Wednesday, December 31, 2025
Home Blog Page 5699

घरातील गॅस सिलेंडरचा ब्लास्ट झाला तर ५० लाखांची नुकसान भरपाई; जाणून क्लेम करायची प्रक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशातील प्रयागराजमधील एका घरात गोंधळ उडाला होता. त्यानंतर गॅस सिलिंडर स्फोट झाल्याची घटना समोर आली होती. सिलिंडर फुटल्याचा एक लाईव्ह व्हिडिओही त्यानंतर समोर आला होता. या स्फोटाचा व्हिडिओ पाहून आपल्याला अंदाज बांधता येऊ शकतो की सिलिंडरच्या स्फोटामुळे लागलेली आग किती धोकादायक असू शकते. अचानक झालेल्या या घटनेमुळे लोकांना मोठे नुकसान सहन करावे लागले.

अशा परिस्थितीत, एलपीजी वापरताना आपण कोणती खबरदारी घेतली पाहिजे आणि अशा प्रकारच्या कोणत्याही दुर्घटना झाल्यास काय केले पाहिजे हे आपल्याला माहित असणे आवश्यक आहे. तसेच, गॅस गळतीमुळे एलपीजी गॅस सिलिंडर फुटला किंवा एखादा अपघात झाल्यास ग्राहक म्हणून आपल्याला काय हक्क आहेत हे देखील आपल्याला माहित असले पाहिजे. एलपीजी म्हणजे एलपीजी कनेक्शन, पेट्रोलियम कंपन्या ग्राहकांना वैयक्तिक अपघाताचे कव्हर देतात. गॅस गळतीमुळे किंवा एलपीजी सिलिंडरमधून स्फोट झाल्यामुळे दुर्घटना झाल्यास ५० लाख रुपयांपर्यंतचा विमा हा आर्थिक सहाय्य म्हणून आहे. यासाठी विमा कंपन्यांसह पेट्रोलियम कंपन्यांची भागीदारी आहे. सध्या, हिंदुस्तान पेट्रोलियम, इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम या एलपीजी कनेक्शनवरील विमा आयसीआयसीआय लोम्बारडमार्फत होतो.

सिलिंडरमध्ये गळती किंवा स्फोट झाल्यास यासाठी डीलरची आणि कंपनीची जबाबदारी आहे. हा आदेश नॅशनल ग्राहक फोरमने सुमारे १६ वर्षांपूर्वी घडलेल्या एका अपघातावर दिला होता आणि जो अजूनही लागू आहे. नॅशनल कंझ्युमर फोरमने आपल्या या निर्णयामध्ये असे म्हटले होते की, एलपीजी वितरणासाठी मार्केटींग डिस्प्ले मार्गदर्शक तत्वे २०१ नुसार असा निर्णय घेण्यात आला आहे की, जर डीलर डिफेक्टिव सिलिंडरचा पुरवठा करत असेल तर तो त्या तक्रार दारावर ती जबाबदारी ठेवू शकत नाही. याविषयीची मार्गदर्शकतत्त्वे सांगतात की डिलिव्हरीपूर्वी डिलरने सिलिंडर अगदी बरोबर आहे की नाही ते तपासावे.

एलपीजी सिलिंडरमुळे झालेल्या अपघाताची नुकसान भरपाई ही प्रत्येक घटनेसाठी ५० लाख रुपये आणि प्रति व्यक्ती १० लाख इतकी रुपये आहे. पुढील काही प्रकरणांमध्ये ही नुकसान भरपाई देणे बंधनकारक आहे. मग हा अपघात गॅस एजन्सीच्या नोंदणीकृत ग्राहकांच्या घरी झालेला असो अथवा नोंदणीकृत विक्रेत्याच्या आवारात घडलेला असो. त्यानंतर पेट्रोलियम कंपनीकडून डिस्ट्रीब्यूटरकडे सिलिंडरची वाहतूक करताना रजिस्टर्ड ट्रांसपोर्ट कॉन्ट्रॅक्टरकडे झालेला अपघात असो. सिलिंडर कर्मचारी किंवा ग्राहक डिलरकडून ग्राहकाच्या घरी घेऊन जात असताना झालेला अपघात असो. कम्युनिटी किचन, रेटिक्युलेटेड सिस्टम सारख्या वस्तू जसे कीं गीझर, लाइटिंग, जनरेटर सेट, सिंचन पंप इत्यादींमध्ये एलपीजीच्या पुरवठ्यादरम्यान झालेला अपघात असो, गॅस एजन्सीच्या एलपीजी इंस्टॉलेशन वेळी कनेक्ट आणि ​डिसकनेक्ट करताना झालेला अपघात असो.

या कलमांतर्गत, ग्राहकांच्या घरी एलपीजी सिलिंडरमुळे होणार्‍या जीवित-मालमत्तेचे नुकसान भरपाई करण्यासाठी हा पर्सनल अ‍ॅक्सीडेंट कव्हर देणे बंधनकारक आहे. एखाद्या अपघातात जर ग्राहकांच्या मालमत्तेचे / घराचे नुकसान झालेले असेल तर झालेल्या प्रत्येक अपघातासाठी २ लाख रुपयांपर्यंतचा विमा हक्क प्राप्त होतो.

अपघातामध्ये झालेल्या मृत्यूवर, प्रत्येक अपघातासाठी प्रति व्यक्ती सहा लाख रुपयांची भरपाई मिळते. अपघातात झालेल्या जखमींसाठी वैद्यकीय खर्चाची भरपाई म्हणून ३० लाख रुपये आहे, जी प्रति व्यक्ती २ लाखांपर्यंत आहे. तसेच एका व्यक्तीसाठी त्वरित २५,००० रुपयांची आर्थिक सहाय्य मदत देखील आहे.

पुढील प्रकरणात वैयक्तिक नुकसान आणि मालमत्तेचे नुकसान यासाठी भरपाई दिली जाईल.

भरलेले सिलिंडर बॉटलिंग प्लांटमधून बाहेर नेले जात असताना वाहतुकीदरम्यान.
भरलेले सिलिंडर डिस्ट्रीब्यूटरकडे ठेवलेला असताना. सिलिंडर डिस्ट्रीब्यूटरच्या घरातून ग्राहकाच्या घरी नेण्यात येत असताना की ग्राहकांचे भरलेले / रिकामे सिलिंडर डिस्ट्रीब्यूटरच्या ठिकाणी नेले जात असताना.
भरलेले सिलिंडर ग्राहकांच्या घरी ठेवलेला असताना. रिकामा सिलेंडर परत बॉटलिंग प्लांटमध्ये आणले जात असताना.
कम्युनिटी किचन, रेटिक्युलेटेड सिस्टम सारख्या वंशी जसे कीं गीझर, लाइटिंग, जनरेटर सेट, सिंचन पंप इत्यादींसह.मध्ये एलपीजीच्या पुरवठ्यादरम्यान.

गॅस एजन्सीच्या एलपीजी इंस्टॉलेशन वेळी कनेक्ट आणि ​डिसकनेक्ट करताना. शैक्षणिक संस्था, संशोधन प्रयोगशाळा, सरकारी / महानगरपालिका रुग्णालये, मध्यान्ह भोजन योजना, अनाथाश्रम, वृद्धाश्रम इत्यादी समाजकल्याण संस्थांमध्ये एलपीजीचा वापर. रेस्टॉरंट्स, हॉटेल, खाजगी रुग्णालये, दवाखाने, कुक्कुटपालन, कुंभारकामविषयक उद्योग, कॉटेज उद्योग, काच उद्योग इत्यादींमध्ये एलपीजीच्या वापरादरम्यान. एखादा ग्राहक ५ किलो सिलिंडर डिस्ट्रीब्यूटरकडून विकत घेऊन जात असताना.

गॅस सिलिंडरवर ५० लाख क्लेम कसा मिळवायचा?
>> मायएलपीजी.इन. (http://mylpg.in) च्या मते, एखाद्या व्यक्तीने एलपीजी कनेक्शन घेतल्याबरोबर त्या व्यक्तीस सिलिंडरमधून अपघात झाल्यास त्याला ५० लाख रुपयांपर्यंत विमा मिळू शकतो.

>> यावेळी झालेल्या अपघाताची जास्तीत जास्त ५० लाख रुपयांची भरपाई मिळू शकते. तसेच अपघातग्रस्त प्रत्येक व्यक्तीला जास्तीत जास्त १० लाख रुपयांची भरपाई दिली जाऊ शकते.

>> एलपीजी सिलिंडरचे विमा संरक्षण मिळविण्यासाठी ग्राहकास तातडीने जवळच्या पोलिस स्टेशन तसेच त्याच्या एलपीजी वितरकास झालेल्या अपघाताची माहिती द्यावी लागते.

>> इंडियन ऑईल, एचपीसी आणि बीपीसी वितरकांसारख्या पीएसयू तेल विपणन कंपन्यांना व्यक्ती आणि मालमत्तांसाठी थर्ड पार्टी विमा संरक्षण यासह अपघातांसाठी विमा पॉलिसी घ्यावी लागते.

>> ते कोणत्याही स्वतंत्र ग्राहकाच्या नावावर नाहीत, परंतु प्रत्येक ग्राहकाला या पॉलिसीमध्ये समाविष्ट केलेला आहे. त्याला यासाठी कोणतेही प्रीमियम देण्याची गरज नसते.

>> जखमींच्या उपचारासाठी एफआयआर, प्रिस्क्रिप्शन आणि वैद्यकीय बिलांची एक प्रत आणि मृत्यू, मृत्यू प्रमाणपत्राचा तसेच पोस्टमॉर्टम रिपोर्ट द्यावा लागतो .

>> अपघात झाल्यास वितरकाच्या वतीने नुकसान भरपाईचा क्लेम केला जातो. तसेच क्लेमची रक्कम संबंधित वितरकाकडे विमा कंपनीकडून जमा केली जाते.

याकरिता गॅस सिलिंडरमुळे एखादा अपघात झाल्यास सर्व प्रथम आपल्याला पोलिस रिपोर्ट दाखल करावि लागेल. यानंतर, संबंधित क्षेत्र कार्यालय हहा अपघात कशामुळे घडला आहे याचा शोध घेतील. जर अपघात एलपीजीमुळे झालेला असेल तर एलपीजी वितरक एजन्सी / क्षेत्र कार्यालय विमा कार्यालयाच्या स्थानिक कार्यालयाला त्याविषयी सूचित करेल. त्यानंतर क्लेम फाइल संबंधित विमा कंपनीकडे दाखल केली जाईल. या दाव्यासाठी ग्राहकाला थेट विमा कंपनीशी संपर्क साधण्याची गरज नाही.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमवर कोरोना हल्ल्याची चर्चा; पत्नी सुद्धा कोरोना पॉझिटिव्ह?

नवी दिल्ली । मोस्ट वाँटेड दहशतवादी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला कोरोना झाल्याची चर्चा आहे. काही हिंदी माध्यमातून अशी माहिती पुढे येत आहे. अजून याची अधिकृत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. दाऊद इब्राहिम आणि त्याची पत्नी महजबीन कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. त्यांना कराचीच्या एका रुग्णालयात दाखल केल्याची माहिती मिळते आहे.

सध्या जगभरात कोरोनाचं तांडव सुरु असताना पाकिस्तानमध्ये देखील कोरोनाचा कहर सुरु आहे. ज्यात भारताचा शत्रू दाऊद देखील आता पॉझिटीव्ह सापडला आहे. दाऊद पाकिस्तानात नसल्याचं पाकिस्तान सरकारकडून सांगण्यात येतं. त्यामुळे दाऊदला कोरोना झालाय का याची अधिकृत माहिती येणं कठीण आहे. दाऊद आणि त्याच्या पत्नीला सैन्याच्या रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.

मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड दाउद इब्राहिम पाकिस्तानमध्ये लपून बसला आहे. पाकिस्तान मात्र तो त्यांच्या देशात नसल्याचं सांगत आला आहे. भारताने अनेकदा पुरावे देवूनही पाकिस्तान हे लपवत आला आहे. कोरोना वायरस दाऊदच्या घरापर्यंत पोहोचला आहे. दाऊद इब्राहिम आणि त्याच्या पत्नीमध्ये कोरोनाचे लक्षण आढळली होती. त्याच्या घरात काम करणाऱ्या लोकांना क्वारंटाईन करण्याच आल्याचं देखील सांगण्यात येत आहे.

दाऊद पाकिस्तानातचं
1993 बॉम्बस्फोटचा दाऊद हा मास्टरमाइंड होता. त्यानंतर तो देश सोडून पळून गेला होता. दाऊद पाकिस्तानात आहे. पण तो लोकांच्या समोर येत नाही. याआधी देखील दाऊद आजारी असल्याच्या बातम्या आल्या होत्या. पण पाकिस्तानकडून याची कोणतीच माहिती दिली जात नाही. त्यामुळे आता दाऊदला कोरोना झाला असला तरी पाकिस्तानमधून याची अधिकृत माहिती समोर येण्याची शक्यता कमीच आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

सरकारी कर्मचाऱ्यांना आठवड्यातून एक दिवस कार्यालयात हजर राहणं बंधनकारक, अन्यथा..

मुंबई । राज्य सरकार आता पुनश्च हरिओम म्हणत लॉकडाउनकडून राज्य अनलॉक करण्याच्या दिशने पाऊल टाकत आहे. मर्यादित कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सरकारी कामकाजही सुरु करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता सरकारी कर्मचाऱ्यांना आठवड्यातून किमान एक दिवस कार्यालयात उपस्थित राहणे बंधनकारक केले आहे. आठवड्यातून एक दिवसही कार्यालयात न येणाऱ्या कर्मचाऱ्यांची संपूर्ण आठवड्याची गैरहजेरी लागणार आहे. तसा आदेशचं आज राज्य सरकारने जारी केला आहे.

एखादा सरकारी कर्मचारी ठरलेल्या दिवशी कामावर आला नाही तर संबंधित कर्मचाऱ्याची त्या आठवड्याची गैरहजेरी लावण्यात येणार असून ती विनावेतन रजा समजली जाणार आहे. त्यामुळे या दिवसांचा पगार कर्मचाऱ्यांना मिळणार नाही. सरकारी कर्मचाऱ्यांनी शासकीय कामाप्रति निष्ठा ठेवणे अनिवार्य असून कार्यालयातील कामाचे कर्मचारी निहाय समन्वायी वाटप होणे आवश्यक आहे. त्यासाठी हे निर्देश दिल्याचे आदेशात म्हटले आहे.

सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या कार्यालयातील उपस्थितीबाबत महाराष्ट्र सरकारच्या वित्त विभागाने याबाबतचा आदेश काढला आहे. ८ जूनपासून या आदेशाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. कर्मचारी परस्पर गैरहजर राहिल्यास शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे. लॉकडाऊनच्या काळात अनेक अधिकारी, कर्मचारी कार्यालयात येत नसल्याचे निदर्शनास आले. काही जण तर मुख्यालय सोडून गावी गेल्याचे कळले. त्यामुळे जे निवडक कर्मचारी शासकीय कार्यालयात हजर राहतात, त्यांच्यावरच अतिरिक्त कामाचा बोजा पडत आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन सरकारने कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीबाबत आदेश काढला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

आज वर्षातील दुसरे चंद्रग्रहण; भारतात कधी दिसणार?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज या वर्षातील दुसरे चंद्रग्रहण दिसणार आहे. यापूर्वी १० जानेवारी रोजी या वर्षातील पहिले चंद्रग्रहण दिसले होते. इतकेच नव्हे, जिथे आज चंद्रग्रहण होणार आहे, तिथे २१ जून रोजी दोन्ही सूर्यग्रहणही दिसणार आहे.

आजचे ग्रहण छाया चंद्रग्रहण असेल. म्हणजेच, चंद्रावर फक्त एक अस्पष्ट छाया असेल.या चंद्रग्रहणामुळे चंद्राच्या आकारात कोणताही बदल होणार नाही आहे. यामध्ये चंद्र अगदी चिखलासारखा मातकट दिसेल.

ज्योतिषशास्त्रात या घटनेला ग्रहण म्हटले जात नाही, म्हणून त्याचा सूतक कालावधी वैध ठरणार नाही. चंद्रग्रहणात सूर्य आणि चंद्राच्या मध्ये पृथ्वी येते. या चंद्रग्रहणात चंद्र पृथ्वीच्या सावलीच्या क्षेत्रामध्ये येतो आणि त्यामुळे चंद्रांवर पडणारा सूर्यप्रकाश फारच कमी असतो. याला छाया चंद्रग्रहण असे म्हणतात.

हे चंद्रग्रहण आज रात्री ११:१६ वाजता सुरू होईल, जे ६ जून, शनिवारी दुपारी २.३४ वाजता समाप्त होईल. मागील १२:५४ वाजता या ग्रहणाचा प्रभाव जास्त असेल.

५ ते ६ जूनच्या रात्री चंद्रग्रहणाची वेळ
चंद्रग्रहण स्पर्श ५ जून रात्री ११ वाजून १६ मिनिटांनी
चंद्रग्रहण मध्य ६ जून रात्री १२ वाजून १५ मिनिटांनी
चंद्रग्रहण मोक्ष ६ जून रात्री ०२ वाजून ३४ मिनिटांनी

हे चंद्रग्रहण भारतासह आशिया, युरोप, ऑस्ट्रेलिया आणि आफ्रिका या देशांमध्येही पाहिले जाऊ शकते. मात्र यात चंद्राच्या आकारात कोणताही बदल दिसणार नाही, फक्त चंद्र किंचित मातकट दिसू शकेल.

यावर्षी चार चंद्रग्रहण होणार आहेत. यातील पहिले चंद्रग्रहण हे १० जानेवारीला दिसले होते. तर दुसरे चंद्रग्रहण हे या महिन्यात आहे. तसेच तिसरे जुलै आणि चौथे नोव्हेंबरमध्ये दिसेल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

आपल्या कारकिर्दीतच राम मंदिर निर्माण होवो; संजय राऊतांच्या योगी आदित्यनाथांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा आज ४८ वा वाढदिवस आहे. ४२ व्या वर्षापर्यँत सलग ५ वेळा खासदार बनण्यासोबतच वयाच्या २६ व्या वर्षी प्रथम खासदार झालेल्या योगीजींना सर्वात कमी वयात खासदार झाल्याचा सन्मान ही मिळाला आहे. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना त्यांच्या जन्मदिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनीही आपल्या ट्विटर अकॉउंटवरून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आणि त्यांच्या अयोध्या लढाईचे कौतुकही केले आहे.

संजय राऊत यांनी योगींना शुभेच्छा दिल्या आहेत तसेच, ‘मी त्यांचा नेहमीच आदर करत आलो आहे. अयोध्या लढाईत योगीजींनी नेहमीच मार्गदर्शन केले. त्यांच्या कारकिर्दीत राम मंदिर निर्माण होवो हीच शुभेच्छा!’ असेही म्हंटले आहे. अयोध्या येथे राममंदिर व्हावे यासाठी सुरु असलेल्या आंदोलनात योगीजींचा मोठा वाटा आहे तसेच त्यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले असल्याचे राऊत यांनी म्हंटले आहे. गणितात एमएससी केलेल्या योगींनी वयाच्या २२ व्या वर्षी ब्रह्मलीन महंत अवैद्यनाथ यांच्याकडून अनुग्रह घेतला आणि ते अजय सिंह बिष्टा चे योगी आदित्यनाथ झाले.

 

योगीं यांच्यावर अनेकदा मुस्लिम विरोधी असण्याचा तसेच सांप्रदायिक भाषण देण्याचा आरोप करण्यात आला आहे. गोरखपूरमध्ये झालेल्या दंग्याच्या वेळी त्यांना तुरुंगवासही झाला होता. २०१७ साली ते उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री झाले. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही योगींना शुभेच्छा दिल्या असून योगीजींच्या समर्थनात राज्य विविध क्षेत्रात यश प्राप्त करत असल्याचे त्यांनी म्हंटले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

UPSC पूर्व परीक्षेची तारीख जाहीर; ‘या’ तारखेला होणार परीक्षा

नवी दिल्ली । लॉकडाऊनमुळे UPSC पूर्व परीक्षा स्थगित करण्यात आली होती. मात्र, आता या परीक्षेची तारीख केंद्रीय लोकसेवा आयोगाने जाहीर केली आहे. UPSC तर्फे घेण्यात येणारी नागरी सेवा पूर्व परीक्षा आता ४ ऑक्टोबर रोजी होणार आहे. तर UPSC मुख्य परीक्षा ८ जानेवारी २०२१ रोजी होणार आहे. या परीक्षेच्या तारखेसोबतच यूपीएससीने संपूर्ण वर्षाचे परीक्षांचे वेळापत्रक जारी केले आहे. आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या एनडीए, सीएमएस आणि अन्य परीक्षांच्या तारखा आता उमेदवारांना या वार्षिक कॅलेंडरमुळे कळणार आहेत. पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार नागरी सेवा पूर्व परीक्षा ३१ मे २०२० रोजी होणार होती. पण लॉकडाऊनमुळे ती

आयोग २० मे २०२० रोजी नागरी सेवा पूर्व परीक्षेची तारीख घोषित करणार होता. पण परिस्थिती सामान्य झाल्यानंतर परीक्षेच्या तारखेची घोषणा करण्यात येणार असल्याचे आयोगाने जाहीर केले. परिस्थितीचा आढावा घेऊन ५ जून २०२० रोजी तारखेबाबतची माहिती जाहीर केली जाणार असे आयोगाने कळवले.
कोरोनासंदर्भातल्या स्थितीचा आढावा घेतल्यानंतर ५ जून रोजी आयोगाच्या संकेतस्थळावर या तारखेची घोषणा करण्यात येईल, असे आयोगाने कळवले होते.

त्यानुसार आज केवळ नागरी सेवा पूर्व परीक्षेचीच नव्हे तर वर्षभरातील सर्व परीक्षांच्या तारखा आयोगाने जाहीर केल्या. केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या नागरी सेवा पूर्व परीक्षेची तारीख आणि अन्य परीक्षांची माहिती मिळवण्यासाठी आम्ही तुम्हाला थेट लिंक उपलब्ध करून देत आहोत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

कौतुकास्पद! हिंदू महिलेवर अंत्यसंस्कार करत मुस्लिम बांधवानी जपली सामाजिक बांधिलकी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. सर्व धर्म, जाती, वंश, वेशभूषा, प्रदेश असा कोणताच भेद इथे केला जात नाही अशी महती सर्वत्र भारताची सांगितली जाते. अलीकडे काही घटनांमुळे भारताच्या महतीला गालबोट लागले असले तरी आजही अशा अनेक घटना पाहावयास मिळतात ज्यामुळे देशातील बंधुभावाचे दर्शन घडते. सोलापूर शहरात अशाच एका घटनेचा प्रत्यय आला. येथील मुस्लिम बांधवानी एका हिंदू महिलेवर विधिवत अंत्यसंस्कार करत सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले आहे.

सोलापूर शहरातील नई जिंदगी परिसरात राहणाऱ्या कुलकर्णी कुटुंबातील पद्मावती कुलकर्णी या 80 वर्षीय महिलेचे कस्मात निधन झाले. यावेळी या कुटुंबात केवळ ३ लोक होते. त्यांनी ही घटना तेथील नगरसेवक तसेच रुग्णसेवेक म्हणून विशेष ओळख असणाऱ्या मौलाली बाशुमिया सय्यद उर्फ बाबा मिस्त्री यांना सांगितली. मिस्त्री यांनी घटनास्थळी जाऊन माहिती घेतली. तेथील एकूण परिस्थिती पाहता घरी कुणीच नसल्याने त्यांनी महानगरपालिकेची गाडी मागवून मृतदेह स्मशानभूमीत नेला. आणि विधिवत अंत्यसंस्कार केले. कोरोनामुळे परिसरात भीतीचे वातावरण असल्याने इतर कुणी अंत्यसंस्कार करण्यास आले नाही मात्र मिस्त्री यांनी समभावाचे एक उदाहरण सर्वाना घालून दिले आहे.

कुलकर्णी यांचे नातेवाईक हे कर्नाटक येथे राहायला आहेत तर त्यांची 4 मुले आणि एक मुलगी ही पुणे,अहमदाबाद,संगमनेर,विजापूर आणि बंगलोर येथे वास्तव्यास आहेत. सद्यस्थितीत कोरोनामुळे ते येऊ शकले नाहीत. दरम्यान मिस्त्री यांनी आतापर्यंत कोरोनाबाधित ९५-९६ रुग्णांच्या मृतदेहाचे अंत्यसंस्कार केले असल्याची माहिती दिली आहे. आमच्या परिसरात कोणत्याच प्रकारचा भेदभाव पाळला जात नाही. आम्ही सर्व समानतेने राहतो असे मिस्त्री यांनी सांगितले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

दारू पिऊन मंदिरात प्रवेश निषिद्ध तर अल्कोहोलने हात धुतलेल्यांना प्रवेश कसा द्यायचा; पुजाऱ्याचा सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील पाचव्या टप्प्यातील संचारबंदी सुरु झाली आहे. यामध्ये बरेच नियम शिथिल करण्यात आले आहेत. या नियमांमध्ये ८ जूनपासून देशातील धार्मिक स्थळे उघडण्याची तसेच नागरिकांना येथे प्रवेशाची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे ८ जूनपासून बहुतांश राज्यातील मंदिरे नागरिकांसाठी खुली केली जाणार आहेत. मात्र नागरिकांना मंदिरात प्रवेश घेण्यासाठी सामाजिक अलगाव चे नियम बंधनकारक असणार आहेत. शासन मंदिरांमध्ये सॅनिटायझर मशीन लावणार असल्याचे सांगण्यात आले आहे. यावर आक्षेप की=घेत एका पुजाऱ्याने दारू पिऊन मंदिरात प्रवेश निषिद्ध तर अल्कोहोलने हात धुतलेल्यांना प्रवेश कसा द्यायचा असा सवाल केला आहे. त्यांच्या या प्रश्नामुळे ते चांगलेच चर्चेत आले आहेत.

सॅनिटायझर अर्थातच जंतूंचा, विषाणूंचा नाश करण्यासाठी वापरले जाते मात्र यामध्ये अल्कोहोलची मात्रा असते. अध्यात्मात दारू पिणे निषिद्ध मानले गेले आहे. मग अल्कोहोल युक्त सॅनिटायझर वापरून नागरिकांना मंदिरात प्रवेश कसा द्यायचा असा प्रश्न या पुजाऱ्याने विचारला आहे. आणि याला विरोध केला आहे. भोपाळ येथील वैष्णव धाम मधील नाव दुर्गा मंदिराचे चंद्रशेखर तिवारी हे पुजारी आहेत. ते म्हणतात, ‘सरकारचे काम मागर्दर्शिका जाहीर करणे हे आहे, मात्र मी मंदिरात सॅनिटायझर मशीन लावण्याच्या विरोधात आहे कारण यात अल्कोहोल असते.” असे म्हणत त्यांनी आपला विरोध दर्शविला आहे.

 

चंद्रशेखर तिवारी यांनी म्हंटले आहे, ‘आपण दारू पिऊन मंदिरात प्रवेश करू शकत नाही, तर अल्कोहोल ने हात कसे धुवू शकतो? तुम्ही मंदिरांच्या बाहेर हात धुण्याच्या मशीन लावा पण तिथे साबण ठेवा. आम्ही त्याचा स्वीकार करतो. आणि तसेही लोक घरातून अंघोळ करूनच मंदिरात येतात.’ भोपाळ च्या या पुजारींचे म्हणणे ऐकून प्रशासन काय निर्णय घेते यावर आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’. 

 

‘निसर्गग्रस्त’ रायगड जिल्ह्याला तातडीची १०० कोटींची मदत- मुख्यमंत्री ठाकरे

रायगड । निसर्ग चक्रीवादळाचा सर्वात जास्त फटका रायगड जिल्ह्याला बसला आहे. या चक्रीवादळामुळे सर्वाधिक नुकसान झालेले पाहता रायगड जिल्ह्यासाठी राज्य सरकारने तातडीने १०० कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज अलिबागमध्ये जाऊन नुकसानीची पाहणी केल्यानंतर तातडीच्या आर्थिक मदतीची घोषणा केली.

यावेळी वादळामुळे इतर जिल्ह्यांमध्ये झालेल्या नुकसानीनुसार मदत जाहीर करणार असंही त्यांनी सांगितलं. मुख्यमंत्र्यांच्या अलिबाग दौऱ्यावेळी त्यांच्यासोबत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख, रायगडच्या पालकमंत्री अदिती तटकरे आदी जण उपस्थित होते.

“तातडीने जे काही करता येईल ते करण्यास सुरुवात केली आहे. पंचनाम्यांना ८-१० दिवस लागतील. त्यानंतर नुकसानभरपाई सरकार देईलच पण तातडीने रायगड जिल्ह्यासाठी सरकारकडून १०० कोटी देत आहोत. याचा अर्थ १०० कोटींवर फूलस्टॉप आहे, असा नाही. जशी रायगडसाठी घोषणा केली, तसंच इतर जिल्ह्यांमध्ये नुकसान झालं, त्यानुसार काळजी घेणार आहोत,” असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.

Image

कोकणच्या किनाऱ्यावर बुधवारी धडकलेल्या निसर्ग चक्रीवादळामुळं रत्नागिरी, रायगड जिल्ह्यात प्रचंड नुकसान झालं आहे. अनेक घरांची पडझड झाली असून हजारो संसार उघड्यावर पडले आहेत. झाडे उन्मळून पडली आहेत. शेती आणि जनावरांनाही मोठा फटका बसला आहे. या नुकसानीसाठी मुख्यमंत्री आज रायगड दौऱ्यावर आहेत. अलिबागच्या काही गावांमध्ये काही गावांमध्ये पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी संवाद साधला व मदतीची घोषणाही केली.

Image

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

आज पासून मुंबईतील मरिन ड्राइव्ह सुरु; सोशल डिस्टंसिंगसाठी CISF तैनात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रातून कोरोनाचे संकट टळलेले नाही, मात्र तरीही पुन्हा एकदा लोक मुंबईतील सर्वाधिक लोकप्रिय हँगआउट्स पॉईंट असलेल्या मरीन ड्राईव्हवर दिसू लागले आहेत. महाराष्ट्र शासनाने आता सकाळी ५ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत लोकांना घराबाहेर पडण्यास परवानगी दिलेली आहे आणि आता लोकही घराबाहेर जात आहेत.

गुरुवारी सायंकाळपासून मरीन ड्राईव्हवर लोकांची लगबग सुरू झाली आहे. लोक सकाळी व्यायाम करताना, धावताना, चालताना दिसत आहेत. या सर्वांमध्ये असेही दिसत आहे जे की, मरीन ड्राईव्हवर यापूर्वी कधीही पाहिले गेले नव्हते.

मुंबई पोलिसांसह केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाला (सीआयएसएफ) येथे तैनात करण्यात आलेले आहे. सुरुवातीला लोकांना जरा विचित्र वाटले मात्र, लवकरच त्यांना कळले की काळजी करण्याची काहीच गरज नाही. शासनाने जारी केलेल्या नियमांचे पालन करून हे जवान लोकांना सोशल डिस्टंसिंग कसे राखावे हे शिकवत आहेत.

इंडिया टुडेशी बोलताना सीआयएसएफचे सहायक कमांडर अक्षय उपाध्याय म्हणाले, ‘मुंबई पोलिसांच्या मदतीसाठी हे सीआयएसएफ दल तैनात करण्यात आले आहे. आम्हाला याकरिता तैनात केलेले आहे की सोशल डिस्टंसिंगचे तसेच नियमांचे येथे पालन केले पाहिजे.

लोक मरीन ड्राइव्हवर चालणे, जॉगिंग, व्यायाम आणि सायकल चालवू शकतात. मात्र हे सर्व करीत असताना त्यांना कोरोनाच्या सुरक्षिततेचे प्रोटोकॉल आणि सोशल डिस्टंसिंगचे पालन करावे लागेल. लोकांना नेहमीच मास्क लावावे लागतील.

ते म्हणाले, ‘लोकांनी प्रत्येक परिस्थितीत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. आमचे जवान निर्णय घेतील. लोकांना नियम समजावून सांगितले जातील. कोविड -१९ हा साथीचा रोग आपल्यामध्ये अजूनही आहेच म्हणून आपण सावधगिरी बाळगली पाहिजे.

घरी सोडण्यापूर्वी आवश्यक माहिती
असिस्टंट कमांडर यांनी असेही म्हटले आहे की, सीआयएसएफचे जवानानीं लोकांना जागरूक केले तर ही आमच्यासाठी आश्चर्यकारक बाब आहे. मुंबई पोलिसांचे मत आहे की,’ घराबाहेर पडण्यापूर्वी लोकांना सामाजिक अंतर कसे राखायचे हे माहित असणे आवश्यक आहे. पोलिसांचे असेही म्हणणे आहे की, सरकारच्या मार्गदर्शक सूचनांविषयी सर्वांनाच माहिती नसते. त्यामुळे आम्ही अशा लोकांना माहिती देऊ.

सल्ला न दिल्यास कारवाई केली जाईल
मुंबई पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने सांगितले, ‘म्हणून लोकांना समजावून सांगण्याची आणि पुढाकार घेण्याची जबाबदारी आपली आहे. जर लोक पोलिस किंवा सीआयएसएफचे म्हणणे ऐकत नसतील आणि त्यांनी दिलेल्या चेतावणीकडे दुर्लक्ष करत असतील तर कायदा त्यांच्या मार्गाचा अवलंब करेल.

मरीन ड्राईव्ह हे पर्यटकांमध्ये खूपच प्रसिद्ध आहे. लोक रात्री उशिरापर्यंत मरीन ड्राईव्हवर जातात. पावसाळ्यात या भागात मोठ्या संख्येने लोक जमा होतात आणि पावसाचा आनंद घेतात.

पण आता मरीन ड्राईव्हवर असे काहीही होणार नाही. कोणत्याही पक्षाला परवानगी दिली जाणार नाही. कोणत्याही सामाजिक मेळाव्यास परवानगी दिली जाणार नाही. लोकांना समुद्राच्या दिशेने बसण्याची परवानगी दिली जाणार नाही. काही निर्बंधांसह या मिशनची ही सुरुवात आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.