Saturday, December 27, 2025
Home Blog Page 5759

पंतप्रधान मोदींनी तरी कुठे घराबाहेर पाऊल टाकलं? भाजपच्या टीकेला जयंत पाटलांचे प्रत्युत्तर

मुंबई । कोरोना व्हायरसचं संकट रोखण्यात राज्य सरकारला अपयश आल्याचं सांगत भाजपने आज आंदोलन केलं. सरकारच्या अपयशाच्या निषेधार्थ भाजपनं आज राज्यभरात ‘मेरा आंगण, मेरा रणांगण’ हे आंदोलन केलं. ‘काळे मास्क, काळे शर्ट, काळी रिबीन, काळे बोर्ड घेऊन राज्य सरकारचा निषेध केला. महाराष्ट्र भाजपच्या या सरकारविरोधी आंदोलनाचा समाचार घेतानाच या आंदोलनापासून जनतेनं सावध राहावं, असं आवाहन राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केलं आहे.

दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाराष्ट्रावर कोरोनाच संकट असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मातोश्रीबाहेर पडत नाहीत, अशी टीका केली होती. त्याला जयंत पाटील यांनी चांगलेच प्रत्युत्तर दिलं. ते म्हणाले कि, “चंद्रकांत पाटलांना आधी पण सल्ला दिला होता की घराबाहेर पडू नका. लॉकडाऊन आहे. सगळे जण व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून काम करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी तरी कुठे बाहेर गेले? त्यामुळे चंद्रकांतदादा ऐकतील, असा विश्वास आहे,” असा टोला जयंत पाटील यांनी चंद्रकांत पाटील यांना लगावला.

आजच्या आंदोलनावेळी केंद्राप्रमाणे राज्य सरकारनेही विशेष पॅकेज जाहीर करावं अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्यावर केंद्र सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजमधील फोलपणा देवेंद्र फडणवीस यांना दिसला म्हणून आता ते राज्य सरकारकडे पॅकेजची मागणी करत आहेत, असा टोला जयंत पाटील यांनी फडणवीसांना लगावला आहे. शिवाय “केंद्राने राज्याला पैसे दिले याबाबत देवेंद्र फडणवीस यांना काहीतरी गैरसमज झाला आहे,” असं म्हणत फडणवीसांच्या मागणीतली हवा काढण्याचा प्रयन्त केला.

दरम्यान, राज्यात आज ठिकठिकाणी भाजपनं सरकारविरोधात निदर्शनं केली. राज्यातील भाजपचे सर्व प्रमुख नेते या निषेध आंदोलनात सहभागी झाले होते. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, खासदार गिरीश बापट यांच्यासह भाजपमधील नाराज नेते एकनाथ खडसे यांनी आपल्या अंगणात येऊन सरकारचा निषेध नोंदवला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

पाकिस्तानच्या माजी क्रिकेटरने सांगितला सचिन तेंडुलकरचा ‘हा’ विक पॉईंट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली यांची गेल्या कित्येक वर्षांपासून तुलना केली जात आहे. कोहलीची सात्यत्तता आणि त्याने केलेल्या धावांमुळे अनेक क्रिकेट विश्लेषक, त्याचे चाहते आणि माजी खेळाडू प्रभावित झाले आहेत. विराट कोहलीचे हे सातत्य आणि त्याचा खेळ पाहता तो सचिन तेंडुलकरचे अनेक विक्रम मोडीत काढेल असा अनेक दिग्गजांचा विश्वास आहे. पाकिस्तानचे माजी दिग्गज खेळाडू सरफराज यांचे ही मत तेच आहे. विक्रम रचण्यात विराट कोहली सचिन तेंडुलकरला मागे टाकेल असा त्यांना विश्वास आहे.

इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या एका मुलाखतीत सरफराज नवाज यांनी सचिन तेंडुलकरच्या विक पॉईंटबद्दल सांगितले जी विराट कोहलीची नाही आहे. त्याने सचिनची ही उणीवेला आधार असल्याचे सांगून विराट त्याच्या पुढे जाईल असे म्हंटले आहे.

इन्सविंग खेळण्यात विक होता सचिन
तो म्हणाला, “यात काही शंका नाही की विराट कोहली तुलनेच्या पलीकडे आहे. तो प्रत्येक फॉरमॅटमध्ये सचिनला मागे टाकेल. इन्सविंग विरुद्ध सचिन कमकुवत होता, परंतु विराटच्या फलंदाजीमध्ये क्वचितच उणीवा जाणवतात. कारकीर्दीच्या सुरुवातीला तो आउट स्वींगविरुद्ध थोडा कमकुवत वाटायचं, पण आता मात्र तो फलंदाजीच्या शिखरावर पोहोचला आहे.

विराटने आउट स्विंगवर बरीच मेहनत घेतली
एक वेळ अशी होती की विराट कोहलीला आउट स्विंग बॉल खेळताना त्रास होत होता. विशेषत: रेड बॉल क्रिकेटमध्ये. मात्र गेल्या काही वर्षांत ३१ वर्षीय कोहलीने आपल्या या कमकुवतपणावर बरीच मेहनत घेतली आहे. आता तो कसोटी क्रिकेटमधील आणखी एक प्रभावी फलंदाज बनला आहे. कोहलीची फलंदाजी पाहून तो आधुनिक काळातील सर्वात परीपूर्ण फलंदाज म्हणून ओळखला जाऊ शकतो.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सचिनने सर्वाधिक धावा केल्या आहेत
त्याच वेळी, जेव्हा सचिन तेंडुलकरचा विचार केला जातो तेव्हा काही लोकांचा असा विश्वास आहे की त्याला इनस्विंग डिलिवरीजवर चांगले खेळता येत नव्हते. हे सर्व असूनही त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३४,००० हून अधिक धावा केल्या आहेत आणि ही वस्तुस्थिती आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तो सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे.

मात्र विराट कोहलीने गेल्या काही वर्षात सचिन तेंडुलकरचे अनेक विक्रम मोडले आहेत. सचिन तेंडुलकरच्या सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावा आणि १०० शतके यांचा विक्रमही तो तोडू शकतो की नाही हे पुढच्या काही वर्षांतच आपल्याला कळेल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

केंद्राच्या पॅकेजमध्ये फोलपणा दिसल्यावरचं फडणवीसांनी राज्याकडे पॅकेजची मागणी केली- जयंत पाटील

मुंबई । केंद्राप्रमाणे राज्य सरकारनेही विशेष पॅकेज जाहीर करावं अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्यावर केंद्र सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजमधील फोलपणा देवेंद्र फडणवीस यांना दिसला म्हणून आता ते राज्य सरकारकडे पॅकेजची मागणी करत आहेत, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी फडणवीसांना लगावला आहे. शिवाय “केंद्राने राज्याला पैसे दिले याबाबत देवेंद्र फडणवीस यांना काहीतरी गैरसमज झाला आहे,” असं म्हणत फडणवीसांच्या मागणीतली हवा काढली.

म्हणून इतर राज्यात रुग्ण कमी
कोरोना व्हायरसचं संकट रोखण्यात राज्य सरकारला अपयश आल्याचं सांगत भाजपने आज आंदोलन केलं. मात्र राज्य सरकार काम करत असून महाराष्ट्रात सर्वाधिक टेस्टिंग सुरु असल्याचं राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सांगितलं. जयंत पाटील म्हणाले की, “राज्य सरकार काम करत आहे. देवेंद्र फडणवीस यांनी देशातील इतर राज्यात फिरुन यावं मग कळेल राज्यात किती काम सुरु आहे. महाराष्ट्रात सगळ्यात जास्त टेस्टिंग सुरु आहे म्हणून रुग्ण दिसत आहेत. इतर राज्यात टेस्टिंग कमी होत आहे.”

पंतप्रधान मोदींनी तरी कुठे घराबाहेर पाऊल टाकलं
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मातोश्रीबाहेर पडत नाहीत, अशी टीका केली होती. त्यालाही जयंत पाटील यांनी उत्तर दिलं आहे. “चंद्रकांत पाटलांना आधी पण सल्ला दिला की घराबाहेर पडू नका. लॉकडाऊन आहे. सगळे जण व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून काम करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी तरी कुठे त्यांच्या घराबाहेर गेले? त्यामुळे चंद्रकांतदादा ऐकतील, असा विश्वास आहे,” असं जयंत पाटील म्हणाले.

महाविकास आघाडीनं दिली सोशल मीडियावर भाजपला टक्कर
सोशल मीडियावर नेहमीच प्रचारात आघाडीवर असणाऱ्या भाजपला आता महाविकास आघाडीने टक्कर दिली आहे. महाविकास आघाडीनं भाजपविरोधात सोशल मीडियावर आंदोलन सुरु केलं. महाराष्ट्र कोरोनाच्या संकटाला मोठ्या धीराने सामोरे जात असताना भाजप गलिच्छ राजकारण करत असल्याचं महाविकास आघाडीच्या नेत्यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रद्रोही भाजपा हा हॅशटॅग ट्रेण्डिंगमध्ये आहे. भाजपच्या आंदोलनाविरोधात पहिल्यांदा शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे कार्यकर्ते सोशल मीडियावर एकत्र आले. हा हॅशटॅग सध्या देशात तिसऱ्या क्रमांकावर ट्रेण्डिंगमध्ये आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

दोन महिन्याच्या विश्रांतीनंतर परभणीत जिल्ह्यातंर्गत बससेवा सुरू

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे

राज्यभरात सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे राज्य परिवहन मंडळाची बस सेवा बंद करण्यात आली होती. राज्यासह परभणी जिल्ह्यातही ही बस सेवा पूर्णपणे बंद केल्याने प्रवाशांचे मोठे हाल झाले. त्यावर आता जिल्हा अंतर्गत बस सेवा सुरू करण्याचे महामंडळाचे आदेश आल्यानंतर, आज सकाळपासून परभणी जिल्ह्यातील बससेवा सुरू करण्यात आली आहे.

ज्यामध्ये जिंतूर , मानवत , पाथरी आणि इतर तालुक्यांना काही नियम आणि अटीसह बस सेवा सुरू करण्यास परवानगी मिळाली असून, बस मधील एकूण आसन क्षमतेपेक्षा, अर्धे प्रवासी नेण्याची मुभा या बसेसना देण्यात आली आहे. त्यामुळे मागील दोन महिन्यापासून रस्त्यावरून गायब असलेली एसटी आता पुन्हा रस्त्यावर धावू लागली आहे. जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील प्रवाशांना याचा मोठा फायदा होणार असला, तरीही बसेसच्या निर्जंतुकीकरण आणि स्वच्छतेकडे महामंडळाला विशेष लक्ष द्यावे लागणार आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

ठाकरे सरकार घरामध्ये बसले, कोणतेच निर्णय घेतले नाहीत – शेखर चरेगावकर 

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी |

भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र प्रदेश यांच्यावतीने आज महाराष्ट्र सरकारचा निषेध करण्यासाठी मेरा अंगण, मेरा रणांगण या आंदोलन करण्यात आले. सर्व भाजपा नेते तसेच कार्यकर्ते यांनी आपल्या घरूनच सकाळी ११ ते १२ या वेळेत आंदोलनात सहभागी झाले होते. सर्वानी आपल्या घरातून सरकार विरोधी घोषणा देऊन आपला निषेध व्यक्त केला. कोरोनाच्या संक्रमणकाळात महाराष्ट्र सरकार काहीच काम करत नाही. मुख्यमंत्री ठाकरे घरात बसले आहेत आणि कोणतेच निर्णय घेत नाहीत असा आरोप भाजपा चे प्रवक्ते आणि सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर यांनी केला आहे.

महाराष्ट्र सरकार हे कोरोना काळात उपाययोजना राबविण्यात तसेच या संकटाचा सामना करण्यास अपयशी ठरले असून ते निष्क्रिय असल्याचे शेखर चरेगावकर यांचे म्हणणे आहे. ते म्हणाले “अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील भौगोलिक स्थिती, लोकसंख्या आणि आरोग्य सुविधा पाहता महाराष्ट्राची स्थिती चिंताजनक झाली आहे. मुख्यमंत्री कोणताच ठोस निर्णय घेत नाहीत. लोकांना करमणुकीचे कार्यक्रम दिल्यासारखे सोशल मीडिया आणि इतर माध्यमांवर कोरोनावर केवळ भाष्य करीत आहेत. राज्यातील बाधितांसाठी काहीच करण्यात आले नाही. तसेच इतर राज्यातील कामगारांसाठीही कोणत्याच सोयी करण्यात आल्या नाहीत परिणामी भविष्यात उद्योग व्यवसाय सुरु झाल्यावर मोठे संकट येणार आहे.”

ठाकरे सरकारची निष्क्रियता सर्वत्र दिसून येत आहे. कोरोनाव्यतिरिक्त आजारी असणाऱ्या रुग्णांसाठी गैरसोय झाली आहे. केवळ घरपोच जीवनावश्यक वस्तू पोहोचवल्या जातील अशा केवळ घोषणा केल्या मात्र अंमलात आणल्या नाहीत. पण दारू घरपोच पोहोचवण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्र सरकारची सांस्कृतिक राज्य या ओळखीला ठाकरे सरकारने कलंक लावला असल्याचे त्यांनी सांगितले. याआधी इतर राज्ये महाराष्ट्राचे उदाहरण घेत असत पण या संकटकाळात महाराष्ट्राची अवस्था या सरकारने बिकट केली आहे. म्हणूनच आम्ही या सरकारचा जाहीर निषेध करत आहोत. असे भाष्य चरेगावकर यांनी केले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

पुणे जिल्ह्यातील ‘हि’ गावे कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर; पहा यादी

पुणे । पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढते आहे. त्यामुळे पुण्यातील वातावरण चिंतादायक झाले आहे. त्यामुळे प्रशासनाने महत्वाचे काही निर्णय घेतले आहेत. ज्यामध्ये बाहेरून येणाऱ्या प्रत्येकास विलगीकरणात ठेवणे, सामाजिक अलगाव च्या नियमांचे पालन करणे इत्यादींचा समावेश आहे. वाढती रुग्ण संख्या लक्षात घेऊन प्रशासनाने जिल्ह्यातील ११ तालुक्यातील काही गावे कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर केली आहेत.

बारामती:  माळेगाव बुद्रुक, कटफळ, वडगाव निंबाळकर

इंदापूर: शिरसोली

हवेली: मांजरी खुर्द गावठाण, मांजरी बुद्रुक, झेड कॉर्नर, महादेवनागर, शिवजन्य सोसायटी -भंडलकरनगर, कदमवाकवस्ती- स्वामी-विवेकानंद-कवडीमावली, लोणीकाळभोर-गावठाण- विश्वरज हॉस्पिटल परिसर, फ़ुरसंगी-हांडेवाडी, फ़ुरसंगी-पिसोळी-अंतुलेनगर, वाघोली-केसनंद-जोगेश्वरी रॉड-सद्गुरूपार्क, पेरणे-लोणीकंद गावठाण, वाघोली-गो-हेवस्ती, फुलमळा, गाडेवस्ती, आजाळवाडी रोडवरील गणेशनगर, गणेशपार्क कावडेवाडी, बकोरी-प्रिस्टीनसिटी फेज-१, किरकटवाडी- कोल्हेवाडी, कोल्हेवाडी- (खडकवासला), जे.पी.जी नगर गोसावी बस्ती (नांदेड), कोंढवे धावडे-ग्रीन कंट्री सोसायटी परिसर, नरहे गोकुळनगर, नवदीप सोसायटी ते देवर्षी कॉम्प्लेक्स, कंजावस्ती कृष्णाईनगर, भिलारवाडी, जांभूळवाडी-गावठाण, उरळी कांचन-आश्रमखेड, खानापूर

शिरूर: माळवाडी परिसर (महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या औद्योगिक आस्थापना वगळून), तळेगाव ढमढेरे गावठाण, शिवतक्रार म्हाळुंगे, कवठे यमाई, टाकाळीभीमा

वेल्हा: सुरवड, कोदवडी, सोंडे कारला, वडगाव झांजे

दौन्ड: राज्य राखीव बाळ गट क्र५ आणि ७, सीआरपीएफ प्रशिक्षण वसतिगृह नवीन परिसर, दहिटणे, मिरवाडी, नांदूर, खामगांव, गणेशनगर, देवकरमळा, बैलखिळा, डुवेवाडी, मेरी मेमोरियल हायस्कुल गिरीम, दौड शहर व बिगर नगरपालिका हद, गोपाळवाडी म्हसोबा मंदिर, भोहिटे नगर, गोपाळवाडी एस्सार पेट्रोल पंप, दत्तनगर व जिजामाता शाळा परिसर, लिंगाळी माळवाडी (वेताळनगर), म्ह्सनरवाडी (जगताप व जगदाळे वस्ती, सोनवाडी, पवार वस्ती, दळवीमळा

खेड: राक्षेवाडी, चाकण येथील झित्राईमळा प्रभाग क्रमांक दोन; मावळ; माळवाडी, तळेगाव शहर, अहिरवाडी, वेहेरगाव, दहिवली, चांदखेड

पुरंदर: खोमणे आळी

मुळशी: भोईरवाडी येथील मेगापलीस सिटी इमारत ए-२०, जांबे

आंबेगाव: साकोरेवरील क्षेत्रे ही कंटेन्मेंट झोनमध्ये जाहीर करण्यात आली आहेत.

या झोनमधील भागात आतंरराष्ट्रीय हवाई सेवा, सर्व प्रवासी रेल्वे सेवा वाहतूक, सार्वजनिक बस वाहतूक, मेट्रो रेल्वे सेवा, आंतरजिल्हा आणि आंतरराज्यीय वाहतूक बंद राहील. शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक, प्रशिक्षण कोचिंग संस्था बंद राहतील. ऑनलाईन शिक्षण सुरु राहील. सिनेमा हॉल, शॉपिंग कॉम्प्लेक्स, व्यायामशाळा, खेळ संकुले, जलतरण तलाव, करमणूक उद्याने, चित्रपटगृह, बार आणि सभागृह बॅड राहतील. सामाजिक , राजकीय, खेळ, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम आणि इतर मेळाव्यांना परवानगी नसेल. सर्व धार्मिक स्थळे, पूजेची, प्रार्थनेची ठिकाणे नागरिकांसाठी बॅड राहतील. आणि धार्मिक स्थळावर गॅरी करता येणार नाही आहे. जिल्ह्यातील वाढणारी रुग्णसंख्या प्रशासन आता खूपच काटेकोरपणे निर्णय घेते आहे.

Pune

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

केन विल्यमसनबरोबरचे हे खास छायाचित्र शेअर करत विराट कोहलीने लिहिले,’एक चांगला माणूस’

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय कर्णधार विराट कोहली आणि केन विल्यमसन यांच्यातील मैत्री किती खोलवर आहे भारताच्या न्युझीलंड दौर्‍यावर दिसून आले. या दौर्‍यादरम्यानच्या एका सामन्यात खेळत नसताना विल्यमसन आणि विराट हे दोन्ही महान खेळाडू बाउंड्रीजवळ बसून गप्पा मारत आनंद घेत होते. विराट कोहलीने बर्‍याच वेळा न्यूझीलंडचा संघ आणि त्याच्या कर्णधाराचे कौतुक केले आहे.

अलीकडेच विराट कोहलीने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन याच्यासोबतचा एक फोटो पोस्ट केला आहे, ज्यामध्ये केन विल्यमसनच्या पाठीवर हात ठेवत विराट कोहली पुढे जाताना दिसत आहेत. हा फोटो कसोटी सामन्यापूर्वीचा आहे. विराट कोहलीने हा फोटो शेअर केला आणि लिहिले “मला आमच्यातले संभाषण आवडते … केन विल्यमसन एक चांगला माणूस आहे”.


View this post on Instagram

 

Love our chats . Good man @kane_s_w

A post shared by Virat Kohli (@virat.kohli) on May 21, 2020 at 9:40pm PDT

 

विश्वचषक २०१९ मध्ये न्यूझीलंडने उपांत्य सामन्यात पराभव करून भारताला बाहेरचा रस्ता दाखविला. यानंतर भारत न्यूझीलंडच्या दौऱ्यावर गेला. या दरम्यान, विराट कोहलीला जेव्हा वर्ल्ड कपमधील पराभव न्यूझीलंडला नेणार की नाही असे विचारले असता तो म्हणाला, ” याची आवश्यकता नाही. तुम्हाला जरी सूड घ्यायचा असेल तरी ही माणसे इतकी चांगली आहेत की तसे करण्याचा तुम्ही विचारही करू शकणार नाही. न्यूझीलंड हा एकमेव असा संघ आहे ज्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर इतर संघांसाठी प्रगती करण्याचा एक उत्तम आदर्श ठेवला आहे. जेव्हा ते वर्ल्ड कप फायनलसाठी क्वालीफाईड झाले तेव्हा आम्ही त्यांच्यासाठी खरोखरच आनंदी होतो. जेव्हा आपण हरलात तेव्हा आपल्याला मोठे चित्र पहावे लागेल. म्हणून त्यामध्ये सूड घेण्यासारखे काहीही नाही. “

न्यूझीलंडच्या या दौर्‍यावर भारताने ५ टी-२०, तीन एकदिवसीय आणि दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळली. यामध्ये टीम इंडिया टी -२० मालिकेत यजमानांना व्हाईट वॉश देण्यास यशस्वी ठरली, मात्र त्यानंतर न्यूझीलंडच्या संघानेही उत्तर देत एकदिवसीय आणि कसोटी मालिकेत भारताला व्हाईट वॉश दिला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

तुम्हाला हे माहित आहे काय? भारत सर्वाधिक पीपीई कीट तयार करणारा जगात दुसऱ्या क्रमांकाचा देश

नवी दिल्ली । कोरोनाच्या लढ्यात भारत आत्मनिर्भर बनला आहे. कोरोनाच्या लढाईत महत्वाचे साधन असणारे पीपीई कीट उत्पादनात भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा उत्पादक देश बनला आहे. कोरोनाच्या लढाईत फ्रंट लाईनवर लढणाऱ्या कोरोना वॉरिअर्सला कोरोनाच्या संक्रमणापासून वाचवण्यास पीपीई कीट चिलखताची भूमिका बजावत आहे. कमालीची बाब म्हणजे केवळ दोन महिन्याच्या कालावधीत भारत सर्वाधिक पीपीई कीट बनवणारा दुसऱ्या क्रमांकाचा निर्माता बनला आहे.

सरकारने गुरूवारी याबाबत माहिती दिली आहे की,भारत दोन महिन्यात सर्वात कमी वेळीत स्वतंत्र पीपीई कीट बनवणारा जगातील दुसरा निर्माता ठरला आहे. भारताच्या अगोदर चीन आहे ज्यांनी सर्वाधिक पीपीई कीटची निर्मिती केली आहे. पीपीई कीटच्या निर्मितीत आणि गुणवत्तेत वाढ करण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. याच कारणामुळे भारतात दोन महिन्यापेक्षा कमी काळात पीपीई सर्वाधिक तयार करणारा दुसरा निर्माता ठरला आहे. दर्जेदार पीपीई कीटची निर्मिती ही उत्कृष्ट दर्जाच्या कंपनीकडेच दिली आहे. आरोग्य कर्मचारी आणि इतर कोरोना वॉरिअर्सना ही पीपीई कीट देण्यात येणार आहे.

दरम्यान, देशातील कोरोना रूग्णांची संख्या 1 लाख 18 हजारांपेक्षा वर गेली आहे. शुक्रवारी आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या अपडेटनुसार आता एकूण रूग्णांची संख्या 1 लाख 18 हजार 447 आहे. यापैकी 3583 लोकांनी आपला जीव गमावला आहे. तर आतापर्यंत 48 हजार 534 लोकं बरे झाले आहेत. अशा वेळी कोरोनाला तोंड देण्यासाठी भारताला आणखी पीपीई कीटची गरज भासणार आहे. जेणेकरून कोरोना वॉरिअर्स आणखी जोमाने कोरोनाला हद्दपार करण्याची लढाई लढू शकतील.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

वडिलांना सायकल वरून बिहार घेऊन जाणारी ज्योती देणार महासंघाची ट्रायल; देशाला मिळणार नवीन खेळाडू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या सुरु असलेल्या लॉकडाउनच्या काळात विविध रंजक कथा ऐकायला मिळत आहेत. विविध राज्यांमध्ये अडकलेले स्थलांतरित मजूर बरेच त्रास सहन करत आपापल्या गावाकडे परत जात आहेत. अशीच एक ज्योती आहे जी तिच्या जखमी बापाला सायकलवर घेऊन गुरुग्रामहून थेट दरभंगाला पोहोचली. इतका लांबचा प्रवास केलेल्या या ज्योतीसाठी अखिलेश यादव यांनी लगेच १ लाखांची मदत जाहीर केली आहे, तर आता सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाकडूनही तिला ट्रायलची संधी देण्यात आलेली आहे. महासंघाचे संचालक व्ही. एन. सिंह यांनी ज्योतीचे वर्णन करताना सांगितले की,’ महासंघ तिला ट्रायल देण्याची संधी देईल आणि सीएफआयच्या मानदंडांमध्ये ती थोडी जरी खरी ठरली तर तिला विशेष ट्रेनिंग आणि कोचिंग दिले जाईल.

मीडिया रिपोर्टनुसार ज्योती या लॉकडाउनमध्ये तिचे वडील मोहसन पासवान यांना घेऊन सायकलवरून आपल्या गावाला जाण्यासाठी निघाली. तिने गुरुग्रामहून बिहारच्या दरभंगाला जाण्यासाठी आठ दिवसांत एक हजार किमीपेक्षा जास्तीचा प्रवास केला आहे. यावेळी ज्योती दररोज १०० ते १५० किलोमीटर सायकल चालवत होती.

व्ही.एन. सिंह म्हणाले की,’ आम्ही नेहमीच अशा प्रतिभावान खेळाडूंचा शोध घेत असतो आणि जर या मुलीमध्ये अशी क्षमता असेल तर आम्ही तिला नक्कीच संधी देऊ. तसेच तिला पुढे ट्रेनिंग आणि कोचिंगसाठी शिबिरात दाखल करता येईल. मात्र, त्यापूर्वी आम्ही तिची क्षमता पारखू. जर ती आमच्या निकषांची पूर्तता करत असेल तर आम्ही तिला पूर्ण मदत करू. तिला परदेशातून आयात केलेल्या सायकलींवर ट्रेनिंग दिले जाईल.

लॉकडाऊननंतर ज्योतीला ट्रायलची संधी देण्याबाबत विचारणा केली असता ते म्हणाले की,’ मी तिच्याशी बोललो आहे आणि मी तिला सांगितले की,’ लॉकडाउन संपल्यानंतर जेव्हा कधी संधी मिळेल तेव्हा तू दिल्लीला ये. यावेळी इंदिरा गांधी स्टेडियमवर आम्ही तिची थोडी टेस्ट घेऊ. आमच्याकडे वॅटबाईक आहेत ज्या स्थिर बाईक आहेत. यावर खेळाडूला चार ते पाच मिनिटे बसवून टेस्ट केली जाते. यामध्ये खेळाडू आणि त्यांच्या पायाची क्षमता किती आहे हे या टेस्ट मधून कळते. ती इतक्या लांबपर्यंत सायकल चालवत आली आहे म्हणजेच तिच्यात नक्कीच क्षमता आहे.’

व्ही.एन. सिंह यांनी कबूल केले की,’ एका १५ वर्षाच्या मुलीसाठी दिवसाला १०० किमीपेक्षा जास्त सायकल चालवणे हे सोपे काम नाही. मी सध्या मीडियामधील बातमीच्या आधारे बोलत आहे, परंतु जर तिने खरोखरच तसे केले असेल तर ती खूपच सक्षम आहे.’

यावेळी ज्योती म्हणाली की,’सायकलिंग फेडरेशनकडून मला फोन आला होता आणि त्यांनी मला ट्रायलबद्दल सांगितले. मी आता खूप थकले आहे पण लॉकडाउननंतर जर मला संधी मिळाली तर मी नक्कीच या टेस्टमध्ये सहभागी होऊ इच्छिते. जर मी यशस्वी ठरले तर मला सायकलिंगमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करायला आवडेल तसेच संधी मिळाली तर मला पुन्हा अभ्यास करायचा आहे असेही तिने सांगितले आहे.

ज्योतीचे वडील गुरुग्राम येथे रिक्षा चालवत होते. त्यांच्या अपघातानंतर ज्योती आपल्या आई व दाजींबरोबर गुरुग्राम येथे आली आणि नंतर वडिलांची देखभाल करण्यासाठी तिथेच राहिली. दरम्यान, कोरोनामुळे लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आणि ज्योतीच्या वडिलांचे काम बंद झाले. अशा परिस्थितीत ज्योतीने आपल्या वडिलांसोबत सायकलवरूनच परत गावी जाण्याचा निर्णय घेतला. आता क्वारंटाईनमध्ये घरातच वेळ घालविणारी ज्योती म्हणाली की,’तिला संधी मिळाली तर ती ट्रायलसाठी तयार आहे.’

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

‘अम्फानग्रस्त’ पश्चिम बंगालसाठी मोदींनी जाहीर केलं १ हजार कोटींचं पॅकेज

नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदी अम्फान महाचक्रीवादळामुळे उद्ध्वस्त झालेल्या पश्चिम बंगाल आणि ओडिशा दौऱ्यासाठी दिल्लीहून कोलकाताला दाखल झाले आहेत. यावेळी पंतप्रधान मोदी आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाची  हॅलिकॉप्टरमध्ये बसून  हवाई पाहणी केली. या पाहणीनंतर पंतप्रधान मोदींनी ‘अम्फान’मुळे झालेल्या नुकसानाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालसाठी १ हजार कोटींचं आर्थिक मदत पॅकेज जाहीर केलं आहे. याशिवाय मृतांच्या कुटुंबीयांनाही आर्थिक मदतीची घोषणा पंतप्रधानांनी केली. मृतांच्या कुटुंबीयांना २ लाख रुपये मदत म्हणून देण्यात येणार आहे.

देशात कोरोना व्हायरसचं संकट आहे. याच वेळेत पूर्व भागाला अम्फान वादळाचा तडाखा बसला. राज्य आणि केंद्र सरकारनं मिळून या महाचक्रीवादळाला तोंड देण्याची तयारी केली होती. परंतु, त्यानंतरही ८० जणांचा जीव आम्ही वाचवू शकलो नाही. या चक्रीवादळात संपत्तीचंही मोठं नुकसान झालं आहे. यामध्ये घर आणि पायाभूत सुविधांचंही नुकसान झालं असल्याचं पंतप्रधान मोदींनी या दौऱ्यावेळी म्हटलं.

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसान पाहणीचं आव्हान पंतप्रधान मोदींना दिलं होतं. त्यानंतर पंतप्रधान आज कोलकाता येथे दाखल झाले आहेत. पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि राज्यपाल जयदीप धनकड कोलकाता विमानतळावर उपस्थित झाले होते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”