Tuesday, December 30, 2025
Home Blog Page 5710

‘निसर्ग’ चक्रीवादळाची रायगड किनारपट्टीकडे वेगवान कूच 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अरबी समुद्रातील निसर्ग हे चक्रीवादळ आता वेगाने पुढे सरकत आहे. या वादळाने त्याचे रौद्र रूप धारण केले असून  खात्याने सॅटेलाईट द्वारे काढलेले छायाचित्र प्रसिद्ध  केले आहे. हे वादळ हवामान खात्याने अंदाज दर्शविल्याप्रमाणे ताशी ११० ते १२० किमी वेगाने रायगड च्या किनारपट्टीवर दुपारी १ ते ४ च्या दरम्यान धडकण्याची शक्यता आहे.  भूपृष्ठावर आल्यानंतर हे वादळ मोठ्या प्रमाणात नुकसान करण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यावेळी मुंबई, ठाणे, रायगड, पालघर  नाशिक जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

वादळ जसजसे किनारपट्टीकडे सरकत आहे, तसतसा वाऱ्याचा वेगही वाढतो आहे. सकाळी ८.३० वाजताच्या नोंदीनुसार रत्नागिरीत ५५ किमी वेगाने वारे वाहत होते. त्याचवेळी कोकण किनारपट्टीवर वाऱ्याचा वेग ताशी ५५ ते ६५ किमी इतका होता. दुपारी हा वेग आणखी वाढून १०० ते ११० किमी पर्यंत जाईल. प्रत्यक्षात वादळ किनारी धडकेल तेव्हा वाऱ्याचा वेग ताशी १२० किमी च्या आसपास असेल, असे हवामान विभागाने नमूद केले आहे. दुपारी १ ते ४ च्या दरम्यान केव्हाही हे वादळ  किनारपट्टीवर धडकेल असे हवामान खात्याने सांगितले आहे.

कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात रात्रभर सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडत आहे. काही भागांत पावसाची संततधार सुरू आहे. रत्नागिरीजवळ ‘बसरा स्टार’ हे व्यापारी जहाज वादळात अडकले होते. या जहाजाला मुंबईच्या किनाऱ्यावर यायचे आहे. समुद्र खवळला असल्याने नौकायान महासंचालक कार्यालयाकडून विशेष जहाज पाठविण्यात आले आहे. बचावकार्यासाठी नौदलाच्या युद्धनौका अरबी समुद्रात सज्ज झाल्या आहेत. मुंबई तसेच परिसरासाठी नौदलाचा आठ बचाव पथके तैनात करण्यात आली आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

पुलवामा: सुरक्षा दलांनी केला ३ दहशतवाद्यांचा खात्मा

श्रीनगर । जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील कंगन वानपोरा भागात भारतीय सुरक्षा दलाकडून जैश-ए-मोहम्मदच्या 3 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. मंगळवारी मध्यरात्रीपासून सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु होती. दोन्ही बाजूने गोळीबार सुरु होता. सीआरपीएफ आणि 55 राष्ट्रीय रायफल्सच्या संयुक्त पथकाने दहशतवाद्यांविरुद्ध ही कारवाई केली आहे.

गेल्या 24 तासात जैश ए मोहम्मदच्या 5 दहशतवाद्यांना मारण्यात आलं आहे. मंगळवारी पुलवामामध्येच भारतीय सेनेकडून जैशचे 2 दहशतवादी ठार करण्यात आले होते.एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, गुप्त सुचनेच्याआधारे, ज्यावेळी सर्च ऑपरेशन सुरु होत, त्याचवेळी लपलेल्या दहशतवाद्यांकडून सुरक्षा दलावर गोळीबार करण्यात आला. त्यानंतर दोन्ही बाजून गोळीबार सुरु झाला.

दहशतवादी लपलेल्या जागेला सुरक्षा दलाकडून घेराव घालण्यात आला होता. दहशतवाद्यांना बाहेर पडण्यास कोणताही मार्ग नव्हता. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कंगन वानपोरा भागात 2-3 दहशतवादी लपले असल्याची माहिती आहे. कोणतीही अफवा पसरवू नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून, त्या भागातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

रत्नागिरीला निसर्ग चक्रीवादळाचा पहिला तडाखा, मदतकार्य सुरू

रत्नागिरी । निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा बसण्यास सुरुवात झाली असून रत्नागिरी जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. किल्ला परिसरात वृक्ष कोसळून पडल्याने घराचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच किनारपट्टी भागातील नारळ आणि सुरुची झाडे मोडून पडली आहेत. राजिवडा, मांडवी किनाऱ्यावरही झाडांची पडझड झाली आहे. संगमेश्वर तालुक्यात देवरुख येथे घरांचे मोठे नुकसान झाले आहे. तर ‘बसरा स्टार’ हे व्यापारी जहाज वादळात अडकले असून जहाजाला सुखरूप मुंबईच्या किनाऱ्यावर आणण्यासाठी मदतकार्य हाती घेण्यात आलं आहे.

सध्या रत्नागिरीत निसर्ग चक्रीवादळ घोंगावत असून या वादळाच्या तडाख्यात एक व्यापारी जहाज सापडले आहे. या जहाजाला मुंबई किनाऱ्यावर यायचे होते. पण रत्नागिरीजवळील मिरकरवाडी भागात हे जहाज जोरदार वादळात व खवळलेल्या समुद्रात अडकून पडले. त्यांनी वरळीतील तटरक्षक दलाच्या समुद्री बचाव केंद्राला मदतीचा संदेश पाठवला. त्यानंतर तटरक्षक दलाने त्या परिसरातील नौकायान मंत्रालयाच्या बचाव नौकेला विनंती केली. त्या विनंतीवरून बचाव नौका तिथे पोहोचली. ‘टोइंग’ प्रकारची ही नौका आता या व्यापारी जहाजाला हळूहळू मुंबईत आणत आहे.

दरम्यान, रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडतोय.खारेघाट रोड येथील काशी विषश्वेवर मंदिराच्या बाजूला वादळामुळे झाड मध्येच तुटले. गुहागर, दापोली, मंडणगड आणि रत्नागिरीत हा मुसळधार पाऊस कोसळतोय. हा निसर्ग चक्रीवादळाचा परिमाण असून वाऱ्याचा वेगही वाढलाय. ताशी ८० ते १०० किलोमीटर वेगाने वारे वाहत आहेत. संगमेश्वरमधील देवरुखमध्ये देखील पाऊस आणि वाऱ्यानं जोर धरला आहे. देवरुखमधील भंडारवाडीत झाड कोसळून घराचं नुकसान झाले आहे.

निसर्ग चक्रीवादळाचा परिणाम किनारपट्टीपासून ५० किमी दूर असलेल्या देवरुखातही जाणवत आहे. काल मध्यरात्रीपासून परिसरात रिमझिम पाऊस सुरु होता. तर सकाळी ६ वाजल्यापासून पावसानं जोर धरला असून आता पावसासोबत वाराही वेगानं वाहतोय. शहरातील भंडारवाडी इथं वाऱ्यानं एक वृक्ष मुळासकट उन्मळून पडलाय. त्यामुळे घरांचं नुकसान झाले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर ‘या’ रेल्वे गाड्यांच्या वेळा बदलल्या

मुंबई । अलिबागच्या किनारपट्टीवर धडकून मुंबईच्या दिशेनं घोंगावणाऱ्या निसर्ग या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात येत आहेत. रस्ते वाहतुकीपासून ते हवाई आणि आता रेल्वे वाहतुकीवरही निसर्ग चक्रीवादळाचा परिणाम होणार असल्याचे दिसत आहे. चक्रीवादळाचे अतिशय रौद्र स्वरुप धारण करण्याचा धोका पाहता वादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटणाऱ्या काही लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकांत खबरदारी म्हणून बदल करण्यात आला आहे.

मुंबईतून सुटणाऱ्या पाच रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. तर, दोन रेल्वे गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले असल्याची माहिती भारतीय रेल्वेकडून देण्यात आली. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात काही विशेष रेल्वे गाड्या सोडण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाकडून घेण्यात आला होता. त्यातही काही बदल झाल्याची माहिती समोर येत आहे. चक्रीवादळाचा वेग क्षणाक्षणाला वाढत असल्यामुळं रेल्वेकडून ही खबरदारी पाळण्यात येत आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

‘निसर्ग’ चक्रीवादळ अलिबागपासून केवळ १३० कि.मी. अंतरावर; काही तासांतच किनारपट्टीला धडकणार

मुंबई । अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्याने मंगळवारी दुपारी ११.३० च्या सुमारास चक्रीवादळाचे रूप धारण केले असून, बांगलादेशने सुचवल्याप्रमाणे निसर्ग असे नामकरण झालेले हे चक्रीवादळ आज दुपारी अलिबागजवळ धडकण्याची शक्यता आहे. ताशी १३ किलोमीटर वेगाने हे वादळ पुढे सरकत असून ते जमिनीवर धडकताना ताशी १०० ते १२० किलोमीटर वेगाने वारे वाहतील, असा भारतीय हवामान विभागाचा अंदाज आहे. दरम्यान, वादळ मुंबईच्या दिशेने वेगाने सरकत असून पहाटे पाच वाजताच्या मुंबईपासून हे वादळ १८० तर अलिबागपासून १३० किलोमीटर अंतरावर होते. त्यानंतर साडेसहा वाजताच्या स्थितीनुसार वादळ मुंबईपासून १८० व अलिबागपासून १३० किमी अंतरावर असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

निसर्ग चक्रीवादळ रायगडसह मुंबई, पालघर, ठाणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांत मोठं नुकसान करण्याची शक्यता आहे. त्याशिवाय उत्तर मध्य महाराष्ट्रातील काही भागही या वादळाच्या पट्ट्यात येईल, असा अंदाज आहे. गुजरातमधील वलसाड, नवसारी, डांग, सुरत तसेच दमण, दादरा नगर हवेली भागालाही निसर्गचा फटका बसू शकतो. या संपूर्ण भागांसाठी रेड अॅलर्ट जारी करण्यात आला आहे. या वादळासोबतच मुसळधार पावसाचाही अंदाज व्यक्त करण्यात आला असून मुंबईत पूरस्थिती उद्भवल्यास त्याला तोंड देण्यासाठी पालिका यंत्रणा सज्ज झाली आहे. एनडीआरएफ, तटरक्षक दल, नौदल राज्य सरकारच्या यंत्रणांशी समन्वय साधून पावले टाकत आहेत.

निसर्गच्या पार्श्वभूमीवर किनारपट्टीवरील गावांतील कच्च्या घरांत राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे काम मंगळवारी हाती घेण्यात आले. मात्र, महाराष्ट्राला चक्रीवादळाचा फारसा अनुभव नसल्याने चक्रीवादळ आले तर काय करायचे, काय तयारी हवी, त्याची तीव्रता किती असेल या सगळ्याबद्दल नागरिकांमध्ये गोंधळाचे आणि अनभिज्ञतेचे वातावरण दिसले. चक्रीवादळाबद्दल सरकारी आणि प्रशासकीय पातळीवरून संदेश प्रसारित होणे सोमवारी रात्री सुरू झाल्यानेही आश्चर्य व्यक्त होत आहे. चक्रीवादळाचा मार्ग, त्यानुसार पूर्वेकडील राज्यांमध्ये घेतली जाणारी काळजी पाहता महाराष्ट्रासंदर्भात मात्र इतक्या उशिरा का जाग आली, असा प्रश्नही विचारण्यात येत आहे.

‘निसर्ग’ची तीव्रता ‘अम्फन’इतकी नसेल असाही दिलासा देण्यात येत आहे. चक्रीवादळ जमिनीवर धडकल्यानंतर साधारण चार तासांपर्यंत त्याचा परिणाम जाणवेल, असा अंदाज आहे. या काळामध्ये झोपड्या, कच्ची घरे यांना सर्वाधिक धोका आहे. या घरांचे छप्पर उडून जाऊ शकते, घरांवर टाकलेले पत्रेही उडून जाऊ शकतात. वीजपुरवठा, संवादाच्या सेवा खंडीत होऊ शकतात, असा इशाराही देण्यात आला आहे. कच्च्या रस्त्यांवर परिणाम होऊ शकतो. झाडांच्या फांद्या पडणे, झाडे पडणे, केळी, पपई अशी झाडे उन्मळून पडू शकतात. किनारपट्टीवरील पिकांना चक्रीवादळाचा फटका मोठ्या प्रमाणात बसू शकतो. मिठागरांनाही चक्रीवादळामुळे संभाव्य धोका आहे.

देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना खडखडीत सवाल; म्हणाले…

मुंबई । राज्यातील सर्वाधिक कोरोना रुग्णांचे मुंबईत निदान होते आहे. तसेच अनेक रुग्ण मृत्युमुखी पडत आहेत. या रुग्णांच्या मुतदेहांना पीएफआय या संघटनेला देण्याचा निर्णय १८ मे रोजी घेण्यात आला होता. त्यासंदर्भात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देशविरोधी कृत्य करणाऱ्या पीएफआय ला काम देणे कितपत योग्य? असा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याना विचारला आहे. १८ मे रोजी काढण्यात आलेल्या या आदेशात कोरोना मुळे मृत्युमुखी पडलेल्या मुस्लिम लोकांचे शव पीएफआय ला देण्यात यावे असे सांगण्यात आले होते.

पीएफआय विरुद्ध देशविरोधी कारवाई केल्याचा आरोप आहे असे फडणवीस यांनी म्हंटले आहे. केरळ, कर्नाटक, झारखंड आणि उत्तरप्रदेश या राज्यांमध्ये ही संघटना प्रतिबंधित करण्याची कारवाई सुरु आहे आणि इतकेच नाही तर सीएए च्या काळात या संघटनांनी देशभरात दंगे करण्यासाठी या संघटनेने पैसे दिल्याचा आरोप ईडी ने यांच्यावर केला होता. आणि तसे त्यांचे अकॉउंटस देखील प्रसिद्ध करण्यात आले होते. अशी माहिती फडणवीस यांनी दिली .

फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना प्रश्न केला आहे की, अशाप्रकारे देशविरोधी काम करणाऱ्या संघटनांना शवांची विल्हेवाट करण्याचे काम देणे, आणि त्यांनाच देण्याचा आग्रह करणे कितपत योग्य आहे? आणि तुम्हाला ते मान्य आहे का? आणि मान्य नसेल तर ज्यांनी हे केले आहे त्यांच्यावर कारवाई कराल का? असे प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी विचारले आहेत. तसेच यावर तात्काळ कारवाई करून यामागे कोण आहे याची चौकशी करून हे परिपत्रक मागे घ्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

डब्ल्यूएचओ देखील चीनवर नाराज, कोरोनाशी संबंधित माहिती शेअर करत नसल्याचा खुलासा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक आरोग्य संघटनेवर चीनच्या बाजूने असल्याचा सतत आरोप केला आहे. मात्र, आता कोरोनाव्हायरस लसीच्या संशोधनाच्या बाबतीत डब्ल्यूएचओ हे चीनवर खूपच नाराज असल्याचा खुलासा झाला आहे. यापूर्वीही चीनवर लस संशोधन करण्याच्या प्रयत्नांमध्ये मुद्दाम अडथळा आणल्याचा आरोप करण्यात आला होता. आताही चीन कोरोना विषाणूशी संबंधित संशोधनाचा डेटा शेअर करण्यासाठी डब्ल्यूएचओकडे सतत दुर्लक्ष करत असल्याचे समोर आले आहे.

चीनमध्ये कोरोना विषाणूशी संबंधित काही महत्वाची माहिती लपविली गेली आहे. चीनमधील अनेक सरकारी प्रयोगशाळांनी या सर्वांवर संशोधन केले आहे, असे सांगणारे ईमेल तसेच अधिकृत कागदपत्रांद्वारे असोसिएट प्रेसची तपासणी करण्यात आली आहे. चीनने पूर्ण झालेल्या कोरोनाच्या टेस्ट, औषधोपचार आणि लसी संबंधित डेटा डब्ल्यूएचओशी शेअर करण्यास उशीरच केला नाही तर अनेक गोष्टी लपवल्या असल्याचा संशयही त्यांनी व्यक्त केला आहे.

एपीला असे काही ईमेल मिळालेले आहेत ज्यात कोरोना विषाणूशी संबंधित अनेक प्रकारची माहिती आहे. मात्र, डब्ल्यूएचओ आणि अन्य प्रयोगशाळांना ही माहिती उपलब्ध करून देण्यास चीनला काही आठवडे लागले. या कागदपत्रांमध्ये अनेक ईमेल, चिनी आरोग्य मंत्रालयाची गोपनीय कागदपत्रे आणि डझनभर कोरोना रूग्ण आणि त्यांवर उपचार घेतलेल्या लोकांच्या मुलाखतींचा समावेश आहे. या ईमेलवरून असे दिसून आले आहे की,’ डब्ल्यूएचओने जाहीरपणे चीनवर टीका केली नसली तरी ही संस्था केवळ चीनकडूनच डेटा मागत नव्हती तर चीनला सर्व डेटा शेअर करत नसल्याचा संशयही त्यांनी व्यक्त केला आहे.’या संदर्भात, डब्ल्यूएचओ अधिकारी आणि चिनी आरोग्य मंत्रालयामध्ये ईमेलद्वारे अनेक संभाषणे झाली. डब्ल्यूएचओच्या मेलमध्ये हे स्पष्टपणे सांगितले आहे की,’ चीनमुळे लसीचे संशोधन सुरू करण्यास उशीर झाला.’

या कागदपत्रांनुसार, डब्ल्यूएचओला कोरोनाशी संबंधित डेटा देण्यापूर्वीच हा सर्व डेटा चिनी सरकारी मीडिया सीसीटीव्हीवर प्रसारित केला जात होता. डब्ल्यूएचओच्या अधिकाऱ्यांनीही चीनच्या माध्यमांना १५ मिनिटांतच ही सर्व महत्वाची माहिती कशी मिळाली याबद्दल चीनला प्रश्न विचारला होता. एका बैठकीत चीनमधील डब्ल्यूएचओचे सर्वोच्च अधिकारी डॉक्टर गौदान गॅलेआ यांनीही चिनी अधिकाऱ्यांकडे याबद्दल कठोर शब्दांत जाब विचारला होता.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

‘या’ विश्वचषक विजेत्या कर्णधाराचे आयसीसीला आव्हान म्हणाला,’वर्णद्वेषाविरुद्ध बोला,अन्यथा परिणामासाठी तयार राहा’

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या जगभरात वर्णद्वेषाचा मुद्दा चर्चेत आला आहे. काही दिवसांपूर्वीच अमेरिकेत एका कृष्णवर्णियाच्या मृत्यूनंतर यावर जगभरातून तीव्र विरोध आहे, तसंच उर्वरित जगातून याविषयी आवाज उठत आहेत. क्रीडा जगतातले अनेक दिग्ग्जही त्याला विरोध करत आहेत. कॅरेबियन खेळाडू ख्रिस गेल आणि त्यानंतर वेस्ट इंडीजचा टी -२० विश्वचषक विजेता कर्णधार डॅरेन सॅमीने यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. मंगळवारी बोलताना त्याने आयसीसीला सांगितले की, ‘क्रिकेट जगाने एकतर वर्णभेदाविरोधात आवाज उठवावा की समस्येचा एक भाग आहेत असे म्हणण्यास सज्ज व्हा.

अमेरिकेत आफ्रिकन-अमेरिकन जॉर्ज फ्लॉयड याच्या निधनानंतर सॅमीने हे विधान केले आहे. एका श्वेतवर्णीय पोलिस अधिकाऱ्याने फ्लॉईडच्या मानेवर गुडघे ठेवला आणि त्याला ठार मारले. त्यानंतर अमेरिकेत अनेक ठिकाणी हिंसक आंदोलने सुरू झालेली आहे.

सॅमीने सोशल मीडियावरील आपल्या पोस्टमध्ये कृष्णवर्णियाच्या समस्यांबद्दल लिहिले. त्याने ट्वीट केले की,’ हा नवीन व्हिडिओ पाहिल्यानंतर, जर क्रिकेट जगत अश्वेतांवर होणाऱ्या या अन्यायाविरूद्ध उभे राहिले नाही तर तेही या समस्येचा भाग मानले जाईल. सॅमी म्हणाला की,’ वंशविदाचा सामना केवळ अमेरिकेतच नाही तर जगभरात केला जातो. त्याने असा प्रश्न केला की,’ माझ्यासारख्या लोकांचे काय होते आयसीसी आणि इतरही क्रिकेट बोर्ड याकडे पाहत नाहीत. माझ्यासारख्या लोकांवर हा सामाजिक अन्याय होत नाही का. ते म्हणाले की, ‘ हे फक्त अमेरिकेतच नाही होत तर हे दररोजच घडत असते.

आता गप्प बसण्याची ही वेळ नाही. मला तुमचा आवाज ऐकायचा आहे. सॅमी म्हणाला की,’ काळे लोकं बर्‍याच काळापासून हे सहन करीत आहेत. मी सेंट लुसियात आहे आणि जॉर्ज फ्लॉइडच्या मृत्यूबद्दल मला खेद आहे. आपण बदल आणण्यासाठी आपले समर्थन देखील देताय का? हॅशटॅग ब्लॅक लाइव्ह्स मॅटर.’

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

‘निसर्ग’ आपली परीक्षा घेत आहे, तेव्हा घरातच सुरक्षित राहा; मुख्यमंत्री ठाकरेंचे आवाहन

मुंबई । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निसर्ग वादळाच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियाद्वारे त्यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी चक्रीवादळाच्या काळात कोणती काळची घ्यावी याबाबत मार्गदर्शन केलं. सध्या राज्यात करोनाचं संकट उभं ठाकलं आहे. त्यातच निसर्ग हे चक्रीवादळ महाराष्ट्राच्या दिशेने सरकत आहे. निसर्ग आपली परीक्षा घेणं सोडत नाहीये, असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी यावेळी केलं. जीवनावश्यक वस्तू व्यवस्थित सांभाळून ठेवा असंही उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. १०० ते १२५ किमीच्या वेगाने सोसाट्याचा वारा आणि पाऊस असं येणार आहे. त्यामुळे काळजी घ्या, प्रशासन तुमच्यासोबत आहेच असंही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.

महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर यापूर्वी वादळं येऊन गेली. पण हे नुसतं वादळ नसून चक्रीवादळ आहे. या चक्रीवादळाची तीव्रता अधिक आहे. यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी. आपल्याव करोनाचे संकट आले. त्याचा सामना आपण धैर्याने केला. आता या निसर्ग वादळाचाही धैर्याने सामना करू. योग्य काळजी घेतल्यास आपण या संकटातून सुखरुप बाहेर पडू. वादळाच्या काळात आणि वादळानंतर अनावश्यक विजेची उपकरणं वापरू नका. तुमच्याकडील बॅटरी चार्ज करून घ्या, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

निसर्ग चक्रीवादळ महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर आलं आहे. अलिबागजवळ हे वादळ धडकण्याची शक्यता आहे. हे वादळ कदाचित हल्ली काही दिवसांमध्ये झालेल्या वादळांपेक्षा मोठं चक्रीवादळ आहे. प्रार्थना हीच आहे की हे वादळ हवेत विरुन जावं. प्रार्थनेला यश नक्कीच मिळेल असा विश्वास वाटतो असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. आपण सज्ज आहोतच. NDRF च्या १५ तुकड्या आहेत. तसेच नौदल, वायुदल, लष्कर आणि हवामान विभाग या सगळ्यांमध्येही समन्वय आहे असंही उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. करोनाचं संकट आपण जसं थोपवून धरलं आहे आणि ते परतवून लावणार आहोत तसंच हे वादळाचं संकट आपण परतवून लावू असंही उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं.

केंद्र सरकार तुमच्यासोबत आहे जी काही मदत लागेल ती सांगा असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. तसंच सोमवारी देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनीही यासंदर्भात सर्वतोपरी मदत करणार असल्याचं व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमध्ये सांगितल्याची माहितीही उद्धव ठाकरेंनी दिली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

३७ शतके झळकाविणारा ‘हा’ फलंदाज म्हणाला-‘विराट कोहलीला पाहून स्वतःला लाज वाटली’

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । या फलंदाजाने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत २२ हजाराहून अधिक धावा केल्या आहेत. त्याने त्याच्या फलंदाजीमध्ये ३७ शतके केली आहेत. सध्याच्या युगातील सर्वात स्फोटक सलामीवीरांमध्ये त्याचा समावेश आहे पण तो जेव्हा विराट कोहली फलंदाजी करताना पाहतो तेव्हा त्याला स्वतःची लाज वाटते. बांगलादेशचा कर्णधार तमीम इक्बाल याच्याबद्दल आम्ही बोल्ट आहोत, ज्याने संजय मांजरेकर यांच्याशी झालेल्या एका खास संभाषणात याची कबुली दिली आहे.

ईएसपीएन क्रिकइन्फोच्या पॉडकास्टमध्ये संजय मांजरेकर यांना दिलेल्या मुलाखती दरम्यान तमीम इक्बालने सांगितले की विराट कोहलीचे कठोर परिश्रम पाहिल्यानंतर स्वत: लाच लाज वाटत आहे. तमिम इक्बाल म्हणाला, ‘या भारतीय क्रिकेटरने आपल्या फिटनेसकडे बरेच लक्ष दिले आहे आणि त्याचा बांगलादेश क्रिकेट संघावरही परिणाम झाला आहे. मला असे म्हणायला लाज वाटत नाही कि विराट कोहलीला २-३ वर्षांपूर्वी जेव्हा जिममध्ये कठोर परिश्रम करताना पाहिले तेव्हा मला स्वतःची लाज वाटली होती. माझ्या एवढेच वय असलेला एक मुलगा आपल्या यशासाठी खूप मेहनत घेत होता,आणि मी त्याच्या अर्ध्याइतकीही मेहनत केली नाही.

तमिम इक्बाल म्हणाला की,’ बांगलादेश संघातील मुशफिकुर रहीम हा आपल्या ट्रेनिंग कडे बरेच लक्ष देतो. तमिम म्हणाला की सामन्याआधी आणि विश्रांतीच्या दिवसांतही तो कठोर परिश्रम करतो.

अलीकडेच तमिम इक्बाल आणि विराट कोहली यांनीही एकमेकांशी व्हिडिओ चॅट केला होता आणि त्यावेळी या बांगलादेशी कर्णधाराने विराटला त्याच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग करण्याचे रहस्य विचारले होते. यावर विराट कोहलीने सांगितले की,’ जेव्हा आपण तरुण होतो तेव्हा टीम इंडियाच्या लक्ष्याचा पाठलाग करताना झालेला पराभव तो पाहत असे. विराट कोहलीला वाटायचे की हा सामना आपण जिंकू शकू. विराट कोहली म्हणाला, ‘लक्ष्याचा पाठलाग करताना त्याच्यावर कोणताही दबाव नसतो. उलट गोष्टी त्याच्यासाठी सोप्या होतात कारण त्याला फलंदाजी कशी करावी हे माहित असते.’

जरी अलीकडे बांगलादेश आणि भारत यांच्यात मैदानावर बरीच भांडणे दिसत आहेत, परंतु तरीही मैदानाबाहेर या दोन्ही देशांचे खेळाडू एकमेकांचा खूपच आदर करतात. तमिम इक्बालसह बांगलादेशातील अन्य खेळाडूदेखील विराट कोहली आणि रोहित शर्माकडून बरेच काही शिकत असतात.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.