Tuesday, December 30, 2025
Home Blog Page 5717

राज्यात पेट्रोल-डिझेल महागले; इतकी झाली इंधन दर वाढ

मुंबई । राज्य सरकारने पेट्रोल आणि डिझेलवर आकारल्या जाणाऱ्या मूल्यवर्धित करावर (VAT) अधिभार वाढ केली आहे. त्यामुळं सोमवारपासून पेट्रोल आणि डिझेल प्रती लीटर २ रुपये महागले आहे. मुंबईत पेट्रोलचा दर प्रती लीटर ७८.३२ रुपये झाला असून डिझेल दर ६८.२१ रुपये आहे. याआधी मार्च महिन्यात राज्यातील महाविकास आघाडी सरकारने पेट्रोल आणि डिझेलवर प्रतिलिटर १ रुपया अतिरिक्त अधिभार लावला होता.

कोरोना रोखण्यासाठी देशभरात टाळेबंदीचा पाचवा टप्पा सुरु आहे. मात्र इंधन विक्री कमी झाल्याने सरकारचा कर महसूल आटला आहे. कर उत्पन्न वाढवण्यासाठी अनेक राज्यांनी लॉकडाउनच्या काळात पेट्रोल आणि डिझेलवरील कर वाढवला होता. दरम्यान, राज्यात इंधनावर आकारण्यात येणाऱ्या मूल्यवर्धित करावरील (VAT) अधिभारात वाढ केल्यानं पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती किमान २ रुपयाने वाढवल्याने सरकारच्या तिजोरीला महिन्याला किमान ५०० कोटींचा अतिरिक्त महसूल प्राप्त होण्याचा अंदाज आहे. याआधी केंद्र सरकारने पेट्रोवरील उत्पादन शुल्क १० रुपये आणि डिझेलवरील शुल्क १३ रुपये प्रती लीटर वाढवले होते.

व्हॅटवरील अधिभाराने राज्यात पेट्रोल आणि डिझेल महागले असले तरी देशातील इतर प्रमुख शहरांमध्ये इंधनाचे भाव स्थिर आहेत. इंडियन ऑइलच्या दर पत्रकानुसार सोमवारी मुंबई वगळता इतर प्रमुख शहरांत इंधन दरात कोणताही बदल झाला नाही. दिल्लीत आज पेट्रोलचा भाव ७१.२६ रुपये आहे. डिझेलच्या दरात देखील कोणताही बदल झालेला नाही. डिझेलचा भाव ६९.३९ रुपये आहे.चेन्नईत पेट्रोल दर ७५.५४ रुपये असून डिझेल ६८.२२ रुपये आहे. कोलकात्यामध्ये पेट्रोल दर प्रती लीटर ७३.३० रुपये असून डिझेल ६५.६२ रुपये आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

मुंबई फिल्मसिटीत पुन्हा लाईट, कॅमेरा, ऍक्शन; चित्रीकरणाला राज्य सरकारची परवानगी

मुंबई । कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यात चित्रपटाच्या तसेच मालिकांच्या चित्रीकरणावर बंदी घालण्यात आली होती. तसेच कोरोनाला रोखण्यासाठी लागू केलेल्यालॉकडाऊनमुळे मार्च महिन्यापासून अनेक चित्रपट, वेब सिरीज, मालिकांचे चित्रिकरण ठप्प आहे. अखेर दोन महिन्यांनंतर महाराष्ट्रात चित्रीकरणाला हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे.

महाराष्ट्र सरकार सेटवर योग्य ती काळजी घेत चित्रीकरणाला सुरूवात करण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे कलाकार, निर्माते, दिग्दर्शक त्याचप्रमाणे रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांनी सुटकेचा श्वास घेतला आहे. कोरोनामुळे संपूर्ण देशभरात लॉकडाऊन आहे.

काही दिवसांपूर्वी कोरोनाच्या लॉकडाऊनकाळात ठप्प पडलेल्या मनोरंजन क्षेत्राच्या कामकाजाला उभारी देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आघाडीच्या ब्रॉडकास्टर्स आणि टीव्ही मालिका निर्मात्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमार्फत संवाद साधला होता. परंतु कोणत्याही भागात चित्रीकरण सुरू करण्यापूर्वी सरकारने लादण्यात आलेल्या अटी शर्तीचे पालन करण्याचे आवाहन प्रॉडक्शन हाऊसला करण्यात आले आहे.

एखाद्या शहरात चित्रीकरण करायचे राहिल्यास तेथील जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी बंधनकारक असणार आहे. शिवाय फिल्म सिटीमध्ये शुटींगमध्ये करायचे राहिल्यास महाराष्ट्र चित्रपट, रंगमंच आणि सांस्कृतिक विकास महामंडळची परवनगी असणं गरजेचं असणार आहे.

 

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

नुकतेच MBBS झालेल्या विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र देण्याचे अमित देशमुखांचे निर्देश; ४ हजार डाॅक्टर्स उपलब्ध होणार

मुंबई । राज्यातील कोरोना रुग्णांची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. राज्यातील सर्वाधिक रुग्णांचे मुंबईत निदान झाले असून मुंबईतील रुग्णसंख्या ३८ हजार पार झाली आहे. जवळपास १,२२७ रुग्ण मृत्यू पावले आहेत. अशा परिस्थितीत रुग्णांवर उपचार करण्यासाठी वैद्यकीय स्टाफ ची कमतरता भासते आहे. यासाठी महाराष्ट्राचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी कोरोना उपचारासाठी डॉक्टर आणि नर्सेस यांना नेमण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. वय वर्षे ४५ च्या आतील नोंदणीकृत तसेच कोणतीही वैद्यकीय समस्या नसलेल्या आणि आपली इंटर्नशिप पूर्ण केलेल्या कोणालाही याअंतर्गत अर्ज करता येणार आहे. तसेच फेब्रुवारी २०१९ साली एमबीबीएस चे अंतिम वर्ष पास झालेल्या ४००० वैद्यकीय विद्यार्थ्यांनाही त्यांनी अर्ज करण्याचे आवाहन केले आहे.

सध्या मुंबईतील परिस्थिती भीषण होत चालली आहे. दिवसेंदिवस वाढणाऱ्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी यंत्रणेची आवश्यकता आहे. म्हणूनच अमित देशमुख यांनी असे आवाहन केलं आहे. जे डॉक्टर, नर्सेस यासाठी नियुक्त केले जातील त्यांना बृहमुंबई महानगरपालिका यांच्याकडून मानधन दिले जाईल. फिजिशियननाही मानधन तत्वांवर नेमले जाणार आहे. डॉक्टरांना ८०,००० प्रति महिना, ऍनेस्थेटिस्टस आणि इंटेन्सिव्हिस्टस याना २ लाख रु प्रति महिना तर पात्र नर्सेस ना ३०,००० रु प्रति महिना मानधन दिले जाणार आहे.

 

अमित देशमुख यांनी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू दिलीप म्हैसकर यांना निर्देश दिले आहेत की, जे विद्यार्थी फेब्रुवारी २०१९ ला अंतिम वर्षांची परीक्षा पास झाले आहेत, आणि इंटर्नशिप पूर्ण केली आहे. त्यांना तात्पुरते पदवी प्रमाणपत्र देण्यात यावे. या प्रमाणपत्राच्या साहाय्याने हे विद्यार्थी अर्ज करू शकतील. जवळपास ४००० विद्यार्थ्यांनी नोव्हेंबर २०१८ ला एमबीबीएम ची परीक्षा दिली आहे ज्याचे निकाल फेब्रुवारी २०१९ रोजी जाहीर झाले आहेत आणि यावर्षी त्यांनी त्यांची इंटर्नशिप पूर्ण केली आहे. या विद्यार्थ्यांचा पदवीदान समारंभ फेब्रुवारी मध्ये होणार होता. जो सध्याच्या कोरोना परिस्थितीमुळे लांबणीवर पडला आहे. पण हे ४००० डॉक्टर उपचारासाठी सेवा बजावू शकतील असा त्यांचा विश्वास आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

मनावर दगड ठेवून मी ‘हा’ निर्णय घेत आहे- पंकजा मुंडे

मुंबई । भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी ३ जूनचा परळी दौरा रद्द केला आहे. दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथी निमित्त गोपीनाथ गडावर होणाऱ्या कार्यक्रमास त्या उपस्थित राहणार होत्या. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे गोपीनाथ गडावर जाण्याऐवजी घरात राहूनच आपले वडील दिवंगत गोपीनाथ मुंडे यांना अभिवादन करणार आहेत. फेसबुक पोस्टच्या माध्यमातून त्यांनी कार्यकर्त्यांना ही माहिती दिली आहे. ‘मनावर दगड ठेवून हा निर्णय घ्यावा लागत आहे,’ अशी खंतही त्यांनी व्यक्त केली आहे.

दरवर्षी ३ जून रोजी भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांची पुण्यतिथी त्यांचे कार्यकर्ते व समर्थक हा दिवस ‘संघर्ष दिन’ म्हणून साजरा करतात. त्या निमित्त गोपीनाथ गडावर विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. मात्र, कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर यंदा गोपीनाथ गडावर कुठलाही मोठा सोहळा होणार नाही. त्याऐवजी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत छोटासा कार्यक्रम होणार आहे, असं पंकजा यांनीच जाहीर केलं होतं. मात्र, आता पंकजा स्वत: देखील गोपीनाथ गडावरच्या कार्यक्रमाला जाणार नाहीत. पंकजा मुंडे परळीत आल्यास स्थानिक व इतर जिल्ह्यातील लोक मोठ्या संख्येने जमा होतील. त्यामुळे प्रशासनावर मोठा ताण होईल. नियमांचा भंग होईल आणि कोविडचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता जिल्हा प्रशासनानं व्यक्त केली होती. प्रशासनाची ही अडचण लक्षात घेऊन पंकजांनी परळी दौरा रद्द केला आहे.

https://www.facebook.com/PankajaGopinathMunde/posts/3022524674499740

आपला दौरा रद्द करण्या संदर्भात पंकजा यांनी एक सविस्तर पोस्ट फेसबुकवर लिहिली आहे. या पोस्टमध्ये पंकजा लिहितात, ‘ मी एक जबाबदार नागरिक व माजी मंत्री असल्यानं प्रशासनाच्या अडचणी समजू शकते. त्यामुळं ३ जून मुंडे साहेबांचे पुण्यस्मरण घरात राहूनच करेन. प्रीतमताई परळीतच असून त्यादिवशी त्या गोपीनाथ गडावर जातील आणि दर्शन व माझा कार्यक्रम असे दोन्ही ऑनलाईन #Live करतील. सर्व कार्यकर्त्यांनी घरात राहूनच मुंडे साहेबांची पुण्यतिथी साजरी करावी. कशी साजरी करायची याबद्दलचे सर्व डिटेल्स लवकरच देईन आणि आपण सर्व त्याच वेळेमध्ये कार्यक्रम करूया आणि मुंडे साहेबांना समर्पित असा तो दिवस पार पाडूया असं आवाहन त्यांनी आपले  कार्यकर्ते व समर्थकांना केलं आहे.

त्या पुढे लिहितात, ‘मुंडे साहेब आज असते तर त्यांनीही प्रशासनाचा मान राखला असता. दुसऱ्या एखाद्या कारणासाठी संचारबंदी लागली असती तर मी पर्वा केली नसती. पण इथे लोकांच्या आरोग्याचा प्रश्न आहे. त्यामुळं मनावर दगड ठेवून हा निर्णय घ्यावा लागत आहे. ३ जूनला मी साहेबांचे दर्शन घेऊ शकत नाही हे माझ्यासाठी आणि तुमच्यासाठी अतिशय अवघड आहे. मी खूप व्यथित आहे. पण तरीही प्रशासनाला सहकार्य करण्यास तयार आहे, आपणही सहकार्य करावे आणि कोणीही आपापल्या घरातून बाहेर पडू नये, असं आवाहनही पंकजा मुंडेंनी केलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

८ वर्षानंतर इरफान पठाणने माजी कर्णधार धोनीवर केला ‘हा, गंभीर आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या स्विंग गोलंदाजीने क्रिकेट विश्वात आपला ठसा उमटवणाऱ्या इरफान पठाणला आपल्या कारकिर्दीचा शेवट असा होईल याची कल्पनाही नव्हती. पठाण २०१२ मध्ये श्रीलंकेविरूद्ध अखेरचा भारतीय संघासाठी खेळताना दिसला होता. या सामन्यात पठाणने चमकदार कामगिरी केली होती तसेच तो सामनावीरही ठरला होता. श्रीलंकेविरुद्धच्या या सामन्यात पठाणने पहिले आपल्या संघासाठी २८ चेंडूत २९ धावा केल्या आणि नंतर शानदार गोलंदाजी करत त्याने १० षटकांत ६१ धावा देत ५ विकेट घेतल्या.

मात्र अशी कामगिरी करूनही, भारतीय संघ व्यवस्थापनाने त्याकडे दुर्लक्ष केले आणि पुन्हा कधीही त्याला राष्ट्रीय संघात खेळण्याची संधी दिली नाही. यावेळी, तो संघात पुनरागमन करण्यासाठी घरगुती क्रिकेट खेळत राहिला आणि संधी मिळत नसतानाही त्याने येथेही आपला ठसा उमटविला. एका युट्यूब वाहिनीशी बोलताना पठाणने आपले हे दुःख मनातून बाहेर काढले आणि त्या वेळचे संघ व्यवस्थापन, कर्णधार आणि प्रशिक्षक यांना लक्ष्य केले.

पठाणबरोबर जेव्हा हा सर्व प्रकार घडला तेव्हा संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा होता. पठाण याने या संभाषणात सांगितले की,’ त्याला संघात नियमितपणे संधी दिली जात नव्हती. त्याशिवाय माझ्याबाबत एक अफवा पसरली होती की, माझ्या गोलंदाजीतील स्विंग आणि वेग संपला. म्हणूनच मला संघात पुन्हा कधी संधी मिळाली नाही.

या संभाषणात पठाण म्हणाला, “जेव्हा मी भारताकडून माझा शेवटचा सामना खेळला, तेव्हा मला सामनावीर म्हणून निवडले गेले. यानंतर, माझ्याकडे सतत दुर्लक्ष केलं गेलं. मी याबद्दल प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांच्याशी बोलण्याचाही प्रयत्न केला पण काही गोष्टी या प्रशिक्षकाच्या हातात नसल्याचे त्यांनी मला सांगितले.

तो म्हणाला, “मात्र, मी येथेच थांबलो नाही आणि त्यावेळी मी संघाचा कर्णधार धोनीला विचारले की, मला संघातील प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी का मिळत नाही? माझ्या गोलंदाजीत आणखी काय सुधारले पाहिजे? धोनीनेही त्याला अचूक असे उत्तर दिले नाही. त्यानंतर निवडकर्त्यांनीही मला निवडले नाही.

VIDEO: MS Dhoni, Irfan Pathan having fun in dressing room ...

यावेळी आपला राग दूर करताना पठाण म्हणाला की,’ मी कोठे चूक करीत आहे हे जाणून घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. तो म्हणाला, “मी वारंवार त्याला एकच गोष्ट विचारू शकत नाही. यामुळे तुमचा आदर कमी होतो. याचा परिणाम असा झाला की मला पुन्हा संघात संधी मिळाली नाही.

या संभाषणात इरफान पठाण म्हणाले की,’ भारतीय संघातून बाहेर पडल्यानंतर तो घरगुती सय्यद मुश्ताक अली टी -२० करंडक २०१६ मध्ये सर्वाधिक विकेट घेणारा तसेच तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकाच्या धावा करणारा फलंदाज देखील ठरला होता, परंतु असे असूनही निवड समितीने म्हटले होते,’ की यामध्ये ती मजा नाहीये.’ दरम्यान, पठाणने आपल्या या संभाषणात माजी सलामीवीर आणि त्यावेळचे निवड समिती अध्यक्ष श्रीकांत यांनाही लक्ष्य केले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

आयकर विभागाने केले ITR फॉर्ममध्ये ‘हे’ मोठे बदल

नवी दिल्ली । आयकर विभागाने आर्थिक वर्ष २०१९-२० मध्ये आयकर रिटर्न फॉर्म (ITR) जाहीर केला आहे. यासाठी सरकारने अधिसूचना देखील जाहीर केल्या आहेत. आर्थिक वर्ष २०१९-२० च्या आयटीआर फॉर्म भरण्याची अंतिम तारीख ही ३० नोव्हेंबर आहे.

नवे ७ फॉर्म केले जाहीर
आयकर विभागाने यावेळी ७ वेगवेगळे फॉर्म जाहीर केले आहेत. ३० मे रोजी जाहीर करण्यात आलेल्या या फॉर्ममध्ये आयटीआर-१ (सहज), आयटीआर-२, आयटीआर-३, आयटीआर-४ (सुगम), आयटीआर-५, आयटीआर-६ आणि आयटीआर-७ यांचा समावेश आहे. आयकर विभागाने कोविड-१९ या जागतिक महामारीचा विचार करून नियमांमध्ये मोठ्या प्रमाणात बदल केले आहेत. ITR फॉर्म १ आणि ITR फॉर्म ४ पुन्हा मागवण्यात आले आहेत.

‘ही’ माहिती देणं बंधनकारक
कर भरणाऱ्या व्यक्तीने आयटीआर फॉर्मच्या माध्यमातून काही माहिती देणं बंधनकारक आहे. १ कोटीहून अधिक रक्कम जमा असल्यास त्याची माहिती, परदेश दौऱ्यावर २ लाख रुपयांहून अधिक खर्च केला असल्यास त्याची माहिती, १ लाख रुपये अथवा त्यापेक्षा विज बील आलं असल्याची त्याची माहिती, तसेच टॅक्स वाचवण्याकरता २०२० मध्ये केलेली गुंतवणूक या सगळ्या गोष्टींची माहिती देणे बंधनकारक आहे.

सरकारने यासोबत आयकर कायद्यातील सेक्शन ८०सी, ८०डी आणि ८० जीच्या अंतर्गत गुंतवणूक करण्याची तारीख वाढवून ३० जूनपर्यंत केली आहे. तज्ञांच असं म्हणणं आहे की, त्या व्यक्तींना आयटीआर-१,२ आणि ४ चा लाभ मिळणार नाही. तसेच कर भरणारी व्यक्ती कंपनीत संचालक पदावर असेल ज्यांनी लिस्टिंगमध्ये नाव नसलेल्या इक्विटी शेअरमध्ये गुंतवणूक केली असेल. त्यांना काही प्रमाणात सवलत दिली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

‘एक देश एक रेशन कार्ड’ योजना आजपासून सुरु, स्थलांतरितांना मिळणार दिलासा 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील संचारबंदीचा पाचवा टप्पा सुरु झाला आहे. ठिकठिकाणचे स्थलांतरित कामगार आपापल्या गावी परतत आहेत.  आहे त्या ठिकाणीच अडकले आहेत. अनेकजण बेरोजगार झाले आहेत. या पार्श्वभूमीवर देशातील अशा गरीब तसेच स्थलांतरित कामगारांसाठी आशादायक गोष्ट घडली आहे. एक देश एक रेशन कार्ड ही योजना आजपासून देशभरात सर राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश याठिकाणी सुरु होते आहे. या योजनेअंतर्गत देशातील कोणत्याही प्रदेशातील व्यक्ती इतर कोणत्याही प्रदेशात राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यानुसार रास्त भाव रेशन दुकानातून अन्नधान्य खरेदी करू शकणार आहे.

महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, गुजरात, तेलंगणा या राज्यात हा प्रकल्प राबविण्यात आला होता. या राज्यांमध्ये रेशन कार्ड पोर्टेबिलिटीची सुविधा होती. १ जानेवारीपासून आणखी ८ राज्यांमध्ये ही योजना राबविण्यात आली होती. आजपासून देशभरातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेश इथे ही योजना राबविण्यात येणार आहे. बायोमेट्रिक किंवा आधार वैधतेनंतर नागरिकांना योजनेचा लाभ घेता येणार आहे. देशातील जवळपास ६७ कोटी लोकांना याचा लाभ मिळणार आहे. तसेच स्थलांतरित कामगारांना अनुदानित अन्नधान्यापासून वंचित राहावे लागणार नाही.

देश के 83 फीसदी राशनकार्ड धारक 'वन ...

एक देश एक रेशन ही सध्याच्या केंद्र सरकारची एक महत्वपूर्ण योजना आहे. या योजनेअंतर्गत देशातील नागरिक कोणत्याही ठिकाणी रास्त भाव दुकानातून स्वस्त ऍन खरेदी करू शकणार आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यानुसार नागरिकांना रस्ट भाव दुकानातून गहू व तांदूळ स्वस्त दरात अर्थात अनुक्रमे २ व ३ रु प्रतिकिलो मिळतात. ही  योजना सुरु झाल्यावर जुने रेशन कार्ड सुरु राहील केवळ त्याला नवीन नियमानुसार अपडेट केले जाईल. केंद्र सरकारने राज्यांना दहा अंकांचे रेशन कार्ड क्रमांक जारी केले आहेत ज्यातील पहिले दोन क्रमांक राज्याचे कोड असतील आणि त्यानंतरचे दोन अंक रेशन कार्ड क्रमांक असतील. या योजनेमुळे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराला आळा बसेल असा विश्वास सरकारला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

राज्याच्या ‘या’ भागांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता

पुणे । भारतीय हवामान खात्याने पश्चिम किनारपट्टीवर चक्रीवादळाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांमध्ये ३ जून आणि ४ जून रोजी अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) या भागासाठी रेड आणि ऑरेंज अलर्ट दिला आहे. रेड अलर्ट भागामध्ये अतिमुसळधार तर ऑरेंज अलर्टमध्ये मुसळधार पाऊस पडू शकतो.

दुसरीकडे १ जूनलाही काही भागात वाऱ्यासह पावसाचा अंदाजही भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. दक्षिणपूर्व आणि लगतच्या मध्यपूर्व अरबी समुद्र आणि लक्षद्वीप भागात कमी दाबाचं क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे पुढच्या १२ तासात पूर्व-पश्चिम आणि लगतच्या नैऋत्य अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार होईल. त्यानंतरच्या २४ तासात पूर्वोत्तर अरबी समुद्रावरील चक्रीवादळामध्ये रुपांतर होण्याची शक्यता आहे.

हे चक्रीवादळ सुरुवातीला २ जूनला पहाटे उत्तरेकडे आणि नंतर उत्तर इशान्येकडे वळेल. यामुळे उत्तर महाराष्ट्र आणि दक्षिण गुजरातच्या जवळ हे वादळ ३ जूनपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. या चक्रीवादळामुळे पश्चिम किनारपट्टीवर १ ते ४ जून दरम्यान भरपूर पावसाची शक्यता आहे. १ जूनला दक्षिण कोकण आणि गोव्यात मुसळधार, अति किंवा अत्यंत मुसळधार पाऊस पडू शकतो.

२ आणि ३ जूनला दक्षिण कोकण आणि गोव्यात बहुतेक ठिकाणी हलका आणि मध्यम स्वरुपाचा पाऊस असेल तर थोड्या ठिकाणी अत्यंत मुसळधार पावसाची शक्यता आहे. ३ आणि ४ जूनला उत्तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस असेल, तर काही ठिकाणी अत्यंत मुसळधार पाऊस असेल, असं भारतीय हवामान खात्याकडून सांगण्यात आलं.

मुख्यमंत्र्यांनी येत्या दोन दिवसात पश्चिम किनारपट्टीवर चक्रीवादळ येण्याची शक्यता लक्षात घेऊन सिंधुदूर्गपासून मुंबईपर्यंतच्या किनारपट्टीवरील मच्छिमारांनी काळजी घेण्याचे, समुद्रात न जाण्याचे आवाहन केलं. हे वादळ येण्याची शक्यता असून ते दिशाही बदलू शकतं, पण तरीही त्यासाठी आवश्यक असणारी यंत्रणा सज्ज केल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

मुंबईहून अचलपुर तालुक्यात परतलेल्या ३० वर्षीय युवकाला कोरोनाची लागण

अमरावती प्रतिनिधी | आशिष गवई

अमरावती जिल्हातील अचलपुर तालुक्यात असणारर्‍या काकडा गावातील एका ३० वर्षीय युवकाचा कोरोना अहवाल आज सकाळी सकारात्मक आलेला आहे. मात्र संबधीत युवक हा मुंबईहून गावात येताच त्याला संस्थात्मक वीलीगीकरन कक्षात ठेवल्याने कोनीही गावातील व्यक्ती त्याच्या संपर्कात येऊ शकले नाही. अन्यथा अधीक बाधीत होऊ शकले असते अशी माहीती अचलपूर चे तहसीलदार मदन जाधव यांनी दीली.

मुंबईहून दी. २१ तारखेला हा युवक त्याच्या ईतर दर्यापुर येथील मित्रांसोबत खाजगी वाहनाने आलेला होता. मात्र प्रशासनाने गावात येताच या युवकाला गावातील शाळेमधे विलीगीकरन कक्षामधे १४ दीवस थांबण्यासाठी सांगीतले. मात्र काही पारीवार बाहेरहुन आलेल्या आपल्या पाल्यांना कीवा संबंधीतांना वीलीगीकरनात ठेऊ नये असा आग्रह करतात जर असे झाल्यास कोरोना बाधीत व्यक्तिंच्या संपर्कातील परीवाराला लागण होऊ शकते.

त्यामुळे कोणीही बाहेरील आलेल्या व्यक्तिंना घरामधे न ठेवता संस्थात्मक विलीगीकरनात ठेवनेच योग्य असते असे आवाहन तहसीलदार मदन जाधव यांनी केलेले आहे. . तर युवकाच्या संपर्कात आणखी कोणी आलेला आहे का यासाठी वीचारपुस सुरू असुन संबधीत परीसर सील करन्यात आलेला आहे . तर सपुर्ण परीसरावर प्रशासनाची नजर आहे असे तहसीलदारांनी सांगीतले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

अमेरिकेत वर्णद्वेषविरोधी आंदोलनाची धग व्हाइट हाउसपर्यंत; ट्रम्प यांनी घेतला बंकरमध्ये आसरा

वॉशिंग्टन । कृष्णवर्णीय जॉर्ज फ्लॉएडची पोलिसांनी हत्या केला असल्याचा आरोप करत अमेरिकेत वर्णद्वेषविरोधी आंदोलन तीव्र झाले आहे. या आंदोलनाची धग आता व्हाइट हाउसपर्यंत पोहचली असून राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना बंकरमध्ये लपवण्याची वेळ सुरक्षा यंत्रणांवर आली आहे. राजधानी वॉशिंग्टनमध्ये रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली. तर, व्हाइट हाउसजवळ सलग तिसऱ्या दिवशीही आंदोलन सुरू राहिले. यावेळी आंदोलकांनी जाळपोळ करण्याचा प्रयत्न केला.

व्हाइट हाउसजवळ आंदोलन करणाऱ्या एका गटाने कचऱ्याच्या डब्याला आग लावली. काही आंदोलकांनी पोलिसांसोबतही धक्काबुक्की केली. परिस्थिती चिघळत असल्याचे पाहून सिक्रेट सर्व्हिस एजेंट्सने राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना सुरक्षेच्या कारणास्तव बंकरमध्ये लपवले. त्यानंतर पोलिसांनी व्हाउट हाउसजवळील आंदोलकांना बळाचा वापर करून हटवले.

रविवारी देखील, व्हाउट हाउसजवळ आंदोलन करण्यात आले. यावेळी शेकडो आंदोलकांनी सहभाग घेतला होता. रविवारच्या आंदोलनाच्या दरम्यान सीक्रेट सर्व्हिस एजेंट्सना दंगलविरोधी पथकाचा गणवेश घालावा लागला होता. या प्रकरणातील आरोपी असलेल्या ४ पोलिसांना निलंबित करण्यात आले असून त्यांची चौकशी सुरू आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”