Tuesday, December 30, 2025
Home Blog Page 5708

देशात कोरोनाग्रस्तांची संख्या २ लाखाच्या पुढे; मागील २४ तासात संख्येत सर्वाधिक ८९०९ने वाढ

नवी दिल्ली । देशात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांचा आकड्याने २ लाखांचा टप्पा गाठला असून मागील 24 तासात 8 हजार 909 कोरोनाचे नवे रुग्ण आढळले आहेत. कोरोनाबाधित रुग्णांची ही वाढ आतापर्यंतची 24 तासातली सर्वाधित वाढ आहे. तर गेल्या 24 तासात 217 जणांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार देशात आता कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 2 लाख 7 हजार 615 झाली आहे. त्यापैकी 5 हजार 815 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 1 लाख 303 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.

दिलासादायक बाब म्हणजे गेल्या 24 तासात 4 हजार 776 कोरोना रुग्ण बरे झाले आहेत. देशाचा रिकव्हरी रेट 48.31 टक्के आहे. सध्या देशात कोरोनाची लागण असलेले म्हणजेच एक्टिव्ह रुग्ण 1 लाख 1 हजार 497 आहेत. देशभरात सर्वाधिक कोरोना रुग्णसंख्या महाराष्ट्रात आहेत. राज्यात सध्या कोरोनाबाधितांचा आकडा 72300 झाला आहे. त्यातील 31333 बरे झाले आहेत. तर राज्यात आतापर्यंत 2465 जण मृत्यूमुखी पडले आहेत.

महाराष्ट्रात काल 1225 कोरोनाबाधित रुग्णांना यशस्वी उपचारांनंतर घरी सोडण्यात आलंय. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत राज्यभरात 31 हजार 333 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. रुग्ण बरे होऊन घरी जाण्याचं प्रमाण राज्यात वाढताना दिसतंय. दरम्यान, काल कोरोनाचे 2287 नवे रुग्ण दाखल झाले आहेत. त्यामुळे सध्या राज्यात 38 हजार 493 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत,अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली होती.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

अरे बापरे !!! हे काय, जुळ्या मुलांचे वडील वेगवेगळ्या व्यक्ती; जाणून घ्या नक्की काय आहे प्रकरण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । चीनमध्ये एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे, ज्यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. इथल्या एका माणसाला धक्का तेव्हा बसला जेव्हा त्याला कळले कि त्याच्या जुळ्या मुलांचा बाप तो एकटा नाही तर आणखीही दुसरा कोणीतरी आहे. या दोन मुलांच्या डीएनए अहवालात असे दिसून आले आहे की त्यांचे वडील हे वेगवेगळे आहेत. हा खुलासा झाल्यामुळे या व्यक्तीस हे देखील कळले की त्याची पत्नी आपली फसवणूक करीत आहे.

डेली मेलच्या वृत्तानुसार, दहा लाखातून असे एखादे प्रकरण समोर येऊ शकते जथे जुळ्या मुलांचे वडील हे वेगवेगळ्या व्यक्ती असतात. चिनी माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, हॉस्पिटलमध्ये जन्मलेल्या प्रत्येक मुलाची डीएनए चाचणी करणे हा त्यांच्या प्रक्रियेचा एक भाग आहे. डेंग याजुन नावाच्या या व्यक्तीला आपल्या पत्नीबद्दल आजिबात शंका नव्हती आणि ते दोघेही खूप आनंदी होते. डॉक्टरांच्या मते, कधीकधी महिन्याभरात स्त्रियांच्या शरीरात एका अंड्याऐवजी दोन अंडी देखील तयार होतात. या प्रकरणात दोन भिन्न पुरुषांच्या शुक्राणूंनी ती अंडी फलित केल्या.

बीजिंगच्या झोंगझेंग फॉरेन्सिक आयडेंटिफिकेशन सेंटरच्या मते, जवळपास दहा लाख जुळ्या मुलांचा जन्म झाल्यावर अशी एक घटना समोर येण्याची शक्यता असते. या प्रकरणात, त्या महिलेने अगदी थोड्या वेळेच्या फरकाने दोन्ही पुरुषांशी लैंगिक संबंध ठेवले असावेत, ज्यामुळे दोन्ही मुलांचे वडील स्वतंत्र पुरुष आहेत. डीएनएच्या अहवालातून हे स्पष्ट झाले आहे की या दोन्ही मुलांची आई एकच आहे परंतु वडील मात्र वेगळे आहेत. सध्या डेंग याजुन यांनी पत्नीविरोधात व्यभिचार केल्याची तक्रार पोलिसात दाखल केली आहे.

चीनमध्ये याआधीही असेच एक प्रकरण समोर आले होते ज्यामध्ये जुळ्या मुलांचे वडील या वेगळ्या व्यक्ती होत्या. त्यावेळी महिलेने सांगितले होते की,तिने एका रात्री वन नाईट स्टँड केले आणि नंतर घरी येऊन आपल्या पतीशीही संबंध ठेवले. २०१९ मध्ये चीनमधील झियामेन शहरात असा प्रकार उघडकीस आला होता.

खरं तर, अशा परिस्थितीत मुलाच्या कायदेशीर वडिलांचे नाव नोंदविण्यात बरीच अडचण येते, कारण डीएनएच्या अहवालानुसार दोन मुलांचे वडील वेगळे आहेत. या प्रकरणात, आपल्या दोन मुलांपैकी एकाच्या दिसण्यामुळे वडिलांना संशय आला आणि डीएनए चाचणी करण्यात आली. या प्रकरणात, त्या व्यक्तीने फक्त आपल्या मुलास ठेवले आणि ते दुसरे मूल वाढविण्यास नकार दिला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

‘उद्धव ठाकरेजी मी आहे तुमच्या सोबत’; अरविंद केजरीवालांचे ट्विट

मुंबई । दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्राती जनतेला पाठिंबा दर्शवला आहे. या संकटाच्या काळात आपण मुख्यमंत्री ठाकरे आणि महाराष्ट्रातील जनतेच्या सोबत आहोत असे केजरीवाल यांनी ट्विट करत म्हटले आहे. अरविंद केजरीवाल यांनी ट्वीटमध्ये म्हणाले, ‘प्रिय उद्धव ठाकरेजी, दिल्लीच्या जनतेच्या वतीने मी निसर्ग चक्रीवादळाचा धोका लक्षात घेता आपल्या आणि महाराष्ट्रातील जनतेसमवेत उभा आहे. आम्ही महाराष्ट्रातील जनतेसाठी प्रार्थना करीत आहोत.’

अरविंद केजरीवाल यांच्याबरोबरच क्रिकेटपटू सुरेश रैना यांनीही निसर्ग चक्रीवादळाविषयी ट्विट केले आहे. सर्वांनी आपापल्या घरातच राहावे आणि प्रशासनाने घेतलेल्या खबरदारीच्या उपायांचे आणि सूचनांचे पालन करावे, असे आवाहन रैनाने केले. दरम्यान, दुपारी १ वाजण्याच्या सुमारास निसर्ग चक्रीवादळाने मुंबईच्या किनारपट्टी भागात जोरदार धडक दिली. यावेळी मुंबईत जोरदार वारा, पाऊस सुरू झाला आहे. समुद्रात उंच लाटा वाढत आहेत. मुंबईच्या अनेक भागात झाडे कोसळली आहेत, त्यामुळे वीज गेली आहे. याशिवाय अनेक ठिकाणी घरांची छप्परे उडण्याच्याही घटना घडलेल्या आहेत.

कोकणच्या समुद्र किनाऱ्यावरून घोंगावत आलेले व रत्नागिरी, रायगडमध्ये बरेच नुकसान करणारे निसर्ग वादळ आता उत्तर महाराष्ट्राच्या दिशेनं सरकल्याची माहिती आहे. असं असलं तरी मुंबईचा धोका अद्याप कमी झालेला नाही. वादळानं दिशा बदलल्यानं मुंबईत वाऱ्या-पावसाचा जोर कमी झाला आहे. तर, नाशिकमध्ये पाऊस सुरू झाला आहे. हे वादळ पुढे कोणत्या दिशेनं मार्गक्रमण करणार, याकडं लक्ष लागलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

आम्ही ठाकरे सरकारच्या सोबत; अरविंद केजरीवाल यांचे ट्विट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र राज्यात आधीच कोरोनाने थैमान घातले आहे. त्यातच महाराष्ट्र गेल्या २ दिवसांपासून निसर्ग चक्रीवादळाच्या भीतीच्या छायेखाली आहे. आता हे वादळ महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीवर धडकून उत्तरेकडे सरकत आहे. महाराष्ट्रात या चक्रीवादळामुळे नुकसान होते आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या काळात आम्ही तुमच्या सोबत आहोत असे ट्विट केले आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना त्यांनी दिल्लीची जनता आणि आम्ही तुमच्या सोबत आहोत आणि महाराष्ट्राच्या लोकांच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना करीत आहोत असे ट्विट केले आहे.

महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीवर निसर्ग चक्रीवादळ धडकले आहे. मुंबईच्या मार्गावरून ते आता उत्तर महाराष्ट्राच्या दिशेने जाते आहे. या पातळीवर राज्य प्रशासनाने नागरिकांना दोन दिवस घरातून बाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. तसेच काय करावे आणि काय नाही याची यादीही जाहीर केली आहे. अद्याप ज्या ठिकाणी वादळाचा तडाखा बसण्याचा धोका आहे तेथील लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे कामही सुरु आहे. एनडीआरएफ च्या टीमदेखील तैनात आहेत. या कठीण समयी अरविंद केजरीवाल यांनी आम्ही तुमच्या सोबत आहोत असे ट्विट केले आहे.

 

केजरीवाल यांच्या ट्विट ला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी उत्तर देत त्यांचे आभार मानले आहेत. तसेच महाराष्ट्रातील जनता त्यांच्या साहस आणि धाडसाने या परिस्थितीवर मात करेल असेही मुख्यमंत्र्यांनी त्याच्या ट्विट मध्ये लिहिले आहे. दरम्यान निसर्ग चक्रीवादळ आता भूपृष्ठावर आदळले असले तरी अद्याप जीवित हानी झालेली नाही. मात्र बऱ्याच ठिकाणी घरांचे पत्रे उडून गेले आहेत. झाडे कोसळली आहेत. विजेचे खांब पडले आहेत. तर काही परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी शिरले आहे. आता हे वादळ उत्तरेकडे गेले असून ते नाशिक तसेच इतर भागात जाण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

 

 

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

सोलापूरच्या महापौरांना कोरोनाची लागण 

सोलापूर । राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढतच आहे. सोलापूर जिल्ह्यातही रुग्णसंख्या वाढत आहे. आता सोलापूरच्या महापौर आणि त्यांच्या पतीलाही कोरोनाचे निदान झाल्याचे समोर आले आहे. या दोघा पती पत्नीवर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ही माहिती समजताच जिल्ह्यात गोंधळ उडाला आहे. सोलापूरमध्ये कोरोनाबाधित रुग्णांमध्ये आणखी ४० रुग्ण वाढले आहेत. अशातच या पती पत्नींना कोरोनाची लागण झाल्याचे समजल्यावर यंत्रणेत गोंधळ उडाला आहे.

ही माहिती समजताच प्रशासनाकडून महापौरांच्या निवासस्थानी सॅनिटेशन करण्यात आले आहे. रेल्वे लाइन्समधील महापौरांचे घर आणि परिसर सॅनिटाईझ करण्यात आला आहे. महापौरांना अंगदुखीसह अशक्तपणा जाणवत होता. ही लक्षणे दिसताच त्यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. आणि त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तपासणीनंतर त्यांचे अहवाल सकारात्मक आले. यानंतर त्यांच्या कुटुंबातील नऊ सदस्यांचीही तपासणी करण्यात आली.

महापौर आणि त्यांचे पती सोडता, कुटुंबातील इतर सर्व सदस्यांचे अहवाल नकारात्मक आले आहेत. तसेच महापौरांचे स्वीय सहायक यांचीही तपासणी केली असता त्यांचे अहवाल नकारात्मक आले आहेत. तथापि महापालिकेतील तीन अधिकाऱ्याना आणि १५ कर्मचाऱ्यांना कोरोनाचे निदान झाले आहे. यासोबत तीन नगरसेवकही कोरोनाबाधित झाले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या एका बैठकीतील एक-दोन अधिकाऱ्यांना कोरोनाचे निदान होते आणि त्यांच्या संपर्कातूनच महापौरांना कोरोना झाल्याचे सांगण्यात आले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

चिनी अ‍ॅपची आता खैर नाही; चीनच्या कुरघोडीनंतर भारतीयांचा संताप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताचा आघाडीचा शत्रू म्हणून पाकिस्तानचं नाव आता मागे पडू लागलं असून ही जागा आता चीनने घेतली आहे. कोरोनाव्हायरसच्या प्रादुर्भावानंतर भारतीय प्रदेश काबीज करण्याच्यादृष्टीने चीन करत असलेल्या प्रयत्नांमुळे भारतीयांचं पित्त खवळलं आहे. चिनी मालावर बहिष्कार टाकण्याची भाषा भारतीयांनी सुरु केली असून त्याची अंमलबजावणीही आता सुरु झाली आहे.

अँडॉईड फोनमधील चिनी अ‍ॅप्स ओळखून डिलीट करण्याचा दावा करणारं Remove China Apps देशभरात व्हायरल झालं आहे. सध्या या अ‍ॅपने गूगल प्ले स्टोअरच्या टॉप फ्री अ‍ॅप्सच्या यादीत स्थान मिळवलं आहे. आतापर्यंत 50 लाखांपेक्षा जास्त वेळा हे अ‍ॅप डाऊनलोड करण्यात आलं आहे. 17 मेपासून आतापर्यंत 50 लाख लोकांनी हे अँप डाऊनलोड केलं असून या आकडेवारीवरुन या अ‍ॅपच्या लोकप्रियतेचा अंदाज बांधता येईल. कोरोना संकट आणि भारत-चीन सीमेवरील तणाव यासारख्या कारणांमुळे देशभरात चीनविरोधात रोष आहे. गुगल प्ले स्टोअरवर हे अ‍ॅप फ्री आहे. विशेष म्हणजे हे अ‍ॅप वापरण्यासाठी लॉगइन करण्याची गरज नाही. यूजर्स आपल्या अँडॉईड फोनमध्ये चिनी अ‍ॅप शोधण्यासाठी Scan चा पर्याय निवडू शकतात.

ऍप कसं काम करतं?

– गूगल प्ले स्टोअरमधून ‘Remove China Apps’ डाऊनलोड आणि इन्स्टॉल करा
– ‘Remove China Apps’ ओपन करा
– आता ‘Scan Now’ पर टॅप करा आणि तुमच्या अँड्रॉईड फोनमध्ये असलेले चिनी अ‍ॅप शोधा
– यानंतर हे अ‍ॅप तुमच्या फोनमध्ये इन्स्टॉल अ‍ॅप स्कॅन करेल. जर चिनी अ‍ॅप मोबाईलमध्ये असतील तर त्याची यादी बनवेल.
– यानंतर जर तुम्हाला या यादीतील कोणतं अ‍ॅप डिलीट करायचं असेल तर अ‍ॅपच्या समोरील डिलीट पर्यायावर टॅप करा
– मग ‘Remove China Apps’ तुमच्या फोनमधील ते अ‍ॅप डिलिट करेल.

बघा, तुम्हाला पटलं तर तुम्हीही विचार करताय का पहा या नवीन अ‍ॅपचा..!!

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

घरी बसून असलेल्या टीम इंडियाला फिट ठेवण्यासाठी बीसीसीआयने तयार केला ‘हा’ मास्टर प्लॅन

मुंबई । कोरोना व्हायरसमुळे सध्याच्या घडीला क्रिकेट ठप्प असल्याने टीम इंडियाचे सर्व क्रिकेटपटू आपल्या घरामध्येच आहेत. त्यामुळे त्यांना आता फिट ठेवण्यासाठी बीसीसीआयने पाऊल उचलले आहे. बीसीसीआयने सर्व खेळाडूंसाठी एक प्लॅन बनवला आहे. त्यानुसार सर्व खेळाडूंना एकत्रित आणून त्यांचे सराव शिबीर आयोजित करण्यात येणार आहे. कारण जोपर्यंत फिटनेस आणि सराव सुरु होत नाही, तोपर्यंत भारतीय संघ कोणताही सामना खेळू शकत नाही. त्यासाठी बीसीसीआयने सर्व खेळाडूंना एकत्रित आणण्याचे ठरवले आहे.

हा आहे प्लॅन
सध्याच्या घडीला भारतामध्ये मान्सून सुरु झाला आहे. त्यामुळे भारताला या २-३ महिन्यांमध्ये मैदानात सराव करता येणार नाही. त्यामुळे आता सप्टेंबरमध्ये खेळाडूंना एकत्रितपणे मैदानात उतरवण्यासाठी बीसीसीआयने कंबर कसली आहे. खेळाडूंना ४ चरणांमध्ये खेळाडूंसाठी फिटनेस आणि सराव कसा करावा हे सांगण्यात येणार आहे.

दरम्यान, खेळाडूंना नेमके कुठे एकत्रित आणणार, याबाबत अजूनही काही निश्चित धोरण ठरवण्यात आलेले नाही. कदाचित भारतीय संघातील सर्व खेळाडूंना राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये एकत्रित आणले जाऊ शकते, पण या वृत्ताला अधिकृत दुजोरा अजून मिळालेला नाही. कारण सध्याच्या घडीला देशातील वाहतूक पूर्णपणे सुरु करण्यात आलेली नाही. त्यामुळे जर सर्व खेळाडूंना एका ठिकाणी जमायचे असेल तर समस्या होऊ शकते. पण सप्टेंबरपर्यंत हा प्रश्न निकाली निघेल, असे म्हटले जात आहे.

म्हणून बीसीसीआयने तयार केला फिटनेस प्लॅन
कोरोना व्हायरसमुळे भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील मालिका रद्द करण्यात आली होती. त्यानंतर आयपीएल २९ मार्चपासून सुरु होणार होते. पण कोरोना व्हायरसमुळे आयपीएलही अनिश्चित काळासाठी पुढे ढकलले गेले. त्यामुळं गेल्या २ महिन्यांपासून खेळाडू आपल्या घरीच आहेत. त्यामुळे सध्याच्या घडीला त्यांचा फिटनेस हा स्पर्धा खेळण्यासाठी योग्य नसावा या विचारातून बीसीसीआयने सर्व खेळाडूंना एकत्रित आणून त्यांचे सराव शिबीर आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

‘या’माजी भारतीय गोलंदाजाचा सनसनाटी खुलासा म्हणाला,’ होय वर्णभेदाला बळी पडलोय…’

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । माजी भारतीय वेगवान गोलंदाज डोडा गणेशने एक खळबळजनक खुलासा केला आहे. आपल्या खेळाच्या दिवसांत आपल्याला वर्णद्वेषी कमेंट्सना सामोरे जावे लागले असे गणेश म्हणाले. मात्र याचा त्याच्यावर काहीच परिणाम झाला नाही आणि तो देश तसेच आपल्या राज्याकडून खेळतच राहिला. डोडा गणेशने भारताकडून चार कसोटी आणि एक वनडे सामना खेळला आहे. १९९७ मध्ये त्याने भारताकडून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. तो म्हणाला की,’ दोन वर्षांपूर्वी अभिनव मुकुंदने वर्णद्वेषाबद्दल केलेल्या खुलाश्यानंतर त्याला आपल्या खेळण्याच्या दिवसात तो काय करीत होता याचा विचार करण्यास प्रवृत्त केले.

कर्नाटककडून गणेशने १०० रणजी सामने खेळले आहेत आणि ३६५ बळी घेतले आहेत, तसंच २ हजार २३ धावाही केल्या आहेत. या ४६ वर्षीय खेळाडूने २००७ मध्ये स्पर्धात्मक क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आणि प्रशिक्षक म्हणून काम करू लागला.

racial abuse,cricket, sports news, indian cricket team, Dodda Ganesh, Abhinav Mukund, नस्‍लवाद, रंगभेद, क्रिकेट, डोडा गणेश, अभिनव मुकुंद, भारतीय क्रिकेट टीम

अभिनव मुकुंद याचे एक जुने पत्र सोशल मीडियावर शेअर करताना डोडा गणेशने असा खुलासा केला की, अभिनव मुकुंदच्या कथेने मला माझ्या खेळण्याच्या दिवसात आलेल्या वर्णद्वेषी कमेंटची आठवण करून दिली. यासाठी एक भारतीय दिग्गजही साक्षीदार होता. यामुळे मी स्ट्रॉंग बनलो आणि भारत तसेच कर्नाटककडून १०० सामने खेळण्यापासून मला कोणीही रोखू शकले नाही. गणेश म्हणाला की, ‘त्यावेळी आपल्याला वंशविद्वेष म्हणजे काय ते समजत नव्हते आणि भविष्यात कोणत्याही भारतीयांनी यातून जावे अशी त्यांची इच्छा नाही.’

२०१७ मध्ये श्रीलंकेच्या दौर्‍याचा एक भाग असलेला अभिनव मुकुंदने त्यावेळी सोशल मीडियावर म्हटले होते की, कातडीच्या रंगामुळे त्याला कित्येक वर्षांपासून अपमान सहन करावा लागत आहे. गोरा रंग केवळ मोहक किंवा देखणा नाही. तुमचा रंग काहीही असो, त्याला सोयीस्कर बनून काम करा. त्याने आपल्या पोस्टमध्ये म्हटले होते की,लहानपणापासूनच त्याच्या त्वचेच्या रंगाबद्दल लोकांची वृत्ती त्याला आश्चर्यचकित करते. तो म्हणाला की, जो कोणी क्रिकेट पाहतो त्याने हे समजलेच पाहिजे कि तो रणरणत्या उन्हात खेळला आहे आणि त्यामुळे त्याचा रंग काळा झाला आहे, याचे त्याला कसलेही दुःख नाही. त्याने लिहिले की, त्याला जे आवडेल ते तो करीत आहे. तो देशातील सर्वात गर्मीचा भाग असलेल्या चेन्नईमध्ये राहणारा आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

‘निसर्ग’ चक्रीवादळाचा हवाई वाहतुकीला फटका! मुंबई विमानतळ बंद

मुंबई । मुंबईच्या उंबरठ्यावर असलेल्या निसर्ग वादळामुळं मुंबई आणि परिसरात सोसाट्याचे वारे आणि विमान घसरल्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ काही तासांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर घोंगावत असलेल्या निसर्ग वादळामुळं अनेक ठिकाणी झाडे कोसळून पडली आहेत. वाऱ्याचा वेग प्रचंड आहे.

याच सोसाट्याच्या वाऱ्यामुळं मुंबई विमानतळावर आज उतरलेले फेडेक्स कंपनीचे मालवाहू विमान धावपट्टीवरून घसरले. हे विमान बेंगळुरूहून आले होते. या घटनेत कुठलीही जीवितहानी नाही. आता विमान बाजूला करण्यात आलं आहे. मात्र, हा अपघात आणि एकूणच परिस्थिती लक्षात घेऊन अनुचित प्रकार टाळण्यासाठी विमानतळ प्राधिकरणानं तूर्त उड्डाणं बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. संध्याकाळी ७ नंतर परिस्थिती पाहून पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचं समजतं.

दरम्यान, कोकणच्या समुद्र किनाऱ्यावरून घोंगावत आलेले व रत्नागिरी, रायगडमध्ये बरेच नुकसान करणारे निसर्ग वादळ आता उत्तर महाराष्ट्राच्या दिशेनं सरकल्याची माहिती आहे. असं असलं तरी मुंबईचा धोका अद्याप कमी झालेला नाही. वादळानं दिशा बदलल्यानं मुंबईत वाऱ्या-पावसाचा जोर कमी झाला आहे. तर, नाशिकमध्ये पाऊस सुरू झाला आहे. हे वादळ पुढे कोणत्या दिशेनं मार्गक्रमण करणार, याकडं लक्ष लागलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

येत्या 6 तासांनंतर चक्रीवादळाची तीव्रता कमी होणार भारतीय हवामान विभागाची माहिती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । निसर्ग चक्रीवादळ आज महाराष्ट्रात धडकल आहे. त्यामुळे राज्यात अनेक भागात पावसाला सुरुवात झाली आहे. या वादळामुळे अनेक ठिकाणी नुकसान ही झाले आहे. काही वादळ अजूनही समुद्रावरच आहे. हे पूर्ण वादळ जमीनीवर दाखल होण्यासाठी अजून एक तासाचा वेळ लागेल. सध्या मध्यभागी या वादळाची तीव्रता ९०-१०० किलोमीटर प्रती तास ते ११० किलोमीटर प्रती तास इतकी आहे. येत्या सहा तासांत हे चक्रीवादळ ईशान्य दिशेला वळणार असून त्याती तीव्रताही कमी होणार असल्याची माहिती भारतीय हवामान विभागानं दिली.

सध्या मध्यभागी या वादळाची तीव्रता ९०-१०० किलोमीटर प्रती तास ते ११० किलोमीटर प्रती तास इतकी आहे. येत्या सहा तासांत हे चक्रीवादळ ईशान्य दिशेला वळणार असल्याचं ही भारतीय हवामान विभागानं सांगितलं आहे.

या चक्रीवादळात कोणतीही जीवीतहानी होऊ नये यासाठीही सर्व व्यवस्था केली जात असून लोकांना सुरक्षितस्थळी हलववण्यात आलं आहे. महाराष्ट्रात राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या २१ तुकड्या तैनात करण्यात आल्या असून आतापर्यंत त्यांनी १ लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.