Tuesday, December 30, 2025
Home Blog Page 5712

अमेरिकेतील वर्णव्देषी आंदोलनात पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ‘हा’अभिनेता गंभीर जखमी पहा व्हिडीओ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेत काही दिवसांपूर्वी पोलिसांसोबत झालेल्या एका झटापटीत जॉर्ज फ्लॉईड या कृष्णवर्णीय व्यक्तीचा मृत्यू झाला होता. सध्या या घटनेचा संबंध हा अमेरिकेतील वर्णव्देषाशी जोडला जात आहे. याचा परिणाम असा झाला कि अमेरिकेत कृष्णवर्णीय लोकांनी अमेरिकन प्रशासनाविरोधात आंदोलन सुरु केलं आहे. या आंदोलनाला थोपवण्यासाठी गोळीबार करण्याचा आदेशही नुकताच देण्यात आलेला आहे. या गोळीबारात अभिनेता केन्ड्रिक सॅम्पसन हा जखमी झाला आहे. त्याला एकूण सात गोळ्या लागलेल्या आहेत.

जॉर्ज फ्लॉइडच्या संशयास्पदरित्या झालेल्या मृत्यूमुळे अमेरिकेतील कृष्णवर्णीयांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. त्यांनी आपला राग व्यक्त करण्यासाठी थेट व्हाईट हाऊससमोर जाऊन निदर्शने केली. या आंदोलनात अभिनेता केन्ड्रिक सॅम्पसन हादेखील सामिल झाला होता. दरम्यान झालेल्या पोलिसांकडून करण्यात आलेल्या रबरी गोळीबारात तो गंभीर जखमी झाला आहे. त्याला एकूण सात गोळ्या लागल्या आहेत. पोलीस फक्त एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी त्याच्यावर लाठीहल्ला देखील केला, असा आरोप त्याने केला आहे.


View this post on Instagram

 

I cut this together from both of our IG live stream POVs. Keep in mind, I don’t know this man AT ALL. I want to make this really clear. He was targeted because he called out the undercover cops in the LAPD. He said that the people throwing things (water bottles and such) at the police are not protesters, they are undercover cops (agent provocateurs/infiltrators) who are agitators and trying to give justification to the brutality. He said over the bullhorn to turn your camera’s on the people throwing stuff and call them out because they are LAPD!! VERY shortly after, he was tackled and the people around him were viciously brutalized as you can see in this video to ensure no interference even though no one was interfering. Now to be clear, I don’t EVER advocate for turning your camera on a protestor. I am not demonizing or denouncing the tactics we use to dismantle police/slave catching or #DefundPolice. We have to be creative and relentless. I am not demonizing or denouncing the way we get to express our rage, grief, mourning or trauma in this moment. And I’m talking about Black people. Non Black people – especially white folks – know that what you do at these protests directly affects the lives of Black protesters as you scream #BlackLivesMatter BUT apparently in this moment – HE KNEW SOMETHING or he FELT something. And apparently he happened to be right. I have some videos I’m sorting through now. And he was targeted for it. #DefundthePolice #DefendBlackLives #ProsecuteKillerCops

A post shared by Kendrick Sampson (@kendrick38) on May 31, 2020 at 6:36pm PDT

 

केन्ड्रिकने आपले हे आरोप सिद्ध करण्यासाठी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ देखील पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये पोलीस आंदोलन कर्त्यांवर लाठीमार करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे.जॉर्ज फ्लॉईडच्या मृत्यूमुळे अमेरिकेतील वातावरण सध्या प्रचंड पेटलेलं आहे. लोक कोरोना विषाणूची पर्व न करता रस्त्यांवर येऊन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात घोषणा देत आहेत. या आंदोलनाला शकिरा, टेलर स्विफ्ट, मॅडोना, लेडी गागा यांसारख्या अनेक मोठ्या हॉलिवूड कलाकारांनीही आपला पाठिंबा दर्शवला आहे. तसेच काही सेलिब्रिटींनी तर नोव्हेंबरमध्ये तुम्हाला मतदानच करणार नाही अशी धमकीच ट्रम्प याना द्यायला सुरुवात केली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

.. अन्यथा तुमचं तोंड बंद ठेवा! ट्रम्प यांना पोलीस अधिकाऱ्याने सुनावले खडे बोल

ह्युस्टन । अमेरिकेत मिनियापोलिसमध्ये पोलीस कस्टडीत कृष्णवर्णीय जॉर्ज फ्लॉइडच्या हत्येनंतर वर्णद्वेष विरोधी आंदोलन अमेरिकेत चिघळत आहे. अनेक राज्यांमध्ये हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. आंदोलकांचा ट्रम्प यांच्याविरोधात रोष वाढत असताना पोलिस अधिकाऱ्यांनी ट्रम्प यांना खडे बोल सुनावले. अमेरिकेतील वाढत्या हिंसाचाराला अटकाव करण्यासाठी लष्कराला पाचारण करणार असल्याचे ट्रम्प यांनी जाहीर केले. हिंसाचाराच्या घटना हे राज्य प्रशासनाचे अपयश असल्याचेही ट्रम्प यांनी सांगितले. ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर ह्युस्टन पोलीस प्रमुख आर्ट एक्वेडो यांनी ट्रम्प यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.

त्यांनी सांगितले की, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना सांगू इच्छितो की, जर तुमच्याकडेही काही बोलण्यासाठी ठोस मुद्दे नाहीत. तर, किमान आपले तोंड बंद ठेवायला हवे. ट्रम्प यांच्यामुळे देशातील २०-२१ वर्षाच्या मुलांचे आयुष्य धोक्यात आले आहे. लोकांनी रस्त्यावर यावे आणि आक्रमक व्हावे असे आम्हाला वाटत नाही, असेही त्यांनी सांगितले. देशाला सध्या एका नेतृत्वाची आवश्यकता आहे. या काळात आपण सर्व एक आहोत, अशी भावना राष्ट्राध्यक्षांकडून लोकांमध्ये जाण्यास हवी, असेही त्यांनी म्हटले.

दरम्यान, ट्रम्प यांनी एक जून रोजी राज्यांच्या राज्यपालांसह व्हिडिओ कॉन्फरन्सवर संवाद साधला. यावेळी त्यांनी आंदोलकांवर नियंत्रण मिळवण्यास सांगितले. आंदोलन मोडून काढून आंदोलकांना तुरुंगात डांबायला हवे. हे जर करता येत नसेल तर तु्म्ही वेळेचा अपव्यय करत आहात, असेही ट्रम्प यांनी म्हटले. डोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विट, वक्तव्यांमुळे परिस्थिती आणखी चिघळत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

माजी कर्णधार गांगुलीचे कौतुक करताना लक्ष्मणने म्हंटले,’ दिलदार क्रिकेटर’

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताचा माजी क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मणने मंगळवारी माजी कर्णधार सौरव गांगुलीबद्दल एक मोठे विधान केले आहे. माजी कर्णधार सौरव गांगुली मोकळेपणाने कसा खेळायचा हे लक्ष्मणने सांगितले आहे. लक्ष्मणने लॉडर्स मैदानावर नॅटवेस्ट ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात गांगुलीने टी-शर्ट काढून भिरकवतानाचा फोटो पोस्ट करत लिहिले की, “अपंरपरागत आणि गर्व असणारा माणूस. सौरव गांगुली हा एक मुक्त मनाने खेळणारा माणूस होता आणि कधीकधी तो बाजूलाही ठेवला जात असे.” “

१३ जुलै २०२० रोजी भारताने इंग्लंडविरुद्ध २ विकेट राखून ३२६ धावांचे विशाल लक्ष्य गाठून नॅटवेस्ट करंडक जिंकला होता. त्यावेळी भारतीय क्रिकेट संघाचा हा सर्वात मोठा विजय होता. मोहम्मद कैफच्या नाबाद ८७ धावा आणि युवराज सिंगच्या ६२ धावांनी या विजयात मोलाचा वाटा उचलला. लक्ष्मणने बीसीसीआयच्या या विद्यमान अध्यक्षांविषयी पुढे लिहिले की, “ शक्तिशाली युवा खेळाडू ज्यांनी पुढे जाऊन अनेक महान खेळी खेळल्या याचे श्रेय गांगुलीच्या नेतृत्त्वाला जाते.”

महत्त्वाचे म्हणजे सौरव गांगुलीची गणना भारताच्या सर्वात यशस्वी कर्णधारांमध्ये केली जाते. गांगुलीने भारताकडून ११३ कसोटी सामन्यांत ७२१२ धावा आणि ३११ एकदिवसीय सामन्यांमध्ये ११३६३ धावा केल्या आहेत. भारतीय संघाचा माजी फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मणने रविवारी सांगितले होते की, ज्या खेळाडूंसोबत मी खेळलो आहे आणि ज्यांनी त्याच्यावर पुढील काही वर्ष मोठा प्रभाव टाकला आहे त्यांना तो आठवेल.

 

लक्ष्मणने सर्वात आधी आपल्या माजी सहकारी फलंदाज सचिन तेंडुलकरचे नाव घेतले आणि सचिनबद्दल लिहिले की, ” मी माझ्या कारकिर्दीत खूप भाग्यवान आहे, ज्याने आपल्या चमकदार खेळामुळे मला सतत प्रेरणा दिली. शिकण्यासारखे अनेक धडे मी त्याच्याकडून शिकलो. त्याने स्वतःची कारकीर्द ज्या प्रकारे हाताळली ते कौतुकास्पद आहे. पुढील काही दिवस मी त्यासहकारी मित्रांना आठवण आहे, ज्यांनी मला खूप प्रभावित केले. ”

यानंतर माजी कर्णधार अनिल कुंबळे याच्या सन्मानार्थ लक्ष्मणने ट्वीट केले की, “तो हरप्रकारे एक महान खेळाडू आहे, तो सर्व शक्यतांपेक्षा पुढे गेला आहे आणि त्याने नेहमीच आपली जबाबदारी चोख पार पाडली आहे. या फोटोमध्ये अनिल कुंबळेचे धैर्य दिसत आहे. काहीही असो, कधीही हार मानू नका, हे गुणच कुंबळेला महान क्रिकेटपटू बनवते. “

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

इंग्लंड क्रिकेटने वर्ल्ड कप २०१९च्या अंतिम सामन्यातील ‘हे’ भावनिक छायाचित्र शेअर करुन केला वंशद्वेषाचा विरोध

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेतील एका गोऱ्या पोलिस कर्मचाऱ्याने केलेल्या एका काळ्या माणसाच्या हत्येविरोधात संपूर्ण अमेरिकेत निदर्शने केली जात आहेत. दरम्यान, इंग्लंड क्रिकेटने वर्ल्ड कप २०१९ च्या अंतिम सामन्याचे एक छायाचित्र पोस्ट करून वंशद्वेषाचा विरोध केला आहे. या छायाचित्रात जोस बटलर, जोफ्रा आर्चर आणि आदिल रशीद हे एकमेकांना मिठी मारताना दिसत आहेत.

हे भावनिक छायाचित्र पोस्ट करत इंग्लंड क्रिकेट मंडळाने ‘आम्ही विविधतेसाठी उभे आहोत, आम्ही वर्णद्वेषाच्या विरोधात आहोत’ असे लिहिले आहे.

 

तत्पूर्वी वेस्ट इंडीजचा सलामीवीर ख्रिस गेल म्हणाला की,’ वर्णभेद फक्त फुटबॉलमध्येच नाही तर क्रिकेटमध्येही आहे.’ गेलने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिले आहे की, “काळ्या लोकांचे जीवन हे इतर लोकांच्या जीवनसारखेच महत्त्वाचे असते. काळे लोक महत्त्वाचे असतात (ब्लॅक लाइव्ह्स मॅटर). गेल म्हणाला की, “मी संपूर्ण जगाचा प्रवास केला आहे आणि मी वर्णविद्वेषी गोष्टी ऐकल्या आहेत कारण मी काळा आहे. त्यावर विश्वास ठेवा. ही यादी वाढतच जाईल.” त्याच वेळी, बुंडेस्लिगा दरम्यान, काही तरुण खेळाडूंनी जॉर्ज फ्लॉइडच्या मृत्यूच्या निषेध आणि पोलिसांच्या हस्ते अन्य काळ्या लोकांच्या हत्येचा निषेध म्हणून न्याय मिळावा या मागणीसाठी निवेदने दिली.

त्याच वेळी, एनबीए (नॅशनल बास्केटबॉल असोसिएशन) चा माजी दिग्गज खेळाडू मायकेल जॉर्डन जॉर्ज फ्लॉइडच्या मृत्यूमुळे तसेच पोलिसांनी केलेल्या काळ्या लोकांच्या हत्येमुळे आणि त्यामुळे उद्भवलेल्या परिस्थितीबद्दल “निराश आणि रागात” आहेत. ट्विटरवर जॉर्डनने दिलेल्या निवेदनात म्हणाले, “मी खूप निराश आणि संतप्त झालो आहे.”

ते म्हणाले, “प्रत्येकाची वेदना, राग आणि निराशा मला समजली आणि जाणवली. मी अशा लोकांच्या विरोधात उभा आहे जे आपल्या देशात जातीच्या आधारे वंशद्वेष आणि लोकांबद्दल हिंसाचार पसरवित आहेत. यावेळी, आपण सर्वांनी एकत्र येऊन आवाज उठवण्याची गरज आहे जेणेकरुन सरकार यासंबंधी कठोर कायदा करेल. “

बेसबॉल टीम न्यूयॉर्क मेट्सचा स्टार खेळाडू पेट अलोन्सोने या संपूर्ण घटनेबद्दल निराशा व्यक्त केली आणि ते म्हणाले की, “माझे शब्द स्वतंत्र आहेत आणि मी गप्प बसणार नाही.” जॉर्ज फ्लॉयडच्या झालेल्या हत्येमुळे मी दु: खी झालो आहे. “

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

राज्यसभा निवडणूक: भाजपने ज्योतिरादित्य शिंदेंना तर काँग्रेसने दिग्विजय सिहांना दिली उमेदवारी

भोपाळ । काँग्रेससोडून भाजपच्या गोटात सामील झालेल्या ज्योतिरादित्य शिंदेंना अखेर भाजपने राज्यसभेची उमेदवारी जाहीर केली. शिंदे यांनी काँग्रेस पक्ष सोडताना आपल्यासोबत काँग्रेसच्या २२ आमदारांनाही फोडलं. त्यामुळेच राज्यात कमलनाथ सरकार कोसळलं. आता ज्योतिरादित्य शिंदे भाजपच्या तिकीटावर राज्यसभेच्या मैदानात उतरले असताना दुसरीकडे काँग्रेसच्या तिकिटावर दिग्विजय सिंह यांना राज्यसभेवर धाडण्याची तयारी करण्यात आली आहे.

उल्लेखनीय म्हणजे, मध्य प्रदेशात राज्यसभेच्या ३ जागांसाठी ४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत. भाजपकडून ज्योतिरादित्य शिंदे आणि सुमेर सिंह सोलंकी यांना संधी मिळाली आहे. तर काँग्रेसकडून दिग्विजय सिंह यांच्यासोबत फूल सिंह बरैया यांना तिकीट देण्यात आलं आहे. काँग्रेसकडून दिग्विजय सिंह यांना तर भाजपकडून ज्योतिरादित्य शिंदे यांना पहिली जागा निश्चित मानली जात आहे. त्यामुळे, दोन्हीही नेते राज्यसभेत पोहचण्यात यशस्वी ठरतील, असं समजलं जातं आहे.

परंतु, मुख्य पेच आहे तो केवळ तिसऱ्या जागेचा. काँग्रेसच्या २२ आमदारांच्या राजीनाम्यानंतर राजकारणाचं संपूर्ण गणितंच पालटलं आहे. त्यामुळे तिसरी जागा आता आणखीनच चुरशीची झाली आहे. राज्यात कमलनाथ सरकार कोसळल्यानंतर मुख्यमंत्री शिवराज सिंह यांनी बहुमत सिद्ध करताना त्यांच्या गोटात ११२ आमदार होते. यातील १०७ आमदार भाजपचे होते तर सपा, बसपा आणि अपक्षांनी शिवराज सरकारला समर्थन दिलं होतं.

दरम्यान, कोरोना फैलाव सुरु असताना स्थगित करण्यात आलेल्या राज्यसभा निवडणुकीला आता निवडणूक आयोगानं परवानगी दिली आहे. निवडणूक आयोगानं राज्यसभेच्या १० राज्यांच्या २४ जागांसाठी निवडणुकीची घोषणा केली. या सर्व जागांसाठी येत्या १९ जून रोजी निवडणूक पार पडणार आहे. राज्यसभा निवडणुकीत आंध्र प्रदेश ४, गुजरात ४, झारखंड २, मध्य प्रदेश ३, राजस्थान ३ तसंच मणिपूर-मेघालयाच्या १-१ जागेचा समावेश आहे. तसंच जून-जुलैमध्ये रिकाम्या होणाऱ्या अरुणाचल प्रदेश १, कर्नाटकच्या ४ आणि मिझोरमच्या एका जागेवरही ही निवडणूक पार पडणार आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

जॉर्ज फ्लॉयडच्या अंत्यसंस्काराचा खर्च बॉक्सर फ्लॉयड मेवेदर उचलणार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । माजी बॉक्सिंग चॅम्पियन फ्लॉयड मेवेदरने जॉर्ज फ्लॉयडच्या अंत्यसंस्कार आणि शोकसभेचा खर्च देण्याची ऑफर केली, जी त्याच्या कुटुंबीयांनी स्वीकारली आहे. मेवेदर प्रमोशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी लिओनार्ड एलेर्बे यांनी सांगितले की,’ ते स्वतःच त्या कुटुंबाशी संपर्कात आहेत. फ्लॉयडचे मूळ शहर हॉस्टनमध्ये ९ जूनला त्याच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत ज्याचा संपूर्ण खर्च ते उचलणार आहे.

मिनीयापोलिसमध्ये एका काळ्या व्यक्तीचा मृत्यू झाला जेव्हा एका पोलिसाने त्याचे हात बांधले आणि गुडघ्याने त्याचा गळा दाबला. त्यानंतर संपूर्ण देशभरात हिंसक निषेधाचा एक टप्पा सुरू झाला आहे. एलेरबेन यांनी सांगितले की, जॉर्जच्या अंत्यसंस्काराशी संबंधित सर्व खर्च मेवेदर करणार आहेत. लास वेगासमध्ये राहणारे मेवेदर अजून त्या कुटुंबाला भेटलेले नाहीत. एकदा तर त्याने आपल्या प्रतिस्पर्ध्याच्या अंत्यसंस्काराचाही खर्च उचलला होता.

या घटनेनंतर सम्पूर्ण क्रीडा जगताने या वर्णद्वेषाचा विरोध केला आहे. अलीकडेच इंग्लंड क्रिकेटने वर्ल्ड कप २०१९ च्या अंतिम सामन्याचे छायाचित्र पोस्ट करुन या वंशद्वेषाचा विरोध केला आहे. या छायाचित्रात जोस बटलर, जोफ्रा आर्चर आणि आदिल रशीद एकमेकांना मिठी मारताना दिसत आहेत. हे भावनिक छायाचित्र पोस्ट करत इंग्लंड क्रिकेटने ‘आम्ही विविधतेसाठी उभे आहोत, आम्ही वर्णद्वेषाच्या विरोधात आहोत’ असे लिहिले आहे.

 

तत्पूर्वी वेस्ट इंडीजचा सलामीवीर ख्रिस गेल म्हणाला की,’ वर्णभेद फक्त फुटबॉलमध्येच नाही तर क्रिकेटमध्येही आहे.’ गेलने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिले आहे की, “काळ्या लोकांचे जीवन हे इतर लोकांच्या जीवनसारखेच महत्त्वाचे असते. काळे लोक महत्त्वाचे असतात (ब्लॅक लाइव्ह्स मॅटर). गेल म्हणाला की, “मी संपूर्ण जगाचा प्रवास केला आहे आणि मी वर्णविद्वेषी गोष्टी ऐकल्या आहेत कारण मी काळा आहे. त्यावर विश्वास ठेवा. ही यादी वाढतच जाईल.”

chris gayle, racism, george floyd, racism in cricket, sports news, cricket, क्रिकेट, क्रिस गेल, नस्‍लवाद, स्‍पोर्ट्स न्‍यूज

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

‘निसर्ग’ चक्रीवादळ अलिबागला धडकण्याची शक्यता; एनडीआरएफच्या अतिरिक्त तुकड्या तैनात

अलिबाग । हवामान खात्याने दिलेल्या ताज्या माहितीनुसार मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या अलिबागमध्ये निसर्ग चक्रीवादळ शक्यता आहे. त्यामुळे अलिबागमध्ये एनडीआरएफच्या अतिरिक्त तुकड्या तैनात करण्यात आल्या असल्याची माहिती जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिली. तसेच नागरिकांना सतर्कत राहण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे.

यापूर्वी हरिहरेशवर येथे चक्रीवादळ धडकण्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता. मात्र, आता निसर्ग अलिबागला धडकण्याची शक्यता आहे, अशी माहिती रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी ही माहिती दिली. जिल्हाधिकारी निधी यांच्या माहितीनंतर अलिबाग येथे एनडीआरएफची आणखी दोन पथके दाखल होणार आहेत. दरम्यान, सध्या श्रीवर्धन आणि अलिबाग येथे प्रत्येकी एक पथक तैनात करण्यात आले आहे.

अरबी समुद्रातल्या कमी दाबाच्या पट्ट्याची तीव्रता वाढली, उद्यापर्यंत या पट्ट्याचे चक्रीवादळात रुपांतर होईल असा भारतीय हवामान विभागाचा अंदाज आहे. अरबी समुद्रातल्या कमी दाबाच्या पट्ट्याचं रूपांतर परवापर्यंत गंभीर स्वरुपाच्या चक्रीवादळामध्ये होण्याची शक्यता असून, हे वादळ येत्या ३ जूनला महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनारपट्टीवरून पुढे सरकेल, अशी शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.

दरम्यान, मुंबई, कोकणासह दक्षिण गुजरापर्यंत निसर्ग चक्रीवादळाचा फटका बसणार असल्याचं सांगितलं जात होतं. त्यामुळे मुंबईसह कोकण किनारपट्ट्यांवर एनडीआरएफच्या १५ टीम तैनात करण्यात आल्या आहेत. श्रीवर्धन येथे आज सकाळपासून ढगाळ वातावरण होतं. दुपारनंतर श्रीवर्धन येथे पावसाला सुरुवात झाली आहे. वादळाचा धोका पाहता मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. तसेच नागरिकांनाही सतर्क राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

मलाही अनेकदा वर्णभेदाचा सामना करावा लागलाय; क्रिस गेलचा धक्कादायक खुलासा

वेस्ट इंडिज । अमेरिकेत जॉर्ज फ्लॉयड या कृष्णवर्णीय व्यक्तीचा पोलिस कोठडीमध्ये मृत्यू झाला होता. २५ मे रोजी घडलेल्या या घटनेचे पडसाद आता संपूर्ण अमेरिकेत पसरत आहेत. जॉर्जला न्याय मिळावा यासाठी लाखो अमेरिकन नागरिक रस्त्यावर येऊन वर्णभेदाविरुद्ध घोषणाबाजी करत आहेत. जागतिक पातळीवर या घटनेचा निषेध होत असताना, वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू ख्रिस गेलनेही क्रिकेटमध्ये वर्णद्वेष होत असल्याचा धक्कादायक खुलासा केला आहे.

गेलने आपल्या इन्स्टाग्राम पेजवर याबाबत एक पोस्ट टाकत याबाबत आपलं मत मांडलं आहे. “इतरांप्रमाणे प्रत्येक कृष्णवर्णीय व्यक्तीच्या आयुष्यालाही तितकंच महत्व आहे. वर्णद्वेष करणाऱ्या लोकांनी आम्हाला मूर्ख समजणं बंद करावं. कधी-कधी आमच्यापैकी काही लोकं इतरांना वर्णद्वेष करण्याची संधी देत असतात, आपल्याला कमी लेखणं थांबवा असं आवाहन मी करेन. मी आतापर्यंत अनेक देश फिरून आलोय, मी कृष्णवर्णीय असल्यामुळे मलाही भेदभावाचा सामना करावा लागला आहे. विश्वास ठेवा वर्णद्वेष हा फक्त फुटबॉलमध्ये नाही तर तो क्रिकेटमध्येही आहे. अनेक संघांमध्ये हा प्रकार होतो.” अशा आशायचा संदेश गेलने आपल्या इन्स्टाग्राम पेजवर लिहीला आहे.

दरम्यान, क्रिकेटच्या मैदानावरही याआधी अनेकदा वर्णद्वेषाच्या घटना घडल्या आहेत. इंग्लंडचा नवोदीत अष्टपैलू खेळाडू जोफ्रा आर्चरला न्यूझीलंडविरुद्ध कसोटी सामन्यात वर्णद्वेषी टिपण्णी ऐकावी लागली होती. आर्चरने सोशल मीडियावर याचा खुलासा केला होता. जॉर्जच्या मृत्यूनंतर अमेरिकेत हजारो नागरिक रस्त्यावर उतरले असून राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रदर्शन करणाऱ्या नागरिकांविरोधात सैन्यदल रस्त्यावर उतरवण्याचा इशारा दिला आहे. जॉर्ज फ्लॉयड याच्या मृत्यूप्रकरणात ट्रम्प यांनी घेतलेल्या भूमिकेवरही अमेरिकेत संताप व्यक्त होतो आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

‘भीम’ ऍपचा डाटा चोरीला? मोदी सरकारने केला ‘हा’ खुलासा

नवी दिल्ली । कॅशलेस किंवा डिजिटल पेमेंटला चालना देण्यासाठी मोदी सरकारकडून जोरदार प्रचार करण्यात आलेल्या ‘भीम’ ऍप सध्या वादात सापडलं आहे. या ऍपचा डाटा लीक झाल्याचा दावा एका इस्रायली सायबर सिक्युरिटी फर्मनं केला होता. ‘व्हीपीएन मेन्टॉर’ या सायबर सिक्युरिटी फर्मनं केलेल्या दाव्यानुसार, भारतातील भीम ऍप वापरणाऱ्या ७२.६ लाख युझर्सचा डाटा लीक झाला आहे. परंतु, भारत सरकारकडून मात्र हा दावा फेटाळण्यात आला आहे. ‘भीम’ वापरकर्त्यांचा डाटा कोणत्याही प्रकारे लीक झालेला नाही असं सांगत भारतानं इस्रायली संस्थेचा दावा खोडून काढला आहे. ‘भीम’ ऍप सुरक्षित असल्याचं नॅशनल पेमेंटस कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या भारत सरकारच्या संस्थेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

दरम्यान, ‘व्हीपीएन मेन्टॉर’च्या दाव्यानुसार या ऍप युझर्सची महत्त्वाची माहिती लीक झाली आहे. या माहितीत युझर्सच नाव, जन्मतारीख, वय, लिंग, घराचा पत्ता, आधारकार्ड अशा संवेदनशील माहितीचा समावेश आहे. याचा फटाक संपूर्ण भारतातील लोकांना बसू शकतो. याचा फायदा उचलत हॅकर्स आणि सायबर गुन्हेगार फसवणूक, चोरी आणि सायबर हल्लेही करू शकतात, असा दावा व्हीपीएननं केला होता.

‘भीम’ ऍपचा डाटा लीक झाला असल्याच्या काही बातम्या समोर येताच भीमऍप युझर्सच्या डेटा सुरक्षितेबाबत तडजोड करत नाही. त्यामुळे अशा खोट्या बातम्यांपासून नागरिकांनी सावध राहावं, असं स्पष्टीकरण भारत सरकारकडून देण्यात आलं हवे. ‘एनपीसीआय अत्यंत उच्च दर्जाचे सुरक्षा तंत्रज्ञान वापरते आणि युझर्सच्या डेटा सुरक्षेसाठी कटिबद्ध आहे. पेमेंटची अत्याधुनिक सेवा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि पुढेही राहू’ असंही सरांकडून सांगण्यात आलं आहे.

केंद्र सरकारच्या संयुक्त सहकार्यानं ‘सीएससी – ई गव्हर्नन्स सर्व्हिसेस’ या कंपनीनं ‘भीम’ हे ऍप तयार केलं. नोटबंदीनंतरच्या काळात मोदी सरकारकडून राबवण्यात आलेल्या ‘डिजिटल भारत’ या संकल्पनेला उभारी देताना मोदी सरकारनं या ऍपचा प्रचार केला होता. परंतु, या ऍपमधील महत्त्वाचा डाटा हा ‘अमेझॉन वेब सर्व्हिसेस एस-३ बकेट’मध्ये सेव्ह झाल्याचा दावा इस्त्रायली फर्मनं केला होता.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

… आणि कोमामधून बाहेर येताच तो चक्क बोलू लागला फ्रेंच … जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इंग्लंडमध्ये नुकतेच एक प्रकरण समोर आले आहे ज्याची सोशल मीडियावर खूप चर्चा होते आहे. येथे रोरी कर्टिस नावाच्या एका फुटबॉलरचा २०१४ मध्ये एक भयंकर अपघात झाला ज्यानंतर तो ६ दिवस कोमामध्ये होता. मात्र याविषयी धक्कादायक गोष्ट अशी आहे की,’ कोमामधून बाहेर आल्यानंतर तो अचानक खूप चांगल्या पद्धतीने फ्रेंच बोलू लागला तसेच त्याला त्याच्या आयुष्यातील मागची १२ वर्षेदेखील आठवली नाहीत.

कर्टिस इंग्लंडमध्ये राहतो आणि १८ व्या शतकात त्याचे पूर्वज फ्रान्सच्या नॉर्मंडी भागात राहत असत, तरी त्यांच्या कुटुंबातील कोणालाही फ्रेंच भाषा बोलता येत नाही. कर्टिसची ही गोष्ट सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. लोक या घटनेला पूर्वजन्म आणि चमत्कारांसारख्या गोष्टींशी जोडत आहेत. कर्टिस म्हणतो की,’ त्याने कदाचित शाळेत कधीतरी फ्रेंच शिकण्याचा प्रयत्न केला होता, परंतु कोमामधून उठल्यानंतर त्याने ही भाषा अगदी चांगल्या प्रकारे बोलण्यास सुरुवात केली, हे सर्व कोठून शिकले हेदेखील त्याला आठवत नाही.

फ्रेंच काही दिवसात विसरला
बीबीसीच्या वृत्तानुसार, कर्टिस कोमातून बरा होत असताना पुन्हा फ्रेंच बोलायला विसरला तेव्हा डॉक्टरांना मोठा धक्काच बसला. ऑगस्ट २०१४ मध्ये कर्टिसचा गंभीर अपघात झाला होता, त्यानंतर त्याला कारमधून बाहेर काढण्यासाठी ४० मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागला होता. त्याला बर्मिंघमच्या एका रुग्णालयात नेण्यात आले आणि तेथे तो ६ दिवस कोमामध्ये होता.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.