Saturday, December 27, 2025
Home Blog Page 5758

इटालियन फुटबॉल क्लब जुव्हेंटसच्या टीमचा कोविड-१९ चा रिपोर्ट आला निगेटिव्ह,आता सरावास सुरुवात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इटलीच्या फुटबॉल क्लब जुव्हेंटसने म्हटले आहे की,” त्यांच्या सर्व खेळाडूंचा कोविड-१९ चा रिपोर्ट हा निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे आता येत्या काही दिवसांत ते मोठ्या गटात सराव सुरु करतील. जुव्हेंटस क्लबने आपल्या एका निवेदनात म्हटले आहे की, “इटालियन फुटबॉल महासंघाच्या (एफआयजीसी) वैद्यकीय वैज्ञानिक आयोगाकडून परवानगी आल्यानंतरच संपूर्ण संघाची काल कोविड -१९ ची चाचणी करण्यात आली, ज्यामध्ये सर्व खेळाडूंचा अहवाल नकारात्मक आला आहे. त्यानंतर आम्ही आता पुढील काही दिवसात मोठ्या गटात ट्रेंनिंग सुरु करू शकू. “

जुव्हेंटसच्या अनेक खेळाडूंनी याआधीच वैयक्तिकरित्या ट्रेंनिंग सुरु केली आहे. स्टार खेळाडू ख्रिस्तीयानो रोनाल्डोनेही मंगळवारी आपल्या खेळाडूंबरोबर सराव केला. यापूर्वी असे मानले जात होते की लीग १३ जूनपासून सुरू होऊ शकेल आणि सगळ्या क्लबनेही गेल्याच आठवड्यात यासाठी मतदानही केले होते. मात्र, ही लीग १५ जूनपर्यंत सुरू होणार नसल्याचे प्रशासनाने सोमवारीच स्पष्ट केले आहे.

एफआयजीसीने नंतर सांगितले की,”त्याने सेरी-ए लीग सह सर्व स्पर्धांचे निलंबन हे १४ जूनपर्यंत वाढवले ​​आहे. हा निर्णय कोरोनाव्हायरस या साथीच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर घेतला गेलेला आहे. तथापि, गुरुवारी एफआयजीसीने म्हटले आहे की सेरी-ए लीगचा सध्याचा सिझन हा २० ऑगस्टपर्यंत संपेल आणि त्यानंतर १ सप्टेंबर २०२०-२१ पासून नवीन सिझन सुरू करता येईल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

‘या’ खेळाडूला आंतरराष्ट्रीय स्तरावर कसोटी खेळायला संधी न मिळणे हे भारताचे नुकसान आहे’-रवी शास्त्री

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रणजी करंडकात ११ हजार धावा आणि तीस शतके झळकावणाऱ्या अमोल मुझुमदारला भारताकडून कधीही कसोटी क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली नाही. यावर भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री म्हणाले की,” मुझुमदारने आंतरराष्ट्रीय स्तरावर कसोटी न खेळणे हे भारताचे नुकसान आहे.

रवी शास्त्री आपल्या आठवणींच्या बॉक्समधून क्रिकेट विषयीच्या अनेक मजेशीर गोष्टी बाहेर आणतात. आजच्या भागात त्यांनी आज त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर रणजी ट्रॉफीचा फलंदाज अमोल मुझुमदार याचा फोटो पोस्ट केला आहे. हा फोटो रवि शास्त्रीच्या शेवटच्या रणजी मोसमातील आहे.

 

हे सुंदर छायाचित्र पोस्ट करत शास्त्रींनी लिहिले, “रणजी करंडकातील खेळाडू – अमोल मुझुमदार याचा फोटो. माझा शेवटचा सिझन तर त्याचा पहिला सिझन होता. मला अजूनही वाटते की, मुझुमदारने आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेट न खेळल्यामुळे भारताचे नुकसान झाले होते.”

घरगुती क्रिकेटमधील मजुमदारचा प्रवास खूपच मस्त आहे. २० वर्षांच्या प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने ११,००० धावा केल्या असून त्यात सुमारे ३० शतकांचा समावेश आहे. लँकशायर आणि यॉर्कशायरमार्फत त्याला बीसीसीआय, क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि ग्रेट ब्रिटन कडून कोचिंगचे सर्टिफिकेटही मिळाले आहे.

गेल्या वर्षी दक्षिण आफ्रिका टिम जेव्हा भारत दौर्‍यावर आली होती, तेव्हा मजुमदार याची फलंदाजी प्रशिक्षक म्हणून या पाहुण्या संघाने नेमणूक केली होती. याशिवाय तो नेदरलँड्सचा फलंदाजी प्रशिक्षकही होता आणि आता आयपीएल संघ राजस्थान रॉयल्सचाही फलंदाजी प्रशिक्षक आहे. मुझुमदारने एनसीए येथे भारताच्या अंडर -१९ आणि अंडर -२३ संघालाही कोचिंग दिलेली आहे
.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

स्टाफ सिलेक्शन कमिशननं परीक्षांच्या तारखांबाबत जारी केलं ‘हे’ परिपत्रक

नवी दिल्ली । स्टाफ सिलेक्शन कमिशनने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रलंबित परीक्षांच्या नव्या तारखांबाबत एक परिपत्रक जारी केले आहे. नव्या तारखा कधी घोषित केल्या जाणार हे यात नमूद करण्यात आले आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशनने कंबाइंड हायर सेकंडरी लेवल एग्झाम (CHSL), ज्युनियर इंजीनियर (JE), स्टेनोग्राफर ग्रेड सी व डी साठी हे परिपत्रक काढले आहे.

या परिपत्रकात SSC CHSL 2019 टियर १ परीक्षा, SSC JE 2019 पेपर १ परीक्षा, SSC स्टेनोग्राफर ग्रेड सी आणि डी २०१९ परीक्षा आणि SSC CHSL 2019 स्कील टेस्ट या परीक्षांच्या तारखेबद्दल माहिती देण्यात आलेली आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या अधिकृत संकेतस्थळावर हे परिपत्रक जारी करण्यात आलं आहे.

या परिपत्रकात जारी केलेल्या माहितीनुसार, देशातील कोरोना विषाणूच्या संक्रमणाने उद्भवलेल्या स्थितीचा विचार करून आयोगाने हा निर्णय घेतला आहे की १ जून २०२० रोजी पुन्हा एकदा परिस्थितीचा आढावा घेतला जाईल. त्यानंतर आयोग भरती परीक्षांच्या नव्या वेळापत्रकाची घोषणा करेल. परिपत्रकात स्पष्टपणे म्हटले आहे की स्टाफ सिलेक्शन कमिशन प्रलंबित परीक्षांच्या नव्या तारखांची घोषणा १ जूननंतरच करणार आहे.

अधिकृत परिपत्रक वाचण्यासाठी येथे क्लिक करा

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

नुकसान १ लाख कोटींचं मदत १ हजार कोटींची; मोदींच्या पॅकेजवर ममता संतापल्या

कोलकाता । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अम्फान महाचक्रीवादळानं प्रचंड तडाखा बसलेल्या पश्चिम बंगालला १ हजार कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा केली. मात्र, ही मदत तुटपुंजी असल्याचं सांगत राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारवरचा आपला राग व्यक्त केला. अम्फान महाचक्रीवादळाचा तडाखा झेललेल्या पश्चिम बंगालची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज हवाई पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीही उपस्थित होत्या.

या हवाई दौऱ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालसाठी १ हजार कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा केली. परंतु, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मात्र पुन्हा एकदा केंद्रातील भाजप सरकारविरुद्ध आपली नाराजी व्यक्त केलीय. नुकसान १ लाख कोटींचं झालेलं असताना मदत म्हणून फक्त १ हजार कोटी दिले जात आहेत, असं म्हणत त्यांनी आपला राग व्यक्त केला.

‘मोदींनी आपात्कालीन आर्थिक मदत म्हणून १ हजार कोटी रुपयांची घोषणा केली. पण, हे पैसे कधी आणि कोणत्या स्वरुपात मिळणार याची स्पष्ट माहितीच देण्यात आलेली नाही. आम्ही याविषयी नंतर ठरवू असं ते म्हणाले’, असं ममता म्हणाल्या. मोदींना किती निधी द्यायचा आहे ते त्यांचे ते ठरवतील, आम्ही सर्व माहिती त्यांना देणार या शब्दांतच त्या व्यक्त झाल्या. ५६ हजार कोटी रुपये तर आमचेच केंद्राकडे थकित आहेत, असंही ममता बॅनर्जी यांनी यावेळी म्हटलं.

दरम्यान, शुक्रवारी सकाळच्या वेळेपर्यंत पश्चिम बंगालमध्ये अम्फान या महाचक्रीवादळामुळे ८० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. शिवाय या वादळामुळे राज्याचं सुमारे १ लाख कोटी रुपयांचं नुकसान होण्याचा अंदाजही वर्तवण्यात येत आहे. आता या साऱ्यामध्ये पंतप्रधानांची मदत कितपत फायद्याची ठरणार आणि ती मदत नेमकी राज्याला कोणत्या स्वरुपात मिळणार हे पाहणं महत्त्वाचं असेल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

१५ वर्षांपूर्वी ‘हे’ गाणे रिलीज झाल्यानंतर फॅन्सने प्रियांकालाच मानले होते गायिका.. पहा व्हिडीओ

 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लॉकडाऊन दरम्यान अभिनेत्री प्रियांका चोप्रा सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह असते. अलीकडेच, तिने आपल्या एका जुन्या बॉलिवूड चित्रपटाचा एक थ्रोबॅक व्हिडिओ शेअर केला आहे, जो मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे. याबददल तिने सांगितले की,” त्यावेळी बहुतेक लोकांना असे वाटले की हे गाणे तिने गायले आहे.” प्रियांकाने या गाण्या संदर्भातील एक मजेदार किस्सा शेअर केला आहे.

या व्हिडिओमध्ये प्रियांका ‘तिनका तिनका’ हे गाणे गात आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिले, ‘तिनका तिनका’ हे गाणे माझ्या “करम” या चित्रपटातील आहे. हे २००५ साली रिलीज झाले होते. काही लोकांना हे माहित नाही की हिंदी चित्रपटांमध्ये बहुतेक गाणी हे प्लेबॅक सिंगर्स गातात. मी भाग्यवान आहे की काही चांगल्या गायकांनी कित्येक वर्षांपासून माझ्या चित्रपटांना आवाज दिला आहे. पण जेव्हा हे गाणे रिलीज झाले तेव्हा बहुतेकांना असे वाटले की ते गाणे मीच गायले आहे. पण खरं तर तो आवाज माझ्या अनेक आवडत्या गायकांपैकी एक असलेल्या अलीशा चिनॉयचा आवाज होता .. तिनेही माझ्या या गाण्यातील अभिनयाचे कौतुक केले आहे. धन्यवाद, अलीशा.’

 

या गाण्याशी संबंधित आणखी एक किस्सा म्हणजे तिला सेटवर गाताना पाहून डायरेक्टर आणि को-स्टारने तिला ‘तिनका तिनका’ गाण्याचा सल्ला दिला, पण तिने अ‍ॅक्टिंगवर फोकस करायचे आहे असे म्हणून नकार दिला. मात्र, नंतर टीव्हीवरील ‘सा रे गा मा पा’ या कार्यक्रमात, जेव्हा तिने हेच गाणे लाइव्ह गायले होते, जे लोकांना खूपच आवडले. तिने ‘इन माय सिटी’ च्या सहाय्याने गायनाच्या क्षेत्रात देखील पॉल ठेवले. यानंतर प्रियांकाचे पुढचे गाणे ‘एक्सोटिक’ हे गाणे रिलीज झाले. त्यानंतर तिने ‘आय कॅंट मेक यू लव मी’ हे गाणे गायले.

अभिनयाबरोबरच प्रियांका गाते सुद्धा
बॉलिवूडविषयी बोलताना प्रियांकाने “मेरी कोम” या चित्रपटातील चाओरो गायले आहे. त्यानंतर फरहान अख्तरसोबत ‘दिल धड़कने दो’ या चित्रपटात देखील एक गाणे गायले. तसेच मराठी भाषेतही डेब्यू करत असताना बाबा हे गाणे गायले.

प्रियांका जॉन अब्राहमसोबत दिसली होती
अ‍ॅक्शन-थ्रीलर चित्रपट करम या सिनेमाचे दिग्दर्शन सिनेमॅटोग्राफर संजय एफ गुप्ता यांनी केले. हा त्याचा पहिला चित्रपट होता, ज्यात जॉन अब्राहम आणि भरत दाभोळकर यांच्याव्यतिरिक्त प्रियांकाने मुख्य भूमिका साकारली होती. जॉन हा एक प्रोफेशनल किलर आहे जो एका मिशन दरम्यान अनवधानाने एका निष्पाप कुटुंबाची हत्या करतो. जॉनला त्या घटनेची इतकी खंत वाटते की तो आपले हे कामच सोडतो. त्याच्या बॉसला हे आवडत नाही आणि त्याच्या बायकोचे अपहरण करून तिला ओलिस ठेवलतो. तिला सोडवण्यासाठी म्हणून जॉन आपले जुने काम करतो आणि शहरातील एका महत्वाच्या माणसाला ठार मारतो. मात्र वास्तविक लढाई यानंतरच सुरू होते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

राजकारण सुरु! राजस्थान सरकारनं पाठवलं यूपी सरकारला विद्यार्थ्यांना बसनं सोडण्याचं बिल

लखनऊ । संपूर्ण देश कोरोनाच्या संकटतात असताना याही काळात राजकीय पक्षांनी राजकारणाला विश्रांती दिली नाही. लॉकडाउनमुळे राजस्थानातील कोटा येथे अडकलेल्या उत्तर प्रदेशातील विद्यार्थ्यांना काँग्रेसच्या नेतृत्वातील राजस्थान सरकारने उत्तर प्रदेशात बसेसद्वारे सोडले. राजस्थान सरकारने याचे ३६ लाख ३६ हजार इतके भाडे आकारले. तर उत्तर प्रदेश सरकारने हे भाडे शुक्रवारी चुकते केले. दरम्यान, आता या बिल प्रकरणावरून उत्तर प्रदेश सरकारने राजस्थान सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे माध्यम सल्लागार मृत्युंजय कुमार यांनी ३६ लाख रुपयांचे भाडे मागणाऱ्या राजस्थान सरकारवर टीकेची तोफ डागली आहे. विद्यार्थ्यांना बसनं सोडण्याचं बिल पाठवणं हा राजस्थान सरकारचा अमानवीय चेहरा असल्याचे ते म्हणाले.एप्रिल महिन्यात उत्तर प्रदेशातील हजारो विद्यार्थ्यांना कोटा येथून त्यांच्या उत्तर प्रदेशातील घरी पोहोचवण्यात आले होते. हे सर्व विद्यार्थी राजस्थानमधील कोटा येथे स्पर्धा परीक्षांची तयारी करत होते.

दरम्यान, कोटा येथे फसलेल्या उत्तर प्रदेशातील विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी आम्ही बसेस उपलब्ध केल्या होत्या, मात्र आम्हाला अतिरिक्त बसेसची आवश्यकता होती. त्यामुळं कोटा येथे उपलब्ध असलेल्या राजस्थान परिवहन महामंडळाच्या बसेस या विद्यार्थ्यांना आग्रा आणि मथुरा येथे सोडण्यासाठी तयार करण्यात आल्या होत्या. दरम्यान आता या बसेसचे सर्व भाडे उत्तर प्रदेश परिवहन महामंडळाने चुकवले असल्याची माहिती उत्तरप्रदेश राज्य परिवहन महामंडळाचे संचालक राज शेखर यांनी सांगितले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

कोलकात्याचा दादा बनणार क्रिकेट जगताचा दादा ? सौरव गांगुलीला आयसीसीचा अध्यक्ष बनवण्याची मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । माजी भारतीय कर्णधार सौरव गांगुली सध्या बीसीसीआयचा अध्यक्ष आहे. गांगुली जवळपास गेल्या आठ महिन्यांपासून बीसीसीआयचे नेतृत्व करीत आहेत. अशातच दुसरीकडे आयसीसीचे अध्यक्ष असलेल्या शशांक मनोहर यांचा कार्यकाळही याच महिन्यात संपुष्टात येतो आहे. यानंतर जुलैमध्ये आयसीसीच्या अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे.

गांगुली यांचा आतापर्यंतचा कार्यकाळ पाहता सौरव गांगुलीला आयसीसी अध्यक्ष करावे, असा आवाज सध्याला उठत आहे. ही मागण्या केवळ भारतातच नाहीत तर इतर देशातूनही होते आहे. दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार आणि सध्या क्रिकेट दक्षिण आफ्रिकेचा अध्यक्ष असलेला ग्रॅमी स्मिथने म्हटले आहे की,”सौरव गांगुलीकडे लीडरशिप क्वॉलिटी आहे आणि तो या आयसीसी अध्यक्ष पदासाठी सर्वोत्कृष्ट आहे.

Graeme Smith wants Sourav Ganguly as next ICC president - Gujarat ...

सौरव गांगुलीच्या नेतृत्वावर आजही लोकांचा विश्वास आहे. त्याने भारतीय संघाला परदेशात सामने जिंकण्यास शिकवले. या व्यतिरिक्त त्याने पश्चिम बंगाल क्रिकेट असोसिएशनचे प्रमुखपद देखील भूषविले होते आणि आता तो बीसीसीआय अध्यक्षाच्या मुख्य भूमिकेत आहे. त्याच्याकडे एक चमकदार कर्णधारपदाचा आणि उत्कृष्ट प्रशासकाचा अनुभव देखील आहे. आता आयसीसी अध्यक्षपदासाठी जुलैमध्ये निवडणुका होणार आहेत. यासाठी क्रिकेट दक्षिण आफ्रिकेचा अध्यक्ष असलेला ग्रॅमी स्मिथ याने सौरव गांगुलीला समर्थन दिले आहे.

ग्रॅमी स्मिथने म्हटले आहे की,”भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा अध्यक्ष सौरव गांगुली याच्यासारख्या दिग्गज व्यक्तीने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष व्हावे. गांगुलीसारख्या अनुभवी खेळाडूच्या या पदावर असल्याचा क्रिकेटला फायदाच होईल. आयसीसीचे अध्यक्षपद हे एक मोठे पद आहे आणि गांगुलीसारख्या व्यक्तीने हे पद सांभाळणे हे क्रिकेटसाठी चांगले होईल.

तो पुढे म्हणाला की,” गांगुली आयसीसी अध्यक्ष होणे हे आधुनिक क्रिकेटसाठी चांगले ठरेल. त्याला हा खेळ अधिक चांगला समजला आहे. त्याने तो अधिक उच्च स्तरावर खेळला आहे आणि कठीण समयी संघाची कमान देखील सांभाळली आहे. त्याचे नेतृत्व क्रिकेटला पुढे नेण्यासाठी सर्वोत्कृष्ट असल्याचे सिद्ध होऊ शकते. तसेच त्याला आयसीसी अध्यक्ष होताना पाहणे हे औत्सुक्याचे ठरणार आहे.”

गांगुलीचे नेतृत्व आश्चर्यकारक आहे
सौरव गांगुलीने बर्‍याच वेळा हे सिद्ध केले आहे की,”परिस्थिती हाताळण्याची आणि त्यात सुधारणा करण्याचे कौशल्य आपल्याकडे आहे. त्याला जेव्हा भारतीय संघाचे कर्णधारपद देण्यात आले होते, त्यावेळी भारतीय संघ अनेक समस्यांनी वेढला गेला होता. त्यावेळी मॅच फिक्सिंगचे भूत हे भारतीय संघाच्या मानगुटीवर बसलेले होते. हा एक खूप मोठा वाद होता, त्यामुळे भारतीय संघाविषयी चाहत्यांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झालेली होती. पण या कठीण वेळी गांगुलीने टीम इंडियाची सूत्रे आपल्या हाती घेतली आणि मग भारताने परदेशातही विजयाचा झेन्डा रोवला.

Zaheer Khan relives India's Natwest Trophy 2002 win - YouTube

गांगुलीने चांगली टीम तयार केली आणि चाहत्यांचा विश्वास पुन्हा जिंकला. मग जेव्हा त्याला बीसीसीआयची कमान मिळाली तेव्हा त्या वेळी बोर्डात अनेक गोष्टी विखुरल्या गेल्या होत्या. गांगुली गेल्या वर्षीच ऑक्टोबरमध्ये बीसीसीआयचा अध्यक्ष बनला होता. त्यानंतर गांगुलीने राष्ट्रीय संघापासून ते देशांतर्गत संघ आणि स्पोर्ट स्टाफपर्यंत सर्वांवर लक्ष दिले. गांगुलीच्या अध्यक्षतेखाली भारताने बांगलादेशविरुद्ध कोलकाता येथे पहिला गुलाबी बॉल कसोटी सामना खेळला. स्वत: गांगुली या कार्यक्रमाची सर्व तयारी पहात होता.

बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीचा कार्यकाळ हा येत्या जुलैमध्ये संपत आहे. अशा परिस्थितीत मंडळाने सर्वोच्च न्यायालयात कूलिंग ऑफ नियमात तीन वर्ष शिथिल करण्याची मागणी केली होती, परंतु अद्यापही या प्रकरणाची सुनावणी झालेली नाही.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय! सर्व खासगी रुग्णालये घेणार ताब्यात

मुंबई । राज्यातील कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर धर्मादाय आयुक्तांकडे नोंद असलेली सर्व खासगी रुग्णालये ताब्यात घेण्याचे आदेश राज्यातील ठाकरे सरकारनं दिले आहेत. राज्यात एकीकडे कोरोनाचे रुग्ण वाढत असताना काही खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांना भरमसाट बिलं देऊन लूटमार केल्या जात असल्याच्या तक्रारी आल्यानंतर राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने खासगी रुग्णालयांमधील ८० टक्के खाटा ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला आहे. ३१ ऑगस्टपर्यंत राज्य सरकारकडे हा ताबा असणार आहे. याशिवाय राज्य सरकारने उपचार खर्चाची मर्यादाही ठरवून दिली आहे. जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त व राज्य आरोग्य हमी सोसायटीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना याबाबत कारवाई करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.

कोरोनाच्या फैलावामुळं राज्यातील आरोग्य सेवेवर प्रचंड ताण आहे. महापालिकेच्या व सरकारी रुग्णालयांची नवे रुग्ण दाखल करून घेण्याची क्षमता संपली आहे. अशा परिस्थितीच अनेक जण खासगी रुग्णालयांत धाव घेत आहेत. मात्र, तिथं मनमानी शुल्क आकारलं जात आहे. अगदी २० ते २५ लाख रुपयेही घेतले जात आहेत. याबाबतच्या अनेक तक्रारी राज्य सरकारकडं आल्या होत्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी याची गंभीर दखल घेत खासगी रुग्णालयांच्या या मनमानीला चाप लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार येत्या ३१ ऑगस्टपर्यंत खासगी रुग्णालयातील ८० टक्के खाटा सरकारच्या ताब्यात राहणार आहेत. दरम्यान २० टक्के खाटांसाठी दर आकारण्याचा अधिकार रुग्णालयांकडे राहणार आहे

शुल्क आकारणीवरही मर्यादा
राज्य सरकारच्या निर्णयानुसार वॉर्ड, विलगीकरण बेडसाठी चार हजार रुपये आकारले जाणार आहे. तसंच व्हेंटिलेटरशिवाय असणाऱ्या आयसीयू बेडसाठी ७५०० तर व्हेंटिलटर सपोर्ट असणाऱ्या आयसीयू बेडसाठी ९००० रुपये आकारले जाणार आहेत. याशिवाय राज्य सरकारने इतर २७० प्रक्रिया आणि शस्त्रक्रियांसाठीचे दरही ठरवले आहेत. यामध्ये कॅन्सर उपचाराचाही समावेश आहे. यामध्ये डॉक्टरांच्या फीचाही समावेश असणार आहे. हॉस्पिटलची तयारी असेल तर ते अतिरिक्त रक्कम डॉक्टरांना देऊ शकतं. आरोग्य विमा कंपन्यांनी ठरविलेल्या दरांनुसार हे दर निश्चित करण्यात आल्याचं नव्या आदेशात नमूद करण्यात आलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

योगी आदित्यांना बॉम्बने उडवण्याची धमकी; अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बॉम्बने उडवण्याची धमकी देणारा मेसेज डायल ११२ या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर पाठविण्यात आला. हा मेसेज पाठवणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरूद्ध नुकताच एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

योगी सरकारने डायल ११२ या सेवे अंतर्गत पोलिस, अग्निशमन दल आणि आरोग्य सेवांशी संबंधित आकस्मिक सेवांना समाविष्ट केले गेले आहे. ही एक आपत्कालीन सेवा आहे. हा नंबर डायल केल्यावर पोलिस, अग्निशमन दल आणि आरोग्य यांसारख्या सेवा अगदी काही वेळातच पुरविल्या जातात. सध्याच्या कोरोना संकटाच्या काळात योगी सरकार या क्रमांकावरून एक व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप चालवत आहे, ज्यावर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बॉम्बने उडवणार असल्याच्या धमकीचा मेसेज पाठवण्यात आला. पोलिस आता त्या नंबरचा शोध घेण्यात गुंतले आहेत.

गोमती नगरचे निरीक्षक डीके सिंह यांनी सांगितले की डायल ११२ मुख्यालयातून हा संदेश मागविण्यात आला आहे. संदेश पाठविण्यासाठी वापरल्या गेलेल्या क्रमांकाची तपासणी सुरू केली गेली आहे. लवकरच त्या नंबरचे लोकेशन शोधून काढले जाईल. लखनौच्या गोमती नगर पोलिस ठाण्यात मुख्यमंत्र्यांना बॉम्बने उडवण्याची धमकी देणाऱ्या या अज्ञात इसमाविरुद्ध कलम ५०५० वन B, ६०६ आणि ७०७ अन्वये एफआयआर नोंदविण्यात आला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

खूषखबर! कर्जमाफी न झालेल्या शेतकऱ्यांनाही मिळणार नवे कर्ज 

मुंबई । राज्याची खरीप हंगाम आढावा बैठक नुकतीच पार पडली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली ही ऑनलाईन बैठक झाली. राज्यात महात्मा जोतिबा फुले योजनेचा लाभ न मिळालेले ११ लाख १२ हजार शेतकरी आहेत. अशा शेतकऱ्यांना खरीप हंगामातील पीक घेण्यासाठी नवे कर्ज देण्यात येईल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या बैठकीत सांगितले. तसेच कोरोना मुळे जगभरातील अन्नधान्याची गरज बदलणार असल्यामुळे त्यादृष्टीने पीक घेण्यात येईल याची आखणी करा असे त्यांनी कृषी विभागाला सांगितले.

राज्यात ३० लाख शेतकऱ्यांची यादी कर्जमुक्तीसाठी देण्यात आली होती. पैकी १९ लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर साधारण १२ हजार कोटी रुपये मार्चपर्यंत जमा करण्यात आले होते. पण कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता उपाययोजनांसाठी निधी वापरण्यात येतो आहे. त्यामुळे सरकारी तिजोरीची अवस्था ठीक नाही. त्यामुळे जवळपास ८ हजार १०० कोटी रुपयांची कर्जमाफी देता आली नाही. मात्र ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली नाही अशांना नवे कर्ज देण्यात येईल त्यांना दुर्लक्षित केले जाणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत दिली आहे. साधारण ४४ हजार कोटींच्या कर्जवाटपाचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवण्यात आले आहे.

दरम्यान २० जूनपर्यंत कापूस, मका, तूर, हरभरा, ज्वारी, धानाची खरेदी खूप संथ गतीने सुरु असल्याने त्यांच्या खरेदीचा वेग वाढवा असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या बैठकीत सांगितले. २० जूनपर्यंत कापसाची खरेदी पूर्ण झाली पाहिले असे ते म्हणाले. कोरोना विषाणूच्या संकटाचा सामना करत असताना कृषी क्षेत्र आपल्याला तारू शकेल असे त्यांनी सांगितले. राज्यातील कोरोनाची स्थिती पाहता उद्योगधंदे सुरळीत होण्यास काही कालावधी जाण्याची शक्यता आहे. या धरतीवर आता शेती व्यवसायाला उभारी देता येऊ शकते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.