी देसाई यांनी प्रकल्प आणि पर्यटन विकासाच्या संदर्भात त्यांनी काही मुद्दे मांडले. तसेच सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव द्यावे अशी मागणी ती याआधीपासूनच करत आहेत. या बैठकीतही त्यांनी ही मागणी केली. तसेच याबाबत शिफारसही केली. देसाई म्हणाले की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोबत चर्चा करून लवकरच हा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर येईल आणि नामविस्तारावर शिक्कामोर्तब होईल असा मला विश्वास आहे.

दरम्यान तालुक्यातील काही ठिकाणे पर्यटनाच्या दृष्टीने नव्याने विकसित करण्याचे ठरले असल्याचे त्यांनी सांगितले. घाटमाथ्यावर कोकण दर्शन विकसित करणे, वॉकिंग ट्रॅक करणे आदी गोष्टी केल्या जाणार असून त्यासाठी ६ कोटी रुपयांची तरतूद केल्याचे त्यांनी सांगितले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

फ्रान्सच्या सैन्याने मोस्ट वॉन्टेड उत्तर आफ्रिका अलकायदा प्रमुखाचा असा केला खात्मा

पॅरिस । उत्तर आफ्रिकेत अल कायद्याच्या दहशतवादी कारवाया करणारा आणि अल कायदाचा उत्तर आफ्रिका प्रमुख अब्देलमालेक ड्रॉकडेलचा खात्मा करण्यात आला आहे. फ्रान्सच्या सैन्याने केलेल्या कारवाई अब्देलमालेक ठार झाला आहे. फ्रान्सचे संरक्षण मंत्री फ्लोरेन्स पार्ली यांनी या गोष्टीची पुष्टी केली.

फ्लोरेन्स पार्ली यांनी सांगतिले की, या मोहिमेत इस्लामिक स्टेट दहशतवादी गटांच्या एका कमांडरला पकडण्यात आले आहे. दहशतवादा विरोधात हे मोठे यश मिळाले असून फ्रान्सचे सैनिक दहशतवाद्यांविरोधात आपली मोहीम सुरूच ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले. मालीमध्ये वर्ष २०१३ पासून फ्रान्सचे हजारो सैनिक तैनात आहेत. इस्लामिक स्टेटच्या दहशतवादाविरोधात फ्रान्सच्या सैनिकांची मोहीम सुरू आहे. फ्रान्सच्या या कारवाईमुळे अलकायदाला मोठा धक्का बसला आहे.

अल कायदा इस्लामिक मगरेबचा प्रमुथ अब्देलमालेक उत्तर आफ्रिकेतील दहशतवादी संघटनेच्या सर्व कारवायाची आखणी करत होता. त्याशिवाय अल कायद्याच्या जमात नुसरत अल-इस्लाम वल मुस्लिमिम या संघटेनेचेही नेतृत्व करत होता. त्याशिवाय त्याने अफगाणिस्तानमध्ये सोव्हिएत फौजांविरोधातील लढाईत सहभाग घेतला होता. अल्जेरियामध्ये २००७मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटमध्ये २२ जणांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्याचे नियोजनही त्यानेच केले असल्याचा आरोप होता. मागील अनेक वर्षांपासून त्याचा शोध सुरू होता.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

पंढरपुरातील साडेतीनशे मठ 2 महिन्यांसाठी बंद; पालिकेचा महत्त्वपूर्ण निर्णय

सोलापूर प्रतिनिधी | आषाढी एकादशी साठी आता पंढरपूरातील मठ, धर्मशाळा येथे वास्तव्य करण्यासाठी प्रशासनाने मनाई केली आहे. कोरोना चा संसर्ग वाढू नये यासाठी प्रशासन दक्षता घेत आहे. जर कोणी आढळले तर त्यांना कायदेशीर कारवाईस सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे आता पंढरपूरात भाविकानी येऊ नये असे आवाहन पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

आषाढी एकादशी १ जुलै रोजी पंढरपूरात होत आहे. सर्वात मोठ्या आषाढी एकादशी साठी पंढरपूरात वास्तव्य करण्यासाठी अनेक भाविक येथील मठ, धर्मशाळा मध्ये राहत असतात. पण यंदा कोरोना ने सर्वच थांबवले आहे.

एकादशी साठी पंढरपूरात येऊन मठात आणि धर्मशाळेत वास्तव्य करण्यासाठी प्रशासनाने मनाई केली आहे. याचाच भाग म्हणून पंढरपूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांनी पंढरपूरातील 350 ते ४५० मठ आणि धर्मशाळाना तशा सूचना दिल्या आहेत. सोबतच नगरपरिषदेचे कर्मचारी प्रत्येक मठात जाऊन तेथील खोल्यांची तपासणी सुध्दा करत आहेत.

जर मठात धर्मशाळेत पंढरपूर बाहेरील कोणी व्यक्ती वास्तव्यास आढळली तर संबधित व्यक्तीसह मठ, धर्मशाळा यांच्या वर सुध्दा कायदेशीर कारवाई होऊ शकते असा इशारा पंढरपूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांनी दिला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

WHO ने जाहीर केले मास्क घालण्याचे नवे निर्देश; ‘हे’ तुम्हाला माहिती असणे महत्वाचे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जागतिक आरोग्य संघटनेने आता मास्क घालण्या संदर्भात काही नवीन मार्गदर्शक सूचना जारी केलेल्या आहेत. ग्लोबल हेल्थ एजन्सीच्या या नवीन मार्गदर्शक सूचनांमध्ये असे म्हटले आहे की, ज्या ठिकाणी सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळले जाऊ शकत नाहीत अशा ठिकाणी लोकांनी मास्क घालावे. या नवीन मार्गदर्शकतत्त्वामध्ये फेस मास्क कोणी घालावा तसेच कोणत्या परिस्थितीत घालावा आणि त्याची पत किंवा कशापासून बनवलेले असावे याबद्दल माहिती देण्यात आलेली आहे.

विशेष म्हणजे, मास्क घालण्याच्या या मार्गदर्शक सूचनांसाठी डब्ल्यूएचओवर टीकादेखील झाली आहे. असे म्हटले गेले की, डब्ल्यूएचओकडून मास्क वापरण्या संदर्भातल्या मार्गदर्शक सूचना लवकर न देण्यात आल्यामुळे कोरोना जगभरात वेगाने पसरला.

मास्क अशा प्रकारचे असावेत
जागतिक आरोग्य संघटनेने मास्कच्या गुणवत्तेविषयीची माहिती दिली आहे. त्यांनी असे म्हटले आहे की नवीन संशोधनातून मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी कपडे आणि इतर प्रकारच्या मास्कशी संबंधित माहिती सांगितली आहे. आपल्याला बाजारपेठेतून फेस मास्क विकत घेता येतात तसेच ते घरीही बनवता येतात मात्र त्यामध्ये तीन प्रकारचे थर असावेत. पहिला अस्तरचा थर, पॉलिस्टरचा बाहेरील थर आणि मध्यभागी पॉलीप्रॉपिलिनने बनलेला ‘फिल्टर’ स्तर असा बनवलेला मास्क घालावा.

जागतिक आरोग्य संघटनेने असेही म्हटले आहे की सर्व देशांनी गर्दी असलेल्या ठिकाणी मास्क घालण्यास लोकांना प्रोत्साहित केले पाहिजे. तसेच अशा ठिकाण जेथे सामुदायिक संप्रेषणासारख्या परिस्थितीत आहेत जसे कि रेल्वे तसेच बस स्थानकांसारख्या गर्दीच्या ठिकाणी देखील मास्क वापरता येतील.

संघटनेच्या महासंचालकांनी बचाव केला
डब्ल्यूएचओचे महासंचालक डॉक्टर टेड्रॉस अ‍ॅडेनोम यांनी चेतावणी दिली आहे की, फेस मास्कवर जास्त अवलंबून राहणे देखील टाळले पाहिजे. त्यांच्या मते, फेस मास्क हा रोगाचा पराभव करण्यासाठी सुरु असलेल्या व्यापक रणनीतीचा एक भाग आहे मात्र यांबरोबरच इतर सावधगिरीचे उपाय देखील अवलंबणे तितकेच महत्वाचे आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

मुंबईसह राज्यातील ‘या’ शहरांत ओला-उबेर टॅक्सी सेवा सुरु

मुंबई । लॉकडाऊन हळहळू अनलॉक करण्यात येत असल्याने अर्थव्यवस्थेला गती मिळतानाच जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे. आता टॅक्सी धावणार असल्याने अनेकांना प्रवास करता येणार आहे. राज्यात अनलॉक-१ अंतर्गत काही सेवा सुरु करण्यात आल्या आहेत. यात आता ओला आणि उबेर टॅक्सीची भर पडणार आहे. ओला-उबेर टॅक्सी सुरु झाल्याने सर्वसामान्यांना आणि कार्यालयात जाणाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

राज्य सरकारने अत्यावश्यक प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ओला-उबर कंपन्यांच्या अप बेस्ड टॅक्सी सेवेचा पर्याय उपलब्ध झाला आहे. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी सुरक्षित प्रवास करण्यासाठी शासनाने काही नियमांचे पालन काटेकोर करण्याचे स्पष्ट बजावले आहे. हे नियम पाळले तर नागरिकांना प्रवास करता येईल. शहरांतर्गत सेवेसह आंतरजिल्हा वाहतुकीसाठी ही टॅक्सी सेवा सुरु करण्याची घोषणा ओला-उबेरने केली आहे.

मुंबईसह पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद आणि अन्य शहरांत ही सेवा सुरु करण्यात आली आहे, असे ओलाचे प्रवक्ते आनंद सुब्रमण्यम यांनी स्पष्ट केले आहे. तर उबेरच्या उबेर गो, प्रीमिअर आणि ऑटो रिक्षा प्रवास करण्याची मुभा आहे. सरकारने दिलेल्या आदेशाप्रमाणे प्रवाशांना आवश्यक कागदपत्रांसह सुरक्षित वावरच्या नियमांचे योग्य पालन करुन प्रवाशांना प्रवास करता येईल, असे उबेरच्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

राज्य सरकारने जाहीर केलेल्या नव्या नियमांनुसार वाहतूक रिक्षा, काळी-पिवळी टॅक्सी, आणि कॅबचालकांना वाहतूक करण्याची मुभा देण्यात आली आहे. प्रवासी आणि ओला टॅक्सी चालकांच्या सुरक्षेसाठी नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे स्पष्ट बजावण्यात आले आहे. त्यानुसार ओला-उबरने प्रवास करताना मास्कचा वापरणे, निर्जंतुकीकरण करुनच प्रवास करणे, रिक्षा-टॅक्सीमध्ये २ प्रवासी आणि ७ आसनी गाडीत ४ प्रवासी असावेत असे नियम पाळावे लागणार आहेत.

दरम्यान, ओला-उबेर टॅक्सी सुरु होत असल्याने सरकारी आणि खासगी कर्मचाऱ्यांना प्रवास कसा करायचा, याची चिंता थोडी कमी झाली आहे. लोकल बंद असल्याने एसटी-बेस्ट फेऱ्यांमध्ये गर्दी होत आहे. त्यामुळे कोरोना संसर्ग वाढण्याचा धोका होता. यामुळे कार्यालय कसे गाठायचे, असा सवाल उपस्थित होत होता. त्यामुळे हा प्रश्न काही प्रमाणात मिटणार आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

सुक्ष्मप्रतिबंध क्षेत्रातील हातावरच्या पोटाला मदतीचा हात

महाबळेश्वर प्रतिनीधी । कोव्हीड १९ संसर्गजन्य रोगामुळे जगावर संकट आले आहे. पाचगणीतील सिद्धार्थ नगरमध्ये कोव्हीड १९ रुग्न सापडल्याने कंटेनमेंट झोन लागु करण्यात आला. सिद्धार्थनगरमध्ये राहणाऱ्या शेकडो कुटुबांचे हातावर पोट आहे. मोलमजुरी करुन पोट भरणाऱ्या हातांना कंटेनमेट झोन लागु झाल्याने हालाखीच्या परीस्थितीला सामोरे जावे लागत आहे. सिद्धर्थ नगरमध्ये सुक्ष्मप्रतिबंध क्षेत्रामधील २९८ कुटुबांना पाचगणी नगरपालीकेकडुन जिवनावश्यक वस्तुचे किट तयार करुन घरपोच पोहोच केले गेले. सिध्दार्थ नगरमधील कुटुबांच्या हातावरील पोटाला कोरोना काळात हातभार मिळाला आहे .

पाचगणी नगरपालीकेच्या मुख्याअधिकारी अमिता दगडे पाटील व नगराध्यक्षा लक्ष्मी कर्हाडकर व सर्व नगरसेवकांच्या माध्यामातुन पाचगणीतील सुक्ष्मप्रतिबंध क्षेत्र सिध्दार्थ नगरमध्ये कोव्हीड १९ चे रुग्न सापडल्यावर युद्धपातळीवर प्रशासनाकडून हालचाली करण्यात आल्या . सुक्ष्म प्रतिबंध क्षेत्र असल्याने दुध व गॅस याच गोष्टी पोहोच करण्याचा आदेश होता . सिद्धार्थ नगरमधील बुहुतांशी कुटुंबाची चुल रोजमदारी करुन पेटते असल्याची बिकट अवस्था आहे .
.
गत काही आठवड्यापासून पाचगणी नगरपालीकेच सर्व कर्मचारी जीवाची बाजी लावुन सिद्धार्थ नगर सक्ष्मप्रतिबंध क्षेत्रामध्ये अहोरात्र मेहनत घेत असुन कोरोनाची साखळी तोडण्याकरीता सिद्धार्थच्या नगरमधील नागरीक ही प्रतिसाद देत आहेत . पांचगणीत स्वच्छतेत अव्वल क्रमांक आणण्याकरीता मुख्याअधिकारी व नगराध्यक्षा यादोन्ही महीलांनी पाचगणीचा अव्वल क्रमांक काढला . अमिता दगडे पाटील व लक्ष्मीकर्हाडकर पाचगणीत कोरोनाची साखळी तोडण्याकरीता नगरपालीकेच्या कर्मचार्यानसह चोख व्यवस्थापन करत कोरोनातील पाचगणीतील साखळी मोडण्याकरीता सुक्ष्मप्रतिबंध क्षेत्रामध्ये योग्य नियोजन करत आहे .

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांकडे किंचितही दुर्लक्ष करून चालणार नाही – रोहित पवार 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाच्या उत्पन्नातील तब्बल ४५% वाटा असणारे क्षेत्र म्हणजे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगाचे क्षेत्र होय. संचारबंदीच्या आधीपासूनच नोटबंदी, जीएसटी यांच्या तातडीने केलेल्या अंमलबजावणीमध्ये सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना खाजगी वित्तीय संस्था आणि बँकांकडून फारसे सहकार्य मिळत नाही आहे. त्यामुळे हे क्षेत्र संचारबंदीच्या आधीपासूनच अनेक समस्यांचा सामना करते आहे. हे क्षेत्र जवळपास ११ कोटी लोकांना रोजगार देणारे क्षेत्र आहे. येणाऱ्या काळातही देशाच्या अर्थकारणात या क्षेत्राचा वाटा महत्वाचा असणार आहे. त्यामुळे या क्षेत्राकडे किंचितही दुर्लक्ष करून चालणार नाही असे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी त्यांच्या ट्विटर तसेच फेसबुकच्या अकॉउंटवरून सांगितले आहे.

नोटबंदी, जीएसटी आणि आता संचारबंदी या स्थितीत या क्षेत्राची अवस्था आणखीनच बिकट झाली आहे. केंद्र सरकारने जाहीरकेलेल्या २० लाख कोटींच्या पॅकेजवर या क्षेत्र आशा ठेवून होते. मात्र तिथेही निराशा झाली आहे. आर्थिक पॅकेजच्या आवरणात केंद्र सरकारने कर्जाधारित पॅकेज जाहीर केले. या सर्व समस्यांमुळे या क्षेत्रातील कोणताही घटक समाधानी नाही आहे. या संचारबंदीनंतर पुन्हा उद्योग सुरु केले तरी त्यांना त्यांचे नुकसान भरून काढता येणार नाही आहे. असे सांगत या क्षेत्रातील सुमारे ८५% उद्योगांची अवस्था अतिगंभीर असून स्टार्टअप चा जो गाजावाजा सरकारने केला आहे त्यातील ७४% स्टार्टअप पुढच्या काही महिन्यात बंद पडण्याच्या मार्गावर असल्याचे त्यांनी यात नमूद केले आहे.

 

या उद्योगांकडे खेळत्या भांडवलाची वाणवा आहे. त्यांना सरकारकडूनही बरीच येणी आहेत मात्र ती वेळेवर येतील याची शाशवती नाही. एकूणच कोट्यवधी लोकांना रोजगार देणाऱ्या या क्षेत्राला वाचविण्यासाठी आता प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे पवार यांनी म्हंटले आहे. म्हणून सरकारने या क्षेत्राची देणी लवकर देणे, त्यांना खेळते भांडवल  पुरविणे,तारण न ठेवता कर्ज देणे सोबतच व्याजाचे दर कमी करणे अशा गोष्टी करणे गरजेचे आहे असे रोहित पवार यांनी सुचविले आहे. या क्षेत्राला लवकरात लवकर सावरण्याची गरज आहे असे ते म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.