Tuesday, December 30, 2025
Home Blog Page 5703

देशात अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली तरी कंपन्यांची पगार कपात सुरूच

नवी दिल्ली । देश अनलॉक होण्याची सुरूवात झाली असली तरी अद्याप अनेक कंपन्या पगार कपात करतच आहेत. लॉकडाऊनमुळे सर्वाधिक फटका बसलेल्या हवाई वाहतूक सेवेतील सर्वच कंपन्यांनी कर्मचाऱ्यांच्या पगार कपात केली होती. एअर एशिया इंडियाने मे आणि जून महिन्याच्या वेतनात सरासरी ४० टक्के कपात करण्याचे ठरवले आहे. त्यामुळे कोरोना व्हायरस लॉकडाऊनचा फटका आणखी काही काळ बसणार असल्याचे दिसत आहे.

एअर एशिया इंडियातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी एप्रिल महिन्यात २० टक्के पगार कपात स्वत:हून घेतली होती. अन्य श्रेणीतील कर्मचाऱ्यांच्या पगारात ७ ते १७ टक्के इतकी कपात झाली होती. अर्थात ज्यांचा पगार ५० हजार अथवा त्या पेक्षा कमी आहे त्यांच्या पगारात कोणताही कपात केली नव्हती. टाटा आणि एसआयए यांच्या मालिकीच्या ही विमान सेवा पुढील आठवड्यात ६ वर्ष पूर्ण करणार आहे.

या कंपनीतील कर्मचाऱ्यांची संख्या २ हजार ५०० इतकी आहे. ३० एअरबस ए ३२० आणि पायलटची संख्या ६०० इतकी आहे. पायलटने उड्डाण केले अथवा न केले तरी ७० तासाचे वेतन मिळते. आता हे प्रमाण २० तास इतके करण्यात आले आहे. अशाच पद्धतीने फस्ट ऑफिसरचे वेतन १ लाख ४० हजाराहून कमी करून ते ४० हजार इतके केले आहे. तर वरिष्ठ पायलटचे वेतन ३.४५ लाखांवरून एक लाख इतके करण्यात आले आहे. एका पायलटच्या एकूण वेतनात ४० टक्के इतकी कपात झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

यासंदर्भात कंपनीकडून अधिकृतपणे कोणत्याही प्रकारची माहिती देण्यात आलेली नाही. कंपनीच्या अंतर्गत विषयात कोणत्याही प्रकारचे वक्तव्य करणार नसल्याचे एअर एशिया इंडियाच्या प्रवक्त्याने सांगितले. सध्या कंपनी कोणतेही नवे विमान खरेदी करणार नाही. पुढील वर्षाच्या मार्चपर्यंत पाच मध्यम आणि एक ए ३२० खरेदी करण्याची एअर एशिया इंडियाची योजना होती. मात्र, ही योजना लांबणीवर जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, केंद्राने काही मार्गांवर हवाई वाहतूक करण्यास परवानगी दिली असली तरी विमान कंपन्यांचे नुकसान भरून निघण्यासाठी मोठा काळ लागणार असल्याचे बोलले जात आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

चीनमधील प्राथमिक शाळेत ४० विद्यार्थी आणि दोन शिक्षकांवर चाकूहल्ला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । चायना प्राइमरी स्कूलमधील एका सुरक्षा रक्षकाने चाकूने सुमारे ४० विद्यार्थी आणि दोन शिक्षकांवर हल्ला केला. या सुरक्षा रक्षकाने शाळेच्याच विद्यार्थ्यांना लक्ष्य का केले याची माहिती अद्यापपर्यंत मिळालेली नाही.

‘चायना डेली’ या अधिकृत वृत्तपत्राच्या वृत्तानुसार, गुआंग्सी प्रांतातील प्राथमिक शाळेत ही घटना घडली. असं म्हणतात की, गुरुवारी सकाळी जेव्हा मुले शाळेत शिकत होती, तेव्हा शाळेच्या सुरक्षा रक्षकाने चाकू आणला आणि शाळेत उपस्थित असलेल्या मुलांवर आणि शिक्षकांवर हल्ला करण्यास सुरवात केली. सुरक्षा रक्षकांनी हल्ला केलेल्या बर्‍याच मुलांचे वय हे ६ वर्षाखालील आहे. या घटनेत एक विद्यार्थी, शाळेचे मुख्याध्यापक तसेच एक सुरक्षा रक्षक यांना गंभीर दुखापत झाली.

सदर घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहचले आणि त्यांनी जखमींना तातडीने वजूहु सिटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले, यातील या तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. पोलिसांनी आरोपी असलेल्या सुरक्षा रक्षकास अटक केली असून त्याच्याकडे पुढील चौकशी केली जात आहे. चीनमध्ये गेल्या काही वर्षांत शाळेच्या आत चाकूने झालेल्या हल्ल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. असंतुष्ट हल्लेखोर हे त्यांचा राग रोखण्यासाठी लहान मुलांच्या शाळा किंवा बसेसला लक्ष्य करतात.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Swiggy आता ‘या’ राज्यातही करणार दारुची ‘होम डिलिव्हरी’

नवी दिल्ली । लोकप्रिय ऑनलाइन फूड डिलिव्हरी कंपनी Swiggy ने झारखंड आणि ओडिशानंतर आता पश्चिम बंगालमध्येही मद्याची ‘होम डिलिव्हरी’ सुरू केली आहे. पश्चिम बंगालच्या कोलकाता आणि सिलीगुडी या दोन शहरांमध्ये सुरुवातीला ही सेवा सुरू होत असून लवकरच राज्यातील अन्य शहरांमध्येही घरपोच मद्यविक्री सेवा सुरू करण्याची कंपनीची योजना आहे.

कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर दुकानांवरील गर्दी कमी करण्याच्या उद्देशाने मद्याची ‘होम डिलिव्हरी’ सुरू केली असल्याचं कंपनीच्या प्रवक्त्यांनी सांगितलं. झारखंड आणि ओडिशामध्ये यशस्वीपणे घरपोच मद्यविक्रीला सुरूवात केल्यानंतर आता कंपनी पश्चिम बंगालमध्येही ही सेवा सुरू करत आहे. पहिल्यांदा कोलकाता आणि सिलीगुडी या दोन शहरांमध्ये ही सेवा सुरू केली जाईल. नंतर टप्प्याटप्प्याने राज्यातील अन्य २४ शहरांमध्येही सेवा सुरू करणार असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.

राज्य सरकारच्या मार्गदर्शक तत्वांनुसार परवाना आणि अन्य कागदपत्रांची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून या सेवेसाठी राज्यातील काही रिटेल विक्रेत्यांसोबत भागीदारी केल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आली. या सेवेसाठी ग्राहकाला वय, वैध सरकारी ओळखपत्राची प्रत आणि स्वतःचा एक फोटो अपलोड करावा लागेल. तसेच ग्राहकाला एका ठरावीक मर्यादेपर्यंतच मद्याची ऑर्डर करता येईल. ‘स्विगी’ने आपल्या अ‍ॅपमध्ये वाईन शॉप्स ही कॅटेगरी सुरू केली असून त्याद्वारे ऑर्डर करणाऱ्यांना घरपोच मद्य पोहोचवलं जाणार आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

महाराष्ट्राच्या लाॅकडाउन नियमावलीत मुख्यमंत्री ठाकरेंकडून सुधारणा; ‘हे’ आहेत नवीन नियम

मुंबई । केंद्र सरकारने १ जूनपासून संचारबंदीचा पाचवा टप्पा जाहीर केला आहे. सोबत काही नियम शिथिल केले आहेत. तसेच राज्यांना त्याचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे. महाराष्ट्र सरकारने आज या नियमांमध्ये सुधारणा करीत ते जाहीर केले आहेत. सुधारित नियमांमध्ये शारीरिक बाह्य क्रियाकलापांना परवानगी असलेली दुकाने उघडणे, खाजगी कार्यालये पुन्हा सुरू करणे, वर्तमानपत्र विक्री, शैक्षणिक संस्थांच्या कर्मचार्‍यांची उपस्थिती, आंतरराज्यीय हालचाली यांना परवानगी देण्यात आली आहे.

जिम, प्ले ग्राउंड, स्विन्ग्स/बार उघडण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. एका दिवशी एका बाजूची दुकाने उघडली जातील तर दुसऱ्या दिवशी दुसऱ्या बाजूची दुकाने उघडली जातील. याचे नियोजन करण्याचे तसेच नियंत्रण ठेवण्याचे आणि नागरिक सामाजिक अलगाव चे नियम पाळतात की नाही हे पाहण्याचे काम महानगरपालिका तसेच स्थानिक पोलिसांचे असेल. ८ जूनपासून सर्व खाजगी कार्यालये १०% कार्यक्षमतेवर सुरु राहतील, किंवा १० लोकांनाच कार्यालयात हजेरी लावता येईल व इतरांना घरातून काम करावे लागेल असे या सुधारित नियमामध्ये म्हंटले आहे. तसेच सर्व कर्मचारी निर्जंतुकीकरणाची पुरेशी काळजी घेत आहेत का हे पाहणे गरजेचे आहे जेणेकरून घरातील असुरक्षित जसे की वृद्ध लोकांना त्रास होणार नाही हे पाहण्यास सांगण्यात आले आहे.

 

७ जूनपासून वर्तमानपत्रांची छपाई आणि वितरणास या नियमांमध्ये परवानगी देण्यात आली आहे. वृत्तपत्र वितरण करणाऱ्या व्यक्तींनी मास्क लावणे, हात निर्जंतुकीकरण करणे तसेच सामाजिक अलगाव पाळणे बंधनकारक आहे. शैक्षणिक संस्था तसेच विद्यापीठातील कर्मचाऱ्यांना केवळ ई- कँन्टेन्ट तयार करण्यासाठी, उत्तरपत्रिकांच्या मूल्यमापनासाठी आणि निकाल जाहीर करण्यासाठी काम करता येईल. तथापि व्यक्तींची आंतरराज्यीय आणि आंतर जिल्हा हालचाल नियमित केली जाईल.मुंबई महानगर प्रदेश अंतर्गत लोकांच्या जिल्ह्यांतर्गत हालचालीस कोणत्याही निर्बंधाशिवाय परवानगी दिली जाईल. एसओपी जारी केल्यानुसार प्रमाणित कामगार, स्थलांतरित कामगार, यात्रेकरू, पर्यटक इत्यादींच्या नियमिततेचे नियमन केले जाईल. असे या सुधारित मार्गदर्शिकेत सांगण्यात आले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

मजुरांनी कामावर परतावं म्हणून बिल्डरनं केली थेट विमान तिकिटांची सोय

हैद्राबाद । देशात कोरोना लॉकडाऊनमध्ये शिथिलतात दिल्यांनतर आता अनेक राज्यांतील आपल्या घरी परतलेल्या श्रमिकांना परत बोलावण्याचं मोठं आव्हान आता उद्योग जगतासमोर उभं आहे. यात उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, छत्तीसगड राज्यातील मजुरांची संख्या अधिक आहे. दरम्यान, हैदराबादमधल्या एका बिल्डरनं मजुरांना कामावर परत आणण्यासाठी एक कमालीची शक्कल लढवली आहे. या बिल्डरनं आपल्या कन्स्ट्रक्शन साईटवर काम करणाऱ्या मजुरांना परत बोलावण्यासाठी त्यांना विमानाची तिकीटं बुक केली आहेत. या बिल्डरनं मजुरांना विमान प्रवासाची आशा दाखवत परत बोलावलं आहे. प्रत्येक तिकीटासाठी त्यानं ४०००-५००० रुपये खर्च केले आहेत. या साईटवर काम करणारे मजूर झारखंड, बिहार, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, तामिळनाडू तसंच पश्चिम बंगालमधून इथं दाखल होणार आहेत.

‘प्रेस्टीज ग्रुप’चे ३ प्रोजेक्ट सध्या हैदराबादमध्ये सुरू आहेत. या ग्रुपचे उपाध्यक्ष सुरेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, मजुरांना परत आणण्यासाठी कंपनीनं विमानाची तिकीटं बुक केली आहेत. मजूर कामावर येण्यासाठी विमानाचाच वापर करतील, असं कॉन्ट्रॅक्टर्सलाही सांगण्यात आलं असल्याचे कुमार यांनी सांगितलं. लॉकडाऊन उघडल्यानंतर काम सुरू करण्याची परवानगी मिळेल परंतु, कामगारच नसतील तर काम कोण करणार? असा प्रश्न सध्या व्यावसायिकांना सतावत आहे. सध्या हैदराबादमध्ये जवळपास ५० टक्के मजुरांची कमतरता भासत आहे. त्यामुळेच हैदराबादच्या अनेक बिल्डरांनी मजुरांसाठी एसी रेल्वेचं तिकीटं बुक केले आहेत.लॉकडाऊन उघडल्यानंतर काम सुरू करण्याची परवानगी मिळेल परंतु, कामगारच नसतील तर काम कोण करणार? असा प्रश्न सध्या व्यावसायिकांना सतावतोय. हैदराबादमध्ये जवळपास ५० टक्के मजुरांची कमतरता भासतेय.त्यामुळेच हैदराबादच्या अनेक बिल्डरांनी मजुरांसाठी एसी रेल्वेचं तिकीटं बुक केले आहेत.

लॉकडाऊनमध्ये मजूर होते वाऱ्यावर
देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यानी २४ मार्च रोजी देशव्यापी लॉकडाऊन घोषित केलं. त्यानंतर किती दिवस लॉकडाऊन सुरू राहील याबद्दल निश्चितता नव्हती. अशातच हातातलं काम बंद पडल्यानं अनेक मजुरांनी उपासमारीची वेळ आली. लॉकडाऊनकाळात अनेक मजुरांना कन्स्ट्रक्शन साईटवर कुठलिही सुविधा किंवा त्यांच्या पोटापाण्याची व्यवस्था नसल्यानं अनेकांनी आपल्या घरी, आपल्या राज्यात परतण्याचा निर्णय घेतला. लाखो मजूर हजारो मैल पायीच आपल्या घरी निघाले. बरेच दिवस देशातील विविध महामार्गांवर घरी परतणाऱ्या मजुरांचे लोंढे पायीच चालत निघाल्याचे चित्र दिसत राहील. दरम्यान, गेल्या महिन्यात केंद्र सरकारनं व्यवस्था केलेल्या श्रमिक रेल्वेमधून मजुर आपल्या घराकडे आता जात आहेत. परंतु, लॉकडाऊनमध्ये शिथिलता मिळताच या मजुरांना पुन्हा कामावर बोलावण्याचं मोठं आव्हान व्यावसायिकांसमोर असतांना त्यांना परत बोलावण्यासाठी मोठं-मोठी अमिश देण्यात येत आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

‘विराट आणि रोहित यांच्यात ‘हा’ आहे सर्वोत्कृष्ट खेळाडू’- ब्रॅड हॉग

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्मा हे दोघे सध्या जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाजांपैकी एक मानले जातात. दोन्ही क्रिकेटर्सनी गेल्या काही वर्षांत चांगली कामगिरी केली असून अनेक मोठे विक्रमही केलेले आहेत. एकीकडे विराट कोहलीने आपल्या स्फोटक खेळाने (४२ एकदिवसीय सामने, २७ कसोटी) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण ७० शतके ठोकली आहेत आणि सचिन तेंडुलकरच्या १०० आंतरराष्ट्रीय शतकांच्या विक्रमाजवळ आला आहे.

तर, दुसरीकडे सलामीवीर फलंदाज रोहित शर्माही मर्यादित षटकांतील खेळांत जगातील सर्वात विश्वासार्ह खेळाडूंपैकी एक बनला आहे. एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात रोहित असा पहिला फलंदाज आहे की, ज्याने एक-दोन नव्हे तर तब्ब्ल तीन दुहेरी शतके ठोकली आहेत. अशा परिस्थितीत रोहितने लवकरच चौथ्यांदा वनडेमध्ये डबल सेंच्युरी करावी अशी अपेक्षा त्याच्या चाहत्यांकडून केली जात आहे. केवळ चाहतेच नाही तर ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकी गोलंदाज ब्रॅड हॉगचाही असा विश्वास आहे की,रोहित शर्मा हा एकमेव असा फलंदाज आहे जो वन डेनंतर टी -२० स्वरूपातही दुहेरी शतक ठोकू शकतो.

मात्र, एवढी चांगली कामगिरी करूनही चाहत्यांमध्ये नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे की,विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यापैकी मर्यादित षटकांतील सामन्यांत सर्वोत्कृष्ट फलंदाज कोण आहे. त्याच प्रश्नाला उत्तर देताना हॉगने आपल्या युट्यूब चॅनेलवर सांगितले की,’ विराट आणि रोहितमध्ये सर्वोत्कृष्ट कोण आहे. तो म्हणाला की, “विराट कोहलीकडे सातत्य आहे, विशेषत: जेव्हा भारत धावांचा पाठलाग करत असतो तेव्हा तो विरोधी संघासमोर अगदी पर्वतासारखा उभा असतो.”

Virat Kohli vs Rohit Sharma: How do the two modern era ODI greats ...

तर दुसरीकडे हॉगने या दोन्ही खेळाडूंचा स्वभाव पूर्णपणे भिन्न असल्याचेही म्हटले तो म्हणाला की,’ या दोघांमध्ये बराच फरक आहे तसेच दोघांचीही खेळाची खेळण्याची शैलीही एकमेकांपेक्षा वेगळी आहे.हॉग पुढे म्हणाला, “या दोघांमध्ये तशी तुलना करता येणार नाही. यामागील सर्वात मोठे कारण म्हणजे दोघांच्याही भूमिका वेगवेगळ्या आहेत. नव्या चेंडूवर आक्रमक फलंदाजी करण्याची जबाबदारी रोहितची आहे तर डाव पुढे नेण्याची आणि शेवटपर्यंत क्रीजवर राहण्याची जबाबदारी ही विराटची आहे. अशा परिस्थितीत हे दोन्ही खेळाडू एकमेकांपेक्षा वेगळे आहेत. ”

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

‘हे’ यश शिवरायांचे राज्य पुढे नेण्यासाठी मला साथ देणार्‍या प्रत्येकाचे’ – मुख्यमंत्री ठाकरे

मुंबई । देशातील सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा समावेश झाला आहे. या यादीत ७६.५२ % पसंती त्यांना मिळाली आहे. त्यांचा या यादीत पाचवा क्रमांक लागला आहे. आयएएनएस आणि सी व्होटर यांनी संयुक्त रित्या हे सर्वेक्षण केले आहे. ही यादी जाहीर झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या ट्विटर

अकॉउंटवरून सर्वांचे आभार मानले आहेत. त्यांनी ‘हे’ यश शिवरायांचे राज्य पुढे नेण्यासाठी मला साथ देणार्‍या प्रत्तेकाचे’ असे ट्विट केले आहे.

“लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत माझा समावेश झाला, हे माझे एकट्याचे यश नाही. सहा महिन्याच्या काळात शिवरायांचे हे राज्य पुढे नेण्यासाठी मला साथ देणाऱ्या प्रत्येकाचे यश आहे. मुख्यमंत्रीपद हे निमित्त आहे. महाराष्ट्राची सेवा घडत आहे हे महत्वाचे. लोकप्रियतेत माझा वरचा नंबर येण्यापेक्षा महाराष्ट्र जगभरात पहिल्या क्रमांकाचे राज्य कसे करता येईल हेच माझे ध्येय आहे.” असे त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगत महाराष्ट्रातील जनता, मंत्रिमंडळातील सहकारी आणि सर्वे अधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत.

 

दरम्यान देशातील लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत एकही भाजपा मुख्यमंत्री नाही आहे. यामध्ये ओडिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बहेल, केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन आणि आंध्र प्रदेश चे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांचा अनुक्रमे पहिला, दुसरा, तिसरा आई चौथा क्रमांक लागला आहे. उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या नियुक्तीची चर्चा चांगलीच रंगली होती. त्यांना मुख्यमंत्रीपद ग्रहण करून केवळ सहा महिन्यांचा कालावधी झाला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

चिंताजनक! राज्यात ३५०० पेक्षा जास्त कोविड योद्ध्यांना कोरोनाची लागण

मुंबई । राज्यात कोरोनाचा संसर्ग दिवसागणिक झपाट्यानं वाढत असताना आता अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचारीही कोरोनाच्या विळख्यात सापडू लागले आहेत. राज्यात एकूण ५०० डॉक्टरांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून ५ डॉक्टरांचा करोनामुळं मृत्यू झाला असल्याची माहिती. महाराष्ट्र मेडिकल परिषद व इंडियन मेडिकल असोसिएशननं दिली आहे. तसेच जवळपास ३ हजार ५०० पेक्षा जास्त कोविड योद्ध्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यात डॉक्टर, परिचारिका, वॉर्डबॉय, पोलिस कर्मचारी यांचा समावेश आहे.

कोरोना युद्धात रात्रंदिवस सेवा देणाऱ्या महाराष्ट्र पोलिस दलालीही जीवघेण्या कोरोनाचा विळखा बसला आहे. १,५२६ पोलिसांना कोरोनाची लगान झाली आहे. यामध्ये १९० पोलिस अधिकारी व १,३२६ पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. राज्यात २९ पोलिसांचा करोनमुळं मृत्यू झाला आहे. दरम्यान, अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्माचाऱ्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत त्यातील बहुंताश जणांची व्यवस्था पालिकेनं हॉस्टेलमध्ये केली होती. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी केलेल्या नियोजनानुसार वेगवेगळ्या वेळांनुसार काम करणारे हे कर्मचारी रात्री हॉस्टेलमध्ये मात्र एकाच खोलीत राहतात. त्यातूनही कोरोनाचा संसर्ग बळावण्याची शक्यता निर्माण केली जात आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

भारतीय वेगवान गोलंदाजीत क्रांती घडविणाऱ्या ‘या’ खेळाडूबद्दल लक्ष्मण काय म्हणाला जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताचा माजी फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मणने गुरुवारी जवागल श्रीनाथचे कौतुक करत म्हटले की, या वेगवान गोलंदाजाने देशातील वेगवान गोलंदाजीत क्रांती घडविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. आजकाल लक्ष्मण आपल्या सहकारी खेळाडूंना ट्रिब्यूट देण्यासाठी मोहीम राबवित आहे, त्याअंतर्गत त्याने श्रीनाथचा फोटो शेअर करत एक ट्विट केले आहे.

लक्ष्मणने ट्वीट केले की, “म्हैसूरचा वेगवान गोलंदाज असलेल्या श्रीनाथने भारतीय गोलंदाजीत क्रांती घडवून आणली. कठीण परिस्थितीतही त्याने नेहमीच संघाच्या गरजेनुसार कामगिरी केली. श्रीनाथची शक्ती प्रतिकूल परिस्थितीतही चांगली कामगिरी करण्याची भूक ही होती.”

 

श्रीनाथने १९८९ मध्ये कर्नाटककडून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि हैदराबादविरुद्धच्या आपल्या पहिल्याच सामन्यात हॅटट्रिक केली. वेगवान गोलंदाज असलेल्या श्रीनाथने ५०० प्रथम श्रेणी विकेट घेऊन आपली कारकीर्द संपविली. श्रीनाथने १९९१ मध्ये ब्रिस्बेन येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. ३I०० एकदिवसीय विकेट घेणारा श्रीनाथ पहिला भारतीय गोलंदाज होता. एकदिवसीय सामन्यात त्याने भारताकडून दुसर्‍या क्रमांकाच्या सर्वाधिक ३११ बळी घेण्याचा विक्रम नोंदविला आहे.

विश्वचषकात श्रीनाथच्या ४४ विकेट्स असून झहीर खानसह विश्वचषकात भारताकडून संयुक्तपणे सर्वाधिक विकेट घेणारा खेळाडू ठरला आहे. २००२ मध्ये कोलकाता येथे वेस्ट इंडीजविरुद्ध त्याने शेवटचा कसोटी सामना खेळला होता तर २००३ वर्ल्ड कपचा अंतिम सामना हा त्याचा शेवटचा वनडे सामना असल्याचे सिद्ध झाले होते. श्रीनाथ सध्या आयसीसीचा मॅच रेफरी म्हणून काम पाहत आहे.

तत्पूर्वी, भारतीय संघाचा माजी फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मणने अशी घोषणा केली की, ज्या खेळाडूंसोबत तो खेळला आहे आणि ज्यांनी त्याच्यावर पुढील काही दिवस मोठा प्रभाव टाकला आहे त्यांना तो आठवेल. पहिल्या दिवशी लक्ष्मणने क्रिकेटचा देव म्हणून ओळखला जाणाऱ्या सचिन तेंडुलकरला आठवले आणि त्यानंतर टीम इंडियाचा लेगस्पिनर आणि माजी कर्णधार अनिल कुंबळे यांच्या सन्मानार्थ ट्विट केले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

आता खासगी कार्यालयेही सुरु होणार; राज्य सरकारने दिली परवानगी

मुंबई । लॉकडाउनमधून शिथीलता देण्यास आता सुरुवात करण्यात आली असून राज्य सरकारने खासगी कार्यालयं सुरु करण्यास परवानगी दिली आहे. यासंबंधीचा आदेश राज्य सरकारकडून जारी करण्यात आला आहे. या आदेशात खासगी कार्यालयं १० टक्के कर्मचारी किंवा १० कर्मचारी याच्यासोबत कामकाज सुरु करु शकता असं सांगण्यात आलं आहे. ८ जूनपासून हा आदेश लागू होणार आहे.

या आदेशानुसार सर्व खासगी कार्यालयं क्षमतेच्या १० टक्के कर्मचारी किंवा १० कर्मचारी यांच्यासोबत कामकाज सुरु करु शकतात. इतर कर्मचाऱ्यांना वर्क फॉर्म होम करावं लागेल. यावेळी कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना स्वच्छतेचं महत्त्व पटवून देण्यासाठी कार्यक्रम हाती घेईल. जेणेकरुन कर्मचारी घरी परतल्यानंतर त्यांच्या घरच्यांना त्यातही खासकरुन वृद्धांना संसर्ग होणार नाही याची काळजी घेतली जाईल. ८ जून २०२० पासून हा निर्णय लागू होईल.

याचसोबत बाहेर व्यायाम करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र यावेळी व्यायामाचं कोणतंही साहित्य, गार्डनमधील जीम, ओपन एअर जीम वापरता येणार नाही. दुकान सम-विषय नियमाने पूर्ण दिवस सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली असून याची जबाबदारी पोलीस आणि महापालिका आयुक्तांवर असणार आहे. एका दिवशी रस्त्याच्या एकाच बाजूची दुकानं सुरु राहतील असं आदेशात सांगण्यात आलं आहे.

रविवारपासून वृत्तपत्र छपाई आणि वाटप करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र यावेळी स्वच्छतेच्या सर्व नियमांचं पालन करणं बंधनकारक असणार आहे. शैक्षणिक संस्थांचे कर्मचारी विद्यार्थ्यांना शिकवण्याऐवजी इतर गोष्टींसाठी कामकाज सुरु ठेऊ शकतात. ई-कंटेट विकसित करणे, उत्तर पत्रिकांचं मूल्यमापन आणि निकाल जाहीर करण्याची कामं यांचा यामध्ये उल्लेख आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”