Saturday, December 27, 2025
Home Blog Page 5769

जवळपास ठरलं! आता ‘या’ कालावधीत होणार IPL स्पर्धा

मुंबई । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनिश्चित काळाकरीता स्थगित करण्यात आलेली आयपीएल स्पर्धा नेमकी कधी हा प्रश्न प्रत्येक क्रिकेट रसिकाच्या मनात आहे. मात्र, चाहत्यांच्या या प्रश्न उत्तर जवळपास मिळालं आहे. कारण आयपीएल येत्या काही महिन्यांमध्ये सुरु होऊ शकते. भारतामध्ये चौथ्या लॉकडाऊनमध्ये क्रीडा क्षेत्राला दिलासा मिळेल, असे म्हटले गेले होते. त्यानंतर आता बीसीसीआयटने कंबर कसली आहे आणि आयपीएल भरवण्यासाठी त्यांनी काही ठोस पावले उचलली आहे. आयपीएलच्या तारखाही जाहीर केल्याचे म्हटले जात आहे. त्याचबरोबर बीसीसीआयच्या अपेक्स कौन्सिलच्या सदस्यांनेही आयपीएल कोणत्या कालावधीत होऊ शकते, याबाबत भाष्य केले आहे. टाइम्स ऑफ इंडियाने याबाबत वृत्त दिलं आहे.

भारताचे माजी क्रिकेटपटू, प्रशिक्षक आणि विद्यमान अपेक्स कौन्सिलचे सदस्य अंशुमन गायकवाड यांनी याबाबत आज काही महत्वाचे वक्तव्य केलं असल्याचे टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तात म्हटलं आहे. आयपीएलसाठी कोणता कालावधी हा चांगला असेल, याबाबत त्यांनी भाष्य केले आहे. अंशुमन गायकवाड म्हणाले की, ” यावर्षी ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धा होणार आहे. पण या स्पर्धेबाबत अजूनही संभ्रमाचे वातावरण आहे. ही स्पर्धा जर झाली नाही तर ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात आयपीएल खेळवले जाऊ शकते. पण त्यासाठी भारतामधील वातावरण नेमके कसे आहे, हे पहिल्यांदा पाहावे लागेल. भारतामध्ये क्रिकेट कधी सुरु होईल, हे कोणी सांगू शकत नाही. कदाचित या गोष्टीला दोन किंवा चार महिनेही लागू शकतात. भारतातील परिस्थितीवर ते अवलंबून असेल. पण जर स्पर्धा खेळवायची झाली तर त्यासाठी मानसीकरीत्या सक्षम असणे गरजेचे आहे.” असं अंशुमन गायकवाड यांनी सांगितलं दरम्यान, देशातील कोरोनाची परिस्थितीच आयपीएलचे भवितव्य ठरणार आहे.

दरम्यान, यंदाची आयपीएल ही २९ मार्च पासून सुरु होणार होती. पण लॉकडाऊन सुरु झाल्यामुळे ती पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर १५ एप्रिलला बीसीसीआयने आयपीएल अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली होती. पण आयपीएलचे आयोजन करण्याबाबत आता विचार सुरु झाला आहे. त्यानुसार ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात आयपीएल खेळवले जाऊ शकते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

हे आता जास्त होतंय! ६ फूटांच्या सोशल डिस्टेंसिंगवरही कोरोनाची बाधा होऊ शकते

लंडन । कोरोना विषाणूनं संपूर्ण जगात नुसता हैदोस घातला आहे. हैदोस पण असा कि, सायलेंट किलर सारखा. थो थोडीशी चूक आणि काही अवधीत शांततेत अनेक जीव मरणाच्या हवाली. या कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी त्याला काबूत करण्यासाठी अनेक खबरादारीचे उपाय संशोधकांनी सुचवले. त्याचा अवलंब सुद्धा लोक करताना दिसत आहेत. मात्र, कोरोना साथीचा प्रकोप जसं जसा आणखी वाढत आहे त्याच्याविषयी अनेक आश्चर्यकारक संशोधन रोज समोर येत आहे. असेच एक संशोधन सोशल डिस्टेंसिंगबाबत समोर आलं आहे. सार्वजनिक ठिकाणी कोरोनापासून बचावासाठी लोक सोशल डिस्टेंसिंगचे कटाक्षानं पालन करत आहेत मात्र, त्यातही कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका आहे असं एका संशोधन अभ्यासातून समोर आलं आहे.

या अभ्यासानुसार, हवेत एका हलक्या खोकल्यामुळे येणारी लाळेतील कण १८ फूटांपर्यंत पसरू शकतात. सायप्रस येथील निकोसिया विद्यापीठाच्या संशोधकांनी सांगितले की, प्रतितास चार किमी वेगाने वाहणाऱ्या हवेतून खोकल्यानंतर तोंडावाटे येणाऱ्या लाळेतील कण ५ सेकंदात १८ फूट दूरपर्यंत फैलावू शकतात. त्यामुळं सोशल डिस्टेंसिंग पाळताना ६ फुट अंतर ठेवावे असं सुचवलं जात असताना सदर अभ्यासानुसार ६ फूटांच्या सोशल डिस्टेंसिंगवरही करोनाची बाधा होण्याचा धोका कायम असल्याचं अभ्यासात म्हटलं आहे.

या संशोधनातील सह-संशोधक दिमित्री द्रिकाकिस यांनी सांगितले की, खोकल्यातून येणाऱ्या लाळेमुळे वयस्कर आणि लहान मुलांना धोका संभवू शकतो. वैज्ञानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, लाळेच्या सुक्ष्म कणांमुळे लहान उंचीचे वयस्कर व्यक्ती आणि लहान मुलांना धोका संभवतो. हे संशोधन जर्नल फिजिक्स ऑफ फ्लुइडमध्ये प्रकाशित झाले आहे.दरम्यान, जगभरातील शास्त्रज्ञ करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लस विकसित करण्याचा प्रयत्न करत आहेत. अनेक देशांमध्ये करोनाच्या लसीवर संशोधन सुरू असताना करोनाला अटकाव करणारे औषध विकसित केले असल्याचा दावा चीनच्या शास्त्रज्ञांनी केला आहे. चीनमधील प्रतिष्ठित पेकिंग विद्यापीठाच्या वैज्ञानिकांनी हा दावा केला आहे. या औषधाने करोनाबाधिताच्या प्रकृती फक्त सुधारणा होणार नसून काही वेळेसाठी रोगप्रतिकार शक्ती वाढणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. हा प्रयोग करोनाबाधित उंदरांवर यशस्वी झाला असल्याची माहिती देण्यात आली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

कराड तालुक्यात एकाच दिवशी तब्बल २३ जणांची कोरोनावर मात

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

कोरोनाचा हॉटस्पॉट बनलेल्या कराड तालुक्यात आज तब्बल २३ जणांनी कोरोनावर मात केली आहे. एकाच दिवशी तालुक्यातील एकूण २३ जण कोरोनातून मुक्त झाले असून त्यांना दवाखान्यातून डिस्चार्ज आहे अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक आमोद गडीकर यांनी दिली आहे.

एकाच दिवसात एवढ्या मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण बरे झाले असल्याने कराडकरांना दिलासादायक मिळाला आहे. कराडच्या कृष्णा हॉस्पिटल मधुन यशस्वी उपचार घेऊन २० जण व सह्याद्री हॉस्पिटल मधुन ३ जण कोरोनामुक्त झाले आहेत. या २३ जणांचे १४ दिवसांनंतर चे दोन्ही रिपोर्ट निगेटिव्ह आले असल्याची माहिती मिळाली आहे.

आज कृष्णा मेडीकल कॉलेज कराड येथे उपचार घेत असलेले, कराड तालुक्यातील वनमासमाची येथील 7, साकुर्डी येथील 2, आगाशिवनगर येथील 4, उंब्रज येथील 1, गोटे येथील 1, बनवडी येथील 1, गमेवाडी येथील 1, तांबवे येथील 1, मलकापूर येथील 1 व साताऱ्यातील शाहूपुरी येथील 1 असे एकूण 20 कोरोनाबाधित रुग्णांचे 14 दिवसानंतरचे दोन्ही नमुने निगेटिव्ह आल्याने त्यांना आज घरी सोडण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.

दरम्यान, आजपर्यंत कराड तालुक्यात एकूण ८२ कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत तर 2 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच कराड पाटण तालुक्यात सद्यस्थितीत एकुण १०९ कोरोनाबाधित रुग्ण आहेत. कराड मध्ये आता 26 कोरोना अॅकटिव पेशंटवर उपचार सुरु आहे.

Satara

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

कोरोना संकटात भाजप आंदोलनाच्या मूडमध्ये; ‘महाराष्ट्र बचाव’ म्हणतं करणार सरकारचा निषेध

संग्रहित छायाचित्र

मुंबई । कोरोनाचं संकट रोखण्यात राज्यातील उद्धव ठाकरे सरकारला अपयश आल्याचं सांगत भाजपने आता राज्य सरकारविरोधात आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. येत्या २२ तारखेला ठाकरे सरकारविरोधात हल्लाबोल करणार आहे. ‘माझं अंगण रणांगण’, ‘महाराष्ट्र बचाव’ आंदोलना अंतर्गत घराच्या अंगणात उभं राहून काळ्या फिती, रिबन लावून, काळे झेंडे उंचावून अथवा काळे फलक हातात घेऊन ठाकरे सरकारचा निषेध नोंदवा, असं आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एका व्हिडिओ संदेशाच्या माध्यामातून ही घोषणा केली आहे.

करोनाविरुद्धच्या लढ्यात राज्यातील महाविकास आघाडी सरकार पूर्णपणे अपयशी ठरलं आहे. त्यामुळे या सरकारला जागे करून प्रभावी काम करण्यास भाग पाडण्यासाठी भाजपाने महाराष्ट्र बचाव आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाचा दुसरा टप्पा म्हणून शुक्रवार २२ मे रोजी सकाळी ११ ते दुपारी १२ वाजेपर्यंत घराच्याबाहेर उभं राहून काळ्या फिती, काळे झेंडे, रिबन आणि फलक उंचावून सरकारचा निषेध नोंदवा, असं आवाहन पाटील यांनी केलं.

घराच्याबाहेर उभं राहून हा निषेध नोंदवताना सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं काटेकोरपणे पालन करा, असंही त्यांनी सांगितलं. तसेच केंद्राकडून आर्थिक पॅकेज मागणाऱ्यांनी राज्यातील जनतेसाठी अद्याप कोणतंही पॅकेज जाहीर केलं नाही, असा चिमटाही त्यांनी काढला. कोरोनाच संकट मोठं आहे म्हणून सहकार्य करा, असं सरकारकडून वारंवार सांगितलं जात होतं. त्यामुळे आम्ही आणि सामान्य जनतेनेही सहकार्य केलं. पण आता लोकांच्या मनातील राग अधिक काळ लपवून राहू शकत नाही, असं सांगतानाच ठाकरे सरकारचं अपयश आणि करोनाचा वाढता प्रादुर्भाव या पार्श्वभूमीवर आम्ही राज्यातील सर्व तहसीलदार आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदने दिले आहेत, असं पाटील यांनी सांगितलं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

या फलंदाजाला मानले जात होते सेहवागचा उत्तराधिकारी, मात्र ‘या’ छोट्याशा चुकीमुळे खराब झाली कारकीर्द

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सेहवागसारखीच आक्रमक वृत्ती, पहिल्याच चेंडूपासून प्रतिस्पर्धी गोलंदाजांवर तुटून पडणे या गुणांमुळे कर्नाटकचा फलंदाज रॉबिन उथप्पा त्याच्या उत्तम फलंदाजीसाठी प्रसिद्ध होता. उथप्पाकडे फलंदाजीचे चांगले तंत्र आणि टॅलेंटही होते. मात्र एक दिवस अचानक तो टीम इंडियामधून बाहेर फेकला गेला आणि त्यानंतर तो परत येऊ शकला नाही. त्याने नुकतेच एक मोठे विधान केले होते. ज्यामध्ये त्याने सांगितले की,’ वयाच्या २५ व्या वर्षी त्याच्याकडून एक अशी चूक झाली कि त्यामुळे त्याची आंतरराष्ट्रीय कारकीर्दच बिघडली.’

माजी भारतीय सलामीवीर असलेल्या रॉबिन उथप्पाला असे वाटते की,’ वयाच्या २५ व्या वर्षी कसोटी क्रिकेट खेळण्याच्या महत्वाकांक्षेमुळे त्याने फलंदाजीचे तंत्र बदलण्यात चूक केली. उथप्पा आता ३४ वर्षांचा आहे आणि त्याने २०१५ मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध भारतासाठी शेवटचा सामना खेळला होता. राजस्थान रॉयल्सच्या पॉडकास्ट सत्रादरम्यान तो म्हणाला की, ‘माझे सर्वात मोठे लक्ष्य भारताकडून कसोटी क्रिकेट खेळणे हे होते. वयाच्या २०-२१ व्या वर्षी मी हा प्रयत्न केला असता तर मी कसोटी क्रिकेट खेळू शकलो असतो. माझ्या कारकिर्दीच्या शेवटी मला याबद्दल खेद करायचा नव्हता आणि मी नेहमीच सर्वोत्कृष्ट कामगिरी करण्याचा प्रयत्न केला.’

उथप्पाने प्रवीण आम्रे यांच्या मदतीने त्याच्या फलंदाजीच्या तंत्रात काहीसे बदल केले, ज्यामुळे त्याचा मुळातच आक्रमक असलेला खेळ बदलला. तो म्हणाला, ‘ मी तांत्रिक दृष्ट्या उत्तम फलंदाज बनून दीर्घकाळ क्रीजवर खेळू शकण्यासाठी वयाच्या २५ व्या वर्षी प्रवीण आम्रे यांच्या देखरेखीखाली माझे फलंदाजीचे तंत्र बदलण्याचे ठरविले. या प्रक्रियेत, मी माझ्या फलंदाजीतली आक्रमकता गमावली. उथप्पाने भारताकडून ४६ एकदिवसीय सामने आणि १३ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. तो म्हणाला,, ‘मला वाटायचे की भारताकडून कसोटी क्रिकेट खेळण्यासाठी मला मला माझ्या फलंदाजीच्या तंत्रात बदल केला पाहिजे. मला वाटते की मी चुकीच्या वयात ते करण्याचा प्रयत्न केला. ज्याचा परिणाम माझ्या कारकिर्दीवर झाला. ‘

२००७ मध्ये खेळला गेलेला टी -२० विश्वचषक असो वा २००८ मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये खेळलेला सीबी मालिका असो, रॉबिन उथप्पाने दोन्ही वेळेस टीम इंडियाला महत्त्वपूर्ण सामने जिंकून देण्यात मोलाचा वाटा उचलला. मात्र, इथून पुढे उथप्पाला त्याच्या प्रतिभेनुसार चांगले प्रदर्शन करता आले नाही. त्याने ४६ एकदिवसीय सामन्यात २५.९९ च्या सरासरीने ९३४ धावा केल्या, तर १३ टी -२० सामन्यात त्याने २४.९० च्या सरासरीने २४९ धावा फटकावल्या. आपल्या या छोट्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत त्याला एकही शतक झळकावता आलेले नाही. त्याने एकूण ७ अर्धशतक केली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

OLAच्या हजारो कर्मचाऱ्यांवर येऊ शकते घरी बसण्याची वेळ; कंपनी घेऊ शकते ‘हा’ निर्णय

नवी दिल्ली । कोरोना व्हायरसमुळे तयार झालेल्या परिस्थितीमुळं बऱ्याच व्यवसाय क्षेत्रांसमोर आर्थिक आव्हानांचा डोंगर उभा राहिला आहे. अशातच आपला व्यवसायाची विस्कटलेली आर्थिक गणित जुळवताना अनेक व्यवसाय कंपन्या कठोर निर्णय घेण्याच्या विचारात आहेत. या कठोर निर्णयात कर्मचारी कपात हा एक मोठा निर्णयही आहे. ज्याचा फटका सध्याच्या घडीला कॅब (टॅक्सी) सेवा पुरवणाऱ्या OLA या कंपनीतील कर्मचाऱ्यांना बसणार असल्याची चिन्हं आहेत. UBER कडून आर्थिक संकटाच्या या काळात जवळपास ६ हजार कर्मचाऱ्यांची कपात करण्यात आल्यानंतर अवघ्या काही कालावधीतच OLA मधील कर्मचारी कपातीचं वृत्त समोर आलं आहे.

OLA चे मुख्य कार्यकारी अधिकारी भविश अग्रवाल यांनी एका पत्रकाच्या माध्यमातून याविषयीची माहिती दिली आहे. या पत्रकात कंपनीच्या सेवेत असणाऱ्या जवळपास १ हजार ४०० कर्मचाऱ्यांना नोकरीला मुकावं लागणार आहे. कोरोनाच्या प्रादुर्वभावाचा थेट परिणाम OLA च्या कमाईवर आणि एकंदरच आर्थिक गणितावरही झाला आहे. मागील २ महिन्यांमध्ये आपल्या कंपनीच्या नफ्याचा दर हा थेट ९५ टक्क्यांनी खाली आला आहे.

मुख्य म्हणजे भारतासह संपूर्ण जगातच या संकटानं कोट्यवधी लोकांचं आयुष्य, त्यांच्या कुटुंबाचं आयुष्य पूर्ण बदललं आहे’, असं अग्रवाल म्हणाले. OLAवर दिसून येणारे याचे परिणाम हे प्रदीर्घ काळासाठी असतील याचे संकेतही त्यांनी दिले. कोरोनापूर्वीचा काळ इतक्या सहज परत येईल अशी काही चिन्ह दिसत नाहीत. सोशल डिस्टन्सिंग, अस्वस्थता आणि अती काळजी हे अनेकांच्याच जगण्याचे निकष झालेले असतील, असंही त्यांनी पत्रकात लिहिलं आहे. कामावरुन नाईलाजास्तव कमी करण्यात येणाऱ्या कर्मचाऱ्यांना ३ महिन्यांचा पगार आणि नोटीस पिरियड काळातील पगारही देण्यात येणार असून, या काळात कंपनी संशोधन आणि विकासाच्या घटकांमध्ये अधिक गुंतवणूक करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

अखेर ६० दिवसांनंतर सलमानने घेतली आई वडिलांची भेट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लॉकडाऊनच्या या दिवसांमध्ये, प्रत्येक व्यक्ती त्यांच्या घरातच कैद आहे. कोरोनाव्हायरसचा वाढता धोका लक्षात घेता सरकारने लॉकडाऊन निर्णय घेतला आहे. परंतु असेही काही लोक आहेत जे आपल्या घरापासून आणि कुटुंबापासून दूर आहेत. यामध्ये अभिनेता सलमान खान देखील आहे जो आपल्या आईवडिलांपासून दूर पनवेलमधील आपल्या फार्म हाऊसमध्ये राहतो आहे. सुमारे ६० दिवसानंतर, सलमान खानने अलीकडेच वडील सलीम खान आणि आई सल्मा यांची भेट घेतली.

गेल्या कित्येक दिवसांपासून सलमान खान आपले वडील सलीम खान यांची आठवण करीत होता. स्पॉटबॉयच्या अहवालानुसार सलमान खान मंगळवारी वांद्रे येथील त्यांच्या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये आला. येथे आल्यानंतर त्याने आपले वडील सलीम खान आणि आई सल्मा यांच्याबरोबर थोडा वेळ घालवला, त्यांच्याशी गप्पा मारल्या, येथील परिस्थितीची माहिती घेतली आणि मग तो पनवेलमधल्या आपल्या फार्म हाऊसमध्ये परत आला. यासाठी त्याने प्रशासनाकडून खास परवानगी घेतली होती आणि यावेळी त्यांनी सोशल डिस्टंन्सिंग देखील राखले.

Salman Khan singing with father Salim Khan is the latest viral ...

सलमान खानने नुकतेच आपले वडील एकटे असल्याने आपल्याला त्यांच्या प्रकृतीविषयी चिंता वाटत असल्याचे सांगितले होते. सलमान गेले काही दिवस पनवेल येथील आपल्या फार्म हाऊसमध्येच थांबला आहे. येथे त्याच्यासोबत त्याची बहीण अर्पिता, तिचा नवरा आयुष शर्मा आणि त्यांची मुलेही आहेत. सलमानचे काही जवळचे मित्रही या फार्म हाऊसमध्ये त्याच्या बरोबर राहत आहेत.

यामध्ये जॅकलिन फर्नांडिज, युलिया वंतूर, पुतण्या निर्वाणा खान आदींचा समावेश आहे. लॉकडाउन सुरु होण्यापूर्वी सलमान काही कामानिमित्त आपल्या फार्म हाऊसमध्ये आला होता. मात्र देशभरात लॉकडाऊन जाहीर झाल्यमुळे तो तिथेच अडकला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

धक्कादायक! मुंबईवरून पायी गावी निघालेल्या अल्पवयीन मुलीचे वाटेतच अपहरण

जळगाव । कोरोनाच्या पार्शवभूमीवर शहरात हाताला काम नसल्याने मुंबईहून अकोल्याकडे पायी निघालेल्या कुटुंबातील अल्पवयीन मुलीला लिफ्ट देण्याचा बहाणा करुन अपहरण केल्याची धक्कादायक घटना जळगाव जिल्ह्यात घडली आहे. या घटनेत अज्ञात तरुणाच्या विरोधात भुसावळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आता अपहरण केलेल्या मुलीचा आणि तिला पळवून नेणाऱ्या तरुणाचा शोध घेत आहेत.

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, मुंबईतील मुलुंड परिसरात मजुरी करुन आपला उदरनिर्वाह करणारे एक कुटुंब कधी पायी तर कधी मिळेल त्या वाहनाने अकोल्याकडे निघाले होते. दरम्यान, पायी जात असलेल्या या कुटुंबाला नशिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका दुचाकीस्वार तरुणाने लिफ्ट देण्याची तयारी दाखवली होती. ऐन दुपारच्या उन्हाची वेळ असल्याने संबंधित कुटुंबातील १७ वर्षांचा मुलगा आणि १३ वर्षीय मुलगी दुचाकीवर बसून पुढच्या प्रवासाला निघाली होती. काही किलोमीटर अंतरावर गेल्यावर तरुणाने मुलीच्या भावास पुढे पोलीस असल्याचा बहाणा करुन उतरण्यास सांगितले. त्यानंतर पोलिसांची गाडी गेल्यावर पुन्हा गाडीवर बसून जाऊ, आम्ही पुढे थांबतो, असे सांगितले.

पीडित अल्पवयीन मुलीच्या भावाने यावर विश्वास ठेवला आणि तो गाडीवरुन उतरुन पायी चालू लागला. मात्र बरंच अंतर पुढे गेल्यावरही आपली बहीण आणि लिफ्ट देणारा तरुण न दिसल्याने भाऊ काळजीत पडला. त्यानंतर याची माहिती त्याने आपल्या आई-वडिलांना सांगितली. घटनेचे गांभीर्य ओळखून कुटुंबाने संबंधित तरुणाविरोधात भुसावळ पोलीस ठाण्यात तक्रार केली. यानंतर पोलिसांनी अज्ञात तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या मुलीचा कसून शोध घेत आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

भारत-नेपाळ सीमावादात अभिनेत्री मनीषा कोईरालाने घेतली उडी; केलं ‘या’ देशाचं समर्थन

मुंबई । भारताने लिपूलेख पासपर्यंत बांधलेल्या मार्गावर नेपाळने आक्षेप घेतला आहे. भारतीय हद्दीतील कालापानी-लिंपियाधुरा-लिपुलेख या प्रदेशावर नेपाळने आपला दावा केला आहे. मागील काही दिवसापासून नेपाळ या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेत आहे. हे प्रदेश कोणत्याही परिस्थितीत नेपाळच्या नकाशामध्ये परत आणले जातील, अशा इशारा नेपाळचे पंतप्रधान के.पी.शर्मा ओली यांनी भारताला दिला. या सर्व वादावरून तणाव वाढून भारत नेपाळ आमनेसामने आले आहेत. अशावेळी या वादात अभिनेत्री मनिषा कोईराला हिनं उडी घेतली आहे. या दोन देशांच्या वादात तिनं नेपाळच्या या निर्णयाचं समर्थन केलं आहे.

मनिषा काईराला हिनं नेपाळ सरकारला धन्यवाद दिले. तसंच भारत, नेपाळ आणि चीन या तिन्ही महान देशांमध्ये मी शांतीपूर्ण आणि सन्मानजनक चर्चेची अपेक्षा करत असल्याचंही तिनं म्हटलं. तिनं यासंदर्भात एक ट्विट केलं आहे. सविस्तर माहितीनुसार नेपाळचे परराष्ट्रमंत्री प्रदीप ग्यावली यांनी यासंदर्भात एक ट्विट केलं होतं. यात मंत्रिमंडळानं नवा नकाशा जारी करण्यास मान्यता दिल्याचं म्हटलं होत.

यामध्ये ७ प्रांत. ७७ जिल्हे आणि लिपियाधुरा, लिपुलेख आणि कालापानीसह ७५३ स्थानिक प्रशासनिक मंडळंही दाखवण्यात येणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. अधिकृत नकाशा लवकरच मिनिस्ट्री ऑफ लँड मॅनेजमेंटद्वारे जारी करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं होती. प्रदीप ग्यावली यांच्या याच ट्विटवर रिप्लाय करत मनिषा कोईरालानं आपलं मत मांडलं आहे. मनीषा कोईराला मूळची नेपाळची असून बॉलीवूड सिनेमामांमध्ये काम करून तिनं लोकप्रियता मिळवली. मनीषा नेपाळच्या राजकारणात सक्रिय असणाऱ्या कोईराला कुटूंबातून येते. मनीषाचे आजोबा बिश्वेश्वर प्रसाद कोईराला नेपाळचे माजी पंतप्रधान आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

शाहिद कपूरची आई नीलिमा अजीमने ‘या’ कारणामुळे घेतला पंकज कपूरबरोबर घटस्फोट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शाहिद कपूरची आई नीलिमा अजीम ही अभिनेता पंकज कपूरची माजी पत्नी आहे. या दोघांच्या घटस्फोटाच्या अनेक वर्षानंतर आता नीलिमाने याविषयी उघडपणे सांगितले आहे. एका मुलाखतीत नीलिमा यांनी हे उघड केले की,” वेगळे होण्याचा निर्णय हा माझा नव्हता, ते खूप पुढे गेले होते. साडेतीन वर्षाचा असल्यापासून नीलिमाने शाहिद कपूरला एकटीनेच वाढविले ​​आहे.’

पिंकविलाला दिलेल्या आपल्या मुलाखतीत नीलिमा म्हणाली, “मी वेगळे होण्याचा निर्णय घेतला नव्हता. खरं हे आहे की ते खूप पुढे गेले होते, मला पोट भरणे देखील अवघड होते.” नीलिमा पुढे म्हणाली-“ जेव्हा संबंध तूटतात, ज्याला घटस्फोट म्हणतात, जे दोघांनाही त्रासदायक असते. होय, मैत्री आणि आसक्ती होती, पण मन दुखावले होते. आज ते आपल्या कुटूंबियांसह व्यवस्थित आहे आणि ते आनंदात रहावो अशी माझी इच्छा आहे. ”

नीलिमा म्हणाली की, तिचे मित्र आणि कुटूंबाच्या मदतीने ती यातून बाहेर पडू शकली. तिची सर्वात मोठी शक्ती शाहिद असल्याचे तिने सांगितले .

नीलिमा आणि पंकज यांनी १९७५ साली लग्न केले. पण लग्नाच्या काही वर्षानंतरच दोघे वेगळे झाले. नंतर सन १९८४ मध्ये पंकजने सुप्रिया पाठकशी लग्न केले. सुप्रिया आणि पंकज यांना सना कपूर आणि रुहान कपूर अशी दोन मुले आहेत. नीलिमाने १९९१ मध्ये राजेश खट्टरशी लग्न केले आणि दोघांना एक मुलगाही झाला ज्याला आपण ईशान खट्टर म्हणून ओळखतो. नीलिमा आणि राजेश खट्टर यांचे लग्नही फार काळ टिकले नाही. २००४ मध्ये नीलिमा यांनी रझा अली खानसोबत लग्न केले होते, हे लग्नही २००९ मध्ये तूटले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.