Wednesday, December 31, 2025
Home Blog Page 5695

ठाकरे सरकारमुळेच मुंबई आज ICU मध्ये – राणे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । निलेश राणे यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी ठाकरे सरकारमुळेच मुंबई आयसीयू मध्ये गेली असल्याचे ट्विट केले आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग राज्यात सुरु झाल्यापासून हे टीकास्त्र सुरु आहे. सातत्याने ठाकरे सरकार या संकटकाळात उपाययोजना राबविण्यात तसेच राज्याला सुरक्षित करण्यात अपयशी ठरल्याचे राणे यांनी त्यांच्या ट्विटरवरून सांगितले आहे. आज पुन्हा एकदा त्यांनी ठाकरे सरकारवर टीका केली असून आरोपही केला आहे.

निलेश राणे यांनी आज मुंबई हे एक जागतिक शहर आहे, ज्याची दयनीय अवस्था झाली आहे. आणि ही स्थिती केवळ ठाकरे सरकारमुळे आली आहे. असे ट्विट केले आहे. लोकं मेली तरी चालेल पण ठाकरे सरकारची प्रतिमा खराब होता कामा नये. असे म्हणत त्यांनी हा आरोप केला आहे. सध्या मुंबईतील कोरोना रुग्णांचे प्रमाण हे सर्वाधिक आहे. राज्यातील सर्वाधिक रुग्ण आणि सर्वाधिक मृत्यू हे मुंबईमध्येच झाले आहेत.

 

दरम्यान राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या ७७ हजार पार गेली आहे. पैकी ३४ हजाराच्या जवळपास रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात एकूण २,७१० मृत्यू झाले आहेत. मुंबई राज्यातीलच नाही तर देशातील सर्वाधिक रुग्ण असणारे शहर आहे. देशातील सर्वाधिक मृत्यूही मुंबईतच झाले आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

कोरोनाची सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांना २४ तासांच्या आत रुग्णालयातून सुट्टी मिळणार

नवी दिल्ली । कोरोना व्हायरसची कोरोना व्हायरसची (COVID19) कोणतीही लक्षणे नसलेल्या (asymptomatic) आणि सौम्य लक्षणे (mild symptom) असणाऱ्या रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज नाही, असे नुकतेच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर दिल्लीतील आरोग्य यंत्रणेने एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, कोरोनाची लक्षणे नसलेल्या आणि अतिसौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांना २४ तासांच्या आत रुग्णालयातून घरी सोडण्यात येईल. दिल्लीच्या आरोग्य यंत्रणेने शनिवारी यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक जारी केले.

मात्र, दुसरीकडे मागील २४ तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल १० हजार नवे रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून याच गतीने नव्या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा २,३६,६५७ इतका झाला आहे. देश अनलॉक होण्याच्या दिशेनं जात असताना कोरोना रुग्णांची वाढणारी संख्या आरोग्य यंत्रणेवरील ताण आणि चिंता वाढवत आहेत.

अशा वेळी, सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांना सुट्टी देण्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले होते. त्यानुसार दिल्लीतील आरोग्य यंत्रणेने अशा रुग्णांना घरी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, आता देशातील इतर राज्यांकडूनही दिल्लीचा कित्ता गिरवला जाणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

भारत, चीनच्या उच्चस्तरीय प्रतिनिधींची बैठक सुरु; भारतीय लष्करी प्रवक्ते म्हणतात…

वृत्तसंस्था | भारत आणि चीनचे अधिकारी सद्यस्थीतीत सीमावर्ती भागात लक्ष देण्यासाठी प्रस्थापित मुत्सद्दी, लष्करी माध्यमांद्वारे काम करत आहेत. या परिस्थितीत त्यांच्या संदर्भातील कोणतीही माहिती ही अनुमानाच्या आधारे अथवा ठोस पुराव्यांशिवाय माध्यमांमध्ये देणे हे उपयुक्त नाही असे भारतीय लष्कराचे प्रवक्ते यांनी म्हंटले आहे. त्यांनी माध्यमांना अशा प्रकारच्या वृत्तांकनापासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. वास्तविक नियंत्रण रेषा (एलएसी) (Line of Actual Control) च्या संदर्भात गेले महिनाभर सुरु असणाऱ्या तणावाचे निराकरण करण्यासाठी आज (शनिवार) सकाळी दोन्ही देशातील उच्चस्तरीय प्रतिनिधींची बैठक सुरु झाली आहे. त्यामध्ये हा मुद्दा उपस्थित करण्यात आला.

दोन्ही देशाच्या परराष्ट्र अधिकाऱ्यांनी शुक्रवारी वादग्रस्त हिमालयीन सीमांच्या भडकलेल्या मुद्द्यावर चर्चा केल्या. चीनच्या बाजूला असणाऱ्या चुशुल-मोल्दो या ठिकाणी या चर्चा होत आहेत. भारतीय शिष्टमंडळात १४ लष्करी तुकडीचे कमांडर लेफ्टनंट जनरल हरिंदर सिंग यांच्यासोबत१० अन्य अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या अधिकाऱ्यांनी पूर्वीच्या चीनसोबतच्या बैठकीत सहभाग घेतला होता. चीनकडून दक्षिण झिन्जिआंग सैन्य विभागाच्या लष्करी तुकडीचे कमांडर लिन लिऊ, व पिपल लिबरेशन आर्मीचे अन्य १० अधिकारी या बैठकीला उस्थित आहेत. शुक्रवारी दोन्ही देशातील शांती आणि संवेदनशीलता यांचा आदर करून शांततापूर्ण मार्गातून हा वाद मिटविला पाहिजे अशी चर्चा झाल्याची माहिती मिळाली आहे.

 

गेल्या महिन्यापासून भारताने लडाख मध्ये रस्तेबांधणी सुरु केल्यापासून भारत चीनच्या सीमेवर तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. यासाठी दोन्ही बाजूने बैठक घेण्यात आल्या आहेत. मात्र त्यावर अद्याप तोडगा काढता आलेला नाही. दोन्ही देशातील वातावरण संवेदनशील झाले आहे. दोन्ही बाजूनी परस्पर सामंजस्याने हे मतभेद मिटावेत असे चीनच्या काही वाचकांचे म्हणणे आहे. या बैठकीतून शांततापूर्ण मार्गाने मतभेद मिटविण्याचे प्रयत्न केले जात आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

जळगावात कोरोनाची दहशत सुरूच; रुग्णसंख्येने गाठला 1000 चा टप्पा, आज 44 रुग्णांची भर

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात आज नवीन 44 कोरोना बाधित रूग्ण आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधित रूग्णाची संख्या आता 1001 इतकी झाली आहे. आतापर्यंत 113 मृत्यू व  429 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

दिवसेंदिवस कोरोनाचा प्रसार हा जिल्ह्यात वाढत आहे. मागील काही दिवसांमध्ये कोरोना रुग्णाची वाढती आकडेवारी ही चिंताजनक बनत आहे. जळगाव व भुसावळ शहरांनी 200 च्या वर रुग्ण संख्येचा आकडा पार केला आहे. त्यात दिलासादायक बाब म्हणजे आज प्राप्त झालेल्या अहवालामध्ये 83 अहवाल हे निगेटिव्ह आले आहेत.

नुकतीच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जळगाव जिल्ह्याची कोरोना संदर्भात आढावा बैठक घेतली होती. त्यात त्यांनी पुढील निर्देश जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणेला दिले आहेत. “जळगाव जिल्ह्यात कोरोना विषाणूमुळे मृत्यू होण्याचे प्रमाण अधिक आहे. ही चिंतेची बाब आहे. मृत्यू दर कमी करण्यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या सहकार्याने टास्क फोर्स गठित करुन त्यांचा सल्ला व औषधोपचार घ्यावेत. तसेच कोरोना विषाणूचा तपासणी अहवाल 24 तासांत प्राप्त होईल, असे नियोजन करावे,” असे निर्देश राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत.


संपूर्ण राज्यात मान्सून १० जूननंतर सक्रीय होईल- हवामान विभाग

मुंबई । निसर्ग चक्रीवादळानंतर राज्यात गेले दोन दिवस थांबून थांबून पाऊस पडत आहे. मात्र, संपूर्ण राज्यात मान्सून १० जूननंतर सक्रीय होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. दरम्यान, चक्रीवादळानंतर केरळमधील मान्सूनची देशातील इतर राज्यांकडील वाटचाल थांबली होती. ती आता पुन्हा सुरु झाली आहे. मान्सून हळूहळू पुढे सरकत आहे. मान्सून महाराष्ट्रात पोहोचण्यास थोडासा उशीर होईल, असे सध्याच्या वाटचालीवरुन दिसून येत आहे.

निसर्ग चक्रीवादळानंतर केरळमधील मान्सून रखडला होता. आता केरळातील मान्सूनची प्रगती दिसून येत आहे. हा मान्सून पुढे सरकत आहे. पुढील तीन दिवसात मान्सून हा कर्नाटक, तामिळनाडू, पद्दुचेरी, बंगालच्या दिशेने वाटचाल करतआहे. आग्नेय तसेच मध्य-पश्चिम बंगालच्या खाडी किनाऱ्याचा भाग मान्सून व्यापून टाकेल, असा अंदाज आहे. त्यानंतर गोव्यातून मान्सून महाराष्ट्रात दाखल होईल.

गोव्यात आज आणि उद्या जोरदार पाऊस पडण्याची शक्यता असून पुढील २४ तासात मान्सून सक्रीय होईल आणि मान्सून महाराष्ट्राकडे वाटचाल करेल, असा अंदाज आहे. हा मान्सून १० जूननंतर संपूर्ण महाराष्ट्रात सक्रीय होईल. कोकण, कोल्हापूर, सातारा, पुणे, बारामती, औरंगाबाद, मालेगाव, जळगाव, अहमदनगर, परभणी, अकोला, अमरावती, नागपूर आदी ठिकाणी पावसाची शक्यता अधिक आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

उमेदवारी दिली तर कोणाला नकोय? मात्र भाजप कि काँग्रेस हे अद्याप गुलदस्त्यात – आनंदराव पाटील

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे खंदे समर्थक म्हणून ओळख असलेल्या आनंदराव पाटील (नाना) यांची उद्या ७ जून रोजी विधानपरिषदेची मुदत संपत आहे. आमदारकीची मुदत संपल्यानंतर नाना काय भूमिका घेणार याकडे आता सातारा जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीवेळी पाटील यांनी पृथ्वीराजबाबांची साथ सोडून भाजपाचे उमेदवार डॉ. अतुल भोसले यांच्याशी जवळीक वाढवली होती. तसेच आपले पुतणे आणि बाजार समितीचे संचालक सुनिल पाटील व चिरंजीव मानसिंग व प्रताप पाटील यांना निवडणुकीआधी भाजपचा मफलर गळ्यात घालून नानांनी आपली वाट काय असणार याचे संकेत दिले. मात्र स्वतः नानांनी अद्याप काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेली नाही. त्यामुळे नाना विधानपरिषदेची मुदत संपल्यानंतर कोणती भुमिका घेणार याकडे सर्वांचे लाक्ष लागले आहे.

याबाबत हॅलो महाराष्ट्राने आनंदराव पाटील यांच्याशी संवाद साधला असता लॉकडाउन उठलं कि मी पत्रकार परिषद घेऊन माझ्या आजवरच्या कामाबाबत सविस्तर माहिती देणार आहे अशी माहिती त्यांनी दिली. तसेच शेवटी पक्षश्रेष्ठी जी भूमिका घेतील ते मान्य करावंच लागते. पण उमेदवारी दिली तर कोणाला नकोय? असंही पाटील यावेळी म्हणाले. उमेदवारी भाजपकडून कि काँग्रेस कडून असा प्रश्न विचारला असता ते आपण अद्याप गुलदस्त्यात ठेवले असून जेव्हा पत्रकार परिषद घेईल तेव्हा याबाबत खुलासा करणार असल्याचे पाटील यांनी सांगितले आहे.

आमदार आनंदराव पाटील हे माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या मातोश्री माजी खासदार व कॉग्रेसच्या प्रदेशाध्याक्षा प्रेमलाताई चव्हाम यांच्यापासून निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून काम करत होते. तर पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री झाल्यानंतर आ. पाटील यांची प्रति मुख्यमंत्री म्हणून छबी तयार झाली होती. त्यामुळेच २०१५ साली राज्यपाल नियुक्त विधानपरिषद सदस्य म्हणून आनंदराव पाटील यांची वर्णी लागली होती. पृथ्वीराज चव्हाण हे केंद्रात मंत्री असताना कराडच्या होमपीचवर कार्यकर्ते सांभाळण्याचे काम आ. पाटील यांनी केले होते. दिल्लीत बाबा असताना गल्लीत नानांनी कॉग्रेस पक्षाची शिबिरे, कार्यक्रम राबविले. परंतु सहा महिन्यापूर्वी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान आ. पाटील व आ. चव्हाण यांच्यात दरी पडली. आ. पाटील यांच्या मुलाने भाजपात जाहीर प्रवेश करून आ. चव्हाण यांच्या विरोधात प्रचार केला. तर आ. पाटील यांनीही भाजपाचे अतुल भोसले यांचे काम केले. त्यामुळे कॉग्रेस विरोधी काम केल्याचा ठपका आ. चव्हाण यांच्या कार्यकर्त्यांनी आ. पाटील यांच्यावर ठेवला होता. आता येत्या सात जूनला विधानपरिषद आमदारकीचा आनंदराव पाटील यांचा कार्यकाळ संपत आहे. तेव्हा आता ते कोणती भूमिका घेणार याकडे लोकांचे लक्ष लागून राहिले आहे.

Satara

आदासा कोळसा खाणीचे मुख्यमंत्र्यांनी केलं ऑनलाईन उदघाटन, तब्बल ३३५ कोटी रुपयांची गुंतवणूक

मुंबई । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज नागपूर जवळील आदासा कोळसा खाणीचे ऑनलाईन उदघाटन करण्यात आले. वेस्टर्न कोल फिल्डच्या नागपूर जवळील आदासा या कोळशाच्या खाणीचा ऑनलाइन शुभारंभ करण्यात आला. या शुभारंभास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि कोळसा व खाण मंत्री प्रल्हाद जोशी हे सुध्दा ऑनलाइन शुभारंभात सहभागी झाले होते.

या कोळसा खाणीमुळे कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक होत आहे. त्यामुळे राज्यातील उद्योगाला यामुळे चालना मिळणार आहे. लॉकडाऊनच्या काळात पहिलाच नवीन प्रकल्प सुरु होत आहे. दरम्यान, आदासा येथील खाणीत ३३५ कोटी रुपये गुंतवणूक होत आहे. १.५ दशलक्ष टन कोळसा उत्पादन होईल. याच वर्षी ही खाण सुरु होणार आहे. दरम्यान, एकूण तीन खाणींचा शुभारंभ आज करण्यात आला आहे. उर्वरित दोन मध्यप्रदेशमधील आहेत. या शुभरंभासही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तसेच कोळसा व खाण मंत्री प्रल्हाद जोशी हे देखील ऑनलाईन सहभागी झाले होते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! या महिन्यापासून खात्यात जमा होणार किसान योजनेचे २ हजार रुपये; लिस्ट मध्ये तुमचे नाव चेक करा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शेतकर्‍यांना थेट त्यांच्या बँक खात्यात पैसे देण्याची योजना असलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता हा १ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. म्हणजेच,२ महिन्यांनंतर मोदी सरकार आपल्या खात्यात आणखी २००० रुपये जमा करतील. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला तीन हप्त्यांमध्ये ६००० रुपये दिले जातात.

पीएम-किसान योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक अग्रवाल यांनी एका न्यूज वाहिनीशी बोलताना सांगितले की, ‘ऑगस्टमध्ये पाठवले जाणारे पैसे हे या योजनेचा सहावा हप्ता असेल. या योजनेंतर्गत आतापर्यंत ९.५४ कोटी अर्जांची पडताळणी करण्यात आली आहे. म्हणजे या योजनेत जे काही पैसे पाठविले जातील त्याचा लाभ साडे नऊ कोटींपेक्षा जास्त शेतकऱ्यांना मिळेल. आपला रेकॉर्ड चेक करा. जेणेकरून आपल्यालाही हे पैसे मिळवण्यास कोणतीही अडचण येणार नाही. आपल्या रेकॉर्डमध्ये काही गडबड असल्यास तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही. कृषी मंत्रालयाच्या सूत्रांचे म्हणणे आहे की यातील सुमारे १.३ कोटी शेतकर्‍यांना अर्ज करूनही पैसे मिळालेले नाहीत कारण एकतर त्यांची नोंद चुकीची आहे किंवा त्यांच्याकडे आधारकार्ड नाही आहे.

रेकॉर्ड बरोबर आहे की नाही हे कसे तपासावे
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेची अधिकृत वेबसाइट (pmkisan.gov.in) आहे. तुम्हांला या वेबसाइटवर लॉग इन करावे लागेल. यात तुम्हाला ‘ Farmers Corner’ टॅबवर क्लिक करावे लागेल.

जर आपण यापूर्वी अर्ज केला असेल आणि आपला आधार कार्ड योग्य प्रकारे अपलोड केला गेला नसेल किंवा काही कारणास्तव आधार क्रमांक चुकीच्या पद्धतीने प्रविष्ट केला गेला असेल तर त्याची माहितीही त्यात दिसून येईल.

‘ Farmers Corner’ मध्ये पीएम किसान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना नवीन नावनोंदणी करण्याचा पर्यायही देण्यात आलेला आहे.

यात शासनाने सर्व लाभार्थ्यांची संपूर्ण यादी अपलोड केली आहे. आपल्या अर्जाची सध्याची स्थिती काय आहे. याबाबतची माहिती आधार क्रमांक / बँक खाते / मोबाइल नंबरद्वारे शेतकऱ्यांना मिळू शकते.

– ज्या शेतकऱ्यांना शासनाने या योजनेचा लाभ याआधीच दिलेला आहे, त्यांची नावे राज्य / जिल्हावार / तहसील / गाव नुसार पाहिली जाऊ शकतात.

थेट मंत्रालयाशी संपर्क साधण्याची सुविधा
मोदी सरकारची ही सर्वात मोठी शेतकरी योजना असल्याने शेतकर्‍यांना यामध्ये विविध प्रकारच्या सुविधा देण्यात आल्या आहेत. यात एक हेल्पलाईन नंबर दिला गेला आहे. ज्याद्वारे देशातील कोणत्याही भागातील शेतकरी थेट कृषी मंत्रालयाशी संपर्क साधू शकतात.

पंतप्रधान किसान टोल फ्री क्रमांक: 18001155266

पंतप्रधान किसान हेल्पलाईन क्रमांक: 155261

पंतप्रधान किसान लँडलाईन क्रमांक: 011—23381092, 23382401

पंतप्रधान किसन यांची आणखी एक हेल्पलाईन आहे: 0120-6025109

ईमेल आयडी: [email protected]

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

यातून पण निसटला! दाऊद इब्राहिम कोरोनाग्रस्त नाही, भाऊ अनिस इब्राहिमचा खुलासा

वृत्तसंस्था । मोस्ट वॉन्टेड फरार अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ अनीस इब्राहिमने दाऊद आणि त्याची पत्नी महजबीन कोरोना पॉझिटीव्ह नसल्याचं म्हटलं आहे. शुक्रवारी सोशल मीडियावर दाऊद इब्राहिम कोरोना पॉझिटीव्ह झाल्याच्या चर्चा सुरु होत्या. दाऊदला सैन्याच्या रुग्णालयात दाखल केल्याचं देखील बोललं जात होतं. पण आता त्याच्या भावाने याबाबत हा खुलासा केला आहे.

दाऊदचे सुरक्षा रक्षक आणि घरातील इतर लोकांना क्वारंटाईन केल्याचं देखील बोललं जात होतं. पण न्यूज़ एजेंसी आयएनएसच्या माहिती नुसार, अनीसने म्हटलं की, त्याचा भाऊ हा कोरोना पॉझिटीव्ह नाही. तो आपल्या घरीच आहे. 1993 मुंबई बॉम्बस्फोटचा दाऊद हा मास्टरमाइंड होता.

त्यानंतर तो देश सोडून पळून गेला होता. दाऊद पाकिस्तानात आहे. पण तो लोकांच्या समोर येत नाही. याआधी देखील दाऊद आजारी असल्याच्या बातम्या आल्या होत्या. पाकिस्तान मात्र तो त्यांच्या देशात नसल्याचं सांगत आला आहे. भारताने अनेकदा पुरावे देवूनही पाकिस्तान हे लपवत आला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

देशाच्या अर्थव्यवस्थेला रुळावर आणण्यासाठी अनेक वर्षे लागतील- आरबीआय गव्हर्नर

नवी दिल्ली । रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. कोरोना व्हायरसमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचं मोठं नुकसान झालं असून अर्थव्यवस्थेला रुळावर आणण्यासाठी अनेक वर्षे लागतील, असं ते म्हणाले. भारतीय बाजारातील मागणीत प्रचंड प्रमाणात घट झाली आहे. बाजारात मागणीच नाही आहे असं निरीक्षणही त्यांनी नोंदवलं.

गेल्या दोन महिन्यांहून अधिक काळापासून देशात लॉकडाऊन आहे. यामुळे पुरवठा आणि मागणी दोन्हींवर परिणाम झाला आहे. आता लॉकडाऊनमध्ये दिलासा देण्याचा प्रयत्न केला गेला आहे. यामुळे पुरवठ्यातील समस्या हळूहळू दूर होतील. पण मागणीतील समस्या कायम आहेत, असंही शक्तिकांत दास म्हणाले.

दरम्यान, देशात सध्या एकमेव कृषि क्षेत्रातच तेजी आहे. यावेळी मान्सून चांगला होणार आहे. यामुळे कृषि क्षेत्रात तेजी बघायला मिळेल. याशिवाय इतर क्षेत्रांची परिस्थिती वाईट आहे. गेल्या दोन महिन्यांपासून जे काही आकडे येत आहेत, ते सर्व निराशाजनक आहेत, असं शक्तिकांत दास म्हणाले. २०१९-२० मध्ये चौथ्या तिमाहीत म्हणजे जानेवारी- मार्चचे रिपोर्ट आले आहेत. संपूर्ण आर्थिक वर्षात विकास दराने (जीडीपी) ११ वर्षांचा ४.२ टक्के इतका निचांक गाठला आहे. यामुळे चौथ्या तिमाहीत विकास दर ३.१ टक्के इतका राहिला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”