Tuesday, December 30, 2025
Home Blog Page 5706

मोदी सरकारनं लागू केलेला लॉकडाऊन फोल ठरला- राहुल गांधी

नवी दिल्ली । कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्राकडून लागू करण्यात आलेला देशव्यापी लॉकडाऊन वाया गेला असल्याचे वक्तव्य काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केले. ते गुरुवारी उद्योगपती राजीव बजाज यांच्यासोबत झालेल्या वेबसंवादात बोलत होते. यावेळी राहुल गांधी यांनी म्हटले की, सध्याची परिस्थिती पाहिल्यास लॉकडाऊन कसा फोल ठरला, हे तुमच्या लक्षात येईल. लॉकडाऊन उठवल्यानंतरही रुग्णांची संख्या वाढतच आहे, अशी परिस्थिती असणारा भारत जगातील एकमेव देश आहे. त्यामुळे आपण पुन्हा आहे तिथेच आलो आहोत. आता केंद्र सरकार सर्व काही राज्यांवर ढकलून हात झटकण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका यावेळी राहुल गांधी यांनी केली.

जगातील इतर देशांमध्ये लॉकडाऊनच्या काळात रुग्णांची संख्या कमी झाल्याचे दिसून आले होते. मात्र, भारतात तब्बल २ महिन्यांच्या लॉकडाऊननंतरही कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. त्यामुळे विरोधकांकडून केंद्राच्या कार्यपद्धतीवर टीका केली जात आहे. दरम्यान, केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वीच Unlock 1 ची घोषणा केली होती. त्यानुसार आता देशातील कंटेन्मेंट झोन सोडून इतर भागांतील लॉकडाऊनचे निर्बंध शिथील करण्यात येणार आहेत. परंतु, जून-जुलै या महिन्यांत देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती तज्ज्ञांनी वर्तविली आहे.

दरम्यान, मागील २४ तासांत देशभरात कोरोनाचे ९३०४ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर २६० लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाग्रस्तांच्या संख्येत एकाच दिवसात झालेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा २ लाखांच्या पुढे गेला आहे. अशा परिस्थितीत Unlock 1 कितपत यशस्वी ठरणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

लोकल ट्रेन सुरु करा! जितेंद्र आव्हाडांची मोदी सरकारकडं मागणी

मुंबई । अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी केंद्र सरकारनं मुंबईतील लोकल गाड्या काही प्रमाणात सुरू कराव्यात, अशी मागणी मागणी राज्याचे गृहनिर्माण मंत्रीजितेंद्र आव्हाड यांनी केंद्रातील मोदी सरकारला केली आहे. येत्या ८ तारखेनंतर लॉकडाऊन आणखी शिथिल होणार असून मोठ्या संख्येनं नागरिक घराबाहेर पडणार आहेत. त्यांच्या प्रवासासाठी देखील लोकल काही प्रमाणात सुरू असणं गरजेचं आहे. ह्या सगळ्याचा विचार करता आव्हाड यांच्या मागणीला महत्त्व आहे.

लोकल सुरु कारण्यासंदर्भांत आव्हाड यांनी एक ट्विट केलं आहे. ‘मुंबईतील रुग्णालयांत सेवा देणारे बहुसंख्य कर्मचारी दूर उपनगरांत किंवा मुंबईबाहेर राहतात. लोकल ट्रेनची सोय असल्याशिवाय ते कामावर रुजू होऊ शकत नाहीत आणि त्यामुळं रुग्णसेवा व्यवस्थित होत नाही. त्यामुळं मोदी सरकारनं अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी काही प्रमाणात लोकल सुरू कराव्यात,’ असं आव्हाड यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, मुंबईतील करोना बाधितांची एकूण संख्या आतापर्यंत ४० हजारांच्याही पुढं गेली आहे. त्यांच्यावर मुंबई शहर व उपनगरांतील वेगवेगळ्या रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. मात्र, त्यांना सेवा देणारे कर्मचारी मुंबईच्या विविध उपनगरांमध्ये तसंच, ठाणे, कल्याण-डोंबिवली, बदलापूर, विरारपर्यंत राहणारे आहेत. लोकल गाड्या सुरू नसल्यानं त्यांना रुग्णालयांत पोहोचताना अडचणी येत आहेत. खासगी रुग्णालयांत बेड असूनही कर्मचारी नसल्यानं ते मोकळेच पडून आहेत. आरोग्य कर्मचारी उपलब्ध झाल्यास खासगी रुग्णालयांनाही पूर्ण क्षमतेनं रुग्णसेवा करणं शक्य होणार आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

पुण्यात येण्यासाठी आणि पुण्यातून बाहेर जाण्यासाठी पासची गरज? पहा काय म्हणतायत पुणे पोलीस

पुणे । केंद्र सरकारने १ जूनपासून पाचच्या टप्प्यातील संचारबंदी सुरु केली आहे. या संचारबंदीमध्ये अनेक नियम शिथिल करण्यात आले आहेत. तसेच राज्यांना हे नियम राबविण्यासंदर्भात स्वातंत्र्य देण्यात आले आहे. महाराष्ट्र सरकारने नियम शिथिल केले असले तरी केंद्र सरकारच्या सर्व नियमांना संमती दिली नाही आहे. अद्याप राज्यात संचारबंदीचे नियम पाळले जाणार आहेत. पुण्यात बारामती, इंदापूर आणि वालचंदनगर याच ठिकाणी एसटी वाहतूक सुरु आहे. इतर ठिकाणी सार्वजनिक वाहतुकीची सुविधा उपलब्ध नाही आहे. त्यामुळे सर्वाना पूर्वीचेच नियम पाळावे लागणार आहेत. सर्वाना पास गरजेचा असल्याचे पुणे पोलिसांनी सांगितले आहे.

अदयाप राज्यातील कोरोना स्थिती आटोक्यात ना आल्याने प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. पुणे जिल्ह्यातील अंतर्गत वाहतुकीसाठी नागरिकांना पास काढावा लागणार आहे. तसेच पुण्यात यायचे असल्यास आणि पुण्याबाहेर जायचे असल्यास दोन्ही परिस्थितीत नागरिकांना परवानगी घेऊन पास काढणे बंधनकारक असल्याची माहिती देण्यात आली आहे. जिल्ह्यातील नागरिकांना धोका उदभवू नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या पाससाठी अनेक अर्ज आले आहेत. त्यांची छाननी सुरु असल्याचे पोलीस उपायुक्त बच्चन सिंग यांनी सांगितले आहेत.

दरम्यान राज्यात एकूण संख्येच्या निम्मीच दुकाने सुरु राहतील अशी व्यवस्था करण्यात आली आहेत. प्रार्थना स्थळेही सर्वांसाठी खुली करण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. खाजगी कार्यालये १०% क्षमतेने सुरु केली जाणार आहेत. पण यामुळे नागरिकांना कोरोनाचा धोका आणखी वाढू नये म्हणून वाहतुकीचे नियम तेच राहतील. गाड्यांमधील प्रवासी संख्या ही संचारबंदीमध्ये निश्चित करून दिलेलीच राहील, ही माहिती पोलिसांकडून मिळाली आहे. संचारबंदीचे नियम शिथिल झाले असले तरी वाहतुकीच्या नियमांमध्ये फारसा बदल झालेला नाही.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

कठोर लॉकडाउनमुळे भारतीय अर्थव्यवस्थेला प्रचंड नुकसान झालं- राजीव बजाज

नवी दिल्ली । लॉकडाउनमुळे अर्थव्यवस्थेचे प्रचंड नुकसान झाले आहे. जीडीपी वृद्धीचा आलेख आता उतरू लागला आहे. कठोर लॉकडाउनमुळे आता केवळ नुकसान होणार आहे, अशा शब्दांत बजाज ऑटोचे व्यवस्थापकीय संचालक राजीव बजाज यांनी केंद्राच्या धोरणांवर टीका केली. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज बजाज यांच्याशी कोरोना संकटावर ऑनलाइन चर्चा केली. त्यावेळी बजाज यांनी आपली मते मांडली.

कोरोना रोखण्यासाठी सध्या सुरु असलेल्या दीर्घकालीन कठोर लॉकडाउनने अर्थव्यवस्थेला प्रचंड फटका बसला आहे. अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी सरकारला बरच काही करता आले असते मात्र ते जमले नाही, अशी खंतही राजीव बजाज यांनी यावेळी बोलून दाखवली. देशात लागू केलेला लॉकडाउन हा कठोरातील कठोर लॉकडाउन म्हटलं पाहिजे. अशा प्रकराची दीर्घकालीन टाळेबंदी मी अद्याप कुठल्या देशात पहिली नाही, असे बजाज यांनी गांधी यांना सांगितले. मात्र सामाजिक आणि भावनिकतेचा विचार करता टाळेबंदी इतर देशांच्या तुलनेत ठीक होती, असे त्यांनी सांगितले.

उद्योगांना सावरण्यासाठी बँकांच्या माध्यमातून मदत देण्यापेक्षा थेट मदत देणे आवश्यक होते, असे मतही त्यांनी व्यक्त केले. एकीकडे बेरोजगारीचे आव्हान उभे ठाकले असताना उद्योगांना आता या संकटातून पूर्वपदावर येण्याचा आशावाद वाटत आहे. मात्र मागणी आणि वस्तूंचा खप वाढणे आवश्यक आहे. आतापर्यंत केवळ पत पुरवठ्यातूनच उद्योगांना दिलासा मिळाला आहे, असेही बजाज यांनी सांगितले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

चिंताजनक! मागील २४ तासांत कोरोनाग्रस्तांच्या संख्येत रेकॉर्ड ब्रेक वाढ

नवी दिल्ली । देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्यानं वाढतच चालली आहे. गेल्या २४ तासांत करोनाग्रस्तांच्या संख्येत सर्वाधिक मोठी वाढ पाहायला मिळाली आहे. गेल्या आठवड्यात दिवसाला ८ हजारांनी वाढणारी संख्या आता ९ हजारांच्या पुढे पोहचली आहे. त्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील २४ तासांत ९ हजार ३०४ नवे रूग्ण आढळून आले आहेत. एका दिवसात वाढलेली ही आतापर्यंतची सर्वाधिक संख्या आहे. देशातील एकूण रुग्णांची संख्या २ लाख १६ हजार ९१९ इतकी झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे एक लाख ४ हजार १०७ जणांनी करोनावर मात केली आहे. तर १ लाख ६ हजार ७३७ जणांवर उपचार सुरू आहेत.

तर दुसरीकडे कोरोनामळे मृत्यू झालेल्यांची संख्याही ६ हजारांच्या पुढे गेली असून मागील २४ तासांत २६० जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत ६ हजार ७५ जणांचा करोनामुळे बळी गेला आहे.दे शभरात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण महाराष्ट्रात आहेत. राज्यात सध्या ७४ हजार ८६० कोरोनाबाधित आहेत. यापैकी ३२ हजार ३२९ जणांनी करोनावर मात कली आहेत. तर २५८७ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.

महाराष्ट्रापाठोपाठ तामिळनाडू, गुजरात, दिल्ली, राज्यस्थान आणि मध्य प्रदेशमध्येही कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. दरम्यान, शहरातून स्थलांतर केलेल्यांमुळे आता कोरोनानं ग्रामीण भागांतही शिरकाव केल्याचं पाहायला मिळत आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

राहुल गांधी त्या परिसरातील, त्यांनी काहीच कारवाई का केली नाही? हत्तीणीच्या हत्या प्रकरणावर मनेका गांधींचा सवाल 

वृत्तसंस्था । केरळच्या मलप्पुरम भागात एका गर्भवती हत्तीणीला अननसमध्ये फटाके भरून ते खायला दिल्याची घटना घडली आहे. ही हत्तिणी या अननस मुले मृत्युमुखी पडली. यानंतर या घटनेचा निषेध सर्व स्तरातून व्यक्त केला जात आहे. सोशल मीडियावर अनेकांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले आहे. अनेकांनी असे कृत्य करणारे किती क्रूर आहेत अशाप्रकारच्या पोस्ट केल्या आहेत. प्राणी हक्कांसाठी लढणाऱ्या कर्यकर्त्या म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या मनेका गांधी याही या प्रकरणावर बोलल्या आहेत. त्यांनी याचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे. आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष या भागातलेच आहेत, त्यांनी या प्रकरणावर कोणतीच कारवाई का केली नाही असा प्रश्न केला आहे. 

त्या म्हणाल्या,” आम्ही अनेक जिल्ह्यांमध्ये कारवाई करत असतो मग या जिल्ह्यात का कारवाई केली जात नाही. तुमच्या तोंडात कुणी तुमच्या पोटात बाळ असताना असा दारुगोळा घातल्याची कल्पना तुम्ही करू शकता का? तेथील वन्यजीवांच्या संरक्षणासाठी त्या वन्य सचिवाला काढून टाकले पाहिजे. तेथील मंत्र्यांना जर काही वाटत असेल तर त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. राहुल गांधी तिथले आहेत, मंत्री तिथले आहेत त्यांनी कोणतीच कारवाई का केली नाही?” असे संतप्तरित्या त्या म्हणाल्या आहेत. यावेळी त्यांनी हा खून आहे आणि मलप्पुरम मध्ये नेहमी अशा घटना होत राहतात असा आरोप केला आहे. ३००-४०० पक्षी एकाच वेळेत मरावेत म्हणून त्यांनी रस्त्यावर विष टाकले होते. हा सर्वात हिंसक जिल्हा असल्याचे त्या म्हणाल्या आहेत. 

त्यांनी या घटनेवर संतप्त प्रतिक्रिया देत असताना केरळ सरकार घाबरले असल्याची टीका केली आहे. केरळ सरकार कोणतीच कारवाई करत नाही आहे, ते घाबरले आहेत असे वाटते आहे. दर तीन दिवसानी तिथे एक हत्ती मारला जातो असा आरोप त्यांनी केला आहे. याबरोबर त्यांनी आपल्याकडे २० हजारांपेक्षाही कमी हत्ती उरले असून तेही झपाट्याने कमी होत असल्याचे सांगितले. आहे. दरम्यान फटाक्यांनी भरलेला अननस खाल्ल्यानंतर मनुष्यवस्तीला कोणतीही इजा न करता ही हत्तिणी पाण्याच्या शोधात वेल्ल्यार नदीमध्ये गेली होती. तिथेच ती मृत झाली होती. 

 

वंचित च्या माजी आमदारांनी केला राष्ट्रवादीत प्रवेश 

मुंबई । अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार हरिदास भदे आणि बाळापूरचे माजी आमदार बळीराम सिरस्कार यांनी आज वंचित बहुजन आघाडीमधून राजीनामा देत आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश घेतला आहे. राहुल डोंगरे यांच्या पुढाकाराने मुंबईतील सिल्व्हर ओक या बंगल्यावर हा रीतसर पक्ष प्रवेश झाला आहे. मुंबईत आज निसर्ग चक्रीवादळ घोंगावत असतानाच हे राजकीय वादळ ही रूप धारण करत होते. त्यांच्या या प्रवेशाने अकोला जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

भारिप-बमस आणि वंचित बहुजन आघाडीला विधानसभा आणि जिल्हा परिषदेत मोठा धक्का बसणार हे पूर्वनिश्चित होते. या दोघांनी राजीनामा दिल्यानंतर ते राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये जाणार हे निश्चित होते. पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश लांबला होता. याचा फायदा घेत वंचित बहुजन आघाडीने यांचा परेश रोखण्यासाठी प्रयत्न केले होते. अडचणी निर्माण करू पहिल्या मात्र त्यांना फारसे यश आले नाही शेवटी आज राहुल डोंगरे यांच्या पुढाकाराने या दोन नेत्यांनी राष्ट्रवादीत पुढाकार घेतला

 

हरिदास भदे हे अकोला पूर्व मतदार संघातून दोनदा आमदार झाले होते. तसेच बळीराम सिरस्कार बाळापूर मतदार संघाचे आमदार होते. यांच्या प्रवेशाबद्दल खूप शंका होत्या मात्र आज या सर्व शंका मिटल्या आहेत. पक्ष प्रवेशाची माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी दिली आहे. या प्रवेशाच्यावेळी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, खासदार सुनील तटकरे आणि राहुल डोंगरे उस्थित होते. राष्ट्रवादीत प्रवेश घेण्याचे अडीच महिन्यापूर्वीच निश्चित केले होते असे हरिदास भदे यांनी सांगितले तर वंचित मधील वाद या प्रवेशासाठी कारणीभूत ठरले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

यंदाचा शिवराज्याभिषेक सोहळा कसा असेल? पहा काय म्हणतायत छत्रपती संभाजीराजे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात गेल्या अडीच महिन्यांपासून कोरोनामुळे संचारबंदी सुरु आहे. आता संचारबंदीचे नियम शिथिल करण्यात आली असली तरी संचारबंदी पूर्णतः उठविण्यात आलेली नाही. दोन दिवसांनी शिवराज्याभिषेक आहे. २००७ पासून रायगडावर शिराज्याभिषेक हा लोकोत्सव म्हणून साजरा केला जात आहे. मात्र यंदा दरवर्षी लाखोंच्या उपस्थितीत साजरा होणारा हा उत्सव यावर्षी कशा पद्धतीने साजरा होणार असा प्रश्न शिवभक्तांना पडला आहे. छत्रपती संभाजीराजे यांनी याचे उत्तर फेसबुकच्या माध्यमातून दिले आहे. बालाजी गाडे यांनी त्यांच्या फेसबुक लाईव्ह च्या मुलाखतीतून संभाजीराजे यांना यावर्षी शिवराज्याभिषेक कसा होणार हा प्रश्न विचारला होता. त्यांनी यावर्षी शिवराज्याभिषेक कसा साजरा होईल याची माहिती दिली आहे.

यावर्षीचा राज्याभिषेक हा दरवर्षी प्रमाणे गाजावाजात केला जाणार नसला तरी मोजक्या शिवभक्तांच्या उपस्थितीत विधिवत रित्या तो रायगडावर केला जाणार आहे. आणि याचे प्रक्षेपण सोशल मीडियाच्या माध्यमातून दाखविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे संभाजीराजेंनी सांगितले. यावर्षी सर्व शिवभक्तांनी आपल्या घरावर भगवे झेंडे रोवून राज्याभिषेक साजरा करावा असे आवाहन त्यांनी याआधी केले होते. मात्र ते स्वतः काही मोजक्या शिवभक्तांसह तिथे जाऊन साध्या पद्धतीनेच मात्र विधिवत राज्याभिषेक करणार आहेत असे त्यांनी सांगितले. कोरोनासोबत आता चक्रीवादळामुळे देखील रायगडाच्या आसपासच्या सर्व व्यवस्था विस्कळीत झाल्या असल्याने या सोहळ्याचे थेट फेसबुक प्रेक्षेपण करता येईल की नाही याबद्दल शंका आहे मात्र तरीही आम्ही प्रयत्न करू असे ते म्हणाले.

https://www.facebook.com/balajigadepatil/videos/677547573030193/

माध्यमातील लोक गडावर येतील की नाही याचीही सध्या शंका आहे. ते आले तर ठीक नाही आले तरी त्यांच्यापर्यंत मेल, फोटो, व्हिडीओ यांच्या माध्यमातून शिवराज्याभिषेकाची माहिती पोहोचवू असे त्यांनी सांगितले. अखिल भारतीय शिवराज्याभिषेक समिती लोकांपर्यंत हा सोहळा पोहोचवण्याचे काम नक्की करेल असे त्यांनी सांगितले. या मुलाखतीत शिवाजी महाराजांनी ज्या पद्धतीने विविध रणनीतींनी स्वराज्य स्थापन केले आहे. आणि अशाच पद्धतीने आपण या परिस्थितीशी लढायचे आहे तसेच सकारात्मक राहून आपल्याकडे असणारे ज्ञान लोकहितासाठी वापरावे असे ते म्हणाले. सर्व शिवभक्तांनी केवळ जयजयकार करून चालणार नाही तर त्यांनी त्यांचे विचार आचरणात आणले पाहिजेत असंही ते म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

रणवीरने ‘या’ अभिनेत्रीसोबत २३ वेळा किसींग सीन दिला; दीपिका पदुकोण म्हणाली..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । २०१६ साली आलेला रोमँटिक कॉमेडी चित्रपट हा चांगलाच चर्चेत आला होता. दिगदर्शक आदित्य चोप्रा यांनी नेहमीच्या चित्रपटांपेक्षा वेगळ्या चौकटीतून हा सिनेमा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांची चर्चा सर्वत्र झाली होती. हा सिनेमा रणवीर सिंग आणि वाणी कपूर यांच्या केमिस्ट्रीमुळे लोकांना आवडला होता. तसेच चित्रपटात वाणी आणि रणवीर चे बरेच किसिंग सीन दाखविण्यात आले होते. या किसिंग सीनची चर्चा पुन्हा एकदा झाली आहे. ते दीपिका पदुकोणच्या एका विधानामुळे तिने या चित्रपटात एकूण २३ किसिंग सीन होते असे म्हंटले आहे. पण ती स्क्रिप्टची गरज होती आणि तशी गरज असेल तर करावेच लागते असे तिने म्हंटले आहे.

बेफिक्रे हा बोल्ड सिनेमा म्हणून त्याच्याकडे पहिले जाते. या चित्रपटाच्या माध्यमातून आदित्य चोप्रा यांनी चौकटीबाहेरच्या कथानकाला हात घातल्याची चर्चा झाली होती. व त्यांनी एक नवीन प्रयोग केल्याबद्दल कौतुकही झाले होते. या सिनेमातील चुंबनदृश्य पाहून दीपिकाने दिलेली ही प्रतिक्रिया ऐकून अनेकांना धक्का बसला आहे. रणवीर आणि दीपिका हे एकाच क्षेत्रात काम करीत आहेत. त्यामुळे या क्षेत्रात त्यांनी एकमेकांना सूट दिली आहे. म्हणूनच या दृश्यांवर दीपिकाने आक्षेप घेतलेला नाही.

दीपिका आणि रणवीर हे पती पत्नी एकमेकांचे चांगले मित्र आहेत. सोशल मीडियावरही दोघांमधील मैत्रीच्या पोस्ट पाहायला मिळतात. तसेच अनेक पुरस्कार सोहळ्यातही रणवीर व दीपिका यांचे प्रेम दिसून आले आहे. हे किसिंग सीन कामाचा भाग असतात. त्यामुळे रणवीर चित्रपटांमध्ये किसिंग सीन देतो आणि माझा त्यावर काहीच आक्षेप नाही असेही तिने सांगितले आहे. लवकरच ही जोडी कपिल देव यांच्या जीवनावरील सिनेमा ‘८३’ मध्ये झळकणार आहे. याअगोदर दोघांनी गोलियो कि रासलीला, बाजीराव मस्तानी या सिनेमामध्ये एकत्र काम केले होते. प्रत्यक्ष आयुष्यात यांची जशी केमिस्ट्री आहे तितकीच ती पडद्यावरही नेहमीच दिसून येते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

पुण्यात पुढचे २४ तास काळजीचे; वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा

पुणे । गेले दोन दिवस चर्चेत असणारे ‘निसर्ग’ हे चक्रीवादळ आज महाराष्ट्रात येऊन धडकले आहे. अरबी समुद्रातून आलेले हे चक्रीवादळ आज दुपारी महाराष्ट्रातील अलिबाग पासून ५० किमी असणाऱ्या किनारपट्टीवर धडकले. शहर आणि परिसरात गेल्या २४ तासात संथ सारी कोसळत आहेत. दुपारी जोराच्या वाऱ्यासह पाऊस पडला होता. पुढच्या २४ तासात वादळी वाऱ्यासह संततधार कोसळण्याची शक्यता असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. जेव्हा चक्रीवादळ महाराष्ट्रात धडकले तेव्हा त्याचा ताशी वेग ११० ते १२० किमी होता. त्याचे परिणाम आजूबाजूच्या परिसरातील हवामानावर जाणवले. शिवाजीनगर, लोहगाव आणि पाषाण परिसरात अनुक्रमे ४४.१, ९७.३, ५१.२ मिमी पाऊस पडला आहे.

हे वादळ आता महाराष्ट्राच्या उत्तर भागाकडे सरकत आहे. त्यामुळे पुण्यातील घाट परिसरात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. सध्या वादळाचा वेग थोडा कमी झाला असला तरी धोका टळलेला नाही म्हणून प्रशासनाने नागरिकांना घरीच राहण्याचे आवाहन केले आहे. या वादळी वाऱ्याचा परिणाम म्हणून  जोराचे वारे वाहण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले आहे.

चक्रीवादळ पुढे सरकले आहे. त्याचे परिणाम म्हणून महाराष्ट्रातील विविध भागात पाऊस कोसळत आहे. जोरदार वारे वाहते आहे. कोकणात काही ठिकाणी समुद्राचे पाणी नागरी वस्तीत पोहोचले आहे. आणखी सहा तास हे वादळ असणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांनी कामाव्यतिक्त घराबाहेर पडू नये असे आवाहन करण्यात आले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.