Saturday, December 27, 2025
Home Blog Page 5760

गुड न्यूज! रेल्वे स्टेशन तिकीट काऊंटर आजपासून सुरु, एजंटद्वारेही बुकिंग सुरू

नवी दिल्ली । देशव्यापी लॉकडाऊन दरम्यान भारतीय रेल्वे प्रवाशांसाठी १ जूनपासून २०० रेल्वे चालवणार आहे. यासाठी प्रवाशांना ऑनलाईन तिकीट बुकिंगसोबत आता रेल्वे तिकीट काऊंटर आणि एजंट द्वारेही बुकिंग करता येणार आहे. याव्यतिरिक्त, कॉमन सर्व्हिस सेंटरला ही रेल्वे मंत्रालयाने परवानगी दिली आहे. याबाबत रेल्वे मंत्रालयाने एक आदेश जारी केला आहे. त्यानुसार रेल्वे मंत्रालयाने सर्व झोनच्या जनरल व्यवस्थापकांना आज शुक्रवारपासून बुकिंग काऊंटर सुरू करण्यास सांगितले आहे. रेल्वे मंत्रालयाने सर्व जनरल व्यवस्थापकांना गरजेनुसार आरक्षण काउंटर कुठे उघडायचे ते ठरविण्यास सांगितले आहे. तथापि, रेल्वेने स्पष्ट केले आहे की कामगार गाड्यांच्या प्रवाशांचे नियंत्रण अद्याप संबंधित राज्यांच्या ताब्यात राहील.

शुक्रवारी देशभरातील जवळपास १.७ लाख ‘कॉमन सर्व्हिस सेंटर’वर रेल्वेचे तिकिटांचे बुकिंग पुन्हा सुरु केले जाईल, असे केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी सांगितले. ‘कॉमन सर्व्हिस सेंटर’ ही ग्रामीण आणि दुर्गम ठिकाणी सरकारची ई-सेवा देणारी केंद्रे आहेत. ही केंद्रे अशा ठिकाणी आहेत जिथे संगणक आणि इंटरनेटची उपलब्धता कमी किंवा नाही. येत्या दोन ते तीन दिवसांत काउंटरवरील काही स्थानकांवरही बुकिंग सुरु होईल, असेही रेल्वे मंत्र्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, तिकीट बुकींगसाठी आरक्षित खिडक्या किती खुल्या करायचा याचा निर्णय राज्यांनी घ्यायचा असल्याचंही रेल्वे मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

भारताला सामान्य परिस्थितीकडे घेऊन जाणं आवश्यक आहे. त्यासाठी आणखीन काही रेल्वे परत सुरू करण्यासंबंधी लवकरच घोषणा केली जाईल, असं रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी म्हटलंय. रेल्वे बोर्डानं दिलेल्या आदेशामध्ये, २२ मेपासून सामान्य सेवा केंद्रात (CSC) तिकीट आरक्षण काऊंटर उघडले जाऊ शकतील. ज्या स्टेशनवर तिकीट काऊंटर उघडले जाऊ शकतील, अशा स्टेशनची यादी झोनल रेल्वेकडून लवकरच जाहीर केली जाईल. या स्टेशन्सवर तिकीट काऊंटर उघडण्यासाठी प्रोटोकॉलही बनवण्यात येईल. त्यानंतर आणखी रेल्वे चालवण्याची घोषणा करू, असं पीयूष गोयल यांनी म्हटलं आहे.

लवकरच आणखी गाड्यांची घोषणा
१ मेपासून श्रमिक स्पेशल गाड्या सुरु केल्यापासून रेल्वेने २,०५० गाड्या चालवल्या असून सुमारे ३० लाख प्रवासी, विद्यार्थी आणि इतर अडकलेल्या लोकांची वाहतूक केली गेली आहे. रेल्वेमंत्र्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचे कामगार-विशिष्ट गाड्या चालविण्यात रेल्वेला मदत केल्याबद्दल त्यांचे कौतुक केले आणि सहकार्य न केल्याबद्दल पश्चिम बंगाल आणि झारखंडवर टीका केली. आतापर्यंत पश्चिम बंगालमध्ये केवळ २७ रेल्वे गाड्या धावू शकल्या आहेत आणि आठ आणि नऊ मेपर्यंत तेथे फक्त दोन गाड्या पोहोचू शकल्या आहेत. झारखंडमध्ये ९६ गाड्या चालविण्यात आल्या असून राजस्थानमध्ये आतापर्यंत ३५ गाड्या धावल्या गेल्या आहेत, अशी माहिती पियुष गोयल यांनी दिली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

बलात्काराच्या आरोपाबाबत बिग बॉस सेलिब्रिटी शहनाज गिलच्या वडिलांचा मोठा दावा, म्हणाले…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रिअ‍ॅलिटी शो बिग बॉस १३ ची स्पर्धक आणि अभिनेत्री शहनाज गिलचे वडील संतोख सिंग सुख यांच्यावर गंभीर आरोप केले गेले आहेत. आता या आरोपांवर संतोख सिंग यांनी प्रथमच स्पष्टीकरण दिले आहे. बंदूकीचा धाक दाखवून त्यांनी तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप एका महिलेने केला आहे. या विषयावर बोलताना संतोखसिंग यांनी स्थानिक वाहिनीशी बोलताना सांगितले आहे की,’ जेव्हा या महिलेने तिच्यावर बलात्कार झाल्याचा आरोप केला तेव्हा तो दिवसभर घरीच होता. यासह संतोख सिंह म्हणाले की,’त्यांचे संपूर्ण घर हे सीसीटीव्हीच्या देखरेखीखाली आहे, जे याचा पुरावा देखील आहे. यासह संतोखसिंग यांनी सांगितले की,’ ज्या ठिकाणी हि घटना घडली तिथले सीसीटीव्ही फुटेजही मिळालेले आहेत.’

संतोखसिंग पुढे म्हणाले, “जेव्हा महिलेने बलात्कार केल्याचा आरोप केला तेव्हा मी दिवसभर माझ्या घरीच होतो. माझे संपूर्ण घर हे सीसीटीव्ही देखरेखीखाली आहे, याचा पुरेसा पुरावाही माझ्याकडे आहे. या महिलेचा घटस्फोट झाला आहे आणि तिला एक मूलही आहे. तिला माझा बिझिनेस पार्टनर लकी संधू बरोबर लग्न करायचं आहे. मी लकीला बर्‍याच काळापासून ओळखत आहे आणि मी त्याला त्याचा हा विषय वैयक्तिकरित्या मिटवण्याचा सल्लाही दिला आहे. “


View this post on Instagram

 

@shehnaazgill @sukhpardhanbeas Please Galat comment mat karo FIR ho sakti hai

A post shared by SANTOKH SINGH SUKH (@santokhsukh1) on Apr 20, 2020 at 11:59am PDT

 

हे संपूर्ण प्रकरण असे आहेः
आपल्या तक्रारीत, या ४० वर्षीय महिलेने म्हंटले आहे की,’ ती आणि जालंधर येथील लक्की संधू उर्फ ​​रणधीरसिंग संधू गेल्या १२ वर्षांपासून एकमेकांना ओळखत आहेत आणि चांगले मित्रही आहेत. अलीकडेच या दोघांमध्ये कशावरून तरी भांडण झाले. दरम्यान, महिलेला समजले की, लकी सध्या अजित नगर येथे राहणाऱ्या संतोख सिंग याच्या घरी येणार आहे. त्यानंतर ही पीडित महिला संतोख सिंगला भेटायला त्याच्या घरी गेली.

ती आपल्या कारमधून एका मित्राबरोबर लकीला भेटण्यासाठी संतोखच्या घरी गेली. तक्रारीनुसार आरोपी संतोख त्यावेळी त्याच्या घराच्या बाहेरच थांबला होता. त्यानंतर त्याने पीडितेला तिच्या गाडीतून उतरून त्याच्या कारमध्ये बसण्यास सांगितले आणि म्हणाला की ‘तो आता लकीला भेटायला जाणार आहे’.

याचदरम्यान संतोख याने गाडी थांबवून बंदुकीने जिवे मारण्याची धमकी दिली आणि कारमध्येच तिच्यावर बलात्कार केला. यानंतर आरोपीने तिला सीमेजवळील भागात सोडले. मंगळवारी महिलेने या घटनेसंदर्भात तक्रार दाखल केली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

पुण्यातील कुरकुंभ एमआयडीसी परिसरात भीषण आग 

पुणे । पुणे येथील कुरकुंभ एमआयडीसी परिसरात भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. घटनास्थळी अग्निशामक दलाला बोलावण्यात आले आहे. आग नेमकी कोणत्या कारणामुळे लागली आहे. हे अद्याप समजलेले नाही. तसेच किती हानी झाली आहे याचीही माहिती मिळू शकलेली नाही.

कोरोनाच्या संक्रमणामुळे आधीच राज्यात आर्थिक संकट उभे आहे. त्यात कुरकुंभ एमआयडीसी ला लागलेली म्हणजे चिंताजनक स्थिती आहे. आग लागल्यानंतर तिथे असणाऱ्या नागरिकांनी बाहेर धाव घेतली आहे. इतर अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.

Pune

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

मुंबई पोलीस दलाला आणखी एक धक्का; पोलीस कॉन्स्टेबलचा कोरोनानं मृत्यू

मुंबई । ठाण्यातील एका महिला पोलीस कर्मचाऱ्याचा कोरोनाच्या संसर्गाने मृत्यू झाल्याच्या घटनेला काही तास उलटत नाहीत, तोच मुंबईतील एका पोलीस कॉन्स्टेबलला प्राण गमवावे लागले आहेत. मृत पोलीस कॉन्स्टेबल हे ५५ वर्षांचे होते. विलेपार्ले पोलीस ठाण्यात ते नेमणुकीला होते. गुरुवारी त्यांचा करोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झाला. त्यांच्यावर ९ मेपासून रुग्णालयात उपचार सुरू होते. आता मुंबई पोलीस दलातील करोनाबाधित कर्मचाऱ्यांची संख्या ११वर पोहोचली आहे.

कोरोना विरोधातील लढ्यात आघाडीवर असलेल्या राज्यातील पोलीस दलाला या विषाणूनं विळखा घातला आहे. राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असताना, आता मृत्यूचा आकडाही वाढत आहे. दरम्यान, काल दुपारी ठाणे पोलीस दलातील एका कोरोनाबाधित महिला कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. ठाण्यातील श्रीनगर पोलीस ठाण्यात त्या पोलीस शिपाई म्हणून कार्यरत होत्या.

१९ मे रोजी या महिला पोलीस कर्मचाऱ्यास रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना दुसऱ्या दिवशी कोरोना चाचणीसाठी त्यांच्या घशातील स्वॅब घेण्यात आला होता. आज त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. मात्र, कोरोनाशी झुंज देत असताना काल दुपारीच साडेतीन वाजता त्यांचा मृत्यू झाला. कोरोनाबाधित महिला पोलिसाचा मृत्यू झाल्याची ही राज्यातील पहिलीच घटना आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

भारतात २४ तासात ६०८८ कोरोनाचे नवे रुग्ण; आतापर्यंतची सर्वाधित रुग्णवाढ

नवी दिल्ली । भारतात कोरोना रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ अद्यापही कायम असून गेल्या २४ तासात आतापर्यंतची सर्वाधित रुग्णवाढ झाली आहे. गेल्या २४ तासात भारतात ६०८८ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. याचसोबत देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १ लाख १८ हजार ४४७ वर पोहोचली आहे. दरम्यान, मागील २४ तासात १४८ मृत्यूंची नोंद झाली असून देशातील मृतांची एकूण संख्या ३५८३ झाली आहे. आतापर्यंत ४८ हजार ५३३ जणांना उपचार करुन घरी सोडण्यात आलं आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, कोरोना रुग्णांचं बरं होण्याचं प्रमाण ४०.९७ टक्के आहे.

या राज्यात आढळत आहेत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण
गेल्या २ दिवसांपासून देशात रोज पाच हजारांहून अधिक रुग्णांची भर पडत असून गुरुवारी २४ तासांत ५,६०९ नवे रुग्ण आढळले होते. देशात महाराष्ट्राला कोरोनाचा सर्वात जास्त फटका बसलेला असून रुग्णसंख्या ४१ हजारावर पोहोचली आहे. महाराष्ट्रानंतर तामिळनाडू (१३,९६७), गुजरात (१२,९०५) यांचा क्रमांक आहे. दिल्लीमध्य कोरोनाचे ११ हजार ६५९ रुग्ण आहेत. राजस्थानमध्ये कोरोनाचे ६२७७ रुग्ण असूम यामधील ३४८५ जण उपचारानंतर बरे झाले आहेत. तर १५१ जणांचा मृत्यू झाला आहे. मध्य प्रदेशात ५९८१ करोना रुग्ण असून २४८३ रुग्ण बरे झाले असून २७० जणांचा मृत्यू झाला आहे.

गेल्या दोन दिवसांपासून देशात अशी वाढली कोरोना रुग्णांची संख्या
देशात पहिला रुग्ण ३० जानेवारी रोजी आढळला होता. त्यानंतर ४५ दिवसांनी म्हणजे १५ मार्च रोजी भारतातील करोनाबाधितांची संख्या १०० वर पोहोचली. तर भारताने १ हजाराचा टप्पा अधिक वेगाने म्हणजे २९ मार्च रोजी गाठला तर १३ एप्रिलपर्यंत बाधितांची संख्या १० हजारांवर गेली. ६ मे रोजी बाधितांची संख्या ५० हजारांवर पोहोचली तर बाधितांची संख्या एक लाखावर पोहोचण्यासाठी २ आठवड्याहून कमी कालावधी लागला. जागतिक पातळीवर बाधितांची संख्या ५० लाखांवर पोहोचली आहे तर तर ३.३ लाख जणांचा मृत्यू झाला आहे आणि १९ लाखांहून अधिक जण बरे झाले आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

५० हजार कोटींचे पॅकेज जाहीर करा; देवेंद्र फडणवीसांचे ठाकरे सरकार विरोधात आंदोलन

मुंबई । महाराष्ट्र सरकारचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर पक्षाच्या नेत्यांनी राज्य सरकारच्या वतीने शेतकरी, कामगार आणि मजुरांसाठी ५० हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करण्याची मागणी करत राज्य भाजपा कार्यालयाबाहेर निदर्शने केली. नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर उपाययोजनांसाठी २० लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे. आत्मनिर्भर भारत या दूरदृष्टीतून भारताला स्वयंपूर्ण बनविण्यासाठी विविध क्षेत्रांसाठी हे पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र राज्यातील शेतकरी, १२ बलुतेदार आणि असंघटित कामगार यांच्यासाठी वेगळे ५०,००० करोड रुपयांचे पॅकेज द्यावे या मागणीसाठी निदर्शने काढली आहेत.

फडणवीस आणि इतर पक्षनेत्यांनी मुंबईतील भाजपा कार्यालयाबाहेर निदर्शने केली आहेत. हातामध्ये शेतकरी, १२ बलुतेदार आणि असंघटित कामगार वर्गासाठी ५०,००० करोड रुपयांचे पॅकेज जाहीर करण्यात यावे अशा मागणीचे फलक घेऊन ते भाजपा कार्यालयाबाहेर उभे आहेत. महाराष्ट्राला आर्थिक संकटातून वाचविण्यासाठी ही मागणी त्यांनी इतर पक्षनेत्यांसोबत केली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

पंतप्रधान मोदी ‘अम्फान’मुळे झालेल्या नुकसान पाहणीसाठी पश्चिम बंगाल-ओडिशा दौऱ्यावर

कोलकाता । पंतप्रधान नरेंद्र मोदी अम्फान महाचक्रीवादळामुळे उद्ध्वस्त झालेल्या पश्चिम बंगाल आणि ओडिशा दौऱ्यासाठी दिल्लीहून कोलकाताला दाखल झाले आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी चक्रीवादळामुळे बंगालचं झालेलं नुकसान पाहण्याचं आव्हान पंतप्रधान मोदींना दिलं होतं. त्यानंतर पंतप्रधान आज कोलकाता येथे दाखल झाले. पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि राज्यपाल धनकर कोलकाता विमानतळावर उपस्थित झाले होते.

पंतप्रधान मोदी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासोबत प्रभावित क्षेत्राचा हवाई सर्व्हे करणार आहेत. यानंतर ममता बॅनर्जी यांच्यासोबत ते एक बैठकदेखील करतील. त्यानंतर दुपारी १.३० मिनिटांनी ते ओडिशाकडे रवाना होतील. पश्चिम बंगालच्या दौऱ्या निमित्तानं पंतप्रधान मोदी तब्बल ८३ दिवसानंतर दिल्लीतून बाहेर पडले आहेत. याअगोदर पंतप्रधानांनी २९ फेब्रुवारी रोजी प्रयागराज आणि चित्रकूट दौरा केला होता. दरम्यान, अम्फान महाचक्रीवादळामुळे पश्चिम बंगालमध्ये अम्फानच्या तडाख्यात तब्बल ७२ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. केवळ कोलकातामध्ये १९ जणांचा मृत्यू झाला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

58 वर्षीय कोरोना बाधितासह 3 अनुमानितांचा मृत्यु; सातारा जिल्ह्यात कोरोनाचा कहर

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

जावली तालुक्यातील एक पुरुष 58 वर्षीय कोविड बाधित रुग्णाचा कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे आज सकाळी मृत्यु झाला आहे. या रुग्णाला मधुमेह व श्वसन संस्थेच्या तीव्र आजार झाला होता, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे. तसेच सातारा जिल्ह्यात आज ३ अनुमानितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती मिळाली आहे.

वरळी, मुंबई येथून प्रवास करुन आलेली पाचगणी येथील 64 वर्षीय महिला गृह विलगीकरणात होती. या महिलेचा दम्याच्या आजाराने व ह्दयविकाराने मृत्यु झाला असून संशियत म्हणून या महिलेच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे, अशी माहिती वाईच्या प्रांताधिकारी संगिता चौगुले यांनी दिली आहे. तसेच घाटकोपर, मुंबई येथून प्रवास करुन आलेल्या 2 महिन्याचे बाळ कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे श्वास घेण्याचा त्रास होत होता म्हणून दाखल करण्यात आले होते. या 2 महिन्याच्या बाळाचा मृत्यु झाला असून संशयित म्हणून घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. तसेच नांदलापूर ता. कराड येथील 60 वर्षीय महिला कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे संशियत म्हणून दाखल करण्यात आली होती. या महिलेचा मृत्यु झाला असून या महिलेच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे, अशी माहिती प्रांताधिकारी उत्तम दिघे यांनी दिली आहे.

146 जणांना अहवाल आले निगेटिव्ह
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 34, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील 53, ग्रामीण रुग्णालय, वाई येथील 9, ग्रामीण रुग्णालय, कोरेगाव येथील 15 असे एकूण 111 जणांचे अहवाल निगेटिव्ह. तसेच कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथील 35 जणांचे असे एकूण 146 जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याचेही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गडीकर यांनी कळविले आहे.

109 जणांना केले विलगीकरण कक्षात दाखल
दि. 21 रोजी रात्री उशिरा क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे 22, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथे 87 असे एकूण 109 जणांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. घशातील स्त्रावांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आलेले आहेत, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गडीकर यांनी दिली आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्या व्यक्तिंची संख्या- 201 झाली असून या पैकी उपचार घेत असलेले कोरोनाबाधित रुग्णसंख्या 90 इतकी असून कोरोना मुक्त होवून घरी गेलेले रुग्णसंख्या 106 आहे तर मृत्यु झालेले 5 रुग्ण आहेत.

Satara

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

खुशखबर! ‘RBI’ कडून रेपो दरात ०.४० टक्क्याची कपात; गृह कर्ज, वाहन कर्ज स्वस्त होणार

नवी दिल्ली । कोरोनाच्या संकट काळात रिझर्व्ह बँक गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी तिसऱ्यांदा पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी आज रेपो दरात ०.४० टक्क्याची कपात केल्याचे घोषीत केले. बँकेचा रेपो दर आता ४ टक्के झाला आहे. यामुळे गृह कर्ज, वाहन कर्ज आणि औद्योगिक कर्ज स्वस्त होण्याची शक्यता आहे. दुसऱ्यांदा आरबीआयने निर्धारित वेळापत्रकापूर्वी रेपो दराची घोषणा केली. ६ जून रोजी पतधोरण जाहीर होणार होते. मात्र त्याआधीच व्याजदर कपात करून बँकेने सामान्य कर्जदारांना दिलासा दिला. याआधी मार्च, एप्रिल आणि मे असे तीन महिने कर्ज वसुलीला स्थगिती (EMI Moratorium) देण्यात आली आहे. आता आणखी तीन महिने म्हणजेच जून, जुलै आणि आॅगस्ट असे तीन महिने कर्जदारांची EMI मधून तात्पुरती सुटका होईल.

देशात कोरोना संकट आणखी गंभीर होत असून अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. या संकटात सामान्य कर्जदारांना आज रिझर्व्ह बँकेने मोठा दिलासा दिला. आरबीआयने कर्ज वसुलीला आणखी तीन महिने स्थागिती (EMI Moratorium) आज जाहीर केली. त्यामुळे आर्थिक चणचणीने त्रासलेल्या कर्जदारांची ऑगस्टपर्यंत मासिक हप्त्यातून सुटका झाली आहे. आधी मार्च, एप्रिल, मे साठी ही सवलत देण्यात आली होती. आता आणखी तीन महिन्यांसाठी ही मुदत वाढवण्यात आली आहे. म्हणजे जून, जुलै आणि ऑगस्टपर्यंत कर्जाचा हप्ता न भरण्याची मुभा असेल. कर्जांवरील व्याज भरण्यास दिलेली स्थगिती आणखी तीन महिन्यांनी वाढवण्यात आलेली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Good News | ‘RBI’ चा दिलासा; आणखी 3 महिने कर्ज वसुलीला स्थगिती

मुंबई | देशावर कोरोना महामारीचे संकट आले आहे. कोरोनामुळे जाहीर केलेल्या लॉकडाउनच भारतीय अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम झाला आहे. यापार्श्वभूमीवर आरबीआयचे गव्हर्नर शशिकांत दास यांनी आज चौथ्यांदा पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी आज रेपो दरात ०.४० टक्क्याची कपात केल्याचे घोषीत केले. बँकेचा रेपो दर आता ४ टक्के झाला आहे. यामुळे गृह कर्ज, वाहन कर्ज आणि औद्योगिक कर्ज स्वस्त होण्याची शक्यता आहे. दुसऱ्यांदा आरबीआयने निर्धारित वेळापत्रकापूर्वी रेपो दराची घोषणा केली. ६ जून रोजी पतधोरण जाहीर होणार होते. मात्र त्याआधीच व्याजदर कपात करून बँकेने सामान्य कर्जदारांना दिलासा Eदिला. याआधी मार्च, एप्रिल आणि मे असे तीन महिने कर्ज वसुलीला स्थगिती देण्यात आली आहे. आता आणखी तीन महिने म्हणजेच जून, जुलै आणि आॅगस्ट असे तीन महिने कर्जदारांची EMI मधून तात्पुरती सुटका होईल.

दरम्यान , करोनामुळे झालेले आर्थिक नुकसान आणि अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी गेल्याच आठवड्यात केंद्र सरकारने आत्मनिर्भर भारत पॅकेज जाहीर केले होते. यात विविध क्षेत्रांना २० लाख कोटींची मदत योजनांमधून केली होती. लॉकडाउनमुळे वस्तूंचा खप कमी झाला आहे. आता विक्रीला चालना देण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली. फेब्रुवारीपासून रिझर्व्ह बँकेने जीडीपीच्या ३.२ टक्के निधी अर्थव्यवस्थेत उपलब्ध केला असल्याचे त्यांनी सांगितले. पुढील वर्षभर उद्योगांची दिवाळखोरी आणि नादारी विधेयकातून सुटका केली असल्याचे त्यांनी सांगितले. निर्यात ३० वर्षातील नीचांकी स्तरावर आहे. आगामी काळात महागाई किती वाढेल याबाबत अंदाज व्यक्त करणे कठीण आहे. मात्र कृषी क्षेत्रासाठी आशेचा किरण आहे. यंदा मॉन्सून चांगला होणार असल्याने कृषी क्षेत्राला फायदा होईल, असे दास यांनी सांगितले. आजच्या व्याजदर कपातीचा लाभ बँका ग्राहकांना देतील, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

करोनावर मात करण्यासाठी लागू केलेलं हे लॉकडाऊन पुन्हा चौथ्यांदा वाढवण्यात आलं आहे. आता लॉकडाऊन ३१ मेपर्यंत वाढवल्यामुळे आरबीआयकडूनही कर्जदारांना दिलासा देण्यासाठी वसुलीला आणखी स्थगिती दिली जाऊ शकते, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. यापूर्वीही तीन महिन्यांची स्थगिती दिली होती. तीन महिन्यांच्या मोरेटोरियममुळे कंपन्यांना ३१ ऑगस्ट २०२० पर्यंत कर्जाचा हफ्ता द्यावा लागणार नाही, असंही एसबीआयच्या अहवालात म्हटलं आहे.