Sunday, December 21, 2025
Home Blog Page 571

कोथरूडमध्ये यंदाचा आमदार ‘हा’ चेहरा असेल

Kothrud

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपचा पुण्याचा गड आला… मुरलीधर मोहोळ खासदार होऊन केंद्रीय मंत्री झाले… पण ज्या बालेकिल्ल्यातून ही सगळी सूत्र हलली त्या कोथरूड विधानसभेत यंदाही चंद्रकांत पाटीलच निवडून येतील का? हा प्रश्न विचारण्याचा तसा मुळात प्रश्नच येत नाही… कारण कोथरूड (Kothrud Constituency) हा भाजपचा पारंपारिक बालेकिल्ला… इथला मतदार हा भाजपच्या पाठीशी डोळे झाकून उभा राहतो… म्हणूनच बाहेरचे असूनही चंद्रकांत पाटलांना कोथरूडच्या जनतेनं मागच्या टर्मला विधानसभेला पाठवलं… त्यात विद्यमान खासदार मुरलीधर मोहोळ यांच्याही प्रभावक्षेत्राखाली हा भाग असल्यानं चंद्रकांत दादांना तसं भिण्याचे काही कारण नाही… पण इथे सध्या शरद पवार काही राजकीय चाली खेळतायेत… त्यांचे डाव परफेक्ट बसले तर पाटलांच्या राजकारणाला बालेकिल्ल्यातच धक्का पोहोचू शकतो… भाजपच्या बाजूने सगळं वातावरण प्लस मध्ये असताना… भाजपचा पारंपारिक बालेकिल्ला असताना… चंद्रकांत पाटलांसारख्या पक्षातील मातब्बराला टक्कर देण्याची हिंमत महाविकास आघाडीतील कोणता चेहरा करेल? राष्ट्रवादीची तुतारी हाताच्या पंजाला हा मतदारसंघ सोडेल का? ब्राह्मण मतदार अपेक्षेपेक्षा काही वेगळा कौल देऊ शकतील का? याच सगळ्याचं इन डेप्थ राजकीय विश्लेषण

2019 च्या विधानसभा निवडणुकीत सर्वात जास्त चर्चा झाली ती कोथरूड विधानसभेची… कारण विधान परिषदेवर नेहमीच निवडून जाणाऱ्या आणि दरबारी राजकारणी म्हणून ज्यांना विरोधक चांगलेच कानपीचक्या देत होते… त्या चंद्रकांत पाटलांनी एक मोठा निर्णय घेतला… कोल्हापुरातील राजकारणाचं पाणी पिऊन देखील त्यांनी विधानसभेला मतदारसंघ निवडला तो पुण्यातील अस्सल पुणेरी असणाऱ्या कोथरूडचा… चंद्रकांत पाटलांनी कोल्हापुरात राहून राजू शेट्टींच्या वर्चस्वाला अनेकदा आव्हान दिलं होतं… त्यात चंद्रकांत दादांचं नाव भाजपच्या पहिल्या फळीत घेतलं जात असल्यामुळे त्यांना निवडून आणणं हा भाजपसाठी महत्त्वाचा नाही… तर अगदी प्रतिष्ठेचा मुद्दा बनला होता… हे सगळं समीकरण पाहून त्यांना कोथरूड मध्ये लॉन्च करण्याचा निर्णय घेण्यात आला… कारण भाजपचा बालेकिल्ला, संघाची मोठी ताकद, पारंपारिक मतदार हे सगळं जुळून येणार असल्यामुळे त्यांचा विजय जवळपास कन्फर्म समजला जात होता… पण बाहेरचा नको स्थानिक हवा… आमचा आमदार कोथरूडचा हवा… अशी मागणी कोथरूडच्या जनतेने केल्याने… आणि मेधा कुलकर्णी यांचं तिकीट कापल्यामुळे ब्राह्मण मतदार नाराज झाल्यानं… चंद्रकांत दादांसाठी कोथरूडचं घोडे मैदान रिस्की होतं…

2019 ला चंद्रकांत पाटलांना मनसेच्या किशोर शिंदेंनी कडवी झुंज दिली… निवडणूक झाली… निकाल लागला… चंद्रकांत पाटील जिंकले देखील… पण लीड होतं अवघं 25 हजारांचं… भाजपचा हा बालेकिल्ला असल्यानं विजयाचं मार्जिन हे जास्त असेल, असं सर्वांनाच वाटलं होतं… यावरून कोथरूडकरांनी 2019 च्या निकालातूनच आम्हाला ग्राह्य धरू नका… असा जणू अप्रत्यक्ष इशाराच दिला… कोथरूड मतदारसंघ हा पूर्वी शिवाजीनगर मतदारसंघाचा भाग होता. पूर्वीचा शिवाजीनगर व 2009 नंतर झालेला कोथरूड मतदारसंघात 1980 पासून भाजप-शिवसेना युतीचेच उमेदवार निवडून येत आहेत. यापूर्वी खासदार अण्णा जोशी, शिवसेनेचे माजी मंत्री शशिकांत सुतार, शिवसेनेचे विनायक निम्हण, चंद्रकांत मोकाटे यांनी मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले… पण 2009 च्या पुनर्रचनेत नवा कोरा कोथरूड विधानसभा मतदारसंघ अस्तित्वात आला… तेव्हा झालेल्या पहिल्याच निवडणुकीत शिवसेनेच्या चंद्रकांत मोकाटे यांनी कोथरूड चा पहिला आमदार होण्याचा मान मिळवला… मनसेच्या किशोर शिंदेंना त्यांनी पराभूत केलं होतं…

पण 2014 ला शिवसेना आणि भाजप वेगवेगळी लढली… भाजपच्या बाजूने वारं होतच… तेव्हा मेधा कुलकर्णी त्यांनी आमदारकीचा गुलाल कपाळाला लावत कोथरूड मध्ये फक्त भाजपच! हे जणू ठासून सांगितलं… नंतर चंद्रकांत पाटलांना लॉन्च करण्यासाठी हा मतदारसंघ निवडल्याने स्टँडिंग आमदार असूनही तिकीट कापल्याने कुलकर्णी नाराज झाल्या होत्या… त्याचंच रिफ्लेक्शन 2019 च्या घटलेल्या लीडमध्ये आपण पाहिलंच…पण सध्या भाजपसाठी परिस्थिती तशी ओके आहे… मेधा कुलकर्णी यांची वर्णी राज्यसभेवर केल्यानं पारंपारिक ब्राह्मण मतदार पुन्हा भाजपच्या पाठीशी आला… म्हणूनच लोकसभेच्या निकालात एकट्या कोथरूडनं 74 हजार मतांची मोठी आघाडी दिली… हा आकडा सांगून देतोय की कोथरूडकर आजही भाजपच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत… त्यात शहरी विकास म्हणून ज्या काही गोष्टी लागतात त्यांची पूर्तता करण्यासाठी चंद्रकांत पाटील आणि मुरलीधर मोहोळ यांनी पुरेसे प्रयत्न केले आहेत… त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेने यंदा कोथरूडची जागा चंद्रकांत दादांना सेफ आहे… फक्त पवारांनी(Sharad pawar) ऐन निवडणुकीच्या रंगात काही पत्ते खुले केले, तर कोथरूडच्या राजकारणाला नवं वळण लागू शकतं…

गेल्या वर्षी चंद्रकांत पाटलांना मनसेच्या किशोर शिंदे यांनी लढत दिली होती… पण आता मनसेच भाजपच्या टप्प्यात आल्यानं ते निवडणुकीवर किती प्रभाव टाकतील? हे सांगता येत नाही… तर 2009 ला ज्यांनी शिवसेनेचा झेंडा कोथरूडवर फडकवला होता.. ते चंद्रकांत मोकाटे सध्या शिवसेना ठाकरे गटात आहेत… त्यांनी या आधीच विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय जाहीर करून टाकलाय… शरद पवारांसोबत त्यांची भेट झाल्यानंतर कोथरूडसाठी काहीतरी महाविकास आघाडीकडून फील्डिंग लागतेय… एवढं मात्र नक्की…त्यामुळे शरद पवारांची साथ, ठाकरेंची सहानुभूती, मोकाटेंचा जनसंपर्क हे सगळं चंद्रकांत दादा आणि भाजपच्या प्रस्थापित बालेकिल्ल्याला कोथरूडमध्ये धक्का लावतील का? हे पाहणं येणाऱ्या काळात इंटरेस्टिंग ठरेल… बाकी दगड जरी उमेदवार दिला तरी तो निवडून येईल, असा कॉन्फिडन्स बाळगणाऱ्या भाजपचा हा बालेकिल्ला आणि चंद्रकांत दादांची आमदारकी यंदाही कायम राहणार का? पुण्याचा लोकसभेला गड आला… मोहोळांचा रूपानं सिंह देखील आला… पण आता कोथरुड रुपी बालेकिल्ला हातचा जाऊ न देणं… याकडे ही भाजपला लक्ष द्यावं लागेल… एवढं मात्र नक्की…

खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात ‘हा’ चेहरा आमदार दिलीप मोहिते पाटील यांना घाम फोडणार

Khed Alandi Thumbnail

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । खेड आळंदी (Khed Alandi) … विद्यमान आमदार दिलीप मोहिते पाटील (Dilip Mohite Patil) … राष्ट्रवादीच्या फुटीत अजित दादांना साथ दिली… पण लोकसभेला काही तुतारीच्या विरोधात मतदार संघातून लीड देता आलं नाही… थोडक्यात मोहिते पाटलांची आमदारकी येत्या विधानसभेला आधीच काठावर आहे… पण आता शरद पवारांनी बंड केलेल्या आमदारांना सांगून पाडायचंच, असा जणू चंग बांधलाय… त्यासाठी त्यांनी मोहिते पाटलांचा सांगून कार्यक्रम करण्यासाठी खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात एक नवा मोहरा शोधलाय… तालुक्यातील मोठं प्रस्थ असणाऱ्या मोहिते पाटलांना यंदा अजितदादा आपली ताकद लावून निवडून आणतील का? मोहिते पाटलांच्या विरोधात मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी नक्की कुणी कुणी दंड थोपटलेत? आणि या सगळ्याच्या पलीकडे जाऊन खेड आळंदीत यंदा कुठला नेता आमदारकीचा गुलाल लावतोय? त्याचाच हा स्पेशल रिपोर्ट…

पुणे नाशिक हायवेला लागूनच असणारा खेड आळंदी हा विधानसभा मतदारसंघ म्हणून 2009 ला अस्तित्वात आला… संत ज्ञानेश्वर महाराजांच्या देवाची आळंदी, निमगाव-दावडीचा खंडोबा, कन्हेरसरची देवी अशी तीर्थक्षेत्र. भामा-आसखेड आणि चासकमान ही धरणं. भुईकोट, भोरगिरी आणि देव-तोरणे किल्ला असा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा या मतदारसंघाला लाभलाय… चाकण एमआयडीसी याच खेड आळंदीत येत असल्याने अनेक स्थलांतरित मजूर, वाहतूक कोंडी आणि औद्योगिक वसाहतीसाठीही हा मतदारसंघ ओळखला जातो…

पण या मतदार संघाच्या निर्मितीनंतरच म्हणजेच 2009 च्या पहिल्या वहिल्या निवडणुकीत इथून राष्ट्रवादीच्या दिलीप मोहिते पाटलांनी आमदारकी पटकावली… राष्ट्रवादी पक्षाला मतदारसंघात चांगला बेस मिळवून दिला… पण वाढत्या शहरीपट्ट्याच्या वाढलेले अपेक्षा मोहिते पाटलांना काही पूर्ण करता आल्या नाहीत… त्यामुळे खेड आळंदी मतदारसंघातील मतदारांचा मोठा भ्रमनिरास झाला… रखडलेली काम, सर्वच राजकीय पक्षांतील नेत्यांच्या वाढलेल्या महत्त्वकांक्षा, मतदारांना गृहीत धरनं या सगळ्याचा परिणाम असा झाला की की 2014 च्या लोकसभेला राष्ट्रवादीचे उमेदवार देवदत्त निकम हक्काच्या खेड आळंदी विधानसभा मतदारसंघातून पिछाडीवर गेले… हा जितका राष्ट्रवादीचा पराभव होता.. तितकाच मोहिते पाटलांचाही… अर्थात या सगळ्याचं रिफ्लेक्शन विधानसभा निवडणुकीतही पाहायला मिळालं… युत्या – आघाड्या वेगवेगळ्या झाल्या… आणि यातच मत विभाजनाचा फटका विद्यमान आमदार मोहिते पाटलांना बसला… राष्ट्रवादीसाठी बालेकिल्ल्यातच हा मोठा धक्का होता… 2014 ला इथून पहिल्यांदाच सुरेश गोरे यांच्या रूपाने शिवसेनेचा भगवा मतदार संघात फडकला…

आमदार – खासदार शिवसेनेचाच असल्याने खेड आळंदी येत्या काळातही राष्ट्रवादीच्या हातातून निसटणार की काय? अशी परिस्थिती होती… पण मराठा क्रांती मोर्चाला लागलेलं हिंसक वळण, रिक्षा चालकाला केलेली बेदम मारहाण आणि अतुल देशमुख हे खेळ आळंदीत नव्याने उदयास आलेलं नव नेतृत्व या सगळ्यातून पुन्हा मतदार संघाच्या चाव्या राष्ट्रवादीच्या हातात आल्या… दिलीप मोहिते पाटील पुन्हा दुसऱ्यांदा आमदार झाले… शिवसेनेचे गोरे पराभूत झाले… पण अपक्ष लढत दिलेल्या अतुल देशमुखांनी तब्बल 19 फेऱ्यांमध्ये दुसऱ्या क्रमांकाची मतं घेतल्याने त्यांनी मतदारसंघातील प्रस्थापितांना धक्का दिला… पुढे महाराष्ट्रातील बदलत्या समीकरणांचा इम्पॅक्ट खेड आळंदीवरही बघायला मिळाला…

राष्ट्रवादीच्या फुटीत दिलीप मोहिते पाटील यांनी अजितदादांना साथ दिली… त्यांचे विरोधक माजी आमदार सुरेश गोरे शिंदे गटात आले… त्यामुळे गोरे आणि मोहिते पाटील एकाच गटात आल्याने महायुतीची ताकद वाढली… पण विधानसभेला तिकीट कोणाला द्यायचं? याचा मोठा पेच निर्माण झालाय… हे सगळं प्लस मायनस डोक्यात घेऊन लोकसभेलाही महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीशी मोठ लीड देण्याच्या मोहिते पाटलांनी घोषणा करूनही इथून अमोल कोल्हेंचीच गाडी पुढे राहिली… यातून एक गोष्ट क्लियर होती ती म्हणजे मोहिते पाटील या टर्मला पुन्हा डेंजर झोन मध्ये आहेत…

त्यात आघाडीत असणारा उमेदवारीचा स्पेस लक्षात घेता अतुल देशमुख यांनी शरद पवार गटात नुकताच प्रवेश केला… त्यामुळे खेड आळंदीची येणारी विधानसभा निवडणूक मोहिते पाटील विरुद्ध अतुल देशमुख अशी होणार असल्याचं जवळपास कन्फर्म आहे… शरद पवारांच्या बाजूने असणारे सहानुभूतीच वार, ठाकरेंच्या शिवसैनिकांची ताकद, दुखावला गेलेला राष्ट्रवादीचा जुना केडर, मुस्लिम आणि दलित मतांचा बसणारा फटका, लोकसभेला विरोधात गेलेला कौल आणि देशमुखांची मतदारसंघातील ताकद हे सगळं गणित जुळवल तर मोहिते पाटील यांच्यासाठी आमदारकी टफ जाणारी आहे…

अतुल देशमुख यांची मतदार संघातील ताकदही वाखण्याजोगी आहे… 2019 मध्ये अपक्ष निवडणूक लढवून त्यांनी याचा ट्रेलर मतदार संघातील प्रस्थापितांना दाखवला होताच.. मतदारसंघातील ग्रामपंचायत, सोसायटी, कृषी उत्पन्न बाजार समिती अशा सगळ्या पातळ्यांवर निर्णय राजकीय खेळी अतुल देशमुख करत असतात… बैलगाडा शर्यत्यांपासून ते लग्न समारंभापर्यंत पब्लिक टच मध्ये राहण्यात ते सध्या सर्वात जास्त आघाडीवर आहेत…. त्यात शरद पवारांकडून येणाऱ्या विधानसभेला बळ मिळणार असल्यानं यंदा खेड आळंदी मध्ये अतुल देशमुख यांचा विजय कन्फर्म समजला जातोय… पण यासोबतच भाजपकडून शरद बुट्टे पाटील, हिंदी गटाकडून अक्षय जाधव, ठाकरे गटाकडून बाबाजी काळे यांचीही नाव इच्छुकांच्या यादीत असल्याने येत्या काळात खेड आळंदीच्या राजकारणाला कसं वळण लागतय? ते पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे….मतदारसंघात बेरोजगारी, चाकण चौकातील ट्राफिक, सांडपाणी आणि शहरी विकास काम हे प्रश्न येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात सर्वात जास्त हायलाईटेड असणार आहेत… बाकी खेड आळंदीत यंदा आमदार कोण होतोय? दिलीप मोहिते पाटील की अतुल देशमुख? तुमचा कौल कुणाच्या पाठीशी? ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा…

SSC Stenographer Bharti 2024 | SSC अंतर्गत स्टेनोग्राफर पदाच्या तब्बल 2006 रिक्त जागा, असा करा अर्ज

SSC Stenographer Bharti 2024

SSC Stenographer Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही नेहमीच नोकरीच्या विविध संधी घेऊन येत असतो. आज देखील आम्ही अशीच एकमेव तुमची संधी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता एसएससी अंतर्गत स्टेनोग्राफर ग्रेड सी (SSC Stenographer Bharti 2024) या पदाचा रिक्त जागा आहेत. या पदाच्या एकूण 2006 रिक्त जागा आहेत. आणि त्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. ही भरती ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. त्यामुळे उमेदवारांना अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अर्ज करायचे आहे. त्याचप्रमाणे 16 जुलै 2024 पासून अर्ज प्रक्रिया सुरू होत आहे. तर 17 अगोदर 2024 अर्ज करण्याचे शेवटची तारीख आहे. त्यामुळे उमेदवारांनी या तारखे अगोदरच अर्ज करा. आता या भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.

महत्त्वाची माहिती | SSC Stenographer Bharti 2024

  • पदाचे नाव – स्टेनोग्राफर ग्रेड सी
  • पदसंख्या – 2006 पदे
  • शैक्षणिक पात्रता – बारावी
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरू होण्याची तारीख – 26 जुलै 2024
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 ऑगस्ट 2024

अर्ज कसा करावा ? | SSC Stenographer Bharti 2024

  • या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून देखील अर्ज करू शकता.
  • 24 ऑगस्ट 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या तारखे अगोदरच अर्ज करा.
  • अर्ज करण्यापूर्वी पीडीएफ जाहिरात सविस्तरपणे वाचा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा

पीडीएफ जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Breast Cancer | केवळ 1 मिनिटातच होणार ब्रेस्ट कॅन्सरचे निदान; स्मार्ट ब्रा अशाप्रकारे करणार काम

Breast Cancer

Breast Cancer | आज काल कर्करोग मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यातही महिलांमध्ये खास करून स्तनांचा कर्करोग (Breast Cancer) ही एक मोठी समस्या बनलेली आहे. परंतु यावर आता एक तोडगा देखील निघताना दिसत आहे. आता आयआयटी कानपूरच्या एका संशोधकाने एक स्मार्ट ब्रा विकसित केलेली आहे. ज्यामुळे तुम्हाला स्तनाचा कॅन्सर झाला आहे की, नाही हे शोधणे अत्यंत सोपे होणार आहे.

ही स्मार्ट ब्रा संशोधक श्रेया नायर यांनी बायो सायन्स आणि बायो इंजीनियरिंग विभागाचे प्रमुख प्राध्यापक अमिताभ बंदोपाध्याय यांच्या देखरेखीखाली तयार केली आहे. आजकाल ब्रेस्ट कॅन्सरचे (Breast Cancer) प्रमाण झपाट्याने वाढू लागलेले आहेत. आणि अनेकदा ब्रेस्ट कॅन्सर झाला हे महिलांना समजत सुद्धा नाही. त्यामुळे ब्रेस्ट कॅन्सर झाला आहे की, नाही याचे निदान होण्यासाठी आता ही एक नवीन ब्रा विकसित केलेली आहे.

स्मार्ट ब्रा खूप कसे काम करते? | Breast Cancer

ही स्मार्ट ब्रा खूपच आश्चर्यकारक आहे. यामध्ये एक प्रकारचा सेन्सर लावलेला आहे. ज्यामुळे तुमच्या स्तनांमध्ये कोणताही बदल झाला तरी, या ब्रामधील सेंसरला लगेच ते समजते. आणि स्तनांची कर्करोगाची लक्षणे असल्यास ती लगेच दिसतात. आणि सेन्सर ताबडतोब तुम्हाला अलर्ट पाठवतो. स्तनांचा कर्करोग हा एक असा कर्करोग आहे. ज्याच्या जर तुम्हाला सुरुवातीच्या टप्प्यात लक्षणे समजली तरच उपचार होऊ शकतात. त्यामुळे ही ब्रा आता खूप फायदेशीर ठरणार आहे.

एक मिनिटात मिळणार माहिती

ही ब्रा तुम्हाला दिवसातून केवळ एक मिनिट घालायची आहे. ही ब्रा तुमच्या मोबाईलची कनेक्टेड असणार आहे. त्यामुळे तुमचा संपूर्ण डेटा तयार केला असेल, जर ब्रामध्ये असलेल्या सेंसरला तुमच्या स्तनांमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल आढळला, तर तो बदल ते लगेच मोबाईलवर पाठवते. आणि महिलेला डॉक्टरची संपर्क साधण्याचा सल्ला देते. अशा प्रकारची एक सिस्टीम यामध्ये तयार केलेली आहे.

याबद्दल सांगताना श्रेया नायर यांनी सांगितले की, या ब्राची क्लीनिकल ट्रायल सुरू आहे. जर संपूर्ण सुरळीत झाले तर वर्षभरात ही ब्रा बाजारामध्ये देखील उपलब्ध होईल. या प्राची किंमत जवळपास पाच हजार रुपये एवढी असणार आहे. या आधी बाजारात असे कोणत्याही प्रकारचे उपकरण उपलब्ध नसल्याचा दावा देखील शास्त्रज्ञांनी केलेला आहे. परंतु आता ही ब्रा जर मार्केटमध्ये उपलब्ध झाली, तर स्तनांचा कर्करोग लवकर ओळखणे आणि त्यावरती लवकर उपचार करणे खूप सोपे होणार आहे.

लाडकी बहीण योजनेबाबत अजित पवारांचं ट्विट चर्चेत; वित्त विभागाच्या आक्षेपानंतर काय म्हणाले?

ajit pawar ladki bahin yojana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील महिलांचे आर्थिक सक्षमीकरण होण्यासाठी महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) सुरु केली आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यभरातील महिलांना दर महिन्याला १५०० रुपयांची आर्थिक मदत सरकार कडून करण्यात येणार आहे. येत्या १९ तारखेला या योजनेचे पैसे महिलांच्या बँक खात्यात जमा होणार असून महिलावर्गात मोठ्या आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे. मात्र वित्त विभागाने या योजनेवरून प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याच्या बातम्या काल वाऱ्यासारख्या पसरल्या. त्यामुळे योजना सुरु राहणार कि बंद पडणार असा प्रश्न महिलाना पडला. यावर आज अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी स्पष्टपणे भूमिका मांडत वित्त विभागाचा या योजनेवर कोणताही आक्षेप नसल्याचे सांगितलं.

अजित पवारांनी ट्विट करत म्हंटल, महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री आणि राज्याचा अर्थ व नियोजन मंत्री म्हणून मी स्वतःच ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजना राज्याच्या वर्ष 2024-25 च्या अतिरिक्त अर्थसंकल्पात सादर केली आहे. वित्त व नियोजन, सर्व संबंधित विभाग तसेच राज्य मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतरच या योजनेची घोषणा मी राज्याच्या अर्थसंकल्पात केली. चालू आर्थिक वर्षात योजनेसाठी आवश्यक एकूण 35 हजार कोटी रुपयांच्या संपूर्ण रकमेची तरतूद यावर्षीच्याच अर्थसंकल्पात केली आहे. त्यामुळे या योजनेसाठी पैसा कुठून आणणार ?, हा प्रश्नच उद्भवत नाही. महाराष्ट्रासारख्या आर्थिक संपन्न राज्याला एवढी रक्कम खर्च करणे शक्य आहे.

राज्यातील माता-भगिनी-मुलींच्या आर्थिक स्वातंत्र्य, स्वावलंबन, पोषण व सर्वांगीण सक्षमीकरणासाठी, मान, सन्मान, स्वाभिमान वाढवण्यासाठी ही रक्कम खर्च करण्याची राज्य शासनाची तयारी आहे. त्यामुळे ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’ला या राज्यातील कुणाचाही विरोध असण्याचे कारण नाही, असूच शकत नाही. काही प्रसार माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या, या योजनेला वित्त विभागाचा विरोध असल्याच्या बातम्या कपोलकल्पित, वस्तुस्थितीशी, विसंगत, राजकीय हेतूने प्रेरित आहेत. प्रसार माध्यमांनी अशा बिनबुडाच्या बातम्या देणे कृपया थांबवावे. राज्यातील कुणाचाही अशा बातम्यांवर विश्वास बसणार नाही, याची मला खात्री आहे. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या यशस्वीतेसाठी अधिकाधिक भगिनींना यात सहभागी करून घेण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूया….

SBI Mumbai Bharti 2024 | स्टेट बँक ऑफ इंडिया मुंबई अंतर्गत मोठी भरती सुरु; असा करा अर्ज

SBI Mumbai Bharti 2024

SBI Mumbai Bharti 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही नेहमीच नोकरीच्या विविध आणि नवनवीन संधी घेऊन येत असतो. जेणेकरून विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल आणि त्यांना चांगल्या प्रकारे नोकरी लागेल. अनेक विद्यार्थ्यांनाही मुंबईमध्ये बँकेत नोकरी करण्याची इच्छा असते. आता त्यांची ही इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. कारण स्टेट बँक ऑफ इंडिया मुंबई (SBI Mumbai Bharti 2024) अंतर्गत एक मोठी भरती निघालेली आहे. या भरती अंतर्गत अधिकारी लिपीच्या पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या पदाच्या एकूण 68 रिक्त जागा आहेत. आणि त्या जागा भरण्यासाठी इच्छुकानी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. ही भरती ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करा. त्याचप्रमाणे 14 ऑगस्ट 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. भरतीची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.

महत्त्वाची माहिती | SBI Mumbai Bharti 2024

  • पदाचे नाव – अधिकारी लिपिक
  • पदसंख्या – 68 जागा
  • नोकरीच्या ठिकाण – मुंबई
  • वयोमर्यादा – 20 ते 30
  • अर्ज शुल्क – 750 जागा
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 ऑगस्ट 2024.

अर्ज कसा करावा ? | SBI Mumbai Bharti 2024

  • या भरतीचा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून देखील अर्ज करू शकता.
  • 14 ऑगस्ट 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे त्यामुळे या तारखे अगोदरच अर्ज करा.
  • अर्ज करण्यापूर्वी पीडीएफ जाहिरात सविस्तरपणे वाचा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा

पीडीएफ जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Indian Railway Rule : वेटिंग तिकीट घेऊन प्रवास केल्यास होईल दंड ? काय सांगतो रेल्वेचा नवा नियम

Indian Railway Rule : जर तुम्ही रेल्वेने नियमित प्रवास करीत असाल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. रेल्वेकडून एक महत्वपूर्ण नियम जारी करण्यात आला आहे. भारतीय रेल्वेने नुकतेच वेटिंग तिकिटांवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी नवीन नियम लागू केले आहेत.

आतापर्यंत ज्या प्रवाशांचे तिकीट कन्फर्म किंवा आरएसी होते ते स्लीपर किंवा एसीमध्ये वेटिंग तिकीट घेऊन प्रवास करत होते. त्यामुळे कन्फर्म तिकीट असलेल्या प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागतो. म्हणूंच कन्फर्म तिकीट असलेल्या बर्थवर सुद्धा होणारी गर्दी लक्षात घेऊन रेल्वेने हा नवा नियम (Indian Railway Rule) जारी केला आहे.

… तर ठोठावण्यात येणार दंड (Indian Railway Rule)

जे लोक कन्फर्म तिकीटाशिवाय प्रवास करणार आहेत त्यांच्यासाठी भारतीय रेल्वेकडून जबर दंड आकारण्यात येणार आहे. वेटिंग तिकीट असलेल्या प्रवाशाने आरक्षित डब्यातून प्रवास केल्यास त्याला 440 रुपये दंड आकारला जाईल आणि ट्रेन तिकीट अधिकारी (TT) त्याला मध्यभागी सुद्धा उतरवू शकतात.
याशिवाय प्रवाशांना जनरल डब्यात पाठवण्याचा अधिकार टीटीला असेल. दुसरीकडे, वेटिंग तिकीट असलेल्या प्रवाशाने स्लीपर कोचमध्ये प्रवास केल्यास त्याला 250 रुपयांचा दंड ठोठावला जाईल आणि पुढील स्थानकावर उतरवले (Indian Railway Rule) जाईल.

प्रवाशांनी काय करावे ? (Indian Railway Rule)

  • रेल्वेच्या नियमानुसार प्रतीक्षा यादीतील तिकिटावर प्रवास करणे बेकायदेशीर आहे.
  • तुम्ही खिडकीच्या काउंटरवरून तिकीट घेतले असेल, तर तुम्ही प्रतीक्षा यादीतील तिकिटावर जनरल डब्यात प्रवास करू शकता.
  • ऑनलाइन बुक केलेल्या प्रतिक्षा यादीतील तिकिटांवर म्हणजेच ई-तिकीट असलेल्या प्रवाशांना ट्रेनमध्ये चढण्याची परवानगी नाही.
  • तुमची प्रतीक्षा यादी तिकीट ऑनलाइन असेल, तर चार्ट तयार झाल्यानंतर, IRCTC ते आपोआप रद्द करेल आणि तुम्हाला परतावा मिळेल.
  • रिफंडची रक्कम तुमच्या खात्यात येते रिफंड रक्कम येण्यासाठी 3-4 दिवस लागू शकतात.
  • जर तुमचे तत्काळ तिकीट देखील प्रतीक्षा यादीत असेल आणि प्रवासाच्या दिवसापर्यंत ते कन्फर्म झाले नसेल तर तुम्ही त्या तिकिटावर प्रवास करू शकत नाही. तत्काळ हे वेटिंग तिकीट असल्यास, तिकीट रेल्वे आपोआप रद्द करते.
  • जर तुमचे तिकीट RAC (रिझर्व्हेशन अगेन्स्ट कॅन्सलेशन) असेल, तर याचा अर्थ तुम्हाला (Indian Railway Rule) ट्रेनमध्ये जागा मिळेल, परंतु तुम्हाला ती जागा दुसऱ्या प्रवाशासोबत शेअर करावी लागेल. या प्रकरणात, आपण प्रवास करू शकता.

वेटिंग तिकिटांसाठी काय आहेत नवीन नियम

भारतीय रेल्वेच्या नवीन नियमांनुसार, जर तुम्ही खिडकीतून तिकीट खरेदी केले असेल आणि ते तिकीट प्रतीक्षा यादीत राहिले तर तुम्ही ते रद्द करून पैसे परत मिळवू शकता. मात्र अनेक प्रवासी ती रद्द करण्याऐवजी प्रवास करण्यासाठी ट्रेनमध्ये चढतात. रिफंड पॉलिसी (Indian Railway Rule) अंतर्गत, रद्द केल्यानंतर तुमच्या तिकिटाची संपूर्ण रक्कम परत केली जाईल.

Vivo Y18i : Vivo ने लाँच केला स्वस्तात मस्त Mobile; किंमत फक्त 7,999 रुपये

Vivo Y18i launched

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । लोकप्रिय मोबाईल निर्माता कंपनी Vivo ने भारतीय बाजारात एक स्वस्तात मस्त असा मोबाईल लाँच केला आहे. Vivo Y18i असं या नव्या स्मार्टफोनचे नाव आहे. कंपनीने हा मोबाईल अवघ्या 7,999 रुपयांत बाजारात आणला आहे. त्यामुळे मध्यमवर्गीय ग्राहकांसाठी हा स्मार्टफोन खरेदीसाठी उत्तम पर्याय ठरेल. किंमत कमी असली तरी मोबाईल मध्ये अनेक भन्नाट फीचर्स मिळतात. चला तर मग आज आपण याबाबत अगदी सविस्तर पणे जाणून घेऊयात…

डिस्प्ले –

कंपनीने Vivo Y18i मध्ये 90Hz रिफ्रेश रेटसह 6.56-इंचाचा HD+ LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेला 1,612 × 720 पिक्सेल रिझोल्यूशन आणि 528 Nits च्या पीक ब्राइटनेस मिळतो. कंपनीने स्मार्टफोनमध्ये Unisoc Tiger T612 प्रोसेसर बसवला असून विवो चा हा मोबाईल Android 14 वर आधारित FunTouch OS या ऑपरेटिंग सिस्टीमवर काम करतो. स्मार्टफोन मध्ये 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज देण्यात आले आहे.

कॅमेरा- Vivo Y18i

मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास, स्मार्टफोनमध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आलाय ज्यामध्ये 13MP मुख्य कॅमेरा आणि 0.08MP चा सेकंडरी कॅमेरा मिळतो. तर सेल्फी आणि विडिओ कॉल साठी समोरील बाजूला 5MP चा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. पॉवरसाठी या स्मार्टफोनमध्ये 5000mAh बॅटरी बसवण्यात आली असून हि बॅटरी 15W चार्जिंगला सपोर्ट करते. अन्य फीचर्सबाबत बोलायचं झाल्यास, 4G LTE सपोर्ट, वाय-फाय, ब्लूटूथ, GPS आणि USB टाइप-सी पोर्ट यांसारखे फीचर्स मिळतात.

किंमत किती ?

Vivo Y18i हा स्मार्टफोन 4GB रॅम + 64GB स्टोरेजमध्ये लॉन्च केला आहे. त्याची किंमत 7,999 रुपये आहे. हा हँडसेट ऑफलाइन मार्केटमध्ये उपलब्ध असेल. तुम्ही हा मोबाईल हिरव्या आणि काळ्या रंगात खरेदी करू शकता.

मराठा आरक्षणावर शरद पवारांनी काढला तोडगा; पहा काय सल्ला दिला?

sharad pawar maratha aarakshan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. एकीकडे मनोज जरांगे पाटील हे ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी प्रयत्नशील आहेत तर दुसरीकडे ओबीसी आरक्षण वाचाव यासाठी लक्ष्मण हाके यांनी पुढाकार घेतला आहे. त्यातच आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनीही आरक्षण बचाव यात्रा सुरु केली आहे. या एकूण संपूर्ण प्रकरणांनी महाराष्ट्राचे वातावरण ढवळून निघालं आहे. या सर्व पार्श्वभूमीवर शरद पवारांनी (Sharad Pawar) मराठा आरक्षणावर तोडगा काढत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याना काही सूचना केल्यात.

प्रसारमाध्यमांशी बोलताना शरद पवार म्हणाले, मुख्यमंत्र्यांना मी त्यांना एकच गोष्ट सांगितली की या एकूण परिस्थितीची मला काळजी वाटते. त्यामुळ त्यातून मार्ग निघावा असं वाटतं, पण मला आज अडचण अशी दिसते की सरकारनं ज्या योग्य पद्धतीनं चर्चा करायला पाहिजे ती केलेली नाही. जरांगे यांच्यासोबत मुख्यमंत्री आणि त्यांचे अन्य नेते संवाद साधत आहेत मात्र दुसरीकडे जरांगेना विरोधक करणाऱ्या लोकांसोबत सरकार मधील दुसरे लोक सुसंवाद ठेवत आहेत. हे कशासाठी? कारण ओबीसींशी चर्चा करण्यासाठी सरकार छगन भुजबळांना सांगायचं दुसऱ्यांशी चर्चा करताना स्वतः करायची तर काहींना बाजुला ठेवायचं यामुळं कारण नसताना गैरसमज होतात असं म्हणत शरद पवारांनी सरकारची चूकच दाखवून दिली. तसेच याऐवजी सगळ्यांना विश्वासात घ्यावं आणि मार्ग काढावा असा सल्ला पवारांनी दिला.

आरक्षणाच्या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी आम्ही सूचवलं कि मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांना बोलवा. ओबीसी आरक्षणाचा आग्रह धरणारे भुजबळ आणि हाके तसेच त्यांच्या सहकाऱ्यांना बोलवा. आम्हालाही बोलवा. त्यावर आपण सामूहिक चर्चा करून मार्ग काढू. ज्यामुळं राज्यातील वातावरण सामाजिक ऐक्याच्या दृष्टीने अनुकुल आणि चांगलं राहिलं असं शरद पवार म्हणाले. आरक्षणाचा प्रश्न सुटावा हा आमचा प्रयत्न आहे. ज्या ज्या घटकांकडून मार्ग निघत असेल त्यांना सोबत घेऊन संवाद साधून मार्ग काढावा असा सल्ला शरद पवारांनी दिला.

Open आणि EWS प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी Form For OBC Candidate लिंक ओपन करा; विद्यार्थ्यांचे अजितदादांना पत्र

Form For OBC Candidate ajit pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ज्याप्रमाणे SEBC च्या विद्यार्थ्यांसाठी सेट भवनच्या संकेतस्थळावर Form For SEBC Candidate ही लिंक ओपन केली आहे अगदी त्याचप्रमाणे Open आणि EWS प्रवर्गातून फॉर्म भरलेल्या आणि 26 जानेवारी 2024 च्या परिपत्रकानुसार ओबीसी प्रमाणपत्र मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी Form For OBC Candidate या शीर्षकांतर्गत प्रवर्ग बदलण्यासाठी लिंक ओपन करण्यात यावी अशा विनंतीचे पत्र सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार याना दिले आहे.

विद्यार्थ्यांचे पत्र जसच्या तस

प्रति,
अजितदादा पवार साहेब
मा. उप मुखयमंत्री
महाराष्ट्र राज्य

विषय :- Open आणि EWS प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी Form For OBC Candidate ही लिंक ओपन करण्याबाबत.

संदर्भ
१) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सेट भवन OW/2024/109 जाहीर प्रकटन . दि.१९/०७/२०२४.
२) महाराष्ट्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती,भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग (जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियमन ) अधिनियम 2000 ( अधिसूचना: सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग अधिसूचना 26 जानेवारी 2024)

महोदय,
उपरोक्त विषयास अनुसरून आपणास विनंती करण्यात येते की, आपल्या सेट भवन कडून महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गाकरिता आरक्षण अधिनियम 2024 नुसार मराठा समाजातील विद्यार्थ्यांना SEBC प्रवर्गामध्ये समाविष्ट झालेत आहेत, अशा विद्यार्थ्यांसाठी सेट भवनाच्या संकेतस्थळावर Form For SEBC Candidate या शीर्षकांतर्गत 19 जुलै 2024 ते 25 जुलै 2024 पर्यंत प्रवर्ग बदलण्यासाठी लिंक ओपन केली आहे.

परंतु ज्या विद्यार्थ्यांनी सेट परीक्षेचा फॉर्म भरत असताना EWS प्रवर्गातून भरला आहे अशा अनेक विद्यार्थ्यांना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्या 26 जानेवारी 2024 च्या अधीसूचनेनुसार ओबीसी प्रमाणपत्र मिळाले आहेत. ( सगळे सोयरे परिपत्रक २६ /०१/२०२४).
अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी ज्याप्रमाणे SEBC च्या विद्यार्थ्यांसाठी सेट भवनच्या संकेतस्थळावर Form For SEBC Candidate ही लिंक ओपन केली आहे अगदी त्याचप्रमाणे Open आणि EWS प्रवर्गातून फॉर्म भरलेल्या आणि 26 जानेवारी 2024 च्या परिपत्रकानुसार ओबीसी प्रमाणपत्र मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी Form For OBC Candidate या शीर्षकांतर्गत प्रवर्ग बदलण्यासाठी लिंक ओपन करावी ही नम्र विनंती, तसेच सदर बदल करण्यासाठी 05 ऑगस्ट 2024 पर्यंत प्रवर्ग बदलण्यासाठी लिंक ओपन करून मिळावी हि विनंती