Saturday, December 27, 2025
Home Blog Page 5761

पुणे जिल्ह्यातील कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी दिली ‘ही’ महत्वाची सूचना

पुणे । राज्यातील विविध भागातून आता हळूहळू लोक परतत आहेत. पुण्यातही गेल्या काही दिवसात परराज्यातून तसेच इतर जिल्ह्यांमधून लोक आले आहेत. दिवसेंदिवस वाढणाऱ्या रुग्णांची संख्या पाहता प्रशासनाकडून विविध उपाय राबविले जात आहेत. जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी सद्यस्थिती लक्षात घेऊन बाहेरून पुणे जिल्ह्याच्या हद्दीत आलेल्या प्रत्येक नागरिकाला घरातच विलगीकरणात ठेवण्याचे आदेश दिले आहेत. १४ दिवस या नागरिकांना सक्तीने विलगीकरणात ठेवावे असे आदेश त्यांनी दिले आहेत.

नवलकिशोर राम यांनी ग्रामपंचायत, नगरपरिषद आणि नगरपालिका यांना या आदेशाची अमलबजावणी करण्यासाठी समित्या स्थापन करण्यास सांगितले आहे. ग्रामपंचायत स्तरावरील समितीचे अध्यक्ष हे सरपंच तर नगरपालिका, नागरपरिषद स्तरावरील अध्यक्ष हे नगराध्यक्ष असतील असे त्यांनी सांगितले. परराज्य आणि परजिल्ह्यातून पुण्यात येणाऱ्या लोकांची संख्याही अधिक आहे. त्यामुळे कोणत्याही झोनमधून येणाऱ्या व्यक्तीस विलगीकरणात ठेवा असा सक्त आदेश त्यांनी जारी केला आहे.

दरम्यान जिल्ह्यात आतापर्यंत साधारण २१ हजाराहून अधिक नागरिक परतल्याची आकडेवारी जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केली. यामध्ये परराज्यातून आलेल्या ५४८९ आणि परजिल्ह्यातून आलेल्या १६४०४ नागरिकांचा समावेश आहे. २४५६ विद्यार्थी, ३८४ यात्रेकरू/पर्यटक, १८४९ कामगार तसेच १७२०४ इतर व्यक्ती यांचा समावेश आहे. जिल्ह्यातील रुग्णांची वाढती संख्या पाहता हा निर्णय घेण्यात आला असून याची कडक अंमलबजावनी  करण्याचे आदेश ग्रामपंचायत, नगरपालिका, नगरपरिषद यांना देण्यात आले आहेत.

Pune

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

सातारकरांची चिंता वाढली; दिवसभरात २० नवीन कोरोनाग्रस्त, जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या २०१ वर

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

सातारा जिल्ह्यात आज दिवसभरात कोरोनाचे २० नवीन कोरोनाग्रस्त सापडले असल्याचे समाजत आहे. संध्याकाळी ८ वाजता जिल्ह्यातील कराड, पाटण आणि खटाव तालुक्यात ४ कोरोना बाधित सापडल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर रात्री उशिरा पुन्हा आणखी १६ कोरोनाग्रस्तांचे सापडले असून त्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक आमोद गडीकर यांनी दिली आहे.

रात्री उशिराने सापडलेले कोरोनाबाधित कोरेगाव 2, खटाव 1, पाटण 2, कराड 3, वाई 1 आणि सातारा ११ असे आहेत. त्यापूर्वी संध्याकाळी ८ वाजता सापडलेले रुग्ण ता. खटाव येथील एक 45 वर्षीय पुरुष, कुंभारगाव ता. पाटण येथील 70 वर्षीय पुरुष, म्हावशी ता. पाटण येथील 45 वर्षीय पुरुष व ऊंब्रज ता. कराड येथील 40 वर्षीय पुरुष असे आहेत. सद्यस्थितीत साताऱ्यात ९१ रुग्णावर उपचार सुरु आहेत.

दरम्यान, ताज्या आकडेवारीनुसार सातारा जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या २०१ वर पोहोचली आहे. तसेच आत्तापर्यंत जिल्ह्यातील 106 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत तर चौघांचा मृत्यू झाला आहे.

Satara

पुणेकरांसाठी गुडन्युज! ससूनमधील पहिली प्लाझ्मा थेरपी यशस्वी 

पुणे । Covid -१९ च्या उपचारासाठी कोणतेच खात्रीशीर औषध अद्याप सापडलेले नाही. शास्त्रज्ञ ते शोधण्यात व्यस्त आहेत. विविध उपचार पद्धती प्रायोगिक पातळीवर केल्या जात आहेत. गेल्या काही दिवसांपासून Convalescent plasma (kon-vuh-LES-unt PLAZ-muh)  थेरपी वापरून कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्याच्या चर्चा सुरु आहेत. पुण्यात ससून रुग्णालयात १० व ११ मे या दिवशी उच्च रक्तदाब असलेल्या अतिस्थूल व्यक्तीवर ही थेरपी करण्यात आली होती. आज ती व्यक्ती ठणठणीत बरी झाली आहे. त्या व्यक्तीला covid  वॉर्ड मधून हलविण्यात आले आहे. अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी त्यांच्या ट्विटर अकॉउंट वरून दिली आहे.

जे रुग्ण कोरोना मधून बरे झाले आहेत त्यांच्या शरीरात अँटीबॉडी, प्रोटीन असतात. ज्याचा वापर रक्त  या संसर्गाशी लढण्यासाठी करत असते. जे यातून बरे झाले आहेत अशा लोकांच्या रक्ताला  Convalescent plasma म्हणतात. प्लाझ्मा हा रक्ताचा द्रव भाग असतो. त्यामुळे संशोधकांना अशी आशा आहे की बऱ्या झालेल्या रुग्णांचा प्लाझ्मा गंभीर रुग्णाला दिल्यास त्या रुग्णाची कोरोनाशी लढण्याची शक्ती वाढेल. कदाचित आधीच आजारी असणाऱ्या व्यक्तीला आणखी आजारी होण्यापासूनही वाचवेल. उच्च रक्तदाब किंवा मधुमेह असणाऱ्या लोकांची रोगप्रतिकार शक्ती तुलनेने कमी असते. त्यामुळे अशा रुग्णांना बरे करणे अवघड असते. अशा रुग्णांना बऱ्या झालेल्या व्यक्तीचा प्लाझ्मा दिल्यास ती व्यक्ती बरी होण्याची शक्यता आहे.

दरम्यान बऱ्याच ठिकाणी या थेरपीचा उपचारासाठी वापर करण्याच्या चर्चा आहेत. ससूनमधील  या यशस्वी प्रयोगामुळे आता उपचारासाठी सकारात्मकता  निर्माण झाली आहे. आता मोठ्या प्रमाणात रुग्ण बरे होण्याची शक्यता आहे. तसेच गंभीर असणाऱ्या रुग्णांवरही उपचार करता येणार असल्याने मृत्यूचा धोकाही टाळता येणार आहे. प्लाझ्मा थेरपीची यशस्वी चाचणी ही सकारात्मक आशा आहे.

Pune

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

वर्ल्ड कप फायनलमधील पराभव विसरु शकलो नाही – केन विल्यमसन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । न्यूझीलंड क्रिकेट संघाचा कर्णधार केन विल्यमसन हा इंग्लंडविरुद्धच्या वर्ल्ड कप फायनलमधील पराभवाला विसरलेला नाही. अंतिम सामन्यात झालेला नाट्यमय पराभव त्याच्या कारकीर्दीतील अपयश होते का हे विल्यमसनला अजूनही उमगलेले नाही.

मागीच्या वर्षी वर्ल्ड कप फायनलमध्ये निर्धारित षटक आणि सुपर ओव्हरनंतरही सामना बरोबरीत सुटल्यानंतर इंग्लंडला चौकार आणि षटकारांच्या मोजणीच्या आधारे विजयी घोषित केले गेले.

विल्यमसन क्रिकबझ संकेतस्थळावर आयोजित एका शोवर म्हणाला, ” मला अजूनही समजत नाही आहे तो आयुष्यातील उतार होता कि चढाव. मी अजूनही ते शोधण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र कधीकधी ते शोधणे कठीण होते. हा आपल्या जीवनाचा एक भाग आहे हे मान्य करावेच लागेल. “

तो म्हणाला, “हा एक चांगला सामना होता आणि मला ते समजणे कठीण होते कारण मी या सामन्याचा एक भाग होतो.” वर्ल्ड कपच्या त्या अंतिम सामन्याचा निकाल बर्‍यापैकी नाट्यमय झाला होता. यानंतर क्रिकेट विश्वात अशी चर्चा होती की इंग्लंड आणि न्यूझीलंड यांना संयुक्तपणे विजेते घोषित केले जावे, परंतु तसे होऊ शकले नाही.

त्याचबरोबर पावसाने व्यत्यय आणलेल्या उपांत्य फेरीतील सामन्यात न्यूझीलंडने भारताला पराभूत करून स्पर्धेबाहेर जाण्याचा मार्ग दाखविला. हा उपांत्य सामना रिझर्व्ह डे ला खेळवण्यात गेला. पहिल्या दिवशी पावसामुळे खेळ पूर्ण होऊ शकला नव्हता. या उपांत्य सामन्याच्या पहिल्या दिवशी भारतीय संघ खूप मजबूत स्थितीत होता मात्र रिझर्व्ह डेच्या दिवशी गेलेला हा सामना न्यूझीलंडने जिंकला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

लॉकडाऊन मुळे नोकरी गेली म्हणून लॉटरीचं तिकीट काढलं आणि बनला करोडपती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूने सध्या जगभर थैमान घातले आहे. कोरोनामुळे जाहीर करण्यात आलेल्या लोकडाऊनमुळे अनेकांची नोकरी गेली आहे. अनेक मोठमोठ्या कंपन्याही लॉकडाऊन काळात बंद असल्याने त्याचा अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम झाला आहे. मात्र अशात न्यूझीलंडमधील एका व्यक्तीला नोकरी गेल्याचा मोठा फायदा झाला आहे. हाताचे काम गेल्याने नैराश्यात गेलेल्या हॅमिल्टन शहरातील एकाने सहज लॉटरीचे तिकीट विकत घेतले आणि त्याला चक्क 10.3 million (New Zealand Dallers) ची लॉटरी लागली आहे. (भारतीय रुपयांमध्ये अंदाजे ४७.७ कोटी रुपये)

स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, लॉकडाउन काळात नोकरी गमावल्यानंतर सदर व्यक्ती घरातच होता. या व्यक्तीची पत्नी ही वैद्यकीय क्षेत्रात काम करत असल्यामुळे तिला कामासाठी बाहेर पडावं लागतं. “मी घरी आले तेव्हा माझा नवरा किचनमध्ये एका टेबलवर बसला होता. एका जागेवर पाकीट ठेवलं होतं, आणि त्याकडे पाहून तो थोडा विचीत्र वागत होता. त्याने मला ते पाकीट उघडायला सांगितलं. ज्यात वर्तमानपत्राच्या बातमीचं कात्रण होतं, ज्यामध्ये हॅमिल्टनमधील एका व्यक्तीने लॉटरी जिंकल्याची बातमी होती. हे तू मला का दाखवत आहेस असं विचारल्यानंतर नवऱ्याने आपणच ती लॉटरी जिंकल्याचं मला सांगितलं.”

“सुरुवातीला मला यावर विश्वास बसला नाही आणि नवरा माझी मस्करी करतोय असं वाटलं. पण त्याने मला लॉटरीवाल्यांकडून आलेला इ-मेल दाखवला. यानंतर खात्री करण्यासाठी मी माझ्या लॉटरी तिकीटावरुन वेबसाईटवर लॉगइन केलं आणि पाहिल्यावर ती लॉटरी आम्हीच जिंकलेलो आहोत याची मला खात्री पटली.” पत्नीने स्थानिक प्रसारमाध्यमांना माहिती दिली. इतक्या मोठ्या रकमेचं इनाम जिंकल्यानंतरही या परिवाराने आपल्याला सामान्य लोकांसारखं आयुष्य जगायला आवडेल असं सांगितलं. घरातले काही खर्च, गाडीची डागडुजी आणि मुलांच्या शिक्षणासाठीची सोय केल्यानंतर उर्वरित रकमेतून इतरांना मदत करणार असल्याचं या परिवाराने सांगितलं.

पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या ४ हजार पार 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुणे जिल्हयात आज एकूण १७३३ स्वॅब संकलित करण्यात आले होते. यापैकी २०८ रुग्णांचे अहवाल सकारात्मक आले आहेत आणि याबरोबरच पुण्यातील एकूण रुग्णांची संख्या आता ४१०७ इतकी झाली आहे. पैकी १६९८ प्रकरणे सध्या कार्यान्वित आहेत. यापैकी ४४ रुग्ण हे व्हेंटिलेटर वर आहेत तर १२५ रुग्ण आयसीयू मध्ये आहेत. आज पुण्यातील १५९ रुग्ण बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

जिल्हयात घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यासाठी ७१२ समूह कार्यरत आहेत ते दररोज जास्तीत जास्त लोकांना भेटून त्यांचे सर्वेक्षण करीत आहेत. आज दिवसभरात १,१४,६०,४५१  लोकांपर्यंत पोहोचून त्यांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. एकूण ३३, ८७,९८५ घरांपर्यंत पोहोचण्यात आले आहे. जिल्हा प्रशासन जिल्ह्यातील जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे.

 

जिल्ह्यात आज एकूण ७ जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत एकूण २२७ रुग्ण मृत्यू पावले आहेत. दरम्यान कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत तसे बरेही होत आहेत. आतापर्यन्त जिल्ह्यतील २१८२ रुग्ण बरे झाले आहेत. जिल्ह्यात संचारबंदीचे नियम काही ठिकाणी हळहळू शिथिल केले जात आहेत. जिथे रुग्ण वाढत आहेत अशा परिसरात संचारबंदी तशीच राहण्याची शक्यता आहे.

Pune

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

राज्यात दिवसभरात सापडले २ हजार ३४५ नवीन कोरोनाग्रस्त; एकूण रुग्णसंख्या ४१ हजार ६४२ वर

मुंबई । राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ४१ हजार ६४२ झाली आहे.आज २३४५ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज १४०८ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ११ हजार ७२६ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सध्या २८ हजार ४५४ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज सांगितले.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ३ लाख १९ हजार ७१० नमुन्यांपैकी २ लाख ७८ हजार ६८ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ४१ हजार ६४२ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ४ लाख ३७ हजार ३०४ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून २६ हजार ८६५ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात ६४ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली असून एकूण संख्या १४५४ झाली आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई मध्ये ४१, मालेगाव ९, पुण्यात ७, औरंगाबाद शहरात ३, नवी मुंबईमध्ये २, पिंपरी- चिंचवड -१ तर सोलापुरात १ मृत्यू झाला आहे.

आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ३६ पुरुष तर २८ महिला आहेत. आज झालेल्या ६४ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ३१ रुग्ण आहेत तर २९ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ४ जण ४० वर्षांखालील आहे. या ६४ रुग्णांपैकी ३८ जणांमध्ये ( ५९ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोविड १९ मुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता १४५४ झाली आहे.

राज्यातील जिल्हा व मनपानिहाय रुग्णांचा आतापर्यंतचा तपशील:(कंसात मृत्यूंची आकडेवारी)

मुंबई महानगरपालिका: २५,५०० (८८२)
ठाणे: ३३८ (४)
ठाणे मनपा: २०४८ (३३)
नवी मुंबई मनपा: १६६८ (३३)
कल्याण डोंबिवली मनपा: ६४१ (६)
उल्हासनगर मनपा: १३१ (२)
भिवंडी निजामपूर मनपा: ८० (३)
मीरा भाईंदर मनपा: ३६२ (४)
पालघर:१०२ (३)
वसई विरार मनपा: ४२५ (११)
रायगड: २८५ (५)
पनवेल मनपा: २७१ (११)
ठाणे मंडळ एकूण: ३१,८५१ (९९६)

नाशिक: ११३
नाशिक मनपा: ८४ (२)
मालेगाव मनपा: ७१० (४३)
अहमदनगर: ४७ (५)
अहमदनगर मनपा: १९
धुळे: १५ (३)
धुळे मनपा: ८० (६)
जळगाव: २५२ (२९)
जळगाव मनपा: ७९ (४)
नंदूरबार: २६ (२)
नाशिक मंडळ एकूण: १४२५ (९४)

पुणे: २५५ (५)
पुणे मनपा: ४२०७ (२२२)
पिंपरी चिंचवड मनपा: २०३ (७)
सोलापूर: १० (१)
सोलापूर मनपा:५१२ (२७)
सातारा: १८४ (२)
पुणे मंडळ एकूण: ५३७१ (२६४)

कोल्हापूर:१४१ (१)
कोल्हापूर मनपा: २०
सांगली: ५४
सांगली मिरज कुपवाड मनपा: ९ (१)
सिंधुदुर्ग: १०
रत्नागिरी: १२३ (३)
कोल्हापूर मंडळ एकूण: ३५७ (५)

औरंगाबाद:२०
औरंगाबाद मनपा: ११०६ (३९)
जालना: ४३
हिंगोली: ११०
परभणी : १५ (१)
परभणी मनपा: ३
औरंगाबाद मंडळ एकूण: १२९७ (४०)

लातूर: ५१ (२)
लातूर मनपा: ३
उस्मानाबाद: १९
बीड: १३
नांदेड: ११
नांदेड मनपा: ८१ (४)
लातूर मंडळ एकूण: १७८ (६)

अकोला: २९ (२)
अकोला मनपा: ३१५ (१५)
अमरावती: ९ (२)
अमरावती मनपा: १३१ (१२)
यवतमाळ: १११
बुलढाणा:३८ (३)
वाशिम: ८
अकोला मंडळ एकूण:६४१ (३४)

नागपूर: ३
नागपूर मनपा: ४३४ (६)
वर्धा: ३ (१)
भंडारा: ९
गोंदिया: ३
चंद्रपूर: ८
चंद्रपूर मनपा: ७
गडचिरोली: ७
नागपूर मंडळ एकूण: ४७४ (७)

इतर राज्ये: ४८ (११)
एकूण: ४१ हजार ६४२ (१४५४)

भारताच्या क्रिकेट संघात एकजुटतेचा अभाव – मोहम्मद कैफ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मैदानात अफलातून क्षेत्ररक्षणासाठी ओळखला जाणारा भारतीय संघाचा माजी खेळाडू मोहम्मद कैफने Helo अ‍ॅपवर केलेल्या लाईव्हमध्ये सध्याच्या भारतीय संघाबद्दल आपले विचार मांडतेक. कैफच्या मते सध्याच्या भारतीय संघात एकजुटतेचा अभाव आहे. सतत खेळाडूंची होणारी आदलाबदली आणि सतत नवे नवे खेळाडू संघात येणे यामुळे भारताचा संघ अजूनही हवा तसा तयार झाला नाहीय. त्यामुळे सर्व महत्त्वाच्या सामन्यात भारतीय संघाला म्हणावी तशी कामगिरी करत नाहीय. २०१३ नंतर भारताने आयसीसीची कोणतीही मोठी स्पर्धा जिंकली नाही. यातून हे स्पष्ट दिसून येतंय की भारतीय संघामध्ये एकजुटपणाची कमतरता जाणवत आहे.

आमच्यावेळी सौरव गांगुलीने सर्व खेळाडूंना एकत्र ठेवण्यात मोठी भूमिका बजावली होती. आजही आपण पाहिलेत तर बीसीसीआयसारख्या मोठ्या संस्थेचे अध्यक्षपद स्विकारल्यावर दादाने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहे. पुढील काळात दादा भारतीय क्रिकेटमध्ये पारदर्शकता आणेल असा विश्वास मला आहे. कैफ बोलला की आमच्या काळात अनेक खेळाडू आजच्यासारखे फिट नसले तरी ते उत्तम क्रिकेटर होते आणि त्यांनी स्वत:ला सिद्ध केले होते.

टी २० विश्वचषकाविषयी बोलताना कैफ म्हणाला की, भारतीय संघात आता एक सुटसुटितपणा आणि समन्वय येणे गरजेचे असून कोणते खेळाडू संघात खेळणार हे निश्चित करणे गरजेचे आहे. भारतीय संघाला शॉर्ट फॉरमॅटमध्ये खेळताना अनेक आव्हाने आहेत त्यामुळे विराटचे नेतृत्व आणि त्याचे निर्णय खुप महत्त्वाचे आहे. माझ्या मते भारताचा महत्त्वाचा खेळाडू महेंद्रसिंग धोनी संघात असणे गरजेचे आहे. धोनी शिवाय भारतीय संघ अपूर्ण आहे. जेव्हा धोनी स्वत: सांगेल की आता मी थकलो आता निवृत्त होतो तेव्हा मी समजेण त्याच्यातील क्रिकेट संपले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

‘रेल्वे बुलाती हैं’ पण महाराष्ट्र सरकार म्हणतंय ‘जाने का नहीं’.. कारण ?

वृत्तसंस्था । १ जून पासून रेल्वेची सुविधा सुरु करण्यात येणार आहे. त्याचे ऑनलाईन बुकिंग ही सुरु करण्यात आले होते. बुकिंग सुरु केल्यावर दोन तासातच दीड लाख प्रवाशांनी बुकिंग बुकिंग केल्याची माहिती रेल्वेने दिली होती. मात्र महाराष्ट्र सरकारने राज्यातील आंतरजिल्हा प्रवासाला बंदी घातली आहे. तसे आदेश त्यांनी रेल्वेला पत्राद्वारे दिले आहेत. रेल्वेकडून १०० विशेष रेल्वेची यादी जाहीर करण्यात आली होती ज्या एक जूनपासून देशातील विविध भागातून चालणार होत्या यामध्ये पूर्वा, शताब्दी, दुरोन्तो, संपर्क क्रांती एक्सप्रेस या रेल्वेचा समावेश होता. पण राज्य सरकारने आता त्याला बंदी घातली आहे.

दोन महिन्यांच्या संचारबंदीनंतर हळूहळू परिवहन साधने सुरु केली जात आहेत. रेल्वेने राज्यांतर्गत रेल्वे सुरु केल्या जाणार असल्याची घोषणा केली होती. त्यानुसार बुकिंगही सुरु करण्यात आले होते. सरकारने हे बुकिंग रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. सरकारने रेल्वे प्रशासनाला लिहिलेल्या पत्रात महाराष्ट्रात येण्यासाठी व महाराष्ट्रातून जाण्यासाठी ज्यांनी बुकिंग केले आहे त्यांचे बुकिंग रद्द करण्यास सांगितले आहे. तसेच कोणत्याही कपातीशिवाय त्यांचे पैसे एसएमएस द्वारे संदेश देऊन परत करावेत असे सांगितले आहेत. सर्व इच्छूक प्रवाशांना “महाराष्ट्र सरकारने रेल्वेने आंतरजिल्हा प्रवासावर निर्बंध लादल्यामुळे आम्ही आपले तिकीट रद्द करत आहोत तसेच आपली सर्व रक्कम पूर्णपणे परत केली जाईल.” असा संदेश पाठवावा असे सांगण्यात आले आहे.

 

देशात रेल्वे सुरु झाल्या तरी महाराष्ट्रात त्या इतक्यात सुरु होणार नाहीत. आणि जोपर्यंत पुढील आदेश येणार नाहीत तोपर्यंत महाराष्ट्रात आंतरराज्य रेल्वे बुकिंग साठी परवानगी दिली जाणार नाही. संबंधित बाबींना लक्षात घेऊन आवश्यक सूचना दिल्या जातील.असे या पत्रात म्हंटले आहे. या आदेशामुळे आता प्रवाशांना पुढच्या सूचना येईपर्यंत वाट बघावी लागणार आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

रोजा सोडण्यासाठी भाकरी घ्यायला गेला होता BSF चा जवान; दहशतवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झाला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जम्मू-काश्मीरमध्ये बीएसएफचे दोन जवान दहशतवादी हल्ल्यात शहीद झाले आहेत. हा हल्ला होण्याच्या अगदी काही मिनिटांपूर्वीच ते इफ्तारसाठी भाकरी घेण्यासाठी बाजारात गेले होते. दरम्यान, या भरलेल्या बाजारपेठेत एका बेकरी जवळ मोटारसायकलवरून आलेल्या दहशतवाद्यांनी अंधाधुंद गोळीबार केला, त्यात बीएसएफचे कॉन्स्टेबल जिया-उल-हक आणि राणा मंडल यांचा जागीच मृत्यू झाला. गुरुवारी अधिकाऱ्यांनी याविषयीची माहिती दिली. बुधवारी सायंकाळी हा हल्ला श्रीनगरच्या सीमेवर असलेल्या सुरा या गावात झाला. पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबाशी संबंधित असलेल्या रेझिस्टन्स फ्रंटने (टीआरएफ) या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

अधिकाऱ्यांनी सांगितले की,’ अतिरेक्यांनी या सैनिकांना अगदी जवळून गोळ्या घातल्या आणि गर्दीतून निसटून पळून गेले. ते म्हणाले की,’ हक आणि मंडल हे पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादचे रहिवासी होते, परंतु अम्फान चक्रीवादळामुळे तेथे विमानतळ बंद असल्याने त्यांचे मृतदेह त्यांच्या घरी पाठविता आले नाहीत. हक (३४) आणि मंडल (२९) यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली .

बीएसएफच्या ३७ व्या बटालियनचे होते
अधिकाऱ्यांनी सांगितले की,’ हे दोघे मित्र सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) ३७ व्या बटालियनचे असून ते पांडक छावणीत ड्युटीस होते. श्रीनगरच्या जवळच्या गांदरबल जिल्ह्यातल्या हालचालींवर लक्ष ठेवणे हे त्याचे काम होते.’ त्यांनी पुढे सांगितले की,’ त्याच्या मृत्यूच्या काही मिनिटांपूर्वीच ते रोजा (इफ्तार) सोडण्यासाठी भाकरि घेण्यासाठी गेले होते. मात्र ते इफ्तार करू शकले नाहीत आणि रोज्यामध्येच शहीद झाले. बीएसएफच्या ३७ व्या बटालियनच्या सैनिकांनी सांगितले की, ‘रोजा असल्याने त्यांनी दिवसभर पाण्याचा एक थेंबही न पिता जगाचा निरोप घेतला. बीएसएफच्या सैनिकांनी त्यांच्या साथीदारांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आणि त्यांनी कायमचा निरोप घेतला असे सांगितले.

हक यांना दोन मुली आहेत
२००९ मध्ये बीएसएफमध्ये रुजू झालेले हक यांच्या मागे आई-वडील, पत्नी नफिसा खातून आणि दोन मुली आहेत. त्यापैकी एक पाच वर्षांची मूकबधिर मुलगी जेशलिन झियाउल आणि सहा महिन्यांची जेनिफर झियाउल आहे. तो मुर्शिदाबाद शहरापासून ३० किमी अंतरावरील रेजिना नगरात राहत होता.

मंडलला पत्नी आणि एक मुलगी आहे
मंडल यांच्या पश्चात आई-वडील, एक मुलगी आणि पत्नी जसमीन खातून आहेत. ते मुर्शिदाबादमधील साहेबरामपुरात राहत होते. ५ ऑगस्ट रोजी केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा मागे घेतल्यामुळे हे दोन्ही जवान काश्मीरमध्ये तैनात होते. २४ मे किंवा २५ मे रोजी येणारा ईद हा उत्सव त्यांना साजरा करता आला नाही.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.