Sunday, December 21, 2025
Home Blog Page 570

Electric Vehicles Subsidy : इलेक्ट्रिक गाडी खरेदी करणाऱ्यांची चांदी!! सरकारने घेतला मोठा निर्णय

Electric Vehicles Subsidy

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय बाजारात इलेक्ट्रिक गाड्यांची (Electric Vehicles) क्रेझ चांगलीच वाढली आहे. पेट्रोल- डिझेलचा खर्च वाचवण्यासाठी अनेक ग्राहक इलेक्ट्रिक वाहन खरेदी करत आहेत. त्यामुळे ऑटोमोबाईल मार्केट मध्ये इलेक्ट्रिक गाड्यांची मागणी वाढत चालली आहे. सरकार सुद्धा इलेक्ट्रिक गाडयांना प्रोत्साहन देत आहेत. आता इलेक्ट्रिक गाडी खरेदीदार ग्राहकांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे. कारण केंद्र सरकारने सध्याच्या इलेक्ट्रिक मोबिलिटी प्रमोशन स्कीमची (EMPS) मुदत आणखी २ महिने वाढवली आहे. देशभरात ग्रीन मोबिलिटी आणि इलेक्ट्रिक व्हेइकल मॅन्युफॅक्चरिंग इकोसिस्टमला चालना देण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. आता वाहन उत्पादक आणि ग्राहक दोघेही ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत या योजनेचा लाभ घेऊ शकतील.

खरं तर EMPS योजना FAME-2 संपल्यानंतर या वर्षी 1 एप्रिलपासून लागू करण्यात आली होती. ही योजना 3 महिन्यांसाठी लागू करण्यात आली होती जी 31 जुलै रोजी संपणार होती. या योजनेंतर्गत, इलेक्ट्रिक मोबिलिटीला प्रोत्साहन देण्यासाठी 500 कोटी रुपयांच्या बजेटची तरतूद करण्यात आली होती. मात्र आता या योजनेला 2 महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली असून तिचे बजेट 769.65 कोटी रुपये करण्यात आले आहे. सरकारच्या या निर्णयामुळे 5,60,789 इलेक्ट्रिक गाडयांना आर्थिक मदत मिळणार आहे. ज्यामध्ये 5,00,080 इलेक्ट्रिक दुचाकी आणि इतर इलेक्ट्रिक थ्री-व्हीलर वाहनांचा समावेश आहे.

किती सबसिडी मिळते ?

EMPS 2024 मध्ये वाटप केलेल्या अनुदानित इलेक्ट्रिक टू-व्हीलरमध्ये बॅटरी क्षमतेच्या प्रत्येक किलोवॅट तास (kWh) साठी 5,000 रुपये सबसिडी दिली जाईल. सध्या भारतीय बाजारपेठेतील जवळपास अनेक इलेक्ट्रिक दुचाकी किंवा स्कूटरमध्ये 2 किलोवॅटपर्यंतची बॅटरी दिली जाते. त्यानुसार, ग्राहकांना प्रत्येक स्कूटरच्या खरेदीवर 10,000 रुपयांपर्यंत सबसिडी मिळू शकेल. तथापि, इलेक्ट्रिक टू-व्हीलरसाठी जास्तीत जास्त अनुदान देखील 10,000 रुपयांपर्यंत मर्यादित करण्यात आले आहे. याचा अर्थ, बॅटरी पॅक 2kWh पेक्षा मोठा असला तरीही, ग्राहकांना 10,000 रुपयेपर्यंतच अनुदान मिळेल.

पिंपरी यंदाही राजकीय नेत्यांचा अंदाज चुकवतोय; हा नेता आमदार होईल

Pimpari anna bansode

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राजकारणात कधीही काहीही होऊ शकतं… पवार साहेब आणि अजित दादा एकत्र आले तर मला आनंद होईल. मी दादांकडे तशी मागणी ही करणार आहे…. हे स्टेटमेंट केलंय अजितदादांच्या राष्ट्रवादीतील पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी… 2009 पासून आलटून पालटून निकाल देणाऱ्या या मतदारसंघात अण्णा दोनदा आमदार झाले असले… तरी त्यांची उमेदवारी येणाऱ्या विधानसभेला रेड झोन मध्ये असल्याचं सध्या समोर येतय… पान टपरी पासून अगदी गरिबीतून त्यांनी राजकारण सुरू केलं खरं… पण आमदार झाल्यानंतरची त्यांची निष्क्रियता आणि गोळीबार प्रकरणामुळे त्यांची इमेज बरीच ढासळलीये… विद्यमान आमदार साहेब तुतारीची वाटेने चालत जाणार असल्याची चर्चाही मतदार संघात आहे… भाजपच्या इच्छुकांनीही ही जागा आपल्याला मिळावी यासाठी हायकमांड वर बरेच प्रेशर आणलय… त्यामुळे अजितदादांचा मतदारसंघ भाजप आपल्याकडे खेचून घेणार का? की या सगळ्या राजकीय डावपेचात शरद पवार इथं गेम चेंजर ठरणार? त्याचंच हे पॉलिटिकल डीकोडींग…

हवामान खात्यावर आणि पिंपरीच्या राजकारणावर कधी विश्वास ठेवायचा नाही… कधी वातावरण आणि आमदार बदलतील सांगता येत नाही… होय… 2009 च्या लोकसभा पुनर्रचनेनंतर हा नवाकोरा पिंपरी हा अनुसूचित जातीसाठी राखीव असणारा शहरी मतदारसंघ अस्तित्वात आला… राखीव गटात असल्यानं आणि मैदानही पल्याचं असल्यानं इथं अनेक छोट्या मोठ्या पक्षांना आमदारकीची स्वप्न पडू लागली… 2009 ला लोकसभेचा कौल या मतदारसंघाने शिवसेनेच्या बाजूने दिला पण विधानसभेला आमदार मात्र राष्ट्रवादीचा निवडून आला… अर्थात हा कौल होता पिंपरीचे पहिले आमदार अण्णा बनसोडे यांच्या बाजूने… हळूहळू राष्ट्रवादीचे वजन पिंपरीत वाढू लागलं… महापालिकेलाही पिंपरीतून सर्वाधिक नगरसेवक हे राष्ट्रवादीनेच दिले…त्यामुळे सगळं काही सुखा सुखी असताना… राष्ट्रवादीच्या बाजूने सगळं काही सेट असताना… 2014 च्या उमेदवारीला अगदी चिल मध्ये आमदार होऊ असं वाटतं असताना राष्ट्रवादीचे बनसोडे पडले… आणि निवडणुकीआधीच काँग्रेस टू शिवसेना असा प्रवास केलेले गौतम चाबुकस्वार पिंपरीचे आमदार झाले… यानंतर राष्ट्रवादीचा पिंपरी डाऊन फॉल सुरू झाला… स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांतही राष्ट्रवादीची पडझड झाली… अजितदादांनी या भागाचा विकासाने कायापालट केला खरा… पण भाजप आणि शिवसेनेने दादांचे हे हक्काचे बालेकिल्ले पोखरायला सुरुवात केली… त्यामुळे 2019 ला शिवसेनेकडून चाबुकस्वार विरुद्ध राष्ट्रवादीकडून बनसोडे अशीच सेम टू सेम लढत झाली… वातावरण राष्ट्रवादीच्या फुल निगेटिव्ह मध्ये होतं… त्यात महायुतीची लाट असल्यानं चाबुकस्वार निवडून येतील… असं वाटत असताना निकाल लागला… आणि राष्ट्रवादीचे अण्णा बनसोडे यांनी पुन्हा कमबॅक करत, राष्ट्रवादीला शहरात जिवंत ठेवलं…

चिंचवड आणि भोसरी विधानसभेला विभागणारा, तुलनेने सर्वात लहान आणि जुना पुणे-मुंबई महामार्गावरील दापोडी ते निगडी असा 12 किलोमीटरमध्ये दोन्ही बाजूंनी पसरलेला हा छोटासा पिंपरी विधानसभा मतदारसंघ.. महापालिका इमारत, नाशिक फाट्यावरील दुमजली पूल, जुना पुणे-मुंबई महामार्गावरील ग्रेड-सेप्रेटर, भक्ती-शक्ती समूहशिल्प असा बराच डेव्हलप भाग पिंपरीत येत असल्याने हा पट्टा राजकारणाच्या दृष्टीने प्रत्येकाला भुरळ घालत असतो… पिंपरी चिंचवड शहरात एकूण 72 झोपडपट्ट्या आहेत.. त्यातल्या तब्बल 50 च्या आसपास झोपडपट्ट्या एकट्या पिंपरी मतदारसंघात येतात… यावरून या मतदारसंघाचं सामाजिक अस्तित्व किती संमिश्र आहे? याचा आपल्याला अंदाज येऊ शकतो… मुस्लीम-दलित बहुल मतं, झोपडपट्टीमुळे स्थानिकांच्या सपोर्टवर इथलं राजकारण चालतं… त्यामुळेच दिसायला साधा असला तरी पिंपरीचं राजकारण तितकच गुंतागुंतीचं आणि बेभरवशी असतं…

आता वळूयात मुख्य मुद्द्याकडे… तो म्हणजे राष्ट्रवादीचे अण्णा बनसोडे हे या मतदारसंघाचे विद्यमान आमदार… राष्ट्रवादी फुटीत ते अजितदादांसोबत राहिले… पण सगळ्याच पातळ्यांवर अण्णांची आमदारकीच नाही तर उमेदवारीही धोक्यात आलीय… पहिलं म्हणजे 2009 ला अण्णांचा अगदी निसटत्या लीडने विजय झाला होता… दुसऱ्या बाजूला 2019 मध्येही जवळच्या चिंचवडमधून भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांनी आतल्या गोटातून मदतीचा हात दिल्यामुळे अण्णांचा पिंपरीतला विजय सोपा झाला होता, अशी मतदारसंघात चर्चा असते… त्यात अजित पवार गटात गेल्यामुळे दलित – मुस्लिम आणि राष्ट्रवादीचा कोअर मतदार आमदार साहेबांवर नाराज आहेच… त्यात गोळीबार प्रकरणात वायरल झालेले शिवीगाळ करतानाचे ऑडिओ, आमदार सुपुत्राचे सीसीटीव्ही फुटेज या सगळ्यामुळे बनसोडेंच्या इमेजला मोठा दणका बसलाय… त्यात झोपडपट्टी पुनर्वसनाचा प्रश्न, प्राधिकरणग्रस्त शेतकऱ्यांचा प्रश्न, विधिमंडळातील निष्क्रियता, फुले शाहू आंबेडकर हाऊसिंग सोसायटीची दबक्या आवाजात होणारी चर्चा… हे सगळं विद्यमान आमदार साहेबांच्या अंगलट येऊ शकतं… त्यात मधल्या काळात आमदार साहेब हे शिंदे गटाशी जवळीक साधत असल्याची चर्चा होती… त्यामुळे मतदार संघातील अजितदादांच्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते दुखावले गेल्याचही बोललं गेलं…

आता हा सगळा इतिहास पाहता कार्यकर्त्यांनी अण्णा बनसोडेंसाठी मतं मागायला जायचं कसं? अशीही चर्चा दबक्या आवाजात होतेय… त्यामुळे आमदारकी सोडा…अण्णा बनसोडेंची उमेदवारीही सध्या रेड झोनमध्ये आलीये… त्यामुळे भाजपकडून सीमा सावळे, अमित गोरखे, रिपब्लिकन पार्टीकडून चंद्रकांता सोनकांबळे यांच्या नावांपैकी एका नावावर महायुती शिक्कामोर्तब करू शकतं… तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीतील ठाकरे गटाकडून माजी आमदार गौतम चाबुकस्वार, शरद पवार गटाकडून सुलक्षणा शीलवंत तर काँग्रेसकडून डॉ. मनीषा गरुड यांचंही नाव सध्या उमेदवारीसाठी चर्चेत आहे…त्यामुळे पिंपरीच्या जागेसाठी महायुती आणि महाविकास आघाडी अशा दोन्ही बाजूंनी उमेदवारीसाठी बरीच घासाघीस होऊ शकते…. पण अजितदादांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या पिंपरीत मात्र नवा पक्ष… नवा चेहरा… मंत्रीपदावर दिसण्याची दाट शक्यता आहे… त्यामुळे राजकीयदृष्ट्या प्रेडिक्ट करण्यासाठी अत्यंत कठीण असणाऱ्या… आणि सतत बदलता कौल देणाऱ्या पिंपरी विधानसभेला यंदा कोणता चेहरा आमदारकीचा गुलाल उधळेल? तुमचं मत कुणाला? ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.. बाकी अशाच नवनवीन आणि राजकीय व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका

Indian Railways Rules : ट्रेन 3 तास उशीरा आल्यास तिकीटाचे पैसे होतात रिफंड; पहा काय आहे प्रोसेस?

Indian Railways Rules

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या भारतात रेल्वेचं मोठं जाळं आहे. देशाच्या कोणत्याही भागातून कुठेही जायचं म्हंटल तरी सर्वसामान्य प्रवासी रेल्वेच्या प्रवासाला प्राधान्य देत असतात. लांबच्या प्रवासासाठी अतिशय आरामदायी आणि महत्वाचं म्हणजे खिशाला परवडणारा प्रवास असल्याने रेल्वेला प्रवाशांची गर्दी पाहायला मिळते. मात्र सध्याचा काळ हा पावसाळ्याचा असून या दिवसात मुसळधार पावसामुळे अनेक रेल्वेगाड्या रद्द होत आहेत तर काही ठिकाणी रेल्वे उशिरा धावत आहेत. परंतु तुंम्हाला रेल्वेचा एक नियम (Indian Railways Rules) माहित आहे का? ज्यामधून जर तुमची ट्रेन ३ तास उशिरा आली तर तुम्हाला तिकिटाचे पैसे परत रिफंड म्हणून मिळतात. चला तर याबाबत सविस्तर जाणून घेऊयात

भारतीय रेल्वेच्या नियमानुसार, तुम्ही ज्या ट्रेनने प्रवास करणार आहात ती ट्रेन ३ तासांपेक्षा जास्त उशिराने धावत असेल तर तुम्ही सहजपणे रिफंड मागू शकता. मात्र, ही सुविधा कन्फर्म तत्काळ तिकीट असलेल्या प्रवाशांसाठी उपलब्ध नाही. याचा अर्थ असा की जर तुमच्याकडे कन्फर्म केलेले तत्काळ तिकीट असेल तर तुम्ही त्यासाठी रिफंडचा दावा करू शकत नाही. पैसे परत मिळवण्यासाठी प्रवाशांना ना तिकीट जमा पावती दाखल करावी लागेल. तुम्ही IRCTC च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन TDR दाखल करू शकता. याशिवाय, तुम्ही तिकीट काउंटरवर जाऊन सुद्धा रिफंडचा दावा करू शकता. रेल्वेच्या नियमांनुसार, (Indian Railways Rules) TDR दाखल केल्यानंतर ९० दिवसांच्या आत रिफंडचे पैसे तुम्हाला परत मिळतील.

ऑनलाइन TDR फाइल करण्याची प्रक्रिया खालीलप्रमाणे- Indian Railways Rules

सर्वात आधी IRCTC च्या अधिकृत वेबसाइटवर जा आणि यूजर आयडी आणि पासवर्डच्या मदतीने लॉग इन करा.
आता ‘सेवा’ पर्यायावर जा आणि “फाइल तिकीट ठेव पावती (TDR)” वर क्लिक करा.
यानंतर, My Transactions टॅबमध्ये “फाइल TDR” निवडा.
आता तुम्हाला क्लेम रिक्वेस्ट पाठवायची आहे. हि रिक्वेष्ट स्वीकारल्यानंतर, तुम्हाला काही दिवसात रिफंड मिळेल.
तुमचा रिफंड त्याच बँक खात्यात येईल ज्यामधून तिकीट बुक केले गेले आहे.

मुंबईचा राजा कोण? रितेश देशमुखच उत्तर ऐकून व्हाल खुश

riteish deshmukh rohit hardik

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । यंदाच्या आयपीएल मध्ये मुंबई इंडियन्सने रोहित शर्माच्या जागी हार्दिक पांड्याची कर्णधारपदी निवड केल्यानंतर रोहितच्या चाहत्यांना हा निर्णय पटला नाही. मुंबई इंडियन्सच्या प्रत्येक सामन्यात रोहित शर्माचे चाहते हार्दिक पांड्याला ट्रॉल करू लागले. मैदानावरही हार्दिकच्या समोरच मुंबईचा राजा रोहित शर्मा हा जयघोष चाहते करत होते. आजही मुंबई राजा म्हंटल कि रोहित शर्मा असच नाव सर्वांच्या तोंडात येत. याच पार्श्वभूमीवर अभिनेता रितेश देशमुख याला मुंबईचा राजा हार्दिक पंड्या कि रोहित शर्मा असा प्रश्न विचारण्यात आल्यावर रितेशने स्पष्टच शब्दात उत्तर दिले.

बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख आणि साकिब सलीम यांनी अलीकडेच एका पॉडकास्टमध्ये सहभाग घेतला. यादरम्यान, रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्या यांच्याबद्दल पॉडकास्टमध्ये प्रश्न विचारला असता रितेशने असे उत्तर दिले जे चाहत्यांना अपेक्षित नसेल. हार्दिक पांड्या आणि रोहित शर्मा यांपैकी मुंबईचा राजा कोण? या प्रश्नावर व्यक्त होताना रितेशने भारी उत्तर दिले. हार्दिक पांड्या हा मुंबई इंडियन्सचा सध्याचा कर्णधार असला तरी रोहित शर्माला नेहमीच मुंबईचा खरा राजा मानला जाईल असे रितेश देशमुखने सांगितलं.

दरम्यान, रोहित शर्मा हा मुंबईकरांचा चांगलाच लाडका आहे. मुंबईचा राजा म्हणून रोहित शर्मालाचा जाणतात. आयपीएल सामन्यात मुंबईचा राजा रोहित शर्मा अशा घोषणा वानखेडे स्टेडियम वर सातत्याने पाहायला मिळतात. भारतीय संघाच्या विजयी रॅली वेळीही रोहित शर्माच्या नावाने चाहत्यांनी जयघोष केला होता. जेवढं कदाचित मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला सुद्धा मिळालं नसेल इतकं प्रेम रोहित शर्माला मुंबईकरांनी दिले आहे.

शहांसोबत 10 बैठका, मास्क -टोपी घालून प्रवास.. अजितदादा महायुतीत जाण्यापूर्वी काय काय घडलं?

amit shah ajit pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मागील वर्षी जून महिन्यात तत्कालीन विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी शरद पवारांना अंधारात ठेऊन तब्बल ४० आमदारांच्या सोबतीने शिंदे फडणवीस सरकार मध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. अजितदादानी थेट शरद पवारांविरोधात थेट बंड केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली. शरद पवार यांच्याकडील घड्याळ चिन्ह आणि राष्ट्रवादी पक्ष सुद्धा निवडणूक आयोगाने अजित पवारांना दिला. अजूनही सर्वोच्य न्यायालयात शरद पवार विरुद्ध अजित पवार यांच्यात सामना सुरु आहे. मात्र एकीकडे हे सगळं सुरु असताना सत्तेत जाण्यापूर्वी अमित शाह यांच्यासोबत किती बैठका घेतल्या आणि कशा पद्धतीने आपण दिल्लीला जायचो हे अजित पवारांनी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना सांगितलं आहे.

सत्तानाट्यावेळी अजित पवार हे अमित शाहांसोबत (Amit Shah) बैठक करायचे, जवळपास १० बैठका अमित शाह आणि अजित पवार यांच्यात झाल्या. त्यावेळी अजित पवार सामान्य विमानाने प्रवास करत होते. मास्क आणि टोपी घालून त्यांचा दिल्ली-मुंबई, मुंबई-दिल्ली असा प्रवास व्हायचा. त्यांच्या या पेहरावामुळे बाजूला बसलेला माणूसही त्यांना ओळखू शकत नव्हता. इतकेच नाही तर अजित अनंतराव पवार या नावाऐवजी ते A.A Pawar अशा नावाने ते प्रवास करायचे. याच नावाने त्यांचा बोर्डिंग पास असायचा असं पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना अजित पवारांनी सांगितलं. एका वृत्तवाहिनीने याबाबत वृत्त दिले आहे.

अजित पवारांच्या या गौप्यस्फोटानंतर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार निशाणा साधला आहे. महारष्ट्राबाबत यांचं कपट कारस्थान किती आधीपासून होते हे तुम्हाला हळू हळू स्पष्ट होतंय. अजित पवार एखाद्या गुप्तहेराप्रमाणे, नाव बदलून, टोप्या बदलून, मिशा बदलून अमित शाह याना भेटायला जात होते. महाराष्ट्राला रंगमंच आणि नाटकाची फार मोठी परंपरा आहे. महाराष्ट्राने बाळ गंगाधर यांच्यापासून ते श्रीराम लागू यांच्यापर्यंत अनेक कलाकार दिले. महाराष्ट्राला नाट्यसृष्टीची परंपरा आहे, त्या नाट्यसृष्टीने अजित पवार, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्याकडे दुर्लक्ष्य केलं असत दिसतंय. यांनाही नाटकातील रंगमंचावर घेतलं पाहिजे कारण हे उत्तम पद्धतीने मेकअप करतात, चेहरा बदलतात. हि फार मोठी गोष्ट आहे असा टोला राऊतांनी लगावला.

महाराष्ट्राला मिळाले नवे राज्यपाल; पहा कोणाची वर्णी लागली?

new governor maharashtra

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्राला नवे राज्यपाल मिळाले आहेत. झारखंडचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. रमेश बैस यांच्या जागी सीपी राधाकृष्णन यांची राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर राज्यातील ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे यांची राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती झाली आहे. रात्री एकच्या सुमारास दहा राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील राज्यपालांच्या बदल्या आणि निुयक्तीबद्दल एक परिपत्रक जारी करण्यात आले. त्यानुसार या सर्व नियुक्त्या करण्यात आल्यात. राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी या सर्व राज्यपालांच्या नियुक्त्या केल्या आहेत.

सीपी राधाकृष्णन हे दक्षिण भारतातील भाजपच्या प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत.  राधाकृष्णन हे दीर्घकाळापासून भाजपचे सदस्य आहेत. वयाच्या 16 व्या वर्षापासून त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तसेच जनसंघासाठी कार्य सुरु केले. तामिळनाडूच्या कोईम्बतूर लोकसभा मतदारसंघातून ते दोनदा खासदार म्हणून निवडून आले होते. 1998 आणि 1999 च्या लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला होता. एवढच नव्हे तर तामिळनाडू भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून सुद्धा त्यांनी काम केलं आहे. 18 फेब्रुवारी 2023 रोजी ते झारखंडचे राज्यपाल झाले होते. आता महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची जबाबदारी त्यांना देण्यात आली आहे.

राज्यातील नवनियुक्त राज्यपालांची संपूर्ण यादी

सी. पी. राधाकृष्णन – महाराष्ट्र
हरिभाऊ किसनराव बागडे – राजस्थान
रामेन डेका – छत्तीसगड
संतोषकुमार गंगवार – झारखंड
ओमप्रकाश माथूर – सिक्किम
लक्ष्मण प्रसाद आचार्य – आसाम, मणिपूर (अतिरिक्त कार्यभार)
जिष्णू देव वर्मा – तेलंगणा
गुलाबचंद कटारिया – पंजाब, चंडीगड
सी. एच. विजयशंकर – मेघालय

Weather Update | ‘या’ 10 जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा; IMD ने जारी केला येलो अलर्ट

Weather Update

Weather Update | गेल्या आठवडाभरापासून संपूर्ण महाराष्ट्रमध्ये जोरदार मुसळधार पाऊस पडताना दिसत आहे. परंतु आता आठवडाभराच्या तुलनेत आता कुठे पावसाचा जोर थोडा कमी झालेला दिसत आहे. तरी देखील अनेक भागांमध्ये सध्या मध्यम आणि मुसळधार पावसाने (Weather Update) हजेरी लावण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. हवामान विभाग दररोज महाराष्ट्रातील हवामानाबद्दल अंदाज व्यक्त करत असतात. आज म्हणजेच 28 जुलै 2024 रोजी हवामान (Weather Update) कसे असेल? याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलेला आहे. याबद्दलची माहिती आपण जाणून घेऊया.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे रायगड जिल्ह्यात देखील मुसळधार ते अति मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडणार असून, या ठिकाणी आता नागरिकांना पावसाचा (Weather Update) ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे.

त्याचप्रमाणे पालघर, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये देखील आज मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याचा शक्यता आहे. त्यामुळे हवामान विभागाने या सर्व जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट दिलेला आहे. आज मुंबईत देखील काही भागांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच येत्या चार दिवसात मुंबईमध्ये जोरदार पावसाची शक्‍यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे. त्यामुळे मुंबईतील पावसाला देखील हवामान विभागाने गेलो अलर्ट दिलेला आहे.

पुण्यातील घाट परिसरात त्याचप्रमाणे इतर भागात देखील हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे. विदर्भातील जवळपास सगळ्या जिल्ह्यामध्ये आज पावसाचा (Weather Update) अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. पावसासोबत या जिल्ह्यांमध्ये वादळी वारा येण्याची देखील शक्यता आहे. तरीदेखील उद्यापासून पावसाचा जोर काहीसा कमी होणार, असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे.

Solapur – Pune Railway : 4 दिवस सोलापूर-पुणे रेल्वे गाड्या राहणार बंद ; कोणत्या गाड्यांचा समावेश ?

Solapur – Pune Railway : मुंबईनंतर पुणे हे राज्यातील सर्वात महत्त्वाचे शहर बनले आहे. नोकरी आणि शिक्षणाच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून इथे लोक येत असतात. त्यातही सोलापूरहून पुण्याकडे येणाऱ्यांची काही कमी नाही. मात्र जर सोलापूरहून तुम्ही पुण्याकडे रेल्वेने येत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. कारण येत्या 29 तारखेपासून सोलापूर ते पुणे येणाऱ्या रेल्वे गाड्या चार दिवसांसाठी रद्द करण्यात आलया आहेत. त्यामुळे पुण्याला जाण्यासाठी दररोज दहा ज्यादा बसेस सोडण्यात येणार असल्याची (Solapur – Pune Railway) माहिती आहे.

सोलापूर पुणे या मार्गावर नॉन इंटरलॉकिंग अन ट्रॅफिक ब्लॉक

या गाड्या कशामुळे बंद असणार आहेत ? तर सोलापूर पुणे या मार्गावर नॉन इंटरलॉकिंग ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात घेणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे गाड्या बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून मध्य रेल्वेच्या पुणे विभागातील (Solapur – Pune Railway) दौंड रेल्वे स्थानक, दौंड कार्ड लाईन, दौंड गुड्स यार्ड आणि दौंड ए केबिन दरम्यान हा ब्लॉक घेण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे. यामुळे पुण्याला जाणाऱ्या गाड्यांवर सर्वात जास्त परिणाम होणार आहे आणि याचा फटका सोलापूर ते पुणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बसणार आहे.

कोणत्या गाड्या झाल्या रद्द (Solapur – Pune Railway)

दरम्यान रद्द झालेल्या गाड्यांमध्ये नांदेड पनवेल एक्सप्रेस, पनवेल नांदेड एक्सप्रेस, पुणे (Solapur – Pune Railway) सिकंदराबाद एक्सप्रेस, सिकंदराबाद पुणे एक्सप्रेस, पुणे सोलापूर एक्सप्रेस, सोलापूर पुणे एक्सप्रेस, गाडी क्रमांक 12 270, पुणे सोलापूर 11 41 7, सोलापूर पुणे गाडी क्रमांक 11 41 8 या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

याबरोबरच सोलापूर दौंड डेमु, दौंड सोलापूर डेमू, पुणे हरंगुळ एक्सप्रेस, हरंगुळ पुणे एक्सप्रेस, सोलापूर पुणे डेमू (14222), पुणे सोलापूर डेमू (11421), अमरावती पुणे(1220), सिकंदराबाद लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस, लोकमान्य टिळक टर्मिनस सिकंदराबाद एक्सप्रेस पुणे अमरावती एक्सप्रेस अमरावती पुणे एक्सप्रेस या गाड्या रद्द करण्यात आले (Solapur – Pune Railway) आहेत.

Tips For Geyser : पावसाळ्यात गिझरकडे लक्ष द्या ; छोटीशी चूक सुद्धा पडू शकते महागात

Tips For Geyser : पावसाळा सुरु झाला की सर्वत्र हवामान थंडगार होऊन जाते. अशावेळेला गरम गरम पाण्याचा वापर आंघोळीसाठी केला जातो. अशावेळेला गिझरचा वापर आपसूकच वाढतो. सध्या बाजारात इलेक्ट्रिक गिझरची चालती आहे. पण गिझरचा वापर करीत असताना तितक्याच सावधानीने केला पाहिजे. गिझरच्या बाबतीत एक छोटीशी चूक सुद्धा महाग पडू शकते. त्यामुळे आजच्या लेखात आम्ही तुम्हाला गिझर (Tips For Gyser) आणि त्याबद्दलच्या सावधगिरीबद्दल सांगणार आहोत चला तर मग जाणून घेऊया …

शॉर्ट सर्किट (Tips For Geyser)

पावसाळ्यात ओलावा वाढतो, त्यामुळे शॉर्ट सर्किटचा धोका वाढतो. गीझरच्या वायरिंगमध्ये किंवा कनेक्शनमध्ये काही बिघाड असल्यास ओलाव्यामुळे शॉर्ट सर्किट होऊन आग लागण्याचा धोका असतो. त्यामुळे पावसाळ्यात या गोष्टींकडे विशेष लक्ष द्या हवे असल्यास (Tips For Geyser) बाथरूम मध्ये एक्झॉस्ट फॅन बसावा म्हणजे हवा खेळती राहील.

गंज (Tips For Geyser)

पावसाळ्यात ओलाव्यामुळे गीझरमधील मेटल भाग गंजू शकतात, ज्यामुळे गीझरची लाईफ कमी होते. शिवाय त्याच्या कार्यक्षमतेवरही परिणाम होतो.

वीज बिल वाढते (Tips For Geyser)

पावसाळ्यात तापमान सामान्यतः कमी राहते, अशा परिस्थितीत गिझरला गरम पाणी निर्माण (Tips For Gyser) करण्यासाठी जास्त वीज लागते, ज्यामुळे वीज बिल वाढू शकते.

पाण्याची गुणवत्ता (Tips For Geyser)

पावसाच्या पाण्यात अनेकदा अशुद्धता असते, जी गीझरच्या आत जमा होऊ शकते आणि त्याची क्षमता प्रभावित करू शकते.

काय घ्याल काळजी ? (Tips For Geyser)

  • गीझरचे वायरिंग व्यवस्थित झाले असून त्यात कोणताही दोष नाही याची काळजी घ्या.
  • गीझर नियमितपणे साफ करत राहा जेणेकरुन ते गंजणार नाही आणि कार्यक्षम राहील.
  • गंज आणि आर्द्रतेला अधिक प्रतिरोधक असणारा चांगल्या दर्जाचा गिझर खरेदी करा.
  • गीझर ओव्हरलोड करू नका, कारण यामुळे गिझर खराब होऊ शकतो.

KBC 16: सुरू होणार ‘कौन बनेगा करोडपती 16’ ; कशी कराल नोंदणी ? जाणून घ्या

KBC 16: “देवियो और डायलॉग सज्जानो …! तैय्यार हो जाईये मेरे साथ खेलीये ‘कौन बनेगा करोडपती’ ” महानायक अमिताभ बच्चन यांचे हे डायलॉग ऐकण्यासाठी तुमचे सुद्धा कान आतुर झाले असतील. तर तुमच्यासाठी खुशखबर आहे कारण लवकरच सुरु होत आहे ‘कौन बनेगा करोडपती’ चा 16वा सिझन तुमहाला देखील या भागामध्ये सहभागी व्हायची इच्छा असेल तर रजिस्ट्रेशन सुरु झालेले आहे. चला जाणून घेऊया या नव्या (KBC 16) सिझन बद्दल…

हा शो पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. ‘कौन बनेगा करोडपती सीझन 16’ चा नवा प्रोमो रिलीज झाला आहे, ज्यामध्ये बिग बींचा नवीन अंदाज पाहायला मिळत आहे. प्रोमो पाहिल्यानंतर चाहत्यांना ‘KBC 16’ कधी आणि कुठे पाहता येईल हे जाणून घेण्याची उत्सुकता वाढली आहे. या सीझनमध्ये बऱ्याच नवीन गोष्टी घडणार आहेत, ज्याची झलक प्रोमोमध्येही पाहायला (KBC 16) मिळेल.

प्रोमोमध्ये बिग बींची नवी स्टाईल (KBC 16)

‘कौन बनेगा करोडपती सीझन 16′ पुढील महिन्यात 12 ऑगस्ट रोजी प्रीमियर होणार आहे.’जिंदगी है, हर मोड़ पर सवाल पूछेगी, जवाब तो देना होगा’ अशी या सीझनची टॅगलाइन आहे, हा प्रोमो पाहिल्यानंतर चाहत्यांमध्ये उत्साह वाढला आहे. सोनी टीव्हीचा रिॲलिटी शो ‘कौन बनेगा करोडपती’ अनेक दिवसांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या शोला खूप मजबूत फॅन फॉलोइंग आहे.सर्व वयोगटातील लोकांना हा शो पाहायला (KBC 16) आवडतो. दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रेक्षक त्याच्या 16व्या सीझनची वाट पाहत आहेत जो लवकरच येत आहे.

‘KBC 16’ कधी आणि कुठे पाहू शकता? (KBC 16)

तुम्ही ‘कौन बनेगा करोडपती सीझन 16’ 12 ऑगस्ट, सोमवार ते शुक्रवार रात्री 9 वाजता सोनी टीव्हीवर पाहू शकता. ‘कौन बनेगा करोडपती’ हा भारतातील सर्वात लोकप्रिय टीव्ही गेम शो आहे. या शोचा प्रीमियर 2000 साली झाला. ‘केबीसी’साठी 26 एप्रिल रोजी रात्री 9 वाजल्यापासून (KBC 16) नोंदणी सुरू झाली. यानंतर, स्पर्धकांची निवड झाल्यानंतर, शो प्रसारित केला जाईल.

कशी कराल नोंदणी? (KBC 16)

  • या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी तुम्हाला रजिस्ट्रेशन करावे लागेल.
  • यासाठी तुम्हाला तुमच्या फोनमध्ये ‘सोनी लिव ॲप’ डाऊनलोड करावे लागेल.
  • आता तुम्हाला केबीसी रजिस्ट्रेशन वर जाऊन विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील.
  • प्रश्नांची उत्तर दिल्यानंतर जी काही प्रोसेस दिली जाईल ती पूर्ण करावी लागेल.
  • यानंतर रजिस्ट्रेशन कन्फर्म झाल्यानंतर तुमच्या स्क्रीनवर त्याबाबतचा मेसेज येईल.

SMS द्वारे नोंदणी (KBC 16)

यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईल फोनच्या मेसेज बॉक्समध्ये जाऊन केबीसी लिहावं लागेल. त्यानंतर स्पेस देऊन रजिस्टर करताना विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तराचा पर्याय निवडावा लागेल. यानंतर तुम्हाला तुमचे वय आणि लिंग 50 90 93 या क्रमांकावर पाठवावे लागेल. याशिवाय http://www.sonyliv.com या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन नोंदणी करू शकता.

यानंतर रजिस्ट्रेशन पूर्ण होईल आणि तुमचे उत्तर बरोबर असेल तर तुमची निवड केली जाईल त्यानंतर इथे पोहोचल्यानंतर ही 11 जणांची निवड केली जाईल या 11 लोकांना सर्वात फास्टेस्ट फिंगर फर्स्ट प्रश्न विचारला जाईल जो कमीत कमी वेळेत अचूक उत्तर देऊ शकेल त्याला अमिताभ बच्चन यांच्या समोर हॉट सीटवर बसण्याची संधी मिळते.