Wednesday, December 31, 2025
Home Blog Page 5700

चित्रीकरणाला परवानगी पण ज्येष्ठ कलाकारांना सिनेमाच्या सेटवर बंदीचं; निर्माते पेचात

प्रातिनिधिक छायाचित्र

मुंबई । चित्रपट-मालिकांच्या चित्रीकरणाला राज्य सरकारनं परवानगी दिलीय खरी, पण प्रत्येकाला नियमांच्या ‘चौकटी’मध्ये राहूनच काम करावं लागणार आहे. राज्य सरकारनं चित्रीकरणासाठी मार्गदर्शक सूचनांची यादीही जाहीर केली आहे. त्यात ६५हून अधिक वयोगटातील कलाकारांना चित्रीकरणाच्या सेटवर काम करता येणार नाही आहे. याचा फटका अनेक चित्रपटांच्या रखडलेल्या चित्रपटांच्या चित्रीकरणावर होणार आहे. प्रत्येक चित्रपटात वयोवृद्ध व्यक्तीची भूमिका सादर करताना मोठ्या वयाच्या कलाकारांची कास्टिंग केली जाते. मात्र, हा नियम पाहता बरेच दिग्दर्शक सिनेमांच्या चित्रीकरणाला सुरुवात करूच शकत नाही आहेत. सध्या ६५ वर्षं वयाच्या मुद्यावर फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हिजन डायरेक्टर्स असोसिएशन आणि राज्य सरकार यांच्यामध्ये बोलणी सुरू आहे. हा नियम शिथिल करण्याची मागणी डायरेक्टर्स असोसिएशनने राज्य सरकारकडे केली आहे. हा नियम शिथील केला जाणार का या मुद्द्याकडे सिनेसृष्टीचं लक्ष लागून राहिलं आहे.

दरम्यान, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मार्चच्या मध्यापासून सर्व प्रकारची चित्रीकरणे थांबविण्यात आली होती. ६० दिवसांहून अधिक काळ लोटल्यामुळे चित्रीकरण पुन्हा सुरू करण्याची परवानगी मिळाल्यानं कलाकारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. असं असलं तरी नियम अटींचे सर्वांनाच पालन करायचे आहे.

चित्रीकरणाच्या सेटवर खाली दिलेले नियम पाळणं कलाकारांसाठी आवश्यक आहेत:

१)रंगभूषाकार आणि केशरचनाकारानं काम करताना मास्क आणि फेसशिल्डचा वापर करावा.

२)कलाकारांनी आपले माईक आणि लेपल माईक केवळ स्वतःसाठी वापरावे. दुसऱ्या कलाकारानं वापरलेल्या माइकचा वापर करू नये.

३)सेटवरील प्रत्येकानं आरोग्य सेतू ऍपचा वापर करणं आवश्यक.

४)स्वच्छतेची सर्व मार्गदर्शक तत्वं आणि आपत्कालीन क्रमांकाचा फलक सेटवर दर्शनी भागात असावा.

५)सेटवर चित्रीकरण सुरू असताना डॉक्टर, परिचारिका, रुग्णवाहिका पूर्ण वेळ असणं बंधनकारक.

६)सेटवर किमान तीन स्वच्छतागृह असणं आवश्यक. दर तासाला स्वच्छतागृहांचं निर्जंतुकीकरण होणं आवश्यक.

७)एक वैद्यकीय कर्मचारी सेटवर उपस्थित असलेल्या सर्वांच्या शरीराच्या तापमानाची आणि ऑक्सिजन पातळीची नोंद ठेवेल.

८)गर्भवती महिला कर्मचारी किंवा जर एखाद्या कर्मचाऱ्याची पत्नी गर्भवती असेल; अशा व्यक्तीला चित्रीकरणाच्या सेटवर काम करता येणार नाही (आगामी तीन महिन्यांसाठी)

९)६५ वर्षांहून अधिक वयाचे कलाकार, तंत्रज्ञ किंवा सिनेकर्मचारी यांना चित्रीकरण सेटवर येण्यास मनाई.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

रेल्वे कर्मचाऱ्याला पाकिस्तानी गुप्तहेराने विचारले ‘हे’ तीन प्रश्न; भारतीय लष्कराच्या हालचालींवर ठेवत होते पाळत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयच्या गुप्तहेरांच्या संपर्कात आलेल्या दोन रेल्वे कर्मचाऱ्यांबरोबरच्या चौकशीत अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. पाकिस्तानी उच्चायुक्तालयात काम करणाऱ्या या दोन्ही गुप्तहेरांनी भारतीय सैन्याच्या हालचालीशी संबंधित माहिती गोळा करण्यासाठी रेल्वे भवनात सापळा रचला होता, सध्या रेल्वेच्या या दोन्ही कर्मचार्‍यांना चौकशीनंतर सोडण्यात आले आहे.

पाकिस्तानी गुप्तहेरांशी कनेक्शन असल्याच्या संबंधात, रेल्वेच्या २ कर्मचार्‍यांची दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने चौकशी केली आहे. या चौकशीनंतर दोघांनाही सोडण्यात आले. चौकशी दरम्यान रेल्वेच्या दोन्ही कर्मचार्‍यांनी सांगितले की, पाकिस्तानी उच्चायुक्तालयात कार्यरत आयएसआय एजंट आबिद आणि ताहिर यांनी बडोदा हाऊसच्या बाहेर त्यांची भेट घेतली होती. या रेल्वे कर्मचार्‍यांना अडकविण्याचा प्रयत्न त्या दोघां गुप्तहेरांनी केला. रेल्वेमध्ये सरकारी नोकरी कशी मिळवायची याबद्दलची माहिती त्यांनी मिळवण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तानी एजंट त्यांच्या मिशनमध्ये यशस्वी ठरले असते,मात्र त्यांनी विचारलेल्या काही प्रश्नांमुळे रेल्वे कर्मचार्‍यांना त्यांचा संशय आला. ते प्रश्न काय होते ते जाणून घेऊयात?

१. भारतीय सैन्य रेल्वेच्या कोणत्या बोगीमधून जातात?

२.भारतीय सैन्य रेल्वेमध्ये कसे येतात?

३. भारतीय सैन्याच्या पर्सनल ट्रेनची सुरुवात केव्हा आणि कशी होते?

या प्रश्नांनी रेल्वे कर्मचार्‍यांना आबिद आणि ताहिरचा संशय आला, मात्र या लबाड गुप्तहेरांनी आपला भाऊ पुस्तक लिहित आहे, ज्यासाठी ते माहिती गोळा करीत आहेत, असे सांगून रेल्वे कर्मचार्‍यांना फसवण्याचा प्रयत्न केला.

पाकिस्तानी दूतावासात तैनात असलेल्या या एजंट्सने त्यांच्या जाळ्यात सैन्याच्या एका सार्जंटला पकडले होते, जो वाहतूक विभागात पोस्ट ड्युटी करत असे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने या हवालदाराची चौकशी करण्याची परवानगी मागितली, तेव्हा सैन्यातून या हवालदाराचे कोर्ट मार्शल झाले असल्याचे सांगण्यात आले.

पाकिस्तानी हाय कमिशनमध्ये काम करणारे अबीद हुसेन आणि मोहम्मद ताहिर खान यांना दिल्लीच्या लष्करी इंटेलिजेंस आणि स्पेशल सेलने दिल्लीच्या करोल बाग येथील रेस्टॉरंटमध्ये पकडले. या जासूस रॅकेटमध्ये आबिद आणि ताहिरसह सहभागी असलेला त्यांचा चालक जावेद यालाही पकडण्यात आले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

देशातील एकूण देवाणघेवाणीची आकडेवारी RBI करणार जाहीर; ३ जूनपासून झाली सुरवात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ज्याप्रमाणे दररोज पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर केले जातात, त्याच प्रकारे आता पैशाचा व्यवहार डेटाही देण्यात येईल. खरं तर, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने देशभरातील विविध पेमेंट सिस्टममधून दररोजच्या व्यवहाराची माहिती देण्यास आता सुरवात केलीली आहे. त्याअंतर्गत आता एटीएममधून पैसे काढण्याविषयीची माहिती मध्यवर्ती बँक एनईएफटी, आरटीजीएस आणि यूपीआयकडून दररोजच्या व्यवहारासह दिली जात आहे.

३ जूनचा डेटा जाहीर
रिझर्व्ह बँकेने दुसर्‍या दिवशी म्हणजेच ४ जून रोजी पैशांचा व्यवहाराचा डेटा जाहीरकेला. या आकडेवारीनुसार ३ जून रोजी देशभरातील एटीएम मशीनमधून सुमारे ४,४२६.९२ कोटी रुपये काढून घेण्यात आले. बँकिंग प्रतिनिधींच्या माध्यमातून ६६८.८८ कोटी रुपयांचे व्यवहार झाले आहेत. देशात आरटीजीएसमार्फत ४.३ लाख व्यवहार झाले, ज्यांचे मूल्य ३३,६३२.८९ कोटी रुपये आहे.

IMPS कडून ७,६५३ कोटींचे व्यवहार
त्याचवेळी एनईएफटीकडून एकूण १००.३६ लाख व्यवहार झाले आणि त्यांचे मूल्य ६२,९८५.७५ कोटी रुपये होते. ३ जून रोजी यूपीआय कडून ४५६.२६ लाख व्यवहार झाले आणि त्यांचे एकूण मूल्य ९,६२२.३८ कोटी रुपये होते. जर आयएमपीएस व्यवहाराबद्दल बोलायचे झाल्यास त्याचे मूल्य ७६५३.७१ कोटी रुपये होते. प्रत्येक दिवसाच्या व्यवहाराचा डेटा त्याच्या पुढील कार्यकारी दिवशी जाहीर केला जाईल.

रिझर्व्ह बँक लवकरच एटीएम कार्डवरील व्यवहारांचा दररोजचा डेटादेखील लवकरच उपलब्ध करुन देणार आहे. त्यासाठी ते एक रिपोर्टिेंग यंत्रणा तयार करण्याच्या प्रक्रियेत आहे. रिसर्च आणि इनोवेशनच्या उद्देशाने ही आकडेवारी जाहीर केली जात असल्याचे आरबीआयचे म्हणणे आहे.

कोरोना संकटाच्या वेळी आरबीआयने बँकिंगशी संबंधित नियमांत अनेक बदल केले आहेत. त्याअंतर्गत एटीएममधून पैसे काढण्यासह इतरही अनेक गोष्टींवर ३० जूनपर्यंत सूट देण्यात आली आहे. मात्र, अशी शक्यता आहे की या कालावधीत आणखीनच वाढ होऊ शकेल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Unlock1: प्रार्थनास्थळांवर दर्शनासाठी केंद्राची नवीन नियमावली; ‘हे’ असतील नियम

नवी दिल्ली । केंद्र सरकारने गेल्या आठवडयात लॉकडाऊनमध्ये शिथिलता देत अनलॉक 1.0 जाहीर करत मॉल, प्रार्थनास्थळे आणि हॉटेल उघडण्यास परवानगी दिली. येत्या ८ जूनपासून काही राज्यांमध्ये मॉल, प्रार्थनास्थळे आणि हॉटेल खुली होणार आहेत. महाराष्ट्रात मात्र अजूनही मॉल, प्रार्थनास्थळे आणि हॉटेल उघडण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. प्रार्थनास्थळांमध्ये दर्शनासाठी गेल्यानंतर कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी काही नियमांचे पालन करावे लागेल. केंद्र सरकारने त्या दृष्टीने काल संध्याकाळी प्रार्थनास्थळांसाठी काही मार्गदर्शकतत्वे जारी केली आहेत. त्यानुसा भाविकांनी प्रार्थनास्थळांवर दर्शनासाठीर खालील नियम पाळणे बंधनकारक असणार आहेत.

१) प्रार्थनास्थळाच्या प्रवेशद्वारावर हात स्वच्छ करण्यासाठी सॅनिटायझर आणि शरीराचे तापमान मोजण्यासाठी थर्मल स्क्रिनिंगची सुविधा आवश्यक आहे.

२) आजाराची कुठलीही लक्षण नसणाऱ्या तंदुरुस्त व्यक्तीलाच प्रार्थना स्थळाच्या परिसरात प्रवेश दिला जाईल.

३)चेहऱ्यावर मास्क बंधनकारक असेल. त्यांनाच प्रवेश दिला जाईल.

४)पोस्टर/स्टँण्डीच्या माध्यमातून Covid-19 चा फैलाव रोखण्याच्या उपायोजनासंदर्भात माहिती देण्यात यावी. प्रार्थनास्थळांमध्ये दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना ठळकपणे दिसेल अशा पद्धतीने पोस्टर/स्टँण्डी ठेवण्यात यावी.

५)ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिप्सच्या माध्यमातून करोना व्हायरस रोखण्यासाठी काय करणे आवश्यक आहे? त्याबद्दल जनजागृती करण्यास सांगण्यात आले आहे.

६)बुट/चप्पल कारमध्येच ठेऊन प्रार्थनास्थळांमध्ये प्रवेश करावा.

७)पार्किंग लॉट आणि प्रार्थना स्थळांबाहेर सोशल डिस्टन्सिंग पाळून गर्दीचे व्यवस्थापन करावे.

८)मंदिराच्या बाहेर किंवा आत असलेली सर्व दुकाने, स्टॉल, कॅफेटेरियामध्ये सोशल डिस्टन्सिंगचे पालन झाले पाहिजे.

९)दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या रांगेचे व्यवस्थापन करताना योग्य अंतर राखण्यासाठी चिन्हांकन करावे. सोशल डिस्टन्सिंग पाळले गेलेच पाहिजे.

१०)रांगेमध्ये ६ फुटाचे शारीरिक अंतर आवश्यक आहे.

११)प्रार्थनास्थळांमध्ये प्रवेश करण्यापूर्वी भाविकांनी त्यांचे हात-पाय साबणाने स्वच्छ धुणे आवश्यक आहे.

१२) पुरेसे सोशल डिस्टन्सिंग पाळले जाईल अशा पद्धतीने मंदिरात बसण्याची आसनव्यवस्था असली पाहिजे.

१३)प्रार्थनास्थळांमध्ये मुर्ती, पवित्र ग्रंथांना स्पर्श करण्याची परवानगी देण्यात आलेली नाही.

१४)रेकॉर्डेड संगीत वाजवण्याची परवानगी असेल पण इन्फेक्शनचा धोका टाळण्यासाठी समूह गायनाला परवानगी नाकारण्यात आली आहे.

१५)मंदिराने कॉमन अंथरी टाळावी त्याऐवजी भाविकांनी स्वत:सोबत येताना अंथरी किंवा कापड आणावे, जे जाताना ते आपल्यासोबत घेऊन जाऊ शकतात.

१६)प्रसाद चढवणे किंवा त्याचे वाटप, पवित्र पाणी अंगावर शिंपडण्याला परवानगी नसेल.

१७)कम्युनिटी किचन, लंगर, अन्नदान फिजिकल डिस्टन्सिंग पाळून करता येईल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

गुजरातमध्ये काँग्रेस आमदारांचे राजीनामा सत्र सुरूच; राज्यसभा निवडणुकीमुळे घोडेबाजार तेजीत

अहमदाबाद । राज्यसभा निवडणुकीच्या तोंडावर गुजरातमध्ये काँग्रेसला लागलेली गळती थांबायला तयार नाही. गेल्या दोन दिवसांत ३ आमदारांनी राजीनामा दिल्याने राज्यसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. आमदारांनी एकापाठोपाठ एक राजीनामे दिल्याने गुजरातमध्ये काँग्रेस आमदारांची संख्या आता ६५ वर आली आहे. मोरबीचे काँग्रेस आमदार ब्रिजेश मेरजा यांनी राजीनामा दिला आहे.

याआधी कर्जनचे आमदार अक्षय पटेल आणि कपराडाचे आमदार जीतू चौधरी यांनी राजीनामा दिला होता. तर याआधी मार्च महिन्यात काँग्रेसच्या पाच आमदारांनी राजीनामा दिला होता. त्यावेळी काँग्रेसच्या आमदारांची संख्या ६८ पर्यंत खाली आली होती. २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने ८१ जागा जिंकल्या होत्या. गुजरातमध्ये राज्यसभेच्या ४ जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. ४ पैकी २ जागा जिंकण्याचा काँग्रेसचा दावा होता. पण काँग्रेसच्या आमदारांनी राजीनामा दिल्याने त्यांची संख्या ६५ पर्यंत खाली आली आहे. त्यामुळे काँग्रेसला दुसरी जागा जिंकणे अवघड बनले आहे.

आमदारांच्या राजीनाम्याबाबत बोलताना एका काँग्रेस नेत्याने सांगितले की, हे अपेक्षित होते. भाजप नेते अन्य राज्यांत असं करू शकतात, तर गुजरात हे त्यांचे घर आहे.गुजरातचे काँग्रेस प्रभारी राजीव सातव म्हणाले, भारत स्वातंत्र्य भारताच्या इतिहासातील सर्वात मोठ्या आरोग्य, आर्थिक आणि मानवी संकटात आहे. असे असूनही भाजप आपली सगळी शक्ती आमदारांच्या घोडेबाजारावर लावत आहे. त्यामुळे गुजरातमधील जनतेचे नुकसान होऊ शकते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

केरळातील हत्तीणीच्या मृत्यूबाबत मोठा खुलासा; स्फोटकं भरलेला अननस शेतकर्‍यांनी चारलाच नाही?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केरळमध्ये स्फोटकांनी भरलेला अननस गर्भवती हत्तीणीला खायला दिल्यामुळे तिचा मृत्यू झाला असल्याची घटना घडली होती. यावरून देशभरातून मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया उमटत आहेत. आता या घटनेबाबत एक मोठा खुलासा करण्यात आला आहे. शशी थरूर यांनी ट्विटवरुन एक पोस्ट शेयर करुन काही गोष्टींचा खूलासा केला आहे. स्फोटकांनी भरलेला अननस शेतकऱ्यांनी हत्तीणीला जाणीवपूर्वक चारलाच नाही असं या पोस्ट मध्ये सांगण्यात आले आहे. मात्र त्याचबरोबर हत्तीणीची हत्या होण्याआधीच तेथील नागरिकांमधील मनुष्य मेला होता असे भावनिक विधानही थरुर यांनी यावेळी केले आहे.

एका वृत्तपत्राने केलेला खुलासा शशी थरूर यांनी त्यांच्या ट्विटर अकॉउंटवरून शेयर केला आहे. यामध्ये केरळमध्ये मृत्यू झालेल्या हत्तीणीला कोणाकडून जाणीवपूर्वक स्फोटकांनी भरलेला अननस देण्यात आला नव्हता, जंगली डुक्करापासून पिकांचे रक्षण करण्यासाठी ठेवण्यात आलेला तो अननस अपघाताने त्या हत्तीणीने खाल्ला असं सांगण्यात आले आहे. तसेच केरळमध्ये अनेक भागांत जरी बेकायदेशीर असले तरी जंगली जनावरांपासून पिकांवर अतिक्रमण तसेच नुकसान टाळण्यासाठी ही पद्धत वापरली जाते. हत्तीनीच्या मृत्यूची घटना ही पलक्कड येथे घडली आहे, मलप्पुरम येथे नाही असं यात सागितले आहे.

 

दरम्यान, हत्तीणीच्या मृत्यूनंतर अनेकांनी याला जातीयतेचे रूप देण्याचा प्रयत्न केला होता, त्यासंदर्भात थरूर यांनी, “बहुसंख्येने मुस्लिम असणाऱ्या जिल्ह्यात अशा घटना घडल्यावर नक्कीच लोकांच्या भावनांचा उद्रेक होतो.” असे म्हंटले आहे. त्याबाबतही यामध्ये कोणत्याच प्रकारचा जातीयवादी संबंध नाही असा खुलासा करण्यात आला आहे. फॉरेस्ट तसेच पोलीस विभागाने याबाबतीत तक्रार नोंदविली असून तपास सुरु आहे असे सांगण्यात आले आहे. जेव्हा ही घटना वनविभागाला समजली तेव्हा त्यांनी त्या हत्तीणीला बाहेर काढण्याचे प्रयत्न केले पण ते व्यर्थ ठरले, तसेच ही घटना २७ मे रोजी घडल्याचा खुलासा करण्यात आला आहे. या मानवीय कृत्यासाठी गुन्हेगारांना शिक्षा व्हावी अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

सात जन्म काय आम्ही सात सेकंदही बायकोसोबत राहू शकत नाही; पत्नी पिडित पुरुषांकडून पिंपळाची पूजा

औरंगाबाद प्रतिनिधी । आज महाराष्ट्रात वटपौर्णिमा सर्वत्र साजरी केली जात आहे. जन्मोजन्मी हाच नवरा मिळावा म्हणून बायका वडाच्या झाडाला फेऱ्या मारतात व त्याला साकडे घालतात. मात्र सात जन्म सोडाच पण सात सेकंद आम्ही या बायकांसोबत राहू शकणार नाही. तेव्हा हे यमराजा आमच्या बायकांचे हे म्हणणे ऐकू नकोस म्हणत औरंगाबाद येथील पत्नी पीडित पुरुषाश्रम ने पिंपळाची पूजा केली आहे. तसेच त्यांनी या निमित्ताने देशातील एकतर्फी विवाह कायदे बदलण्याची मागणी केली आहे.  या आश्रमाचे अध्यक्ष भारत फुलारे व्हिडिओच्या माध्यमातून ही मागणी केली आहे.

फुलारे म्हणाले, ‘आज आमच्या बायका सात जन्म हाच नवरा मिळावा अशी मागणी करतील पण आम्ही ७ सेकंद देखील या बायकांना सांभाळू शकणार नाही. कोरोनाचे संकट आज जगावर आले आहे, पण आम्ही ज्यादिवशी लग्न केले तेव्हापासून याहीपेक्षा महाभयंकर संकट आमच्यावर आले आहे. या संकटाला सामोरे जाण्यासाठी आम्हाला कुणी साथ देत नाही आहे. त्यामुळेच आम्ही जी झुंज देत आहोत. त्यात मदत म्हणून जे एकतर्फी कायदे आहेत ते थांबले पाहिजेत. हिंदू विवाह कायद्यात सुधारणा झाली पाहिजे. म्हणूनच विवाहसंस्था संपुष्टात येण्याआधी या एकतर्फी कायद्यांवर विचार करा.”  फुलारे यांनी पिंपळ पूजा करून आम्हाला न्याय मिळावा अशी मागणी केली आहे.

पिंपळाला साकडे घालून त्यांनी हे यमराजा तू आमच्या बायकांचे अजिबात ऐकू नकोस, असे मागणे मागितले. कोरोना संकटाची जाणीव ठेवत त्यांनी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत ही पूजा केली यावेळी त्यांनी शासनाला पुरुषांसाठी एखादा पुरुष अयोग्य स्थापन करण्याची विनंती केली आहे. पत्नी त्रासामुळे वैतागलेल्या पुरुषांना आत्महत्या न करता संघटित होण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. दरवर्षी ते मोठ्या प्रमाणात हा उपक्रम राबवत असतात. मात्र यावर्षी कोरोना संकटामुळे त्यांनी मोजक्या लोकांसमवेत सामाजिक अलगाव पाळत हा उपक्रम राबविला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

विराट कोहलीने लॉकडाऊनमध्ये घरात बसून इंस्टाग्रामवरून ‘असे’ कमावले तब्बल ३ करोड

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरसच्या संसर्गाला रोखण्यासाठी सुरु असलेल्या लॉकडाउनला अडीच महिन्यांहून अधिक काळ झाला असून सर्व उद्योगांबरोबरच क्रिकेटही बंद पडलेले आहे. यावेळी सगळे क्रिकेटपटू त्यांच्या घरीच आहेत. याचवेळी विराट कोहली देखील पत्नी अनुष्का शर्मासह त्याच्या घरीच थांबलेला आहे.

या लॉकडाऊनमध्ये विराट कोहलीने घरातच बसून साडेतीन कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. विराट कोहलीने केवळ इन्स्टाग्राम पोस्टद्वारे एवढी कमाई केली आहे. इन्स्टाग्राम पोस्टवरुन कमाई करणाऱ्या स्पोर्ट्स पर्सनमध्ये विराट कोहली सहाव्या क्रमांकावर असून यामध्ये तो एकमेव भारतीय खेळाडू आहे.

लॉकडाऊन दरम्यान भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने तीन स्पॉन्सर इन्स्टाग्राम पोस्ट केले आहेत. विराट कोहलीच्या त्या प्रत्येक पोस्टची सरासरी कमाई ही १ कोटी २० लाख रुपये इतकी आहे, त्यामुळे कोहलीची एकूण कमाई ही ३ कोटी ६० लाख रुपये झाली आहे.

विराट कोहलीचे इन्स्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्स आहेत, त्याच्या इन्स्टाग्राम फॉलोअर्सची संख्या जवळपास ६ कोटी २० लाख आहे. इन्स्टाग्राम पोस्टवरून कमाईच्या बाबतीत विराट कोहली हा एकमेव भारतीय आहे, तर टॉप फाइव्हमध्ये ४ फुटबॉलर्स आहेत.

जगातील प्रसिद्ध फुटबॉलर क्रिस्टियानो रोनाल्डो या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे, जगभरात क्रिस्टियानो रोनाल्डोच्या इन्स्टाग्राम फॉलोअर्सची संख्या ही सर्वाधिक आहे. रोनाल्डोचे इन्स्टाग्राम फॉलोअर्स २२.२ दशलक्ष आहेत. या लॉकडाऊनमध्ये क्रिस्टियानो रोनाल्डोने इन्स्टाग्राम पोस्टवरुन सुमारे १८ कोटी रुपयांची कमाई केली आहे.

इन्स्टाग्रामकडून मिळणार्‍या कमाईच्या बाबतीत पहिल्या ५ खेळाडूंपैकी फक्त एक बास्केटबॉल खेळाडू आहेत, तर उर्वरित ४ हे फुटबॉलपटू आहेत. या यादीत पाचव्या क्रमांकावर इंग्लंडचा माजी फुटबॉलपटू डेव्हिड बेकहॅम आहे. या यादीमध्ये मेस्सी (१२ कोटी ३० लाख) दुसर्‍या तर ब्राझीलचा फुटबॉलपटू नेमार (११ कोटी ४०लाख) तिसर्‍या स्थानावर आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

कोरोना आर्थिक संकट: कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी राज्य सरकारला पुन्हा घ्यावे लागणार मोठं कर्ज

मुंबई । कोरोनाच्या पार्शवभूमीवर राज्यात लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे गेली दोन महिने महसूल आटल्याने राज्य सरकारला आता आर्थिक चणचण भासू लागली आहे. त्यामुळेच कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यासाठी कर्ज घ्यावे लागणार आहे. सरकारने यापूर्वीच विकासकामांवरील खर्चात ६७ टक्के कपात करुन आर्थिक ताळमेळ साधण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, उत्पन्नाचे स्रोतच आटल्याने वेतन आणि निवृत्ती वेतन देण्यासाठी सरकारला जवळपास ९ हजार कोटींचे कर्ज घ्यावे लागणार आहे. कोरोनाचे संकट ओढावल्यापासून राज्य सरकार लागोपाठ दुसऱ्या महिन्यात अशाप्रकारे अडचणीत आले आहे. गेल्या महिन्यातही सरकारने वेतन देण्यासाठी ९ हजार कोटींचे कर्ज उचलले होते.

दर महिन्याला कर्मचाऱ्यांच्या वेतनापोटी सरकारला १२ हजार कोटी रुपये खर्च करावे लागतात. मात्र, या महिन्यात सरकारच्या तिजोरीत केवळ साडे ५ हजार कोटी रुपये जमा झाले आहेत. त्यामुळे सरकारला कर्ज उचलण्यावाचून पर्याय उरलेला नाही, असे एका ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्याने सांगितले. यापूर्वी मार्च महिन्यात राज्य सरकारने अ, ब आणि क श्रेणीतील कर्मचाऱ्यांचे पगार दोन टप्प्यांत दिले होते. मात्र, त्यावरुन विरोधकांनी बराच गदारोळ केला होता. पोलीस आणि डॉक्टर असे अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाही पूर्ण वेतन न दिल्याने विरोधी पक्षांनी सरकारला धारेवर धरले होते. दरम्यान, केंद्र सरकारने गुरुवारीच राज्यांना जीएसटी परताव्याचे ३६ हजार ४०० कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे महाराष्ट्राला काही अंशी दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

महसूलसाठी इंधन वाढवला सेस
काही दिवसांपूर्वीच राज्य सरकारने महसूल वाढवण्यासाठी पेट्रोल आणि डिझेलवरील सेस वाढवण्याचा निर्णय घेतला होता. पेट्रोलवर असलेला सध्याच्या ८ रुपये १२ पैसे सेसमध्ये दोन रुपयांची वाढ करून तो आता १० रुपये १२ पैसे करण्यात आला आहे. तर डिझेलवर एक रुपया सेस होता तो आता तीन रुपये करण्यात आला आहे. त्यामुळे येत्या दहा महिन्यात राज्य शासनाच्या तिजोरीत ३ हजार कोटी रुपयांची अतिरिक्त भर पडेल असा अंदाज आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

निलेश राणेंकडून अजित पवारांची स्तुती; परिस्थिती आणि प्रशासन हाताळण्याच्या कौशल्याचे केले कौतुक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नुकतेच महाराष्ट्रात ‘निसर्ग’ चक्रीवादळ येऊन गेले. यामुळे कोकण परिसरातील किनारपट्टी भागातीप गावांचव मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या वादळामुळे पुणे जिल्ह्याच्याही काही भागांमध्ये नुकसान झाले आहे. या नुकसानीची उपमुख्यमंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी स्थानिक प्रशासन आणि लोकप्रतिनिधींशी बोलून माहिती घेतली. तसेच याचे पंचनामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. निलेश राणे यांनी अजित पवार यांच्या कौशल्याचे कौतुक केले आहे. त्यांनी त्यांच्या ट्विटर अकॉउंटवरून अजित पवार यांची स्तुती केली आहे.

निलेश राणे यांनी अजित पवार यांच्या या तातडीने निर्णय घेण्याच्या तसेच परिस्तिथी हाताळण्याच्या कौशल्याचे कौतुक करत ट्विट केले आहे की, “जसं पुण्यात अजित दादांनी केलं त्याला म्हणतात परिस्थिती आणि प्रशासन हाताळणं.” यासोबतच त्यांनी रत्नागिरी व सिंधुदुर्ग च्या पालकमंत्र्यांना टोलाही मारला आहे. ते म्हणाले, “नाहीतर रत्नागिरी आणि सिंधुदुर्गाचे पालकमंत्री. रत्नागिरीचा पालकमंत्री दिसत नाही आणि सिंधुदुर्गाचा पालकमंत्री कधी कधी दिसतो पण काही कामाचा नाही.”

 

निलेश राणे यांच्याकडून अजित पवार यांचे असे जाहीर कौतुक झाल्याने बऱ्याचजणांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. तशा प्रतिक्रियाही देण्यात आली आहेत. दरम्यान चक्रीवादळाच्या संकटकाळात मदतकार्यात सहभागी झालेले लाईफ गार्ड, पोलिस, संरक्षण दलांचे, एनडीआरएफचे जवान, स्थानिक स्वराज संस्थांचे कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, आपत्कालिन यंत्रणेतील, कर्मचारी, स्वयंसेवी संस्था, नागरिकांचे अजित पवार यांनी जाहीर आभार मानले आहेत. या वादळामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.