Saturday, June 3, 2023

‘रेल्वे बुलाती हैं’ पण महाराष्ट्र सरकार म्हणतंय ‘जाने का नहीं’.. कारण ?

वृत्तसंस्था । १ जून पासून रेल्वेची सुविधा सुरु करण्यात येणार आहे. त्याचे ऑनलाईन बुकिंग ही सुरु करण्यात आले होते. बुकिंग सुरु केल्यावर दोन तासातच दीड लाख प्रवाशांनी बुकिंग बुकिंग केल्याची माहिती रेल्वेने दिली होती. मात्र महाराष्ट्र सरकारने राज्यातील आंतरजिल्हा प्रवासाला बंदी घातली आहे. तसे आदेश त्यांनी रेल्वेला पत्राद्वारे दिले आहेत. रेल्वेकडून १०० विशेष रेल्वेची यादी जाहीर करण्यात आली होती ज्या एक जूनपासून देशातील विविध भागातून चालणार होत्या यामध्ये पूर्वा, शताब्दी, दुरोन्तो, संपर्क क्रांती एक्सप्रेस या रेल्वेचा समावेश होता. पण राज्य सरकारने आता त्याला बंदी घातली आहे.

दोन महिन्यांच्या संचारबंदीनंतर हळूहळू परिवहन साधने सुरु केली जात आहेत. रेल्वेने राज्यांतर्गत रेल्वे सुरु केल्या जाणार असल्याची घोषणा केली होती. त्यानुसार बुकिंगही सुरु करण्यात आले होते. सरकारने हे बुकिंग रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. सरकारने रेल्वे प्रशासनाला लिहिलेल्या पत्रात महाराष्ट्रात येण्यासाठी व महाराष्ट्रातून जाण्यासाठी ज्यांनी बुकिंग केले आहे त्यांचे बुकिंग रद्द करण्यास सांगितले आहे. तसेच कोणत्याही कपातीशिवाय त्यांचे पैसे एसएमएस द्वारे संदेश देऊन परत करावेत असे सांगितले आहेत. सर्व इच्छूक प्रवाशांना “महाराष्ट्र सरकारने रेल्वेने आंतरजिल्हा प्रवासावर निर्बंध लादल्यामुळे आम्ही आपले तिकीट रद्द करत आहोत तसेच आपली सर्व रक्कम पूर्णपणे परत केली जाईल.” असा संदेश पाठवावा असे सांगण्यात आले आहे.

 

देशात रेल्वे सुरु झाल्या तरी महाराष्ट्रात त्या इतक्यात सुरु होणार नाहीत. आणि जोपर्यंत पुढील आदेश येणार नाहीत तोपर्यंत महाराष्ट्रात आंतरराज्य रेल्वे बुकिंग साठी परवानगी दिली जाणार नाही. संबंधित बाबींना लक्षात घेऊन आवश्यक सूचना दिल्या जातील.असे या पत्रात म्हंटले आहे. या आदेशामुळे आता प्रवाशांना पुढच्या सूचना येईपर्यंत वाट बघावी लागणार आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.