Tuesday, December 30, 2025
Home Blog Page 5711

लाॅकडाउनमध्ये ‘ही’ अभिनेत्री युट्यूबवरुन देतेय मुंबईतील घडामोडींचे अपडेट्स

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या भारतभरात संचारबंदीमुळे सर्व जण घरामध्ये बसून आहेत. चित्रपट, मालिका यांचे शूटिंग बंद आहे तसेच मालिकांचे जुने भाग पुप्रक्षेपीत केले जात आहेत. काही सेलिब्रिटी मात्र विविध व्हिडीओ बनवून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. सोबत मुंबईतील घडामोडींचे अपडेट्स देते आहे. असे अनेक सेलिब्रिटी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेक्षकांशी संवाद साधत आहेत. आर्या वोरा या अभिनेत्रीने स्वतःचे यु ट्यूब चॅनेल सुरु केले आहे. यातून ती मुंबईचे व्हिडीओ करून प्रेक्षकांचे मनोरंजन करते आहे.

आर्या वोराने सुरु केलेल्या या चॅनेलवर ती सध्या मुंबईची काय परिस्थिती आहे. हे व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आहे. त्यामुळे कंटाळलेल्या प्रत्येकाला थोडा विरंगुळा मिळतो आहे. तिच्या या यु ट्यूब चॅनेल ला तिच्या चाहत्यांनी चांगलीच पसंती दर्शविली आहे. सध्या मुंबईचे वातावरण कसे आहे तसेच मुंबईत काय सुरु आहे याचे व्हिडीओ ती बनवते आहे. तिने एक-दीड महिन्यापूर्वी हे चॅनेल सुरु केले आहे.

देवो के देव महादेव या मालिकेमुळे आर्या लोकांना माहित झाली होती. आर्या ही उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच फॅशन, लाइफस्टाइल ब्लॉग्ससाठी प्रसिध्द आहे. “लॉकडाऊनमध्ये प्रत्येकजण मनोरंजनासाठी वेगवेगळे पर्याय शोधत आहेत.  “मला माझ्या अनेक चाहत्यांनी यु ट्यूब चॅनेल सुरु करण्यास सांगितले होते. शेवटी मी माझे स्वत:चे युट्यूब चॅनल घेऊन आले आहे.  चॅनलची सुरूवात एक-दिड महिन्यापूर्वीच झाली आहे.  पण रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे”, असे आर्याने सांगितले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

कोरोनाची लस सोडा तुम्ही आधी ट्रम्पवर उपचार शोधा 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेत आफ्रिकन वंशाच्या जॉर्ज फ्लाईड या कृष्णवर्णीय व्यक्तीच्या पोलिसांकडून झालेल्या हत्येचा जगभरातून निषेध व्यक्त केला जात आहे. भारतातूनही अनेकांनी या निषेधात सहभाग नोंदवला आहे. सलोनी गौर या कॉमेडियन तरुणीनेही यावर आपल्या प्रतिक्रियांचा एक व्हिडीओ केला आहे. आपल्या हटके अंदाजात तिने ट्रम्प यांच्यावर चांगलेच ताशेरे ओढले आहेत. या व्हिडिओत तिने अमेरिकेच्या शास्त्रज्ञांना तुम्ही कोरोनाची लस सोडा आणि आधी ट्रम्पचा उपचार शोधा असा टोलाही मारला आहे.

सलोनी गौर ही कॉमेडियन तरुणी नजमा आपी या नावाने व्हिडीओ करत असते. अमेरिकेतील एकूण परिस्थितीवर तिने हा व्हिडीओ केला आहे. ज्यात तिने चांगलेच तोळे लगावले आहेत. ती म्हणते, “भाऊ जर तुम्ही कोणत्या बंकर च्या मागे लपून बसला नसाल तर तुम्हाला माहित असले पाहिजे की अमेरिकेत काय सुरु आहे. या ट्रम्प पासून आपण आपली गरिबी लपविली होती पण ट्रम्प स्वतःच लपून बसला आहे. मला ट्रम्प ला विचारायचं आहे की जगभरातले मॅटर सोडवायला तू खलिफा होत असतोस आणि आता स्वतःच्या देशात आग लागली तर तुझा विवेका मुणूनडून झाला आहे.”

 

ती म्हणते, ” तू भारताकडून हायड्रोक्लोरो लस घेतली ठीक आहे, पण मतदानाच्या आधी दंगे करण्याची कल्पना का घेतली? मला जगाचा वंशवाद लक्षात येत नाही की सगळे रंग विधात्याने बनवले आहेत. तुमच्या नादात काय एशियन पेंट च्या शेडकार्डनुसार जन्माला यायचे काय?” काई आंदोलक दुकाने लुटत आहेत त्यांना ती म्हणते तुम्हाला फुकट ब्रँडेड वस्तू हव्या आहेत तर सेलची वाट बघा आंदोलन का खराब करत आहात. या व्हिडिओत तिने प्रियांका चोप्रा आणि इव्हँका या दोन तरुणींचे कौतुक केले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

… तर तोंड बंद ठेवा; डोनाल्ड ट्रम्प यांना पोलिसाने सुनावले 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेत आधीच कोरोनाने थैमान घातले आहे. त्यातच जॉर्ज फ्लाईड या कृष्णवर्णीय व्यक्तीची पोलिसाने निर्घृण रित्या हत्या केला मुळे इथला जनसमुदाय संतापला आहे. लोक अनेक माध्यमातून आपला राग व्यक्त करत आहेत. रस्त्यावर उतरून आंदोलने करत आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांच्यावरही मोठ्या प्रमाणात टिका केली जात आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केलेल्या एका प्रतिक्रियेवर एका पोलिसाने त्यांना ‘जर तुमच्याकडे सांगण्यासारखे काही नसेल तर तोंड बंद ठेवा”  अशा शब्दांत सुनावले आहे.

जनतेचा रोष पाहून डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या खास शैलीत टिका केली होती. तसेच ज्या शहरात ही घटना घडली त्या मिनियापोलीस शहरात गव्हर्नरशी बोलताना त्यांनी बळाचा वापर करून हिंसाचार थांबवा असे सांगितले होते. ते म्हणाले होते, “तुम्ही आंदोलनकर्त्यांवर वर्चस्व मिळवायला हवे आणि तुम्ही तसे करत नसाल तर तुमचा वेळ तुम्ही वाया घालवत आहात. ते तुमच्यावर धावून येत असतील तर तुम्ही त्यांच्यावर वर्चस्व मिळवायला हवे.” त्यांनी यावेळी मिनियापोलीस शहरातील राष्ट्रीय सुरक्षा दलाचे कौतुक केले होते.

ट्रम्प यांच्या या सल्ल्यावर ह्युस्टन पोलीस प्रमुख आर्ट असीवदो यांनी ट्रम्प याना गप्प राहण्याचा सल्ला दिला आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना ते सर्व पोलीस प्रमुखांच्या वतीने ट्रम्प यांना म्हणाले, “तुमच्याकडे बोलण्यासारखे काही नसेल तर तुम्ही तोंड बंद ठेवा. हे सर्व वर्चस्व मिळविण्यासंबंधी नाही तर लोकांचे मन जिंकण्याविषयी आहे. आम्ही जनजीवन जे पूर्व पदावर आणले आहे ते दुर्लक्षामुळे आम्ही खराब करू इच्छित नाही.” तसेच हा हॉलिवूड सिनेमा नाही तर वास्तविक जीवन असल्याचा टोलाही त्यांना मारला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

अबब !!! हे काय तब्बल १३ लाखांची दारू चोरली; जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाच्या विषाणूच्या नियंत्रणासाठी दक्षिण आफ्रिकेत ६६ दिवसांचा लॉकडाउन जाहीर करण्यात आला होता. हा लॉकडाउन संपण्याच्या एकच दिवस आधी भुयार खोदून काही चोरांनी वाइन शॉपमधून तब्बल ३ लाख रॅंड (जवळपास १३ लाख ६० हजार) किंमतीची दारु चोरली असल्याची घटना समोर आली आहे.

कोरोनाच्या संसर्गाला नियंत्रणात आणण्यासाठी अनेक देशांमध्ये लॉकडाउन जाहीर करण्यात आलेला होता. या लॉकडाउनमध्ये अनेक लोकांना त्रास सहन करावा लागला आहे. त्यातही दारुची दुकाने बंद असल्यामुळे तर मद्यप्रेमींचे हाल पाहण्यासारखे होते. दक्षिण आफ्रिकेतही मार्च महिन्यापासून लॉकडाउनमुळे दारू विक्रीवर बंदी घालण्यात आली होती. यावेळी हे मदयचोरीची घटना घडली. वाईन शॉपच्या मालकाने जेव्हा सोमवारी सकाळी दुकान उघडले त्यानंतर चोरी झाली असल्याचे समोर आले. चोरी करणाऱ्या चोरांची सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे ओळख पटवण्यात आली आहे. हे चोर काही दिवस आधीही या दुकानावर आले असल्याची माहिती मालकाने दिली. या चोरांची माहिती देणाऱ्यांना ५० हजार रँडचे बक्षिस जाहीर करण्यात आले आहे.

मागील काही दिवसांपासून दक्षिण आफ्रिकेतिळ वाईन शॉपमध्ये चोरीचे प्रमाण वाढते आहे. त्यामुळे अनेकजणांनी वाईन शॉपच्या सुरक्षिततेसाठी खास सुरक्षा रक्षकांची नेमणूक केली आहे. लॉकडाउनमुळे मद्य विक्रीवर बंदी होती. त्यामुळे अनेकजणांची गैरसोय होत होती. तसेच दारू विक्रीवर बंदी असल्यामुळे काळ्या बाजारात १० पट जास्त किंमतीने दारुची विक्री करण्यात येत आहे. आता, दारू विक्री करण्यास सरकारने मंजुरी दिली असून सोमवार ते गुरुवार दरम्यानच दारू विक्री करता येणार आहे. दक्षिण आफ्रिकेतही कोरोनाच्या संसर्गाचे ३४ हजार ३५७ रुग्ण आढळले असून ७०९ जणांचा मृत्यू झाला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

नियमांचा भंग केल्याप्रकरणी ३२२ रेशन दुकानांचे परवाने रद्द- छगन भुजबळ

मुंबई । लॉकडाऊनच्या काळात रेशन धान्य वाटपात अनियमितता आणि नियमांचा भंग केल्याप्रकरणी ३२२ रेशन दुकानांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. तसेच ४८३ रेशन दुकानांचे निलंबन करण्यात आले आहे. तर राज्यातील ९३ रास्तभाव दुकानदारांची १०० टक्के अनामत रक्कम जप्त करण्यात आली आहे, अशी माहिती नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली. अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात विभागाची आढावा बैठक पार पडली त्यांनतर भुजबळ यांनी माहिती दिली.

राज्यात एकूण सहा महसुली विभाग असून यामध्ये नागपूर, अमरावती, औरंगाबाद, नाशिक, पुणे व कोकण विभागाचा समावेश आहे. या सहा विभागात तसेच मुंबई शहरात दि.२३ मार्च ते ३१ मे २०२० पर्यंतच्या लॉकडाऊनच्या काळात एकूण ४८३ रेशन दुकानांचे निलंबन, ३२२ रेशन दुकानांचे परवाने रद्द करण्यात आले तर राज्यातील ९३ रास्तभाव दुकानदारांचे १०० टक्के अनामत रक्कम जप्त करण्यात आली आहे. राज्यातील या वितरण व्यवस्थेवर अन्न, नागरी पुरवठा विभागाच्या वतीने काटेकोरपणे लक्ष ठेवण्यात आले असून निर्माण करण्यात आलेल्या पथकांच्या माध्यमातून ही कारवाई करण्यात येत आहे, असे भुजबळ यांनी सांगितले.

राज्याच्या नागपूर महसूल विभागात एकूण ७८ रेशन दुकानांचे निलंबन तर १३ दुकानांचा परवाना रद्द करण्यात आला आहे. अमरावती महसूल विभागात एकूण २२ रेशन दुकानांचे निलंबन करण्यात आले तर ३२ दुकानांचा परवाना रद्द करण्यात आला आहे. औरंगाबाद महसूल विभागात ७१ रेशन दुकानांचे निलंबन करण्यात आले असून ६ दुकानांचा परवाना रद्द करण्यात आला आहे. नाशिक महसूल विभागात एकूण ६१ रेशन दुकानांचे निलंबन करण्यात आले तर ७३ दुकानांचा परवाना रद्द करण्यात आला आहे. पुणे महसूल विभागात एकूण १९५ रेशन दुकानांचे निलंबन करण्यात आले असून १८३ दुकानांचा परवाना रद्द करण्यात आला आहे. कोकण महसूल विभागात एकूण ३१ रेशन दुकानांचे निलंबन करण्यात आले असून ७ दुकानांचा परवाना रद्द करण्यात आला आहे. तर मुंबई शहरातील एकूण २५ रेशन दुकानांचे निलंबन करण्यात आले असून ८ दुकानांचा परवाना रद्द करण्यात आला आहे असंही भूजबळ यांनी सांगितली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

तब्बल ७० दिवसांनंतर सोन्या-चांदीची दुकानं सुरु; जाणून घ्या आजचा भाव

नवी दिल्ली । देशात अनलॉक १.० सुरु झाल्यानंतर अनेक गोष्टींमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. जवळपास 70 दिवसांनंतर सराफा बाजार सुरु करण्यात येत आहे. लोकल बाजारात सराफा दुकानं लॉकडाऊन 4.0 दरम्यानच सुरु होत होती. मात्र देशातील इतर भागातील प्रमुख सराफा बाजार 1 जूनपासून हळू-हळू सुरु होत आहेत. लॉकडाऊन दरम्यानही सोन्या-चांदीच्या भावात सतत चढ-उतार पाहायला मिळत होते. सध्याचं शेअर मार्केटमधील अनिश्चिततेचं वातावरण पाहता गुंतवणूकदारांचा सोनं खरेदीसाठी कल आहे. त्यामुळे सोन्याची मागणी आणि किंमती दोघांमध्येही वाढ पाहायला मिळाली. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाईटवर (ibjarates.com) सोन्या-चांदीचे भाव अपडेट होत असतात.

इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार, मंगळवारी 24 कॅरेट सोन्याचा दर 47,184 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका आहे. तर 22 कॅरेट सोन्याची किंमत 43,221 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. सोमवारी संध्याकाळी सराफा बाजार बंद होण्यावेळी सोन्याचा दर 47,043 रुपये होता. तर चांदीचा दर 340 रुपयांच्या वाढीसह 49,670 रुपयांवर पोहचला आहे.दिल्लीतील कपिल ज्वेलर्स यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या अनेक दिवसांपासून ते आपलं दुकानं सुरु करत आहेत. ग्राहकही येत आहेत, परंतु ग्राहकांच्या मागणीनुसार त्यांना दागिने पुरवता येत नाहीत. कारण, लॉकडाऊनदरम्यान, त्यांचे कारागीर आपापल्या गावी परतले आहेत. त्यामुळे आता कारागीर परत येईपर्यंत काही सांगता येत नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

PM Cares Fundचे पैसे कसे खर्च करणार? हायकोर्टाची पंतप्रधानांना विचारणा

नागपूर । पीएम केअर्स फंड अंतर्गत जमा होणार निधीबाबत सुरुवातीपासून शंका उपस्थित केल्या जात आहेत. पीएम केअर्स फंडच्या पारदर्शकतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थितीत केले जात असताना मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने पीएम केअर फंडमधील रक्कम नेमकी कशी खर्च करणार, अशी विचारणा करणारी नोटीस ट्रस्टचे अध्यक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्र सरकार व इतरांना नोटीस बजावली आहे. नागपूर हायकोर्टात वकिली करणारे अरविंद वाघमारे यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर न्या. सुनील शुक्रे आणि न्या. अनिल किलोर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.

वाघमारे यांनी याचिकेत पीएम केअर फंड ट्रस्टच्या स्थापनेवर आक्षेप घेतला नाही. तसेच त्यांनी स्वत: त्यात काही रक्कम दान करून या कार्याला विरोध नसल्याचे स्पष्ट केले. परंतु, पीएम केअर फंड ट्रस्टच्या एकूण रचनेत ३ सदस्य हे समाजातील प्रतिष्ठीत अथवा देशातील नामवंत व्यक्ती असावेत, असे नमूद केले आहे. सदर ट्रस्ट स्थापन झाल्यानंतर त्यात संरक्षण मंत्री, अर्थमंत्री, तसेच इतर पदाधिकारी नियुक्त केले. पण समाजिक व इतर क्षेत्रातील ३ पदे रिक्त आहेत, याकडे याचिकेत लक्ष वेधले. याशिवाय पीएम केअर फंडमध्ये देशभरातून निधी जमा झाला आहे. हा निधी नेमका कसा खर्च करण्यात येणार, राज्यांना त्याचा किती लाभ मिळणार, या निधीतून होणारा खर्च जनतेसमोर येण्यासाठी कॅगमार्फत त्याचे ऑडिट करायला हवे, असा मुद्दाही उपस्थित करण्यात आला आहे.

दरम्यान, केंद्र सरकारचे अतिरक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी वाघमारे यांच्या याचिकेचा तीव्र विरोध केला. याचिकेत नमूद केलेल्या सगळे मुद्दे सुप्रीम कोर्टाने आधीच नाकारले आहेत. एक याचिका नोटीस न काढताच फेटाळण्यात आली, तर दुसरी याचिका मागे घेण्यात आली होती. त्यामुळे हायकोर्टाने नव्याने त्याच मुद्यांवर सुनावणी करण्याचे औचित्य राहत नाही, असे सिंग यांनी नमूद केले. परंतु, हायकोर्टाने सिंग यांचा युक्तिवाद अमान्य केला.

सुप्रीम कोर्टात झालेल्या मुद्यांवर आम्ही येथे दुर्लक्ष करू. परंतु, या निधीच्या ट्रस्टमध्ये ३ लोक अद्याप का नियुक्त झाले नाहीत, तसेच पीएम केअरमध्ये जमा झालेला निधी कसा खर्च करणार हे जाणून घेण्याचा जनतेला अधिकार आहे. त्यामुळे या दोन मुद्यांवर सविस्तर शपथपत्र दाखल करावे, असा आदेश देण्यात आला. हायकोर्टाने याबाबत पीएम केअर फंड ट्रस्टचे अध्यक्ष या नात्याने पंतप्रधान, ट्रस्ट्रचे सचिव, अर्थमंत्री, संरक्षण मंत्री, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी व मनपा आयुक्तांनाही नोटीस बजावली आहे. तसेच इतर प्रतिवादींनाही देखील दोन आठवड्यात उत्तर सादर करण्याचा आदेश दिला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना चिंता लागून राहिलेले ”अँटिफा” प्रत्यक्षात आहे तरी काय जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काही दिवसांपूर्वी अमेरिकेत कृष्णवर्णीय असलेल्या जॉर्ज फ्लॉईड नावाच्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर अमेरिकेत पुन्हा एकदा वर्णद्वेषविरोधी आंदोलन सुरू झाले आहे. हे आंदोलन अमेरिकेतील अनेक महत्त्वाच्या शहरात सुरू झाले असून त्याची झळ थेट व्हाइट हाउसपर्यंत पोहोचली आहे. काही शहरांमध्ये मात्र या आंदोलनाला हिंसक असे वळण लागले आहे. यामध्ये काही ठिकाणी पोलीस स्टेशनला आगीही लावण्यात आल्या आहेत. आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या आंदोलनात सहभागी असणाऱ्या गटाला ‘अँटिफा’ दहशतवादी संघटना म्हणून घोषित करणार असल्याचे म्हटले आहे.

Alt-Left Warns Antifa Will Attack Canadian Journalists At Protests

”अँटिफा” म्हणजे आहे तरी काय?
अमेरिकेमध्ये फॅसिझमविरोधात असणाऱ्या गटाला ‘अँटिफा’ (AntiFascists) असे म्हंटले जाते. या गटात फॅसिझमविरोधातील, डाव्या विचार सरणींच्या कार्यकर्त्यांचा सहभाग असतो. नवफॅसिझम,नवनाझीवाद तसेच वर्णद्वेषाविरोधात हा गट ऍक्टिव्ह असतो. हा गट सरकारच्या धोरणांविरोधात सतत आंदोलन करत असतो. निदर्शने, मोर्चे, मानवी साखळी करणे असे या गटाच्या आंदोलनाचे स्वरुप असते.

‘अँटिफा’ची स्थापना कशी करण्यात आली ?
‘अँटिफा’ या गटाच्या स्थापनेविषयी साध्यतरी फारशी माहिती उपलब्ध नाही आहे. मात्र, असे सांगितले जाते कि, १९२०-३० च्या दशकात युरोपीयन फॅसिस्ट शक्तींच्या विरोधात हा गट स्थापन करण्यात आला होता. तर, ‘अँटिफा’चे आंदोलन १९८० च्या दशकात ‘अँटि-रेसिस्ट एक्शन नावाच्या एका गटाच्या आंदोलनाद्वारे सुरू झाले, अशी माहिती या गटाशी निगडीत असलेले सांगतात. मात्र मध्यंतरीच्या काळात हा गट तितकासा ऍक्टिव्ह नव्हता. आता डोनाल्ड ट्रम्प हे जेव्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले त्यानंतर या गटाच्या आंदोलनाला पुन्हा एकदा ताकद मिळाली.

Trump is threatening to designate antifa an “organization of ...

‘अँटिफा’चे सदस्य कोण कोण आहेत ?
या गटातील कार्यकर्त्यांना अमेरिकेत ओळखणे फारच कठीण काम आहे.पोलीसांच्या कारवाईची भीती असल्यामुळे अनेकजण आपली ओळख लपवून असतात. वर्णभेदाचे असे एखादे प्रकरण समोर आल्यानंतर या गटाशी संबंधित सदस्य आंदोलनस्थळी जमा होतात. या गटासाठी अधिकृत असा कोणताही नेता नाही आहे. मात्र स्थानिक पातळीवरील कार्यकर्ते हे एकमेकांशी नेहमीच संपर्क ठेवून असतात.

‘अँटिफा’ गट इतरांपेक्षा वेगळे काय करते?
‘अँटिफा’ हा गट अमेरिकेतील इतर काही काही अराजकतावादी गटांप्रमाणे काम करतो. यामध्ये आंदोलनस्थळी कार्यकर्ते आंदोलन करताना काळे कपडे घालणे, मास्क घालणे अशा पद्धतीचा अवलंब करतात. या गटाच्या आंदोलनाचा रोख हा प्रामुख्याने भांडवलशाही आणि त्यांच्या व्यवस्थेवर असतो. पोलीस आणि इतर यंत्रणांना हा गट आपले लक्ष्य करतो.

Army Parrots Racist Right's Talking Points on Antifa

या ‘अँटिफा’गटाचा नेमका हेतू तरी काय आहे ?
फॅसिस्ट तसेच वर्णभेद करणाऱ्या विचारांना हा गट विरोध करतो. वेगवेगळ्या मंचावरून याविषयीच्या विचारांना आंदोलनाच्या माध्यमातून विरोध करण्यात येतो. अल्पसंख्याक, एलजीबीटी समुहाच्या समर्थनात तसेच महिलांवर होणाऱ्या अत्याचारांविरोधात निदर्शने आणि आंदोलने करण्यावर यांचा अधिक भर असतो.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

दिल्ली भाजप अध्यक्षपदावरून मनोज तिवारींची उचलबांगडी; चर्चांना उधाण

नवी दिल्ली । दिल्लीचे खासदार मनोज तिवारी यांना मोठा धक्का बसला आहे. भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी मनोज तिवारी यांना दिल्ली प्रदेश भाजप अध्यक्षपदावरून काढून टाकले आहे. तिवारी यांच्या जागी आदेश गुप्ता यांची वर्णी लागली आहे. आदेश गुप्ता आता दिल्ली प्रदेश भाजपचे अध्यक्ष म्हणून काम पाहतील. या बरोबरच छत्तीसगडच्या प्रदेशाध्यक्षपदी विष्णुदेव साय यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मनोज तिवारी यांची नेमकी कोणत्या कारणांमुळे उचलबांगडी करण्यात आली याबाबत माहिती मिळू शकलेली नाही.

दरम्यान, दिल्ली निवडणूकीत झालेला दारूण पराभव हे मनोज तिवारींना डच्चू देण्यामागील एक कारण सांगितले जाते. दिल्लीत विधानसभा निवडणूक २०२० अर्थात या वर्षी फेब्रुवारी महिन्यात घेण्यात आल्या होत्या. या निवडणुकीत भाजपला एकूण ८ जागा मिळाल्या होत्या. पक्षाने ही निवड मनोज तिवारीच्या अध्यक्षतेखालीच लढवली होती.

म्हणून मनोज तिवारींना हटवून भाजपने आदेश गुप्तांकडे दिले अध्यक्षपद
मनोज तिवारी यांना हटवून आदेश गुप्ता यांना दिल्लीच्या अध्यक्षपदी बसवण्यात आले आहे. आदेश गुप्ता एका वर्षापूर्वी उत्तर एमसीडीचे महापौर होते. व्यापारी वर्गाला खूश करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने हा चेहरा पुढे केल्याचे बोलले जात आहे. मनोज तिवारी यांना दूर करून लोकांशी जोडले गेलेले आणि दिल्लीशी थेट संबंध असेलेले गुप्ता यांची निवड भाजपने केली आहे. दिल्लीतून हीच मागणी अनेक दिवसांपासून होत होती. आदेश गुप्ता शिकवणी चालवून आपले घर चालवत असत.

तिवारी काही दिवसापासून होते सापडले होते वादात
लॉकडाउनच्या नियमांचा भंग केल्याप्रकरणी मनोज तिवारी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी सोमवारी ताब्यात घेतले होते. दिल्लीतील कोविड -१९ विरोधात लढण्यात अरविंद केजरीवाल सरकार कमी पडले असे सांगत सरकारविरोधात निदर्शने करण्यासाठी ते राजघाटवर गेले होते. त्यापूर्वी ते हरयाणात क्रिकेटचा सामना खेळण्यासाठी गेले होते. तेथे मास्क न लावता, तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन करता ते क्रिकेट खेळत होते त्यामुळं मोठा वादंग निर्माण झाला होता.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

राजेश टोपेंचा दणका! हिंदुजा, लीलावतीसह ४ खासगी रुग्णालयांना बजावली नोटीस

मुंबई । कोरोना उपचारासाठी राज्य सरकारनं घालून दिलेल्या नियमांचे पालन न करण्यात आल्याने मुंबईतील लिलावती, जसलोक, बॉम्बे व हिंदुजा या ४ खासगी रुग्णालयांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे आहे. राज्य आरोग्य सेवा हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे यांनी ही कारवाई केली आहे. सरकारच्या आदेशाचे पालन न करणाऱ्या रुग्णालयांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिला आहे. खासगी रुग्णालयांनी ८० टक्के बेड्स उपलब्ध करुन देणे आणि गरीबांसाठी १०% बेड आरक्षित ठेवण नियामानुसार अपेक्षित आहे. मात्र या आदेशाचं पालन खासगी रुग्णालयांकडून होत नाही. काल रात्री आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या रुग्णालयांना अचानक भेट दिली, त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. रुग्णालये चार्जेसचे चार्टही लावत नसल्याचं समोर आल्याने राज्य सरकारने ही कारवाई केली आहे.

सुरुवातीला टोपेंनी बॉम्बे हॉस्पिटलला भेट दिली. तेथील बेड्सच्या उपलब्धतेबाबत जाहीर फलक नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी नाराजी व्यक्त केली. रुग्णालयातील एकूण बेड्स, ८० टक्केनुसार दिलेले बेड्स, शिल्लक बेड्स यांची माहिती त्यांनी घेतली. त्यानंतर आरोग्यमंत्र्यांनी जसलोक, हिंदुजा, लिलावती या रुग्णालयांनाही भेटी दिल्या. प्रत्येक ठिकाणी त्यांनी राखीव बेड्सची माहिती दर्शविणारा तक्ता पाहिला. या भेटीमध्ये चारही रुग्णालयांमध्ये काही बाबींची पूर्तता होत नसल्याचे आढळून आल्याने या रुग्णालयांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सरकारी आणि महापालिकेच्या रुग्णालयांची क्षमता हळूहळू संपत आहे. त्यामुळे मुंबईतील खासगी रुग्णालयांतील 80 टक्के बेड्स उपलब्ध करुन देण्याचे आदेश आहेत. मुंबईतील गरजू आणि गरीब रुग्णांना रुग्णालयांमध्ये बेड्स उपलब्ध झाले पाहिजेत. रुग्णालयांनी चार्जेसचा चार्ट लावला पाहिजे. रुग्णालयांना नोटीस पाठवून गरजूंना बेड्स मिळतात की नाही, आदेशांचं पालन होत आहे की नाही याची खात्री करून घेत आहेत. या रुग्णालयामध्ये रुग्णांना बेड उपलब्ध असतील तर ते मिळालेच पाहिजेत. मी आरोग्यमंत्री या नात्याने स्वत: रुग्णालयांना भेट दिली आणि हे सहन केला जाणार नाही असा संदेश देण्याचा प्रयत्न केला. तसेच रुग्णालयांनी रुग्णांना बेड्स उपलब्ध करुन दिले नाही, तर कायदेशीर कारवाई करु, असा इशाराही राजेश टोपे यांनी यावेळी दिला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”