Tuesday, December 30, 2025
Home Blog Page 5713

पंजाब नॅशनल बँकेनं व्याज दारात केली ‘इतकी’ घट; कार-होम लोन झाले स्वस्त

नवी दिल्ली । लॉकडाऊन ५ लागू झाल्यानंतर घर किंवा कार खरेदी करण्याच्या विचारत असलेल्यांसाठी एक चांगली बातमी आहे. सार्वजनिक क्षेत्रातील दोन प्रमुख बँकांनी नुकत्याच झालेल्या व्याजदरात (Intrest Rate) कपात केल्यानंतर आता देशातील दुसर्‍या क्रमांकाची पंजाब नॅशनल बँकने (PNB) आपल्या व्याजदरामध्ये कपात करण्याची घोषणा केली आहे. पंजाब नॅशनल बँक (PNB) ग्राहकांना अत्यंत कमी व्याज दरावर गृह कर्जे (Home Loan)आणि वाहन कर्जे (Auto Loan) प्रदान देणार आहे.

दुसर्‍या क्रमांकाची सरकारी बँक असलेल्या पंजाब नॅशनल बँकने (PNB) सोमवारी कर्जावरील रेपो दरात 0.40 टक्के सूट जाहीर केली. आता हा व्याजदर ७.०५टक्क्यांवरून ६.६५ टक्के होईल.तज्ज्ञांच्या मते, घर किंवा कार खरेदी करण्याच्या विचारात असलेल्या लोकांसाठी हा दर फारच कमी आहे. आता ग्राहकांना कर्जावरील कमी व्याजदराचा थेट लाभ मिळणार आहे.

बँकेने एका निवेदनात म्हटले आहे की या व्यतिरिक्त सर्व परिपक्वता अवधीच्या कर्जासाठी आधारित व्याज दर एमसीएलआर आधारित ०.१५ टक्क्यांनी कमी करण्यात आले आहेत.बचत खात्यांवरील व्याज दरही बँकेने ०.५० टक्क्यांवरून कमी करून ३.२५ टक्के केले आहेत. सुधारित दर १ जुलैपासून लागू होणार असल्याचे बँकेने म्हटले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

सीमा वादाच्या पार्श्वभूमीवर चीनने भारतापुढे ठेवला ‘हा’ प्रस्ताव

वृत्तसंस्था । लडाख सीमा वादावरून ताणलेले संबंध सुधरवण्यासाठी चीनने भारतासमोर आणखी एक प्रस्ताव दिला आहे. आर्थिक विकासासाठी भारताने चीनच्या ‘बेल्ट ऍण्ड रोड इनिशिएटीव’ (बीआरआय) प्रकल्पात सहभागी व्हावे असे चीनला वाटत आहे. भारतासाठी हा प्रस्ताव महत्त्वाचा ठरणार असून आर्थिक विकासाच्या संधी त्यांच्यासाठी उपलब्ध होणार असल्याचे चीनने म्हटले आहे.

चीन सरकारच्या ‘ग्लोबल टाइम्स’मध्ये प्रकाशित झालेल्या एका लेखात भारताला ‘बीआरआय’चा प्रस्ताव देण्यात आला आहे. चीनच्या प्रस्तावित बीआरआय प्रकल्पामुळे भारताच्या आर्थिक विकासाला हातभार लागू शकतो. बीआरआय प्रकल्पाचा उद्देश्य देश आणि संबंधित क्षेत्राच्या विकास करणे आहे. पायाभूत सुविधांमधील गुंतवणुकीतून बीआरआय प्रकल्पातून भारताला फार मोठी संधी मिळणार असून परदेशी गुंतवणूक वाढवण्यासाठी आणि औद्योगिक विकासासाठी ही गुंतवणूक महत्त्वाची असल्याचे चीनने म्हटले आहे.

भारताच्या अर्थव्यवस्थेत मागील काही वर्षात वेगाने वाढ होत आहे. मात्र, पायाभूत सुविधा फारशा विकसित नसल्यामुळे विकासात अडचणी निर्माण होत असल्याचे चीनने म्हटले आहे. भारताने १९९१ पासून आर्थिक सुधारणा केल्या असल्या तरी आर्थिक संकट, व्यापार नुकसान, महागाईचे संकट आहे. भारताने बीआरआयमध्ये गुंतवणूक केल्यास मोठ्या प्रमाणावर या समस्या सुटणार असल्याचा दावा चीनने केला आहे. करोनाच्या संकटानंतर सगळेच देश आर्थिक विकासासाठी प्रयत्न करणार आहेत. हिंदी महासागर आणि आजूबाजूचा परिसर बीआरआयसाठी उपयुक्त असल्याचे चीनने म्हटले आहे.

याआधी भारताने चीनचा ‘तो’ प्रस्ताव फेटाळला
भारताने याआधीच बीआरआय प्रकल्पात सहभागी होण्याचा प्रस्ताव फेटाळून लावला आहे. चीनचा हा प्रकल्प भारताच्या सार्वभौमत्वाला धक्का असल्याची भूमिका भारताने मांडली आहे. चीनने पाकिस्तानसह इकॉनॉमिक कॉरिडोअर प्रकल्प सुरू केला असून भारताने त्याला विरोध दर्शवला आहे. या प्रकल्पातील मार्ग पाकव्याप्त काश्मीरमधील गिलगिट-बाल्टिस्तानमधून जातो.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

भारत-नेपाळ सीमा वादाला नवीन वळण, विवादास्पद नकाशावर नेपाळी संसदेत मांडले जाणार विधेयक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उद्या नेपाळच्या संसदेमध्ये भारताच्या सीमेवरील वादाबाबत एक विधेयक मांडले जाईल. नेपाळचा एक भाग म्हणून या विधेयकात कालापानी, लिंपियाधुरा आणि लिपुलेख यांचा उल्लेख आहे आणि त्याला घटनात्मक आधार देण्यात येईल. भारताच्या या भागांवर नेपाळ आपला हक्क सांगत आहे. अलीकडेच नेपाळने आपल्या नकाशामध्ये भारताचे हे भाग समाविष्ट केले होते. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.

आता नेपाळ भारतातील हे भाग नेपाळच्या हद्दीत आणणारे एक विधेयक सादर करेल. उद्या संसदेत या विधेयकाला पाठिंबा देण्याचे नेपाळी कॉंग्रेसने म्हंटले आहे. या सुधारित विधेयकाच्या समर्थनार्थ मतदान करण्याचा निर्णय नेपाळी कॉंग्रेस कमिटीने आज घेतला आहे. पक्षाने आपल्या सदस्यांना या घटना दुरुस्ती विधेयकाच्या समर्थनार्थ मतदान करण्यास सांगितले आहे.

नवीन नकाशा संदर्भात नेपाळच्या घटनेत दुरुस्ती
या घटनादुरुस्तीद्वारे नेपाळ भारताच्या कालापाणी, लिंपियाधुरा आणि लिपुलेख या प्रांतांना घटनात्मकरित्या मान्यता देईल आणि नेपाळ त्यांवर आपला दावा करेल.

नेपाळशी असलेला भारताचा सीमा विवाद हा बर्‍याच काळापासून सुरू आहे. नेपाळ भारतातील कलापाणी, लिंपियाधुरा आणि लिपुलेख यावर आपला हक्क सांगितला आहे. नेपाळचा मुख्य विरोधी पक्ष असलेल्या नेपाळी कॉंग्रेसनेही पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांना या संदर्भात भारताशी राजनैतिक चर्चा करण्यास सांगितले आहे. मात्र यावेळी संसदेत या वादग्रस्त नकाशाला पाठिंबा देण्याची प्रक्रियाही सुरू झाली आहे.

नेपाळी कॉंग्रेसचे पक्षाचे सरचिटणीस यांच्या वतीने असे म्हटले आहे की,’ आम्ही या घटना दुरुस्तीच्या बाजूने आहोत. मात्र त्याचबरोबर राजनैतिक पातळीवरही भारताशी संवाद सुरुच ठेवावा.

नवीन नकाशाने भारत-नेपाळ संबंध खराब केले
भारताच्या वतीने असे म्हटले जात आहे की,’या संपूर्ण प्रकरणामुळे दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. वाटाघाटीपूर्वीच नेपाळला भारताचा विश्वास जिंकणे आवश्यक आहे.

नेपाळच्या या नवीन नकाशामध्ये नेपाळने भारताच्या एकूण ३९५ चौरस किमी क्षेत्रफळ भूभागाला आपला म्हणून दर्शविले आहे. त्यांमध्ये लिंपियाधुरा, लिपुलेख आणि कलापाणी व्यतिरिक्त गुंजी, नाभी आणि काटी या गावांचा समावेश आहे.

नेपाळने आपल्या या नकाशामध्ये काळापाणीचे ६० चौरस किलोमीटरचे क्षेत्र स्वतःचे म्हणून घोषित केले आहे. त्याचप्रमाणे नेपाळने ३९५ चौरस किलोमीटर लिंपियाधूरावर आपला हक्क सांगितला आहे. नेपाळच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या नकाशाला मान्यताही देण्यात आली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

आता पंतप्रधान मोदी आहेत तरी कुठे? ‘या’ मुद्द्यावरून कपिल सिब्बल यांनी केंद्रावर सोडलं टीकास्त्र

नवी दिल्ली । काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. मूडीज या संस्थेने भारताच्या जीडीपी रँकिंगबाबत व्यक्त केलेल्या मताचा धागा पकडून आता मोदी कुठे आहेत?असा सवाल सिब्बल यांनी केला आहे. मोदी सरकारवर टीकास्त्र सोडताना काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी ट्वीट अनेक मुद्दे उपस्थित केले आहेत.

गेल्या काही दिवसांमध्ये जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, भारताचा जीडीपी दशकाच्या सर्वात खालच्या स्तरावर आहे. मूडीजनेही भारताचे सार्वभौम रेटिंग कमी केली आहे. आणि जीडीपीत ४% घसरणीचा इशारा दिला आहे. अशा परिस्थितीत कोरोना संकटाच्या आधीपासूनच ही परिस्थिती आहे, तर मग पुढे काय होईल, असे म्हणत काँग्रेसने केंद्र सरकारला आपल्या टीकेचे लक्ष्य केले आहे.

सिब्बल यांनी ट्विटमध्ये सरकारबाबतचे विवादास्पद मुद्दे आणि देशाचे प्रश्न मांडले आहेत. कपिल सिब्बल यांनी ट्विटमध्ये लव्ह जिहाद, घर वापसी, सर्जिकल स्ट्राइक, ट्रिपल तलाक, ३७० कलम, यूएपीए, सीएए आणि एनआरसी हे मुद्दे उपस्थित केले आहेत. हे मुद्दे वादग्रस्त असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यानंतर सिब्बल यांनी देशाचे प्रश्न उपस्थि केले आहेत. यात त्यांनी आरोग्य, शिक्षण, बेरोजगारी, गरिबी, मध्यमवर्गाचे प्रश्न आणि आर्थिक मंदीचा उल्लेख केला आहे. हा उल्लेख करताना त्यांनी पंतप्रधान मोदी कोठे आहेत, असा सवाल उपस्थित केला आहे.

विशेष म्हणजे मोदी सरकारच्या दुसर्‍या कार्यकालातील पहिले वर्ष पूर्ण झाल्यावर सरकारकडून आपल्या कामगिरीबाबत माहिती दिली जात आहे. त्यापैकी जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटविणे, नागरिकता दुरुस्ती कायदा, तिहेरी तालक विधेयक, राम मंदिराचे बांधकाम सुरू करणे आणि आणखी काही मुद्दे उपस्थित केले जात आहेत. तर दुसरीकडे, काँग्रेस सातत्याने आर्थिक आघाडीवर अपयशी ठरल्याबद्दल सरकारला लक्ष्य करत आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

१२ वर्षाच्या वयात केवळ साठवलेल्या पैशातून तिने ३ मजुरांचे विमानाचे तिकीट काढले 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुलांनी आपल्या साठवलेल्या पैशातून गरीब लोकांना मदत केल्याची अनेक उदाहरणे आहेत. आपल्या पॉकेटमनीत मिळालेल्या पैशातून एका मुलीने असेच एक कौतुकास्पद काम केले आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या या काळात संचारबंदीमुळे मजुरांचे होणारे हाल ती सातत्याने दूरदर्शनवरून पाहत होती. आणि आपण ही आपली जबाबदारी म्हणून काहीतरी केले पाहिजे म्हणून तिने चक्क तिच्या साठवलेल्या पैशातून ३ मजुरांना घरी जाण्यासाठी विमान तिकिटाचा खर्च केला आहे. केवळ १२ वर्षाच्या वयात तिच्या या कामामुळे निहारिका द्विवेदी ही मुलगी सर्वांच्या कौतुकास पात्र ठरली आहे.

दिल्लीतील नोएडा येथे राहणारी निहारिका म्हणते, “समाजाने आपल्याला खूप काही दिले आहे, त्यामुळे या संकटकाळात आपण त्याची परतफेड करणे ही आपली जबाबदारी आहे.” आठवीत असणाऱ्या या मुलीने तीन मजुरांना आपल्या झारखंडमधील गावी जाण्यासाठी विमान तिकीट काढून दिले आहे. ज्याचा खर्च साधारण ४८ हजार इतका आहे. या तीन मजुरांपैकी १ मजूर कॅन्सरग्रस्त असल्याची माहिती मिळाली आहे.

 

निहारिकाच्या आई सुरभी यांनी सांगितले की, “जेव्हा ती दूरदर्शनवर अशा बातम्या बघायची तेव्हा खूप दुःखी व्हायची, तिने एकदा आम्हाला विचारले की आपण याना विमानाने पाठवू शकतो का आम्ही हो म्हंटल्यावर तिने आम्हाला तिच्याकडचे पैसे आणून दिले. आम्हाला एका मित्राकडून तीन मजुरांना झारखंड ला जायचे आहे आणि त्यांच्यापैकी एकजण कॅन्करग्रस्त असल्याची माहिती मिळाली. मग आम्ही त्यांचा तिकीट खर्च केला.” इतक्या लहान वयात इतका समंजस पणा यामुळे तिचे सर्वत्र कोतुक होते आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

वाजिद खान यांच्या आईलाही कोरोनाची लागण 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध बॉलिवूड संगीतकार वाजिद खान यांचे सोमवारी रुग्णालयात निधन झाले. त्यांचे निधन कार्डियाक अरेस्टने झाल्याचे साजिद खान यांनी स्पष्ट केले आहे. त्याआधी त्यांना किडनीशी संबंधित काही आजार होते. मात्र त्यांना कोरणाचे संक्रमण झाले होते. त्यांच्यासोबत रुग्णालयात त्यांची आई होती अशी माहिती समोर आली आहे. वाजिद यांना किडनीच्या समस्येमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हा त्यांचे कोरोनाचे अहवाल सकरात्मक आले होते. मात्र त्यांच्या आईला आधीच कोरोनाची बाधा झाली होती अशी माहिती समोर आली आहे.

त्यांच्या आई रझिना यांची प्रकृती आता स्थिर आहे. वाजिद खान याना रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांचे सर्व अहवाल सकारात्मक आले होते. दरम्यान दिवंगत वाजिद खान यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असल्याने केवळ २० लोकांनाच अंत्यसंस्काराला परवानगी देण्यात आली होती. कडक पोलीस बंदोबस्तात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

साजिद-वाजिद ही जोडी बॉलिवूडमधील प्रसिद्ध संगीतकार जोडी होती. वाजिद यांच्या जाण्याने सर्वत्र दुःख व्यक्त केले जात आहे. बॉलिवूडमधील मान्यवरांनी त्यांच्या सोशल मीडियावरून वाजिद यांना श्रद्धांजली वाहिली आहे. सलमान खान साठी या जोडीने अनेक हिट गाणी दिली आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

‘ये रिश्ता क्या कहलाता हैं’ फेम अभिनेत्रीसह कुटुंबातील सात जणांना कोरोना 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाचा प्रादुर्भाव सर्वत्र होत आहे. अनेक सेलिब्रिटी देखील कोरोनाचे बळी ठरत आहेत. नुकतेच संगीतकार वाजिद खान यांचे निधन झाले. त्यांना कोरोनाचे संक्रमण झाले होते. आता अशीच एक  माहिती मिळाली आहे. ‘ये रिश्ता क्या कहलाता हैं’ फेम अभिनेत्रीला आणि तिच्या कुटुंबातील ७ जणांना कोरोना झाला असल्याची माहिती समोर आली आहे.  या मालिकेत कीर्तीची भूमिका करणारी अभिनेत्री मोहेना कुमारी हिला व कुटुंबाला कोरोनाचे निदान झाले आहे. एका वृत्तपत्राच्या मुलाखतीत तिने स्वतः त्यांचे अहवाल सकारात्मक झाल्याचे सांगितले आहे.

सोमवारी त्यांचे अहवाल आले होते. “आमचे अहवाल सकारात्मक आल्याची बातमी खरी आहे. माझ्या सासूला सर्वप्रथम कोरोना झाल्याचे आम्हाला समजले. आमच्यामध्ये सौम्य लक्षणे होती, पण आम्हाला वाटले की वातावरणातील बदलामुळे हे झाले असावे. मात्र तपासणी केल्यावर आमचे अहवाल सकारात्मक आले आहेत. आता आम्ही विलगीकरणात आहोत आणि आमच्यावर उपचार सुरु आहेत. तसेच आम्हा सर्वांची प्रकृती उत्तम आहे.” असे तिने सांगितले.

तिच्या इंस्टाग्रामवरील पोस्टमध्ये तिने लिहिले आहे की, हा काळ आमच्या कुटुंबासाठी खूप कठीण आहे. मला झोप येत नाही आहे.  पण आम्ही लवकरच यातून बाहेर पडू. मोहेनाने उत्तराखंडचे पर्यटन मंत्री सतपाल महाराज यांच्या मुलाशी सुयेश रावत याच्याशी लग्न केले आहे. डान्स इंडिया डान्स मधून ती लोकांना माहित झाली. ‘ये रिश्ता क्या कहलाता हैं’ मधून तिला अभिनयात चांगला ब्रेक मिळाला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

अमेरिकेच्या डब्ल्यूएचओपासून वेगळे होण्याबाबत चीनने वक्तव्य म्हणाले, हे तर ‘पावर पॉलिटिक्‍स’

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अलीकडेच अमेरिकेने डब्ल्यूएचओ बरोबरील आपले संबंध संपवले आहेत. यावर आता चीनने विधान केले आहे. ते म्हणाले आहेत की,’ जागतिक आरोग्य संघटनेपासून अमेरिकेचे वेगळे होणे हे ‘पॉवर पॉलिटिक्स’ आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चिनी परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले की,’ आंतरराष्ट्रीय समुदाय हा अमेरिकेच्या या वृत्तीशी सहमत नाही आहे. अमेरिका डब्ल्यूएचओपासून वेगळी होत आहे तसेच सत्तेचे राजकारण करीत आहे.

‘एआरवाय न्यूज’च्या वृत्तानुसार प्रवक्त्याने म्हटले आहे की,’ चीनवर कोरोना व्हायरस पसरविण्याचा आरोप ठेवल्याने हा व्हायरस संपुष्टात येणार नाही किंवा लोकांचे जीवही वाचणार नाहीत. अशावेळी या महामारीवर राजकारण करण्याऐवजी अमेरिकन राजकारण्यांनी त्याला संपविण्यासाठी आवश्यक असलेल्या उपायांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. रविवारी व्हाईट हाऊसने दिलेल्या एका निवेदनात असे म्हटले होते की, ‘भ्रष्टाचार आणि चीनवरील अवलंबित्व संपवल्यास अमेरिका डब्ल्यूएचओमध्ये सामील होण्याचा विचार करू शकते.’

विशेष म्हणजे यापूर्वीच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक आरोग्य संघटनेपासून आपण वेगळे होत असल्याचे जाहीर केले होते. त्यांनी जागतिक आरोग्य संघटनेबरोबर असलेले त्यांचे सर्व संबंध संपवले. यावर युरोपियन युनियननेही त्यांना पुन्हा एकदा विचार करण्यास सांगितले होते. अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी एका निवेदनात म्हटले आहे की,’डब्ल्यूएचओला निधी देण्याऐवजी ते सार्वजनिक आरोग्य प्रकल्पांवर खर्च करतील. आता हा पैसा जगभरात योग्य हेतूसाठी वापरला जाईल आणि अमेरिकन नागरिक त्यांचे संरक्षण करत राहतील. यापूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक आरोग्य संघटनेचा निधी कमी करण्याविषयीही सांगितले होते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

कोरोनामुळे अडचणीत सापडलेल्या पाकिस्तानची नवीन १५ अब्ज डॉलर्स कर्ज घेण्याची योजना

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पाकिस्तान सरकारने त्यांचे विदेशी कर्ज भरण्यासाठी आणि परकीय चलनाचा साठा भक्कम करण्यासाठी १५ अब्ज डॉलर्सचे नवीन कर्ज घेण्याची योजना आखत आहे. हे एका वर्षात पाकिस्तानने घेतलेले सर्वात मोठे कर्ज असेल. स्थानिक माध्यमांनी रविवारी याबाबत सांगितले. पाकिस्तानच्या अर्थ मंत्रालयाच्या सूत्रांनी ‘द एक्सप्रेस ट्रिब्यून’ या वृत्तपत्राला सांगितले की, २०२०-२१ आर्थिक वर्षात सुमारे १५ अब्ज डॉलर्सच्या विदेशी कर्जापैकी जवळपास १० अब्ज डॉलर्स हे जुन्या कर्जाची परतफेड करण्यासाठी वापरले जातील. ही रक्कम व्याजाच्या देयका व्यतिरिक्त आहे.

 या वृत्तानुसार, उर्वरित रक्कम ही देशाच्या बाह्य सार्वजनिक कर्जाचा भाग होईल, जी मार्चच्या अखेरीस ८६.४ अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे. पाकिस्तानने एका वर्षात १५ अब्ज डॉलर्सचे घेतलेले कर्ज हे त्या देशातील आव्हाने आणि वाढती कर्जाचे संकट दर्शविते. पाकिस्तानमध्ये सध्यातरी कर्जाशिवाय परकीय चलन येणे शक्य नाही.

स्टेट बँक ऑफ पाकिस्तानकडे असलेले १२ अब्ज डॉलर्सचा एकूण परकीय चलनाचा साठा मुख्यतः कर्जामुळे आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वित्त मंत्रालयाला आर्थिक वर्ष २०२०-२१ दरम्यान द्विपक्षीय आणि बहुपक्षीय सावकार, वाणिज्य बँका, युरोबॉन्ड जारीकर्ता आणि आयएमएफ कडून एकूण १५ अब्ज डॉलर्स मिळणे अपेक्षित आहे. विदेशी कर्जावरचे पाकिस्तानचे अवलंबित्व वाढत आहे. जुलै २०१८ ते जून २०२१ पर्यंत त्यांच्यावर एकूण ४० अब्ज डॉलर्स इतके नवीन कर्ज झाले आहे. त्यापैकी ते जुन्या कर्जाची परतफेड करण्यासाठी २० अब्ज डॉलर्स वापरणार आहे, तर उर्वरित १५ अब्ज डॉलर्स हे त्यांच्या त्याच्या बाह्य सार्वजनिक कर्जात जोडले जातील.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

चिंताजनक! देशातील करोनाग्रस्तांची संख्या २ लाखांच्या टप्प्यावर

नवी दिल्ली । देशभरात कोरोनाच्या साथीला रोखण्यासाठी लॉकडाऊनचे ४ टप्पे पार पडले तरी स्थिती नियंत्रणात आलेली दिसत नाही आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्येत आजही वाढ नोंदवली जात आहे. देशातील कोरोनाचे रुग्ण सलग तिसऱ्या दिवशी ८ हजारांहून अधिक संख्येने वाढले. मागील २४ तासांमध्ये देशात ८ हजार १७१ रुग्णांची नोंद झाल्याने एकूण रुग्णांची संख्या १ लाख ९७ हजार ५८१ वर पोहोचली आहे. त्यामुळं कोरोनाबाधित रुग्ण सापडण्याचा वेग असाच कायम राहिला तर येत्या २ दिवसात देशात कोरोनाबाधितांचा आकडा २ लाखांचा टप्पा गाठेल.

कोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या असलेल्या १० देशांमध्ये भारत ७ व्या क्रमांकावर आहे. कोरोनाबाधितांच्या संख्येत आठवड्यापूर्वी भारत ९ व्या क्रमांकावर होता. आता मात्र देशातील रुग्णांची संख्या फ्रान्समधील रुग्णांपेक्षा जास्त झाली आहे.मागील २४ तासांत देशात २०४ जण कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत ५ हजार ५९८ जणांचा बळी गेला आहे.

समाधानकारक बाब म्हणजे देशात ९५ हजार ५२६ जणांनी कोरोनाचा पराभव केला आहे. तर ९७ हजार ५८१ जणांवर उपचार सुरू आहेत. देशात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ४८.१९ टक्क्यांवर पोहोचले आहे. १८ मे रोजी हे प्रमाण ३८.२९ टक्के होते.आतापर्यंत ३८ लाख ३७,२०७ नमुना चाचण्या झाल्या असून दररोज १ लाख चाचण्या करता येणे शक्य झाले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”