Tuesday, December 30, 2025
Home Blog Page 5716

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात पंच म्हणून काम करणे कठीण काम आहे – इयान गुल्ड

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । क्रीडा क्षेत्रात दोन खेळाडू अथवा दोन टीम्स यांच्यात अनेक प्रकारच्या स्पर्धा होत असतात. जे चाहत्यांनाही खूप आवडते. लिओनेल मेस्सी आणि ख्रिस्तियानो रोनाल्डो यांच्यातही फुटबॉलमध्ये होणारी टक्कर तसेच १९७० च्या दशकात निक्की लॉडा आणि जेम्स हंट यांच्यात फॉर्म्युला वन रेसिंगमध्ये होणाऱ्या स्पर्धेसारखीच असते. टेनिसमध्ये बोलताना राफेल नदाल आणि रॉजर फेडरर यांच्यातही एक चांगला सामना पहायला मिळतो. बास्केटबॉलबद्दल बोलताना केव्हिन डुरंट आणि लेब्रॉन जेम्स यांच्यातील स्पर्धा पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी केवळ स्टेडियम मध्येच नाही तर त्याच्या बाहेरही दिसते.

अशाच प्रकारे जर आपण क्रिकेटबद्दल बोलायचे तर भारत आणि पाकिस्तानमधील सामना हा क्रिकेटमधील सर्वात मोठा सामना मानला जातो. या सामन्यात केवळ चाहतेच नव्हे तर खेळाडूंनाही मैदानात बऱ्याच प्रमाणात दडपण जाणवते. ज्यामुळे या दोन्ही शेजारी देशांमधील सामना फारच तणावग्रस्त बनतो. ज्यामुळे क्रिकेट मैदानावरील खेळाडूंसह अंपायरही खूपच सतर्क राहतात जेणेकरून त्यांच्या हातून कोणतीही चूक होऊ नये, अन्यथा त्यांना मैदानाबाहेर बराच टीकेचा सामना करावा लागतो.

त्याचप्रमाणे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना आठवत आयसीसीचे एलिट अंपायर राहिलेले इयान गुल्डने आपला अनुभव सांगितला आहे. ईएसपीएन क्रिकइन्फोशी बोलताना ते म्हणाले की, “यावेळी खूप दबावाचे वातावरण असते. मी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सुमारे ७ ते ८ सामन्यात पंच म्हणून काम केले आहे. ज्यात खेळाडू खरोखरच शानदार असतात. ते सर्व जण एकमेकांना आव्हान देत असतात. मात्र यावेळी आपण आपल्या चाहत्यांना आपल्यावर अधिराज्य गाजवू दिले तर त्यांचा गोंगाट आणि लाटा हे जे काही घडते, ते आपले लक्ष खेळापासून विचलित करू शकतात. “

इयान पुढे म्हणाले, “अशा प्रकारे आपण भविष्यात अशा अगदी छोट्या छोट्या गोष्टीदेखील मिस करतो. मला आठवते की,काही वर्षांपूर्वी किंवा दोन वर्षांपूर्वी बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यातील सामन्यात फक्त एकच वेगवान गोलंदाज खेळला होता. अशा प्रकारे काही वेळा आपले कार्य खूप कठीण बनते. “

 भारत आणि पाकिस्तान यांच्यातील राजकीय दबावामुळे गेल्या अनेक वर्षांपासून कोणतीही व्दिपक्षीय मालिका खेळवली जात नाही. आयसीसीच्या विश्वचषक किंवा आशिया चषक स्पर्धेत मात्र हे दोन्ही संघ आमनेसामने येताना दिसतात. त्यावेळी या दोन संघातील क्रिकेट हे अगदी शिगेला पोहोचलेले असते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

कृष्णा हॉस्पिटलमध्ये कोरोनामुक्तीची शंभरी; आज 19 कोरोनाग्रस्तांना डिस्चार्ज, जिल्हाधिकाऱ्यांकडून कौतुक

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

सातारा जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त रूग्णांसाठी वरदान ठरलेल्या कृष्णा हॉस्पिटलमधून आज कोरोनामुक्त झालेल्या 19 रूग्णांना टाळ्यांच्या गजरात आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या विशेष उपस्थितीत डिस्चार्ज देण्यात आला.आत्तापर्यंत कृष्णा हॉस्पिटलने योग्य उपचाराने तब्बल 100 रूग्णांना कोरोनामुक्त करण्यात यश प्राप्त केले असून, कोरोनामुक्तीच्या लढाईत कृष्णा हॉस्पिटलने दिलेल्या या योगदानाचे विशेष कौतुक जिल्हाधिकारी शेखर सेह
यांनी केले आहे.

दक्षिण महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात कोरोनाने मोठा हाहाकार निर्माण केला. अगदी पहिल्या टप्प्यातच सांगली व कोल्हापूर जिल्ह्यापेक्षा तुलनेने सातारा जिल्ह्यात सर्वाधिक कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले. त्यातही कराडमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या दिवसेंदविस वाढू लागल्याने संपूर्ण जिल्ह्यात भितीचे वातावरण पसरले. दरम्यान, कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कृष्णा हॉस्पिटलच्या कोरोना विशेष वॉर्डमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांवर तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचारास प्रारंभ झाला आणि 18 एप्रिल रोजी कराड तालुक्यातील पहिल्या असणाऱ्या तांबवे येथील कोरोनामुक्त रूग्णाला टाळ्यांच्या गजरात डिस्चार्ज देण्यात आला.

त्यानंतर कृष्णा हॉस्टिलटने यशस्वी उपचाराने कोरोनामुक्त झालेल्या रूग्णांना, सन्मानपूर्वक डिस्चार्ज देण्याची मालिकाच सुरू केल्याने लोकांमधील कोरोनाबद्दलची भिती कमी होण्यास मदत झाली. आज जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत 100 व्या कोरोनामुक्त रूग्णाला कृष्णा हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला.

आज डिस्चार्ज देण्यात आलेल्या रूग्णांमध्ये गावडेवाडी येथील 20 वर्षीय युवक, उंब्रज येथील 40 वर्षीय पुरूष, म्हासोली येथील 37 वर्षीय महिला, 15 वर्षीय मुलगी, शिराळ-पाटण येथील 26 वर्षीय महिला, 25 वर्षीय महिला, भरेवाडी-पाटण येथील 36 वर्षीय पुरूष, बनपुरी-पाटण येथील 31 वर्षीय महिला, 40 वर्षीय पुरूष, 19 वर्षीय युवक, 48 वर्षीय पुरूष, 10 वर्षीय मुलगा, 8 वर्षीय मुलगा, शितपवाडी-पाटण येथील 40 वर्षीय पुरूष, 14 वर्षीय मुलगा, 19 वर्षीय युवक, ढेबेवाडी फाटा येथील 23 वर्षीय पुरूष, 44 वर्षीय महिला, 18 वर्षीय मुलगी अशा एकूण 19 जणांचा समावेश आहे. यावेळी कोरोनाची लढाई यशस्वीपणे जिंकलेल्या या कोरोनामुक्त रूग्णांना जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या हस्ते पुष्पगुच्छ प्रदान करण्यात आला.

यावेळी बोलताना सिंह म्हणाले, कृष्णा हॉस्पिटलमधून आत्तापर्यंत 100 रूग्ण कोरोनामुक्त झाले असून, ही आपल्या जिल्ह्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. कोरोनामुक्तीच्या या लढाईत डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कृष्णा हॉस्पिटलचे सर्व डॉक्टर्स व अन्य स्टाफने अमूल्य योगदान दिले आहे. सातारा जिल्ह्यात अद्ययावत व अत्याधुनिक आरोग्यविषयक सोयीसुविधा असणाऱ्या कृष्णा हॉस्पिटलमुळे आज याठिकाणी 100 रूग्ण कोरोनामुक्त होण्यात यश प्राप्त झाले असून, मी डॉ. सुरेश भोसले आणि कृष्णा हॉस्पिटलच्या सर्व टीमचे सातारा जिल्हा प्रशासनाच्यावतीने विशेष अभिनंदन करतो.

दरम्यान, कृष्णा हॉस्पिटलमध्ये सुरक्षेच्या दृष्टीकोनातून कोरोना विशेष वॉर्डकडे जाण्यासाठी स्वतंत्र मार्ग तयार करण्यात आला आहे. या मार्गाची प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी जिल्हाधिकाऱ्यांनी केली. तसेच अन्य रूग्णांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून अत्यंत कमी कालावधीत कृष्णा हॉस्पिटल व्यवस्थापनाने तयार करण्यात आलेल्या या विशेष मार्गाचे कौतुक केले.

याप्रसंगी कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले, कृष्णा हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. ए. वाय. क्षीरसागर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संगीता देशमुख, कृष्णा अभिमत विद्यापीठाचे सहाय्यक कुलसचिव डॉ. एम. व्ही. घोरपडे, वित्त अधिकारी पी. डी. जॉन, सहाय्यक कुलसचिव एस. ए. माशाळकर, प्राचार्य डॉ. एस. टी. मोहिते, डॉ. संजय पाटील, डॉ. एस. आर. पाटील, रोहिणी बाबर, राजेंद्र संदे, कॉन्ट्रॅक्टर दिपक रैनाक यांच्यासह हॉस्पिटलचा अन्य स्टाफ उपस्थित होता.

व्हीव्हीएस लक्ष्मणने अनिल कुंबळेचे कौतुक करताना सांगितले कि,’ मोठा खेळाडू…’

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रविवारी, भारतीय संघाचा माजी फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मणने सांगितले होते की,पुढील काही दिवस ज्या खेळाडूंसोबत तो खेळला आहे आणि ज्यांनी त्याच्यावर मोठा प्रभाव टाकला आहे अशा खेळाडूंना तो आठवेल. याच्या पहिल्याच दिवशी लक्ष्मणने क्रिकेटचा देव म्हणून ओळखला जाणारा सचिन तेंडुलकर याला आठवले आणि आता त्याने टीम इंडियाचा लेगस्पिनर आणि माजी कर्णधार अनिल कुंबळे याच्या सन्मानार्थ एक ट्विट केले आहे. कुंबळेची स्तुती करताना लक्ष्मण म्हणाला की,’ तो हरप्रकारे खूप मोठा खेळाडू आहे आणि आपली जबाबदारी पार पाडण्यासाठी तो नेहमीच तयार असे.

लक्ष्मणने त्यांचे कुंबळेला आठवताना एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये त्याचा चेहऱ्यावर पट्टी लावलेली दिसत आहे. २००२ मध्ये अँटिग्वा येथे वेस्ट इंडिजविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यातील हा फोटो आहे ज्यामध्ये कुंबळेने मोडलेल्या जबड्याला पट्टी लावून गोलंदाजी केली होती.

 

लक्ष्मणने ट्वीट केले, “तो एक मोठा खेळाडू होता, तो सर्व शक्यतांपेक्षा पुढे होता आणि त्याने नेहमीच आपली जबाबदारी चोखपणे पार पाडली. या छायाचित्रात दाखविलेले धैर्य अनिल कुंबळे मधील सर्वोच्च आहे. कधीही हार मानू नका. मग काहीही असो, कुंबळेचे हेच वैशिष्ट्य त्याला एक महान क्रिकेटर बनवते. ”
२००२ मध्ये खेळल्या गेलेल्या या कसोटी सामन्यात कुंबळेला मारवीन डिलनचा एक उसळता चेंडू जबड्याला लागला होता. मात्र असे असूनही, त्याने तोंडाला पट्टी लावून सलग १४ षटके गोलंदाजी केली.

कुंबळे हा भारतातर्फे कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा खेळाडू आहे. त्याने भारताकडून १२२ कसोटी सामने खेळले आहेत आणि ६१९ बळी घेतले आहेत. एकदिवसीय सामन्यात कुंबळेने भारताकडून २७१ सामने खेळले असून त्यांच्या नावावर ३३७ बळी घेतले आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

मुंबईच्या मदतीला केरळ आलं धावून; डॉक्टर्स आणि नर्सेसची विशेष टीम लवकरच दाखल होणार

मुंबई । कोरोना व्हायरसने मुंबईला चांगलाच घट्ट विळखा घातला आहे. अशा संकटाच्या स्थितीत मुंबईला या विळख्यातून सोडवायला आता केरळ राज्य मदतीला धावून आलं आहे. कोरोनाविरुद्ध सुरु असलेल्या लढाईत मेडिकल स्टाफच्या मदतीसाठी पुढच्या काही दिवसात केरळमधून ५० हून अधिक डॉक्टर्स आणि नर्सेस मुंबईत येणार आहेत. कोरोना रुग्णांवर उपचार करताना मुंबईला आणखी मनुष्यबळाची आवश्यकता आहे. केरळहून १६ डॉक्टरांची टीम सोमवारी मुंबईला पोहोचण्याची शक्यता आहे असे डॉक्टर संतोष कुमार यांनी सांगितले. तिरुअनंतपूरममधल्या सरकारी मेडिकल कॉलेजचे उपअधीक्षक म्हणून ते काम करतात. इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे.

केरळहून पुढच्या काही दिवसात ५० डॉक्टर आणि १०० नर्सेस मुंबईत येतील असे कुमार यांनी सांगितले. “सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये हे डॉक्टर काम करतील. ते वैद्यक कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षित रुग्णालय आहे. मुंबईत मेडिकल स्टाफच्या मदतीसाठी येणारे डॉक्टर केरळात खासगी क्षेत्रामध्ये काम करतात. स्वच्छेने ते आपल्याच सहकाऱ्यांची मदत करण्यासाठी येत आहेत” असे डॉ. संतोष कुमार यांनी सांगितले. कोरोना व्हायरसवर नियंत्रण मिळवणारे केरळ हे देशातील पहिले राज्य आहे. शिवाय तिथे मृत्यूदरही प्रचंड कमी आहे. अंधेरीमध्ये असलेले सेव्हन हिल्स हॉस्पिटल सर्व सोयी-सुविधांनी सुसज्ज आहे. वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी सुद्धा ते सुरक्षित आहे असे संतोष कुमार यांनी सांगितले.

केरळ आणि मुंबईमधील करोनाच्या परिस्थितीची तुलना करण्यास त्यांनी नकार दिला. “केरळमध्ये मुंबईसारखी एकही जागा नाही. हे मोठे शहर असून इथे तीन कोटी लोकसंख्या राहते. दोन्ही ठिकाणी इन्फेक्शन पसरण्याची कारणे वेगवेगळी आहेत आणि विषाणूचा सामना कसा करायचा त्याची रणनिती सुद्धा वेगळी आहे” असे त्यांनी सांगितले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

तरच अमेरिका पुन्हा सहभागी होईल; ट्रम्प यांनी WHOसमोर ठेवली ‘ही’ अट

नवी दिल्ली । गेल्या आठवड्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक आरोग्य संघटनेतून (WHO) अमेरिका बाहेर पडत असल्याचे जाहीर केले होते. निष्पक्ष भूमिका सोडून चीनची तळी उचलून धरणे, कोरोना संसर्गाची माहिती लपवणे आदी आरोप ट्रम्प यांनी जागतिक आरोग्य संघटनेवर लावले होते. दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेत सुधारणा आवश्यक असून भ्रष्टाचार आणि चीनला झुकतं माप देणे बंद झाल्यास अमेरिका पुन्हा एकदा सदस्यत्व स्वीकारणार असल्याचे अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार रॉबर्ट ओब्रायन यांनी सांगितले.

ओब्रायन यांनी सांगितले की, अमेरिका जागतिक आरोग्य संघटनेत पुन्हा सहभागी होण्यास तयार आहे. जागतिक आरोग्य संघटनेने भ्रष्टाचार आणि चीनच्या बाजूने भूमिका घेणे बंद केले तर अमेरिका पुन्हा सहभागी होईल असे त्यांनी सांगितले. जागतिक आरोग्य संघटनेला सर्वाधिक निधी अमेरिकेतून मिळतो. अमेरिकेने निधी बंद केल्यामुळे आरोग्य संघटनेसमोर आर्थिक संकट उभे राहू शकते अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

जागतिक आरोग्य संघटनेला कोणता देश किती निधी देईल हे आधीपासूनच ठरलेले असते. संबंधित देशाची अर्थव्यवस्था आणि लोकसंख्या याआधारे निधीचा वाटा ठरवण्यात येतो. या निधीतून जागतिक आरोग्य संघटना आपले उपक्रम जगभरात राबवते. अमेरिका जवळपास २२ टक्के निधी देते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

हॉस्पिटलमध्ये ‘हूड हूड दबंग’ गाताना वाजिद खान भाऊ साजिद खानला म्हणाला- ‘लव्ह यू भाई’ पहा व्हिडीओ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध संगीतकार आणि गायक वाजिद खानचा जुना व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो हॉस्पिटलमध्ये सलमान खानच्या चित्रपटाचे गाणे ‘हूड हूड’ गाताना दिसत आहे. या परिस्थितीतही त्याचा उत्साह अगदी पाहण्यासारखा आहे. मात्र, त्याला ओळखणे खूप कठीण आहे. वाजीद खानने नुकताच जगाचा निरोप घेतला आहे. हृदयविकाराच्या झटक्याने त्याचे वयाच्या ४२ व्या वर्षी निधन झाले.

आपल्या भावाला डेडिकेट करताना वाजिदने हे गाणे गायले आहे. हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यानही त्याने सर्वांचे आपल्या गाण्यातून मनोरंजन केले. व्हिडीओमध्ये त्याला गाणे गाताना पाहून एक महिलाही आंनदाने हसत होती.

 

साजिद वाजिदने सलमान खानच्या ‘प्यार किया तो डरना क्या’ या चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. वाजिद याच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत सलमाननेही एक ट्विट केले आहे.

 

 

कोविड -१९ चा संसर्ग रोखण्यासाठी सुरु असलेला लॉकडाऊन दरम्यान साजिद-वाजिदने अलीकडेच बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानसाठी गाणी रचली, त्यातील एक गाणे ‘प्यार करोना’ हे होते. हे पॉप एंथम (गाणे) सर्वांना कोरोनाव्हायरस साथीच्या विरुद्ध लढण्यासाठी प्रेरित करायला तयार केले होते. एप्रिलमध्ये रिलीज झालेले हे गाणे सलमानने आपल्या आवाजात गायले आहे.

संगीतकारांच्या या जोडीने नुकतेच सलमानचे ईदसाठीचे खास गाणे ‘भाई-भाई’ देखील बनवले होते. हे गाणे जातीय सलोख्याचे आहे. सलमान खानसाठी संगीतकार म्हणून साजिद-वाजिदने बर्‍याचदा काम केले आहे. १९९८ साली सलमानच्या सुपरहिट फिल्म ‘प्यार किया तो डरना क्या से’ मधून त्यांनी डेब्यू केला होता.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

रेशनकार्डपासून ते रेल्वेसंदर्भातील नियमांमध्ये आजपासून ‘हे’ मोठे बदल

नवी दिल्ली । देशात एकिकडे कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर अनेक नियम लागू करण्यात आलेले असतानाच नियमांच्या या सत्रामध्ये आता आज म्हणजेच १ जूनपासून काही महत्त्वाच्या नियमांमध्ये मोठे बदल होणार आहेत. रेल्वे, गॅस सिलेंडर, पेट्रोल-डिझेल यांची भाववाड तसेच रेशन कार्ड आणि रेल्वेच्या नियमातील बदलांचा यात समावेश आहे. यांपैकी काही बदलांमुळं नागरिकांना अंशत: सूट मिळणार आहे. तर, काही गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास तुम्हाला याचा फटकाही बसू शकतो.

लागू होणार ‘एक देश एक रेशन कार्ड’
देशभरातील गरीब जनतेला दिलासा देण्यासाठी म्हणून जवळपास २० राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ‘वन नेशन वन कार्ड’ ही योजना राबवण्यात येणार आहे. ज्याअंतर्गत दारिद्र्य रेषेखाली असणाऱ्यांना देशातील कोणत्याही भागात त्यांच्या रेशन कार्डच्या माध्यमातून धान्य मिळवता येणार आहे. जवळपास ६७ कोटी जनतेला याचा फायदा होईल. तीन रुपये प्रतिकिलो तांदूळ आणि दोन रुपये प्रतिकिलो गहू या दरानं धान्यवाटप करण्यात येणार आहे. स्थानिक, हिंदी किंवा इंग्रजी अशा भाषांमध्ये हे रेशन कार्ड दिलं जाईल. याशिवाय रेशन कार्ड आधार कार्डाशी जोडण्याची अंतिम तारीख ३० सप्टेंबर असल्याचंही केंद्रीय अन्नपुरवठा मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे.

घरगुती वापरातील सिलेंडरच्या दरात बदल
सामान्यांच्या खिशाला झळ बसणारी बातमी आहे. आजपासून १४ आणि १९ किलोंचा एलपीजी गॅस महागला आहे. १४ किलोचा गॅस सिलेंडर मुंबई आणि दिल्लीत ११ रुपये ५० पैशांनी महागला आहे. १९ किलो किंमतीचा गॅस सिलेंडर राजधानी दिल्लीत ११० रुपयांनी तर मुंबईमध्ये १०९ रुपयांनी महागला आहे.

रॉकेलच्या किंमतीत कपात
तेल कंपनीने रॉकेलच्या किंमतीत कपात केली आहे. दिल्ली रॉकेल फ्री राज्य म्हणून घोषित केल्यामुळे तेथील किंमती जाहिर होत नाहीत. कोलकातामध्ये आज रॉकेलच्या किंमतीत १२ रुपये १२ पैशांनी कपात झाली. मुंबईत रॉकेल प्रतिलीटर १३ रुपये ८६ पैसे झाले आहे.

पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ
अनेक राज्यात वॅटच्या किंमती वाढवल्यामुळे पेट्रोल आणि डिजेलच्या किंमतीत वाढ झाली आहे. मिझोराम सरकारने एक जूनपासून राज्यात पेट्रोलवर २.५ टक्के आणि डिझेलवर ५ टक्के वॅट लावला आहे. त्यामुळे राज्यातील पेट्रोलच्या किंमतीत वाढ झाली. केंद्रशासित प्रदेश जम्मू-कश्मीर आणि महाराष्ट्र यासारख्या राज्याने पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ केली आहे. सोमवारपासून (१ जून) महराष्ट्रात मुंबईपासून ते गडचिरोलीपर्यंत सर्वत्र पेट्रोल व डिझेल महाग होणार असून या दरवाढीमुळे पुढील १० महिन्यांत राज्य सरकारला तीन हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त महसूल मिळेल. राज्यात पेट्रोलवर २६ टक्के आणि डिझेलवर २४ टक्के वॅट आहे. तर पेट्रोलवरील अधिभार आता १०.१२ रुपये करण्यात आला आहे. याआधी तो ८.१२ रुपये होता. डिझेलवरील अधिभार १ रुपयांवरून ३ रुपये करण्यात आला आहे.

आजपासून २०० रेल्वे धावणार, प्रवासापूर्वी वाचा नियम
लॉकडाउनच्या पाचव्या टप्याच्या सुरूवातीलाच २०० नव्या रेल्वे गाड्या धावनार आहेत. यापूर्वी १२ मे पासून राजधानी एक्स्प्रेससारख्या ३० रेल्वे धावत होत्या. आता एक जूनपासून एकूण २३० रेल्वे प्रवाशांसाठी उपलब्ध असतील. या सर्व रेल्वे मेल आणि एक्स्परेस आहेत. या रेल्वेंना वेळापत्रकानुसार चालवले जाणार आहे. या सेवेच्या पहिल्या दिवशी म्हणजे सोमवारी देशभरातून १ लाख ४५ हजार प्रवासी प्रवास करणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.

सार्वजनिक वाहतुक सेवेला सुरुवात
उत्तर प्रदेश, दिल्ली, राजस्थान, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशसह अनेक राज्यांनी परिवहन मंडळाच्या बसेस सोडण्याला मंजूरी दिली आहे. बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशाकडे मास्क असणे बंधनकारक आहे. बसला वांवार सॅनेटाइज केलं जाईल. त्याशिवाय बसमध्ये बसताना किंवा उतरताना सोशल डिस्टेन्सिंगचा वापर करणे अनिवार्य केलं आहे.

विमान प्रवास महागला
एविएशन टर्बाइन फ्यूल (ATF) च्या किंमतीत वाढ झाल्यामुळे विमान प्रवासही महागला आहे. इंडियन ऑयलच्या संकेतस्थळानुसार, राजधानी दिल्लीत एटीएफचा दर 11030.62 रुपये प्रति किलोलीटरने वाढून 33,575.37 रुपये प्रति किलोलीटर झाला आहे.

गो एअरसह इतर विमान कंपन्या देशांतर्गत सेवा सुरू करणार
स्वस्तात सेवा देणारी विमान कंपनी गो एअर देशांतर्गत विमानसेवा सुरू केली आहे. याशिवाय इतर काही विमानकंपनीनेही २५ मे पासून देशांतर्गत वाहतूक सुरू केली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

केरळात मान्सूनचे आगमन; राज्यात कधी?

मुंबई । भारतात मान्सूनचं आगमन झालं असून केरळ किनारपट्टीवर धडक दिली आहे. भारतीय हवामान खात्याचे संचालक मृत्यूंजय मोहपात्रा यांनी पीटीआयशी बोलताना ही माहिती दिली आहे. भारतात जून ते सप्टेंबर या चार महिन्यात ७५ टक्के पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याआधी हवामानाचा अंदाज वर्तवणाऱ्या स्कायमेटने ३० मे रोजी मान्सूनचं आगमन झाल्याचं जाहीर केलं होतं. पण भारतीय हवामान खात्याने ही माहिती फेटाळली होती. अशी घोषणा करण्यासाठी सध्या योग्य परिस्थिती नसल्याचं भारतीय हवामान खात्याने सांगितलं होतं.

तर दुसरीकडे राज्यातही पूर्व मोसमी पावसाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. मुंबईसह कोकण आणि उर्वरित राज्यातही जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात सध्या पूर्व मोसमी पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे रविवारी अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. समुद्रातील कमी दाबाचं क्षेत्र तीव्र होत जाणार असल्याचं हवामान विभागाने सांगितलं आहे. त्यामुळे कोकणसह राज्यातील विविध भागात पूर्व मोसमी पाऊस कोसळणार आहे.

आयएमडीने १ जूनला संपूर्ण राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवली आहे. तर २ जून रोजी कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. याशिवाय ३ आणि ४ जूनला उत्तर कोकणात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भातही वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी होऊ शकते. तर पुणे, नाशिक, धुळे, नंदुरबार, नगर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, बीड आणि परभणी या जिल्ह्यांमध्येही पावसाचा अंदाज आहे.

चक्रीवादळाचा धोका
अरबी समुद्राच्या आग्नेय दिशेला आणि लगतच्या पूर्व-मध्य अरबी समुद्रात तसेच, लक्षद्वीपजवळ कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. येत्या ४८ तासांमध्ये या क्षेत्राची तीव्रता वाढून त्याचे चक्रीवादळात रूपांतर होण्याचा अंदाज आहे. ‘निसर्ग’ असे नामकरण होणारे चक्रीवादळ उत्तर दिशेकडे प्रवास करून ते ३ जूनला उत्तर महाराष्ट्र आणि गुजरातच्या दिशेने मार्गक्रमण करणार आहे. परिणामी किनारपट्टीवर जोरदार पावसाची शक्यता व्यक्त होत आहे. मुंबईमध्येही मंगळवारपासून पाऊस पडेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

बाबा आढाव हे एक चिवट आणि निडर चळवळ्या नेते – शरद पवार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । झोपड्पट्टीधारक, हमाल, कष्टकरी यासारख्या असंघटीत कामगारांसाठी आयुष्य वेचणारे बाबा अशी ओळख असणारे नेते बाबा आढाव यांचा आज ९० वा वाढदिवस आहे. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी त्यांच्या ट्विटर अकॉउंट ‘हमालांच्या कल्याणासाठी हिमालायाइतके कष्ट उपसणाऱ्या हिम्मतवाल्या बाबा आढावांना निरोगी दीर्घायू मिळावे म्हणून वाढदिवसानिमित्त माझ्या मनपूर्वक शुभेच्छा!’ अशा शब्दात शुभेच्छा दिल्या आहेत. पवार यांनी काही ट्विट करून आढाव यांच्या कामाचे तसेच आतापर्यंतच्या संघर्षाचे वर्णन केले आहे. शरद पवार मुख्यमंत्री झाले त्यावेळी मराठवाडा विद्यापीठाला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यासाठी करण्यात आलेल्या आंदोलनात ते अग्रभागी असल्याची आठवण ही त्यांनी शेअर केली आहे.

 

‘बाबा आढाव १ जून रोजी वयाची नव्वद वर्षे पूर्ण करत आहेत याचा मला मनापासून आनंद वाटतो. चांगली माणसे दीर्घायू असली पाहिजेत आणि बाबांना ते वरदान मिळाले आहे. बाबांनी कष्टकऱ्यांच्या कल्याणाचा वसा घेतला आणि ती एक प्रदीर्घ साधना असल्याने बाबांचे ध्यासपर्व शंभरीपार पोहचेल यात शंका नाही.’ अशी आशा पवारांनी व्यक्त केली आहे. बाबांच्या लढवय्या व्यक्तिमत्वाचे कौतुक करत असताना पवार म्हणतात, ‘मला वाटते हवाबदल करण्यासाठी त्यांचे आवडते ठिकाण तुरूंग असावे. बाबांनी वयाच्या २२ व्या वर्षी अन्नधान्याची दरवाढ करून गरीबांची परवड करणाऱ्या व्यवस्थेविरुद्ध आंदोलन करून तुरुंगवास भोगला.  बावन्न सालापासून त्यांनी तब्बल त्रेपन्न वेळा सामान्यांना न्याय देण्यासाठी कारावास पत्करला. यातून बाबा आढावांमध्ये एक चिवट आणि निडर चळवळ्या असल्याचे दर्शन घडते.’ १९२७ मध्ये बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळली तरी जयपूर येथील न्यायालयासमोर मनुचा पुतळा कित्येक वर्षे तसाच राहिला होता. तो हटवण्यासाठी देखील बाबांनी लाँगमार्च काढला होता. अशा या पुरोगामी महाराष्ट्राच्या सुपुत्राची इतिहासात अक्षय्य नोंद राहील असे पवार यांनी ट्विट मधून म्हंटले आहे.

 

 

बाबांनी २०१२ मध्ये नवी दिल्लीच्या जंतर-मंतरवर असंघटित कामगारांसाठी पेन्शन परिषद घेतली. त्यांच्या प्रयत्नाने ४५ कोटी असंघटित कामगारांच्या भल्यासाठी सामाजिक सुरक्षा कायदा विधेयक संसदेत मंजूर झाले असले तरी अंमलबजावणी होत नाही याची त्यांना खंत आहे.‘कष्टाची भाकर’ मिळवून देण्यासाठी आयुष्य झोकून देणाऱ्या बाबांच्या कष्टाचे हा कायदा अंमलात आल्याने चीज होईल. मध्यवर्ती शासनाने त्याकडे लक्ष पुरवावे याकडे देखील या निमित्ताने लक्ष वेधतो. असेही पवार यांनी सांगितले आहे. बाबांनी स्थापन केलेल्या संघटनांचीही पवारांनी त्यांच्या ट्विट मधून नोंद केली आहे. आणि त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केल्या आहेत.

 

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

लॉकडाउन नंतर कमी बजेटमध्ये कार खरेदी करण्याचा विचार करताय? ३ लाखांच्या आतमध्ये आहेत ‘हे’ ऑप्शन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरसच्या सध्याच्या संकटांच्या वेळी लोक आता सार्वजनिक वाहतुकीचा वापर करणे टाळतील किंवा कमी करतील. जे लोक घराबाहेर फिरतात त्यांना आता कोरोनामुळे स्वतःचे वाहन वापरायचे आहे. सध्या सुरु असलेल्या लॉकडाऊननंतर सार्वजनिक वाहतुकीचा वापर कमी होईल, असे एका सर्वेक्षणात म्हटले आहे. सुमारे ७० टक्के लोक अ‍ॅपवर आधारित वाहन सेवा वापरायचे टाळतील. लॉकडाऊन संपल्यानंतर जर तुम्हालाही कमी बजेटमध्ये स्वतःची कार खरेदी करायची असेल तर यासाठी बाजारात अनेक पर्याय उपलब्ध आहेत. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की ३ लाख रुपयांपर्यंतच्या बजेटमध्ये कोणत्या गाड्या बाजारात उपलब्ध आहेत.

रेडी-गो फेसलिफ्ट
नुकताच डॅटसन रेडी गोचा बीएस ६ इम्प्लांट हे मॉडेल घेऊन आला आहे. या बेस मॉडेलची किंमत ०.८ D व्हेरिएंटची किंमत २.८३ लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. २०२० रेडी-जीओ फेसलिफ्ट ०.८-लिटर इंजिनद्वारे समर्थित आहे. ०.८-लिटर इंजिन b ५४ bhp उर्जा आणि N२ Nm टॉर्क जनरेट करते. रेडी-जीओ ०.८-लिटर इंजिन इंजिनचे मायलेज २०.७१ किमी / ली आहे, जे पूर्वीच्या तुलनेत १.९९ kmpl कमी आहे.

3 लाख से भी कम कीमत में लॉन्च हुई बेहद ...

मारुती अल्टो ८००
ऑल्टो ही त्याच्या सेगमेंट मधील सर्वात लोकप्रिय अशी कार आहे. कमी किंमत तसेच देखभालीच्या कमी खर्चामुळे ती देखील मध्यमवर्गीय कुटुंबाची सर्वाधिक पसंतीची कार ठरली आहे. दिल्लीत अल्टोच्या एक्स शो रूमची किंमत २.९५ लाखांपासून सुरू आहे. ऑल्टोमध्ये ७९६ सीसी ३ सिलेंडर इंजिन आहे जे ६००० आरपीएम वर ३५.३ किलोवॅट वीज आणि ३५०० आरपीएम वर ६९ एनएम टॉर्क देते. याशिवाय हे इंजिन ५ स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनने सुसज्ज आहे. कारमध्ये बीएस ६ इंजिन देण्यात आले आहे, जे किफायतशीर आणि उत्कृष्ट कामगिरी देखील देते. एका लिटरमध्ये ही कार २२.०५ किलोमीटरचे मायलेज देते.

मारुति आपकी मनपसंद कार ओल्टो 800 का ...

Renault Kwid
Renault Kwid ला त्याच्या स्पोर्टी डिझाइन आणि चांगल्या स्पेसमुळे चांगलेच पसंत केले जात आहे. दिल्लीत त्याची एक्स शो रूम किंमत २.९२ लाखांपासून सुरू होते. या कारमध्ये ७९६ सीसी बीएस ६ पेट्रोल इंजिन आहे, जे ४८ एचपी पॉवर आणि ६९ एनएम टॉर्क तयार करते. सुरक्षिततेसाठी एअरबॅग, अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम + ईबीडी, रियर पार्किंग सेन्सर्स, सीट बेल्ट रिमाइंडर आणि स्पीड अ‍ॅलर्ट सिस्टम यासारखी खास वैशिष्ट्ये उपलब्ध आहेत. ही कार एका लिटरमध्ये २५ किमीचे मायलेज देते.

Renault Kwid (2020) Price, Specs, Review, Pics & Mileage in India

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.