Saturday, December 27, 2025
Home Blog Page 5768

पती करत होता टिकटॉक बनवण्याचा हट्ट; पत्नीने मुलासोबत केली आत्महत्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथून एक वाईट बातमी समोर आली आहे. येथे सोशल मीडिया अ‍ॅ प टिकटॅकमुळे एका कुटुंबातील दोन व्यक्तींनी आपला जीव गमावला आहे. आई आणि मुलगा अशा या दोन मरण पावलेलय व्यक्ती आहेत. करीमा (वय ३५ वर्षे) असे मृत महिलेचे नाव आहे तर तिचा मुलगा हा अल्पवयीन होता.

सोमवारी रात्री करीमावर टिक-टॉक व्हिडिओ बनवण्यासाठी तिच्या पतीकडून दबाव टाकला जात होता. यामुळे तिने आत्महत्या केली असल्याचे सांगितलं जात आहे.आपल्या आईच्या मृत्यूची बातमी मुलाला सहन झाली नव्हती आणि सायनाईड पिऊन आपला जीव दिला. पोलिसांनी सांगितले की, महिलेच्या पतीला टिक-टॉक व्हिडिओ बनवण्याची सवय होती. लॉकडाऊनमुळे तिच्या नवऱ्याची नोकरी गेली होती, परंतु तरीही तो पत्नीला व्हिडिओ बनविण्यास सांगत होता. यामुळेच कंटाळून करीमाने आत्महत्या केली.

करीमाच्या नवऱ्याचे नाव समसूद्दीन होते. तो सोन्याच्या दागिन्यांवर सोन्याचे पाणी चढवण्याचे काम करीत असे. सध्या लॉकडाऊन सुरु असल्यामुळे तो घरीच बसुन होता. यावेळी तो आर्थिक संकटातूनही जात होता. काही दिवसांपूर्वीच त्यांनी कार अपघातामुळे ५ ते ६ लाखांचे कर्जही घेतले होते. असे असूनही तो आपल्या पत्नीबरोबर टिक-टॉक व्हिडिओ बनवण्यासाठी आग्रह धरत होता. यामुळे संतप्त होऊन त्याच्या पत्नीने सायनाईट पिऊन आपला जीव दिला.

काही दिवसांपूर्वीच कुटुंबीयांनी त्यांच्या मोठ्या मुलीचे लग्नही केले होते. त्या लग्नातही खूप पैसा खर्च झालेला होता. हे कुटुंब पूर्णपणे आर्थिक संकटात सापडले होते आणि अशा टिक-टॉक व्हिडिओ बनवण्याच्या बाबतीत नवऱ्याच्या बेजबाबदार वागण्याने पत्नीला सायनाइट पिण्यास भाग पाडले होते. आई मरत असल्याचे पाहून मुलानेही सायनाईड पिऊन जीव दिला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

अशा वेळी आंदोलनाचं खूळ डोक्यात आलं तरी कुणाच्या? अजित पवारांचा भाजपला सवाल

मुंबई । भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी पुकारलेले ‘काळे झेंडे’ आंदोलन हे अवेळी पुकारलेले, अनाकलनीय आंदोलन आहे. या आंदोलनातून महाराष्ट्राचं आणि भाजपचं काहीही भलं होणार नाही. राज्यातील प्रत्येक जण कोरोनाविरुद्धच्या लढाईत योगदान देत असताना अशा पद्धतीचं ‘काळं’ आंदोलन करण्याची कल्पना कुणाच्या डोक्यात कशी येऊ शकते, हा राज्याला पडलेला प्रश्न आहे, अशा शब्दांत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपच्या सरकार विरोधात आंदोलन करण्याच्या भूमिकेवर कडाडून टीका केली.

संपूर्ण महाराष्ट्र कोरोनाविरुद्धची लढाई एकजुटीनं लढत असताना अशा आंदोलनातून या लढाईत अडथळे निर्माण करण्याचा, महाराष्ट्राला कमकुवत करण्याचा प्रयत्न राज्यातील जनताच हाणून पाडेल, असा विश्वासही उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. स्वत:च्या घराच्या अंगणालाच ‘रणांगण’ बनवणं याला शहाणपण म्हणत नाही, असा टोला हाणतानाच आज महाराष्ट्रातील डॉक्टर, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफ, सफाई कर्मचारी, पोलिस, राज्याचा प्रत्येक नागरिक जोखीम पत्करुन कोरोनाविरुद्ध शर्थीनं लढत असताना त्यांच्या प्रयत्नांना ताकद देण्याऐवजी काळे झेंडे, काळे निषेध फलक फडकवून आंदोलन करणे हा समस्त करोना योद्ध्यांचा, महाराष्ट्रातील जनतेचा अपमान आहे, असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भाजपच्या आंदोलनाच्या भूमिकेवर ताशेरे ओढले.

दरम्यान, राज्य या आव्हानांचा यशस्वी सामना करत असताना भाजपने काळे झेंडे सारखे आंदोलन करून महाराष्ट्रातील कोरोना योद्ध्यांचा अपमान करू नका. कोरोनाविरुद्धच्या लढाईत अडथळे आणू नका. भाजपने काळे झेंडे आंदोलन मागे घेऊन कोरोनाविरुद्धच्या लढाईत सहभागी व्हा, महाराष्ट्राविरुद्धच्या कटाचा भाग बनण्याचं पाप माथी घेऊ नका, असं कळकळीच आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपला केले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

चिंताजनक ! परभणीची रेड झोनकडे वाटचाल ; एकाच दिवसात सापडले नऊ कोरोनाग्रस्त रुग्ण

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे

मागील चार दिवसांमध्ये सापडलेल्या कोरोना बाधित रुग्णांमूळे परभणी जिल्ह्याची वाटचाल वेगाने रेड झोनकडे होत आहे .आज आलेल्या स्वॅब अहवालातून नऊ जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाल्याने जिल्ह्याचा कोरणा बाधित रुग्ण संख्येचा आकडा दोन अंकी संख्येवर गेलाय . त्यामुळे जिल्हा वासियांची धडधड वाढलीय .जिंतूर तालुक्यातील शेवडी गावांमध्ये एकाच दिवशी तीन जणांना कोरोना बाधा झाल्यानंतर आता सतत चौथ्या दिवशी हा आकडा वाढत चालला असून परभणी जिल्ह्यात तब्बल सोळा जण कोरोनाग्रस्त असल्याचे निष्पन्न झाले आहे.

सोमवारी मुंबई येथून आलेली सोनपेठ तालुक्यातील शेळगाव ची महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली होती .त्यानंतर साकला भाग प्लॉटमध्ये पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला होता .आज आलेल्या अहवालामध्ये जिल्ह्यातील नवीन नऊ कोरोनाग्रस्त रुग्ण पॉझिटिव्ह निष्पन्न झाले आहेत. त्यामध्ये शेळगाव येथील महिलेच्या संपर्कात आलेल्या सहा जणांना कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

पूर्णा तालुक्यामध्ये आज पहिल्यांदाच कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे तर गंगाखेडमध्ये दोन पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे सहाजिकच जिल्हा वासियांची धडधड वाढली आहे. विशेष म्हणजे सापडलेली ही सर्व रुग्ण पुणे व मुंबई या रेड झोनमधुन आलेले आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

अमेरिकेत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असणे ही तर अभिमानाची गोष्ट – डोनाल्ड ट्रम्प

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतेच असे म्हटले आहे की,’ अमेरिकेत सर्वाधिक कोरोना विषाणूचा संसर्ग होणे हा एक प्रकारचा बहुमानच आहे’. मंगळवारी व्हाईट हाऊसमध्ये झालेल्या एक कार्यक्रमात ते म्हणाले, ‘जेव्हा आपण असे म्हणता की,’ आम्ही संसर्गाच्या बाबतीत पुढे आहोत, तेव्हा मला यात हरकत वाटत नाही. म्हणजेच याचा अर्थ असा की, आम्ही इतरांपेक्षा जास्त चाचण्या घेतल्या आहेत. ही एक चांगली गोष्ट आहे, कारण हे दाखवते की आमची चाचणी ही इतरांपेक्षा अधिक चांगली आहे. मला तर हा एक प्रकारचा सन्मानच वाटतो.’ अमेरिकेत आतापर्यंत १५ लाख ७० हजारांहून अधिक कोरोना संसर्गाची प्रकरणे नोंदवली गेली आहेत तसेच येथे ९३ हजारांहून अधिक मृत्यू देखील झालेले आहेत.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या या विधानावर अमेरिकेतील विरोधी डेमोक्रॅटिक पक्षाने टीका केली आहे. डेमोक्रॅटिक पक्षाच्या नॅशनल कमिटीने यावर उत्तर देताना म्हटले आहे की, “देशात कोरोना विषाणूची १० लाखाहून अधिक प्रकरणे होणे हे आपल्या देशातील नेतृत्वाचे पूर्णपणे अपयश आहे.” गेल्याच आठवड्यात सिनेटच्या बैठकीत, सत्ताधारी रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांनी कोरोनाच्या कमी पडलेल्या चाचणीवरही प्रश्न उपस्थित केले होते. रिपब्लिकनचे खासदार मिट रोमनी म्हणाले की,’ अमेरिकेचा चाचण्या घेण्याचा रेकॉर्ड तितकासा चांगला नाही आहे. इथे फेब्रुवारी मार्चपासून संसर्गाची प्रकरणे समोर येऊ लागली तसेच आतापर्यंत इथे पुरेश्या चाचण्याही झालेल्या नाहीत.’

ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांच्या मते, प्रत्येक एक हजार लोकांच्या चाचणी घेण्याच्या बाबतीत अमेरिका १६ व्या स्थानावर आहे. या यादीमध्ये तो आईसलँड, न्यूझीलंड, रशिया आणि कॅनडा सारख्या देशांच्याही मागे आहे. अमेरिका दररोज तीन ते चार लाख लोकांची तपासणी करीत आहे. हार्वर्ड ग्लोबल हेल्थ इन्स्टिट्यूटच्या म्हणण्यानुसार जर आपली अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आणायची असेल तर आपल्याला दररोज किमान ५ लाख चाचण्या घेण्याची आवश्यकता आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

गुड न्यूज! येत्या 25 मेपासून देशांतर्गत विमान वाहतूक सुरु होणार

नवी दिल्ली । कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत देशांतर्गत विमान वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली. त्यांनतर वाढत्या लॉकडाऊनच्या कालावधीमुळं गेल्या ५० दिवसांपेक्षा जास्त काळापासून भारतातील हवाई सेवा बंद आहे. दरम्यान, लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात एकीकडे रेल्वे सेवा हळूहळू पूर्वपदावर आणत असताना केंद्रानं हवाई सेवेचा मार्ग सुद्धा मोकळा झाला आहे. येत्या 25 मेपासून सुरु होणार आहे, अशी माहिती हवाई वाहतूकमंत्री हरदीप पुरी यांनी ट्विटरवरून दिली आहे. त्यासाठी सर्व विमानतळे सज्ज ठेवण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत.

देशांतर्गत प्रवासी विमान वाहतूक सुरु झाल्यानं देशातील विविध भागात अडकलेल्या नागरिकांना याचा फायदा होणार आहे. देशभरात येत्या 31 मे पर्यंत लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. मात्र या दरम्यान देशांर्गत हवाई वाहतूक सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. यासंदर्भात हवाई वाहतूकमंत्री हरदीपसिंह पुरी यांनी ट्वीट करुन सांगितलं की, 25 मे पासून देशांर्तग हवाई वाहतूक सुरु केली जाणार आहे. सर्व विमानतळांना 25 मे पासून सेवा देण्यास सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, देशांतर्गत प्रवासी विमान वाहतूक बंद असल्यानं विमान कंपन्यांना मोठं नुकसान होत आहे. अशावेळी पुन्हा हवाई वाहतूक सुरु करण्याची परवानगी मिळाल्यानं विमान कंपन्यांना दिलासा मिळाला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

सोने चांदीच्या किंमतीत आज पुन्हा बदल; जाणून घ्या आजचे भाव

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मंगळवारी झालेल्या घसरणीनंतर आज पुन्हा एकदा सोन्याच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे. बुधवारी सकाळी २४ कॅरेट सोने हे पुन्हा महाग झाले. आता, १० ग्रॅम सोन्याच्या ९९९ साठी आपल्याला ४७३५६ रुपये मोजावे लागतील. यापूर्वी मंगळवारी सोन्याच्या किंमतीत जोरदार घसरण झाली होती. सोन्याचा भाव सुमारे ४८,००० रुपयांवरून ४६९६६ रुपयांवर आला होता. त्याच वेळी, चांदीही पुन्हा एकदा तेजीचे आली आहे. सकाळच्या व्यापारात चांदीचा दर प्रति किलो १५१५ रुपयांनी वाढला आहे. इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनची वेबसाइट (ibjarates.com) त्यांची सरासरी किंमत अपडेट करत असते. ibjarates च्या मते, 20 मे 2020 रोजी सोने आणि चांदीचे दर खालीलप्रमाणे आहेत.

धातू मे 20 सकाळ दर (रुपये / 10 ग्रॅम) दर मे 19 दर (रुपये / 10 ग्राम) दर बदल (रुपये / 10 ग्रॅम)
सोने 999              47356                                       46829                              527
सोने 995              47166                                       46641                              525
सोने 916              43378                                       42895                              483
सोने 750              35517                                       35122                              395
सोने 585              27703                                       27395                              308
चांदी 999             48315 रुपये / किलो                    46800  रुपये / किलो         1515 रुपये / किलो

इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन, दिल्लीचे मीडिया प्रभारी राजेश खोसला यांनी दिलेल्या माहितीनुसार, इब्जा देशभरातील १४ केंद्रांकडून सोन्या-चांदीची सरासरी किंमत दर्शविते. खोसला म्हणतात की सध्याचा सोने-चांदीचा करेंट रेट किंवा स्पॉट किंमत ही वेगवेगळ्या ठिकाणी वेगळी असू शकते, परंतु त्यांच्या किंमतींमध्ये अगदी थोडाच फरक असतो.

गेल्या दहा दिवसांत सोन्याच्या दराने प्रति १० ग्रॅम ४५७४३ रुपयांवरून उडी घेऊन ४८,००० रुपये झाला आणि त्यायानंतर एकाच दिवसाने एक हजाराहून अधिकचा तोटा होऊन ते ४६,९६६ पर्यंत पोहोचले. ५ मे २०२० रोजी २४ कॅरेट सोन्याचे मूल्य हे प्रति १० ग्रॅम ४५७४३ रुपये होते. त्यानंतर ते ८ मे रोजी ४६२२१ वर पोचले, परंतु १४ मेपासून यास गती मिळाली.

या दिवशी तो ४६२४६ वर पोहोचला, दुसर्‍या दिवशी त्याने ४६,७९१ रुपयांपर्यंत वाढून एक नवीन विक्रम रचला आणि १८ मे रोजीचा दर प्रति १० ग्रॅम ४७९४८ रुपयांच्या उंचीवर पोहोचला, परंतु दुसर्‍याच दिवशी सोने ४६,९६६ रुपयांवर घसरले आणि आज म्हणजेच २० मे रोजी सोने पुन्हा एकदा ५२७ रुपयांनी वाढून ४७३६५ रुपये प्रति १० ग्रॅम झाले आहे.

स्पॉट डिमांडमुळे सोन्याचे वायदा वाढले
बुधवारी जोरदार मागणीमुळे सोन्याचे भाव वायद्याच्या व्यापारात २२० रुपयांनी वाढून ४७,२७० रुपयांवर गेले. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (एमसीएक्स) मध्ये जूनसाठी सोन्याचा करार २२० रुपये किंवा ०.४७ टक्क्यांनी वाढून ४७,४७० रुपये प्रति १० ग्रॅम झाला. या दराने, आज ११,४२० लॉटमध्ये व्यापार झाला . ऑगस्टच्या सुवर्ण दरात १९७ रुपये किंवा ०.४२ टक्क्यांनी वाढ होऊन १००७१लॉटमध्ये व्यापार झाला. जागतिक पातळीवर न्यूयॉर्कमध्ये सोन्याचे भाव ०.४२ टक्क्यांनी वधारून ते १,७५३ डॉलर प्रति औंस झाले.

लॉकडाउनमध्ये अनेक रेकॉर्ड बनले आणि मोडले
९ एप्रिल रोजी पहिल्यांदाच सोन्याचा भाव ४५,२०१ रुपयांच्या नवीन उंचीवर पोहोचला. याच्या चारच दिवसांनंतर हा विक्रम मोडला गेला आणि १३ एप्रिल रोजी सोन्याचे दर दहा ग्रॅम ४६,०३४ रुपयांवर पोहोचले. सोन्याने या दिवशी नवीन विक्रम स्थापित केला, मात्र १५ एप्रिल रोजी तो कोसळला. सोन्याने प्रति १० ग्रॅम ४६,५३४ रुपयांची नवीन शिखरे गाठली. या विक्रमांना याच्या दुसर्‍याच दिवशी १६ एप्रिलला ब्रेक लागला आणि १० ग्रॅम सोन्याची किंमत ४६,९२८ रुपये झाली होती. यानंतर १५ मे रोजी सोन्याने ४७०६७ रुपयांवर पोहोचून आणखी एक नवा विक्रम केला. १८ मे रोजीही हा विक्रम मोडला गेला ज्यावेळी सोने ४७,८६१ रुपयांवर पोहोचले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

हवं तर काँग्रेसनं पाठवलेल्या बसेसला भाजपचे झेंडे लावा, पण मजुरांसाठी ‘त्या’ बस सोडा

नवी दिल्ली । उत्तर प्रदेशात सध्या स्थलांतरित मजुरांना गावी परतण्यासाठी काँग्रेसकडून सोडण्यात येणाऱ्या बसेसच्या मुद्द्यावरून प्रचंड राजकारण रंगले आहे. गेल्या दोन तीन दिवसांपासून काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी आणि योगी आदित्यनाथ सरकारमध्ये खडाजंगी सुरु आहे. या पार्श्वभूमीवर प्रियंका गांधी यांनी बुधवारी पत्रकारपरिषद घेऊन योगी सरकारवर हल्ला चढवला. ”ही वेळ राजकारणाची नसून आपण स्वत:ची जबाबदारी ओळखली पाहिजे. देशाच्या विविध भागांतून उत्तर प्रदेशातील मजूर आपापल्या मूळगावी परतत आहेत. हे लोक फक्त भारतीयच नाहीत तर ते देशाचा कणा आहेत. ते आपलं रक्त आणि घाम गाळतात म्हणून देश चालतो. त्यामुळे त्यांची जबाबदारी घेणे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे.” असं प्रियांका गांधींनी पत्रकारपरिषदेत म्हटलं.

तसेच ”आम्ही २४ तासांपूर्वीच या मजुरांसाठी बसेसची व्यवस्था केली आहे. त्यामुळे आता उत्तर प्रदेश सरकारला या बसेस मजुरांना परत आणण्यासाठी वापराव्यात. पण या बसेसना उत्तर प्रदेशच्या हद्दीत प्रवेश करण्याची परवानगी द्यावी. हवं तर तुम्ही या सर्व बसगाड्यांवर भाजपचे झेंडे आणि स्टीकर लावा. या बसगाड्यांची व्यवस्था भाजपने केली असेही सांगा. परंतु, कृपा करुन या बस चालवण्यात याव्यात,” अशी विनंती प्रियंका गांधी यांनी योगी सरकारला केली आहे.

नेमकं काय आहे वादाचं कारण?
काँग्रेस पक्षाने उत्तर प्रदेशकडे परतणाऱ्या स्थलांतरित मजुरांना त्यांच्या गावी सोडण्यासाठी १ हजार बसेसची व्यवस्था केली आहे. सुरुवातीला या बसेस चालवण्यासाठी योगी सरकारने परवानगी दिली नव्हती. बऱ्याच गदारोळानंतर योगी सरकार त्यासाठी राजी झाले. मात्र, योगी सरकारने आधी काँग्रेसकडून या १ हजार बसेसचा तपशील मागवला. त्यानंतर योगी सरकारच्या पुढच्या मागणीनुसार काँग्रेसकडून १ हजार बसगाड्यांचा वाहन क्रमांक, त्यांचे चालक असा सगळा तपशीलही पुरवण्यात आला. मात्र, यानंतरही योगी सरकारने काँग्रेसने १ हजार बसेसची व्यवस्था केल्याचा दावा फेटाळून लावला. वाहनांचे क्रमांक तपासले असता यापैकी अनेक गाड्या बस नसून बाईक, कार आणि रिक्षा असल्याचे निदर्शनास आल्याचे योगी सरकारचे म्हणणे आहे. मात्र, काँग्रेसनं हा दावा फेटाळून लावला आहे. दरम्यान, काँग्रेसच्या बस अजूनही मजुरांना गावी पोहचवण्याच्या प्रतीक्षेत असून हवं तर काँग्रेसनं पाठवलेल्या बसेसला भाजपचे झेंडे लावा, पण मजुरांसाठी ‘त्या’ बस सोडा अशी विनंती प्रियांका गांधींनी केली योगी सरकारला आता केली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

‘त्या’ मृत मुलाच्या कुटुंबियांचे अहवाल निगेटिव्ह; जावलीकरांच्या आला जीवात जीव

मेढा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील जावली तालुक्यातील म्हाते खुर्द या कंटेन्मेंट झोनमधील गावातील त्या मुलाच्या कुटुंबातील सदस्यांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने गावकऱ्यांनी सुटकेचा निश्वास घेतला.  या गावात मुंबईहून राहायला आलेल्या एका कुटुंबात एक मृतदेह तीन दिवस आपल्या घरीच ठेवल्याची घटना घडली होती. मुंबईवरून पहिल्यांदाच आपल्या गावी राहायला आलेल्या दळवी कुटुंबातील १६ वर्षाचा मुलगा अर्णव दळवी याचा मृत्यू झाला होता. पण कोरोना संसर्गामुळे आजूबाजूला झालेल्या संशयी वातावरणामुळे दळवी कुटुंबाने आपल्या घरी मृत्यू झाल्याचे लपवून ठेवले. व मृतदेह घरीच ठेवला होता. या कटुंबातील सदस्यांनी मुलाला कोरोना असल्यामुळे मृतदेह लपवला नाही ना? अशी भीती नागरिकांमध्ये होती 

अर्णव च्या मृतदेहाचे जैविक विघटन होण्यास सुरुवात झाल्यावर पसरलेल्या दुर्गंधीने परिसरातील लोकांना मृत्यू झाल्याचे समजले. मृतदेह विघटित झाल्याने शवविच्छेदनात मृत्यू कशाने झाला हे समजले नव्हते. त्यामुळे त्याला कोरोना झाला होता की नाही याची खात्री नव्हती. म्हणूनच या कुटुंबातील इतर सदस्यांचे स्वॅब पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. तसेच या कुटुंबाला रायगाव येथे संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले होते. महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे गावातील लोकांना प्रचंड चिंता वाटत होती. मात्र आज या कुटूंबाचे अहवाल नकारात्मक आल्याने गावकऱ्यांचा जीव भांड्यात पडला आहे. 

मुंबईहून आलेल्या या कुटुंबाच्या संशयात्मक कृती जसे की आजूबाजूच्यांशी फार बोलायचे नाही, आशा सेविका, आरोग्य कर्मचारी यांना पुरेशी माहिती द्यायची नाही यामुळे नागरिकांनी ही माहिती सरपंच विमल दळवी यांना माहिती दिली होती. अर्णव गेल्या काही महिन्यांपासून आजारी होता. असे प्राथमिक तपासणीत दिसून आले होते. पण गाव कंटेन्मेंट झोनमध्ये असल्याने नागरिकांमध्ये हा प्रकार काहीतरी वेगळा असल्याची भीती निर्माण झाली होती. पण आजच्या अहवालामुळे आता सर्वांची चिंता नाहीशी झाली आहे.

सुब्रमण्यम स्वामींचा उद्धव ठाकरेंना सल्ला, आघाडीतून बाहेर पडण्याची ‘हीच ती वेळ’ अन्यथा..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । यंदाची महाराष्ट्रातील निवडणूक आणि विशेषतः निवडणूक निकालानंतरची मुख्यमंत्री पदाची निवड होईपर्यंतचा काळ चांगलाच गाजला आहे. अनेक चढ-उतारांनी या निवडणुकीने देशभरात चर्चेला कारण दिले. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून रोज नव्याने त्यांच्यावरच्या टीका आणि त्यांना दिले जाणारे सल्ले चर्चेत येत असतात. याच चर्चांमध्ये भाजपा नेते सुब्रमण्यम स्वामी एक नवा मुद्दा दिला आहे. त्यांनी नुकताच एक लेख आपल्या ट्विटर अकाउंट वरून प्रसिद्ध करत राष्ट्रपती राजवट हा महाराष्ट्रासाठी एकमेव पर्याय आहे का? असे ट्विट केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना युती तोडा अथवा राष्ट्रवादी आणि काँग्रेस तुम्हाला संपवून टाकेल असा सल्ला त्यांनी दिला आहे.

देशाच्या एकूण कोरोना बाधितांपैकी ३३% रुग्ण हे महाराष्ट्रात आहेत  २० टक्के  रुग्ण मुंबईत आहेत. अशी आकडेवारी देत स्वामी यांनी महाराष्ट्र सरकार या संकटकाळात उपाययोजना करण्यात, लोकांना वाचविण्यात अपयशी ठरले आहे असे आपल्या लेखात लिहिले आहे. मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. इथे हजारो परदेशी प्रवासी रोज येत असतात. जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना ला साथीचा आजार म्हणून घोषित केल्यावरच महाराष्ट्र सरकारने कडक पावले उचलण्याची गरज होती. मात्र ते केंद्र सरकारची वाट बघत बसले. आपल्या राज्यातील लोकांना सुरक्षित ठेवणे ही राज्याची जबाबदारी असते पण महाराष्ट्र सरकार ते करू शकले नाही, असे त्यांनी म्हंटले आहे.

महाराष्ट्रातील मंत्र्यांचे आपापल्या खात्यातील काम नीट नसून त्यांच्यातील परस्पर समन्वयही नसल्याचे स्वामी यांनी लिहिले आहे. ते महाराष्ट्रातील सद्यपरिस्थितीला पूर्णतः सरकारला जबाबदार ठरवत आहेत. आरोग्य मंत्री राजेश टोपे, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्यांची कामे व्यवस्थित न केल्याने ही स्थिती उत्पन्न झाल्याचे ते म्हणतात. हा लेख प्रसिद्ध करताना त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आताच युती तोडा अन्यथा राष्ट्रवादी आणि काँग्रेस तुम्हाला संपवून टाकेल असा सल्ला दिला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

देवेंद्र फडणवीस राज्यात अस्थिरता पसरवण्याचा रचतायत ‘कट’- बाळासाहेब थोरात

मुंबई । राज्यातील विधान सभेचे विरोधी पक्षनेते तथा भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह दिल्ली आणि राज्यातील काही नेते एकत्र मिळून महाराष्ट्रातील सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप राज्याचे महसूल मंत्री आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केला. एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना त्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ”राज्य कोरोनाच्या संकटात असताना भाजपला राजकारण सुचत आहे. सुब्रमण्यम स्वामी यांनी उद्धव ठाकरे यांना महाविकासआघाडीतून बाहेर पडण्याचा दिलेला सल्ला या कटाचा भाग असल्याचा दावा थोरात यांनी यावेळी केला.

राज्य कोरोनाच्या संकटात असताना  भाजपचे नेते राजकारण करायचे नाही, म्हणून सांगतात. पण दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांच्यासह दिल्ली आणि राज्यातील काही नेते सातत्याने सरकार अडचणीत कसे येईल, हे पाहत आहेत. सरकार अस्थिर करण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु आहेत. आज राज्यावर संकट आले असताना त्याला सामोरे जायचे सोडून भाजप राजकारण करु पाहत आहे. भाजपची कृती ही महाराष्ट्रद्रोही आहे. भाजपने सरकारविरोधात पुकारलेले आंदोलन हे ‘महाराष्ट्र बचाव’ नव्हे तर ‘भाजप बचाव’ या भूमिकेतून पुकारलं असल्याची टीका थोरात यांनी केली.

भाजप आंदोलनाच्या मूडमध्ये
भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी येत्या २२ तारखेला भाजप ‘महाराष्ट्र बचाव’ आंदोलन करणार असल्याचे सांगितले. कोरोना राज्यात येऊन ६० दिवस उलटले. तरीदेखील राज्य सरकारने काहीच केलेले नाही. त्यामुळे आम्ही २२ तारखेला महाराष्ट्र बचाव आंदोलन करुन सरकारला जाब विचारणार आहोत. २२ मे रोजी सकाळी ११ वाजता जनतेने हे आंदोलन करून नागरिकांनीही आपला निषेध नोंदवावा, असे आवाहन भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”