Tuesday, December 30, 2025
Home Blog Page 5707

कोरोनाबाबत जनजागृती करणारी अक्षय कुमारची ‘ही’ जाहिरात पाहिलीत का?

मुंबई । बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने लॉकडाउनमध्ये विशेष परवानगी घेऊन जाहिरातीचे चित्रीकरण केल्यामुळे चर्चेत होता. ही जाहीरात केंद्र सरकारच्या कोरोना विषयी जागरुकता मोहिम राबवण्यासाठी शूट करण्यात आली होती. आता ही जाहिरात प्रदर्शित करण्यात आली आहे. या जाहिरातचे दिग्दर्शन अक्षय कुमारच्या ‘पॅड मॅन’ या चित्रपटाचे दिग्दर्शक आर. बाल्की यांनी केली आहे.

या जाहिरातीत अक्षय कुमार तुम्हाला कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून कोणती काळजी घ्यावी याची माहिती देताना दिसत आहे. पीआयबी इंडियाच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर ही जाहिरात प्रदर्शित करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी या जाहिरातीचे चित्रीकरण सुरु असतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. तसेच लॉकडाउनमध्ये चित्रीकरण केल्याने अक्षयला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले होते. मात्र, ज्या जाहिरातीच्या चित्रीकरणात अक्षयने ती कोरोना विषयी जागरुकता मोहिम राबवण्यासाठी तयारी गेली असल्याचं ती प्रदर्शित झाल्यानंतर समजते आहे. चला तर पाहुयात अक्षयची ही जाहिरात…

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

पुणेकरांनो लाॅकडाउनमध्ये घरमालकांवर गुन्हे दाखल करताय? हे वाचा

पुणे । कोरोना संसर्गामुळे देशव्यापी संचारबंदी जाहीर करण्यात आली होती. त्यामुळे देशातील अनेक उद्योग व्यवसाय बंद होते. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने भाडेतत्वावर राहणाऱ्या लोकांना सूट दिली होती. मात्र आता घरमालकांनी थकीत भाड्यासाठी मागणी सुरु केली आहे. यावरून मालक व भाडेकरू यांच्यामध्ये वाद होत आहेत. घरमालक आणि भाडेकरू यांच्यातील हे वाद सामंजस्याने सोडविण्याची गरज असल्याचे असोसिएशन ऑफ रिअल इस्टेट एजंट्स या संघटेनद्वारे सांगण्यात आले आहे. तसे निवेदन त्यांनी दिले आहे. त्यांनी या निवेदनात घरमालकानावर गुन्हे दाखल करण्यापूर्वी त्यांच्या समस्या समजून घ्या अशी विनंती केली आहे.

नोकरी, व्यसायाबरोबरच उत्पन्नाचा दुसरा स्रोत म्हणून बरेच जण घर भाड्याने देतात. पुण्यात शिक्षण, नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने  अनेकजण वास्तव्यास येत असतात. त्यामुळे अनेक ज्येष्ठ नागरिक या घरभाड्यामधून आपला खर्च भागवितात. महानगरपालिकेचा कर, वीज बिल, घर दुरुस्ती हे सर्व खर्च ते भाड्यातून करत असतात. महापालिकेने करभरणा करण्यासाठी माफ केला नाही. म्हणूनच घरमालकांनी भाडेकरुंकडे थकीत भाड्याची मागणी सुरु केली असल्याचे या निवेदनात सांगण्यात आले आहे. तसेच गृहनिर्माण विभागाने या काळात तीन महिन्याचे टप्प्याटप्प्याने भाडे देण्यास सांगितले याचा अर्थ  भाडे देऊच नये असा नाही. त्यामुळे घरमालकावर गुन्हा दाखल करणे योग्य ठरत नाही असे या निवेदनात म्हंटले असल्याची माहिती या असोसिएशनचे अध्यक्ष सचिन शिंगवी यांनी दिली.

जर पोलिसांनी घरमालकांविरोधात गुन्हा दाखल केला तर लोक याचा गैरफायदा घेतील काहीजण भाडे देणारच नाहीत. गुन्हा दाखल केल्यामुळे घरमालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे असे त्यांनी सांगितले. शहरातील अनेक ज्येष्ठ नागरिक जे सेवानिवृत्त झाले आहेत ते या भाड्याचा वापर सेवानिवृत्ती वेतन म्हणून करतात. तर अनेकांनी कर्ज काढून घरे घेतली आहेत. मिळणाऱ्या भाड्यातून ते कर्जाचा हप्ता भरतात या बाजूचाही विचार करावा अशी विनंती त्यांनी केली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

करवंदं विकणाऱ्या तिच्या कमनीय देहाची मनस्वी गोष्ट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मे महिन्यातील कडक दूपार होती ती. आमची रेल्वेगाडी कसारा स्टेशनला थांबलेली होती. “डोंगराची काळी मैना…डोंगराची काळी मैना” असं मोठमोठ्याने ओरडत…हातात कसल्याशा टोपल्या घेऊन, काही महीला गाडीच्या प्रत्तेक बोगीच्या खिडकीमधे डोकावून कोणी त्यांची करवंद घेतंय काय ते पाहत होत्या. रेल्वेगाडी स्टेशनावरती येताच लगबगीने हलकेपणाने या बोगीतून त्या बोगीच्या खिडक्यांकडे धावणार्या त्यांच्या चेहर्यावरती थोडा थकवा जाणवत होता. आतमधे गेलेले त्यांचे डोळे त्यांनी डोंगर-दर्या पायी पालत्या घालून ती करवंद गोळा केली आहेत याचे द्योतक होते.

या गर्दीपासून दूरवर एका खांबाला टेकून करवंद विकणारी त्यांच्यातलीच एक महिला शांतपणे उभी राहीलेली होती. हातात करवंदाने गच्च भरलेली पाटी घेतलेल्या तीची नजर एखाद्या फुलपाखरासारखी भिरभिरत होती. कोणीतरी आपल्याला हाक मारेल अन् आपली करवंद घेईल असं तिला वाटत होतं. एका खिडकीमधून दुसर्‍या खिडकिमधे ती नजरेनेच दूरवरुनंच डोकावत होती. पळसाच्या हिरवेगार हँडमेड द्रोणात काळेभोर करवंद शोभून दिसत होते.

तेवढ्यात कुणीतरी जोरात ‘ओ बाई’ अशी आरोळी दिली..ती लगबगीने आवाज आलेल्या खिडकीजवळ गेली. कोणीतरि आपली करवंद घेतंय या विचारानं ती नकळत थोडीशी हारकली होती. चेहर्यावरच्या त्या आनंदी छटेसह ती त्या बोगीच्या खिडकीजवळ आली. 10 रुपयेला एक द्रोण याप्रमाणे तीने 7 द्रोण करवंद विकली. सत्तर रुपयेची कमाई झाल्याने आता तिच्या गालावर एक छान पुसटशी कळी पडलेली होती. त्वचेवर अमावस्या पांघरून ती निर्भीड रात्रीसारखी स्वच्छ होती. चेहर्‍यावर चांदण्या गोंदलेल्या होत्या. गाडी फ्लेटफोर्मवर येताच पळता यावं म्हणुन तिने तिची साडी गुडघ्यापर्यंत खोचलेली होती. पदर कसाबसा खांद्यावर टाकलेला होता.

डोंगर-दर्यांतून करवंद गोळा करत असताना करवंदिच्या त्या काट्यांनी जागोजागी फाटलेला पदर ओबडधोबड तीचे उर झाकत होता. आता गाडी सुटायची वेळ झाली होती. आणखीन कोणी करवंद घेतंय का ते पहाण्यासाठी बोगीच्या आजुबाजुच्या खिडक्यावरुन ती पुन्हा एकदा नजर फिरवत होती. तेवढ्यात माझ्या कंपार्टमंट मधे बसलेल्या अन् मगापासून तिच्याकडे वेगळ्याच नजरेने पहाणार्या कोणीतरी तीच्या कंबरेकरता अश्लील शब्द वापरला. तिच्या शरिरावरती अश्लिल टीपन्नी केली.

ती मात्र यापासून अलिप्तपणे करवंद विकत होती. रात्री चटणी कोरडी न खाता छटाकभर तेल तरी आणता येईल या आशेने ती उभी होती. डोळ्यावर धूकं पांघरलेल्या पांढरपेशा समाजाला तिचा कमनीय बांधा दिसला पण अंगावरचे जागोजागी असलेले काट्यांचे ओरखडे नाही दिसले.

तेवढ्यात ट्रेनची व्हिसल वाजली आणि मी माझ्या विचारांच्या तंद्री मधुन बाहेर आले. मंदपणे वेग वाढत निघालेल्या गाडीच्या लोखंडी गज असलेल्या त्या खिडकीमधुन मी तिला पाहण्याकरता बाहेर डोकावले. स्टेशन पुन्हा अगोदरसारखे सामसूम झाले होते. हातातले ७० रुपये पदरामधे खोचत ती दुरवर तशीच उभी होती. जणु ते अश्लिल शब्द तिला एकुच गेले नव्हते…जणु तसल्या अश्लिल टिपन्न्या रोजच्याच होत्या तिच्यासाठी. इतक्या वर्षांमधे फ्लेटफोर्मवर करवंद विकताना तिने अशा किती किळसवाण्या नजरांना तोंड दिलंय कोणास ठावूक. तिला आता त्या नजरांचं अन् त्या अश्लिल टिपण्यांच काहिंच वाटेनासं झालंय भोइतेक असो. ७० रु कमरेला खोचल्यावर मात्र मगाशी दमल्यासारखा दिसणारा तिचा चेहरा जरा तजेलदार वाटायला लागला होते एवढं नक्की.

द इनव्हिजिबल इंडियन फेसबुक पेजवरुन साभार

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

निसर्ग चक्रीवादळामुळे आतापर्यंत ५ जण जखमी, कोणतीही जीवितहानी नाही- उदय सामंत

मुंबई । निसर्ग चक्रीवादळामुळे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याना तडाखा बसला आहे. या दोन्ही जिल्ह्यात अनेक ठिकाणी झाडे पडण्याचे तसेच विजेच्या तारा तुटण्याचे प्रकार घडले. यात 4 जण जखमी झाले आहेत. मात्र जिवितहानी नाही. तसेच वादळामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू झाले असून नुकसानाबाबत 2 दिवसांत भरपाई रक्कम शासकीय नियमांप्रमाणे दिली जाईल, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. हे चक्रीवादळ रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातून पुढे सरकले असून पाऊस थांबताच नुकसानीचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे.

दरम्यान, रत्नागिरीत डिझेल वाहतूक करणारी एक बोट भगवती बंदरात होती. वाऱ्याच्या वेगाने जहाजाचा अँकर तुटल्याने ती भरकटत पांढऱ्या समुद्रापर्यंत आली. ही नाव किनाऱ्याला आणली असून यावरील १३ खलाशांना सुखरूपपणे वाचविण्यात यश आले आहे. हे खलाशी डिझेल पुरवठा करून परतण्यासाठी निघाले, परंतु वादळाच्या सुचनेमुळे थांबले होते. या प्रवाशांमध्ये 10 भारतीय असून 3 परदेशी आहेत. यामुळे या सर्वांना क्वॉरंटाईन करून त्यांचे स्वँब घेतले जातील, त्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येईल असेही सामंत यांनी सांगितले.

हे जहाज खडकावर आदळून त्याला छिद्र पडल्याने वापरून झालेले इंजिन ऑइल सांडले, परंतु धोका नाही. बोट महिनाभर येथेच राहील, असंही ते म्हणाले. तसेच पुढे बोलताना मंडणगड आणि दापोली तालुक्यात मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची माहिती तेथील विभागीय अधिकाऱ्यांनी दिली असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

मुंबईवरील ‘निसर्गा’चं संकट टळलं; रेड अलर्ट अजूनही कायम

मुंबई । मुंबईच्या उंबरठ्यावर असलेल्या निसर्ग वादळानं अचानक दिशा बदलल्यानं मुंबईवरील धोका आता टळला आहे. असं असलं तरी पुढील काही तास मुंबईसाठी महत्त्वाचे ठरणार आहेत. निसर्ग वादळाने आता महाराष्ट्राची किनारपट्टी ओलांडली असून हे वादळ आता थोडे ईशान्येकडे सरकू लागले आहे. दुपारी १२.३३ ते २.३० च्या दरम्यान अलिबागला धडकलेल्या या वादळानं रौद्र रूप धारण केलं होतं.

यावेळी अलिबागला १०० ते ११० किमी प्रति तास या वेगानं वारे वाहू लागले होते. काही वेळा तर वाऱ्याचा वेग १२० किमी प्रति तास अशा भीतीदायक पातळीवर पोहोचला होता. दुपारी अडीच वाजता हे वादळ मुंबईपासून ७५ किमी अंतरावर तर तर पुण्याच्या पश्चिमेला ६५ किमी अंतरावर होतं. भारतीय हवामान खात्याकडून ही माहिती देण्यात आली आहे.

अलिबागनंतर हे वादळ मुंबई आणि ठाण्याच्या दिशेनं सरकत होते पण वादळाने दिशा बदलल्यानंतर ते आता धुळे किंवा नाशिकला धडकण्याची शक्यता आहे. निसर्ग चक्रीवादळाचा फटका मुंबई व पुण्यालाही बसला. मुंबईत सकाळपासूनचं सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळत होता. वादळी वाऱ्यामुळं मुंबईतील अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली होती.

कोकणच्या समुद्र किनाऱ्यावरून घोंगावत आलेले वादळानं रत्नागिरी, रायगडमध्ये बरेच नुकसान केलं आहे. वादळानं दिशा बदलल्यानं वाऱ्याचा जोरही वाढला आहे. मुंबई- पुण्यात अनेक ठिकाणी मोठे वृक्ष उन्मळून पडले आहेत. तर काही भागांत वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. तर, सोसाट्याच्या वाऱ्यामुळं मुंबई विमानतळावर आज उतरलेले फेडेक्स कंपनीचे मालवाहू विमान धावपट्टीवरून घसरले. निसर्ग वादळामुळं निर्माण झालेली परिस्थिती पाहून मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ बंद करण्यात आलं होतं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

जवळपास अडीच महिन्यांनी टीव्ही कोरोना मुक्त झाला – संजय राऊत 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।  गेले अनेक दिवस देशात कोरोनाने थैमान घातले आहे. दररोज रुग्णांच्या वाढणाऱ्या संख्या, कोरोनामुळे होणारे मृत्यू, कोरोना उपचार, कोरोनासंबंधी राजकीय लोकांचे आरोप-प्रत्यारोप, कोरोना बचावासाठीचे उपाय, दक्षता असे अनेक विषय माध्यमांमधून झळकत आहेत. टीव्ही लावला असता टीव्ही वर सतत कोरोनाचे अपडेट्स दिले जात आहेत. आज मात्र या बातम्यांची जागा ‘निसर्ग’ चक्रीवादळाने घेतली आहे. सकाळपासून टीव्हीवर या चक्रीवादळाची चर्चा सुरु आहे. यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी मजेशीर ट्विट केले आहे. त्यांनी “जवळपास अडीच महिन्यांनी टीव्ही कोरोना मुक्त झाला” असे म्हंटले आहे.

दिवसभर टीव्हीवर निसर्ग चक्रीवादळाच्या बातम्या दिल्या जात आहेत. हे वादळ आता भूपृष्ठावर येऊन धडकले आहे. आणि ते उत्तर महाराष्ट्राकडे सरकले आहे.  या वादळाशी संबंधित बातम्या वृत्तवाहिन्यांवर दाखविल्या जात आहेत. तसेच राज्यात नागरिकांना सतर्क राहण्यासही आवाहन केले जात आहे. त्यामुळे आज कोरोनाच्या बातम्या नागरिकांच्या फारशा कानावर आल्या नाहीत. संजय राऊत यांनी “अडीच महिन्यांनी टीव्ही कोरोनमुक्त झाला आहे आणि त्याला चक्रीवादळाचा फटका बसला आहे.” असे ट्विट केले आहे.

दरम्यान हे वादळ काही तासच राहणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. मात्र अदयाप धोका टळला नसल्याने सतर्क राहण्याचा इशारा नागरिकांना देण्यात आला आहे. संजय राऊत याच्या ट्विटवर अनेकांनी विडंबनात्मक प्रतिक्रिया दिल्या असून या चक्रीवादळाच्या माध्यमातून मुंबईला उडवून गुजरातला न्यायचा डाव फसला असल्याची प्रतिक्रिया एकाने दिली आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांचे हे ट्विट चांगलेच चर्चेत आले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

गर्भवती हत्तीणीच्या हत्येबद्दल अक्षय कुमारचा संताप, म्हणाला..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केरळमध्ये गर्भवती हत्तीच्या हत्येमुळे लोकं दुखी झाले आहेत. सोशल मीडियावर अनेक लोकांनी आपला संताप व्यक्त केला आणि हत्तीणीला ओलसर डोळ्यांनी श्रद्धांजली वाहिली. बॉलिवूडमधील अनेक स्टार्सनीही याबाबत सोशल मीडियावर आपले दुःख आणि संताप व्यक्त केला आहे. अभिनेता अक्षय कुमारनेहि सोशल मीडियावर यातील दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

फेसबुकवर पोस्ट करत अक्षय कुमारने लिहिले- “कदाचित प्राणी माणसांपेक्षा कमी जंगली असतात आणि मानवाकडे माणुसकी कमी असते.त्या हत्तीबाबत जे झाले ते अतिशय हृदयविदारक, अमानुष आणि न स्वीकारले जाणारे आहे. यातील दोषींवर कडक कारवाई केली जावी. #AllLivesMatter ”

केरळमध्ये गर्भवती असणारी एक वन्य हत्तीण अन्नाच्या शोधात रस्त्यावर आली. तेव्हा तेथील स्थानिकांनी तिला फटाक्यांनी भरलेली अननस दिली. ते खाताच तिच्या तोंडात इतका शक्तिशाली फटाक्यांचा स्फोट झाला की तिची जीभ आणि तोंड गंभीररित्या जखमी झाले. या हत्तीणीने वेदना आणि भुकेने सर्व गाव फिरली मात्र दुखापतीमुळे ती काही खाऊ शकली नाही.

यानंतर, वेदनांनी अस्वस्थ होऊन ती हत्तीण नदीत गेली. त्याचे काही फोटो समोर आले आहेत. असह्य वेदनांपासून स्वत: ला वाचवण्याचा प्रयत्न करीत ती नदीतच उभी राहिली. वनाधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार तिने माश्या आणि इतर कीटकांपासून वाचण्यासाठी असे केले असावे.

तिला नदीतून बाहेर काढून उपचार करण्याचा विचार वनाधिकाऱ्यांनी केला. सुरेंद्रन आणि नीलकंठण या दोन हत्तींच्या मदतीने तिला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला गेला पण ती बाहेर आलीच नाही. अखेर २७ मे रोजी संध्याकाळी ४ वाजता पाण्यातच उभी राहून तिचा मृत्यू झाला. त्यानंतर वनाधिकाऱ्यांनी तिच्यावर अंत्यसंस्कार केले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

धक्कादायक! व्हिडीओ शूट करत अभिनेत्रीची आत्महत्या 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मनोरंजन क्षेत्रात नेहमी काहीतरी धक्कादायक घटना समोर येत असतात. आजपर्यँत या क्षेत्रात अनेक अभिनेत्रींनी आत्महत्या केल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. मात्र दाक्षिणात्य अभिनेत्री चंदना हिने व्हिडीओ शूट करत आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. कन्नड अभिनेत्री चंदना हिने आत्महत्या करण्यापूर्वी एक व्हिडीओ शूट केला आहे. जयंत तिने आत्महत्या करण्याचे कारण सांगितले आहे. तिने तिच्या प्रियकरावर गंभीर आरोप केले आहेत. त्याने तिची फसवणूक केली आहे असे तिने या व्हिडिओत सांगितले आहे.

चंदनाने व्हिडिओमध्ये केलेल्या आरोपानुसार तिच्या प्रियकरावर एफआयआर दाखल करण्यात आली आहे. एका वृत्तपत्राच्या माहितीनुसार २९ वर्षीय चंदनाने आत्महत्या करण्यापूर्वी जो व्हिडीओ केला आहे त्यामध्ये तिचा प्रियकर दिनेश याच्यावर तिची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. त्याने तिचे शारीरिक, मानसिक शोषण केल्याचे आरोप तिने केले आहेत. तिने २८ मे रोजी हा व्हिडीओ शूट करून आत्महत्या केली होती. जो १ जून रोजी समोर आला आहे.

दरम्यान तिने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे समजल्यावर लगेच तिचा प्रियकर तिला रुग्णालयात घेऊन गेला पण तिथे पोहोचताच तिचा मृत्यू झाला. दिनेश आणि चंदना गेल्या पाच वर्षांपासून नात्यात होते. या दोघांच्या नात्याबद्दल घरच्यांना माहिती होती मात्र लग्नाच्या बोलणीसाठी गेले असता दिनेशच्या घरच्यांनी चंदनाच्या घरच्यांना वाईट वागणूक देत लग्नाला नकार दिला. म्हणूनच चंदनाने आत्महत्या केली. या सर्व घटनांमुळे पोलिसांच्या भीतीने दिनेशने रुग्णालयातून पळ काढला. त्याच्यावर तसेच त्याच्या कुटुंबियांवर एफआयआर दाखल करण्यात आली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

अप्पा.. मला बळ द्या!’ धनंजय मुंडेंची ‘ती’ भावनिक पोस्ट

बीड । माजी केंद्रीय मंत्री दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांची आज पुण्यतिथी. यानिमित्तानं राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी त्यांचे काका गोपीनाथ मुंडे यांच्या गोपीनाथ गड येथील स्मृतिस्थळी जाऊन त्यांना अभिवादन केले. धनंजय मुंडे यांनी पुण्यतिथीच्या निमित्ताने गोपीनाथ मुंडे हे आपल्या गुरुस्थानी आहेत असे म्हणत एक संग्रहित व्हिडीओ ट्विटरवर शेअर करून एक भावनिक पोस्ट केली आहे.

”अप्पा, आज तुमचा स्मृतिदिन. तुम्ही कायम माझ्या गुरुस्थानी आहात…तुमच्या आयुष्याचा अविभाज्य घटक असलेल्या ऊसतोड मजुर, कष्टकरी, वंचित-उपेक्षित, दीन दुबळ्यांची सेवा करण्याची संधी मला मिळाली. त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी, त्यांचा विकास साधण्यासाठी मला बळ द्या!” अशी भावनिक साद धनंजय मुंडे यांनी आपल्या पोस्टद्वारे घातली आहे.

येणाऱ्या काळात गोरगरीब-कष्टकरी, वंचित-उपेक्षित वर्गाच्या आयुष्यात थोडेफार जरी सकारात्मक बदल घडवणारे काम करता आले तर तीच गोपीनाथ मुंडे यांना खरी श्रद्धांजली असेल. तसेच आपल्या गुरूला अर्पण केलेली गुरुदक्षिणा असेल असेही धनंजय मुंडे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

गुजरातमधील किटकनाशक कंपनीत भीषण स्फोट; ५ जण मृत्युमुखी

गुजरात, भरूच । गुजरातच्या भरुच जिल्ह्यातील दहेज स्पेशल इकॉनॉमिक झोन (SEZ) मधल्या एका किटकनाशक बनवणाऱ्या कंपनीत एक मोठा स्फोट झाला. या स्फोटात पाच जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर जवळपास ३२ जण गंभीर जखमी झालेत. कंपनीत झालेल्या स्फोटामागचे कारण अजून समजू शकले नाही आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ‘यशस्वी रसायन प्रायव्हेट लिमिटेड’ या किटकनाशक बनवणाऱ्या कंपनीच्या स्टोअरेज भागात दुपारी १२ वाजल्याच्या आसपास आग लागली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवळपास १५ गाड्यांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवलं. या स्फोटतील जखमींना भरुचच्या वेगवेगळ्या रुग्णालयांत दाखल करण्यात आलं आहे. खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासनानं या भागातील लुवारा आणि लखिगाम गाव तसंच अदानी पोर्ट, पेट्रोनेट एलएनजी यांसारख्या कंपन्यांच्या कार्यालयांना रिकामं केलं आहे.

कंपनीत स्फोट होताच आग लागल्यानंतर संपूर्ण परिसर धुरानं भरून गेला होता. स्फोटाचा आवाज जवळपास २० किलोमीटर अंतरावरूनही स्पष्ट ऐकू आल्याचं स्थानिकांनी सांगितलं आहे. आवाज इतका जोरात होता की आजूबाजूच्या परिसरात इतर कंपन्यांच्या काचेच्या खिडक्याही फुटल्या आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”