Tuesday, December 30, 2025
Home Blog Page 5714

Moody’s कडून भारताच्या पतमानांकनात घट; तब्बल २२ वर्षांनंतर रेटिंगमध्ये घट

मुंबई । जागतिक रेटिंग एजन्सी मूडीजनं तब्बल 22 वर्षांनंतर भारताच्या पतमानांकनात म्हणजेच रेटिंगमध्ये घट केली आहे. भारताला यापुढं विविध संस्थाच्या माध्यमातून आर्थिक नीती प्रभावीपणे लागू करता येणार नाही शिवाय अनेक आव्हानांचा सामना करावा लागणार आहे. केंद्राने जाहीर केलेल्या २० लाख कोटींचे आर्थिक पॅकेजही पुरेसे नाही. त्यामुळे कमी वृद्धीचा धोका काही काळ राहणार आहे. म्हणूनच मूडीजनं बीएए २ वरून भारताची रेटिंग बीएए ३ केली आहे.

मागील काही कालावधीपासून भारत आपल्या क्षमतेच्या तुलनेत कमी वृद्धी करत आहे . तसेच कर्जाचं ओझं वाढत असून कर्जाची परतफेड होण्यात अडचणींचा सामना करावा लागेल. त्यामुळे वित्तीय प्रणालीवर दबाव येणार असल्याचं भाकितही मूडीजनं केलं आहे. बीएए ३ रेटिंग म्हणजे गुंतवणूक ग्रेड मानली जात आहे. भारतात गुंतवणूक ग्रेड असणारी अर्थव्यवस्था काही काळ राहील. मूडीजनं २०१७ मध्येच रेटिंग वाढवून बीएए २ केली होती. पण, सॉवरिन क्रेडीट प्रोफाईल पोषक नाही.

विशेष म्हणजे मूडीजचा अंदाज कोरोनामुळे वर्तवला नाही. तर मागील वर्षीच हा अंदाज वर्तवला होता. कोरोनामुळे भारताचा जीडीपी २०२० मध्ये ४ टक्के पर्यंत येईल. परंतु २०२१ मध्ये ८.७ टक्के जीडीपी राहील तसेच त्यानंतर ६ टक्के जीडीपी राहील असा अंदाजही मूडीजने वर्तवला आहे. दरम्यान, कोरोनातून बाहेर पडण्यासाठी आणि अर्थव्यवस्था सुरळीत करण्यासाठी दिलेले २० लाख कोटींचे पॅकेज पुरेसे नसून येत्या कालावधीत आर्थिक वृद्धी आणण्यासाठी उपयोगी नसल्याचं मत मूडीजनं व्यक्त केलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

दिलासादायक ! राज्यात कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचं प्रमाण मे महिन्यात अधिक

मुंबई । राज्यामध्ये कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण मार्चच्या तुलनेत मे मध्ये सुमारे साडेतीन पटीने वाढले असून ४३.३५ टक्के इतके झाले आहे. गेल्या तीन महिन्यांची आकडेवारी पाहता मे मध्ये सर्वाधिक रुग्ण बरे झाल्याचे दिसून आले आहेत. राज्यातील रुग्ण दुपटीचा कालावधी (डबलींग रेट) ११ वरून १७.५ दिवसांवर गेला आहे.

३१ मे अखेर राज्यात ६७ हजार ६५५ रुग्णांपैकी २९ हजार ३२९ रुग्ण बरे होऊन घरी गेले. त्यामुळे मे अखेरीस राज्याचा रिकव्हरी रेट मार्चच्या तुलनेत सुमारे साडे तीन पटीने वाढत ४३.३५ टक्के एवढा झाला आहे. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तर एकाच दिवशी ८००० रुग्ण बरे होऊन घरी परतले होते. अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

मार्चच्या पहिल्या आठवड्यात राज्यात पहिला रुग्ण आढळला आहे. तर ३१ मार्च अखेर राज्यात ३०२ रुग्ण आढळले होते. त्यातील ३९ रुग्ण बरे झाले. म्हणजे मार्च महिन्यात कोरोना रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण १२.९१ टक्के एवढे होते. एप्रिल अखेर राज्यात १० हजार ४९८ रुग्ण होते. त्यातील १७७३ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले. एप्रिल महिन्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण १६.८८ टक्के होते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

श्रमिक रेल्वेत एकाही मजुराचा मृत्यू अन्न-पाणी न मिळाल्यानं झाला नाही; रेल्वेमंत्री पीयूष गोयलांचा दावा

नवी दिल्ली । केंद्रानं लॉकडाऊनमुळे देशातील विविध भागात अडकलेल्या मजुरांना घरी परतण्यासाठी सुरु केल्या श्रमिक स्पेशल रेल्वेतून प्रवास करताना अनेक प्रवाशांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या होत्या. जवळपास ८० प्रवासी श्रमिक रेल्वेत मृत्यू झाला आहे. यांनतर श्रमिक रेल्वेत मजुरांचे होत असलेले हाल आणि प्रवासादरम्यान जेवण आणि पाणी न मिळाल्यानं त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे. त्यावर आज रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी या सगळ्या आरोपांना उत्तर दिली आहेत. यात एकाही प्रवाशाचा अन्न-पाण्यावाचून मृत्यू झालेला नाही, असा दावा त्यांनी केला आहे.

पीयूष गोयल यांनी एक ट्विट करून याबाबत स्पष्टीकरणं दिलं आहे. “देशात कोणत्याही रेल्वेगाडीला पोहोचण्यासाठी ७ वा ९ दिवस लागलेले नाहीत. त्याचबरोबर एकाही प्रवाशाचा मृत्यू जेवण अथवा पाणी न मिळाल्यान झालेला नाही. रेल्वे प्रवाशांना १.९ कोटी रूपयांपेक्षा अधिक जेवण व १.५ कोटी रुपयांपेक्षा जास्त पाण्याच्या बॉटल रेल्वेद्वारे पुरवण्यात आले. रेल्वे मार्गातील अडथळ्यांमुळे काही रेल्वेगाड्या वळवण्यात आल्या. ज्याचं प्रमाण एकूण रेल्वेगाड्यांच्या तुलनेत १.७५ टक्के इतकंच आहे,” असा दावा गोयल यांनी केला आहे.

केंद्र सरकारनं मजुरांना घरी सोडण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या विशेष श्रमिक रेल्वेगाड्या सध्या चर्चेत आहेत. या गाड्यांमध्ये मजुरांना खाण्यापिण्याची व्यवस्था नसल्याचा आरोप राजकीय नेत्यांनी केला होता. दहा दिवसांमध्ये या रेल्वेगाड्यांमध्ये ८० मजुरांचा मृत्यू झाल्याचा दावा खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केला होता.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारनं देशात लॉकडाउन लागू केला. २१ दिवसांच्या पहिल्या लॉकडाउनमध्ये सर्व व्यवहार ठप्प झाले. त्यामुळे देशभरात विविध राज्यात काम करत असणाऱ्या मजुरांनी घराकडे स्थलांतर करण्यास सुरूवात केली. पायीच घरी जाणाऱ्या अनेक मजुरांना रस्त्यातच जीव गमवावा लागला. त्यामुळे सरकारनं लॉकडाउनचा चौथा टप्पा सुरू होण्यापूर्वी विशेष श्रमिक रेल्वे गाड्या सुरू केल्या. या गाड्यांमध्ये ८० पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाल्याचा दावा राजकीय नेत्यांकडून करण्यात येत आहे. रेल्वेसंदर्भात होत असलेल्या आरोपांना रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी उत्तर दिली आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

अम्फाननंतर ‘निसर्ग’ चक्रीवादळाचा धोका, या २ राज्यात ‘यलो’ अलर्ट जारी

मुंबई । काही दिवसांपूर्वीच देशाच्या पूर्वेकडील भागात ‘अ‍म्फान’ चक्रीवादळाचा पश्चिम-बंगाल, ओडिशा राज्यांना तडाखा बसला होता. आता पश्चिम किनाऱ्यावर अरबी समुद्रावर नवीन चक्रीवादळ ‘निसर्ग’ निर्माण होऊ लागले आहे. जूनपर्यंत हे वादळ महाराष्ट्र आणि गुजरातच्या काही भागांत येऊ शकेल. भारतीय हवामान विभागाने दोन्ही राज्यांसाठी ‘यलो’ अलर्ट जारी केला आहे. तसेच मुसळधार पावसाची शक्यताही आहे. मुंबई, कोकणात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच हरिहरेश्वर, दमणसह कोकण किनारपट्टीला निसर्ग चक्रीवादळ धडकणार असल्याने हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

आयएमडीने इशारा दिला की चक्रीवादळ ‘निसर्ग’चा परिणाम मुंबईसह महाराष्ट्रातील किनारी जिल्ह्यांवर होईल. तसेच गुजरात आणि इतर शेजारच्या राज्यांपेक्षा जास्त परिणाम होण्याची शक्यता आहे. आयएमडीने म्हटले आहे की, अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा वाढेल आणि चक्रीवादळाचा वेग आणखी तीव्र होईल आणि हे वादळ रायगड जिल्ह्यातील हरिहेश्वर ते दमण दरम्यान उत्तर महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमेवर ३ जूनला धडकेल, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.

यंत्रणा सज्ज
दक्षिणपूर्व आणि लगतच्या पूर्व मध्य अरबी समुद्र आणि लक्षद्वीपवरील कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. येत्या १२ तासांत ते अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. आणि त्यानंतर पुढील २४ तासांत पूर्व मध्य अरबी समुद्रावर चक्रीवादळाच्या वादळामध्ये तीव्रता वाढेल, असे हवामान विभागाने म्हटेल आहे.
दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सोमवारी गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव प्रशासक प्रफुल्ल पटेल यांच्यासमवेत निसर्ग चक्रीवादळाविषयी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेतली. यावेळी शाह यांनी केंद्राकडून सर्व मदतीची ग्वाही दिली आणि राज्यांना परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी आवश्यक असलेल्या गरजा व स्रोतांचा तपशील तयार करण्यास सांगितले.

यापूर्वी अरबी समुद्रावर निर्माण होणाऱ्या चक्रीवादळाच्या प्रकृतीचा सामना करण्यासाठी तत्परतेची व परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी शाह यांनी बैठक घेतली होती. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (एनडीएमए), राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद बल (एनडीआरएफ), भारत हवामान विभाग (आयएमडी) च्या अधिकाऱ्यांसमवेत गृहमंत्र्यांनी आढावा बैठक घेतली. एनडीआरएफने गुजरातमध्ये यापूर्वी १३ टीम तैनात केल्या आहेत, त्यापैकी दोन टीम राखीव ठेवण्यात आले आहेत. याशिवाय महाराष्ट्रात १६ टीम तैनात करण्यात आल्या असून त्यापैकी सात टीम राखीव ठेवण्यात आल्या आहेत. तर दमण आणि दीव आणि दादरा आणि नगर हवेली येथे प्रत्येकी एक पथक तैनात करण्यात आले आहे. खालच्या किनारपट्टी भागातून लोकांना बाहेर काढण्यात एनडीआरएफ राज्य सरकारांना मदत करत आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

कोरोनापेक्षा भयानक असणारा ‘हा’ व्हायरस संपवू शकतो जगातील अर्धी लोकसंख्या; शास्त्रज्ञांचा दावा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या जगभरात कोरोना विषाणूने एक मोठे संकट उभे केले आहे. आता अशात कोरोनापेक्षा भयानक असलेला एक व्हायरस जगातील अर्ध्या पेक्षा जास्त लोकसंख्या संपवू शकतो अशा दावा शाश्त्रज्ञांनी केला आहे. सध्या कोंबड्यांमध्ये असणारा एपोकॅलिप्टिक नावाचा विषाणू कोरोनापेक्षा भयंकर असून जर तो माणसांमध्ये पसरला तर जगातील अर्ध्याहून अधिक लोकसंख्या संपेल असा दावा ऑस्ट्रेलियायाचे शास्त्रज्ञ मायकल ग्रेगरी यांनी केला आहे.

डॉ. मायकेल ग्रेगर यांनी हाऊ टू सर्वाइव्ह ए पेंडमिक नावाच्या आपल्या पुस्तकात लिहिले आहे की, कोंबड्यांमुळे मनुष्यांना कोरोना व्हायरस पेक्षा अधिक धोका आहे. जगभरातील पोल्ट्रींमध्ये असणाऱ्या कोंबड्यांमध्ये एपोकॅलिप्टिकची बाधा पसरली तर त्यापासून माणसाला मोठा धोका निर्माण होऊ शकतो. डॉ ग्रेगर म्हणाले, जोपर्यंत आपण मांस खाण्यावर अवलंबून आहोत तोपर्यंत मनुष्य नवीन साथीच्या आजारासाठी अत्यंत असुरक्षित आहे.

दरम्यान, कोरोना नंतरचा पेंडमिक हा गर्दी असलेल्या आणि अस्वच्छ पोल्ट्री फार्म मधून येऊ शकतो असा इशारा डॉ. मायकेल ग्रेगर यांनी दिला आहे. १९२० सालचा स्पेनिश फ्ल्यू आणि १९९७ सालचा H५N १ विषाणूची साथ या उद्रेकांचा दाखला यावेळी ग्रेगर यांनी दिला आहे. शाकाहारी आहाराकडे वळणे हे यासाठी गरजेचे असल्याचंही ग्रेगर यांनी म्हटले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

लॉकडाऊन इम्पॅक्ट | पुण्यातील अपंग रिक्षाचालकाच्या संघर्षाला हवाय मदतीचा हात

पुणे प्रतिनिधी | कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण जग हैराण झालेलं असताना गरीब कष्टकरी जनतेचे होणारे हाल प्रचंड आहेत. हातावरचं पोट असणाऱ्या नागरिकांनी लॉकडाऊनचे पहिले २ टप्पे कसेबसे काढले, मात्र त्यानंतर या वर्गाची होणारी फरफटही संपूर्ण देशाने पाहिली. कष्टकरी मजुरांचे तांडे रस्त्याने चालत जात असताना पाहणं हे वेदनादायी होती. अनेक लोकांच्या वेदना आपल्याला दिसून आल्या, मात्र देशातील बरीच जनता अशी सुद्धा आहे ज्यांच्यापर्यंत लॉकडाऊनचा ५ वा टप्पा सुरू झाला तरी अद्यापही मदतीचा हात पोहचला नाही. पुण्यातील गुलटेकडी परिसरातील खंदारे वस्तीत राहणारे संजय राजू काळे हे त्यातीलच एक.

संजय काळे हे एका पायाने अधू असून ते पुण्यातच रिक्षा चालवतात. २०१५ पासून त्यांचा रिक्षा चालवण्याचा व्यवसाय आहे. घरी बसून बसून त्यांचे पाय आखडले असून याचा अधिक त्रास त्यांना होत आहे. लॉकडाऊन काळात कमाईसाठी कोणतंच साधन उपलब्ध नसल्याने आणि जवळील सेवाभावी संस्थांमार्फतही कोणतीच मदत न मिळाल्याने ते अडचणीत आले आहेत. काळे हे आपल्या आईसोबत एका छोट्या खोलीमध्ये राहत आहेत. ते राहत असलेला एरिया कधी रेड झोन तर कधी प्रतिबंधीत क्षेत्रात येत असल्याने त्यांच्यापुढील अडचणी वाढल्या आहेत. समाजातील संवेदनशील नागरिकांकडून त्यांना मदत मिळावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. आर्थिक मदत किंवा दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंची मदत आपण काळे यांना करु शकता.

मदतीसाठी संपर्क – संजय राजू काळे – 8888388319 (गुगल पे उपलब्ध आहे.)
बँक ऑफ महाराष्ट्र, गुलटेकडी शाखा, पुणे
बचत खाते अकाउंट नंबर – 60130910548
ifsc code – MAHB0000320

एका दिवसात सातारा जिल्ह्यात सापडले तब्बल ४० नवीन कोरोनाग्रस्त; रुग्णसंख्या ५५६ वर

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

सातारा जिल्ह्यात सोमवार दिवसभरात तब्बल ४० नवीन कोरोनाग्रस्त सापडले आहेत. सकाळी ५, संध्याकाळी १७ आणि पुन्हा रात्री उशीराने १८ असे रुग्णांमध्ये वाढ झाल्याने जिल्ह्यातील एकुण रुग्णसंख्या आता ५५६ वर पोहोचली आहे.

जिल्ह्यार मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. बहुताश रुग्ण हे पुण्या मुंबईहून प्रवास करुन आलेले आहेत. त्यामुळे बाहेरुन प्रवास करुन आलेल्या नागरिकांनी होम क्वारंटाइमध्ये राहवं आणि नियमांचे कडक अंमलबजावणी करावी असे निर्देश जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.

दरम्यान, जिलह्यातील कराड येथील कृष्णा हाॅस्पिटल येथून आज १९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. कृष्णा हाॅस्पिटलने कोरोनामुक्तीची शंभरी पार केल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मात्र दुसरीकडे आज जिल्ह्यात तीन नागरिकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे नागरिकांत संभ्रम अवस्था असून प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

मुंबईवरुन आलेल्या व घरीच क्वॉरंटाईन असेलल्या बोपेगांव ता. वाई येथील रक्त दाबाचा त्रास असलेल्या 85 वर्षीय महिला, सारीचा आजार असलेली गिरवी ता. फलटण येथील 65 वर्षीय महिला तर 15 वर्षापूर्वी कॅन्सरने आजारी असलेला 29 मे रोजी मुंबई येथून आलेला 52 वर्षीय पुरुष अशा 3 जणांचा मृत्यू झाला असून, मृत्यू पश्चात त्यांच्या घाशातील स्त्रावाचा नमुना तपासणीसाठी पाठविण्यात आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अमोद गडीकर यांनी दिली.

बाधित रुग्णांची माहिती खालीलप्रमाणे –
फलटण तालुक्यातील बरड येथील 55 वर्षीय महिला, वडाळे येथील 35 वर्षीय पुरुष.
जावळी तालुकयातील गवडी येथील 52 वर्षीय महिला, काळोशी येथील 41 वर्षीय पुरुष, केळघर (सोळशी) येथील 39 वर्षीय महिला.
कराड तालुक्यातील विंग येथील 43 वर्षीय महिला, 19 वर्षीय तरुण.
पाटण तालुक्यातील काळेवाडी येथील 21 वर्षीय महिला, नवसरेवाडी येथील 25 व 22 वर्षीय पुरुष.
खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील 72 वर्षीय महिला.
खटाव तालुक्यातील अंभेरी येथील 3 व 6 वर्षीय बालीका, 29 वर्षीय पुरुष.
महाबळेश्वर तालुक्यातील हरचंदी येथील 53 वर्षीय महिला, गोरोशी येथील 72 वर्षीय महिला.
वाई ग्रामीण रुग्णालयातील 24 वर्षीय महिला आरोग्य सेवक.

परीक्षा रद्द पण बॅकलाॅग राहिलेल्यांचे काय? 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर गेले अनेक दिवस अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेचं काय हा प्रश्न आता मिटला आहे. त्याबाबत परीक्षा रद्द केल्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. आणि मागील परीक्षांमधील गुंणानुसार श्रेणी देण्याचे जाहीर करण्यात आले आहे. मात्र ज्या विद्यार्थ्यांचे मागील परीक्षेत विषय राहिले आहेत अशा विद्यार्थ्यांचे काय? हा प्रश्न अद्याप शासनाने सोडविला नाही. यांचे गुणांकन कसे होणार? किंवा याना परीक्षा द्याव्या लागणार का? आणि जर द्याव्या लागल्या तर कधी असे अनेक प्रश्न या विद्यार्थ्यांसमोर आहेत.

राज्यात सुमारे ९ लाख विद्यार्थी अंतिम वर्षात होते. त्यातील साडेतीन लाख म्हणजे जवळपास ४५% विद्यार्थ्यांचे विषय राहिले आहेत. पुणे विद्यापीठातील ७५ हजार म्हणजे सुमारे ३०% विद्यार्थ्यांचे विषय राहिले आहेत. आता या विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र मिळणार की त्यांना आता जेव्हा परीक्षा होतील तेव्हापर्यंत वाट बघावी लागणार असा प्रश्न उभा ठाकला आहे. या विदयार्थ्यांच्या बाबतीत शासन काय निर्णय घेते याकडे आता बहुतांश विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.

जर परीक्षा घेण्याचा निर्णय झाला तर राहिलेला विषय सुटल्याशिवाय या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण होता येणार नाही अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. मनविसेचे शहराध्यक्ष कल्पेश यादव यांनी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले असून ज्या विद्यार्थ्यांचे विषय राहिले आहेत त्या विद्यार्थ्यांचे काय याबाबत स्पष्टता देण्याबाबत मागणी केली आहे. आता शासन काय निर्णय घेते यावर या विद्यार्थ्यांचे भवितव्य अवलंबून आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

टेलर स्विफ्ट ची डोनाल्ड ट्रम्प यांना धमकी; म्हणाली…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेतील एका कृष्णवर्णीय माणसाची गौरवर्णीय पोलिसाने निर्घृण रित्या हत्या केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. या प्रकरणानंतर अमेरिकेत पुन्हा एकदा वर्णवाद उसळून आला आहे. तो अधूनमधून वर येत असतो. ज्या व्यक्तीची हत्या झाली त्याचे नाव जॉर्ज फ्लाईड असे होते. पोलिसांनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला होता. यावर विविध माध्यमातून निषेध व्यक्त केला जात आहे. आता हॉलिवूड पॉप सिंगर टेलर स्विफ्ट हिने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना ट्विटर वरून आम्ही तुम्हाला नोव्हेंबर मध्ये मतदान करणार नाही असे स्पष्ट शब्दात सुनावले आहे.

तुमच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या संपूर्ण काळात श्वेत वर्चस्व आणि वर्णद्वेषाची आग लावून हिंसेची धमकी देण्यापूर्वी तुमच्याकडे नैतिकतेचा मज्जातंतू आहे का? असा सडेतोड प्रश्न तिने तिच्या पोस्टमधून विचारला आहे. देशात एवढी आग उसळली आहे. आम्ही तुम्हाला नोव्हेंबर मध्ये मतदान करणार नाही असे तिने स्पष्टपणे सांगितले आहे. भारतातूनही या प्रकरणासाठी आवाज उठविण्यात आला होता.

 

टेलर स्विफ्ट ही हॉलिवूडची प्रसिद्ध पॉप सिंगर आहे. या ट्विटमुळे तिला सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही प्रकारच्या प्रतिक्रियांना सामोरे जावे लागते आहे. २० लाखांपेक्षा अधिक लोकांनी याला लाईक केले आहे. तर अनेकांनी यावर कमेंट्स केल्या आहेत. टेलर स्विफ्टचे हे ट्विट चांगलेच व्हायरल झाले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

एकता कपूरने केला भारतीय जवानांचा अपमान? युट्यूबरची पोलिसांत तक्रार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । घरोघरी सासू सुनांच्या कट कारस्थानांच्या मालिकांमुळे पोहोचलेली एकता कपूर सतत वादातीत गोष्टींमुळे चर्चेत असते. आता पुन्हा एकदा ती तिच्या एका वेब सिरीजच्या ऍप मुळे चर्चेत आली आहे. आपल्या मेलोड्रॅमॅटिक मालिकांमुळे तिने छोट्या पडद्यावर मोठ्या प्रमाणात यश मिळविले. आता ती वेबसिरीज कडे वळली आहे. तिने अल्ट बालाजी नामक एक वेबसिरीज चे ऍप देखील सुरु केलं आहे. तिच्या या ऍपवरील एका सिरीज मध्ये तिने भारतीय सैनिकांचा अपमान केला असल्याचा आरोप युट्युबर हिंदुस्तानी भाऊ याने केला आहे.

अल्ट बालाजी या ऍपवर ट्रिपल एक्स नावाची एक सिरीज सुरु आहे. ही सैनिकांशी संबंधित सिरीज आहे. या सिरीजचा दुसरा सीझन आला आहे. यामध्ये एका सैनिकांची कथा दाखविण्यात आली आहे. हा सैनिक सीमेवर लढत असताना त्याच्या बायकोचे इतर पुरुषांसोबत अनैतिक संबंध असल्याचे या सिरीज मधून दाखविण्यात आले आहे. प्रसिद्ध भारतीय युट्युबर असणाऱ्या हिंदुस्तानी भाऊ याने यावर आक्षेप घेतला आहे. आणि एकता कपूरवर भारतीय जवानांचा अपमान केल्याचा आरोप केला आहे.

अभिनेते जितेंद्र हे एकता कपूरचे वडील आहेत. तर तुषार कपूर हा तिचा भाऊ आहे. अनेक भारतीय सिरीयलच्या माध्यमातून तिने छोटा पडदा गाजवला आहे. क्यो की सांस भी कभी बहू थी या सिरीयल मुळे एकता कपूर प्रसिद्ध झाली होती. याच सीरियलमध्ये स्मृती इराणीनेदेखील अभिनय केला होता.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.